Tuesday, December 16, 2025
Home Blog Page 5262

कृषी क्षेत्रामुळे सरकारला जीडीपी मध्ये थोडासा दिलासा 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। दोन दिवसांपूर्वी केंद्र सरकारने  जाहीर केलेल्या आकडेवारीने संबंध देशात जीडीपी च्या घसरणीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. जूनमध्ये संपलेल्या पहिल्या  तिमाहीत  सकल राष्ट्रीय उत्पन्न हे -२३% ने  घटले  आहे. स्वातंत्र्यानंतर  पहिल्यांदाच जीडीपीमध्ये  एवढी घट  नोंदवण्यात आली आहे. सगळी क्षेत्रे कोलमडत असताना कृषी क्षेत्रात मात्र ३.४% वाढ  झाल्यामुळे मोदी सरकारला थोडासा दिलासा मिळाला आहे.

कोरोनाच्या संकटामुळे देशातील अनेक उद्योग व्यापार अडचणीत आले आहेत. देशाची  आर्थिक स्थिती रुळावर आणण्यासाठी कृषी क्षेत्र मह्त्वाची भुमिका निभावणार अशी बतावणी अनेक जणांनी केली होती. याचीच प्रचिती या अहवालातून आली आहे. आपण जीडीपीचे आकडे पाहिल्यास मोदी सरकार  देशाची अर्थव्यवस्था  हाताळण्यास सपशेल अपयशी  ठरले आहे.  कोरोनाच्या आगोदर  देशाची अर्थव्यवस्था मंदावली  होती. आता  मात्र  कोरोनामुळे हि  परिथिती अधिक बिकट होत गेली. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर  शेती  क्षेत्राने ३.४% एवढी समाधानकारक वाढ नोंदवली  आहे.

कृषी  क्षेत्राला  ताळेबंदीच्या काळात मिळालेली सूट आणि ग्रामीण भागाची असलेली स्वतंत्र  अर्थव्यवस्थेची  समांतर व्यवस्था यामुळे  कृषी क्षेत्राने हि प्रगती साधली आहे. मागच्या महिन्यात  शेती क्षेत्राच्या संबंधित  अनेक उद्योगानी वाढ नोंदवली होती.  त्यामुळे अर्थव्यस्थेला चालना   मिळाली.  येणाऱ्या तिमाहीतही जेव्हा  इतर क्षेत्रे हळूहळू प्रगती करत असतील तर शेती मात्र या सगळ्याच्या  पुढे असेल आणि   पुढच्या तिमाहीतही कृषी  क्षेत्र देवाच्या अर्थव्यस्थेला चालना देईल. मागच्या महिन्यात  वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी   या कोरोनामसारख्या महामारीच्या काळात  कृषिक्षेत्र आपल्याला वाचवू  शकते त्यामुळे त्यासाठी अधिक गुंतवणुकीची आवश्यकता आहे असे  म्हटले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

वार्तांकनावेळी डिवचणाऱ्या रिपब्लिक टीव्हीच्या पत्रकाराला मुंबईच्या पत्रकारांनी दिला चोप; व्हिडिओ व्हायरल

मुंबई । आपल्या अतरंगी वार्तांकनासाठी ओळखले जाणारे रिपब्लिकच टीव्हीचे पत्रकार प्रदीप भंडारी यांना मुंबईतील टीव्ही पत्रकारांनी चोप दिल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये प्रदीप भंडारी यांना इतर पत्रकारांकडून धक्काबुक्की होताना दिसत आहे. मुंबईतील इतर चैनलचे पत्रकार वार्तांकन करताना भंडारी वारंवार त्यांच्या कामात व्यत्यय अनंत त्यानं हिणवत असल्याचा आरोप घटनास्थळावर प्रत्यक्षदर्शी पत्रकारांनी केला आहे. प्रदीप भंडारी यांनी ट्विट करत एनडीटीव्ही आणि एबीपीच्या पत्रकारांचा गुंड असा उल्लेख करत त्यांच्यावर मारहाण केल्याचा उलट आरोप केला आहे.

मुंबईतील पत्रकारांच्या सांगण्यानुसार, भंडारी हे मुंबईतल्या पत्रकारांना चाय बिस्कुट पत्रकार म्हणून हिणवत होते, थोडक्यात तुम्ही खरी पत्रकारिता करत नाही, ती आम्ही करतो असं ते डिवचत असल्याचं काही पत्रकारांनी सांगितलं. तसंच अत्यंत आक्रस्ताळ्या पद्धतीनं रिपोर्टिंग करताना रिपब्लिकचे पत्रकार अन्य पत्रकारांच्या कामात प्रचंड व्यत्यय आणत होते अशी चर्चाही मुंबईतल्या पत्रकारांच्या वर्तुळात होती. या सगळ्याचा उद्रेक गुरूवारी झाल्याचं बघायला मिळालं.

