Friday, December 19, 2025
Home Blog Page 5270

राष्ट्रवादीकडून कुठलीही ऑफर नाही! एकनाथ खडसेंचा जाहीर खुलासा, पण जर..

जळगाव । भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. अशा वेळी भाजपच्या नेत्यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिल्यानंतर स्वत: खडसे यांनी आज याविषयी खुलासा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याबाबत आपण कोणताही निर्णय घेतलेला नाही. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसकडून आपल्याला तसा कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव आलेला नाही, असे स्पष्टीकरण एकनाथ खडसे याांनी दिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशाबाबत खडसे यांनी सांगितले की, ‘गेल्या २ महिन्यांपासून मी आजारपणामुळे मुक्ताईनगरातचं आहे. माझ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशाची सध्या जोरदार चर्चा आहे. याआधी शिवसेना आणि काँग्रेसच्या प्रवेशाचीही चर्चा होती. मात्र, मी अजून पक्षांतराबाबतचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. तसा काही निर्णय घेतला तर तो मी स्वतः जाहीर करेन, असेही खडसेंनी यावेळी सांगितले.

दरम्यान, एकनाथ खडसेंनी यांनी गेल्या आठवड्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट हल्ला केला होता. फडणवीस यांनी आपल्याला त्रास दिला, असा जाहीर आरोप त्यांनी केला होता. पक्षाने अन्याय केल्यामुळे पक्षात राहू नये, असा सूरही त्यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. ते शिवसेनेत जाणार की राष्ट्रवादीत जाणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

शिवसेना नेते तथा राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी त्यांना शिवसेनेत येण्याचे आवाहन केले होते. तर राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही खडसे पक्षात आल्यास स्वागत आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जळगाव जिल्ह्यात येऊन आढावा घेणार होते. मात्र, आता पक्षाचे नेते शरद पवारच आढावा घेत असल्याने या बैठकीत काय निर्णय होतो? याकडे लक्ष लागून राहिले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

 

 

 

 

नोकरी करणार्‍यांसाठी मोठी बातमी – आता ‘या’ करात मिळेल 25% सूट, याचा आपल्या पैशावर काय परिणाम होईल ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Taxation and Other Laws (Relaxation and Amendment of Certain Provisions) Bill, 2020 संसदेने मंजूर केले. हे विधेयक आता अशा अध्यादेशांची जागा घेईल ज्यात अनेक प्रकारच्या करात सूट देण्यात आली आहे. उदाहरणार्थ, सन 2019-20 या आर्थिक वर्षासाठी इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम तारीख यावेळी 30 नोव्हेंबर 2020 अशी करण्यात आली आहे. तसेच पुढील वर्षापर्यंत TDS साठी 25 टक्के सूट देण्यात येत आहे, जी 31 मार्च 2021 पर्यंत सुरू राहणार आहे.

कोणत्या प्रकारचे पेमेंट किंवा उत्पन्नावर TDS लागू केले जाऊ शकते
TDS मध्ये देण्यात आलेली 25 सवलत सर्व प्रकारच्या पेमेंटसवर लागू होईल. यात कमिशन, ब्रोकरेज किंवा कोणत्याही प्रकारच्या पेमेंटसचा समावेश आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत चर्चेदरम्यान सांगितले की, यामुळे 50 हजार कोटींची लिक्विडिटी लोकांच्या हातात राहील. तसेच, ज्यांचा इनकम टॅक्स रिफंड अजूनही मिळालेला नाही त्यांना लवकरच पैसे दिले जातील. पगार, व्याज किंवा गुंतवणूकीवरील कमिशन यासह उत्पन्नाच्या विविध स्त्रोतांवर TDS कट केला जातो. TDS सुरू करण्याचा उद्देश उत्पन्नाच्या स्त्रोतावर टॅक्स कट करणे हा होता.

