Monday, December 22, 2025
Home Blog Page 529

PM Awas Yojana : मध्यमवर्गीयांचे घराचे स्वप्न होणार पूर्ण ! सरकार देणार अडीच लाख, चार पद्धतीने मिळणार मदत

PM Awas Yojana: केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना-शहरी 2.0 योजनेला मान्यता दिली आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार शहरी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी एक कोटी परवडणारी घरे बांधणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेला मंजुरी देण्यात आली. या योजनेवर सरकार 2.30 लाख कोटी रुपयांची सबसिडी देणार आहे. या योजनेंतर्गत शहरी (PM Awas Yojana)भागात घरे बांधण्यासाठी सरकार आर्थिक मदत करणार.

कशा पद्धतीने केली जाणार मदत ? (PM Awas Yojana)

  • या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हे लक्षात घ्या की केंद्र सरकारकडून या योजनेचा लाभ घेण्यासाठी चार पद्धतीने मदत केली जाते. यामध्ये
  • लाभार्थी आधारित बांधकाम म्हणजेच (बी एल सी)
  • भागीदारीत परवडणारी घर म्हणजे (ए एच पी)
  • परवडणारी भाड्याची घर म्हणजे (ए आर एच)
  • व्याज अनुदान योजना म्हणजेच (आय एस एस) अशा चार प्रकारे सरकार तुम्हाला मदत करू शकते.

कोणत्या तीन वर्गासाठी मदत (PM Awas Yojana)

बीएलसी, एएचपी आणि एआरएच अंतर्गत घर मागणीसाठी येणारा खर्च मंत्रालय राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश किंवा युएलव्ही आणि पात्र लाभार्थी यांच्यात केला जाणार आहे. एएचपी किंवा बीएलसी अंतर्गत सरकारी मदत विशिष्ट अटींसह प्रत्येक वर्गाला अडीच लाख (PM Awas Yojana) एवढी असणार आहे.

कोणत्या राज्याला किती मदत

देशातील कोणत्या राज्याला किती मदत करण्यात येईल याची माहिती आता घेऊयात. ईशान्ये कडील राज्य हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि केंद्रशासित प्रदेश, जम्मू काश्मीर, पदुच्छेरी आणि दिल्लीतील, बीएलसी तथा एएचपी वर्गासाठी केंद्र सरकार प्रतिघर 2.25 लाख रुपयांची मदत करेल आणि राज्य सरकार प्रतिघर किमान 0.25 लाख रुपयांची मदत करेल. इतर सर्व केंद्रशासित प्रदेशांसाठी केंद्र सरकार 2.50 लाख रुपयांची मदत करेल याशिवाय इतर राज्यांसाठी केंद्र सरकार दीड लाख रुपये प्रति घर आणि राज्य सरकार किमान एक लाख रुपये (PM Awas Yojana) प्रतिघर मदत करणार आहेत.

गृहकर्जावर 1.80 लाख रुपयांची सबसिडी (PM Awas Yojana)

याशिवाय, या योजनेंतर्गत, EWS, LIG ​​आणि MIG श्रेणीतील लोकांना 35 लाख रुपयांपर्यंतच्या घरांसाठी 25 लाख रुपयांपर्यंतचे गृहकर्ज घेण्यावर व्याज अनुदान दिले जाईल. या योजनेत 1.80 लाख रुपयांचे अनुदान 5 वर्षांसाठी हप्त्यांमध्ये दिले (PM Awas Yojana) जाईल.

दिल्लीचे IGI विमानतळ ठरले भारतातील पहिले नेट झीरो कार्बन उत्सर्जन करणारे विमानतळ

कार्बन उत्सर्जन ही पर्यावरणासाठी एक गंभीर समस्या बनली आहे. जगभरातील अनेक देश कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र भारतासाठी एक चांगली बातमी आहे. दिनांक १४ ऑगस्ट रोजी दिल्लीतील विमानतळ नेट झिरो कार्बन उत्सर्जन दर्जा प्राप्त करणारे देशातील पहिले विमानतळ बनले आहे चला जाणून घेऊया याबाबत अधिक माहिती

दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (DIAL), जीएमआर एअरपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडची उपकंपनी आहे, दिनांक १४ ऑगस्ट रोजी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नेट झिरो कार्बन उत्सर्जन दर्जा प्राप्त करणारे देशातील पहिले विमानतळ बनले असल्याची घोषणा केली आहे. DIAL ने जारी केलेल्या निवेदनात याबाबत माहिती देण्यात आली आहे.

