Monday, December 22, 2025
Home Blog Page 523

UPI New Scam | UPI द्वारे पेमेंट करत असाल तर सावधान; काही मिनिटातच बँक खाते होईल खाली

UPI New Scam

UPI New Scam | सध्या संपूर्ण भारत डिजिटल झालेला आहे. सगळे आर्थिक व्यवहार देखील आता डिजिटल पद्धतीने चालू झालेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही वर्षांपूर्वी पाहिलेले होते. आणि तेच स्वप्न आता पूर्ण होण्याच्या तयारीत आहे. 2016 पासून भारतामध्ये UPI सेवा सुरू झाली, हा पेमेंट करण्याचा एक अत्यंत सोपा आणि लोकप्रिय पर्याय आहे. अनेक लोक UPI च्या माध्यमातूनच पेमेंट करत असतात. कॅश किंवा कार्ड पेमेंट करण्यापेक्षा अनेक लोक UPI ने पेमेंट करण्याला जास्त प्राधान्य देतात. कारण याने पेमेंट अगदी जलद गतीने होते. आणि यासाठी कोणत्याही प्रकारची रिस्क देखील घ्यावी लागत नाही.

परंतु सध्या UPI च्या (UPI New Scam) वाढत्या पेमेंटमुळे फसवणुकीच्या घटकांमध्ये देखील वाढ झालेली दिसत आहे. फसवणूक करणारे लोक नवनवीन मार्ग शोधत आहेत. आणि सर्वसामान्य लोकांच्या पैशाची फसवणूक करत आहेत. तसेच ओटीपीच्या माध्यमातून देखील अशा अनेक घटना घडल्याच्या बातम्या समोर आलेल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिक बळी पडतात आणि त्यांच्या अकाउंटमधील पैसे जातात. पण हा यूपीआय ऑटो पे स्कॅम काय आहे? हे आज आपण जाणून घेणार आहोत

UPI ऑटो पे स्कॅम | UPI New Scam

UPI द्वारे यूजरची (UPI New Scam)ऑटो पे द्वारे फसवणूक केली जाते. म्हणजे तुम्ही नेटफ्लिक्स किंवा डिस्नी साठी जर रिक्वेस्ट पाठवली असेल, तर लोक त्याचा फायदा घेतात आणि तुम्हाला विनंती करतात. यावेळी युजर तुम्हाला रिक्वेस्ट पाठवतात. परंतु आपल्याला असे वाटते की ती रिक्वेस्ट त्या कंपनीकडूनच आलेली आहे. आणि आपण ती स्वीकारतो आणि आपल्या खात्यातून पैसे जातात. परंतु हे पैसे आपल्या कोणत्या सबस्क्रिप्शनसाठी न जाता ही फसवणूकदारांच्या बँक खात्यात गेलेले असतात. भारतात या खोट्या फसवणुकीला अनेक लोक बळी पडलेले आहेत. परंतु यापासून आपण स्वतःला वाचवणे आणि आपले पैसे सुरक्षित ठेवणे खूप गरजेचे आहे.

आजकाल लोक शॉपिंग, रेस्टॉरंट, मॉल, पार्किंग इत्यादी ठिकाणी आपला नंबर देतात किंवा आपल्या यूपीआय आयडीवरून पेमेंट करतात. त्यामुळे लोक त्याचा गैरफायदा घेतात आणि आपला UPI आयडी त्यांना समजतो. आणि ते फसवणूक करतात. तुम्हाला जर यासारख्या फसवणुकीपासून रक्षण करायचे असेल, तर तुमचा यूपीआय आयडी तुमच्या बँक खात्याशी संलग्न करू नका. त्याऐवजी तुमच्या वॉलेटमध्ये पैसे ठेवण्याचा प्रयत्न करा आणि कॅशद्वारे जास्तीत जास्त पेमेंट करत जा. त्यामुळे तुमच्या बँक खात्यातील पैसे देखील सुरक्षित राहतात आणि तुमचे काम देखील होते. तसेच कोणतीही ऑटो पे रिक्वेस्ट स्वीकारण्यापूर्वी ती नक्की कोणती रिक्वेस्ट आहे. या गोष्टीची पूर्ण शहानिशा करा आणि नंतरच तुमचे पैसे पाठवा. अन्यथा तुमचे खूप मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते.