TDS म्हणजे काय आणि कोणत्या प्रकारचा व्यवहारावर लागू होत नाही
एखाद्या व्यक्तीला टॅक्स कट करून रक्कम दिल्यास ती टॅक्स म्हणून कट केलेली रक्कम असते तिला TDS असे म्हणतात. लोकांच्या उत्पन्नाच्या स्त्रोतावर कपात केलेल्या TDS द्वारे सरकार टॅक्स वसूल करते. TDS प्रत्येक उत्पन्न आणि प्रत्येक व्यवहारासाठी लागू होत नाही. समजा तुम्ही भारतीय आहात आणि तुम्ही डेट म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला कोणताही TDS भरावा लागणार नाही. त्याचबरोबर, जर तुम्ही अनिवासी भारतीय (NRI) असाल तर तुम्हाला या निधीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर TDS भरावा लागेल. TDS भरण्याची जबाबदारी देय व्यक्ती किंवा संस्था यांची असेल. कट केलेला TDS शासकीय खात्यात जमा करणे आवश्यक आहे.

कर्मचारी कंपनीला TDS कट न करण्यास सांगू शकतात
TDS वजा करणाऱ्याला सर्टिफिकेट देऊन हे सांगणे आवश्यक आहे की, त्याने किती टॅक्स कट केला व तो सरकारकडे जमा केला. पेमेंट मिळविणारी व्यक्ती भरलेल्या टॅक्सच्या TDS चा क्लेम करू शकते. मात्र, हा क्लेम त्याच आर्थिक वर्षात करावा लागेल. एखाद्या वित्तीय वर्षात एखाद्या व्यक्तीचे उत्पन्न इन्कम टॅक्स सूट मर्यादेच्या आत असल्यास, तो नियोक्ताला फॉर्म 15 G किंवा 15 H भरून TDS कपात न करण्याविषयी सांगू शकतो. इन्कम टॅक्स कायद्यातील कलम 192 च्या अंतर्गत ज्यांना पगार मिळतो त्यांच्याकडून दरवर्षी सरकार TDS म्हणून टॅक्स वसूल करते.

कंपन्या आर्थिक वर्षासाठी अशा प्रकारे कॅल्क्युलेट करतात TDS
टॅक्स कायद्यानुसार पगाराच्या उत्पन्नावरील TDS चा दर कर्मचार्‍याच्या इन्कम टॅक्स स्लॅबवर अवलंबून असतो. संस्था इन्कम टॅक्सच्या सरासरी दराने टॅक्स पेमेंट्स कॅल्क्युलेट करतात. कर्मचार्‍याच्या एकूण उत्पन्नाद्वारे एकूण टॅक्स पेमेंट्सचे विभाजन करून सरासरी दर काढला जातो. पगारातून टॅक्स कट करण्यासाठी कर्मचार्‍याची एकूण टॅक्स देयता कॅल्क्युलेट केली जाते. त्यासाठी त्याच्या वतीने टॅक्स सेविंग स्‍कीममध्ये केलेली गुंतवणूकही विचारात घेतली जाते. कर्मचार्‍यांच्या पगारावर आणि टॅक्स सेविंग स्कीम गुंतवणूकीच्या आधारे ही आर्थिक वर्षाच्या सुरूवातीस मोजली जाते.

आर्थिक वर्षात नोकरी बदलल्यास TDS कसा कॅल्क्युलेट करावा
कोणत्याही एका आर्थिक वर्षात एखादा कर्मचारी एक कंपनी सोडून दुसर्‍या कंपनीमध्ये जॉइन करू शकतो. अशा परिस्थितीत त्याला एका आर्थिक वर्षात दोन वेगवेगळ्या संस्थांकडून वेतन मिळेल. आता TDS कट करण्यासाठी नवीन संस्थेवरील इन्कम टॅक्सच्या सरासरी दर कॅल्क्युलेट करण्याची जबाबदारी असेल. म्हणूनच, कर्मचार्‍यास नवीन कंपनीत फॉर्म -12 B जमा करायचा असतो. या फॉर्ममध्ये मागील कंपनीकडून मिळालेल्या पगाराचा तपशील असेल. तसेच आधीची कंपनी किती TDS कपात करायची हे देखील कळेल. नवीन कंपनी केवळ या फॉर्मच्या आधारे उर्वरित आर्थिक वर्षासाठी TDS कॅल्क्युलेट करेल.

