Monday, December 22, 2025
Home Blog Page 527

Satara Rojgar Melava 2024 | सातारा जिल्ह्यात 1327 पदांसाठी भरणार रोजगार मेळावा; अशी करा नोंदणी

Satara Rojgar Melava 2024

Satara Rojgar Melava 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही तुम्हाला अशाच एका रोजगार मेळाव्याबद्दलची माहिती सांगणार आहोत. ती म्हणजे आता सातारा येथे एक रोजगार मिळावा भरणार आहे. या आधी देखील त्यांनी एक मिळावा आयोजित केलेला होता. आता सातारा (Satara Rojgar Melava 2024) येथे प्रशिक्षणार्थी, तंत्रज्ञ इलेक्ट्रिकल, डिझाईन अभियंता, आयटीआय प्रशिक्षणार्थी, मशीननिष्ट, टर्नर फिटर, प्रशिक्षणार्थी अभियंता, कार्यालय सहाय्यक आणि इतर अनेक पदांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. त्यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करायची आहे. त्याचप्रमाणे हा मेळावा ऑफलाइन पद्धतीने 21 ऑगस्ट 2024 रोजी होणार आहे. आता या मेळाव्याचे सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

महत्वाची माहिती | Satara Rojgar Melava 2024

  • मेळाव्याचे नाव – पंडित दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा -2
  • पदाचे नाव –प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणार्थी, तंत्रज्ञ इलेक्ट्रिकल, डिझाईन अभियंता, ITI प्रशिक्षणार्थी, मशिनिस्ट, टर्नर, फिटर, प्रशिक्षणार्थी अभियंता, कार्यालय सहाय्यक आणि इतर
  • पदसंख्या –1,327+ जागा
  • पात्रता – खाजगी नियोक्ता
  • अर्ज पध्दती – ऑनलाईन नोंदणी
  • राज्य – महाराष्ट्र
  • विभाग – पुणे
  • जिल्हा – सातारा (Satara)
  • नोकरी ठिकाण – सातारा
  • रोजगार मेळाव्याची तारीख – 21 ऑगस्ट 2024
  • मेळाव्याचा पत्ता – जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा, उंब्रज, ता.कराड जि.सातारा

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी इथे क्लिक करा

RBI Penalties | RBI ने ‘बँक ऑफ महाराष्ट्र’सह ‘या’ बँकांना ठोठावला दंड; जाणून घ्या कारण

RBI Penalties

RBI Penalties | देशातील सर्व बँका आपापल्या परीने काम करत असतात. परंतु रिझर्व बँक ऑफ इंडियाचे या सगळ्या बँकांच्या कामकाजावर बारीक लक्ष असते. जेव्हा कोणतीही बँक आरबीआयच्या नियमांकडे दुर्लक्ष करते. आणि वेगळ्या पद्धतीने काम करते. तेव्हा मध्यवर्ती बँक त्यावर दंड आकारतात. अशातच आता नियमाचे भंग केल्याने भारतीय रिझर्व बँकेने तीन बँकांना चांगला दंड ठोठावला आहे.

रिझर्व बँक ऑफ इंडियाने (RBI Penalties) बँक ऑफ महाराष्ट्रला देखील नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणे दंड ठोठावला आहे. बँकेने त्यांची कर्जप्रणाली सायबर सिक्युरिटी आणि फ्रेमवर्क इन बँक क्रेडिट तसेच केवायसी याबाबतचे नियमांचे पालन केले नाही. म्हणूनच आरबीआयने हा दंड ठोठावला आहे. बँक ऑफ महाराष्ट्रला 1,27,20,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे.

आरबीआयने (RBI Penalties) 31 मार्च 2023 पर्यंत सगळ्या बँकांची आर्थिक स्थिती नक्की कशी आहे याची तपासणी केली होती. तसेच मेमध्ये सर्व बँकांच्या माहिती तंत्रज्ञानाच्या माहितीची देखील तपासणी करण्यात आली होती. परंतु या तपासणी दरम्यान नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आरबीआयचे लक्षात आले. आणि त्यानंतर त्यांनी बँकांना नोटीस बजावून त्या बँकांनी नियमाचे पालन न केल्याबद्दल बँकेला जास्तीत जास्त दंड का लावू नये. अशी विचारणा केली होती.

