Monday, December 22, 2025
Home Blog Page 530

Gold Import | सोने होणार पुन्हा महाग; आयातीत झाली मोठी घट

Gold Import

Gold Import | भारतातील स्त्रियांना दागिन्यांची खूप आवड आहे. त्त्यातही सोन्या-चांदीचे दागिने महिलांना त्याचप्रमाणे पुरुषांना देखील खूप आवडतात. अनेक सण समारंभामध्ये सोन्याचे दागिने घालतात. त्याचप्रमाणे अनेक लोक गुंतवणूक म्हणून देखील सोने खरेदी करतात. अनेक सोन्याच्या वस्तू खरेदी करतात गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतींमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. कारण आता बाहेरील देशात करून भारतामध्ये जी सोन्याची आयात (Gold Import) होते. त्यामध्ये मोठ्या संख्येने घसरण झालेली आहे. एप्रिल, जुलै या महिन्यांमध्ये भारतात सोन्याची आयात ही 4.23% होती. परंतु आता ती घसरून 12.64 अब्ज डॉलर एवढी झालेली आहे. म्हणजेच आता सोन्याच्या आयातीमध्ये घसरण होताना दिसत आहे.

आपण जर 2023 मध्ये सोन्याचे आयात पाहिली तर याच कालावधीत ही आयात (Gold Import) 13.2 अब्ज डॉलर एवढी होती. भारत सगळ्यात जास्त स्विझरलँड या देशाकडून सोने खरेदी करतो म्हणजे भारतात जे एकूण सोने आहेत त्यातील जवळपास 40% हा स्विझर्लंडचा वाटा आहे.

जुलैमध्ये सोन्याच्या आयातीत घट | Gold Import

भारतामध्ये जुलै महिन्यात सोन्याचे आयात ही 10.65 टक्क्यांनी घसरून आता 3.13 अब्ज डॉलर एवढी झालेली आहे. मागील महिन्यात हीच आयात 3.5 अब्ज डॉलर एवढी होती जून महिन्यात ही – 38.66% एवढी होती आणि मे महिन्यात – 9.76% एवढी कमी झालेली आहे. एप्रिलमध्ये ही आयात 3.11 अब्ज डॉलर एवढी होती.

सोन्याची आयात का कमी झाली?

सध्या सोन्याच्या किमती जास्त प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे सोन्याची भारतात होणारी आयात देखील कमी झालेली आहे. सप्टेंबर महिन्यात भारतात अनेक सणासुदीचे दिवस असतात. त्यामुळे यामध्ये तेजी येण्याची शक्यता देखील आहे. त्यामुळे आयात शुल्कात कपातही फायदा होणार आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकारने सोने आणि चांदीचे आयात शुल्क देखील 15 टक्क्यांवरून 6 टक्के एवढे केलेले आहे.

सोन्याचा भाव काय आहे?

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमती देखील जास्त प्रमाणात वाढलेले आहे. 16 ऑगस्ट रोजी जर आपण पाहिले तर सोन्याचा भाव 300 रुपयांनी वाढून तो 71 हजार 700 रुपये प्रति तोळा एवढा आहे. भारतामध्ये सगळ्यात जास्त सोना हे स्वित्झर्लंडकडून आयात केले जाते. त्याचप्रमाणे संयुक्त अरबी अमिरातीकडून देखील 16% सोने आयात केले जाते, तर दक्षिण आफ्रिकामधून 10 टक्के सोने आयात केले जाते.

Credit Card | एक व्यक्ती किती क्रेडिट कार्ड वापरू शकतो? जाणून घ्या RBI चा नियम

Credit Card

Credit Card | आज-काल लोक क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डचा वापर सर्रास करतात. अनेक लोक हे जास्त करून क्रेडिट कार्डचा वापर करतात. काही लोकांकडे एक क्रेडिट कार्ड असते, तर काही लोकांकडे एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असते. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या क्रेडिट कार्डचा वापर केला जातो. ज्यामुळे त्यांचे रिव्हर्स पॉईंट्स देखील वाढतात. परंतु तुम्ही एका मर्यादित संख्येने स्वतःकडे क्रेडिट कार्ड ठेवू शकता का? आणि याबाबत रिझर्व बँक ऑफ इंडियाचे नक्की काय नियम आहेत? हे आज आपण जाणून घेणार आहोत.