व्हायरल झालेल्या व्हिडीओत प्रदीप भंडारी यांना धक्काबुक्की होताना दिसत आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात शाब्दिक चकमकही सुरु होती. पोलीस पोहोचण्याआधीच हा वाद सुरु झाला होता. वाद वाढल्यानंतर पोलीस आणि इतर सहकारी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. हा वाद नेमका कशामुळे झाला याबाबत स्पष्ट माहिती मिळालेली नाही.

एनडीटीव्हीच्या पत्रकारांनीही ट्विटरच्या माध्यमातून आपली बाजू मांडली आहे. एनडीटीव्हीच्या सौरभ गुप्ता यांनी समोरच्या बाजुनं शिवीगाळ व गैरवर्तणूक होत होती, परंतु एनडीटीव्हीच्या पत्रकारांनी परिस्थिती शांतपणे हाताळल्याचे म्हटलं आहे. तसंच, भंडारी यांनीच दाखवलेल्या व्हिडीओमध्येही ते स्पष्ट असल्याचं गुप्ता यांनी म्हटलं आहे.

या घटनेनंतर प्रदीप भंडारी यांनी ट्विट केलं असून ड्रग्ज रॅकेटमधील मोठी नावं समोर आणल्याने आपल्यावर हल्ला झाल्याचा दावा केला आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, “महाराष्ट्रात सत्य बोलण्याची काय किंमत आहे माहिती आहे का? ड्रग्ज रॅकेटमधील प्रसिद्ध चेहरे समोर आणल्याने यांचा संताप वाढत आहे. जेव्हा पोलिसांमार्फत काही झालं नाही तर आज एनडीटीव्ही आणि एबीपीच्या गुंड पत्रकारांना माझ्यासोबत हाणामारी करण्यासाठी पाठवलं. पण मी माघार घेणाऱ्यांपैकी नाही”. या सगळ्या प्रकरणातून आता पत्रकारांमध्येही गट पडत असल्याची व अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन हमरीतुमरीवर उतरण्याची स्पर्धा होत असल्याची चर्चा समाजमाध्यमांमध्ये रंगली आहे. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

 

 

लहानपणी जास्त गुटगुटीत असणे हे सुद्धा आहे आजाराचे लक्षण

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । लहान मुलं एकमेकांशी खेळत असतात त्यावेळी सर्वात जास्त कौतुक हे सगळ्या मुलांचे केले जात नाही. त्यातील जी मुलं दिसायला स्मार्ट आहेत किंवा शरीराने बलाढ्य आहेत. त्याचे कौतुक हे जास्त प्रमाणात पाहायला मिळते. पण त्याच्या शरीराचे असणारे वजन सुद्धा एक प्रकारची आई वडिलांसाठी डोकेदुखी आहे. भविष्यात या मुलांना खूप त्रास सहन करावा लागतो. मधुमेह तसेच हृदयरोग यासारखे आजार लहान वयातच मुलांना निर्माण होतात.

लठ्ठपणाचे कोणते दुष्परिणाम आहेत हे जाणून घेऊया

-जी मुले पाच ते दहा वयापर्यंत लठ्ठ राहतात. ती मुले आपला किशोर वयात सुद्धा तशीच राहतात. त्या मुलांना प्रौढांग वयात सुद्धा लठ्ठपणाचा सामना करावा लागतो.

-लठ्ठपणा येण्याचे प्रमाण हे मुलींमध्ये आणि मुलांमध्ये सारख्या प्रमाणात आहे.

-खाण्यापिण्याच्या खूप वाईट सवयीमुळे लठ्ठपणा हा जास्त वाढतो.

-लठ्ठ मुलींमध्ये वयाच्या अगोदर पाळी येण्याचे प्रमाण जास्त असते.

-लठ्ठ मुलींना नको असलेल्या ठिकाणी केस वाढायला सुरुवात होते.

-अनेक वेळा लठ्ठ मुलांचे शरीर योग्य रित्या वाढत नाही. त्याच्या दाढीमध्ये वाढ होत नाही.

-मुलाची मुलींच्या छातीसारखी वाढ होण्यास सुरुवात होते.

  • वजनाचा परिणाम हा हाडांवर होतो. त्यामुळे शरीराची मोठ्या प्रमाणात झीज होते. हाडे ठिसूळ होतात.