यानंतर आरबीआयने असे सांगितले की, नोटीसला उत्तर दिल्यानंतर बँकांची वैयक्तिक तपासणी आणि वैयक्तिक सूचनावणी केली जाईल. आरबीआयला त्यानंतर असे आढळले की बँकांवरील आरोप सिद्ध झालेले आहे. त्यानंतर त्यावर दंड आकारला जाऊ शकतो. असे आरबीआयने सांगितले होते. तसेच KYC मार्गदर्शक तत्वे 2016 च्या काही तरतुदींचे पालन न केल्यामुळे रिझर्व बँकेने हिंदुजा लेलँड फायनान्स लिमिटेडला 4.90 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. तसेच पूनावाला फिनकॉर्प लिमिटेडला 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

लाडक्या बहिणींना 90 हजार रूपये देणार, पण… अजितदादांनी घातली ‘ही’ अट

ajit pawar ladki bahin yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील महायुती सरकारकडून माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपये देण्यात आले आहेत. लाखो महिलांच्या बँक खात्यावर हे पैसे जमा झाले असून आणखी काही महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे राज्यभरातील महिलावर्गात मोठ्या आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. त्यातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी महिलांना एक मोठं आवाहन केलं आहे. आम्ही लाडक्या बहिणींना 90 हजार रूपये देणार परंतु त्यासाठी पुन्हा एकदा आम्हाला निवडून द्या अशी विनंती अजित पवारांनी केली आहे.

आज पुण्यातील बालेवाडीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ सुरु आहे. शिवछत्रपती क्रीडा संकुलमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रमाला पार पडत आहे. या कार्यक्रमामध्ये उपस्थित बहिणींशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले, आपल्याला सातत्या टीकवायचं आहे. ते टिकवायचं काम तुमच्या हातात आहे. हे सातत्य टिकवतं असताना पुढच्या पंचवार्षिकला पुन्हा महायुतीला निवडून द्या, पुन्हा आम्हाला पाठबळ द्या, आम्ही तुमच्या खात्यात पुन्हा एकदा 90 हजार रूपये देण्याचं काम करू असं आश्वासन अजित पवारांनी दिले. हे पैसे भाऊ बीज म्हणून तुम्हाला दिले आहेत. हा तुमचा हक्क आहे. कोणी काही बोललं तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका. दिलेली ओवाळणी ही तुमची आहे ती तुमच्याकडेच राहणार आहे असं अजित पवार म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आगामी काळात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढण्याचे संकेत दिले. देण्याची नियत लागते आणि ती आमच्या सरकार मध्ये आहे. तुम्ही आम्हाला आशीर्वाद दिला, बळ दिले तर १५०० रुपयांचे आम्ही पावणे दोन हजार करू, २००० रुपये करू, अडीच हजार करू आणि असच जर मजबूत सरकार तुम्ही निवडून दिले आणि अशीच आमची ताकद वाढली तर आम्ही तुम्हाला ३००० रुपये सुद्धा देऊ अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच या योजनेत खोडा घालायला आलेल्या सावत्र भावांना संधी येईल तेव्हा जोडा दाखवा.’ अशी टीका सुद्धा एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर केली.

Vande Bharat Express : महाराष्ट्रातून धावणार पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कसा असेल रूट?

Vande Bharat Express : संपूर्ण भारतामध्ये रेल्वेचे मोठे जाळे पसरले आहे. रेल्वे सार्वजनिक वाहतुकीच्या सेवेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. त्यातही पूर्णपणे स्वदेशी असलेली वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन प्रवाशांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. आता वंदे भारताच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर असून मुंबईतून उत्तर महाराष्ट्र मार्गे देशातली पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच सुरू होणार आहे. सध्याच्या वंदे भारत (Vande Bharat Express) बाबत बोलायचं झालं तर या ट्रेन चेअर कार प्रकारातील आहेत. मात्र लवकरच स्लीपर ट्रेन सुद्धा उपलब्ध होणार आहेत

सध्या देशातल्या 52 महत्त्वाच्या मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार वंदे भारत हि ट्रेन सर्वप्रथम नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर धावली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने देशातील इतर महत्त्वाच्या मार्गावर (Vande Bharat Express) या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. प्रवाशांचा चांगला प्रतिसाद बघता वंदे भारत स्लीपर ट्रेन वर्जन लॉन्च केले जाणार आहे. मात्र महत्त्वाची बाब म्हणजे चेअरकार वंदे भारत ट्रेन पेक्षा स्लीपर वंदे भारत ट्रेनचा वेग हा कमी असणार आहे. मात्र वंदे भारत चेअर कारच्या तुलनेने ही गाडी आरामदायी असणार आहे