नियोजित वेळेपूर्वी लक्ष्य गाठले

दिल्ली विमानतळाने सुरुवातीला 2030 पर्यंत “नेट झिरो कार्बन उत्सर्जन विमानतळ” बनण्याचे लक्ष्य ठेवले होते.परंतु नवीकरणीय ऊर्जेचा अवलंब, हरित विमानतळाच्या पायाभूत सुविधांचा विकास, इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन यांसारख्या नाविन्यपूर्ण धोरण आणि उपक्रमांच्या मदतीने विमानतळाने निर्धारित वेळेच्या आधीच आपले लक्ष्य निर्धारित वेळेपेक्षा आधी गाठले आहे.

लेव्हल 5 प्रमाणपत्र

या ऐतिहासिक कामगिरीसाठी दिल्ली विमानतळाला लेव्हल 5 प्रमाणपत्र देण्यात आले आहे. दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने म्हटले आहे की विमानतळाने त्याचे स्कोप 1 आणि 2 CO2 उत्सर्जन 90% कमी करण्यात यशस्वी झाले आहे. DIAL ने 2050 पर्यंत स्कोप 3 शून्य कार्बन उत्सर्जन साध्य करण्यासाठी, ACI च्या ACA फ्रेमवर्क आणि शाश्वत भविष्यासाठी जागतिक प्रयत्नांसह संरेखित करण्यासाठी वचनबद्ध केले आहे.

Ganeshotsav 2024 : विधानसभेसाठी भाजपचा मेगा प्लॅन ! कोकणात जाणाऱ्यांकरिता केली बस आणि ट्रेन्सची सोय

Ganeshotsav 2024 : संपूर्ण महाराष्ट्र गणेशोत्सव हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतो. त्यातही कोकणात मोठ्या दिमाखात हा सण साजरा होतो. या सणाला कोकणवासी सुद्धा आवर्जून हजेरी लावतो. मुंबईवरून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. यासाठी शासनाकडूनही प्रवाशांची सोय करण्यात आली आहे.

आता याबरोबरच भाजपने सुद्धा चाकरमान्यांची सोय केली आहे. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खास बस आणि रेल्वेची सोय भाजप कडून करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये अपयश आल्यानंतर विधानसभा (Ganeshotsav 2024) निवडणुकीत विजयासाठी भाजप कंबर कसून काम करीत आहे. एकीकडे ‘लाडकी बहीण’ योजनेनंतर आता कोकणवासी मतदारांना खुश करण्यासाठी भाजपने प्लॅन आखला आहे.

कोकणात जाण्यासाठी भाजपकडून विशेष बस आणि रेल्वे गाड्या सुद्धा सोडण्यात येणार आहेत. मुंबई महानगरातून तब्बल 700 बसेस आणि ६ ट्रेन्सचे नियोजन करण्यात आले आहे. लवकरच या बस आणि ट्रेनच्या बुकिंगला (Ganeshotsav 2024) भाजप कार्यालयात सुरुवात होणार आहे. मुंबईत कोकणी मतदारांचा आकडा मोठा असून याच मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपकडून सर्वाधिक बसेस सोडण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटलं जात आहे.

खरंतर वांद्रे पश्चिम विधानसभा क्षेत्रामध्ये बॅनर लागले आहेत. या बॅनर वर आशिष शेलार यांचा मोठा फोटो लावण्यात आला आहे. याबरोबरच मोदी, शहा, फडणवीस, बावनकुळे, यांच्यासह उज्वल निकम यांचा देखील (Ganeshotsav 2024)फोटो दिसत आहे. या बॅनर वर दिलेल्या माहितीनुसार मुंबईतून रायगड आणि पुढे कोकणातील चाकरमान्यांसाठी खास सोय करण्यात आली आहे. यासाठी 20 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये फॉर्म भरण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. अर्ज करताना निवडणूक ओळखपत्र आणि आधार कार्डची खरी आणि झेरॉक्स प्रत सोबत आणण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. खार पश्चिम येथून या बसेस सोडणार आहेत.

तर दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा फोटो (Ganeshotsav 2024) असलेल्या बॅनर वर विरार ते रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग एसटी बस सेवा असा बॅनर लावण्यात आला आहे याचे बुकिंग 15 ऑगस्ट पासून सुरू झाल्याचे सांगण्यात आले आहे.