  • तसेच या मुलांमध्ये नकारात्मकता वाढते

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

सराफा बाजारात आज सोने 485 रुपये आणि चांदी 2081 रुपयांनी झाले स्वस्त, नवीन दर जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्ली बुलियन मार्केटमध्ये आज सलग चौथ्या दिवशी सोन्या-चांदीच्या किंमती घसरल्या आहेत. वास्तविक, जागतिक बाजारपेठेतील पिवळ्या धातूच्या किंमतींमध्ये गेल्या काही दिवसांत कमजोरी दिसून येत आहे. त्यामुळे त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारावरही दिसून येतो आहे. गुरुवारी दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोन्याचे दर परी 10 ग्रॅम 485 रुपयांनी स्वस्त झाले आहे. याखेरीज चांदीचे दरही आज 2000 रुपयांनी खाली आले आहेत. तज्ज्ञांचे याबाबत असे म्हणणे आहे की, सोन्याच्या किंमतीतील घसरणीचा कल आज सलग तिसर्‍या दिवशीही कायम आहे. अमेरिकन डॉलरच्या वाढीमुळे परकीय बाजारात सोन्याची किंमत 2 टक्क्यांनी घसरून 1832 डॉलर प्रति औंस झाली आहे. म्हणूनच देशांतर्गत बाजारात सोन्याची खरेदी स्वस्त झाली आहे. गेल्या चार दिवसांत सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम सुमारे 2,500 रुपये स्वस्त झाले आहेत. मागील सत्रात सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅम 950 रुपयांनी घसरले होते, तर बुधवारी चांदीच्या किंमती 4.5 किलो किंवा 2,700 रुपये प्रति किलोने खाली आल्या.

सोने-चांदी इतक्या मोठ्या प्रमाणात का घसरले?
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले, “दिल्लीतील 24 कॅरेट स्पॉट सोन्याच्या किंमतीत प्रति 10 ग्रॅम 485 रुपयांनी घट झाली आहे.” हे आंतरराष्ट्रीय बाजारातील विक्री दर्शवते. आंतरराष्ट्रीय बाजारात हे दोन्ही मौल्यवान धातू घट नोंदवत आहेत”. ते पुढे म्हणाले की,” कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांमध्ये डॉलरची ताकद युरोपमधील आर्थिक क्रियेतून ओसरली जात आहे. हेच कारण आहे की, सध्या काही काळ सोन्याच्या किंमती खाली येत आहेत.”

रिलायन्स सिक्युरिटीजचे वरिष्ठ रिसर्च अनॅलिस्ट श्रीराम अय्यर म्हणाले की,”गुरुवारी आंतरराष्ट्रीय बाजारातील गुंतवणूकदारांचे सोने-चांदीच्या आघाडीवर परिणाम झाले. गुरुवारी, दुपारच्या सत्रात डॉलरची मजबुती दिसून आली. परकीय बाजाराच्या कमकुवत किंमतींमुळे देशांतर्गत बाजारात याच्या किंमत खाली आलेल्या आहेत.

चांदीचे नवे दर
आज चांदीच्या किंमतींमध्येही मोठी घट नोंदली गेली. गुरुवारी दिल्ली बुलियन मार्केटमधील चांदी 2081 रुपये प्रति किलोने खाली येऊन 60 हजार रुपयांवर आली आहे. चांदीची नवीन किंमत आता 58,099 रुपये प्रति किलो झाली आहे. यापूर्वी चांदीचा दर हा प्रति किलो 60,180 रुपये होता. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांदीच्या किंमतीबद्दल बोलतांना ते प्रति औंस 22.12 डॉलरवर आहेत.

सोन्याचे नवे दर
जागतिक बाजारपेठेतील कमजोरीनंतर दिल्लीच्या सराफा बाजारात आज सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 485 रुपयांनी स्वस्त झाले असून ते 50,418 रुपयांवर पोहोचले आहेत. पहिल्या व्यापारी सत्रात सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 50,903 रुपयांवर बंद झाले तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोने प्रति औंस 1,854 डॉलर इतके होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

आरेवाडीच्या बिरोबाला फसवलेले पडळकर आता विठ्ठलाला फसवायला आलेत: विक्रम ढोणे

पंढरपूर । दोन वर्षापुर्वी आरेवाडी येथील बिरोबाच्या बनात धनगर आरक्षणप्रश्नी खोट्या शपथा घेतलेले गोपीचंद पडळकर यांनी आता नव्याने फसवणुकीचा डाव मांडला आहे. विठ्ठलाच्या नावाने धनगर समाजाची फसवणूक करण्यासाठी ते पंढरपुरात आंदोलन करत आहेत. विठ्ठल मंदिरात ढोल बजाओ आंदोलन करणाऱ्या पडळकरांनी स्वत:च्या स्वार्थासाठी धनगर आरक्षणाचा ढोल कधीच फोडला आहे. त्यामुळे पडळकरांच्या भाजपप्रणित एजेंड्यापासून धनगर समाजाने सतर्क राहावे, असे आवाहन धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी केली आहे.