खरंतर क्रेडिट कार्ड वापरण्याबाबत रिझर्व बॅंक बँकेचा कोणत्याही प्रकारचा नियम नाही. तुम्ही तुम्हाला हव्या तितके क्रेडिट कार्ड वापरू शकता. क्रेडिट कार्ड देण्यापूर्वी बँक तुमच्याकडे किती क्रेडिट कार्ड आहे? या सगळ्याचा वापर तुम्ही कशाप्रकारे करता? क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरले जात आहे की नाही? या सगळ्या गोष्टींची तपासणी करते. या सगळ्यात जर तुमची कमाई कमी असेल, तर तुम्हाला क्रेडिट कार्ड मिळणार नाही. पण तुमचे उत्पन्न चांगले असेल तर तुम्हाला अनेक बँका स्वतःहून क्रेडिट कार्ड ऑफर करतात.

तुम्ही एका वेळी आठ किंवा दहा क्रेडिट कार्ड (Credit Card) देखील वापरू शकता. अनेक लोक एकावेळी अनेक बँकांचे क्रेडिट कार्ड वापरतात. त्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या कार्डवर वेगवेगळ्या ऑफर देखील मिळतील.. आणि त्याचा फायदा तुम्हाला चांगल्या प्रकारे होईल. या सगळ्याचा विचार करूनच लोक एका पेक्षा जास्त क्रेडिट कार्ड ठेवतात.

त्याचप्रमाणे अनेक लोक बॅलन्स ट्रान्सफर करण्याची सुविधा म्हणजे एका कार्ड वरून दुसऱ्या कार्डवर पेमेंट करण्याची सुविधा देखील ठेवतात. त्यामुळे कधी कधी जास्त क्रेडिट कार्ड ठेवणे देखील हानिकारक असते. जर तुमच्याकडे जास्त क्रेडिट कार्ड असेल, तर तुमचा खर्च देखील जास्त होतो. त्यामुळे तुम्ही अगदी कमीत कमी क्रेडिट कार्ड ठेवा.

त्याचप्रमाणे जर तुमच्याकडे एकापेक्षा अधिक क्रेडिट कार्ड (Credit Card) असेल, तर कोणत्या कामासाठी किती खर्च करायचा आणि त्यासाठी कोणते क्रेडिट कार्ड वापरायचे या सगळ्याचा विचार तुम्ही आधीच करा. जसं सिनेमासाठी वेगळं क्रेडिट कार्ड वापरा, पेट्रोलसाठी वेगळं आणि शॉपिंगसाठी वेगळं, असे वेगवेगळे क्रेडिट कार्ड घेतलं, तर तुम्हाला त्यातून फायदा होईल त्यातून वेगवेगळे रीवार्ड पॉईंट्सदेखील मिळतील.

Electric Tractor : शेतकऱ्यांसाठी लाँच झाला Electric Tractor ; सिंगल चार्जवर 8 तास काम करणार

Electric Tractor AutoNxt X45

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या भारतात मागील काही वर्षांपासून इलेक्ट्रिक वाहनांची मागणी चांगलीच वाढली आहे. इलेक्ट्रिक स्कुटर, इलेक्ट्रिक बाईक, इलेक्ट्रिक कार तर आपण बघितली असेलच. पण आता मार्केट मध्ये इलेक्ट्रिक ट्रॅक्टर (Electric Tractor) सुद्धा लाँच झाला आहे. AutoNxt X45 असं या नव्या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचे नाव असून हा देशातील पहिलाच इलेक्ट्रिक ट्रॅक्टर असल्याचे बोललं जात आहे. या ट्रॅक्टरची खास बाब म्हणजे अवघे ३ तास फुल्ल चार्ज केल्यानंतर हा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर तब्बल ८ तास चालतोय. त्यामुळे शेतकऱ्यांचे पैसे वाचण्यास मदत होणार आहे. आज आपण या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचे खास फीचर्स जाणून घेणार आहोत.