नव्या स्लीपर ट्रेनचा महाराष्ट्राला लाभ (Vande Bharat Express)

नव्याने सुरू होणाऱ्या मुंबई ते वाराणसी स्लीपर वंदे भारत ट्रेन ही महाराष्ट्रातील मनमाड, जळगाव मार्गे बरेली कडे जाणार आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील जनतेला या गाडीचा फायदा होणार आहे. यामुळे खानदेशासहित संपूर्ण (Vande Bharat Express) उत्तर महाराष्ट्रातील जनतेला मुंबईकडे सुसाट जाता येणार आहेत

कसा असेल रूट ? (Vande Bharat Express)

देशातील पहिली वंदे भारत स्लीपर लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई ते बरेली या दरम्यान चालवण्यात येणार आहे. रेल्वे विभागाकडून या गाडीला अंतिम रूप देण्यात आले आहे. ही गाडी 16 कोची असणार असून यामध्ये 11 थर्ड एसी चे कोच, चार सेकंड एसी चे कोच आणि एक फर्स्ट एसी चा कोच राहणार आहे. तर या गाडीची प्रवासी संख्या ही 823 इतकी असणार असून मुंबई ते बरेली (Vande Bharat Express) हा प्रवास 11 तासात पूर्ण होणार आहे. याबरोबरच मुंबई ते आग्रा हा प्रवास दहा तासात पूर्ण होईल. सध्या हा प्रवास करण्यासाठी प्रवाशांना 27 तासांचा कालावधी लागतो. मात्र ही ट्रेन सुरू झाल्यानंतर प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.

BSNL Recharge Plan : BSNL चा जबरदस्त रिचार्ज प्लॅन; रोज 2GB इंटरनेट, 160 दिवसांची व्हॅलिडिटी

BSNL Recharge Plan 997 rs

BSNL Recharge Plan | एअरटेल- जिओ सारख्या देशातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्याने सर्वसामान्य ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे कमी पैशात मोबाईल रिचार्ज मारण्यासाठी अनेकजण देशी टेलिकॉम कंपनी असलेल्या BSNL कडे वळत आहे. अतिशय स्वस्त आणि खिशाला परवडणाऱ्या किमतीत बीएसएनएलचे रिचार्ज उपलब्ध असल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळत आहे. तुम्ही सुद्धा बीएसएनएलचे ग्राहक असाल तर आज आम्ही तुम्हाला अशाच एका रिचार्ज प्लॅन बद्दल सांगणार आहोत त्यामाध्यमातून तुम्ही 160 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह दररोज २GB इंटरनेटचा लाभ घेऊ शकता. तसेच अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा करू शकता.

BSNL चा 997 रुपयांचा रिचार्ज – BSNL Recharge Plan

आम्ही तुम्हाला ज्या रिचार्जबद्दल सांगत आहोत तो आहे बीएसएनएलचा 997 रुपयांचा रिचार्ज प्लॅन. हा रिचार्ज प्लॅन (BSNL Recharge Plan) तब्बल 160 दिवसांच्या व्हॅलिडिटी सह येतोय म्हणजेच एकदा रिचार्ज केल्यानंतर ५ महिने तरी तुम्हाला काही टेन्शन नाही. 997 रुपयांच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २GB म्हणजेच एकूण 320GB इंटरनेट डेटाचा लाभ घेता येतोय. याशिवाय कोणत्याही नेटवर्कवर मोफत अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 मोफत एसएमएसची सुविधाही ग्राहकांना देण्यात येतेय. हा रिचार्ज प्लॅन देशभरात मोफत रोमिंगसह येतो. याव्यतिरिक्त, वापरकर्त्यांना हार्डी गेम्स, झिंग म्युझिक, बीएसएनएल ट्यून्स इत्यादी अनेक मूल्यवर्धित सेवांचा लाभ देखील मिळेल.

