Monday, December 22, 2025
Home Blog Page 528

महाविकास आघाडीचे सरकार आल्यास लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार

mahavikas aghadi ladki bahin yojana (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महायुती सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mazi Ladki Bahin Yojana) सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत करण्यात येणार आहे. परंतु आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारांना खुश करण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे. आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी तर या योजेनेबाबत मोठी घोषणा केली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास लाडक्या बहिणींना १५०० ऐवजी आम्ही ३००० देऊ असं संजय राऊतांनी म्हंटल आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

लाडकी बहीण योजना महायुती सरकारसाठी टर्निंग पॉईंट ठरेल का? असा सवाल संजय राऊत याना केला असता ते म्हणाले, अजिबात नाही. कदाचित त्यांच्यासाठी तो यू टर्न ठरेल. टर्निंग पॉईंट वगैरे काही नाही. महाराष्ट्रात आत्तापर्यंत महिलांसाठी अशा अनेक योजना आल्या आहेत. ही नवीन योजना नाही. त्यांनी फार मोठी क्रांती केली नाही. देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि मिंधे दीड हजार रुपये खिशातले देत नाहीत. लोकांच्या करातला हा पैसा आहे. महिलांनी या योजनेचा लाभ जरूर घेतला पाहिजे. परंतु राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचे सरकार आल्यास आम्ही महिलांना १५०० ऐवजी ३००० रुपये देऊ हा आमचा शब्द आहे असं संजय राऊत म्हणाले.

यावेळी संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. महाविकास आघाडीचे सरकार आल्यास लाडकी बहीण योजना बंद होईल असं विधान फडणवीसांनी केलं होते त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, या महाराष्ट्रात ही योजना बंद, ती योजना बंद, हे सूडाचे राजकारण फडणवीसांनी सुरु केले आहे. आम्ही त्या पद्धतीचे राजकर्ते नाहीत. त्यांना आपलं सरकार जाईल ही भीती का वाटतं आहे? त्यामुळेच ते लोकांना धमक्या देतात असं प्रत्युत्तर राऊतांनी दिले. खरं तर देवेंद्र फडणवीस यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही. ज्या पद्धतीने पेशव्यांचे शेवटच्या काळात राज्य सुरु होतं, त्या पद्धतीने सध्या फडणवीस किंवा त्यांचे लोक काम करत आहेत. सर्व ठिकाणी अनागोंदी, अराजकता, लूटमार हे सर्व सुरु आहे. हे तिघेही घाशिराम कोतवाल आहेत. या तिघांच्या हातात महाराष्ट्र आहे. घाशिराम कोतवालांचा इतिहास काय, हे आम्ही महाराष्ट्राला लवकरच सांगू असा इशाराही संजय राऊतांनी शिंदे, फडणसवीस आणि अजित पवारांना दिला.

Pune And Thane Metro Project | पुणे आणि ठाण्याचा प्रवास होणार काही मिनिटात; मेट्रो प्रकल्पाला मोदींनी दिला हिरवा कंदील

Pune And Thane Metro Project

Pune And Thane Metro Project | राज्यात विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर सरकार देखील नागरिकांसाठी विविध योजना तसेच अनेक सोयी सुविधा देखील आणत आहेत. अशातच आता सरकारकडून पुणेकरांसाठी आणि ठाणेकरांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी दिलेली आहे. या दोन शहरांचे अंतर कापणे आता सहज शक्य आणि सोप्पे होणार आहे.