Viral Video | मस्ती आली अंगाशी ! नागपूरमधील तलावात बुडून तरुणाचा मृत्यू

Viral Video

Viral Video | पावसाळा आला की अनेक लोक फिरायला जातात. पावसाळ्यामध्ये डोंगरदर्‍यांवरून धबधबे वाहत असतात. या पावसाचा आनंद घ्यायला सगळ्यांना खूप आवडतो. पावसाळा तसेच निसर्ग जेवढा चांगला आहे तितकाच काही वेळा आपल्याला भयानक रूप देखील दाखवतात. अगदी पर्यटकांच्या जीवावर बेततेल असे प्रसंग देखील घडतात यावर्षी देखील असे अनेक प्रसंग घडलेले आहेत. त्यामुळे कधीच पाण्याची खेळू नका. असं आपल्याला आपल्या पूर्वजांनी देखील सांगितलेले आहे.

अशातच आता नागपुरातून पावसाळ्यात आलेल्या पर्यटकांमधील एक ठराविक व्हिडिओ समोर आलेला आहे. ज्यामध्ये तलावावर उभे राहून स्टंटबाजी एका तरुणांनी केलेली आहे. परंतु ती स्टंटबाजी त्याच्या जीवावर बेतलेली आहे. त्या तलावाच्या किनाऱ्यावर उभा राहून स्टंटबाजी करणारा हा तर कोणत्या तलावात कोसळलेला आहे. त्यानंतर तो तसाच पाण्याच्या प्रवाहा सोबत पुढे पुढे गेला आणि म्हणून त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. हा धडकी भरवणारा व्हिडिओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामुळे जर तुम्हीही धबधब्यावर जाऊन, असे व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न करत असाल, तर ते आधी स्वतःच्या जीवाची काळजी करा.

https://www.instagram.com/reel/C-uPb3EuIJ4/?utm_source=ig_embed&ig_rid=d6ffa5d3-42f7-4eb1-b2e1-a2c20d0acc2d

स्वातंत्र्य दिनानिमित्त नागपूर जिल्ह्यामध्ये तलावावर पर्यटकांची मोठी गर्दी जमलेली होती. या गर्दीतील एका व्यक्तीने तलावावर उभे राहून व्हिडिओ काढण्याचे धाडस केले. परंतु ते धाडस त्याच्या अंगलट आल्याने ही दुर्घटना घडलेली आहे. त्या ठिकाणी अनेक लोक उपस्थित होते, तरी देखील त्याला त्याचा बचाव करता आले नाही. कारण पाण्याचा वेग इतका जास्त होता की, त्यासोबत तो तरुण वाहत गेला.

सोशल मीडियावर व्हायरल होणारे या व्हिडिओमध्ये (Viral Video) पाहू शकता की, तीन तरुण एका सांडव्यावरून तलावाचे पाणी समोरच्या दिशेने वाहते सांडव्याच्या भिंतीवर चालण्याचा प्रयत्न करू लागले. आणि त्यात एक तरुण यशस्वी झाला. जो सांडव्यावर उभा होता तो मागच्या दिशेला कोसळला. आणि पोहोच काही सेकंदातच त्याचा मृत्यू झालेला आहे. काही लोकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न देखील केला परंतु ते त्यांना शक्य झाले नाही.

Viral Video | रिल्ससाठी स्वतःलाच जमिनीत गाडले; धक्कादायक व्हिडीओ समोर

Viral Video

Viral Video | सध्या इंटरनेटचे युग चालू आहे. या इंटरनेटच्या युगात सोशल मीडियाचे देखील सगळ्यांना मोठे व्यसन लागलेले आहे. या सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहण्यासाठी आणि स्वतःला प्रसिद्ध करण्यासाठी लोक काहीही करायला तयार होतात. आपण सोशल मीडियावर रोजच वेगवेगळे धक्कादायक आणि रोमांचक व्हिडिओ पाहत असतो. ज्यामध्ये प्रसिद्ध होण्यासाठी अनेक लोक त्यांचा जीव देखील धोक्यात घालताना दिसत आहे. अशातच आता सोशल मीडियावर एक भयानक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये त्या पुरुषाने स्वतःला जमिनीखाली गाडलेले आहे. आणि ती महिला त्याला खायला घालताना दिसत आहे. हा व्हिडिओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात त्या पुरुषांवर टीका देखील करत आहे. हा व्हिडिओ पाहून एका व्यक्तीने कमेंट केली आहे की, “रीलमुळे लोक वेडी झाले आहेत. आता ते विष बनले आहे.” तर दुसऱ्या एका व्यक्तीने लिहिलेले आहे की, “आव्हानांचा सामना करण्यासाठी सरकार आणि समाज दोघांना मिळून उपाययोजना करायला पाहिजे.”

