Tuesday, December 16, 2025
Home Blog Page 5263

कालावधी पूर्ण होण्याअगोदर अपुऱ्या दिवसाचे बाळ का जन्माला येते ?

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । प्रत्येक आईला आपले बाळ हे व्यवस्थित आणि सुखरूप असावे असे वाटत असते. कधी कधी आईच्या शरीरात निर्माण झालेल्या काही कारणामुळे अधिक वेळा मुलं लवकर जन्माला येते. तर कधी कधी आई आणि बाळाच्या सुखरूपतेसाठी बाळ ला लवकर जन्म द्यावा लागतो. गर्भाशयातले ते दिवस प्रत्येक बाईसाठी एक नवे आवाहन असते. बाळाच्या विकासासाठी एक ठराविक कालावधी असतो. त्या वेळी बाळाची वाढ आणि विकास चांगल्या पद्धतीने होतो. गर्भाच्या योग्य विकासासाठी त्याने ९ महिने ९ दिवस आईच्या पोटात राहणं सुरक्षित आणि फायद्याचे असते. पण काही बाळं हि नियोजित वेळेच्या आधी जन्माला येतात, अश्या बाळांना प्रिमॅच्युअर बाळ किंवा अपुऱ्या दिवसाचे बाळ म्हणतात. तर त्या पाठीमागची कोणती अशी कारणे आहेत ते जाणून घेऊया.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार बाळाची संपूर्ण वाढ ही २८० दिवसात होते .स्त्रीचे मासिकपाळी ज्यावेळी चुकते. त्या आधीचे २८ किंवा ३० दिवस आणि त्यानंतर २५० दिवस म्हणजेच ९ महिने हा बाळाची संपूर्णतः वाढ होण्याचा कालावधी मानण्यात आला आहे. सुरवातीचे तीन महिने हे जोखमीचे असतात. या तीन महिन्यामध्ये बाळ रुजणे आणि गर्भाच्या महत्वाच्या अवयवाची निर्मिती होत असते.

वेळेआधी बाळ जन्माला येण्याची कारणे –
–आईला किडनीविषयक काही समस्या असल्यास

— आईला रक्तदाबाविषयक काही समस्या असल्यास

–गरोदरपणात योग्य पोषणयुक्त आहार न घेणं

–गरोदर होण्या अगोदर धूम्रपान करणे, नशा करणे किंवा त्यासारखी औषधे घेणे,दारू पिणे अश्या सवयी असल्यास किंवा गरोदरपणात या गोष्टी केल्यास.

—कोणत्याही प्रकारचा संक्रमण जसे मूत्रमार्गातील संसर्ग,गर्भाशयसंदर्भात कोणतेही संक्रमण होणे

—असामान्य गर्भाशय असल्यास किंवा गर्भाशयासंदर्भात काही गुंतागुंत असल्यास

—गर्भाशयाचे मुख हे कमकुवत असल्यास

— आईला मधुमेह असल्यास

—आईला हृद्यासंबंधी काही समस्या असल्यास

— दोन गरोदरपणात कमीतकमी १८ महीन्यांपेक्षा कमी अंतर असल्यास कारण शरीराला विशेषत: गर्भाशयाला प्रसुती नंतर आरामाची गरज असते.त्या मुळे १८ महिन्यांच्या आधी पुन्हा गरोदर राहिल्यास प्रिमॅच्युअर डिलीव्हरीचा धोका निर्माण होतो. जाणून घ्या

–उशिरा गरोदर राहणे हे देखील या प्रकारच्या प्रसुतीचे एक कारण असतो. साधारणतः गरोदर होण्याचे योग्य वय २२ ते ३० असते. त्यामुळेकमी वयाच्या आणि ३० पेक्षा जास्त वयाच्या स्त्रियांना प्रिमॅच्युअर प्रसूतीचा धोका असतो.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

सोने आणि शेअर बाजारानंतर आता भारतीय रुपया घसरल्याने सर्वसामान्यांच्या अडचणी वाढणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूची दुसरी लाट आणि जागतिक आर्थिक वाढीविषयीच्या चिंतेमुळे जगभरातील गुंतवणूकदारांनी एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून अमेरिकन डॉलरमध्ये खरेदी करण्यास सुरवात केली आहे. या कारणास्तव विकसनशील देशांचे चलन घसरत आहे. गुरुवारी अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया एक महिन्याच्या नीचांकी पातळी म्हणजे 74 प्रति डॉलरवर घसरला.