कारण हा प्रवास तुम्ही अगदी काहीच मिनिटात पार करू शकता. या दोन शहरांसाठी मेट्रो प्रकल्प चालू होणार आहे. आणि मेट्रो प्रकल्पासाठी केंद्र सरकारने मंजुरी देखील दिलेली आहे. यासोबतच आता पुणे स्वारगेट ते कात्रज पर्यंत भुयारी मार्ग होणार आहे. यामुळे पिंपरी चिंचवड ते कात्रज हा काही तासांचा प्रवास आता प्रवाशांना काही मिनिटात पूर्ण करता येणार आहे. ठाणे ते पुणे या मेट्रो प्रकल्पासाठी नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी एक बैठक पार पडली. आणि या बैठकीमध्ये या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आलेली आहे. फेब्रुवारी 2029 पर्यंत हा प्रकल्प पूर्णत्वास जाणार आहे. हा प्रकल्प तब्बल 2954 कोटींचा असणार आहे.

कात्रज ते स्वारगेट भुयारी मार्ग | Pune And Thane Metro Project

पुण्यातील कात्रज ते स्वारगेट यादरम्यान नेहमीच वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होते. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक तोंडी कमी करण्यासाठी आता या ठिकाणी भुयारी मेट्रो प्रकल्प सुरू होणार आहे. आणि या प्रस्तावाला देखील राज्य सरकारने मंजुरी दिलेली आहे. कात्रज ते स्वारगेट या मार्गामध्ये मार्केटयार्ड, बिबेवाडी, बालाजीनगर, कात्रज या ठिकाणांच्या प्रवास करणाऱ्यांना आता खूप सोयीचे होणार आहे.

सरकारने ठाणे शहरांतर्गत मेट्रो प्रकल्पाला देखील मान्यता दिलेली आहे. हा मार्ग 29 किलोमीटरचा आहे. आणि तो पूर्ण करण्यासाठी 12200 कोटी रुपये खर्च होणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर स्थानिक शहरात जी वाहतूक कोंडी होत आहे. ती वाहतूक कोंडी देखील दूर होणार आहे. तसेच आता विविध भागांशी आता थेट मेट्रो मार्गाने प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. ठाणे शहरासाठी हा एक ऐतिहासिक प्रकल्प असल्याची प्रतिक्रिया देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे.

MS Dhoni : धोनीसाठी कायपण!! BCCI बदलणार IPL चा ‘तो’ नियम? चेन्नईला काय फायदा?

MS Dhoni IPL 2025

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । IPL 2025 साठी मेगालीलाव घ्यायचा का? किती प्लेयर्स रिटेन करण्याची मुभा द्यायची? यावरून BCCI आणि IPL फ्रेंचायजी मध्ये चर्चा सुरु आहे. बीसीसीआयने अद्याप जाहीर केलं नाही कि, मेगा लिलावासाठी किती खेळाडू कायम ठेवता येईल. मात्र महेंद्रसिंघ धोनीसाठी (MS Dhoni) बीसीसीआय ५ वर्षांपूर्वीचा जुना नियम बदलण्याच्या तयारीत असल्याचे बोललं जात आहे. जर हा नियम खरोखऱच बदलला तर धोनी आयपीएल 2025 मध्ये अनकॅप्ड खेळाडू म्हणून खेळताना दिसेल. आणि चेन्नई सुपर किंग्सच्या पैशांची बचत होईल.

आयपीएल मध्ये 2021 पर्यंत एक नियम होता कि, ज्या खेळाडूने ५ वर्षांहून अधिक काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तो खेळाडू अनकॅप्ड म्हणून आयपीएलच्या लिलावात उतरू शकतो, मात्र 2021 नंतर हा नियम बंद करण्यात आला कारण कोणत्याही फ्रँचायझीने या नियमाचा कधीच वापर केला नाही किंवा करावा लागला नाही. परंतु 31 जुलै रोजी BCCI सोबत झालेल्या बैठकीत चेन्नई सुपर किंग्सने पुन्हा एकदा हा नियम नव्याने सुरु करण्याची विनंती केली होती. CSK ची हि विनंती BCCI मान्य करण्याची शक्यता असून असं झाल्यास महेंद्रसिंघ धोनी अनकॅप्ड प्लेयर्सच्या रूपात आयपीएल लिलावात उतरू शकतो.