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये (Viral Video) पाहू शकता की, एक माणूस जमिनीत खोलवर गाडलेला दिसत आहे. त्याच्या शेजारी एक महिला आणि एक मुलगी दिसत आहे. त्याचे केवळ डोके जमिनीच्या वर दिसत आहे. आणि ते लोक रील काढत आहे. ती महिला त्या पुरुषाला खायला घालत आहे. परंतु हा असा धोकादायक प्रकार त्याच्या जीवावर देखील बेतू शकला असता. या गोष्टीचे कोणालाही भान राहिले नाही. त्यामुळे सोशल मीडियावर या व्हिडिओवर मोठ्या प्रमाणात टीका देखील होत आहे.

महाराष्ट्रातील निवडणुकांच्या तारखा का जाहीर केल्या नाहीत? निवडणूक आयुक्तांनी सांगितलं कारण

rajiv kumar maharashtra vidhan sabha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) आज जम्मू काश्मीर आणि हरियाणा राज्यातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यातील हरियाणामध्ये एक टप्प्यात निवडणूक होणार असून 1 ऑक्टोबर रोजी मतदान घेण्यात येईल. तर जम्मू काश्मिरमध्ये तीन टप्प्यात निवडणूक होणार आहे. या दोन्ही निवडणुकांचा निकाल 4 ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी याबाबत माहिती दिली. मात्र यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला नाही. परंतु या तारखा जाहीर न करण्याचे कारण त्यांनी सांगितलं आहे. जम्मू-काश्मीरच्या सुरक्षा आवश्यकतांमुळे महाराष्ट्रातील निवडणुका नंतर जाहीर केल्या जातील, असं राजीव कुमार यांनी म्हटलंय.

आजच्या पत्रकार परिषदेत बोलताना राजीव कुमार (Rajiv Kumar) यांनी म्हंटल कि, गेल्या काही दिवसांपासून जम्मू काश्मीरमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याठिकाणी सातत्याने दहशतवादी हल्ले होत आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या काळात सर्व उमेदवारांना कडेकोट सुरक्षा पुरवण्यात येणार आहे. याच कारणाने या काळात महाराष्ट्रात निवडणुका घेतल्या जाणार नाहीत. जम्मू-काश्मीरच्या सुरक्षा आवश्यकतांमुळे महाराष्ट्रातील निवडणुका नंतर जाहीर केल्या जातील असं स्पष्टीकरण राजीव कुमार यांनी दिले. त्यामुळे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका लांबणीवर पडणार हे आता समोर आलं आहे. महाराष्ट्र विधानसभेची मुदत ही 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. त्यामुळे आता दिवाळीनंतरच राज्यात निवडणुका लागण्याची शक्यता आहे. निवडणुका जाहीर झालेल्या नसल्या तरीही राज्यातील पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना पाहायला मिळणार आहे.

दरम्यान, जम्मू आणि काश्मीर हा विधानसभा असलेला केंद्रशासित प्रदेश आहे. पूर्ण राज्याचा दर्जा रद्द केल्यानंतर तेथील विधानसभेचे चित्रही बदलले आहे. आता जम्मू-काश्मीरमध्ये 114 जागा आहेत, त्यापैकी 24 जागा पाकव्याप्त काश्मीरमध्ये (PoK) येतात. अशा प्रकारे केवळ 90 जागांवर निवडणूक होणार आहे. 90 पैकी 43 जागा काश्मीर विभागात, तर 47 जागा जम्मू विभागात गेल्या आहेत. एकुंज 90 विधानसभा मतदारसंघापैकी 74 सर्वसाधारण, SC-7 आणि ST-9 आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये एकूण 87.09 लाख मतदार असतील. ज्यामध्ये 44.46 लाख पुरुष, 42.62 लाख महिला, 3.71 लाख प्रथमच मतदार आणि 20.7 लाख तरुण मतदार आहेत.