सर्वसामान्यांवर काय परिणाम होईल?
भारत आपल्या पेट्रोलियम उत्पादनापैकी सुमारे 80 टक्के आयात करतो. रुपया घसरल्यामुळे आता पेट्रोलियम पदार्थांची आयात महाग होईल ज्यामुळे तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या देशांतर्गत किंमती वाढवू शकतील. डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्याने मालवाहतूक वाढेल, त्यामुळे महागाई वाढू शकेल. या व्यतिरिक्त भारत मोठ्या प्रमाणात खाद्यतेल आणि डाळींची आयात करतो. रुपया कमकुवत झाल्याने देशांतर्गत बाजारात खाद्य तेले आणि डाळींचे दर देखील वाढू शकतात.

भारताच्या अर्थकारणावर याचा काय परिणाम होईल?
एका अमेरिकन डॉलरच्या किंमतीत एक रुपयाची वाढ झाल्याने तेल कंपन्यांवर 8,000 कोटी रुपयांचा बोजा पडतो, असे आर्थिक सर्वेक्षणात सांगण्यात आले. यामुळे ते पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढविण्यास भाग पाडतात. पेट्रोलियम उत्पादनांच्या किंमतींमध्ये 10 टक्के वाढ झाल्याने महागाईत सुमारे 0.8 टक्क्यांनी वाढ होते. त्याचा थेट परिणाम खाणे-पिणे आणि वाहतुकीच्या खर्चावर होतो.

भारतीय रुपया कमकुवत आणि भक्कम कसा आहे
तज्ञ सांगतात की रुपयाची किंमत संपूर्णपणे मागणी आणि पुरवठ्यावर अवलंबून असते आणि त्याचा परिणाम आयात आणि निर्यातीवर देखील होतो. प्रत्येक देशाकडे इतर देशांच्या चलनाचा साठा असतो, त्यातून ते व्यवहार करतात म्हणजेच आयात (निर्यात) करतात. याला परकीय चलन साठा असे म्हणतात. रिझर्व्ह बँकेकडून वेळोवेळी त्याचे आकडे जाहीर केले जातात जर तुम्हाला सोप्या शब्दांत सजवायचे झाले तर समजा भारत अमेरिकेबरोबर काही व्यवसाय करीत आहे. अमेरिकेकडे 67,000 रुपये आहेत तर आपल्याकडे 1000 डॉलर्स आहेत जर आज डॉलर 67 रुपये असेल तर याक्षणी दोघांकडे समान रक्कम आहे.

आता आपल्याला अमेरिकेतून एखादी वस्तू खरेदी करायची असेल, ज्याचा भाव आपल्या चलनानुसार 6,700 रुपये असेल, तर त्यासाठी आपल्याला 100 डॉलर्स द्यावे लागतील. आता आमच्या परकीय चलन साठ्यात फक्त 900 डॉलर्स शिल्लक आहेत आणि अमेरिकेकडे 74,800 रुपये आहेत. यानुसार अमेरिकेच्या परकीय चलन साठ्यामध्ये भारताकडे असलेली 67,000 रुपयांची रक्कम इतकीच नाही तर भारताच्या परकीय चलन साठ्यातील 100 डॉलर्ससुद्धा त्याच्यापर्यंत पोहोचले.

जर भारताने अमेरिकेला समान रक्कम म्हणजेच 100 डॉलर्स दिले तर त्याची परिस्थिती सुधारली जाईल. जेव्हा ही परिस्थिती मोठ्या प्रमाणात उद्भवते तेव्हा आपल्या परकीय चलन साठ्यात असलेल्या चलनात असमर्थता असते. यावेळी, जर आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून डॉलर विकत घ्यायचे असतील तर त्यासाठीआपल्याला अधिक पैसे खर्च करावे लागतील. अशा परिस्थितीत, देशातील मध्यवर्ती बँक आरबीआय, त्याच्या साठा व विदेशात खरेदी करून, बाजारात डॉलरचा पुरवठा सुनिश्चित करते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

