Monday, December 22, 2025
Home Blog Page 524

Weather Update | विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा पावसाची जोरदार बॅटिंग; हवामान खात्याने दिला इशारा

Weather Update

Weather Update | यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडलेला आहे. त्यामुळे अनेक नदी, नाले, धरणे देखील ओसंडून वाहत आहेत. परंतु त्यानंतर पावसाने काहीशी विश्रांती घेतली आणि आता राज्यात पुन्हा एकदा पाऊसची सुरुवात झालेली आहे. गेल्या दोन दिवसापासून संध्याकाळच्या वेळी चांगलाच पाऊस पडताना दिसत आहे. पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडलेला आहे. अशातच हवामान विभागाने आज देखील पावसाची (Weather Update) शक्यता वर्तवलेली आहे.

हवामान विभागाने पावसाबद्दलची शक्यता वर्तवलेली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार सोमवारपासून पुढील चार-पाच दिवस राज्यांमध्ये विविध जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. याबद्दल हवामान विभागाचे प्रमुख डॉक्टर कृष्णानंद होसाळीकर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून माहिती दिलेली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार 18 ऑगस्टपासून पुढील चार-पाच दिवस राज्यात मेघगरजेनेसह पावसाची शक्यता आहे. तसेच या पावसाचा जोरदार वारे असणार आहे आणि विजा पडण्याची देखील शक्यता वर्तवलेली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज कोकण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस (Weather Update) पडणार आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वारे देखील वाहणार आहे. त्यामुळे मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी, ठाणे, कोकण या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे.

त्याचप्रमाणे आज कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या भागात देखील पाऊस पडेल. तसेच अहमदनगर, पुणे, नाशिक या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. येत्या चार-पाच दिवसात मराठवाड्यात देखील पावसाची शक्यता आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, लातूर, नांदेड, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे. काही दिवसाचा ब्रेक घेतल्यानंतर आता पाऊस पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार कोसळण्यासाठी तयार झालेला आहे.

Gold Price Today : रक्षाबंधनाच्या दिवशी सोनं स्वस्त की महाग? आजचे भाव पहाच

Gold Price Today 19 august

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज रक्षाबंधन,,, बहीण भावाच्या नात्याचा खास असा सण.. परंतु आजच्या या शुभदिवशी सोने- चांदीच्या किमतीत (Gold Price Today) मात्र मोठी वाढ पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज २४ कॅरेट १० ग्राम सोने 71190 रुपयांवर व्यवहार करत असून आधीच्या तुलनेत या किमतीत ०.३६ टक्के म्हणजेच 252 रुपयांची वाढ झाली आहे तर चांदीच्या किमती सुद्धा 721 रुपयांनी महाग झाल्या असून १ किलो चांदीचा भाव सध्या 83746 रुपयांवर व्यवहार करत आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या किमतीत (Gold Price Today) आज चांगलेच चढउतार पाहायला मिळाले. सकाळी ९ वाजता ७११०० रुपयांपासून सोन्याचा व्यवहार सुरु झाला. थोड्याच वेळात या किमतीत वाढ होत गेली. ९ वाजून ४१ मिनिटांनी सोन्याचा भाव ७११८५ रुपयांवर पोचला… त्यानंतर सोन्याच्या किमती थोड्याफार खाली गेल्या मात्र १२ वाजून १५ मिनिटांनी सोन्याच्या किमतींनी ७१२४३ रुपयांचा उच्चांक गाठला. सध्या २४ कॅरेट १० ग्राम सोने 71190 रुपयांवर व्यवहार करत आहेत. तर दुसरीकडे गुड रिटर्न वेबसाईट नुसार, २२ कॅरेट १० ग्राम सोन्याचा दर ६६७०० रुपये आहे तर २४ कॅरेट सोने ७२७७० रुपये प्रति तोळा आहे. तर एक किलो चांदीचा भाव ८६००० रुपये इतका आहे.