Pune Metro : कधी सुरु होणार पुणे मेट्रोचा महत्वाचा टप्पा ? अपडेट आली समोर

Pune Metro : मुंबईनंतर राज्यातील महत्वाचे शहर म्हणजे पुणे. पुण्यात शिक्षण, नोकरी, व्यवसायासाठी अनेकजण येत असतात. अशा या पुण्याची संख्या देखील काही वर्षात वाढली आहे. परिणामी पुण्याच्या सार्वजनिक वाहतुकींमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढली आहे. बस आणि लोकल नंतर आता सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये मेट्रोचीही (Pune Metro) भर पडली आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी सोय होते आहे.

सध्या पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट म्हणजेच पर्पल मेट्रो लाईनचा पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट हा भाग वाहतुकीसाठी सुरू आहे. तसेच वनाज ते रामवाडी हा मार्ग देखील मेट्रोसाठी खुला करण्यात आले आहे. आता पुणेकरांना सिविल कोर्ट- स्वारगेट ही मेट्रो लाईन कधी सुरू होणार याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. पुणेकरांची प्रतीक्षा संपणार आहे कारण लवकरच या मेट्रो मार्केटचे उद्घाटन होणार असून ही मार्गिका सुरू होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सुरुवातीला सिविल कोर्ट ते स्वारगेट पर्यंतची मेट्रो सेवा ऑगस्ट 2024 पर्यंत खुली केली जाणार असा दावा केला जात होता. या पार्श्वभूमीवर महा मेट्रोने देखील खूप प्रयत्न केले होते. पण तांत्रिक अडचणींमुळे हे काम लांबणीवर पडल्याचं कळतंय. यामुळे महा मेट्रो ने ठरवलेल्या वेळेत हा प्रकल्प सर्वसामान्यांसाठी सुरू होऊ शकला नाही. पण बांधकाम (Pune Metro) अंतिम टप्प्यात असून येत्या काही दिवसातच हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.

काशीपर्यंत सुरु होणार मार्गिका ? (Pune Metro)

लवकरच या प्रकल्पाचे काम पूर्ण होणार आहे असा अहवाल देखील अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेला आहे. महा मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकल्पाचे काम जवळपास पूर्णत्वास आले आहे. म्हणून महा मेट्रो ने मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त यांच्याशी संपर्क साधला असल्याची माहिती आहे. एवढेच नाही तर तीन स्थानकांसह संपूर्ण भागासाठी सुरक्षा तपासणीची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे. सप्टेंबरच्या मध्यापर्यंत हा मार्ग सुरू करण्यासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. गणेशोत्सवाच्या अखेरीस हा मार्ग वाहतुकीच्या सेवेत दाखल होऊ शकतो अशी अशा आता प्रवाशांना लागून राहिली आहे. त्यामुळे पुढच्या महिन्यात सिविल कोर्ट ते स्वारगेट हा संपूर्ण भूमिगत मेट्रो मार्ग (Pune Metro) पुणेकरांच्या सेवेत दाखल होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गिका (Pune Metro)

पुणेकरांसाठी आणखी एक महत्त्वाची बातमी म्हणजे स्वारगेट ते कात्रज अशी नवी मेट्रो लाईन बांधण्यासाठी केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. पुणे हे देशातील पाच मोठ्या महानगरांपैकी एक असून पुण्यातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळांना मेट्रो लाईनचा विस्तार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. या निर्णयानुसार स्वारगेट ते कात्रज अशी नवीन मेट्रोलाईन करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. 5.4 किलोमीटरचा हा प्रकल्प असणार आहे. यामध्ये तीन नवीन मेट्रोस्थानक असतील. या प्रकल्पाचा अंदाज हे खर्च 2954 कोटी रुपये असेल. हा (Pune Metro) प्रकल्प 2019 पर्यंत पूर्ण होण्याची (Pune Metro) शक्यता केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सांगितली आहे.

धनंजय मुंडे आयोजित बीड कृषी महोत्सवावर मराठा समाजाचा बहिष्कार?? कोणीही सहभाग न घेण्याचे आवाहन

beed krishi mahotsav maratha samaj

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या पुढाकाराने 21 ऑगस्ट पासून परळी वैद्यनाथ येथे पाच दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सव (Beed Krishi Mahotsav) आयोजित करण्यात आला आहे. केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. मात्र राज्यातील मराठा समाजातील(Maratha Community) बांधवांकडून या कृषी महोत्सवावर बहिष्कार घालण्यात येणार आहे. तशा प्रकारचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे कृषी महोत्सवापूर्वीच मराठा समाजाकडून धनंजय मुंडे यांच्यासाठी हा मोठा दणका मानला जात आहे.