माजी क्रिकेटपटू आणि समालोचक डीन जोन्स यांचं अकाली निधन ; क्रिकेट विश्वावर पसरली शोककळा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांचं मुंबईत निधन झालं आहे. हार्टअटॅकमुळे वयाच्या 59 व्या वर्षी डीन जोन्स यांचं निधन झालं. कोच आणि कॉमेंटेटर म्हणून त्यांनी भूमिका बजावल्या आहेत. सध्या ते IPL च्या कॉमेंट्रीसाठी मुंबईत होते.

डीन जोन्स हे ऑस्‍ट्रेलियाच्या दिज्जग खेळाडूंमध्ये गणले जातात. त्यांनी 52 टेस्‍ट, 164 वनडे इंटरनॅशनल सामने खेळले आहेत. टेस्‍टमध्ये 216 आणि वनड मध्ये 145 रन त्यांचा सर्वोत्कृष्ट स्कोर आहे. टेस्‍ट क्रिकेटमध्ये 46.55 च्या रनरेटने त्यांनी 3631 रन केले आहेत ज्यामध्ये 1 शतक आणि 14 अर्धशतकांचा समावेश आहे.वनडेमध्ये त्यांनी 44.61 च्या रनरेटने 6068 रन केले आहे. ज्यामध्ये 7 शतक आणि 46 अर्धशतकांचा समावेश आहे.

भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. डीन हे माझे सर्वात आवडते कॉमेंटेटर होते, त्यांच्या अकाली निधनाने मला अतिशय दु:ख झाले आहे. त्यांच्यासोबतच्या अनेक आठवणी आहेत अस सेहवाग म्हणाला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

शेअर बाजारात झाली मोठी घसरण, अवघ्या काही मिनिटांतच गुंतवणूकदारांचे बुडाले चार लाख कोटी रुपये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिका आणि युरोपियन बाजारात तेजीने विक्री झाल्यामुळे देशांतर्गत शेअर बाजारात मोठी घसरण झाली. बीएसईचा 30 शेअर्सचा  प्रमुख इंडेक्स सेंसेक्स (Sensex) 1,114  ने खाली घसरून 36,5533 वर बंद झाला. त्याचबरोबर NSE चा 50 शेअर्सचा प्रमुख इंडेक्स निफ्टी (Nifty) 307 अंकांच्या घसरणीनंतरही 10,824 च्या पातळीवर बंद झाला. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे 4 लाख कोटी रुपये बुडल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र, गुंतवणूकदारांनी या घसरणीमुळे घाबरू नये. तसेच नवीन गुंतवणूक टाळण्याचा देखील सल्ला यावेळी दिला.

शेअर बाजार का घसरला – एस्कॉर्ट सिक्युरिटीचे संशोधन प्रमुख आसिफ इक्बाल यांनी एका वाहिनीशी बोलताना सांगितले की, ग्लोबल मार्केट FinCEN च्या खुलाशानंतर चिंताग्रस्त आहे. तसेच जागतिक वाढीच्या चिंतेमुळे बाजारातील तणाव वाढत आहे. म्हणूनच शेअर बाजार घसरला आहे.

बुधवारी अमेरिकन शेअर बाजारामध्ये मोठी विक्री झाली. अमेरिकेचा बेंचमार्क इंडेक्स डाओ जोन्स 1.92 टक्क्यांनी घसरला. त्याच वेळी, एस अँड पी 500 निर्देशांक 2.37 टक्क्यांनी घसरला.

परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री केली. गेल्या सत्रात त्यांनी कॅश मार्केटमध्ये 3,912.44 कोटी रुपयांचे शेअर्स विकले. त्याच वेळी देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी या कालावधीत 1,629.23 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.

7-आठवड्यांच्या नीचांकावरील शेअर बाजार – आज बाजार उघडताच मोठ्या प्रमाणात घसरण दिसून आली. 4 ऑगस्टनंतर निफ्टी 11,000 च्या खाली गेला आहे. तर बाजार हा गेल्या 7 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर दिसतो आहे. निफ्टीच्या 50 पैकी 48 स्टॉक खाली आले आहेत.