गुड रिटर्न नुसार सोन्याचा भाव – Gold Price Today

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)-

पुणे- 66,700 रुपये
मुंबई – 66,700 रुपये
नागपूर – 66,700 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 72,770 रूपये
मुंबई – 72,770 रूपये
नागपूर – 72,770 रूपये

सोन्याची शुद्धता कशी तपासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

शरद पवार शकुनी मामा, एकनाथ शिंदे कर्ण आणि फडणवीस अर्जुन; सदाभाऊंची टोलेबाजी

Sadabhau Khot Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) हे सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका करत असतात. आताही त्यांनी राजकीय नेत्यांना महाभारतातील पात्रांची नावे देताना शरद पवारांचा उल्लेख शकुनी मामा असा उल्लेख केला आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कर्णासारखे दानवीर आहेत आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अर्जुन आहेत असेही सदाभाऊ खोत यांनी म्हंटल. भाजप नेते सम्राट महाडिक यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या (CM Ladki Bahin Yojana) प्रचारासाठी सांगलीत एक कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी सदाभाऊंनी आपल्या भाषणात जोरदार टोलेबाजी केली.

सदाभाऊ खोत म्हणाले, महायुतीची सत्ता आली होती. पण शरद पवार म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातला शकुनी मामा. शकुनी मामानं डाव टाकला आणि जनतेनं निवडून दिलेलं राज्य हिरावून घेतलं गेलं. पण त्यांना ते राज्य फार काळ लाभलं नाही. एकनाथ शिंदे नावाच्या वाघानं बंड केलं आणि देवेंद्र फडणवीसांच्या साथीनं महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आलं. एकनाथ शिंदे हे कर्ण आहेत ते मागेल त्याला दान करत आहेत आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणात अर्जुनाची भूमिका बजावत आहेत, राज्य कस चालवायचं ते त्यांना माहित आहे, त्यांच्याकडे दूरदृष्टीपणा आहे असं सदाभाऊ खोत म्हणाले.

यावेळी सदाभाऊ खोत यांनी मराठा आरक्षणावरूनही शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. आत्तापर्यंत अनेक वेळा मराठा समाजाचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात झाला. परंतु यापैकी कोणत्याही मुख्यमंत्र्याने मराठा समाजाला आरक्षण दिले नाही. पण 2019 साली देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण मिळवून दिले. पण शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी हे आरक्षण घालवले. मात्र, या दोघांवर टीका झाली नाही , टीका झाली ती देवेंद्र फडणवीस यांच्यावर. कारण प्रस्थापितांना धक्का देण्याचे काम फडणवीस यांनी केले होते. शरद पवारांना कळलं की एकच माणूस आपल्याला छातीवर घेऊ शकतो तो म्हणजे देवेंद्र फडणवीस. म्हणून फडणवीस यांच्याविरोधात सगळे एक झाले असा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला.

लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूका पुढे ढकलल्या??

maharashtra assembly election 2024 (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय निवडणूक आयोगाने जम्मू काश्मीर आणि हरियाणा या २ राज्यातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. मात्र महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात विधानसभा निवडणुकांचे मतदान होऊन निकाल लागण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. निवडणुका लांबणीवर पडल्यामुळे सरकार निवडणुका घ्यायला घाबरत आहे असा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. मात्र या विधानसभा निवडणुका लांबणीवर पडण्याला लाडकी बहीण योजना कारणीभूत असल्याची चर्चा सुरु आहे. राज्यात नियमानुसार नवी विधानसभा 26 नोव्हेंबर 2024 पर्यंत अस्तित्त्वात येणे अपेक्षित आहे. मात्र, महायुती सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे (Ladki Bahin Yojana) निवडणूक लांबणीवर पडली असल्याची चर्चा आहे.

