Monday, December 22, 2025
Home Blog Page 526

High Salt Level | शरीरातील मिठाचे प्रमाण वाढले तर दिसतात ही लक्षणे; वेळीच व्हा सावध

High Salt Level

High Salt Level | मीठ हे जेवणामध्ये खूप महत्त्वाचे असते. मिठामुळेच अन्नाला चव येते. परंतु कधी कधी हेच मीठ जीवघेणे देखील ठरते. तुमच्या शरीरात जर मिठाचे प्रमाण वाढले, तर त्यामुळे तुमच्या शरीराला धोका निर्माण होऊ शकतो. तुम्ही जर प्रमाणापेक्षा जास्त मीठ खाल्ले, (High Salt Level) तर तुम्हाला उच्च रक्तदाब, सूज येणे, अशक्तपणा येणे यांसारखे अनेक आजार उद्भवतात. त्यामुळे तुम्हाला जर अशी लक्षणे तुमच्या शरीरात दिसत असेल, तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. कारण ही गंभीर रोगांची लक्षणे आहेत. आता ती कोणती लक्षणे आहेत हे आपण जाणून घेऊया

उच्च रक्तदाब | High Salt Level

तुमच्या शरीरातील मिठाचे प्रमाण जर वाढले, तर त्याचा थेट परिणाम तुमच्या रक्तदाबावर होत असतो. जास्त मीठ खाल्ले, तर तुमचा रक्तदाब वाढतो. त्यामुळे तुम्हाला हृदयाच्या आजार देखील होऊ शकतात. यामध्ये डोकेदुखी, चक्कर येणे, हृदयाचे ठोके अत्यंत जलद होणे यांसारखी लक्षणे दिसतात. जर तुम्हाला देखील ही लक्षणे जाणवत असेल. तर त्यावर नियंत्रण करणे खूप गरजेचे आहे अशावेळी तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांशी संपर्क साधा.

शरीराला सूज येणे

तुम्ही जर गरजेपेक्षा जास्त मीठ खाल्ले, तर तुमच्या शरीरात पाणी साचू शकते. यामुळे तुमचे हात, पाय, चेहरा आणि पोटात देखील सूज येऊ शकते. सूज येणे म्हणजे तुमच्या शरीरातील मिठाचे प्रमाण वाढले आहे असे लक्षण आहे. त्यामुळे असे लक्षण जर दिसत असेल, तर तुम्ही त्यावर वेळीच उपचार घ्या.

सारखी तहान लागते

तुमच्या शरीरात जर मिठाची पातळी जास्त झाली असेल, तर तुम्हाला सारखी तहान लागते. अतिरिक्त मीठ काढण्याचा शरीराचा हा एक मार्ग आहे. शरीर तुम्हाला तुमच्या बॉडीतील अतिरिक्त नीट काढून टाकण्याचा एक संकेत देत असते. त्यामुळे तुम्हाला सारखी तहान लागते.

थकवा अशक्तपणा

तुमच्या शरीरात जर जास्त मीठ झाले असेल, तर तुम्हाला अशक्तपणा देखील येतो. आणि थकवा देखील येतो. त्यामुळे तुमच्या शरीरातील संपूर्ण संतुलन बिघडते. तुम्हाला जर काहीही काम न करता असा अशक्तपणा आणि थकवा जाणवत असेल, तर तुम्ही त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. आणि लवकरात लवकर डॉक्टरांशी संपर्क साधा.

अशावेळी काय करावे ? | High Salt Level

तुम्हाला जर वरील सगळी लक्षणे दिसत असेल, तर तुमच्या जेवणात मिठाचे प्रमाण वाढले आहे. अशावेळी तुम्ही अगदी योग्य प्रमाणात तुमच्या जेवणामध्ये मीठ वापरा. तसेच जास्तीत जास्त भाज्या आणि ताजी फळे खाण्यावर भार द्या. कारण या नैसर्गिक घटकांमध्ये नैसर्गिक मीठ असते. त्यामुळे तुमच्या शरीराला कोणताही धोका निर्माण होत नाही. जास्तीत जास्त पाणी प्या जास्तीत जास्त पाणी पिल्याने तुमच्या शरीरात असलेले अतिरिक्त मीठ हे निघून जाते आणि तुमच्या आरोग्य देखील चांगले राहते.