TDS कपातीचा पगारावर 25% ने कमी परिणाम होईल
कोरोना संकट आणि लॉकडाऊनमुळे लोकांची परीस्तिथी तितकीशी चांगली नाही आहे. हे लक्षात घेऊन सरकारने 31 मार्च 2021 पर्यंत TDS कपात 25 टक्क्यांनी कमी केली आहे. उदाहरणार्थ, जर तुमचा TDS आतापर्यंत 10% कमी केला असेल तर आता तुमच्या उत्पन्नाच्या स्त्रोतावर फक्त 7.5% टॅक्स कट केला जाईल, म्हणजे आता तुमच्या पगारामध्ये 2.5% वाढ होईल. सरकारने 13 मे पासून एक अध्यादेश आणून ही प्रणाली लागू केली, त्यासाठी संसदेमध्ये एक दुरुस्ती विधेयक मांडण्यात आले, ज्यास दोन्ही सभागृहांकडून मान्यता मिळाली आहे. यासह सरकारने आर्थिक वर्ष 2019-20 साठी इनकम टॅक्स रिटर्न फाइल करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत वाढविली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

‘कितीही मोठी ऑफर दिली तरी खडसेंचा डीएनए त्यांना दुसऱ्या पक्षात जाऊ देत नाही’- सुधीर मुनगंटीवार

मुंबई । भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. अशा वेळी भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एकनाथ खडसेंना दुसऱ्या पक्षाने कितीही मोठी ऑफर दिली, तरी ते भाजप सोडून जाणार नाहीत असा विश्वास व्यक्त केला आहे. “दुसऱ्या पक्षाने कितीही मोठी ऑफर दिली, तरी खडसेंचा डीएनए त्यांना दुसऱ्या पक्षात जाऊ देत नाही,” असं ते म्हणाले आहेत.

“एकनाथ खडसे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. कार्यकर्त्यांवर प्रेम करणारे नेते आहेत. जिना यहाँ मरना यहाँ इसके सिवा जाना कहाँ… खडसे हे भाजप सोडून दुसऱ्या पक्षात जाऊच शकत नाही हा कार्यकर्ता म्हणून एक विश्वास आहे. संवादाच्या माध्यमातून प्रश्न सुटतील,” असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान, एकनाथ खडसे भाजपाला सोडचिठ्ठी देण्याच्या चर्चेबद्दल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ते असं काही करणार नसल्याचे म्हटलं.

‘एकनाथ खडसे हे भाजपचे ज्येष्ठ आणि जुने-जाणते नेते आहेत. पक्षाने आतापर्यंत त्यांना भरभरून दिलं आहे. त्यामुळं भाजपचं नुकसान होईल अशी कोणतीही भूमिका एकनाथ खडसे घेणार नाहीत,’ असा विश्वास व्यक्त केला आहे. ‘नाथाभाऊंच्या बद्दल यापूर्वी अनेकदा अशा चर्चा झाल्या होत्या. मात्र, त्या अफवाच ठरल्या होत्या. आताची चर्चा देखील अफवाच ठरेल,’ असं पाटील म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

 

 

 

 