Virgin Pregnancy | संभोग न करताही महिला होऊ शकते गरोदर; काय आहे Virgin Pregnancy ?

Virgin Pregnancy

Virgin Pregnancy | आज-काल विज्ञान आणि तंत्रज्ञानाने एवढी प्रगती केलेली आहे की, ज्या गोष्टी मानवाला जमत नाही. त्या आज विज्ञानाच्या आधारावर करता येत आहेत. आरोग्य विषयक अनेक समस्या विज्ञानाच्या सहाय्याने सोप्या झालेल्या आहेत अशातच आजकाल प्रेग्नेंसी हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय झालेला आहे. त्यातही व्हर्जिन प्रेग्नेंसी ही कन्सेप्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आलेली आहे. परंतु याबद्दल सगळ्यांना पूर्ण माहिती नाही. व्हर्जिन प्रेग्नेंसी नक्की आहे तरी काय? संभोग न करता महिला कशी काय गरोदर होऊ शकते? या सगळ्याची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

गर्भधारणेमध्ये शारीरिक संबंध न ठेवता देखील एक महिला मुलाला जन्म देऊ शकते. ही पद्धत जास्त अवघड नाही. अगदी सामान्य पद्धत आहे. परंतु खूप कमी लोक या पद्धतीचा अवलंब करतात. एका अहवालानुसार 7870 महिलांवर याबाबत अभ्यास करण्यात आलेला आहे. ज्यामध्ये केवळ 0.5% महिलांनी ही व्हर्जिन प्रेग्नेंसीचा पर्याय निवडला. या तंत्रज्ञानाच्या मदतीने एका महिलेने दोन वेळा मुलांना जन्म दिला आणि तिची ती दोन्ही मुले अत्यंत निरोगी आहेत. त्याचप्रमाणे फोर प्ले किंवा आयव्हीएफच्या द्वारे देखील महिला गर्भवती होऊ शकतात.

या तंत्रज्ञानामध्ये महिला तिची व्हर्जिनिटी न गमावता प्रेग्नेंट (Virgin Pregnancy) होते आणि एका मुलाला देखील जन्म देते. 2021 मध्ये इंग्लंड मधील एक महिला या तंत्रज्ञानाच्या मदतीने आई झालेली आहे. तिचे नाव व्हर्जिन मेरी असे ठेवण्यात आलेले आहे. तिने संभोग न करता आयव्हीएफ द्वारे निरोगी बाळाला जन्म दिलेला आहे.

महिलांच्या ओव्हिलेशननुसार गर्भधारणेची शक्यता असते. मासिक पाळीच्या 14 दिवसानंतर ही सायकल चालू होते. या काळातच अंडाशय अंडे पेशीत सोडत असते. या काळात शुक्राणू पेशी महिलांच्या पेशीमध्ये सोडून त्यांचे फर्टीलायझेशन केले जाते.यामुळे झायगोट तयार होते. यामध्ये आई आणि वडिलांचा अर्धा DNA फॅलोपियन ट्यूब द्वारे गर्भाशयात टाकले जाते. या गर्भाचा पूर्ण विकास होण्यासाठी शेवटच्या कालावधीपासून 40 दिवस लागतात.

असिफ शेख यांची मालेगावमध्ये विधानसभा मतदारसंघात इतकी ताकद आहे

malegaon centre assembly

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खासदाराला पाडायची हिम्मत दाखवणारा मतदारसंघ म्हणजे मालेगाव मध्य… पाच मतदारसंघातून मायनसमध्ये जाऊनही एकट्या मालेगाव मध्यने काँग्रेसच्या उमेदवाराला 1 लाख 21 हजाराचं लीड दिलं… आणि भाजपचा कणका पाडत काँग्रेसचा उमेदवार निवडून आणला… मालेगाव मध्य मध्ये ही ताकद येते ती इथल्या बहुसंख्यांक मुस्लिम समाजामुळे… तब्बल 80 टक्के मुस्लिम समाज असणाऱ्या या मतदारसंघात एक वेळ पक्ष बदलेल पण आमदार हा समाजातच राहतो, अशी इथली परंपरा… पण लोकसभेच्या निकालानंतर मालेगाव मध्यमध्ये अनेकांना आमदारकीची स्वप्न पडू लागली आहेत.. त्यातही विद्यमान आमदार एमआयएमचे मुफ्ती मोहम्मद इस्माईल आणि असिफ शेख यांच्यात 2019 प्रमाणेच काट्यावरची लढत पाहायला मिळेल… त्यामुळे खासदारा तर ठरला.. पण मालेगाव मध्यचा आमदार कोण? याच प्रश्नाचं जमिनीवरचं विश्लेषण पाहुयात आजच्या व्हिडिओमध्ये…