Virat Kohli : विराट कोहलीने पूर्ण केली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 16 वर्षे ; पहा कोणकोणते रेकॉर्ड केले

Virat Kohli 16 Years

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विराट कोहली( Virat Kohli)… भारतीय क्रिकेटचा किंग कोहली… रनमशीन.. आणि मित्रांचा चिकू…. सचिन तेंडुलकरनंतर भारतीय फलंदाजीचा आधारस्तंभ असलेला विराट कोहली…. याच कोहलीने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या कारकिर्दीची 16 वर्षे पूर्ण केली आहेत. १६ वर्षांपूर्वी आजच्या दिवशी विराटने श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय सामन्याच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पदार्पण केलं होते. त्यानंतर त्याने तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये भारताकडून मुख्य भूमिका बजावली. तिन्ही फॉरमॅट मध्ये संघाचे नेतृत्व केलं. मागील १६ वर्षेत सतत क्रिकेट खेळत विराट कोहलीने टीम इंडियाला अनेक ऐतिहासिक विजय मिळवून दिले आहेत. आज आपण विराटच्या आत्तापर्यंतच्या एकूण कामगिरीचा आढावा घेऊया….

२००८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पदार्पण केल्यानंतर विराट कोहलीने (Virat Kohli) सुरुवातीपासूनच आपल्या खेळतात सातत्य राखलं… त्यावेळी भारतीय संघात सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, गौतम गंभीर असे दिग्गज खेळाडू होते. परंतु या खेळाडूंच्या निवृत्तीनंतर विराट कोहलीने खऱ्या अर्थाने भारतीय संघाचा संपूर्ण भार स्वतःच्या खांद्यांवर घेतला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत त्याने अनेकदा भारतीय संघाला संकटातुन बाहेर काढलं आहे. आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर विराट कोहली भारतीयांच्या मनातील किंग कोहली बनला…. आजची त्याचे भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात मोठा फॅनबेस आहे.

कशी आहे कोहलीची कारकीर्द? Virat Kohli

विराट कोहलीने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत 113 कसोटी, 295 एकदिवसीय आणि 125 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कसोटीच्या 191 डावांमध्ये त्याने 49.15 च्या सरासरीने 8848 धावा केल्या आहेत. कोहलीने कसोटीत 29 शतके आणि 30 अर्धशतके केली आहेत, ज्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 254* धावा आहे. याशिवाय, वनडेच्या 283 डावांमध्ये त्याने 58.18 च्या सरासरीने 13906 धावा केल्या आहेत, ज्यात 50 शतके आणि 72 अर्धशतकांचा समावेश आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यातील उर्वरित 117 डावांमध्ये किंग कोहलीने 48.69 च्या सरासरीने आणि 137.04 च्या स्ट्राइक रेटने 4188 धावा केल्या, ज्यामध्ये 1 शतक आणि 38 अर्धशतकांचा समावेश आहे. नुकतंच त्याने टी-20 क्रिकेट मधून निवृत्ती घेतली आहे.

विराट कोहलीने महेंद्रसिंघ धोनीनंतर तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतासाठी संघाचे नेतृत्वही केले. कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने नवी उंची गाठली. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अनेक द्विपक्षीय मालिका जिंकल्या, मात्र टीम इंडिया वर्ल्ड कप सारखी आयसीसी ची कोणतीही मोठी ट्रॉफी जिंकता आली नाही. त्यानंतर रोहित शर्माकडे भारतीय क्रिकेटचे नेतृत्व सोपवण्यात आलं.