बँकिंगच्या खुलाश्यानंतर काय घडले ?- FinCEN खुलाश्यामध्ये छुपे आर्थिक व्यवहार आणि बँकिंगची रहस्ये उघडकीस आली आहेत. यूएस नियामक FinCEN ने संशयास्पद गतिविधि रिपोर्ट (SAR) नावाचा एक गुप्त दस्तऐवज तयार करतो. यात 1999 ते 2017 दरम्यान 2,121 झालेल्या संशयास्पद व्यवहारांचा उल्लेख आहे.

याद्वारे 2.099 ट्रिलियन डॉलर्स किंमतीचे संशयास्पद व्यवहार झाले. वास्तविक जेव्हा एखाद्या बँकेला व्यवहाराचा संशय असतो. म्हणून ते FinCEN कडे तक्रार करतात. सहापेक्षा जास्त बँकांनी अशा प्रकारच्या व्यवहाराबाबत शंका उपस्थित करून तक्रार दिली होती. ही तक्रार अत्यंत गोपनीय ठेवली जाते. याबाबत खातेदारांनाही माहिती दिली जात नाही.

त्यानंतर FinCEN ने भारतीय एजन्सींना ही माहिती दिली, त्यानंतर अनेक प्रकरणांची चौकशी सुरू झाली. ज्या संस्थांचे व्यवहार संशयास्पद असल्याचे आढळले ते 2 G  स्पेक्ट्रम घोटाळा, ऑगस्टा वेस्टलँड घोटाळा, रोल्स रॉयस लाच प्रकरण, एअरसेल मॅक्सिस प्रकरणाशी संबंधित आहेत.

या संशयास्पद व्यवहारांमध्ये तुरूंगातील तस्कर, हिरे कंपनीचा मालक, घोटाळ्यातील गुंतवणूकीचे हेल्थकेअर ग्रुप, दिवाळखोर स्टील फर्म, लक्झरी कार डीलर्स, आयपीएलचे प्रायोजक, एक कथित हवाला डीलर ज्याच्यामुळे ईडीमध्ये परस्पर फुट पडली, डॉनचा प्रमुख फायनान्सर यांचा समावेश आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

धक्कादायक! पुण्याच्या जंबो कोव्हिड सेंटरमधून ३३ वर्षीय महिला रुग्ण बेपत्ता

प्रातिनिधीक छायाचित्र

पुणे । कोव्हिड सेंटरमधील महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. पुण्यात एक ३३ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह महिला जंबो कोव्हिड सेंटरमधून बेपत्ता झाल्यानं एकच खळबळ माजली आहे. या महिलेला ससून रुग्णालयातून कोव्हिड सेंटरमध्ये दाखल केले होते. या रुग्ण महिलेवर उपचार सुरु असल्याचं कोव्हिड सेंटरमधून सुरूवातीला सांगण्यात आलं होतं.

मात्र, बरी झालेल्या महिलेला जंबो कोव्हिड सेंटरमधून घरी घेऊन जाण्यासाठी गेलेल्या त्यांच्या आईला, ‘तुमची मुलगी येथे अॅडमिटच नव्हती’, अशी धक्कादायक माहिती देण्यात आली. त्यानंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयाविरोधात आमरण उपोषणाचा मार्ग निवडला आहे. जंबो कोविड सेंटर येथून बेपत्ता झालेल्या ३३ वर्षीय महिलेचा घातपात झाला असण्याची शक्यता व्यक्त करत महिलेच्या आईनं जंबो कोव्हिड सेंटर येथे आमरण उपोषण आंदोलन सुरू केले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

 

 

“30 सप्टेंबरपर्यंत आता ‘या’ लोकांनी ITR भरणे जरुरीचे आहे”-Income Tax Department

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इनकम टॅक्स डिपार्टमेंटने आपल्या ट्विटर हँडलद्वारे ट्विट केले आहे की, आर्थिक वर्ष 2018-19 साठी इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख जवळ आली आहे. म्हणूनच करदात्यांनी (Taxpayers) लवकरात लवकर आपले रिटर्न भरले पाहिजेत. आर्थिक वर्ष 2018-19 साठी इनकम टॅक्स डिपार्टमेंटने ITR भरण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबरपर्यंत वाढविली आहे. त्याच वेळी यापूर्वी ही मुदत 31 जुलैपर्यंत ठेवण्यात आली होती. 2019-20 या आर्थिक वर्षासाठी रिटर्न भरण्याची तारीखही 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे. सहसा त्याची अंतिम तारीख 31 जुलै असते.