लोकसभा निवडणुकीत दणका बसल्यानंतर विधानसभेत (Maharashtra Assembly Election 2024) कोणताही धोका नको यासाठी महायुतीने कंबर कसली आहे. याचाच भाग म्हणजे राज्यातील महिला खुश करण्यासाठी सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जात आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने या योजनेचे २ हफ्ते म्हणजेच एकूण ३००० रुपये महिलांच्या बँक खात्यावर जमा झालेत. मात्र आणखी १- २ हफ्ते महिलांना मिळावे म्हणजेच त्यांचा विश्वास खऱ्या अर्थाने संपादित करता येईल असा विचार सरकारचा असू शकतो. निवडणुका लागल्या तर आचारसंहिता लागेल आणि या योजनेत मिठाचा खडा पडेल त्यामुळे निवडणूकच जितकी शक्य तितकी लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न आहे.

जम्मू काश्मीर येथील मतदानानंतरच महाराष्ट्रात निवडणुका होण्याचे संकेत निवडणूक आयोगाने दिले आहेत. पाऊस, गणपती, पितृपक्ष, नवरात्र, दसरा अशा सण उत्सवांमुळे जम्मूसोबत निवडणुका घेत नसल्याचं आयोगाने म्हटलं आहे. चार ऑक्टोबरला जम्मू काश्मीरमध्ये मतदान होणार आहे. म्हणजेच जर ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात जरी निवडणुकीची घोषणा झाली तरी सप्टेंबर आणि ऑक्टोबर असे आणखी २ हफ्ते महिलांच्या बँक खात्यात जमा होतील आणि या योजनेचा राज्य सरकारला फायदा होण्याची शक्यता आहे. ऑक्टोबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात जरी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला तरी त्यानंतर 45 दिवसांचा कालावधी प्रचारासाठी दिला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील निवडणूक डिसेंबरमध्ये घेण्याशिवाय इतर कोणताही पर्याय आयोगाकडे सध्या तरी उपलब्ध नसल्याचं स्पष्ट झाले आहे.

Pune Auto Rikshaw Offer : रक्षाबंधननिमित्त महिलांना 100 रुपयांपर्यंत मोफत रिक्षा प्रवास

Pune Auto Rikshaw Offer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज रक्षाबंधन (Raksha Bandhan) म्हणजे बहीण- भावाच्या नात्याचा सण.. सर्वच बहिणी आज आपल्या भावाला राखी बांधतात आणि भाऊ सुद्धा त्या बदलयात बहिणीला ओवाळणी देतो…. हि आपली परंपरा आहे. आज सर्वत्र हा सण साजरा केला जात असताना पुण्यातील रिक्षा चालकांनी सुद्धा या खास दिवसाच्या निमित्ताने महिलांना १०० रुपयांपर्यंत मोफत प्रवास ( Auto Rikshaw Offer For Womens) देण्याची घोषणा करत एकप्रकारे ओवाळणीच दिली आहे. रक्षाबंधनच्या दिवशी अनेक बहिणी भावाला राखी बांधण्यासाठी एसटी बस, टॅक्सी आणि रिक्षाने जात असतात. त्यामुळेच बहिणांना १०० रुपयांपर्यंत मोफत प्रवास देण्याचा निर्णय पुण्यातील रिक्षाचालकांनी घेतला आहे.

आज सोमवारी ( दि. १९) ऑगस्टला सकाळी ८ ते रात्री ८ यावेळेत पुणे स्टेशन येथील रिक्षा मित्र प्रीपेड बूथ (Pune Station Rikshaw Mitra Prepaid Booth) वरून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना १०० रुपये पर्यंतचा रिक्षा प्रवास मोफत दिला जात असून त्यापुढे भाडे झाल्यास एकूण भाड्यातून रू. १०० ची सूट देण्यात येणार आली आहे. याठिकाणी शहरातील आतापर्यत ८०० रिक्षा पुणे स्टेशन वरील रिक्षा मित्र प्रीपेड बूथवर नोंदणी केली आहे. या सर्व रिक्षातून महिलाना फायदा मिळणार आहे. लाडक्या बहिणींसाठी हि एकप्रकारे चांगली ओवाळणीच म्हणावी लागेल.