दरम्यान, मागच्या महिन्यापासून BSNL च्या सिमकार्डची मागणी प्रचंड वाढली आहे, एअरटेल- जिओचे रिचार्ज महाग झाल्याने ग्राहकांचा बीएसएनएलवर विश्वास वाढला आहे. त्यामुळे या बदललेल्या परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी कंपनी सुद्धा पुढे सरसावली आहे. ऑक्टोबर 2024 पर्यंत BSNL कडून देशभरात सुमारे 80 हजार टॉवर बसवले जातील अशी माहिती केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिली होती. तर मार्च 2025 पर्यंत आणखी हजार टॉवर बसवले जातील असं त्यांनी म्हंटल होते. म्हणजेच एकूण 1 लाख BSNL टॉवर देशात उभारले जातील. सध्या जरी BSNL 4G सेवा देत असली तरी कंपनी 5G इंटरनेटवर सुद्धा काम करत आहे. बीएसएनएलचे नवीन 5G सिमकार्डची झलक सुद्धा काही दिवसांपूर्वी समोर आली होती. त्यामुळे येत्या काळात Jio-Airtel ला टक्कर देत BSNL जोरदार मुसंडी मारण्याची शक्यता आहे.

विधानसभेत कोणता पक्ष किती जागा जिंकणार? झोप उडवणारा सर्वे पहाच

opinion poll vidhan sabha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात येत्या २-३ महिन्यात विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Election 2024) होणार असून त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. राज्यात भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांची महायुती विरुद्व काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाविकास आघाडीत जोरदार टक्कर बघायला मिळणार आहे. दोन्हीकडून आमचंच सरकार येणार असा विश्वास व्यक्त केला जात आहे. तत्पूर्वी आता ‘टाइम्स नाऊ नवभारत’ आणि ‘मॅटराइज’ या संस्थेने केलेला सर्वे समोर आला आहे. महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? कोणत्या पार्टीला किती मते मिळणार? याबाबतचा ओपिनियन पोल समोर आलेला आहे.

महाराष्ट्रात विधानसभेच्या २८८ जागा आहेत. सत्ता स्थापन करण्यासाठी १४५ जागांची गरज लागते. टाइम्स नाऊ नवभारत आणि मॅटराइजच्या ओपिनियन पोल नुसार, भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरेल असं या सर्व्हेत दिसत आहे. भाजपला 95-105 जागा मिळण्याचा अंदाज ओपिनियन पोलमध्ये आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मात्र यंदाच्या विधानसभेत फटका बसणार आहे. एकनाथ शिंदे गटाला केवळ 19-24 जागा मिळतील असा अंदाज आहे. आश्चर्याची बाब म्हणजे महायुतीतील तिसरा पक्ष असलेल्या अजित पवारांना मात्र सर्वात मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. कारण दादा गटाला अवघ्या 7-12 जागा मिळणार असल्याचा दावा इम्स नाऊ नवभारत आणि मॅटराइजच्या ओपिनियन पोल मधून करण्यात आलाय. अन्य पक्षाना 11-16 जागा मिळतील

दुसरीकडे, महाविकास आघाडीबाबत सांगायचं झाल्यास, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पक्षपुटीचा फटका बसल्याचे या ओपिनियन पोल मधून स्पष्ट दिसत आहे. तर काँग्रेस मात्र २०१९ च्या निवडणुकीला जेवढ्या जागा मिळाल्या त्या कायम राखण्यात यश मिळवेल. महाविकास आघाडीत सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस समोर आला आहे. काँग्रेसला 42 ते 47 जागा मिळतील, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 26 ते 31 जागांवर समाधान मानावे लागणार आहे. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 23 ते 28 जागा मिळण्याचा अंदाज ओपिनियन पोलमध्ये वर्तवण्यात आलं आहे. असं असलं तरी महाविकास आघाडी सत्ता स्थापनेपासून बरीच लांब दिसत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची झोप उडवणारा असा हा सर्वे आहे. यावर आता राजकीय नेत्यांकडून काय प्रतिक्रिया येते ते पाहायला हवं.