तुम्हीही रिकाम्या पोटी खूप पाणी पीत असाल तर सावधान; होऊ शकतो गंभीर आजार

Water

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पाणी पिणे हे आपल्या शरीरासाठी खूप गरजेचे असते. परंतु अनेकवेळा लोक उपाशीपोटी पाणी पितात. बरीच लोक ही सकाळी उठल्या उठल्या भरपूर पाणी पितात. परंतु जर तुम्ही जास्त रिकाम्या पोटी जास्त पाणी पिले, तर ते तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे आपण सकाळी उठल्या उठल्या किंवा रिकामी पोटी किती पाणी प्यायला पाहिजे. त्यामुळे कोणत्या समस्या निर्माण होऊ शकतात? याबद्दलची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

इलेक्ट्रोलाइट्सचे असंतुलन

आपल्या शरीरात इलेक्ट्रोलाइट्स हे एक महत्त्वाचे खनिज आहे. आपल्या शरीरात होणाऱ्या अनेक महत्त्वाच्या कार्यांमध्ये इलेक्ट्रोलाइट्स मदत करत असते. जेव्हा आपण गरजेपेक्षा जास्त पाणी पितो, तेव्हा आपल्या शरीरातील संतुलन बिघडते. त्यामुळे आपल्याला अशक्तपणा येऊ शकतो, डोकेदुखी होऊ शकते.

मूत्रपिंडावर दबाव वाढतो

आपली किडनी ही आपल्या शरीरातील विषारी पदार्थ हे शरीराबाहेर काढून टाकण्याचे काम करत असते. परंतु जेव्हा आपण जास्त पाणी पितो. त्यावेळी किडनीवर दाब देतो आणि किडनी नीट काम करू शकत नाही. म्हणून या कारणामुळे भविष्यात जाऊन किडनीच्या देखील अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी पिऊ नये.

हायपोनेट्रीमिया

जेव्हा तुम्ही रिकाम्या पोटी आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी पितात. त्यावेळी तुमच्या शरीरातील सोडियमची पातळी कमी होते. जास्त पाणी पिल्याने आपल्या शरीरातील सोडियम त्या पाण्यात विरघळतो आणि सोडियमची पातळी कमी होते. त्यामुळे आपल्याला अनेक गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागते. यामुळे तुम्हाला उलट्या होतात स्नायूंचे आजार वाढतात.

पचन संस्थेवर परिणाम

जेव्हा तुम्ही रिकाम्या पोटी जास्त पाणी पितात. त्यावेळी तुमच्या पचनसंस्थेवर ही परिणाम होतो. यामुळे गॅस होणे, अपचन, पोट फुगणे यांसारख्या समस्या उद्भवतात.

पाणी पिण्याची योग्य पद्धत

तुम्हाला जर सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी पाणी पिण्याची सवय असेल, तर तुम्ही सकाळी उठल्या उठल्या कोमट पाणी पिल्याने तुम्हाला त्याचा फायदा होईल. यावेळी तुमची पचन संस्था देखील चांगली सक्रिय होईल. तसेच तुम्ही जेव्हा रिकाम्यापोटी पाणी पितात. त्यावेळी एकाच वेळी जास्त पाणी पिऊ नका. तुम्ही पाणी हळूहळू प्या. जेणेकरून शरीराला देखील चांगले पोषण मिळेल. अनेक वेळा आपण इंटरनेटवर वाचून जास्तीत जास्त पाणी पीत असतो. परंतु प्रत्येक व्यक्तीची शारीरिक गरज ही वेगळी असते. त्यामुळे तुमचे दिनचर्या शारीरिक हालचाली ओळखून योग्य ते पाणी प्या.

अजित पवारांना भाजपनेच दाखवले काळे झेंडे; महायुतीत खळबळ

ajit pawar BJP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या महायुतीचे सरकार आहे. तिन्ही नेत्यांमध्ये योग्य समन्वय आहे तसेच कोणत्याही कार्यक्रमाला तिन्ही नेत्याची एकत्रित हजेरीही महाराष्ट्राचे अनेकदा बघितली आहे. त्यामुळे सरकार मध्ये सगळं काही ओके वातावरण आहे. मात्र याच महायुतीला तडे जातायत कि काय अशी घटना पुण्यात घडली आहे. अजित पवारांना भाजपच्या कार्यकर्त्यांकडूनच काळे झेंडे दाखवण्यात आलेत. जुन्नरमध्ये हि घटना घडली असून यामागे नेमकं कारण काय आहे ते आपण जाणून घेऊयात….

अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदारांना आकर्षित करण्यासाठी जनसन्मान यात्रा सुरु केली आहे. आज पुण्यातील जुन्नर भागात ही जनसन्मान यात्रा आयोजित करण्यात आली आहे. मात्र भाजपाच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा आशा बुचके यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी अजित पवारांना काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली. अजित पवारांचा ताफा ज्या ठिकाणावरुन बैठकींचं आयोजन करण्यात आलेल्या सभागृहात जात होता त्याच मार्गावर हे आंदोलन करण्यात आलं. पर्यटन तालुका असताना शासकीय कार्यक्रम घेऊन घटक पक्षांना डावलं जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केले. अजित पवारांनी घटक पक्षांना डावलून पालकत्वाची भूमिका पाळली नाही असं म्हणत भाजप कार्यकर्त्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. पुण्यातील या घटनेने महायुतीत खळबळ उडाली आहे.

यानंतर आशा बुचके यांनी एका वृत्तवाहिनीला म्हंटल, अजित पवार ज्या पद्धतीने चोरुन चोरुन बैठक घेतात. प्रचारसभांचा गैरवापर करतात. आमचा तालुका पर्यटन तालुका म्हणून प्रसिद्ध आहे. पर्यटनाच्या तालुक्यात सर्वांना विश्वासात घेऊन काम व्हायला हवं. त्यांना महायुती मान्य नसेल तर अजित पवारांनी तसं स्पष्ट सांगावं. अजित पवारांनी माझा काहीही संबंध नाही, असे स्पष्ट घोषित करावे. दुसरीकडे शिंदे गटाने सुद्धा अजितदादाच्या उपस्थित आज होणाऱ्या महायुतीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला आहे.

पवार साहेबच माझे नेते, नाईलाजाने दादांसोबत गेलो; राष्ट्रवादी आमदाराच्या कबुलीने खळबळ

rajendra shingane sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजित पवारांचं बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये २ गट पडले असून अनेक बडे नेते अजितदादांसोबत राहिलेत, मात्र मागील काही दिवसांपासून दादा गटातील आमदार पुन्हा एकदा शरद पवारांकडे (Sharad Pawar) परतणार असल्याच्या जोरदार चर्चा महाराष्टरच्या राजकारणात सुरु आहेत. अजून तरी दादा गटातील कोणताही आमदार अधिकृतपणे शरद पवारांच्या गटात गेलेला नाही. मात्र राष्ट्रवादीच्या सिंदखेड राजा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र शिंगणे (Rajendra Shingane) यांच्या एका विधानाने दादा गटात खळबळ उडण्याची शक्यता आहे. आजही शरद पवार साहेब माझे नेते आहेत, ते मला नेहमीच आदरणीय आहेत मात्र नाईलाजाने मी अजित पवारांसोबत गेलो अशी स्पष्ट कबुलीच राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे.

वर्ध्यात माजी आमदार सुरेश देशमुख यांच्या ७५व्या वाढदिवसाच्या निमित्तानं एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवार गटाचे आमदार राजेंद्र शिंगणे हे एकाच मंचावर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमात बोलताना राजेंद्र शिंगणे यांनी शरद पवार यांचे कौतुक करत आभार मानले आहेत. गेली अनेक वर्षे मी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय. माझ्या राजकीय जडणघडणीमध्ये देखील शरद पवार यांचा मोठा मोलाचा वाटा असल्याचंही मी मान्य करतो. त्यामुळे मी आयुष्यभर निश्चितपणे त्यांचा ऋणी राहणार आहे. मात्र, मध्यंतरीच्या काळात आमच्या जिल्हा सहकारी बँकेच्या अडचणीमुळे मी नाईलाजाने अजित पवार यांच्याबरोबर गेलो. त्यानंतर आज राज्य सरकारने जिल्हा सहकारी बँकेला ३०० कोटी रुपये दिले. परंतु निश्चितपणे शरद पवार माझ्यासाठी आदरणीय राहतील असं शिंगणे यांनी म्हंटल.