यावेळी रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष डॉ. केशव नाना क्षीरसागर यांनी म्हंटल कि, रिक्षाचालक बांधवा तर्फे महिला प्रवाशांना रक्षाबंधनाची छोटीशी भेट असून याचा महिला प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आलं आहे. रिक्षाचालक संघटनेच्या या ऑफर मुळे पुण्यातील बहिणींचा प्रवास सुखकर तर होणार आहेच परंतु त्यांच्या पैशाची बचतही होणार आहे. त्यामुळे राज्यभरातून पुण्यातील रिक्षावाला संघटनेचे कौतुक केलं जात आहे.

Breast Cancer | तरुण वयातील मुलींमध्ये का वाढलाय कर्करोगाचा धोका? जाणून घ्या कारणे

Breast Cancer

Breast Cancer | विज्ञान आणि तंत्रज्ञानाने मानवाच्या आयुष्यात खूप प्रगती केली. परंतु या वाढलेल्या प्रगती सोबत माणसाची जीवनशैली देखील बदललेली आहे. जीवनशैली बदलल्यामुळे त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर झालेला आहे. त्यामुळे अनेक आजार लोकांना होत आहेत. आजकाल खास करून कर्करोग हा अनेक लोकांमध्ये वाढताना दिसत आहे. त्यातही महिलांमध्ये स्तनांचा कर्करोग (Breast Cancer) ही अत्यंत सामान्य घटना झालेली आहे. आज काल आपण पाहिले, तर अगदी तरुण महिला देखील या स्तनाच्या कर्करोगाला बळी पडत आहेत. ही दिवसेंदिवस वाढलेली चिंतेची बाब आहे. याआधी जवळपास 50 वर्षाच्या जास्त असणाऱ्या महिलांना स्तनाचा कर्करोग होत होता. परंतु आजकाल अगदी लहान वयातच स्तनांचा कर्करोग होतो. परंतु लहान वयात स्तनांचा कर्करोग होण्याची नक्की काय कारणे आहे? हे आज आपण जाणून घेऊया.

अनुवंशिक घटक | Breast Cancer

स्तनांचा कर्करोग होण्यामागे अनुवंशिक घटक हे प्रमुख कारण आहे. जर तुमच्या कुटुंबातील आधी कुठल्या व्यक्तीला कर्करोग असेल, तर त्याचा पुढील पिढीला तो कर्करोग होण्याचा धोका होऊ शकतो. त्यामुळे हा रोग पुढच्या पिढीला हस्तांतरित होऊ शकतो. आणि ज्यामुळे त्यामुळेच आजकाल लहान वयातही मुलींना कर्करोग होण्याचा धोका वाढत आहे.

हार्मोनल असंतुलन

तरुण मुलींच्या शरीरात अनेक हार्मोनल बदल होत असतात. आणि त्याच बदलांमुळे स्तनाचा कर्करोग होऊ शकतो. आजकाल मुलींना मासिक पाळी खूपच लवकर येते. आणि त्यामुळे इस्ट्रोजन हे हार्मोन त्यांच्या शरीरात बराच काळ राहते. यासोबतच हार्मोनल थेरपी घेणे, गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर करणे यामुळे हार्मोनल असंतुलन होते. आणि मुलींना अगदी कमी वय असतानाचा कर्करोग होऊ शकतो.

खराब जीवनशैली

खराब जीवनशैली ही आजकाल प्रत्येक आजारावरचे कारण बनलेले आहे. बाहेरचे तेलकट खाणे, धूम्रपान करणे, अल्कोहोलचे सेवन करणे यांसारख्या गोष्टी जर तुम्ही सातत्याने करत असला, तरतुमच्या स्तनामध्ये कर्करोगाच्या पेशी वाढण्याचा धोका वाढतो. याशिवाय शारीरिक हालचाली कमी असणे, लठ्ठपणा, मानसिक तणाव यामुळे देखील हा आजार वाढू शकतो.