समाजाची सर्वाधिक फसवणूक करणाऱ्या पडळकरांना धनगर आरक्षणप्रश्नी आंदोलन करण्याचा नैतिक अधिकार नाही. पंढरपूरमधील आंदोलन म्हणजे निव्वळ स्टंट, ‘इव्हेंट’ आहे, असेही ढोणे यांनी म्हटले आहे. भाजपचे विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी चार दिवसांपुर्वी धनगर एसटी आरक्षणाचा अध्यादेश राज्य शासनाने काढावा आणि तातडीने दाखले द्यावेत, अशी मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे. तसेच 25 सप्टेंबरला पंढरपूर येथे आरक्षणप्रश्नी ‘ढोल बजाओ’ आंदोलन घोषित केले आहे. त्यासंदर्भात विक्रम ढोणे यांनी आज धनगर विवेक जागृती अभियानाची भुमिका मांडली.

वर्षानुवर्षे धनगर एसटी आरक्षणप्रश्नी फक्त आश्वासने देवून समाजाची मते लाटली जात आहेत. समाजीत स्वयंघोषित नेत्यांना हाताशी धरून राजकीय पक्ष व्होटबँक पॉलिटिक्स करत आहेत. याप्रश्नी समाजाचे होत असलेले शोषण थांबावे म्हणून अभियानाने वस्तुस्थिती मांडून फसव्या प्रवत्तींचा खरा चेहरा उघड करण्याची भुमिका घेतलेली आहे. त्यातीलच पडळकर हे शिताफिने समाजाला फसवत आहेत हे अभियानाने वेळोवेळी दाखवून दिले आहे, असे ढोणे म्हणाले.

पडळकरांनी हार्दिक पटेलांनाही फसवले!
गोपीचंद पडळकर यांनी स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी आरेवाडी (जि. सांगली) येथील बिरोबा देवस्थान ट्रस्टला हाताशी धरून धनगर समाजाचा दसरा मेळावा सुरू केला. सर्वसमावेशक चर्चेनंतर हा मेळावा कोणा एका नेत्याच्या प्रमोशनसाठी करायचा नाही, या मेळाव्याला फक्त समाजाच्या नेत्यांना बोलवायचे, तसेच स्टेजवर कुणीही नेत्याने बसायचे नाही असे ठरले. त्याप्रमाणे दोन वर्षे झाले, मात्र तिसऱ्या वर्षी पडळकरांचा मूळ कारस्थानी स्वभाव जागा झाला. त्यांनी धनगर समाजाच्या प्रतिनिधींना न विचारता स्वत:च्या स्वार्थासाठी तिथे गुजरातमधील पटेल आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांना बोलावले व स्वत:च्या नेतृत्वाचे प्रमोशन केले. माझ्या घरातील कुणी भाजपकडून उभे राहिले तरी मतदान करू नका, अशी बिरोबाच्या नावाने शपथ दिली. प्रत्यक्षात पडळकर हे समाजाच्या भावनेला हात घालून भाजपच्यानेत्यांशी सेटिंग करत होते. आपण भाजपविरोधात लढाई करतोय अशी बतावणी करून पडळकरांनी हार्दिक पटेलांना आरेवाडीच्या मेळाव्याला बोलावले होते, मात्र त्यांचीही फसवणूक करून पडळकर पुढे भाजपात सामिल झाले. महाराष्ट्रातील धनगर समाजाबरोबरच गुजरातच्या हार्दिक पटेलांची फसवणूक करणारे पडळकर हे तर बंडलबाज नेतृत्व आहे.

म्हणून पडळकरांचे डिपॉझिट जप्त झाले!
लोकसभा निवडणूक आठवड्यावर असताना पडळकरांनी महाड ते मुंबई आंदोलन जाहीर केले. हे आंदोलन जाहीर करत असताना एसटी सर्टिफिकेट घेतल्याशिवाय मुंबईतून उठणार नाही, असे पडळकरांनी सांगितले होते. प्रत्यक्षात कुठल्याही प्रकारचे आरक्षण मिळाले नाही. सवलतींचा बागुलबुवा दाखवून पडळकर मॅनेज झाले. सरकार पाडायला गेलेले पडळकर फडणवीसांचे अभिनंदन करून परत आले. भाजपच्या इशाऱ्यावरून वंचित आघाडीत जावून लोकसभा निवडणुकीला लढले. त्या मतविभागणीचा फायदा भाजपलाच झाला. पडळकरांच्या तोंडी भाजप विरोधाची भाषा होती, मात्र प्रत्यक्ष कृती भाजपच्या सोयीची होती. हे पुढे सिद्ध झाले. पडळकरांनी विधानसभा निवडणुकीच्या अगोदर विधान परिषदेच्या आमदारकीच्या अटीवर भाजपमध्ये प्रवेश केला. बारामतीत लाखाच्या आसपास धनगर मतदान असल्याने त्यांना भाजपने बारामतीत उभे केले, मात्र तिथे बिरोबाच्या खोट्या शपथा घेतल्याचा मुद्दा गाजला. पडळकरांचे डिपॉझिट जप्त झाले. त्यांना 30 हजार मते मिळाली. भाजपचे मूळ मतदान 50 टक्क्यांनी घटले. बारामतीच्या धनगर समाजाने पडळकरांना आणि भाजपला साफ नाकारले. कोट्यवधी रूपये खर्च करूनही डिपॉझिट जप्त झालेल्या या पडळकरांना भाजपने विधान परिषद आमदार करून धनगर समाजाला संभ्रमित करण्याचे काम दिले आहे. त्याचाच भाग म्हणून गैरलागू मुद्दा असलेल्या जीआरच्या मागणीसाठी पडळकर आंदोलन करत आहेत.