35 KWHr क्षमतेचा बॅटरी पॅक- Electric Tractor

AutoNxt या कंपनीने देशातील पहिला इलेक्ट्रिक ट्रॅक्टर AutoNxt X45 बाजारात आणला असून या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरच्या लोकार्पण सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते. या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची सुरुवातीची किंमत 15.00 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. मात्र, त्यात इलेक्ट्रिक वाहनांवरील अनुदानाचा समावेश नाही. सबसिडी ही राज्यानुसार वेगवेगळी असेल. कंपनीचा दावा आहे कि, हा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर (Electric Tractor)शेतीचा खर्च कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. कंपनीने या इलेक्ट्रिक ट्रॅक्टर मध्ये 32 KW क्षमतेची इलेक्ट्रिक मोटर दिली आहे जी जास्तीत जास्त 45 HP पॉवर जनरेट करते. यात 35 KWHr क्षमतेचा बॅटरी पॅक आहे, जो एका चार्जवर सुमारे 8 एकर शेतजमिनीत 8 तास काम करू शकतो. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरच्या बॅटरीचे लाइफ सायकल 3000 आहे. म्हणजे त्याची बॅटरी साधारण 8 ते 10 वर्षे सहज टिकू शकते. परंतु हे सर्व ट्रॅक्टरवर असणारा लोड, त्याचा वापर यावर अवलंबून असेल.

10-15 टन लोड सहन करू शकतो-

हा ट्रॅक्टर चार्ज करण्यासाठी कंपनीने २ पर्याय दिले आहेत. घरगुती सॉकेट (15A) ला जोडून ते सहजपणे चार्ज केले जाऊ शकते. जर तुम्ही सिंगल फेजवर चार्ज केल्यास हा इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी अंदाजे 6 तास लागतील तर थ्री फेजवर चार्ज करण्यासाठी केवळ 3 तासांचा वेळ लागेल. AutoNxt X45 हा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर 10-15 टन लोड सहन करू शकतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते पूर्णपणे इलेक्ट्रिक आहे, त्यामुळे डिझेलवर खर्च होणाऱ्या पैशांची मोठी बचत होऊ शकते. ट्रॅक्टरच्या मेंटेनन्स साठी सुद्धा जास्त खर्च येणार नाही असा दावा कंपनीने केलाय.

PMPL : खुशखबर ! बसची वाट पाहायची गरज नाही मोबाईलवर येणार इत्यंभूत माहिती

PMPL : मुंबईनंतर झपाट्याने विकसित होणारे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे महत्वाचे शहर म्हणजे ‘पुणे’. शैक्षणीक, सांस्कृतिक आणि नोकरीसाठी सुद्धा पुण्याला मोठी पसंती आहे. शिवाय उत्तम रहिवासी ठिकाण म्हणून पुणे देशभर प्रचलित आहे.

अशा या पुण्यामध्ये सार्वजनिक वाहतूक सुविधेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते ती म्हणजे बस. मात्र अनेकदा बसची ताटकळत वाट पाहावी लागते, नवख्या माणसाला बस रूट आणि वेळा माहिती नसतात . पण आता PMPL ने प्रवास करायचा म्हणजे नो टेन्शन कारण PMPL कडून नवे ॲप लॉन्च करण्यात आले असून यामुळे PMPL चा प्रवास सुखकर होणार आहे.

पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड म्हणजेच पीएमपीएल (PMPL) कडून पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. PMPL कडून एक ॲप विकसित करण्यात आलं असून या ॲपमुळे पुणेकरांची मोठी सोय होणार आहे. या ॲप मध्ये असं काय आहे? तर या ॲप मध्ये सर्व बसेस संदर्भात शिवाय मेट्रोच्या तिकिटाची सुद्धा सुविधा मिळणार आहे. उद्यापासून म्हणजे येत्या 17 ऑगस्ट पासून हे ॲप सुरू होणार आहे. चला जाणून घेऊया याबद्दल…

मागच्या अनेक दिवसांपासून या ॲपची चर्चा होती. असं हे ‘आपली पीएमपीएल ‘ हे मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च करण्यात आले आहे. पुणेकरांना 17 ऑगस्ट पासून म्हणजेच उद्यापासून अँड्रॉइड डिव्हाइस वर या ॲपची सेवा सुरू करता येणार आहे.