सोशल मीडियात फिरणाऱ्या मेसेज मध्ये म्हंटलय तरी काय?

जातीयवादी व मराठा विरोधी धनंजय मुंडे यांनी परळी येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कृषी महोत्सवावर राज्यातील मराठ्यांनी बहिष्कार घालायचा ठरवले आहे. मराठ्यांनी ताकद दाखवायची हीच वेळ आहे. परळीतील कार्यक्रम उधळला तर येत्या २९ तारखेपर्यंत सरकार काही निर्णय करेल, अन्यथा मराठे २९ तारखेला निर्णय करतील असं मराठा समाजाने म्हंटल आहे. कोणत्याही मराठ्याने या कृषी महोत्सवाकडे जायचे नाही, कोणीही मराठा बांधवाने या महोत्सवामध्ये स्टॉल लावू नये, कोणीही मराठा बांधवाने या महोत्सवामध्ये जनावरे घेवुन येवू नये, तसेच कोणीही मराठा बांधव किंवा भगिनी या महोत्सवात भाग घेवू नये असं आवाहन करणारा मेसेज सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरत आहे. महत्वाची बाब म्हणजे याला मनोज जरांगे पाटील यांचा पाठिंबा आणि मूकसंमती आहे अशी सूत्रांची माहिती आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यभरातील मराठा समाज हा आक्रमक झाला आहे. ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण द्या या मागणीवर मनोज जरांगे आजही ठाम आहेत. याच मुद्द्यावरून राज्यातील ओबीसी नेत्यांविरुद्ध जरांगे पाटील यांचे खटकेही उडाले. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाच्या नाराजीचा फटका महायुती सरकारला बसला. खास करून मराठवाड्यात मराठा समाजाच्या रोषाला सरकारला सामोरे जावं लागलं. बीडमध्ये पंकजा मुंडे याना बजरंग सोनावणे यांच्याकडून पराभव पत्करावा लागला, जालन्यात रावसाहेब दानवे यांचा आपल्याच बालेकिल्ल्यात धक्कादायक पराभवाला सामोरे जावं लागलं होते. तर लातूर आणि नांदेड मधेही काँग्रेसच्या हाताला बळ मिळालं आणि भाजप भुईसपाट झाली. हा सर्व जरांगे फॅक्टरचा प्रभाव आहे असं बोललं जातं. आताही जरांगे पाटलांनी २९ ऑगस्ट पर्यंत सरकारला अल्टिमेटम दिला असून पुढची भूमिका जाहीर करू असा इशारा दिला आहे.

No Raksha Bandhan Celebration | भारतातील या गावात साजरी होत नाही रक्षाबंधन; राखी बांधून घेण्यास घाबरतात भाऊ

No Raksha Bandhan Celebration

No Raksha Bandhan Celebration | हिंदू कालगणनेनुसार श्रावण महिना चालू झालेला आहे. आणि या श्रावण महिन्यामध्ये अनेक सण येतात आणि संपूर्ण महाराष्ट्रात हे सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातात. यातीलच भाऊ बहिणीच्या नात्याचा पवित्र सण म्हणजे रक्षाबंधन. हा सण देखील देशभरात उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक बहिण आपल्या भावाच्या हातात राखी बांधते आणि भाऊ तिला आयुष्यभर तिचे संरक्षण करेल असे वचन देतो. हा सण सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. परंतु आपल्या भारतात असे एक गाव आहे, ज्या ठिकाणी रक्षाबंधन साजरी (No Raksha Bandhan Celebration) केली जात नाही. कारण तिथल्या मुलांच्या मनात एक खूप मोठी भीती आहे. त्यामुळे ते रक्षाबंधन साजरे करत नाही. पण नक्की हा प्रकार काय आहे? आणि कोणत्या गावात सुरू आहे हे आज आपण जाणून घेऊया.

रक्षाबंधनाच्या (No Raksha Bandhan Celebration) दिवशी बहिणीने राखी बांधल्यानंतर भाऊ तिला ओवाळणी म्हणून काहीतरी गिफ्ट देत असतो. अनेक बहिणी गिफ्ट साठी हट्ट करत असतात. परंतु बहिणीच्या या गिफ्टमुळे आपल्याला घर सोडावे लागू नये. अशी भीती अनेक गावकऱ्यांच्या मनात पूर्वीपासून आहे. त्या विरुद्ध आवाज देखील उठवण्यात आला. परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. बहिणींनी आगळीवेगळी ओवाळणी मागू नये, यासाठी भाऊ राखी बांधून घेत नाही.