शरद पवारांच्या ‘त्या’ आरोपावर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आयकर विभागाने नोटीस बजावली आहे. २००९, २०१४ आणि २०२० मधील निवडणुकांमधील प्रतिज्ञापत्रांवरील माहितीवरून आयकर विभागाने त्यांना नोटीस पाठवली आहे. यांनतर आयकर विभागाने आपल्याला नोटीस बजाविली असून, त्याला लवकरच उत्तर देऊ, अशी माहिती शरद पवार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. याशिवाय राजकीय विरोधकांना आयकर विभागाच्या माध्यमातून नोटिसा बजावून त्यांच्यावर दबाव वाढविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप शरद पवार यांनी मंगळवारी केला. दरम्यान, निवडणूक आयोगाने शरद पवारांचा आरोप फेटाळत याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

निवडणूक आयोगाने ट्विटरवर एक निवेदन प्रसिद्ध करत सांगितलं की, “भारतीय निवडणूक आयोगाने केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाला शरद पवारांना नोटीस बजावण्यासाटी कोणताही आदेश दिला नव्हता”. दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनाही नोटीस बजाविण्यात येणार असल्याचे पवार म्हणाले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनाही नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत” असं पवार यांनी सांगितलं होतं.

“निवडणूक आयोगाच्या सूचनेवरून ही नोटीस बजाविण्यात आली. उत्तर देण्यास विलंब झाल्यास प्रतिदिन १० हजार रुपये दंड आकारला जाईल, असे त्यात नमूद करण्यात आले आहे. यामुळेच आपण लगेचच या नोटिसीला उत्तर देऊ,” असं शरद पवार यांनी सांगितलं. याचबरोबर ‘संपूर्ण देशात आमच्यावर विशेष प्रेम आहे याचा आनंद वाटतो, अशा शब्दांत पवारांनी केंद्रातील सत्ताधारी भाजपला टोला हाणला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

 

 

 

 

‘अशी’ पेरणी तुम्ही या अगोदर कधीच पाहिली नसेल; पहा हा भन्नाट व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय माणुस जुगाड करण्यात नेहमीच वरचढ ठरतो. यात शेतकरी मित्रही काही कमी नाहित. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल (Social Media Viral Video) होत आहे. अभिनेता अर्शद वारसीनं (Arshad Warsi) एक व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे. या व्हिडीओमध्ये शेतकरी अत्यंक अनोख्या पद्धतीने पेरणी करताना दिसत आहेत.

https://twitter.com/ArshadWarsi/status/1306784776095969281

सदर व्हिडीओ कुठला आहे याची माहिती समजू शकलेली नसली तरी या व्हिडीओमध्ये शेतकरी धान्याची पेरणी करताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, दोन जणं एका युवकाचे पाय पकडून त्याला खेचत आहेत, हा मुलगा शेतात धान्य पेरत आहे. या शेतकऱ्यांनी पेरणी करण्यासाठी लावलेली शक्कल पाहून सोशल मीडियावर त्यांचे कौतुक केले जात आहे.

अर्शद वारसीने हा व्हिडीओ 18 सप्टेंबररोजी पोस्ट केला आहे. या व्हिडीओला त्याने, Necessity is the mother of all inventions… म्हणजेच ‘गरज ही शोधाची जननी’ असेच कॅप्शन दिले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या चर्चेवर चंद्रकांतदादा, म्हणाले..

कोल्हापूर । उत्तर महाराष्ट्रातील काही नेते व पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. त्यात भाजपचे जेष्ठ नेते खडसे यांचं नाव प्रमुख आहे. यावर ‘एकनाथ खडसे हे भाजपचे ज्येष्ठ आणि जुने-जाणते नेते आहेत. पक्षाने आतापर्यंत त्यांना भरभरून दिलं आहे. त्यामुळं भाजपचं नुकसान होईल अशी कोणतीही भूमिका एकनाथ खडसे घेणार नाहीत,’ असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

मराठा समाजाच्या राज्य सरकारनं घेतलेल्या काही निर्णयाच्या अनुषंगानं बोलण्यासाठी आज त्यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. त्यावेळी त्यांनी खडसे यांच्याबद्दलही प्रतिक्रिया दिली. यावेळी एकनाथ खडसे भाजपाला सोडचिठ्ठी देण्याच्या चर्चेबद्दल चंद्रकांत पाटील यांना विचारलं असता, खडसे असं काही करणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘नाथाभाऊंच्या बद्दल यापूर्वी अनेकदा अशा चर्चा झाल्या होत्या. मात्र, त्या अफवाच ठरल्या होत्या. आताची चर्चा देखील अफवाच ठरेल,’ असं पाटील म्हणाले.