आता जर रिटर्न भरला नाही तर काय होईल ?
जर करदात्याने या अंतिम मुदतीत रिटर्न भरला नाही तर तो रिटर्न फाईल करू शकणार नाही. सामान्यत: देय तारखेपर्यंत इनकम टॅक्स रिटर्न न भरल्याबद्दल दंड आकारला जातो. समजा ITR दाखल करण्याची शेवटची तारीख 31 जुलै असेल आणि आपण 31ऑगस्टपर्यंत रिटर्न भरला नसेल तर तुम्हाला दंड भरावा लागेल.

अंतिम मुदतीनंतर आपण 31 डिसेंबरपर्यंत रिटर्न भरल्यास 5000 रुपये दंड भरावा लागेल. आपण डिसेंबर नंतर रिटर्न भरल्यास दहा हजार रुपये दंड आकारला जाईल.आपण ITR दाखल करण्यास अपयशी ठरल्यास तीन महिने ते दोन वर्षे तुरूंगवासही होऊ शकतो. इनकम टॅक्सची थकबाकी 25 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास 7 वर्षापर्यंत तुरूंगवासही होऊ शकतो.

Image

कोणत्याही आर्थिक वर्षासाठी रिटर्न असेसमेंट ईयर दाखल केले जातात. आर्थिक वर्ष 2018-19 साठी असेसमेंट ईयर FY2019-20 प्रमाणे. 31 मार्च 2020 पर्यंत वित्तीय वर्ष FY2018-19 साठी रिटर्न फाईल केला जाऊ शकतो.

सीबीडीटीने मागील महिन्यात इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख तिसऱ्यांदा वाढविली होती. आर्थिक वर्ष 2018-19 साठी 31 मार्च 2020 पर्यंत ITR दाखल करायचा होता. मात्र पहिले ते 30 जूनपर्यंत वाढविण्यात आले. नंतर त्याची अंतिम तारीख 31 जुलै करण्यात आली आणि आता ती 30 सप्टेंबर 2020 पर्यंत वाढविण्यात आली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

धोनीनंतर रोहित शर्माच सर्वोत्कृष्ट कर्णधार ; दिग्गज भारतीय खेळाडूने केले रोहितच्या नेतृत्वाचे कौतुक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गतविजेत्या मुंबई इंडियन्सने काल कोलकाताचा पराभव करून आयपीएल 2020 मधील आपला पहिला विजय मिळवला. कर्णधार रोहित शर्मा ला त्याच्या धडाकेबाज खेळीसाठी सामनावीर पुरस्कार मिळाला. 196 धावांचा पाठलाग करताना कोलकात्याची दमछाक झाली. गोलंदाजांचा योग्य रीतीने वापर करून रोहितने पुन्हा एकदा आपलं नेतृत्व कौशल्य दाखवून दिले. यामुळेच भारताचा दिग्गज माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग रोहित शर्माच्या नेतृत्वावर फिदा झालाय. सेहवागने रोहितच्या नेतृत्वाची स्तुती केली.

रोहितच्या नेतृत्वावर सेहवागने स्तुतिसुमने उधळली, सेहवाग म्हणाला, “मी नेहमीच म्हणतोय की महेंद्रसिंग धोनीनंतर या स्पर्धेतील सर्वोत्तम कर्णधार हा रोहित शर्माच आहे. सामना आणि खेळ समजून घेण्याची त्याची क्षमता उत्तम आहे. खेळाच्या गरजेनुसार तो गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात जे बदल करतो ते एक उत्तम कर्णधारच करू शकतो”, असे सेहवाग म्हणाला.