बेनिपुर गावातील प्रकार | No Raksha Bandhan Celebration

उत्तर प्रदेशातील बेनिपुर हे एक असे गाव आहे. ज्या ठिकाणी रक्षाबंधन साजरे होत नाही. हे गाव या रक्षाबंधनाच्या सणाला अपवाद आहे. कारण त्यांना वाटते की, बहिणींनी ओवाळणीमध्ये जर त्यांना गाव सोडून जायला सांगितले, तर ते काय करणार? ही भीती त्यांच्या मनात खूप पूर्वीपासूनच आहे. या गावांमध्ये यादव आणि ठाकूर या दोन समाजाची जास्त लोक राहतात. दोन्ही समाजाकडे खूप चांगली जमीनदारी होती. त्यांचे संबंध देखील चांगले होते.

परंतु गावातील जुनी मंडळी सांगतात की, ठाकूर या परिवारात गेल्या अनेक पिढ्यांमध्ये मुलाचा जन्म झालेला नाही. त्यावेळी ठाकूर परिवारातील एका मुलीने यादव परिवारातील एका मुलाला राखी बांधली आणि ही प्रथा कायम राहिली. हा सण मोठ्या उत्साहाने साजरा जात होता. आणि एकदा ठाकूर यांच्या मुलीने जमीनदाराच्या मुलाला राखी बांधली आणि ओवळणीमध्ये जमीन मागितली आणि त्यानंतर त्यांनी त्या दिवशी गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला.

ठाकुराची मुलगी आणि गाववाल्यांनी त्यांना जमीनदाराला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. पण त्यांनी ऐकले नाही. आणि आपली जमीन सोणून कुटुंबाला घेऊन ते बेनिफर गावात येऊन राहू लागली. बेनेपूर गावात यादव समाज गेल्या अनेक वर्ष राहत होता. त्यांनी मिळून निर्णय घेतला की, इथून ठाकूर परिवाराकडून राखी बांधून घ्यायची नाही. त्यामुळे ते रक्षाबंधन साजरी करत नाही.

MSRTC : साताऱ्यातून लालपरी होणार कालबाह्य ! MSRTC चा महत्वपूर्ण निर्णय

MSRTC : महाराष्ट्राची शान असलेली ‘लालपरी’ राज्याच्या वाड्या वस्त्यांवर राहणाऱ्या प्रवाशांकरिता आजही वरदान आहे. मात्र मागच्या काही दिवसांपासून लाल परीला आर्थिक नुकसानीची झळ सोसावी लागत आहे. हेच नुकसान भरून काढण्यासाठी MSRTC ने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला असून साताऱ्यात इलेक्ट्रिक बसेसची सुरुवात करण्यात आली आहे. साताऱ्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून नव्या ई बसेसची सेवा सुरू करण्यात येतील अशी घोषणा करण्यात आली होती मात्र आता प्रवाशांची प्रतीक्षा संपुष्टात आली असून सातारा जिल्ह्यामध्ये इ बसेस दाखल झाल्या (MSRTC) आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, या बसेस या पूर्णपणे वातानुकूलित यंत्रणांच्या असणार आहेत त्यामुळे सातारकरांचा प्रवास आता थंडगार आणि आणखी सुखद होणार आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एम एस आर टी सी कडून हा निर्णय घेण्यात आला आहे. वातानुकूलित असण्याबरोबरच या बसेस (MSRTC) ऑटोमॅटिक सुद्धा आहेत.

सातारातील एसटी स्टँड मध्ये पहिल्या टप्प्यात पाच गाड्या दाखल झाल्या असून एसटी महामंडळाच्या आवारात ई-बस साठी आवश्यक असणारी चार्जिंग पॉइंट ची सुविधा सुद्धा करण्यात आली आहे. या गाड्यांची प्रवासी संख्या जवळपास 35 इतकी आहे. सातारा जिल्ह्यामध्ये प्रवाशांचा प्रतिसाद पाहता गाड्यांची संख्या वाढवण्यात देखील येणार आहे. या गाड्या पूर्णपणे इलेक्ट्रिक असल्यामुळे इंधनाचा खर्चही कमी (MSRTC) होणार आहे.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार सातारा मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून लाल पोरीचा गोंधळ समोर येत होता. गाड्यांची अस्वच्छता, अनेक गाड्या मोडकळीस आलेल्या होत्या, शिवाय काही गाड्या ह्या मध्येच बंद पडत होत्या त्यामुळे प्रवाशांची गैरसोय मोठ्या प्रमाणात होत होती. याचा परिणाम सातारा जिल्ह्यातून होणाऱ्या एम एस आर टी सी च्या आर्थिक स्थिती वर होत होता. म्हणूनच ही आर्थिक दरी भरून काढण्यासाठी (MSRTC) साताऱ्यामध्ये इलेक्ट्रिक बसेसची सुरुवात करण्यात आली आहे.