दरम्यान, भाजपमध्ये आपल्याला सातत्यानं डावललं जात असल्याची एकनाथ खडसे यांची भावना आहे. त्यातून ते अस्वस्थ आहेत. खडसे यांनी आपली नाराजी अनेकदा जाहीरपणे बोलून दाखवली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ते देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट हल्ले चढवत आहेत. काल आलेले लोक आम्हाला अक्कल शिकवत आहेत, असा टोला त्यांनी काही दिवसांपूर्वी हाणला होता. ‘भाजपची सत्ता जाण्यासाठी ‘मी पुन्हा येईन’ ही घोषणा जबाबदार आहे का याचा अभ्यास मी करतोय, असंही ते म्हणाले होते. फडणवीसांना लक्ष्य करून खडसे यांनी पक्ष सोडण्याची तयारी केल्याचं बोललं जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

 

 

 

 

‘हॅलो कृषी’ या शेतीविषयक वेबपोर्टलचा लोकार्पण सोहळा राजू शेट्टींच्या हस्ते संपन्न

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शेतीविषयक प्रश्नांच्या बातमीदारीसाठी ‘हॅलो कृषी’ या नवीन वेबपोर्टलचं लोकार्पण २२ सप्टेंबर रोजी राजू शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आलं. पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या लोकार्पण सोहळ्याला डेलीहंट माध्यम समूहाचे वरिष्ठ व्यवस्थापक महेंद्र मुंजाळ यांचीही उपस्थिती होती. ऑनलाईन पार पडलेल्या या कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या मुलांनी करायचं काय? या विषयावर राजू शेट्टी यांनी उपस्थितांना फेसबुक लाईव्हद्वारे मार्गदर्शन केलं.

लोकसभेत आणि राज्यसभेत पारित झालेल्या कृषी विधेयकांवर राजू शेट्टींनी कडाडून टीका केली. आतापर्यंत कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा कोणताच पर्याय भारतात यशस्वी झालेला नसून शेतीक्षेत्र बड्या उद्योगपतींच्या अधीन करण्याचा केंद्र सरकारचा डाव असल्याचं शेट्टी पुढे म्हणाले. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर न देण्याचं खाजगी विधेयक २०१८ साली मांडलं होतं, त्याला देशभरातील २६० कृषी संघटनांनी पाठिंबा दिला होता. हमीभावापेक्षा कमी दर देणाऱ्या लोकांवर फौजदारी कारवाई करण्याची तरतूदही या विधेयकात होती, मात्र हे विधेयक मंजूर झालं नाही. याचा दाखला देत शेतकऱ्यांना किमान हमीभाव देता येत नसेल तर शेतकऱ्यांनी सरकारला जाब विचारायला हवाच अशी स्पष्ट भूमिका शेट्टींनी यावेळी मांडली.

https://www.facebook.com/hellokrushi/videos/617177465646367/

पोर्टलचं लोकार्पण करत असताना शेतकऱ्यांची मुलं करत असलेल्या धडपडीविषयी राजू शेट्टींनी आनंद व्यक्त केला. देशातील ६० ते ६५ टक्के शेतकऱ्यांनी एकत्र येत सत्ताधाऱ्यांवर वचक बसवण्यासाठी आपला दबावगट निर्माण करण्याची गरजही राजू शेट्टींनी कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी बोलून दाखवली. ‘हॅलो कृषी’ या वेबपोर्टलच्या माध्यमातून शेतीविषयक प्रश्नांची मांडणी करण्यात येणार असून या संदर्भात कुणीही योगदान देण्यास इच्छुक असेल तर 8806336033 या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन हॅलो महाराष्ट्रचे प्रमुख आदर्श पाटील यांनी केलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम यांचा पहिल्याच दिवशी दणका; अवैध धंद्यांवर उगारला कारवाईचा बडगा