कोलकाताविरूद्धच्या सामन्यात नितीश राणा आणि कार्तिक खेळत असताना रोहितच्या जागी दुसऱ्या एखाद्या कर्णधाराने कृणाल पांड्याला गोलंदाजी दिली असती आणि तो निर्णय कदाचित चुकीचा ठरला असता. पण रोहितने त्यावेळी गोलंदाजीसाठी कायरन पोलार्डला आणलं. त्याने अनुभवाच्या बळावर धावगतीवर अंकुश लावला. असेही सेहवाग म्हणाला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

‘चुकीच्या आकडेवारीमुळे रेल्वेने आपली आर्थिक परिस्थिती दाखविली चांगली’- CAG

Railway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (CAG) ने रेल्वेच्या आर्थिक स्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. CAG ने म्हटले आहे की, रेल्वेने आपली आर्थिक स्थिती अधिक चांगल्या प्रकारे दाखविण्यासाठी भविष्यातील कमाई त्याच्या खात्यात जोडून दाखविली. CAG ने बुधवारी संसदेच्या दोन्ही सभागृहात रेल्वेच्या आर्थिक परिस्थितीचा अहवाल सादर केला आहे. या अहवालात असे म्हटले आहे की,’ रेल्वेने वर्ष 2018-19 मध्ये ऑपरेटिंग रेशो 97.27 दाखविला आहे. मात्र, रेल्वेचे लक्ष्य ऑपरेटिंग रेशो 92.8 वर ठेवण्याचे होते. तसेच, रेल्वेने दाखविलेल्या या आकडेवारीसाठी चुकीची पद्धत अवलंबली गेली.

भविष्यातील कमाईचा डेटा सामील केला
रेल्वेने NTPC आणि CONCOR कडून 8,351 कोटी मालवाहतूक आपल्या खात्यास जोडली. अशा प्रकारे खात्यात रेल्वेची कमाई जास्त दाखविली गेली. जर तसे केले गेले नाही तर वर्ष 2018 साठीचे रेल्वेचा ऑपरेटिंग रेशो (Railway Operating Ratio) 101.77 झालेला आहे. म्हणजेच रेल्वेने 100 रुपये मिळवण्यासाठी सुमारे 102 रुपये खर्च केले. ऑपरेटिंग रेशोवरूनच रेल्वेची आर्थिक स्थिती समजली जाऊ शकते.

7 हजार कोटींपेक्षा जास्त नुकसान झाले
CAG च्या म्हणण्यानुसार रेल्वेने आपल्या कमाईचे चुकीचे आकडे सादर करून 3773.86 कोटींचा नफा दाखविला. या आर्थिक वर्षात त्याची वाढ नकारात्मक झाली आहे. CAG ने आपल्या अहवालात म्हटले आहे की, जर रेल्वेने योग्य आकडेवारी दाखविली असती तर त्यांचे सुमारे 7335 कोटींचे नुकसान झाले हे दिसले असते.

रेल्वेला LIC कडून पूर्ण कर्ज मिळालेले नाही
CAG ने आपल्या अहवालात असेही म्हटले आहे की, 2015-16 मध्ये रेल्वेने LIC शी दरवर्षी दीड लाख कर्ज घेण्यासाठी करार केला होता. ही रक्कम सन 2015 ते 2020 दरम्यान मिळाली पाहिजे होती. मात्र 2015 ते 2019 या काळात रेल्वेला केवळ 16,200 कोटी रुपयेच घेता आले.

रेल्वे प्रकल्प पूर्ण होण्यास उशीर झाल्याबद्दल चिंता
याशिवाय रेल्वे प्रकल्पांमधील दिरंगाईबाबतही अहवालात चिंता व्यक्त केली गेली आहे. यासाठी विभागीय रेल्वेच्या पात्रतेवर प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत. तसेच, रेल्वे बोर्डालाही यासाठी लक्ष्य केले आहे.