Streetlights On Moon : चंद्रावर उभारण्यात येणार स्ट्रीटलाइट्स; 100 मीटर पेक्षाही उंच असणार

Streetlights On Moon

Streetlights On Moon आपल्याला सुरुवातीपासूनच चंद्राचे आकर्षण राहिले आहे. निल आर्मस्ट्रॉंगने सर्वात आधीच चंद्रावर पहिले पॉल टाकलं. त्यानंतर अनेक उपग्रह चंद्रावर पाठवण्यात आली. चंद्रावर वातावरण कस आहे? पाण्याचा साठा आहे का? खनिजे आहेत का? याचा शोध शास्त्रज्ञ घेत असतात. भारताने सुद्धा २०४० पर्यंत मानवाला चंद्रावर पाठवण्याची योजना आखली आहे. आता तर शास्त्रज्ञ चंद्रावर उजेड पडण्यासाठी स्ट्रीटलाइट्स बसवण्यात येणार आहेत. या स्ट्रीट लाईट्स उंची कुतुबमिनार पेक्षाही जास्त असेल.

100 मीटर पेक्षाही उंच -Streetlights On Moon

शास्त्रज्ञांना चंद्रावर मानवी वसाहती, रेल्वे यंत्रणा, अणुभट्ट्या इत्यादी उभारायच्या आहेत. परंतु या सर्व गोष्टी करण्यासाठी महत्वाची गोष्ट असणार आहे ती म्हणजे प्रकाश… कारण प्रकाशच नसेल तर कोणतीच कामे करणं शक्य होणार नाही. आपल्या पृथ्वीसारखे चंद्रासारखं १२ तास दिवस आणि १२ तास रात्र नसते. चंद्रावरचा एक दिवस पृथ्वीच्या दोन आठवड्यांच्या बरोबरीचा असतो. त्यामुळे माणूस जर चंद्रावर गेला तर त्याठिकाणी त्याला सर्वात जास्त गरज लागेल ती म्हणजे प्रकाशाची… त्यासाठी स्पेस टेक्नॉलॉजी कंपनीने उपाय शोधला असून चंद्रावर LunarStreetLamp उभारण्याची कंपनीची योजना आहे. हा लाईटचा खांब सोलर बॅटरी म्हणूनही काम करेल.

LUNARSABER असे या प्रकल्पाचे नाव आहे. अमेरिकन सरकारी एजन्सीकडून या प्रकल्पाला निधी दिला जात आहे. त्याचा प्रमोशनल व्हिडीओ समोर आला आहे. या प्रकल्पाचे प्रमुख अन्वेषक विष्णू सेंगेपल्ली यांनी म्हंटल, चंद्रावर बसवलेला प्रत्येक स्ट्रीटलाईट दिवा हा पृथ्वीवरील दिव्यांपेक्षा स्वस्त असेल आणि त्याची उंची 100 मीटर असेल. जोपर्यंत चंद्रावर दिवस आहे तोपर्यंत LunarSaber दिवे सूर्यप्रकाश साठवून ठेवेल आणि रात्रीच्या वेळी याच साठवून ठेवलेल्या लाईटचा प्रकाश पाडण्यात येईल . चंद्रावर जास्त खड्डे असल्याने या स्ट्रीटलाईट्सची उंची (Streetlights On Moon)जास्त ठेवण्यात आली आहे. जास्त उंचीचे बल्ब असल्याने जास्तीत जास्त भागांवर त्याचा प्रकाश पडेल.