राजेंद्र शिंगणे पुढे म्हणाले, मी पवारांचं नेतृत्व मान्य करतो. खर म्हटलं तर आदरणीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली मी अनेक वर्ष काम करत आलो आहे. जवळपास तीस वर्ष झाले आहे त्यांच्या नेतृत्वात काम करत आहे. माझ्या राजकीय जडणघडणी मध्ये शरद पवार यांचा मोठा वाटा आहे, याबाबत मी आयुष्यभर ऋणी आहे. शरद पवार साहेबांचं नेतृत्व राज्याला आणि देशाला आश्वासक राहणार आहे असेही राजेंद्र शिंगणे यांनी म्हंटल आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजेंद्र शिंगणे अजित पवारांची साथ सोडून पुन्हा एकदा शरद पवारांच्या गटात जाणार का? या चर्चाना जोर आला आहे. दादा गटाला हा मोठा धक्का ठरेल.

Satara News : साताऱ्यात आज लाडकी बहीण योजनेचा सन्मान सोहळा; वाहतुकीत मोठा बदल, कोणते रस्ते बंद?

_satara change in traffic (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्यातील महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत करण्यात येत आहे. लाखो महिलांच्या बँक खात्यावर हे पैसे जमा झाले असून महिलावर्गात आनंदाचे वातावरण आहे. सरकारकडून या योजनेचा प्रचार- प्रसार करण्यासाठी ठिकठिकाणी लाडकी बहीण योजना सन्मान सोहळा घेण्यात येत आहे. आज हा सोहळा सातारा जिल्ह्यात (Satara District) आयोजित करण्यात आलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत आज दुपारी सैनिक स्कूलच्या मैदानावर लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांचा सन्मान सोहळा होणार आहे. यानिमित्ताने सकाळी ८ ते सायंकाळी ६ पर्यंत वाहतुक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. त्यामुळे सातारकरांनी घराबाहेर पडताना वाहतुकीतील बदल जाणून घेणं गरजेचं आहे.

कोणकोणते रस्ते बंद?

१) बॉम्बे रेस्टॉरंट चौक ते बांधकाम भवन जिल्हा परिषदेसमोरील रस्ता हा वाहतुकीस सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी करणेत येत आहे.

२) गोडोली नाका, साईबाबा मंदिर मार्गे जिल्हा परिषद चौक येथे येणेस सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करणेत येत आहे.

३) कनिष्क मंगल कार्यालय बाजुकडुन जिल्हा परिषद चौक येथे येणेस सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करणेत येत आहे.

वाहतुकीकरीता पर्यायी मार्ग कोणते –

१) बॉम्बे रेस्टॉरंट बाजुकडुन सातारा शहरात येणारी वाहने ही अजंठा चौक, गोडोली नाका मार्गे पोवई नाका बाजुकडे येतील.

२) पोवई नाका बाजुकडुन बॉम्बे रेस्टॉरंट बाजुकडे जाणारी वाहने ही बांधकाम भवन येथुन आर.टी.ओ. कार्यालय, सैनिकनगर मार्गे बॉम्बे रेस्टॉरंट चौक बाजुकडे रवाना होतील.

पार्किंग ठिकाणे-

१) ठक्कर सिटी- कराड, पाटण बाजुकडुन कार्यक्रमासाठी येणारी सर्व वाहने ही ठक्कर सिटी येथील मोकळ्या जागेत पार्किंग होतील.

२) जुनी MIDC- कोरेगांव, रहिमतपुर, माण, खटाव बाजुकडुन येणारी सर्व वाहने ही जुनी MIDC मध्ये रस्त्याचे कडेला पार्किंग होतील.