पर्यावरणाचा प्रभाव

जर तुमच्यासोबत कालच्या वातावरणामध्ये काही रसायने असतील, तर त्याचा परिणाम होऊन देखील तुमच्या शरीरात कर्करोगाच्या पेशी वाढू शकतात. या रसायनांमुळे शरीरात हार्मोनल बदल होतात. त्यामुळे प्रदूषण, रसायनिक, कीटकनाशके यांच्या संपर्कात सहसा जाऊ नये. कारण कर्करोग होण्यासाठी हे घटक देखील कारणीभूत ठरतात.

लठ्ठपणा | Breast Cancer

लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदललेल्या आहे. त्यामुळे सगळ्यांमध्ये लठ्ठपणा वाढत चाललेला आहे. जास्त चरबीयुक्त पदार्थ खाल्ल्याने शरीरात एस्ट्रोजनची पातळी वाढते. आणि कर्करोगाचा धोका धोका वाढतो. त्यामुळे आपण सकस आणि ताजे अन्न खाल्ले पाहिजे.

घरगुती वीजग्राहक आणि शेतकऱ्यांना मिळणार मोफत वीज; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

Electricity

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्य सरकारने शेतकऱ्यांना त्याचप्रमाणे सर्वसामान्य माणसांना केंद्रस्थानी ठेवून विविध योजना आणलेल्या आहेत. जेणेकरून सामान्य माणसांना त्याचा फायदा होईल. आणि त्यांना आर्थिक हातभार लागेल. राज्य सरकारने सर्व सामान्य माणसांसाठी वीज क्षेत्रात देखील खूप मोठी कामगिरी केली आहे. नागरिकांना कमीत कमी वीज बिल (Electricity Bill) यावे, यासाठी सरकार देखील प्रयत्न करत आहे. अशातच राज्यातील 44 लाख शेतकऱ्यांना एप्रिल महिन्यापासून पुढील पाच वर्षे मोफत वीज देण्यात येणार आहे. सरकारने यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना देखील आणलेली आहे. यासोबतच केंद्र सरकारची प्रधानमंत्री सूर्य घर योजना आहे. या योजनेतून वीज ग्राहकांचे वीज बिल देखील आता शून्य होणार आहे. लवकरच सरकार या योजनेची अंमलबजावणी करणार आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना आणि ग्राहकांना एक मोठा दिलासा मिळणार आहे. याबद्दलची माहिती रविवारी 18 ऑगस्ट 2024 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक खूप खुश झालेले आहेत.

सरकारने राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये हे सौर उर्जीकरणाचे काम सुरू केलेले आहे. अशातच सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मान्याची वाडी म्हणून एक गाव आहे. या गावांमध्ये महावितरणाच्या वतीने 100 टक्के सौरऊर्जीकरण करण्यात आलेले आहे. राज्यातील पहिले सौरग्राम या मान्याची वाडी झालेले आहे. यावेळी लोकार्पण करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील त्याबद्दल बोलत होते. वीज क्षेत्रात ही कामगिरी केल्यामुळे त्याचप्रमाणे सर्वसामान्य नागरिकांना मोफत वीज दिल्यामुळे त्या गावचे सरपंच रवींद्र माने यांनी उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले, त्यांना धन्यवाद देखील म्हटले. या सौरग्राम असलेल्या मान्याची वाडी लोकार्पण करताना, त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री ऊर्जा आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस, पालक मंत्री शंभूराजे देसाई, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे हे सगळे प्रमुख पाहुणे उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील मान्याची वाडी ही सौरग्राम होण्याचा पहिला मान मिळवलेला आहे. या गावातील सगळ्या नागरिकांचे मी अभिनंदन करतो, सौर ऊर्जा ही घरगुती ग्राहक आणि शेतकऱ्यांसाठी एक मोठी वरदानच आहे. प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेतून शेतकऱ्यांच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवला जातो. त्यामुळे विज बिल त्यांना अजिबात येत नाही. त्याचप्रमाणे राज्य सरकारने देखील मागील त्यांना सौर कृषी पंप योजना जाहीर केलेली आहे. खुल्या वर्गातील जे प्रवर्ग आहेत, शेतकरी आहेत त्यांना 10 टक्के रक्कम, अनुसूचित जाती जमाती शेतकऱ्यांना 5 टक्के रक्कम भरून कृषी पंप आणि सौर पॅनल्स मिळणार आहे. उर्वरित रक्कम आहे ती शासनाकडून अनुदानाच्या रूपात मिळेल असे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले आहे.