IRCTC : रेल्वेचे कन्फर्म तिकीट हवे आहे ? जाणून घ्या IRCTC च्या ‘या’ पर्यायाबद्दल

IRCTC : सध्या दशभरात सण आणि उत्सवाचा काळ सुरु आहे. आज रक्षाबंधन असून काही दिवसातच गणेशोत्सव आणि दिवाळी ते खिस्तमस पर्यंत सण सुरूच असतात. सणानिमित्त अनेकजण आपापल्या गावी जात असतात. यासाठी ट्रेन ह्या सर्वजनिक वाहतुकीच्या साधनाचा आवर्जून वापर केला जातो. पण गर्दीच्या करणामुळे अनेकदा रेल्वेचे तिकीट मिळत नाही. म्हणूनच आजच्या लेखात आपण ट्रेनचे कन्फर्म तिकीट (IRCTC) मिळण्याचा फंडा जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया…

IRCTC चा विकल्प पर्याय (IRCTC)

भारतीय रेल्वेने आपल्या प्रवाशांसाठी कन्फर्म तिकीट मिळवण्यासाठी VIKALP चा पर्याय आणला आहे. ही एक अशी सुविधा आहे. या सुविधेचा वापर करून तुमचे कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता वाढते. खरेतर रेल्वेने २०१५ मध्ये प्रवाशांसाठी ही पर्याय योजना सुरू केली होती. या सुविधेअंतर्गत , वेटिंग तिकीट ऑनलाइन बुक करताना, प्रवासी कन्फर्म तिकीट मिळविण्यासाठी दुसऱ्या ट्रेनचा पर्याय देखील निवडू शकतात. असे केल्याने त्यांचे कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता वाढते. या योजनेला अल्टरनेट ट्रेन अकमोडेशन स्कीम (ATAS) असेही म्हणतात. यासह, रेल्वे अधिकाधिक प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळते.

कसे मिळवाल कन्फर्म तिकीट (IRCTC)

IRCTC ऑप्शन तिकीट बुकिंग योजनेमुळे, प्रवाशांना सणासुदीच्या काळात आणि इतर प्रसंगी ट्रेनमध्ये कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता लक्षणीय वाढते. तथापि, विकल्पचा अर्थ असा नाही की तुम्हाला कन्फर्म तिकीट मिळेल. या योजनेंतर्गत आपल्या प्रवाशांना कन्फर्म तिकिटे मिळावीत यासाठी रेल्वे सर्वतोपरी प्रयत्न करते, परंतु ते त्यातील गाड्या आणि बर्थच्या उपलब्धतेवर अवलंबून असते.

VIKALP चा कसा वापर कराल ?

IRCTC ची Vikalp योजना वापरण्यासाठी, IRCTC वेबसाइटवरून तिकीट बुक करताना, तुम्ही तुमच्या ट्रेनमधील जागांच्या उपलब्धतेची स्थिती तपासली पाहिजे. ट्रेनमध्ये सीट उपलब्ध नसल्यास आणि प्रकरण वेटिंग लिस्टचे असल्यास, ऑनलाइन ट्रेन तिकीट बुक करताना तुम्ही VIKALP निवडा.

निवडू शकता 7 ट्रेन

यानंतर IRCTC तुम्हाला तुमच्या आवडीच्या इतर ट्रेनबद्दल विचारते, ज्यामध्ये तुम्ही 7 ट्रेन निवडू शकता. तिकीट बुकिंग दरम्यान ऑप्शन ऑप्शन उपलब्ध नसेल तर तुम्ही बुक केलेल्या तिकीट हिस्ट्रीमध्ये जाऊन तिकीटाचा पर्याय निवडू शकता. यानंतर, भारतीय रेल्वे तुमच्या पसंतीच्या इतर ट्रेनमध्ये तुमच्यासाठी कन्फर्म तिकीट बुक करण्याचा प्रयत्न करेल. रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळवण्याचा हा ‘पर्याय’ म्हणजे निश्चित उपाय! तुम्ही हा पर्याय वापरून पाहिल्यास, तुम्हाला प्रत्येक वेळी पूर्ण सीट त्वरित मिळेल.

हाच का मेट्रो सिटी पुण्याचा विकास; पूरग्रस्त स्थितीवरून कमलताई व्यवहारे यांचा विरोधकांवर निशाणा

kamalatai vyavhare pune flood

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राचे सांस्कृतिक शहर पुणे हे यंदाच्या पावसात मात्र समुद्रासारखं पाण्याने भरलेले दिसलं. मागील २-३ दिवसांपासून पुण्यात मुसळधार पाऊस पडल्याने पुन्हा एकदा पुण्यातील अनेक सखल भागात पाणी साचल्याने पाहायला मिळालं. शहरातील लोहियानगर आणि गंज पेठ परिसरात सुद्धा ओसंडून पाणी वाहू लागलं असून नागरिकांची गैरसोय पाहायला मिळाली. प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा फटका पुणेकरांना बसत असून या एकूण सर्व परिस्थितीवरून काँग्रेस नेत्या आणि माजी महापौर कमलताई व्यवहारे(Kamaltai Vyavhare) यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. हाच का मेट्रो सिटी पुण्याचा विकास? असा सवाल कमलताई व्यवहारे यांनी केला आहे.