दरम्यान, एका कार्यक्रमात बोलताना आपल्या आयपीएलमधील भविष्याबाबत बोलताना म्हंटल होते कि, IPL 2025 अजून बराच वेळ आहे. आता चेंडू आमच्या पारड्यात नाही. एकदा का नियम जाहीर झाले की मी निर्णय घेईन. खेळाडूंना कायम ठेवण्याबाबत काय निर्णय होतो तो बघूया, त्यानंतर मी निर्णय घेईन आणि हा निर्णय संघाच्या हिताचा असेल असं माहीने सांगितलं. त्यामुळे बीसीसीआयच्या निर्णयावरच धोनीचे आयपीएल मधील भविष्य अवलंबून असेल हे स्पष्ट आहे आणि धोनीला सुद्धा याची जाणीव आहे.

चेन्नई सुपर किंग्सचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी मात्र धोनी पुढील वर्षी चेन्नई सुपर किंग्ससाठी खेळेल अशी आशा व्यक्त केली होती. आम्ही नेहमी त्याच्या निर्णयाचा आदर करतो. मला आशा आहे की तो लवकरच निर्णय घेईल. मात्र, तो पुढील वर्षी चेन्नई सुपर किंग्ससाठी खेळेल अशी आम्हाला खूप आशा आहे, आणि ही चाहत्यांची आणि माझीही इच्छा आहे, असं काशी विश्वनाथन म्हणाले होते. आपणा सर्वांना माहिती आहे की, धोनी स्वतःचे निर्णय स्वतःच घेतो आणि धोनीने योग्य वेळी ते जाहीर सुद्धा केले आहेत . परंतु आम्हाला खूप आशा आहे की तो पुढील वर्षी CSK साठी उपलब्ध असेल.

Sprouts Benefits | स्प्राउट्स आहेत मल्टीविटामिनचा चांगला स्रोत; दररोज खाल्याने होतात हे फायदे

Sprouts Benefits

Sprouts Benefits | आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपल्याला निरोगी जेवण करणे देखील खूप महत्त्वाचे असते. आपल्या शरीरात सगळ्या पोषक तत्वांची कमतरता भरून काढण्यासाठी आपल्याला योग्य तो आहार घेतला पाहिजे. अनेक आरोग्य तज्ञांनी निरोगी जेवण करण्याचा सल्ला दिलेला आहे. त्यातही स्प्राऊट्स (Sprouts Benefits) हा सगळ्या पोषण तत्त्वांचा एक उत्तम पर्याय आहे. तुम्ही जर आहारात समावेश केला, तर तुमचे वजन देखील नियंत्रणात राहील.

अनेक जीवनसत्वांची कमतरता देखील भरून निघेल. यामध्ये मल्टीविटामिन्स देखील असतात. तुम्ही स्प्राऊट्स तसेच खाल्ले तर ते पचायला देखील कठीण होतात. त्यामुळे इतरही समस्या उद्भवू शकतात. त्यावेळी तुम्ही स्क्राऊट्स उकळून खाऊ शकता. त्यामध्ये थोडे मसाले आणि सॅलरी वगैरे टाकून खाऊ शकता. त्यामुळे ते पचायला देखील सोपे असतात. आणि त्याचा आपल्या शरीराला फायदा देखील होता. याचे नक्की कोणते फायदे होतात हे आपण जाणून घेणार आहोत.

पोषक तत्वांनी समृद्ध | Sprouts Benefits

स्प्राऊट्समध्ये सगळे पोषणतत्व असतात. यामध्ये कॅल्शियम लोह मॅग्नेशियम जास्त आणि अँटिऑक्सिडंट यांसारखे घटक असतात. तसेच विटामिन ए, बी आणि सी देखील असतात. ज्यामुळे आपल्या शरीराला खूप फायदा होतो. तुम्ही जर रोज खाल्ले तर रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते.