३) शाहु स्टेडीअम – वाई, महाबळेश्वर बाजुकडुन येणारी सर्व वाहने ही शाहु स्टेडीअम येथे पार्किंग होतील. ४) जिल्हा परिषद ग्राऊंड- सातारा शहर व मेढा बाजुकडुन येणारी सर्व वाहने ही जिल्हा परिषद मैदान येथे पार्किंग होतील.

५) वाढे फाटा-खंडाळा, फलटण बाजुकडुन येणारी सर्व वाहने ही वाढे फाटा पासुन सर्व्हिस रोडला पार्किंग होतील. तरी या बदलाची सर्व नागरिकांनी नोंद घेवुन पोलीस दलास सहकार्य करावे.

Weather Update | पुढील 8 तासात ‘या’ जिल्ह्यांमध्ये कोसळणार पाऊस; हवामान खात्याने दिली माहिती

Weather Update

Weather Update | जुलै महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडला. परंतु ऑगस्ट उजाडल्यानंतर पावसाचा जोर काहीसा कमी झालेला दिसत आहे. अशातच आता हवामान खात्याने अनेक जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिलेला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा पाऊस (Weathe Update) कोसळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देखील जारी करण्यात आलेला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी वादळी वारा आणि विजा देखील कडकडणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. यासोबतच पुण्यातील काही भागांमध्ये आज वादळी वारासह पावसाची (Weather Update) हजेरी लागणार असल्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळे पुण्याला देखील आज येलो अलर्ट देण्यात आलेला आहे.

मुंबईमध्ये आज पाऊस (Weather Update) नसला, तरी संपूर्णपणे ढगाळ वातावरण असणार आहे. त्यामुळे येथील तापमान देखील वाढणार आहे. मुंबईत कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस एवढे असणार आहे. हवामान विभागाने नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, हिंगोली, परभणी, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये देखील येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये आज दुपारपर्यंत पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे. मागील 24 तासांमध्ये मराठवाडा, विदर्भ या ठिकाणी पावसाने हजेरी लावलेली आहे. त्यामुळे आज अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढील 8 तास काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस कोसळणार आहे. पुढील आठवडाभर पावसाचा हा जोर कायम असणार आहे. सध्या अनेक शेतकरी हे शेतात पिकाला खत देण्याचे काम करत आहेत. त्यामुळे हा पाऊस शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असणार आहे.

… तर मोदींनी चलनावर गांधींऐवजी स्वतःचा फोटो लावला असता

sanjay raut slam modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीत जर भारतीय जनता पक्षाने ४०० जागा जिंकल्या असत्या तर मोदींनी (Narendra Modi) नक्कीच देशाचे संविधान बदललं असत आणि भारतीय चलनावर महात्मा गांधींऐवजी स्वत:चा फोटो टाकण्याची इच्छा पूर्ण करून घेतली असती असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. सामनातील रोखठोक या सदरातून राऊतांनी मोदींवर तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हल्लाबोल केला आहे. तसेच देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात संघ आणि भाजपचे काडीचे योगदान नसल्याचेही संजय राऊतांनी म्हंटल आहे.

सामनात नेमकं काय म्हंटल?

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात काडीचे योगदान नसलेले लोक मागच्या दहा वर्षांपासून लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवत आहेत व देशाला स्वातंत्र्याचे महत्त्व सांगत आहेत. भारतीय जनता पक्षाचे मार्गदर्शक, दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांनी ‘तिरंगा’ ध्वज त्यांना मान्य नसल्याचे जाहीरपणे सांगितले होते. “तिरंगा राष्ट्रासाठी अशुभ ठरेल. कारण तीन संख्या हिंदू धर्मासाठी अशुभ असते,” असा तर्क श्री. गोळवलकर गुरुजी यांनी मांडला होता. त्यावर सरदार पटेल यांनी सरसंघचालकांची शाळा घेतली. सरदार म्हणाले, “काय बोलायचे अशा माणसाविषयी ? त्यांना हिंदू धर्मच समजू शकला नाही. ज्यांना हे माहीत नाही की, हिंदू धर्माच्या मुख्य देवताच ‘तीन’ आहेत. ब्रह्मा, विष्णू आणि महेश. त्यांना तीन आकडा अशुभ वाटावा हे हिंदू धर्माबाबत त्यांचे अज्ञान आहे.” अशा हिंदू धर्माच्या राजकीय ठेकेदारांनी अयोध्येत प्रभू श्रीरामाकडेही पाठ फिरवली. त्यामुळे अयोध्येत चोरांचे व अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. लोकसभा निवडणुकीत लाभ व्हावा म्हणून पंतप्रधान मोदी यांनी घाईघाईने मंदिर उद्घाटनाचा राजकीय उत्सव अयोध्येत पार पाडला, पण राम त्यांना पावला नाही.