मालेगाव मध्य हा राज्यातील सर्वात जास्त संवेदनशील मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. .. कारण मतदारसंघात तब्बल 80 टक्के मुस्लिम समाज राहतो…मालेगाव मध्य या मतदार संघावर सलग पंचवीस वर्ष जनता दलाचे निहाल अहमद यांची पकड होती.. पुढे रशीद शेख यांनी काँग्रेसच्या पंजाला या मुस्लिम बहुल मतदारसंघात बेस मिळवून दिला… पण 2009 साली मुस्लीम धर्मगुरु मौलाना मुफ्ती ईस्माइल यांनी धार्मिक कट्टरतावादाला प्राधान्य देत… रशीद शेख यांच्या विकासाच्या राजकारणाला साईडलाईन करत धर्म मोठा केला… पण 2014 साली मात्र रशीद शेख यांनी निवडणूक न लढवता आपला मुलगा आसिफ शेख यांना काँग्रेसच्या तिकिटावर निवडणुकीच्या आखाड्यात उतरविले. उच्च शिक्षित असलेला आसिफनं मुस्लिम आरक्षण, यंत्रमाग उद्योगाला सवलती मिळवून देण्याचा शब्द देऊन प्रचार केला…निवडणूक लढली… आणि जिंकली देखील… पुढील पाच वर्षांत आसिफ शेख यांनी मतदार संघातला आपला कनेक्ट अजिबात कमी होऊ दिला नव्हता…

हेच असिफ शेख 2019 ला काँग्रेसकडून एमआयएमच्या मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांच्याविरोधात रिंगणात होते… तर भाजपकडून दिपाली वारुळे निवडणुकीच्या रिंगणात होत्या… हे अत्यंत अटीतटीची आणि घासून झालेल्या लढतीत जनतेनं एमआयएमच्या म्हणजेच मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांच्या बाजूने आमदारकीचा कौल दिला… इथल्या मुस्लिम समाजाच्या ताकतीचा अंदाज लावायचा असेल तर नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार शोभा बच्छाव या पाचही विधानसभा मतदारसंघातून पिछाडीवर होत्या… थोडक्यात त्यांचा पराभव फिक्स होता… पण एकट्या मालेगाव मध्यने वारं फिरवलं… आणि काँग्रेसच्या उमेदवाराला विक्रमी लीड दिलं… अर्थात या मतदारसंघावर महायुतीला पकड मिळवणं अवघड असलं तरी इथली मुख्य लढत ही काँग्रेस विरुद्ध एमआयएमआयएम अशी होईल असा एकूणच अंदाज आहे…

पण खरी मेख आहे ती इथेच… करंट एमएलए मुक्ती मोहम्मद इस्माईल यांना प्रत्येक टर्मला घासून लढत देणारे आसिफ शेख यांनी 2019 ची निवडणूक काँग्रेसच्या तिकिटावर लढवली… मात्र त्यात त्यांचा पराभव झाला… यानंतर त्यांनी राष्ट्रवादीची वाट धरली… राष्ट्रवादीच्या फुटीतही मालेगाव मध्यच धार्मिक राजकारण लक्षात घेत ते शरद पवार गटासोबतच राहिले… खरंतर मालेगाव मध्यची ताकद पाहता ते राष्ट्रवादीकडून धुळे लोकसभेसाठी इच्छुक होते… पण ही जागा काँग्रेसची असल्याने त्यांनी दोन पावलं मागे घेत काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार केला… मतदारसंघातून आश्चर्यकारक सव्वा लाखाचं लीड दिलं… पण आता आघाडीत मालेगाव मध्यची जागा काँग्रेसला सुटणार हे लक्षात येताच आसिफ शेख यांनी अपक्ष उमेदवारीची घोषणा केली… त्यामुळे काँग्रेस – भाजप – एमाआयएम आणि अपक्ष अशी चौरंगी लढत आगामी विधानसभेत मालेगाव मध्य मध्ये पाहायला मिळू शकते… आसिफ शेख यांनी खरंतर वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत काँग्रेस सोबतची आपली निष्ठा कायम ठेवली होती… खरंतर काँग्रेसमध्येच त्यांनी राजकारणाची बाराखडी गिरवली.. नगरसेवक महापौर ते थेट आमदारही झाले… मालेगाव मध्य मध्ये आसिफ शेख या नावाला मानणारा मोठा व्होट बेस देखील आहे… त्यामुळे लढत चौरंगी असली तरी मुख्य लढत मुफ्ती मोहम्मद इस्माईल आणि आसिफ शेख आशीच राहील, एवढं मात्र नक्की…