विटामिन्सने समृद्ध

मसूर, चने, सोयाबीन, मूग, राजमा यांसारख्या स्प्राऊट्स मध्ये विटामिन परिपक्व असतात. त्यामुळे शाकाहारी लोकांसाठी स्प्राऊट हा एक पौष्टिक असा घटक आहे. स्नायूंच्या तंदुरुस्तीसाठी, मेंदूच्या विकासासाठी आणि संपूर्ण शरीरासाठी स्प्राऊटस खूप गरजेचे असतात.

वजन नियंत्रणात राहते

स्प्राऊट्समध्ये कमी कॅलरीज असतात. आणि जास्त पोषण तत्वे असतात. यामध्ये जास्त फायबर असतात. त्यामुळेच पाऊस खाल्ल्याने आपल्याला भूक कमी लागते आणि वजन देखील नियंत्रणात येते.

डीटॉक्सिफिकेशन | Sprouts Benefits

स्प्राऊट्समध्ये जास्त प्रमाणात फायबर असते आणि पाणी देखील असते. त्यामुळे स्प्राऊस आपल्या शरीराला हायड्रेट ठेवते. नियमितपणे जर तुम्ही स्प्राऊटचे सेवन केले तर शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यात देखील मदत होते.

Doctors Strike : आज देशभरात डॉक्टरांचा संप!! कोणत्या सेवा बंद राहणार?

Doctors Strike Kolkata Rape Murder Case

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोलकाता येथे प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील अत्याचार आणि निर्घृण हत्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. सर्वच स्तरातून या घटनेविरुद्ध आवाज उठवला जात असून सदर गुन्हेगारांना योग्य ती शिक्षा देण्याचे आवाहन समाजातून केलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर आज देशभरातील डॉक्टरांनी 24 तासांच्या बंदची (Doctors Strike) हाक दिली आहे. आज सकाळी ६ वाजल्यापासून हा संप सुरु झाला असून उद्या सकाळी ६ वाजेपर्यंत तो सुरु राहणार आहे. डॉक्टरांची संघटना असलेल्या IMA ने या संपात सहभागी होण्याचे आवाहन केल्यानंतर दिल्लीपासून ते मुंबईपर्यंत सर्वच आरोग्य सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे आज कोणकोणत्या सेवा बंद राहतील आणि कोणत्या सेवा सुरु राहतील हे आपण जाणून घेऊयात….

कोणत्या सेवा बंद राहणार? Doctors Strike

या संपाचा परिणाम खासगी आणि सरकारी हॉस्पिटलवर होईल.
रुग्णालयातील बहुतांश सेवा या बंद राहतील
या काळात सर्व आवश्यक सेवा सुरु असतील.
जखमी रुग्णांवर उपचार करण्यात येतील, परंतु नियमीत ओपीडी आणि वैकल्पिक शस्त्रक्रिया होणार नाहीत. (Doctors Strike)

IMA चे अध्यक्ष काय म्हणाले ?

ज्या मुलीसोबत ही घटना घडली ती मध्यमवर्गीय कुटुंबातील एकुलती एक मुलगी असल्याचे आयएमएचे अध्यक्ष म्हणाले. ही घटना कोणी एका व्यक्तीने घडवली नसून अनेक लोक यात सामील आहेत. ज्या पद्धतीने तिची हत्या झाली त्याचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. हा मानवतेविरुद्धचा गुन्हा असल्याचे ते म्हणाले. रुग्णालयात सुरक्षित नसल्याची चिंता डॉक्टर आणि परिचारिकांना आहे, तसेच त्यांचे कुटुंबीयही चिंतेत आहेत. मी आता सीबीआयच्या तपास रिपोर्टची वाट बघतोय असं त्यांनी म्हंटल.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात नेण्याच्या सूचना दिल्या आहेत. गरज पडल्यास आरोपींना फाशीची शिक्षा दिली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे असं ममता बॅनर्जी यांनी म्हंटल. तसेच या प्रकरणी आंदोलन करणाऱ्या लोकांचा राज्य सरकारवर विश्वास नसेल तर ते इतर कोणत्याही तपास यंत्रणेशी संपर्क साधू शकतात.असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या