पडळकर आणि उत्तम जानकर वेगवेगळे कां?
पडळकरांची धनगर आरक्षणप्रश्नी कोणतीही बांधिलकी नाही. त्यांनी गेल्या 2 वर्षात जे काही केले आहे ते स्वत:च्या आमदारकीसाठी केले आहे. यासाठी ते आक्रमपणे खोटे बोलत आहेत. पडळकर आणि माळशिरसचे उत्तम जानकर यांनी लोकसभेच्या निवडणुकीआधी स्वत:च्या स्वार्थासाठी ‘धनगर आरक्षणाचा अखेरचा लढा’ हे आंदोलन घोषित केले. यादरम्यान लोकांच्या भावनेला हात घालणारी भाषणे करून स्वत:चे नेतृत्व प्रोजेक्ट केले. हे दोघेच आंदोलनाचे नेते होते, बाकी कुणाला सोबत घेत नव्हते. त्यांच्या सभांवेळी फक्त दोघांच्या खुर्च्या स्टेजवर असायच्या. लोकसभेवेळी या दोघांनी भाजपशी सेटिंग केले. त्यानंतर ‘अखेरचा लढा’ हे आंदोलन गुंडाळले. मध्यंतरी उत्तम जानकर यांनी देवेंद्र फडणवीस हे भामटे असल्याची टीका केली. धनगर आरक्षणप्रश्नी भाजपने असे काही केले आहे की पडळकर भाजपमधून बाहेर पडतील, असे त्यांनी म्हटले होते. पडळकर आणि उत्तम जानकर यांच्या कथित आंदोलनातील अंदाधुंदी यानिमित्ताने बाहेर आलेली आहे. त्यामुळे पडळकर यांनी उत्तम जानकर यांना बरोबर घेवून समाजाला आधी सर्व प्रश्नांची उत्तरे द्यायला हवीत. पडळकर हे भाजपचे प्रवक्ते आहेत. ते पुर्णवेळ भाजपचा एजेंडा चालवत आहेत. ते समाजाचा एजेंडा चालवत नाहीत. त्यामुळे 25 तारखेला होत असलेले पडळकरांचे आंदोलन हे भाजपप्रणित आंदोलन आहे. ते सर्वसमावेशक धनगर समाजाचे आंदोलन नाही. भाजपच्या सोयीसाठी समाजाचा वापर चालवला आहे. आरेवाडीच्या बिरोबानंतर आता पंढरीच्या विठ्ठलाच्या नावावर फसवणुक सुरू केली आहे. ही त्यांची फसवणुक काही दिवसांत उघडी पडेल, असा दावाही विक्रम ढोणे यांनी केला आहे.

मग ‘गॉडगिफ्ट’ फडणवीसांनी जीआर कां काढला नाही?
मराठा आरक्षणाच्या स्थगितीनंतर महाराष्ट्रात मराठा आरक्षण कायम राहण्यासाठी अध्यादेश काढण्याची चर्चा सुरू आहे. त्यावर पडळकरांनी लगेच धनगर आरक्षणासाठी अध्यादेश काढून दाखले देण्याची मागणी केली. मुळात ही मागणी बावळटपणाची आहे. धनगर एसटी आरक्षण आणि मराठा आरक्षण हे दोन वेगळे आणि स्वतंत्र आहेत. धनगर समाजाला महाराष्ट्रात आरक्षण आहे आणि त्याचा जीआरसुद्धा आहे. धनगर एसटी आरक्षणाचा प्रश्न हा केंद्र शासनाशी संबंधित आहेत. महाराष्ट्र शासनाने शिफारस दिल्यानंतर केंद्र शासन एसटी आरक्षणाला मंजूरी देते त्यानंतर राष्ट्रपती याचा आदेश काढतात. ही घटनात्मक प्रक्रिया आहे. असे असताना पडळकर समाजाला चुकीची दिशा दाखवत आहेत असा जी. आर. काढता येत होता तर पडळकरांसाठी ‘गॉडगिफ्ट’ असलेल्या देवेंद्र पडणवीस यांनी तो कां काढला नाही, याचे उत्तरे द्यावे, असा सवाल ढोणे यांनी केला आहे.