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे

जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी सोमवारी कार्यभार घेतला. पदभार स्वीकारल्यांनंतर त्यांनी तातडीने प्रत्यक्षात कामांची अंमलबजावणी करण्यास सुरवात केली आहे. पदभार स्वीकारताना त्यांनी जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार मंगळवारपासून म्हणजेच कामाच्या पहिल्याच दिवशी अवैध धंद्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात करण्यात आली आहे. अधीक्षकांच्या सूचनेप्रमाणे पोलिसांनी जिल्ह्यात कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. गेडाम यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन अधिकाऱ्यांना कारवाईच्या सूचना दिल्या. गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात अनेक ठिकाणी छुप्या पद्धतीने मटका, जुगार, दारु, गांजा विक्री असे अवैध धंदे सुरु होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आला होता. या लॉकडाऊनछ्या कालावधीत आणि लॉकडाऊन नंतर अवैधधंद्यांचे प्रमाण मोठ्याने वाढले होते. नूतन अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर कारवाई करण्यास सुरु केली आहे. पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी मंगळवारी दिवसभर जिल्हाभर स्थानिक पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकांनीही अवैध धंद्यांवर कारवाई केली. अधीक्षक गेडाम यांनी सर्व ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्­यांना कारवाई करण्याचे आदेश दिले होते. कारवाईत सातत्य ठेवून त्याचा अहवाल रोज अधीक्षक कार्यालयाला देण्यास सांगितले आहे. त्यानुसार मंगळवारी स्थानिक पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकांनी विविध ठिकाणी छापे टाकले.

एलसीबीने आठ ठिकाणी छापे टाकून २ जुगार अड्डे आणि ६ दारु विक्रीच्या अड्ड्यावर कारवाई केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. दरम्यान, अवैध व्यवसायांबरोबरच खासगी सावकारांवरही कडक कारवाईचे संकेत अधीक्षक गेडाम यांनी दिले आहेत. शिवाय ज्या सावकारांवर दोन किंवा त्याहून अधिक गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई करण्याचेही आदेश दिले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

‘राफेल’ला मिळाली पहिली महिला फायटर पायलट; फ्लाइट लेफ्टनंट शिवांगी सिंह यांना मिळाला बहुमान

नवी दिल्ली । इंडियन एअर फोर्समधील ‘गोल्डन अ‍ॅरो’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘राफेल’च्या पहिल्या स्क्वार्डनमध्ये एका महिला फायटर पायलटचा समावेश करण्यात आला आहे. फ्लाइट लेफ्टनंट शिवांगी सिंह असे या महिला फायटर पायलटचे नाव आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

शिवांगी सिंह २०१७ साली इंडियन एअर फोर्सच्या सेवेत रुजू झाल्या. त्या दुसऱ्या बॅचमधील फायटर पायलट आहेत. वाराणासीच्या असलेल्या शिवांगी सिंह यांचे सध्या प्रशिक्षण सुरु आहे. त्या लवकरच अंबाला स्थित ‘गोल्डन अ‍ॅरो’ च्या १७ व्या स्क्वार्डनच्या भाग होतील. नव्यानेच समावेश झालेल्या राफेल विमानांच्या वैमानिकांच्या चमूमध्ये हवाई दलातील महिला वैमानिकांची निवड करण्यात येणार असल्याचे वृत्त सोमवारी प्रसिद्ध झाले होते. राफेल एक मल्टीरोल म्हणजे बहुउद्देशीय फायटर विमान आहे.