पैसे परत घेण्याची भाषा करणाऱ्यांची जीभ हासडून काढू; अजितदादांचा दम

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेण्याची भाषा करणाऱ्यांची जीभ हासडून काढू असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी नाव न घेता आमदार रवी राणा यांच्यावर निशाणा साधला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीची जन सन्मान यात्रा पिंपरी चिंचवड परिसरात आली होती. यावेळी आपल्या भाषणात त्यांनी लाडकी बहीण योजनेबाबत रवी राणा (Ravi Rana) यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला तसेच लोकसभेला आरक्षण आणि संविधान बदलणार असा खोटं पण रेटून बोल असा प्रचार केला. पण, मी संविधानाला हात लावू देणार नाही अशी ग्वाहीही अजित पवारांनी दिली. यावेळी व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, युवा नेते पार्थ पवार, आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, माजी महापौर मंगला कदम, योगेश बहल, सुरज चव्हाण, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, नाना काटे, महिला कविता आल्हाट आदी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, रक्षाबंधनाच्या निमित्ताने जेव्हा बहीण भावाला राखी बांधते. यावेळी भाव आपल्या बहिणीला कोणीतरी अशी भेट नक्कीच देते. या भेटवस्तूवर बहिणीचा अधिकार असेल तर ती भेट कधीही परत घेता येणार नाही. आमच्या सरकारने या योजनेअंतर्गत सर्व भगिनींना ही भेट दिली आहे. कोणत्याही मायच्या लालने याबाबत चुकीचे वक्तव्य केले तर मी त्याची जीभ हासडीन असा सज्जड दम अजित पवारांनी दिला. आजपर्यंत ९० लाख महिलांना ३ हजार रूपये पाठवले आहेत. मी तुमचा भाऊ आहे. त्यामुळे सावत्र भावापासून लांब रहा. उद्यापर्यंत १ कोटी २५ लाख महिलांना मदत मिळणार आहे. हे सरकार असेपर्यंत ६-७ हजार रूपये महिलांना मिळतील असं अजित पवार म्हणाले.

रवी राणा यांचे विधान काय होते?

ज्याचं खाल्लं त्याचं जागलं पाहिजे. सरकार देत राहते, पण सरकारला आशीर्वादही दिला पाहिजे. आमचं सरकार आल्यावर लाडकी बहिण योजनेचे 1500 रुपयांचे आम्ही 3 हजार रुपये करू, तर आता त्यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवा आहे. मात्र, ज्यांनी मला आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ म्हणून ते 1500 रुपये तुमच्या खात्यातून वापस घेणार, असं रवी राणा यांनी म्हंटल. रवी राणा यांच्या या विधानाने महायुती सरकारची गोची होण्याची शक्यता आहे.

Niroshan Dickwella Banned : क्रिकेटविश्वास मोठी खळबळ!! डोपिंग प्रकरणी कर्णधारच निलंबित

Niroshan Dickwella Banned

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । श्रीलंका क्रिकेटमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. यष्टीरक्षक फलंदाज निरोशन डिकवेला (Niroshan Dickwella Banned) याला क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅट मधून निलंबित करण्यात आलं आहे. डिकवेलाला लंका प्रीमियर लीग (LPL) दरम्यान डोपिंगविरोधी उल्लंघन केल्याच्या आरोपानंतर निलंबित करण्यात आले होते. नुकत्याच पार पडलेल्या लंका प्रीमिअर लीग दरम्यान ही घटना घडली आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत डिकवेला गॅले मार्व्हल्सचे कर्णधारपद भूषवत होता. थेट कर्णधारावरच निलंबनाची कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे.