रेल्वे कोळशाच्या वाहतुकीतून सर्वाधिक उत्पन्न मिळवते
CAG चे असे म्हणणे आहे की, रेल्वे कोळशा वाहतुकीतून सर्वाधिक उत्पन्न मिळवते. हे त्याच्या फ्रेट कमाईच्या जवळपास निम्मे आहे. रेल्वे कोळशाच्या वाहतुकीवर खूप अवलंबून आहे आणि त्यातील कोणत्याही बदलामुळे त्याच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होऊ शकतो.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण

प्रातिनिधिक छायाचित्र

श्रीनगर । जम्मू-काश्मिरातील बडगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांकडून केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) गस्त पथकावर हल्ला करण्यात आला. यामध्ये सीआरपीएफच्या ११७ बटालियनचे सहाय्यक उपनिरीक्षक नरेश उमराव बडोले जखमी झाले होते. उपचारादरम्यान ते शहीद झाले. नरेश बडोले मुळचे गोंदिया जिल्ह्यातील होते.

बडगम जिल्ह्यातील छदुरा परिसरात गस्तीवर असताना त्यांच्या पथकावर आज सकाळी पावणे ८ च्या सुमारास दहशतवादी हल्ला झाला. मोटरसायकलवरून आलेल्या दहशतवाद्यांनी बडोले यांच्या पथकाच्या दिशेनं अंदाधुंद गोळीबार केला. यावेळी उडालेल्या धुमश्चक्रीत बडोले गंभीर जखमी झाले. जखमी बडोले यांची रायफल घेऊन दहशतवाद्यांनी पळ काढला.

जखमी अवस्थेत बडोले यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. गोंदिया जिल्ह्यातील अर्जनी तालुक्यातील बाम्हणी हे बडोले यांचे मूळ गाव.२४ एप्रिल १९७१ रोजी जन्मलेले बडोले १९८९ मध्ये सीआरपीएफला रुजू झाले होते. अंत्यसंस्कारासाठी त्यांचे पार्थिव नागपूरला आणण्यात येणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

 

 

ड्रग्ज व्यापारी, खंडणी मागणारे, मर्डर केस, हीच आजच्या शिवसेनेची ओळख ; निलेश राणेंनी साधला शिवसेनेवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राणे कुटूंबिय आणि शिवसेना हा वाद काही नवा नाही. त्यातच भाजपाचे नेते निलेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचलं आहे. बुधवारी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. नाणार रिफायनरी प्रकल्प रत्नागिरीत आणू पाहणारे मुख्यमंत्री कार्यालयाच्या संपर्कात असल्याचा दावा राणे यांनी केला होता. आता ड्रग्ज व्यापारी, खंडणी मागणारे, मर्डर केस, हीच आजक्सच्या शिवसेनेची ओळख आहे , अस म्हणत त्यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.

शिवसेना उपनेत्याच्या मुलाची ड्रग्ज प्रकरणी पोलिसांकडून चौकशी असं वृत्त एका वृत्तपत्रात छापून आलं आहे. त्या वृत्तपत्रातील वृत्ताच्या आधारावर राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. “काय ओळख होती शिवसेनेची आणि आता काय झाली आहे. ड्रग्ज व्यापारी, खंडणी मागणारे, मर्डर केस, ही ओळख आजच्या शिवसेनेची. मराठीमध्ये म्हण आहे ‘अति तिथे माती‘… शिवसेनेचा अंत जवळ आलाय,” असं म्हणत त्यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला. त्यांनी ट्वीटरच्या माध्यमातून शिवसेनेवर टीका केली.

यापूर्वी बुधवारीही पत्रकार परिषदेत राणे यांनी शिवसेनेला लक्ष्य केलं होतं. “नाणारचा विषय आमच्यासाठी संपला असल्याचं शिवसेनेचे स्थानिक मंत्री, आमदार, खासदार नेहमी बोलत असतात. पण नाणारची एक कमिटी जी प्रकल्प आणू पाहत आहे, ती सातत्याने मुख्यमंत्री कार्यालयाच्या संपर्कात आहे. मुख्यमंत्री कार्यालय त्यांच्याशी चर्चा करत आहे. प्रकल्प रद्द झाला आहे तर मग ती चर्चा कशासाठी होत आहे ? प्रकल्प रायगडमध्ये नेण्यासाठी ही चर्चा होत नाही. राजापूरमध्ये प्रकल्प आणावा यासाठी ही चर्चा होत आहे. नाणार राजापूरमध्ये परत कसं आणलं जावं यासाठी एकत्र येऊन योजना आखली जात आहे,” असं निलेश राणेंनी म्हटलं होतं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’