मुसळधार पावसामुळे पुण्यातील अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले. गंजपेठ- लोहियानगर या भरगच्च वस्ती असलेल्या भागात सुद्धा[पाणी तुंबल्याने संपूर्ण परिसराला नदीचे स्वरूप प्राप्त झालं आहे. साचलेल्या पाण्याचा मोठा फटका याठिकाणी राहत असलेल्या स्थानिक नागरिकांना बसत असून त्यांचं संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यामुळे पुण्याची स्मार्ट सिटी करतो अशा वलग्ना करणाऱ्या विरोधकांवर कमलताई व्यवहारे यांनी हल्लाबोल केला. हाच का मेट्रो सिटी पुण्याचा विकास? एका रात्रीत पावसामुळे पुण्यातील अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. असं म्हणत कमलताई व्यवहारे यांनी विरोधकांना लक्ष्य केले.

कोण आहेत कमलताई व्यवहारे?

कमलताई व्यवहारे या अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या सदस्य आहेत. १९९२ ते २०१७ या काळात त्या नगरसेवक होत्या. कमलताई व्यवहारे यांनी महिला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदही भुषवले आहे. पुणे शहरच्या त्या पहिल्या महिला महापौर आहेत. त्या महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीसही होत्या. गेली अनेक वर्ष त्या काँग्रेस पक्षासोबत निष्ठेने काम करत आहेत. पुण्यात काँग्रेस वाढवण्यात आणि रुजवण्यास कमलताई व्यवहारे यांचाही मोठा वाटा आहे.

Expressway: मुंबई -पुणे दरम्यानचा प्रवास अर्ध्या तासाने होणार कमी ; बनणार राज्यातील सर्वात लांब बोगदा

Expressway: मुंबईला आर्थिक राजधानी म्हणून संबोधले जाते तर पुणे हे शिक्षणाचे माहेरघर सध्या नोकरीसाठी सुद्धा पसंतीचे ठिकाण झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील पुणे आणि मुंबई ही दोन्ही शहरे तितकीच महत्त्वाची आहेत आणि या दोन्ही शहरांना एकमेकांशी जोडणारा मार्ग म्हणजे मुंबई पुणे एक्सप्रेसवे. पुणे ते मुंबई आणि मुंबई ते पुणे अशी दररोज सफर करणाऱ्या प्रवाशांची या रस्त्यावर काही कमी नाही. याशिवाय व्यापारी आणि इतर कारणांसाठी देखील या मार्गावरून मोठी वाहतूक होत असते.

मात्र मागच्या काही दिवसांपासून मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर दिवस-रात्र वाहनांची वर्दळ असल्यामुळे बऱ्याचदा इथे ट्रॅफिक जॅमची समस्या निर्माण होते. म्हणूनच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजेच एमएसआरडीसी ने खंडाळा घाटात 13.3 किलोमीटर लांबीचा ‘मिसिंग लिंक मार्ग’ बनवण्याचं काम हाती घेतले आहे. चला जाणून घेऊया या (Expressway) मार्गाबद्दल…

पुणे-मुंबई प्रवास अर्ध्या तासाने कमी (Expressway)

खंडाळा घाटात होत असलेल्या मिसिंग लिंक मार्गामुळे पुणे-मुंबई दरम्यानचा प्रवास हा अर्ध्या तासाने कमी होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या मिसिंग लिंक वर 1.75 किलोमीटर आणि 8.93 किलोमीटरचे दोन बोगदे केबल स्टेड पूल उभारले जाणार आहेत. केबल स्टेड पुलाचं काम अद्याप सुरू असून बोगद्यांचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या बोगद्यांच्या बाबतीत सांगायचं झाल्यास याची लांबी जवळपास नऊ किलोमीटर असल्याने तो राज्यातील सर्वात लांबीचा बोगदा ठरणार असल्याची माहिती एमएसआरडीसी च्या एका वरिष्ठ (Expressway) अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

काय आहे या बोगद्याची वैशिष्ट्य ? (Expressway)

या बोगद्याची लांबी 8.93 किलोमीटर असेल, तर रुंदी 21.5 मीटर असेल, या बोगद्याची उंची ही 11 मीटर असून यावरचा जो मार्ग आहे हा चार पदरी मार्ग असणार आहेत. तर हा बोगदा तयार करण्यासाठी ड्रिल अँड ब्लास्ट या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्याची माहिती आहे.