श्रीलंका क्रिकेटने एका निवेदनात म्हटले, निरोशन डिकवेला वरील निलंबन तात्काळ लागू झाले आहे आणि पुढील सूचना मिळेपर्यंत कायम राहील. लंका प्रीमियर लीग 2024 दरम्यान श्रीलंका अँटी-डोपिंग एजन्सी (SLADA) द्वारे ही चाचणी खेळाची अखंडता राखण्यासाठी श्रीलंका क्रिकेटच्या चालू असलेल्या वचनबद्धतेचा भाग म्हणून घेण्यात आली.क्रीडा मंत्रालयाच्या सहकार्याने आणि जागतिक उत्तेजक विरोधी एजन्सी (WADA) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार हाती घेतलेल्या या उपक्रमाचा उद्देश क्रिकेट प्रतिबंधित पदार्थांच्या प्रभावापासून मुक्त राहण्याची खात्री करणे हा आहे. असं श्रीलंका क्रिकेट कडून सांगण्यात आलं.

यापूर्वी सुद्धा डिकवेला वादाच्या भोवऱ्यात- Niroshan Dickwella Banned

यापूर्वी सुद्धा निरोशन डिकवेला वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. 2021 च्या सुरुवातीला इंग्लंडमध्ये बायो-बबल उल्लंघनामुळे दानुष्का गुनाथिलका आणि कुसल मेंडिससह त्याच्यावर एक वर्षाची बंदी (Niroshan Dickwella Banned) घालण्यात आली होती. त्यानंतर तो बराच काळ श्रीलंका संघांच्या बाहेर होता. मार्च 2023 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध डिकवेलाने आपली शेवटची कसोटी खेळली. त्याच्या एकूण कारकिर्दीबाबत सांगायचं झाल्यास,डिकवेलाने श्रीलंकेसाठी 54 कसोटी, 55 एकदिवसीय आणि 28 टी-20 सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत 2757 धावा आणि एकदिवसीय सामन्यात 1604 धावा केल्या आहेत. तर टी-20 मध्ये त्याने 480 धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 2 शतके आहेत. नुकत्याच झालेल्या लंका प्रीमिअर लीग मध्ये त्याने 10 डावात 184 धावा केल्या होत्या. त्याचा संघ गॅले मार्व्हल्स अंतिम फेरीत पोचला होता मात्र फायनलमध्ये त्यांना जाफना किंग्जकडून पराभव पत्करावा लागला.

BSNL | BSNL या शहरांना देणार 4G सेवा; Jio आणि Airtel च्या चिंतेत वाढ

BSNL

BSNL | मागील महिन्यात अनेक खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज दरात वाढ केलेली आहे. त्यामुळे अनेक ग्राहक हे बीएसएनएल (BSNL) या कंपनीकडे वळताना दिसत आहे. अशातच आता बीएसएनएलने त्यांच्या दिल्ली आणि मुंबईमध्ये काम करत असलेल्या ग्राहकांना 4G सेवा पुरवण्यासाठी MTNL यांच्यासोबत हात मिळवणे केलेली आहे. त्यांच्यात झालेल्या या करारामुळे MTNL आता पुढील दहा वर्षे आपले नेटवर्क सुधारण्याचे काम करणार आहे. आणि ग्राहकांना 4G सेवा देखील प्रदान करणार आहे. MTNL आणि BSNL या कंपन्यांनी त्यांची 4G सेवा बाजारात आणण्यासाठी खूप उशीर केलेला आहे. परंतु आता त्यांनी त्यांच्या ग्राहकांसाठी ही सेवा सुरू करण्याचा एक मोठा निर्णय घेतलेला आहे. याचा त्यांना चांगलाच फायदा होणार आहे.