Someshwar Cooperative Sugar Factory | महाराष्ट्रातील’ या’ साखर कारखान्याने जाहीर केला ऊसाला 3771 रुपये प्रतिटन दर

Someshwar Cooperative Sugar Factory

Someshwar Cooperative Sugar Factory | आपल्या महाराष्ट्रात अनेक शेतकरी हे उसाचे उत्पन्न घेतात. उसाचे उत्पन्न घेतल्यामुळे आपल्या महाराष्ट्रात अनेक साखर कारखाने देखील आहे. ज्यामध्ये उसापासून साखरेचे उत्पादन होत असते. यातच बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना हा एक प्रसिद्ध कारखाना आहे.या कारखान्याने गेल्या वर्षात एक मोठा विक्रम करून दाखवलेला आहे. त्यामुळे सगळ्यांचे लक्ष आता या साखर कारखान्यावर आहे. सोमेश्वर सहकारी साखर कारखाना (Someshwar Cooperative Sugar Factory) हा 2023 आणि 24 या वर्षातील गाळप हंगामासाठी चांगला दर देणारा साखर कारखाना ठरलेला आहे. या कारखान्याने प्रति मेट्रिक टन ऊसाला 697 रुपये एवढा दर दिलेला आहे. यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच फायदा झालेला आहे. म्हणजेच अनुदानासह शेतकऱ्यांच्या उसाला प्रति टन 3771 रुपये दर जाहीर केलेला आहे. त्यामुळे सर्वात जास्त दर देणारा सोमेश्वर साखर कारखाना हा राज्यातील पहिला साखर कारखाना ठरलेला आहे.

याबाबतची सविस्तर माहिती कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिलेली आहे. त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, त्यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या संचालक बैठकीमध्ये हा एक मोठा निर्णय घेतलेला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे देखील या कारखान्यावर (Someshwar Cooperative Sugar Factory) लक्ष असते. वेळोवेळी ते मार्गदर्शन देखील करत असतात. त्यामुळे संचालक मंडळाचे काटकसरीने धोरण करणे. यामुळे त्यांना हा उच्चांक गाठता आला आहे. असे देखील सांगितलेले आहे. या साखर कारखान्याने चालू हंगामासाठी 3571 रुपये उच्चांक असणारा ऊस दर जाहीर केलेला आहे. त्यांनी एफआरपी पेक्षा 697 रुपये जास्त दर देण्याचे जाहीर केलेले आहे. मागील वर्षी हा भाव प्रति टन अनुदानासह 3771 रुपये जाहीर होता. .

यावर्षी त्यांनी 3571 सगळ्यात जास्त उसाचा दर जाहीर केलेला आहे. जानेवारीमध्ये तुटणाऱ्या उसाला 75 रुपये त्याचप्रमाणे फेब्रुवारीमध्ये दुखणाऱ्या उसात 100 रुपये मार्चमध्ये तुटणारी उसाला 150 रुपये. हंगाम संपेपर्यंत तुटणाऱ्या उसाला 200 रुपये देण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. म्हणजेच अनुदानासह जानेवारीमध्ये तुटणाऱ्या उसाला 3646 रुपये, फेब्रुवारी मधील उसाला 3671 रुपये, त्याचप्रमाणे मार्चमधील उसाला 3721 रुपये हा भाव दिला जाणार आहे. यावर्षी सोमेश्वर या साखर कारखान्याने एकूण 15 लाख 23 हजार 876 मेट्रिक टन उसाचे गाळप केलेले आहे.