बाकी यंत्रमागाचं शहर असूनही टेक्स्टाईल पार्कला चालना न मिळणं, शहरातील अस्वच्छता, अतिक्रमण आणि बेशिस्त वाहतूक यांसारखे अनेक समस्या येणाऱ्या निवडणुकीला फ्रंटला असू शकतात… दहा वर्षाच्या काळात आमदार रशीद शेख यांनी केलेली विकासकामं धार्मिकतेच्या मुद्यापुढे फिकी पडली. याच काळात मालेगाव मध्यमधील मतदार संघाचे विभाजन होऊन हिंदू बहुल भाग हा मालेगाव बाह्य मतदारसंघात गेला. त्यामुळे कॉंग्रेसची हक्काच्या हिंदू मतांचं विभाजन होऊन त्याचा फटका आमदार रशीद शेख यांना बसला. 2014 साली मात्र रशीद शेख यांनी निवडणूक न लढवता आपला मुलगा आसिफ शेख याला निवडणुकीच्या आखाड्यात उतरविले. उच्च शिक्षित असलेल्या आसिफ शेख यांनी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करत तरुणाईला आपलेसे केले. तर दुसरीकडे दखनी-मोमीन अशी जातीय पेरणी होऊ लागली. यंत्रमाग उद्योगाला सवलती, मुस्लीम आरक्षण या प्रश्नावर आसिफ शेख यांनी आंदोलन करत आमदार मौलाना मुफ्ती यांचा प्रभाव कमी केला.

त्यामुळे 2014 सालच्या चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत मौलाना मुफ्ती यांचा पराभव करत आसिफ शेख विजयी झाले. आपल्या आमदारकीच्या काळात आसिफ शेख यांनी विविध समाजपयोगी कामांचा धडाका लावला. त्यातच त्यांनी स्थानिकांना रोजगार देत तयार केलेल्या मालाची सर्वत्र ओळख व्हावी म्हणून मालेगाव महोत्सवांसारख्या कार्यक्रमांचं आयोजन करत जनतेशी आपली नाळ जोडण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे येणाऱ्या विधानसभेला मालेगाव मध्यचा कौल हा विकासाभिमुख राजकारणाला राहील की धार्मिक कट्टरतावादाला राहील हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच… बाकी तुम्हाला काय वाटतं, मालेगाव मध्यचा 2024 चा आमदार कोण? तुमचा कौल कुणाला? ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा..

Cleaning Hacks : काळेकुट्ट झाले आहेत सिलींग फॅन ? फक्त एका रुपयात होतील साफ, वापरा सोप्या ट्रिक्स

Cleaning Hacks : घराची सफाई ही नेहमीच आवश्यक असते. गृहिणी आपले घर स्वच्छ आणि टापटीप ठेवण्याला प्राधान्य देतात. त्यातही सण -उत्सवांच्या काळात हमखास साफ सफाई केलीच जाते. अनेकदा आपण खिडक्या, किचनमधील ट्रॉलीज, बाथरूम, सिंक सर्वांची सफाई करतो. मात्र अनेकदा सिलींग फॅनची स्वच्छता मागे राहते. टेबलावर चढून फॅन चकाचक करणे (Cleaning Hacks) म्हणजे तसे जिकिरीचे काम. म्हणूनच आज आम्ही घरच्या घरी फॅन क्लीनर कसे बनवायचे पाहुयात …

शाम्पु (Cleaning Hacks)

तुमचे काळेकुट्ट झालेले सिलींग फॅन केवळ एका रुप्याच्या शाम्पूने होईल साफ होतील. फॅन स्वच्छ करण्याचे हे क्लीनर बनवण्यासाठी एका भांड्यात शाम्पू घ्या. अर्धा चमचा मोहरीचे तेल आणि अर्धा ग्लास पाणी घालून (Cleaning Hacks) मिक्स करा. त्यानंतर पंखा स्वच्छ करण्यासाठी स्वच्छ स्पंज आणि सुती कापडाचा वापर करा. आता आपण तयार केलेल्या क्लीनरमध्ये स्पंज बुडवा आणि एकेक करून फॅनच्या सर्व ब्लेड वर लावा. दोन-तीन मिनिटे तसंच राहू द्या. सुती कापड थोडेसे ओले करून पुसून टाका. या उपायामुळे तुमचे पंखे चकचकीत होतील.