दिल्ली आणि मुंबईसाठी कायदे | BSNL

14 ऑगस्ट 2024 रोजी या करायला बाबत बैठक झाली. आणि या बैठकीमध्ये संपूर्ण माहिती देण्यात आली हा करार दहा वर्षासाठी असणार आहे. त्यामध्ये दोन्ही कंपन्यांना किमान सहा महिने अगोदर नोटीस देऊन करार संपवता येणार आहे. यामुळे आता दिल्ली आणि मुंबईतील ग्राहकांना अगदी स्वस्त दरामध्ये फोरजी सेवा मिळणार आहे.

सरकारकडे एमटीएनएलच्या 56% जास्त भागीदारी | BSNL

सरकारकडे सध्या एमटीएनएल 56% पेक्षा जास्त हिस्सा आहे. त्यामुळे कंपनी आपल्या दुसऱ्या कंपनीला बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. एमटीएनएलला सरकारकडून जवळपास 80 हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. त्यामुळे आता कंपनीला पुन्हा एकदा जोमाने काम करण्याची संधी मिळालेली आहे.

BSNL चे नवे उपक्रम

BSNL ने त्यांच्या ग्राहकांसाठी 4G आणि 5G ओव्हर द इयर अँड युनिव्हर्सल सिम प्लॅटफॉर्म लॉन्च केलेला आहे. त्यामुळे आता त्यांच्या ग्राहकांना चांगली नेटवर्कची सुविधा पुरवणार आहे. ग्राहकांना तसेच सिम कार्ड कोणत्याही राज्याच्या अडथळ्याशिवाय बदलता येणार आहे. BSNL ने जवळपास 12,000 नवीन टॉवर्स देखील स्थापन केलेले आहेत. 2024 च्या शेवटपर्यंत संपूर्ण देशभरात 4G सेवा पुरवण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. तसेच 2025 च्या सुरुवातीला BSNL 5G सेवा पुरवण्याच्या तयारीत देखील आहे.

IBPS SO Bharti 2024 | IBPS SO अंतर्गत 896 पदांसाठी भरती सुरु; असा करा अर्ज

IBPS SO Bharti 2024

IBPS SO Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. आम्ही नेहमीच तुम्हाला नोकरीच्या विविध संधींची माहिती देत असतो. आज देखील आम्ही अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता बँकिंग कार्मिक निवड संस्था म्हणजेच IBPS अंतर्गत एक मोठी भरती चालू झालेली आहे. या भरती अंतर्गत आयटी अधिकारी, कृषी क्षेत्र अधिकारी, राजभाषा अधिकारी, कायदा अधिकारी, कार्यामिक अधिकारी, विपणन अधिकारी या पदांच्या रिक्त जागा आहेत. या पदांच्या एकूण 896 रिक्त जागा आहेत. आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. त्याचप्रमाणे 21 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी यासारख्या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

महत्वाची माहिती | IBPS SO Bharti 2024

  • पदाचे नाव – आयटी अधिकारी, कृषी क्षेत्र अधिकारी, राजभाषा अधिकारी, कायदा अधिकारी, कार्मिक अधिकारी, विपणन अधिकारी
  • पदसंख्या – 896 जागा
  • वयोमर्यादा – 20 ते 30 वर्ष
  • अर्ज शुल्क – 175 रुपये
  • अर्ज पद्धती – ऑनलाइन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 ऑगस्ट 2024

रिक्त पदे

  • आयटी अधिकारी – 170 जागा
  • कृषी क्षेत्राधिकारी – 346 जागा
  • राजभाषा अधिकारी -25 जागा
  • कायदा अधिकारी – 125 जागा
  • कार्मिक अधिकारी – 25 जागा
  • विपणन अधिकारी – 205 जागा

अर्ज कसा करावा ?