मोदी यांच्या काळात अयोध्येचे नवे राममंदिर गळत आहे व श्रीरामाच्या गर्भगृहात रामाच्या बचावासाठी छत्री धरावी लागत आहे. संपूर्ण अयोध्येत चोरांचे राज्य निर्माण झाले आहे. रामपथावर लावलेल्या 3,800 बाम्बू लाईट आणि 36 गोबो प्रोजेक्टर दिवे चोरीला गेले. रामपथावर आज अंधार आहे. जणू रामराज्य भाजपने अंधारात बुडवले. चोरांनी रामालाही सोडले नाही. हे यांचे कायद्याचे राज्य! या राज्याची चौकीदारी मोदी व शहा करीत आहेत. भारताने आपला 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा केला. बहुमत गमावलेले आपले पंतप्रधान श्रीमान मोदी यांनी तरीही लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवला, ज्या तिरंग्यास त्यांच्या मार्गदर्शक संघटनेचा विरोध होता. या वेळी मोदी यांनी 400 जागा खरोखरच जिंकल्या असत्या तर त्यांनी तीन गोष्टी नक्कीच घडवून आणल्या असत्या. त्यातील एक म्हणजे
भारतीय चलनावर महात्मा गांधींऐवजी स्वत:चा फोटो टाकण्याची इच्छा पूर्ण करून घेतली असती. दुसरं म्हणजे संविधान त्यांनी नक्कीच बदलले असते.आणि तिसरी गोष्ट म्हणजे तिरंगा’ बदलण्याचे मनसुबेही तडीस नेले असते.

या ‘तीन’ महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी घडवून आणल्या असत्या. ‘तीन’ हा आकडा संघ विचारधारा मानणाऱ्यांसाठी अशुभ असला तरी या तीन गोष्टी मोदी यांनी नक्कीच घडवून आणल्या असत्या व त्यासाठी तहहयात आपणच पंतप्रधान राहू हा ‘पुतीन पॅटर्न लागू करण्यासाठी संविधानातील लोकशाही, स्वातंत्र्यविषयक कलमे बदलायलाही त्यांनी पावले टाकली असती, पण भारतीय जनतेने हे होऊ दिले नाही! सुजाण भारतीय जनतेने तिरंग्याचे, स्वातंत्र्याचे व संसदेचे रक्षण केले आहे.असं संजय राऊतांनी रोखठोक मधून म्हंटल.

Housing : खुशखबर ! फ्लॅट आणि घरांच्या किंमती होणार कमी ? जाणून घ्या

Housing : आज काल घरांच्या किमती पाहता गगनाला भिडलेल्या दिलेल्या दिसत आहेत. पुणे – मुंबई सारख्या शहरात तर घरांच्या किमती 90 लाख ते एक कोटींच्या आसपास आहेत. मात्र फ्लॅट आणि घराच्या किमती कमी होण्याचे (Housing) संकेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार 9 सप्टेंबर रोजी जीएसटी कौन्सिलची बैठक होणार असून त्या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे. या बैठकीत घरे आणि फ्लॅटच्या किमती कमी होण्याच्या उद्देशाने निर्णय घेतला जाऊ (Housing) शकतो असं सांगण्यात आलं आहे.