फोन पडकण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतो माणसाचा स्वभाव; जाणून घ्या सोप्प्या ट्रिक्स

Mobile

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | असं म्हणतात की व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव देखील वेगळा असतो. परंतु आजकाल स्वभाव ओळखणे खूप अवघड झालेला आहे. लोकांचा स्वभाव लोकांचा व्यक्तिमत्व ओळखायला माणसं चुकतात. आणि तिथेच ते खूप मोठी चूक करतात. चुकीच्या माणसांवर विश्वास ठेवतात. त्याचप्रमाणे चुकीच्या गोष्टी करतात. त्यामुळे कुठल्याही व्यक्तीशी जास्त जवळीक साधण्या आधी त्या व्यक्तीचा स्वभाव ओळखणे खूप गरजेचे असते. त्यावर आपले भवितव्य देखील अवलंबून असते. कारण जर आपण चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवला, तर पुढे जाऊन ती व्यक्ती आपल्याला फसवू देखील शकते. तर आज आम्ही तुम्हाला समोरच्या व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व ओळखण्याच्या काही सोप्या ट्रिक सांगणार आहोत.

आजकाल मोबाईल वापरणे ही एक सामान्य गोष्ट झालेली आहे. अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळेच जण मोबाईल फोनचा वापर करतात. आता एखादा व्यक्ती कसा मोबाईल धरतो? त्यावरून त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व कसे आहे? हे ओळखणे खूपच सोपे आहे. तर आज आपण जाणून घेऊया की, व्यक्तीच्या मोबाईल धरण्यावरून त्या व्यक्तीचा स्वभाव कसा ओळखता येईल हे जाणून घेऊया.

जर एखादी व्यक्ती दोन्ही हातांनी मोबाईल पकडून त्या मोबाईलवर काम करत असेल, तर ती व्यक्ती खूप सावध असते. दोन्ही हातांनी मोबाईल धरून दोन्ही बोटांनी काम करणारे लोक कोणताही निर्णय घेण्याआधी सगळ्या प्रकारच्या शक्यता चेक करतात. तसेच विचार करून निर्णय घेतल्याने त्याचे चांगले आणि वाईट परिणाम काय होऊ शकतात. या गोष्टींचा दहा वेळा विचार करतात आणि मगच निर्णय घेतात. असा व्यक्ती कोणावरही विश्वास ठेवत नाही.

जो व्यक्ती एका हाताचा वापर करून फोन एका अंगठ्याने स्क्रीन स्कूल करतात. ते व्यक्ती खूप आत्मविश्वासी असतात. आणि आशावादी देखील असतात. हे लोक त्यांच्या आयुष्यात खूप लवकर प्रगती करतात. आणि कोणत्याही परिस्थितीला न घाबरता तोंड देतात आणि त्यात जिंकतात देखील तसेच कुठल्याही प्रकारचे कठोर परिश्रम करण्यासाठी ही माणसं नेहमीच तत्पर असतात.

दोन्ही हाताने मोबाईल धरून दोन्ही अंगठ्याचा वापर करतात.ते लोक त्यांच्या आयुष्यात खूप उत्साही असतात तसेच हुशार देखील असतात. अशी लोक प्रत्येक गोष्टीत त्यांचा समाधानाने आनंद शोधत असतात. हे लोक खूप भोळे असतात तसेच निरागस देखील असतात. त्यामुळे ते लगेच कोणत्याही व्यक्तीवर विश्वास ठेवतात. आणि यामुळे कधी कधी त्यांच्या आयुष्यात त्यांना धोका मिळतो. तसेच आर्थिक व्यवहारात देखील तोटा सहन करावा लागतो.

जे व्यक्ती एका हातात मोबाईलवरून दुसऱ्या हाताच्या बोटाने स्क्रीन स्क्रोल करतात. हे लोक खूप धाडसी निर्णय घेत असतात. त्यांची कल्पनाशक्ती देखील खूप चांगली असते. तसेच आयुष्यात खूप प्रसंग पाहिले असल्याने ते कोणताही निर्णय घेताना विचार करून घेतात.