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू
21 ऑगस्ट 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे
अर्ज करण्यापूर्वी पीडीएफ जाहिरात सविस्तरपणे वाचा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Pune Metro : Good News ! पुणे, ठाणे मेट्रोच्या नव्या लाईनला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Pune Metro : मोदी सरकार कडून अनेक महत्वाचे विकास प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. मेट्रो , बुलेट ट्रेन, आणि नव्या रस्त्यांचा सुद्धा यात समावेश आहे. आता मेट्रोच्या विस्ताराबाबत महत्वपूर्ण निर्णय मोदी सरकार कडून घेण्यात आला आहे. यामध्ये पुणे, ठाणे आणि बेंगलोर येथील मेट्रोच्या (Pune Metro) विस्ताराला केंद्राकडून मंजुरी मिळाली आहे. चला जाणून घेऊया…

पुणेकरांना आणि ठाणेकरांना एक मोठी खुशखबर आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पाच महत्त्वाचे आणि मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये तीन मेट्रो प्रकल्प तर दोन विमानतळांना मंजुरी मिळाली आहे. विशेष म्हणजे मेट्रो प्रकल्पामध्ये महाराष्ट्रातील ठाणे रिंग मेट्रो आणि पुणे मेट्रोच्या नव्या लाईनला मंजुरी मिळाली (Pune Metro) आहे.

ठाणे रिंग मेट्रो (Pune Metro)

ठाण्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर ठाणे शहरात वाहतुकीचा विचार करून मंत्रिमंडळाने ठाणे रिंग मेट्रोला मंजुरी दिली आहे. यासाठी 12,200 कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे. तर ठाण्याच्या चारी बाजूने मेट्रो लाईनचा घेराव असेल. ठाणे रिंग मेट्रो जुन्या रेल्वे स्थानकाला नवीन स्थानकाबरोबर जोडण्याचं काम करेल याबरोबरच बुलेट ट्रेनच्या स्थानकांना जोडणार आहे. ते ठाणे रिंग मेट्रो मुंबई मेट्रो आणि उपनगरांच्या मेट्रोशी जोडली जाईल हा प्रकल्प महाराष्ट्र आणि केंद्र सरकारची संयुक्तिक योजना असेल (Pune Metro) ठाणे रिंग मेट्रोची लांबी 29 किलोमीटर असेल यामध्ये 22 मेट्रो स्थानक असतील या प्रकल्पामध्ये 2045 पर्यंत आठ लाख 70 हजार प्रवासी प्रवास करते.

पुणे मेट्रो (Pune Metro)

मिळालेल्या माहितीनुसार पुण्याच्या मेट्रो बद्दल सांगायचं झालं तर पुणे हे देशातील पाच मोठ्या महानगरांपैकी एक असून पुण्यातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळांना मेट्रो लाईनचा विस्तार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. या निर्णयानुसार स्वारगेट ते कात्रज अशी नवीन मेट्रोलाईन करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. 5.4 किलोमीटरचा हा प्रकल्प असणार आहे. यामध्ये तीन नवीन मेट्रोस्थानक असतील. या प्रकल्पाचा अंदाज हे खर्च 2954 कोटी रुपये असेल. हा प्रकल्प 2019 पर्यंत पूर्ण होण्याची (Pune Metro) शक्यता केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितली आहे.

दोन विमानतळांना मंजुरी (Pune Metro)

याबरोबरच केंद्रीय मंत्रिमंडळांने पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये प्रत्येकी एक विमानतळ बांधण्यासाठी मंजुरी दिली आहेत. पश्चिम बंगालच्या बागडोरामध्ये नवीन विमानतळ होणार आहे. तर बिहारच्या बीहिटा मधील सुरक्षा दलाच्या विमानतळाचा विस्तारीकरण करून सामान्य नागरिकांसाठी हे विमानतळ सुरू केले जाणार आहे. या विमानतळामुळे पटना विमानतळावरचा भार कमी होणार (Pune Metro) आहे आणि या दोन्ही प्रकल्पासाठी 2962 कोटी रुपयांची मंजुरी मिळाली आहे.