२०१७ मध्ये IAF मध्ये रुजू झाल्यापासून फ्लाइट लेफ्टनंट शिवांगी सिंह या मिग-२१ बायसन विमानाच्या पायलट आहेत. राजस्थानातून त्या अंबालामध्ये दाखल झाल्या आहेत. वाराणसीतून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर शिवांगी सिंह यांनी बनारस हिंदू विद्यापीठात प्रवेश घेतला. तिथे त्या नॅशनल कॅडेट कॉर्पमध्ये ७ यूपी एअर स्क्वाड्रनचा भाग होत्या. त्यानंतर २०१६ साली ट्रेनिंगसाठी एअर फोर्स अ‍ॅकेडमीत प्रवेश घेतला. भारतीय हवाई दलातील १० महिला वैमानिकांनी सुखोई, मिग २९ यासह सर्व प्रकारची लढाऊ जेट विमाने चालवली आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

 

 

 

 

आता व्हिसाशिवाय जगातील ‘या’ 16 देशांमध्ये फिरू शकणार भारतीय नागरिक, राज्यसभेत सरकारने दिली माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेला लेखी उत्तर देताना मुरलीधरन म्हणाले की, “43 देश व्हिसा-ऑन-अराइवल सुविधा देतात आणि 36 देशांमध्ये भारतीय सामान्य पासपोर्ट धारकांना ई-व्हिसा सुविधा उपलब्ध आहेत.

 नई दिल्ली. राज्यसभा को एक लिखित जवाब में मुरलीधरन ने बताया कि 43 देश वीजा-ऑन-अराइवल सुविधा प्रदान करते हैं और 36 देश भारतीय साधारण पासपोर्ट धारकों को ई-वीजा सुविधा प्रदान करते हैं.

‘या’ देशांसाठी व्हिसा आवश्यक नाही – ज्या देशांमध्ये प्रवासासाठी व्हिसा लागत नाही असे देश आहेत – बार्बाडोस, भूतान, डोमिनिका, ग्रॅनाडा, हैती, हाँगकाँग SAR, मालदीव, मॉरिशस, मॉन्टेरॅट, नेपाळ, नियू बेटे, सामोआ, सेनेगल , त्रिनिदाद आणि टोबॅगो, सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्स आणि सर्बिया.

केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, व्हिसा-ऑन-अराइवल सुविधा देणार्‍या देशांमध्ये इराण, इंडोनेशिया आणि म्यानमार यांचा देखील समावेश आहे तसेच श्रीलंका, न्यूझीलंड आणि मलेशिया हे त्या 26 देशांच्या गटात आहेत जे ई-व्हिसा सुविधा देत आहेत.

 इन देशों के लिए नहीं चाहिए वीजा- जिन देशों की यात्रा के लिए वीजा की आवश्यक्ता नहीं होती, वे हैं- बारबाडोस, भूटान, डोमिनिका, ग्रेनाडा, हैती, हांगकांग SAR, मालदीव, मॉरीशस, मोंटसेराट, नेपाल, नीयू द्वीप, समोआ, सेनेगल, त्रिनिदाद और टोबैगो, सेंट विंसेंट और ग्रेनेडाइंस और सर्बिया.

भारतीय नागरिकांना आंतरराष्ट्रीय प्रवास सुलभ व्हावा या उद्देशाने व्हिसा मुक्त प्रवास, व्हिसा-ऑन-अराइवल आणि ई-व्हिसा सुविधा देणार्‍या देशांची संख्या वाढविण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे मंत्री म्हणाले.

 मंत्री ने कहा कि सरकार अंतरराष्ट्रीय यात्रा को आसान बनाने के उद्देश्य से भारतीयों को वीजा मुक्त यात्रा, वीजा-ऑन-अराइवल और ई-वीजा सुविधा प्रदान करने वाले देशों की संख्या बढ़ाने के प्रयास कर रही है.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.