Pune Burger King | पुण्याच्या बर्गर किंगचा 13 वर्षे जुन्या कायदेशीर लढाईत विजय; अमेरिकन कंपनीचा पराभव

Pune Burger King

Pune Burger King | सध्या आपल्या भारतामध्ये तसेच जगामध्ये अनेक ब्रँड्स आहेत. जे ब्रँड्स संपूर्ण जगभर प्रसिद्ध होताना दिसत आहे. त्यातीलच एक ब्रँड म्हणजे बर्गम बर्गर किंग. हा जगातील सगळ्यात प्रसिद्ध असा ब्रँड आहे. या ब्रँडचे 100 देशांमध्ये तब्बल 13000 रेस्टॉरंट आहेत. आणि हे रेस्टॉरंट खूप प्रसिद्ध झालेले आहे. सध्या ही कंपनी खूप लोकप्रिय असली, तरी भारतात या कंपनीला एका समस्येचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत आहे. ते म्हणजे महाराष्ट्रातील पुणे शहरांमध्ये बर्गर किंग (Pune Burger King) या नावाचे एक जुने रेस्टॉरंट चालू होते. या रेस्टॉरंटवर अमेरिकन कंपनीने आपले नाव वापरल्याचा आरोप केलेला आहे. आणि त्यांच्याबाबत गुन्हा देखील दाखल केलेला आहे. भारत आणि बर्गर किंगच्या नावाने सुरू असलेली ही कायदेशीर कारवाई जवळपास 13 वर्षे चालली होती. आणि अशातच आता या लढाई देशील लढाईचा शेवट झालेला आहे. पुण्याच्या कंपनीच्या बाजूने हा निकाल लागलेला आहे. त्यामुळे आता अमेरिकेच्या बरोबर किंगसाठी हा एक मोठा धक्का आहे.

न्यायालयात गेल्या 13 वर्षापासून याबाबत केस चालू होती. अखेर पुण्यातील रेस्टॉरंटच्या बाजूने निकाल लागलेला आहे. अमेरिकेच्या फूड कंपनी बर्गर किंग कॉर्पोरेशनची याची ठरलेली आहे. याबाबत जिल्हा न्यायाधीश सुनिद वेद पाटील यांनी 16 ऑगस्ट रोजी आदेश देखील सांगितलेले आहे. पुण्यातील कंपनीवर अमेरिकन कंपनीने ट्रेडमार्क उल्लंघनाच्या आरोप केलेला होता. त्याचप्रमाणे पुण्यातील कंपनीला त्यांचे नाव वापरण्यास देखील बंदी घातली होती. तसेच त्यांच्यावर नुकसान भरपाई देखील द्यावी, असे देखील सांगितलेले होते.

हे रेस्टॉरंट पुण्यातील कॅम्प आणि कोरेगाव भागात आहेत. आणि लोकांना देखील हे रेस्टॉरंट खूप आवडतात. न्यायाधीशांनी या केसमध्ये सांगितलेले की, पुण्याचा बर्गर किंग (Pune Burger King) हे नाव 1992 ते 93 पासून वापरत आहे. आणि अमेरिकन कंपनी खूप त्यानंतर भारतात आलेली आहे. पुण्यातील ही कंपनी गेल्या अनेक वर्षापासून हेच नाव वापरत आहे. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकत नाही.

बर्गर किंगची स्थापना ही 1954 मध्ये झाली. या कंपनीची स्थापना जेम्स मॅकलॅमोर आणि डेव्हिड यांनी केली आहे. 100 पेक्षा जास्त देशांमध्ये या कंपनीचे रेस्टॉरंट आहेत. या कंपनीचे एकूण 13000 रेस्टॉरंट आहे. या रेस्टॉरंट पैकी 97% कंपनीची मालकी आहे. या सगळ्या रेस्टॉरंटमध्ये सुमारे 30300 लोकं काम करतात. ही कंपनी 2014 मध्ये भारतात आली. त्यांनी नवी दिल्ली, मुंबई आणि पुणे सारख्या ठिकाणी काम करण्यास सुरुवात केली.