Viral Video | पुरी ना लाटता थेट कढईत तळण्याचा देसी जुगाड; एकदा व्हिडीओ पाहाच

Viral Video

Viral Video | सध्या सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. या व्हिडिओ मधून कधी कधी आपल्याला अत्यंत कामाची अशी माहिती मिळते, तर कधी कधी त्या व्हिडिओमधून मनोरंजन होत असते. सोशल मीडियावर अनेक युजर्स देखील या व्हिडिओला प्रतिसाद देत असतात. आपल्या भारतामध्ये जुगाड करणाऱ्या लोकांची अजिबात कमतरता नाही. परंतु सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओचा वापर आपण दैनंदिन जीवनात देखील करू शकतो. सध्या सोशल मीडियावर असाच एक नवीन व्हिडिओ व्हायरल होत आहे. तो व्हिडिओ लोकांना देखील खूप आवडत आहे. एका महिलेने जुगाड केला आहे जो लोकांना आवडत आहे.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये (Viral Video) आपण पाहू शकता की, महिला स्वयंपाक घरात जेवण करत आहे. त्या महिलेने गॅसवर एक कढई ठेवली. आणि नंतर गरम करण्यासाठी तेल टाकलेल्या तेलामध्ये आपल्याला एक गोलाकाराचे झाकण देखील दिसत आहे. ती महिला पुरी करण्यासाठी तर झाकणात ओले पीठ टाकत आहे. नंतर तेच झाकण तिने त्या गरम तेलात बुडवले. काही वेळाने पुरी तळून निघालेली आहे आणि एकदम गोलाकार दिसत आहे. म्हणजेच ही पुरी तळण्यासाठी तिने झाकणाचा वापर केलेला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगला दिसत आहे.

हा व्हिडिओ (Viral Video) शेअर करून गोल गोल पुरी करण्याची निंजा टेक्निक असे कॅप्शन देखील लिहिलेले आहे. अनेक महिला वर्गांना हा व्हिडिओ आवडला आहे. आत्तापर्यंत या व्हिडिओला एक लाखापेक्षा जास्त वेळा पाहिले गेले आहे. तर अनेक लोक या व्हिडिओवर सकारात्मक कमेंट करताना देखील दिसत आहे. महिलांना येणाऱ्या अडचणी यावर आता एक चांगला उपाय सापडलेला आहे.

Blue Moon | रक्षाबंधनाला आकाशात दिसणार निळा चंद्र, दुर्मिळ खगोलीय घटनेचे होणार दर्शन

Blue Moon

Blue Moon | यावर्षी नारळी पौर्णिमा म्हणजे रक्षाबंधन खूप खास असणार आहे. कारण रक्षाबंधनच्या दिवशी म्हणजेच सोमवारी 19 ऑगस्ट रोजी आकाशात ब्ल्यू मून दिसणार आहे. हा अत्यंत तेजस्वी असणार आहे. त्यामुळे त्याला ब्लू सुपरमून असे देखील म्हणतात. या रक्षाबंधनाच्या वेळी जी पौर्णिमा येत आहे. ती पौर्णिमा नेहमीसारखी सामान्य पौर्णिमा नाही. या पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला आकाशामध्ये ब्लू मून (Blue Moon) दिसणार आहे. म्हणजेच तुम्हाला चंद्र निळ्या रंगाचा दिसणार आहे त्याला असे म्हणतात. आता याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया

ब्ल्यू मून म्हणजे काय ? | Blue Moon

आकाशात अनेक घटना घडत असतात. त्यातीलच एक खगोलीय घटना म्हणजे ब्लू मून जेव्हा एकाच महिन्यात दोन पौर्णिमा येतात किंवा एका हंगामात चार पौर्णिमा असतात. तेव्हा तिसऱ्या पौर्णिमेला असे म्हणतात. जेव्हा ते चंद्र त्याच्या कक्षेत पृथ्वीच्या जवळ असतो. हा चंद्र सामान्य पौर्णिमेच्या दिवशी दिसणाऱ्या चंद्रापेक्षा 14% मोठा असतो आणि 30% अधिक तेजस्वी देखील असतो.

चंद्राचा रंग निळा का असतो ?

या पौर्णिमेच्या दिवशी चंद्राचा रंग निळा दिसतो. म्हणजेच या दिवशी पण चंद्र नैसर्गिक रुपात दिसतो. फक्त या दिवशी चंद्रकांत आणि मोठा दिसतो. आणि अगदी उजळ दिसतो. त्यामुळे तो निळ्या रंगाचा दिसतो. ही अवकाशातील अत्यंत दुर्मिळ अशी घटना आहे. दर दोन ते तीन वर्षांनी हा ब्ल्यू मून दिसतो.