प्रतिज्ञापत्राबाबतीत पडळकरांकडून दिशाभूल
उच्च न्यायालयात धनगर आरक्षणप्रश्नी दाखल असलेल्या याचिकांमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्य शासनाने प्रतिज्ञापत्र दाखल आहे. या प्रतिज्ञापत्रात धनगर व धनगड एक असल्याचे, तसेच धनगर समाजाला एसटी आरक्षण द्यावे असे कुठेही म्हटलेले नाही, मात्र धनगर व धनगड एक असल्याचे प्रतिज्ञापत्र फडणवीसांनी दिल्याचे पडळकर हे राणा भीमदेवी थाटात सांगत आहेत. शिवाय मोदी सरकारने या याचिकांमध्ये धनगरांच्या विरोधात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. भाजप कायदेशीर पातळीवर विरोधी भुमिका घेत असताना पडळकर समाजाला ढोल बडवायला लावून सत्यापासून दूर नेत आहेत. उच्च न्यायालयात घेण्यात आलेल्या भुमिकांसंदर्भात कुणाशीही जाहीर चर्चेची तयारी असल्याचे ढोणे यांनी म्हटले आहे. पडळकरांचे आंदोलन हे भाजपचे आंदोलन आहे, मात्र ते समाजाचे असल्याचे दाखवण्याची पडळकरांची धडपड आहे. असेही ढोणे यांनी म्हटले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

 

 

आता विमानात सामान घेऊन जाण्याविषयीचे नियम बदलले, नवीन नियम काय आहेत ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । घरगुती प्रवाश्यांसाठी नागरी उड्डाण मंत्रालयाने (Ministry of Civil Aviation) विमान कंपन्यांवर सामानाच्या लिमिटेशनचा निर्णय सोडला आहे. विमान कंपन्या (Airlines) घरगुती मार्गावरील सामानाची मर्यादा ठरवतील असे अधिकृत आदेशात म्हटले आहे. सुमारे दोन महिन्यांच्या लॉकडाउननंतर 25 मे रोजी जेव्हा स्थानिक उड्डाणे पुन्हा सुरू करण्यात आली तेव्हा नागरी उड्डाण मंत्रालयाने प्रवाशांना केवळ एक चेक इन बॅगेज आणि एका हाताच्या बॅगेला परवानगी दिली जाईल असे म्हटले होते. एकीकडे एक नवीन आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशानुसार, ‘सामानाची मर्यादा ही आता विमान कंपनीच्या धोरणावर आधारित असेल’

स्टेकहोल्डर्सकडून मिळालेल्या फिडबॅकनंतर हा आदेश जारी केला
मंत्रालयाने असेही म्हटले आहे की,’ चेक-इन बॅगेजशी संबंधित विषयाचा आढावा घेण्यात आला आहे. यामध्ये स्टेकहोल्डर्सकडून मिळालेला फिडबॅक / इनपुट्स विचारात घेतले गेले आहेत. सध्या एअरलाइन्सना आदेश आहेत की,’ते कोरोना कालावधीपूर्वीच्या एकूण उड्डाणांच्या 60 टक्केच उड्डाणे चालवतील.’

कोरोना काळापूर्वी बॅगेजबाबत काय नियम होता
कोरोना विषाणूच्या साथीच्या अगोदर एअर इंडिया ही एकमेव एअरलाईन अशी होती जी प्रवाशांना 20-किलो सामान ठेवण्याची परवानगी द्यायची. बर्‍याच खाजगी विमान कंपन्या इकॉनॉमी क्लासच्या प्रवाश्यांसाठी केवळ 15 किलो सामाना नेण्याची परवानगी देतात. यामुळे प्रवाशांना अतिरिक्त सामानासाठी अतिरिक्त पैसे द्यावे लागायचे.

दरम्यान, बुधवारी एअर इंडिया एक्सप्रेसने ट्विट करुन म्हटले आहे की,’ ते सध्या फक्त सौदी अरेबिया ते भारत ऑपरेट करत आहे.’ या ट्विटमध्ये असे सांगितले गेले होते की,’सौदी अरेबियाहून प्रवाशांना भारतात नेण्यासाठी विमान कंपनी जाणार नाही.’ यापूर्वी 22 सप्टेंबर रोजी सौदी अरेबियन नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने भारत, अर्जेंटिना आणि ब्राझीलच्या विमानांवर बंदी घातली होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

कालावधी पूर्ण होण्याअगोदर अपुऱ्या दिवसाचे बाळ का जन्माला येते ?