जमीनच्या खरेदीवर 18% जीएसटी चा प्रश्न लवकरच सोडवला जाऊ शकतो. याबाबत 22 ऑगस्टला होणाऱ्या बैठकीमध्ये निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. जमिनीच्या खरेदी विक्रीवर 18% जीएसटी लागू (Housing) करण्यात येणार होता. मात्र याला रिअल इस्टेट डेव्हलपर्स ने विरोध केलाय. त्यामुळे जमिनीची किंमत वाढते त्यामुळे थेट फ्लॅट आणि घर महाग होतात.

महाराष्ट्र शासनाने जर शिफारस केली तर 9 सप्टेंबरला होणाऱ्या जीएसटी कौन्सलच्या बैठकीमध्ये अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो. सध्या डेव्हलपेबल लँड खरेदी-विक्रीवर कोणताही जीएसटी लागू होत नाही परंतु डेव्हलपमेंट (Housing) राईटवर 18% जीएसटी लागू केल्याने जमिनीची किंमत वाढते आणि याचाच परिणाम घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या वर दिसून येतो त्यामुळे घरांच्या किमती वाढतात. यामुळे घर खरेदीदार जास्त प्रमाणात घर खरेदी करताना दिसत नाहीत. जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.

Sunita Williams | सुनीता विलियम्स यांच्याबद्दल वाईट बातमी; अंतराळात झाला ‘हा’ आजार

Sunita Williams

Sunita Williams | हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन काही महिन्यांपूर्वी अंतराळवीर सुनीता विल्यम्स या अंतराळात गेलेल्या आहे. पण सध्या त्या तिथेच अडकून राहिलेल्या आहेत. आणि त्यांच्याबद्दल एक अतिशय वाईट बातमी समोर आलेली आहे. या बातमीमुळे आता नासाच्या अडचणींमध्ये देखील वाढ झालेली दिसत आहे. बोईंगच्या स्टार लाइनर स्पेस क्राफ्टमध्ये बिघाड झाल्याने सुनीता विल्यम्स या अवकाशातच अडकलेल्या आहेत. त्यांना पृथ्वीवर आणण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जात आहे. आणि पर्यायांचा विचार देखील नासाकडून केली जात आहे. सुनीता विल्यम्स आणि बीच विल्मोर हे दोघेही आंतरराष्ट्रीय अवकाश तळावर सध्या आहेत.

सुनिता विल्यम्स (Sunita Williams) आणि बीच विल्मोर हे दोघे पृथ्वीवर कधीपर्यंत येणार याची सगळ्यांनाच आतुरता लागलेली आहे. परंतु ते कधी येणार याची माहिती अजूनही समोर आलेली नाही. लोक याबद्दल वेगवेगळे अंदाज देखील लावत आहे. परंतु आता त्यांच्याबाबत एक वाईट बातमी समोर येत आहे. ती म्हणजे सुनीता विल्यम्स यांची प्रकृती बिघडलेली आहे. त्यामुळे नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या अडचणीत वाढ झालेली आहे.

सुनीता विल्यम्स (Sunita Williams) यांना डोळ्यांच्या प्रकाशासंदर्भात समस्या निर्माण झालेली आहे. मायक्रो ग्रॅव्हिटीच्या संपर्कात सारखे राहिल्यामुळे त्यांना हा आजार झालेला आहे. स्पेस फ्लाईट असोसिएटेड म्हणून हा एक आजार आहे. यामुळे डोळ्याच्या प्रकाशावर परिणाम होतो. आणि धुरकट दिसू लागते. सुनीता विल्यम्स यांच्या कॉर्निया, रेटिना आणि लेन्सची स्कॅनिंग देखील करण्यात आलेली आहे. हा आजार कितपत जास्त प्रमाणात झालेला आहे. या संदर्भात स्कॅनिंग करण्यात आलेले आहे.

सुनिता विल्यम्स आणि बीच विल्मोर हे अंतराळात गेलेले आहे. ते बोईंच्या स्टार लाइनर स्पेस क्राफ्टने परत येणार होते. परंतु या यानामध्ये तांत्रिक बिघाड झाली आणि त्या अवकाशातच अडकले नासा या दोघांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी वेगवेगळ्या पर्यायांचा विचार करत आहे.