यावेळी दिसणार ब्लू मून | Blue Moon

यावर्षी 19 ऑगस्टला रक्षाबंधनच्या दिवशी संध्याकाळी 6 वाजून 56 मिनिटांनी चंद्रोदय होणार आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी चंद्रस्तो होणार. यावेळी चंद्र सुमारे 2 वाजून 26 वाजता पूर्ण टप्प्यात पोहोचेल. त्यावेळी स्थानिक हवामानाने दृश्य मानतेनुसार लोक ब्लु मून पाहू शकतील

Gold Price Today : रक्षाबंधनपूर्वी सोने-चांदीचे भाव किती? आजचे दर इथे पहा

Gold Price Today 17 august

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । १९ तारखेला रक्षाबंधन असून यानिमित्ताने काहीजण आपल्या बहिणीला किंवा भावांना गिफ्ट म्हणून सोने देतात. त्यामुळे रक्षाबंधनाच्या आधी सोने- चांदीच्या किमती (Gold Price Today) काय आहेत हे जाणून घेणं आवश्यक आहे. आज शनिवार १७ ऑगस्ट २०२४ रोजी म्हणजेच आठवड्याच्या बाजाराच्या शेवटच्या दिवशी सोने- चांदीच्या किमतीत वाढ पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर २४ कॅरेट १० ग्राम सोने 70960 रुपयांवर व्यवहार करत असून या किमतीत २२ रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीच्या भावात सुद्धा २५ रुपयांची किरकोळ वाढ झाली असून एक किलो चांदीचा दर 83050 रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

गुड रिटर्न वेबसाईट नुसार, २२ कॅरेट १० ग्राम सोन्याचा दर ६६७०० रुपये आहे तर २४ कॅरेट सोने ७२७७० रुपये प्रति तोळा आहे. तर एक किलो चांदीचा भाव ८६००० रुपये इतका आहे. तुम्ही घरबसल्या मिस्ड कॉलद्वारे सुद्धा सोन्या-चांदीची किंमत तपासू शकता. 22 कॅरेट सोन्याचे आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. भारतात वेगवगेळ्या शहरानुसार सोन्या-चांदीचे भाव (Gold Price Today) सुद्धा वेगवेगळे आहेत.

गुड रिटर्न नुसार सोन्याचा भाव – Gold Price Today

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)-

पुणे- 66,700 रुपये
मुंबई – 66,700 रुपये
नागपूर – 66,700 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 72,770 रूपये
मुंबई – 72,770 रूपये
नागपूर – 72,770 रूपये

सोन्याची शुद्धता कशी तपासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

Best Tourism Places In Monsoon | पावसाळ्यात महाराष्ट्रातील या 5 ठिकाणांना द्या भेट; मन होईल अगदी प्रसन्न

Best Tourism Places In Monsoon

Best Tourism Places In Monsoon | पावसाळा आला की संपूर्ण निसर्गाचे चित्र बदलते. सर्वत्र हिरवाई दिसते. डोंगर दऱ्या, नदी,नाले सगळे ओसंडून वाहत असतात. त्याचप्रमाणे डोंगरावरून कोसळणारे शुभ्र दुधासारखे धबधबे, तर लोकांचे खास आकर्षण असते. त्यामुळे सगळेच लोक पावसाळ्यामध्ये (Best Tourism Places In Monsoon) निसर्गाच्या सानिध्यात त्यांचा वेळ घालवतात. परंतु जर तुम्हाला महाराष्ट्रातील काही चांगल्या ठिकाणी फिरायला जायचे, असेल तर आधी त्या ठिकाणाबद्दल माहिती असणे खूप गरजेचे असते. त्या ठिकाणी गेल्यावर तुम्हाला कोण कोणत्या गोष्टींची गरज असते. त्यामुळे आज आपण महाराष्ट्रातील अशा काही ठिकाणांबद्दल जाणून घेणार आहोत. ज्या ठिकाणी तुम्ही पावसाळ्यात जायलाच पाहिजे.