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । प्रत्येक आईला आपले बाळ हे व्यवस्थित आणि सुखरूप असावे असे वाटत असते. कधी कधी आईच्या शरीरात निर्माण झालेल्या काही कारणामुळे अधिक वेळा मुलं लवकर जन्माला येते. तर कधी कधी आई आणि बाळाच्या सुखरूपतेसाठी बाळ ला लवकर जन्म द्यावा लागतो. गर्भाशयातले ते दिवस प्रत्येक बाईसाठी एक नवे आवाहन असते. बाळाच्या विकासासाठी एक ठराविक कालावधी असतो. त्या वेळी बाळाची वाढ आणि विकास चांगल्या पद्धतीने होतो. गर्भाच्या योग्य विकासासाठी त्याने ९ महिने ९ दिवस आईच्या पोटात राहणं सुरक्षित आणि फायद्याचे असते. पण काही बाळं हि नियोजित वेळेच्या आधी जन्माला येतात, अश्या बाळांना प्रिमॅच्युअर बाळ किंवा अपुऱ्या दिवसाचे बाळ म्हणतात. तर त्या पाठीमागची कोणती अशी कारणे आहेत ते जाणून घेऊया.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार बाळाची संपूर्ण वाढ ही २८० दिवसात होते .स्त्रीचे मासिकपाळी ज्यावेळी चुकते. त्या आधीचे २८ किंवा ३० दिवस आणि त्यानंतर २५० दिवस म्हणजेच ९ महिने हा बाळाची संपूर्णतः वाढ होण्याचा कालावधी मानण्यात आला आहे. सुरवातीचे तीन महिने हे जोखमीचे असतात. या तीन महिन्यामध्ये बाळ रुजणे आणि गर्भाच्या महत्वाच्या अवयवाची निर्मिती होत असते.

वेळेआधी बाळ जन्माला येण्याची कारणे –
–आईला किडनीविषयक काही समस्या असल्यास

— आईला रक्तदाबाविषयक काही समस्या असल्यास

–गरोदरपणात योग्य पोषणयुक्त आहार न घेणं

–गरोदर होण्या अगोदर धूम्रपान करणे, नशा करणे किंवा त्यासारखी औषधे घेणे,दारू पिणे अश्या सवयी असल्यास किंवा गरोदरपणात या गोष्टी केल्यास.

—कोणत्याही प्रकारचा संक्रमण जसे मूत्रमार्गातील संसर्ग,गर्भाशयसंदर्भात कोणतेही संक्रमण होणे

—असामान्य गर्भाशय असल्यास किंवा गर्भाशयासंदर्भात काही गुंतागुंत असल्यास

—गर्भाशयाचे मुख हे कमकुवत असल्यास

— आईला मधुमेह असल्यास

—आईला हृद्यासंबंधी काही समस्या असल्यास

— दोन गरोदरपणात कमीतकमी १८ महीन्यांपेक्षा कमी अंतर असल्यास कारण शरीराला विशेषत: गर्भाशयाला प्रसुती नंतर आरामाची गरज असते.त्या मुळे १८ महिन्यांच्या आधी पुन्हा गरोदर राहिल्यास प्रिमॅच्युअर डिलीव्हरीचा धोका निर्माण होतो. जाणून घ्या

–उशिरा गरोदर राहणे हे देखील या प्रकारच्या प्रसुतीचे एक कारण असतो. साधारणतः गरोदर होण्याचे योग्य वय २२ ते ३० असते. त्यामुळेकमी वयाच्या आणि ३० पेक्षा जास्त वयाच्या स्त्रियांना प्रिमॅच्युअर प्रसूतीचा धोका असतो.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

सोने आणि शेअर बाजारानंतर आता भारतीय रुपया घसरल्याने सर्वसामान्यांच्या अडचणी वाढणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूची दुसरी लाट आणि जागतिक आर्थिक वाढीविषयीच्या चिंतेमुळे जगभरातील गुंतवणूकदारांनी एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून अमेरिकन डॉलरमध्ये खरेदी करण्यास सुरवात केली आहे. या कारणास्तव विकसनशील देशांचे चलन घसरत आहे. गुरुवारी अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया एक महिन्याच्या नीचांकी पातळी म्हणजे 74 प्रति डॉलरवर घसरला.

सर्वसामान्यांवर काय परिणाम होईल?
भारत आपल्या पेट्रोलियम उत्पादनापैकी सुमारे 80 टक्के आयात करतो. रुपया घसरल्यामुळे आता पेट्रोलियम पदार्थांची आयात महाग होईल ज्यामुळे तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या देशांतर्गत किंमती वाढवू शकतील. डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्याने मालवाहतूक वाढेल, त्यामुळे महागाई वाढू शकेल. या व्यतिरिक्त भारत मोठ्या प्रमाणात खाद्यतेल आणि डाळींची आयात करतो. रुपया कमकुवत झाल्याने देशांतर्गत बाजारात खाद्य तेले आणि डाळींचे दर देखील वाढू शकतात.