राज्यातील सर्वात लांब बोगदा (Expressway)

आता देशातील सर्वात मोठा बोगदा कोणता? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर देशातील महामार्गावरील सर्वात लांब बोगद्यांच्या यादीमध्ये पहिल्या स्थानावर जम्मू कश्मीरमधील डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी हा बोगदा असून त्याची लांबी 9.28 किलोमीटर (Expressway) आहे. राज्यातील बोगद्यांच्या बद्दल बोलायचं झाल्यास समृद्धी महामार्गावरील कसारा घाटातील नुकताच पूर्ण करण्यात आलेला बोगदा आठ किलोमीटर लांबीचा आहे. हा बोगदा राज्यातील सर्वात लांब बोगदा आहे. मात्र पुढील काही महिन्यात ‘मिसिंग लिंक’ वरील 8.93 किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे काम पूर्ण होणार असल्याने तो राज्यातील सर्वात लांब बोगदा ठरणार आहे

Viral Video | जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्याचा नाद नाय करायचा ! विविध प्राणी पक्षांचे काढले आवाज

Viral Video

Viral Video | यावर्षी आपण 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याचे 78 वर्षे पूर्ण केले आहेत. आपला भारत देश स्वतंत्र झालेला 78 वर्षे पूर्ण झालेले आहे. स्वातंत्र्य दिन हा आपल्या देशाचा एक राष्ट्रीय सण आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरात मोठ्या प्रमाणात उत्साह असतो. शाळा कॉलेजमध्ये तर स्वातंत्र्य दिन हा कोणत्याही सणापेक्षा कमी नसतो. आपण लहानपणापासून स्वातंत्र्यदिनाबाबत खूप उत्सुक असतो. कारण या दिवशी शाळेमध्ये विविध कार्यक्रम असतात. अनेक विद्यार्थी त्यांचे कलागुण या दिवशी दाखवत असतात. सुंदर गाणी म्हणतात, देशभक्तीपर गीते म्हणतात. तसेच डान्स करतात. सध्या असाच एक 15 ऑगस्ट च्या शाळेतील व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये (Viral Video) जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलगा त्याच्या असा एक कलागुण दाखवत आहे. जे पाहून तुम्हालाही कौतुक वाटेल.

जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलं ही नेहमीच त् त्यांच्यात असणारे कलागुण हे सगळ्यांसमोर दाखवत असतात. काही जण या दिवशी भाषण करतात डान्स करतात. वेगवेगळी गाणी म्हणतात. परंतु या व्हिडिओमध्ये एका मुलाने अशी काही कला सादर केली आहे. जो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच पाहिजे होताना दिसत आहे.

https://www.instagram.com/reel/C-tmOg6yQRa/?utm_source=ig_embed&ig_rid=1a6de2c8-24f2-40cb-b8b8-f5ef2c6b8d0c

स्वातंत्र्य दिनाच्या बाहेर होणारे या व्हिडिओमध्ये (Viral Video) तुम्ही पाहू शकता की, जिल्हा परिषदेच्या शाळेत विविध कलागुण सादर करण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला असतो यावेळी शाळेतील एक मुलगा विविध प्राण्यांचे आणि पक्षांची आवाज काढताना दिसत आहे. तो सुरुवातीला एका श्वानाचा ओरडण्याचा आवाज करतो. त्याचे सादरीकरण पाहून सगळेच हसतात. नंतर तो कावळा, कोकीळा, शेळी यांसारख्या विविध प्राण्यांच्या आणि पक्षांचे आवाज काढून दाखवतो. सुरुवातीला सगळेजण तरी हसत असले, तरी त्याने काढलेल्या या आवाजाच्या सगळ्यांनाच खूप कौतुक वाटले आणि टाळ्यांच्या कडकडाटात त्याचे कौतुक करण्यात आले.

हा व्हिडिओ सध्या इंस्टाग्रामवर व्हायरल होत आहे. आतापर्यंत या व्हिडिओला 43 मिलियन पेक्षाही जास्त व्ह्यूज आलेले आहेत. तसेच 2 मिलियन पेक्षाही जास्त लाईक झालेले आहेत. तसेच अनेक युजर्स या व्हिडिओवर कमेंट्स देखील करत आहेत.