व्हाईट व्हिनेगर आणि डिश वॉश (Cleaning Hacks)

घरातले पंखे चांगल्या पद्धतीने स्वच्छ करण्यासाठी तुम्ही आणखी एका पद्धतीनं घरच्या घरी क्लीनर तयार करू शकता. यासाठी तुम्ही व्हाईट विनेगर एका बाऊलमध्ये घ्या. त्यामध्ये डिश वॉश घाला आणि अर्धा ग्लास पाणी (Cleaning Hacks) घालून हे मिश्रण एकत्र करा.आता हे मिश्रण स्पन्जने फॅनच्या ब्लेड वर लावा आणि हलक्या हाताने घासून घ्या. त्यानंतर स्वच्छ कापडाने पुसून घ्या.

UPI Payment : बँक खातं नसतानाही करता येणार UPI पेमेंट? काय आहे NPCI चा प्लॅन?

UPI Payment Without Bank Account

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याचे जग हे आधुनिक जग असून आजकाल पेमेंट सुद्धा ऑनलाईन पद्धतीने केलं जात आहे. UPI च्या माध्यमातून (UPI Payment) हे पेमेंट केलं जात. मात्र जास्तीत जास्त लोकांनी UPI चा वापर करावा यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) वेळोवेळी UPI पेमेंटमध्ये बदल करत असते. आताही असाच एक बदल करण्यात आला असून या नव्या बदलाचा फायदा ग्राहकांना होणार आहे. कारण इथून पुढे बँक खाते नसले तरी सुद्धा UPI पेमेंट करता येणार आहे. हे कस शक्य आहे? याचा फायदा कसा आणि कोणाला होणार? याबाबत अधिक माहिती आपण जाणून घेऊयात.

‘डेलिगेटेड पेमेंट सिस्टम- (UPI Payment)

सध्या, UPI वापरण्यासाठी तुमच्याकडे बँक खाते असणे आवश्यक आहे. तसेच तुमचा मोबाइल नंबर आणि आधार कार्ड एकमेकांना लिंक असायला पाहिजे असा नियम आहे. तरच तुम्ही UPI खाते तयार करू शकता आणि गुगल पे, फोनपे सारख्या काहीं ॲप्सच्या मदतीने डिजिटल पेमेंट करू शकता. पण NPCI या सेवेचा आणखी विस्तार करत आहे आणि ज्यांचे बँक खाते नाही ते देखील UPI चा वापरू शकतील. UPI मध्ये बदल करण्यामागे अनेक कारणे आहेत. यातील एक मोठे कारण म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे. ‘डेलिगेटेड पेमेंट सिस्टम’ असे या नव्या सिस्टीमचे नाव आहे. (UPI Payment)

या नवीन डेलीगेटेड पेमेंट सिस्टमच्या मदतीने, कुटुंबातील सदस्यांचे स्वतःचे बँक खाते नसले तरीही ते एकच UPI ​​अकाउंट वापरू शकतील. उदाहरणार्थ, जर कुटुंबातील एका सदस्याचे बँक खाते असेल आणि UPI सेवा त्यात ऍक्टिव्ह असेल, तर इतर लोक देखील त्यांच्या फोनवरून त्याच UPI खात्यातून पेमेंट करू शकतील. मात्र याठिकाणी ही गोष्ट लक्षात ठेवा कि हे फक्त बचत सेव्हिंग अकाउंट साठीच असेल, क्रेडिट कार्ड किंवा इतर कर्ज खात्यांसाठी नाही. तसेच ज्या व्यक्तीचे UPI खाते हे ती व्यक्ती हे सर्व पेमेंट कंट्रोल करेल आणि तो इतर लोकांना पेमेंट करू देऊ शकेल. NPCI ला आशा आहे की ही ग्राहकांना सेवा प्रदान दिल्यानंतर UPI पेमेंटमध्ये वाढ होऊ शकते. म्हणजेच काय तर जास्तीत जास्त लोक UPI पेमेंट वापरतील.