भारताच्या अर्थकारणावर याचा काय परिणाम होईल?
एका अमेरिकन डॉलरच्या किंमतीत एक रुपयाची वाढ झाल्याने तेल कंपन्यांवर 8,000 कोटी रुपयांचा बोजा पडतो, असे आर्थिक सर्वेक्षणात सांगण्यात आले. यामुळे ते पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढविण्यास भाग पाडतात. पेट्रोलियम उत्पादनांच्या किंमतींमध्ये 10 टक्के वाढ झाल्याने महागाईत सुमारे 0.8 टक्क्यांनी वाढ होते. त्याचा थेट परिणाम खाणे-पिणे आणि वाहतुकीच्या खर्चावर होतो.

भारतीय रुपया कमकुवत आणि भक्कम कसा आहे
तज्ञ सांगतात की रुपयाची किंमत संपूर्णपणे मागणी आणि पुरवठ्यावर अवलंबून असते आणि त्याचा परिणाम आयात आणि निर्यातीवर देखील होतो. प्रत्येक देशाकडे इतर देशांच्या चलनाचा साठा असतो, त्यातून ते व्यवहार करतात म्हणजेच आयात (निर्यात) करतात. याला परकीय चलन साठा असे म्हणतात. रिझर्व्ह बँकेकडून वेळोवेळी त्याचे आकडे जाहीर केले जातात जर तुम्हाला सोप्या शब्दांत सजवायचे झाले तर समजा भारत अमेरिकेबरोबर काही व्यवसाय करीत आहे. अमेरिकेकडे 67,000 रुपये आहेत तर आपल्याकडे 1000 डॉलर्स आहेत जर आज डॉलर 67 रुपये असेल तर याक्षणी दोघांकडे समान रक्कम आहे.

आता आपल्याला अमेरिकेतून एखादी वस्तू खरेदी करायची असेल, ज्याचा भाव आपल्या चलनानुसार 6,700 रुपये असेल, तर त्यासाठी आपल्याला 100 डॉलर्स द्यावे लागतील. आता आमच्या परकीय चलन साठ्यात फक्त 900 डॉलर्स शिल्लक आहेत आणि अमेरिकेकडे 74,800 रुपये आहेत. यानुसार अमेरिकेच्या परकीय चलन साठ्यामध्ये भारताकडे असलेली 67,000 रुपयांची रक्कम इतकीच नाही तर भारताच्या परकीय चलन साठ्यातील 100 डॉलर्ससुद्धा त्याच्यापर्यंत पोहोचले.

जर भारताने अमेरिकेला समान रक्कम म्हणजेच 100 डॉलर्स दिले तर त्याची परिस्थिती सुधारली जाईल. जेव्हा ही परिस्थिती मोठ्या प्रमाणात उद्भवते तेव्हा आपल्या परकीय चलन साठ्यात असलेल्या चलनात असमर्थता असते. यावेळी, जर आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून डॉलर विकत घ्यायचे असतील तर त्यासाठीआपल्याला अधिक पैसे खर्च करावे लागतील. अशा परिस्थितीत, देशातील मध्यवर्ती बँक आरबीआय, त्याच्या साठा व विदेशात खरेदी करून, बाजारात डॉलरचा पुरवठा सुनिश्चित करते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

माजी क्रिकेटपटू आणि समालोचक डीन जोन्स यांचं अकाली निधन ; क्रिकेट विश्वावर पसरली शोककळा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांचं मुंबईत निधन झालं आहे. हार्टअटॅकमुळे वयाच्या 59 व्या वर्षी डीन जोन्स यांचं निधन झालं. कोच आणि कॉमेंटेटर म्हणून त्यांनी भूमिका बजावल्या आहेत. सध्या ते IPL च्या कॉमेंट्रीसाठी मुंबईत होते.

डीन जोन्स हे ऑस्‍ट्रेलियाच्या दिज्जग खेळाडूंमध्ये गणले जातात. त्यांनी 52 टेस्‍ट, 164 वनडे इंटरनॅशनल सामने खेळले आहेत. टेस्‍टमध्ये 216 आणि वनड मध्ये 145 रन त्यांचा सर्वोत्कृष्ट स्कोर आहे. टेस्‍ट क्रिकेटमध्ये 46.55 च्या रनरेटने त्यांनी 3631 रन केले आहेत ज्यामध्ये 1 शतक आणि 14 अर्धशतकांचा समावेश आहे.वनडेमध्ये त्यांनी 44.61 च्या रनरेटने 6068 रन केले आहे. ज्यामध्ये 7 शतक आणि 46 अर्धशतकांचा समावेश आहे.

भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. डीन हे माझे सर्वात आवडते कॉमेंटेटर होते, त्यांच्या अकाली निधनाने मला अतिशय दु:ख झाले आहे. त्यांच्यासोबतच्या अनेक आठवणी आहेत अस सेहवाग म्हणाला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’