कोलाड | Best Tourism Places In Monsoon

Kolad

कोलाड हे महाराष्ट्रातील पावसाळ्यासाठी असलेले एक प्रसिद्ध असे ठिकाण आहे. मुंबई जवळ हे ठिकाण आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी हे ठिकाण अत्यंत सोयीचे आहे. या ठिकाणी विविध वनस्पती आहेत. त्याचप्रमाणे दुर्मिळ प्राणी आणि नैसर्गिक विविधता आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी तुम्ही पिकनिक किंवा कॅम्पिंग देखील प्लॅन करू शकता. तसेच या ठिकाणी जवळच गुहा, किल्ले आणि धबधब्याचा तुम्हाला मनमोहक आनंद घेता येईल.

इगतपुरी

Igatpuri

पावसाळ्यात महाराष्ट्रात फिरण्यासाठी असणाऱ्या ठिकाणांपैकी इगतपुरी हे अत्यंत सुंदर असे ठिकाण आहे. हे ठिकाण पुण्याजवळ वसलेले आहे. प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी हे एक स्थळ आहे. त्यामुळे पुण्याजवळ राहणाऱ्या लोकांना हे ठिकाण अत्यंत सोयीचे आहे. इगतपुरी हे ठिकाणी निसर्गाला मिळालेले एक मोठे वरदानच आहे. निसर्गप्रेमी या ठिकाणी सातत्याने येत असतात. या ठिकाणी अनेक किल्ले आहेत डोंगर नद्या त्याचप्रमाणे डोंगरावरून कोसळणारे धबधबे पाहणे, म्हणजे निसर्ग प्रेमींसाठी एक मेजवानीच आहे. त्यामुळे तुम्ही या ठिकाणाला नक्की भेट द्या.

महाबळेश्वर

Mahabaleshwar

महाबळेश्वर हे मुंबई आणि पुणे या ठिकाणी असणाऱ्या रहिवाशी लोकांसाठी अत्यंत सोयीचे ठिकाण आहे. महाबळेश्वर हे अगदी निसर्गाच्या सानिध्यात असल्याने त्या ठिकाणी आपल्याला दुर्मिळ असे प्राणी वनस्पती पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे पावसाळ्यात महाबळेश्वरचे सौंदर्य हे आणखीनच खुलते. कारण डोंगरावरून वाहणारे धबधबे, त्याचप्रमाणे डोंगरावर आलेले आकाश या सगळ्या गोष्टी अगदी नयनरम्य असतात. या व्यतिरिक्त तुम्हाला ऐतिहासिक स्थळे देखील पाहायला मिळतील. तसेच ज्यांना ट्रेकिंग करायचे आहे. त्यांच्यासाठी महाबळेश्वर हे ठिकाण अत्यंत सोयीचे आहेत.

लोणावळा खंडाळा

Lonavala

पुणे- मुंबई महामार्गावर सह्याद्रीच्या घाट- माथ्यावर असलेले हे एक अत्यंत प्रसिद्ध असे ठिकाण आहे. लोणावळ्या आणि खंडाळा या ठिकाणी अनेक लोक जातात. या ठिकाणी तुम्हाला टायगर पॉईंट, लायन पॉईंट यांसारखी प्रसिद्ध ठिकाणे पाहायला मिळेल. त्याचप्रमाणे इथे हिरवागार निसर्ग असतो. थंड हवा असते. तसेच डोंगरावरून कोसळणारे धबधबे, दाट धुके हे एक खास आकर्षण आहे. त्यामुळे पावसाळ्यात अनेक लोक लोणावळ्याला नक्की जातात.

भीमाशंकर | Best Tourism Places In Monsoon

Bhimashankar

महाराष्ट्रातील भीमाशंकर हे एक प्रसिद्ध असे पर्यटन स्थळ आहे. आणि ते एक देवस्थान देखील आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रत्येक ऋतूमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. परंतु पावसाळ्यामध्ये या ठिकाणी खास गहू गर्दी असते. कारण भीमाशंकरचे जंगल या ठिकाणी असलेले अभयारण्य, हिरवा निसर्ग, नद्या हे पर्यटकांना आकर्षित करत असतात. जंगल प्रेमी आणि ज्यांना ट्रेकिंग करायची आहे. त्यांच्यासाठी हे ठिकाण अत्यंत असे उत्तम ठिकाण आहे. या ठिकाणी तुम्हाला विविध प्रकारचे प्राणी संपदा देखील पाहायला मिळेल. आणि या ठिकाणी बसून तुम्ही पर्यटनाचा आनंद घेऊ शकता.