या’ सुविधांचा समावेश (PMPL)

  • हे ॲप वापर करताना त्यांच्या ठिकाणापासून त्यांच्या इच्छित स्थळापर्यंतच्या सर्व बसमार्गांची माहिती देईल.
  • याबरोबरच या ॲपमध्ये मेट्रोचं तिकीट सुद्धा बुक करता येणार आहे.
  • या ॲपमध्ये लाईव्ह लोकेशनचे फीचर असणार आहे
  • याशिवाय ऑनलाइन तिकीट बुकिंग
  • यूपीआय पेमेंट सुद्धा या ॲपवरून करता येणार आहे.

दरम्यान पुणे मेट्रोला पुणेकरांची चांगलीच पसंती मिळताना दिसत आहे. पुणेकरांना (PMPL) आता स्वारगेट पर्यंत मेट्रो कधी सुरू होणार याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. मात्र लवकरच सिविल कोर्ट ते स्वारगेट पर्यंतचा मेट्रोच्या टप्प्याचे काम वेगाने पूर्ण होणार असून लवकरच पिंपरी चिंचवड मधील नागरिकांनाही स्वारगेट पर्यंत मेट्रोने प्रवास करता येणार आहे.

बच्चू कडू करणार दमदार बॅटिंग!! निवडणूक आयोगाकडून मिळालं “बॅट” हे चिन्ह

prahar janshakti party bat symbol

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्या प्रहार जनशक्ती संघटनेला निवडणूक आयोगाकडून बॅट (Bat Symbol) हे चिन्ह मिळालं आहे. त्यामुळे सध्याच्या राजकीय पटलावर बच्चू कडू जोरदार बॅटिंग करणार असं चित्र आहे. बच्चू कडू हे जरी महायुती मध्ये असले तरी शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, तसेच दिव्यांगबांधव या समाजातील तळागाळातील लोकांसाठी सातत्याने झटत असतात आणि त्यांच्या प्रश्नावरून आवाज उठवत असतात. आता हाच आवाज आगामी विधानसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्राला ऐकायला मिळणार आहे.

बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने राज्य सरकारच्या विरोधात ९ ऑगस्ट क्रांती दिनी छत्रपती संभाजीनगरमध्ये आक्रोश मोर्चा काढून सरकारला मोठा इशारा दिला होता. त्यांनी राज्यातील शेतकरी, दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, कामगारांच्या विविध मागण्या निवेदनाद्वारे सरकारपुढे मांडल्या. ५ सप्टेंबर पर्यंत मागण्या मान्य न झाल्यास २२ सप्टेंबर ला मुंबईत धडक देणार, असा इशारा यावेळी कडू यांनी दिला. आता बच्चू कडू विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज झाले असून त्यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाला निवडणूक आयोगाकडून बॅट हे चिन्ह देण्यात आलं आहे.

दिव्यांग बांधवाना बच्चू कडूंचा आधार-

राज्यातील दिव्यांग बांधवाना खऱ्या अर्थाने कोणाचा आधार वाटत असेल तर तो बच्चू कडू यांचा… महाराष्ट्राच्या पावन भूमीत दिव्यांग कल्याण मुद्दा कायम दुर्लक्षित व्हावा हे जरा भुवया उंचावणारं आहे पण याच बांधवांच्या कल्याणासाठी आपलं आयुष्य समर्पित करणारा माणूस म्हणजे बच्चूभाऊ कडू…. पुण्याच्या सरकारी कार्यालयात एका दिव्यांग बांधवांना मिळालेल्या दुय्यम वागणुकीने त्यांच हृदय ढवळून निघालं. आणि तिथूनच आरंभ झाला दिव्यांग बांधवाना त्यांचे हक्क मिळवून देण्याच्या निर्धाराचा. देहू ते वर्षां बंगला असं त्यांनी दिव्यांग बांधवांच प्रथम आंदोलन केलं. ज्याचं नाव होतं प्रहार अपंग क्रांती आंदोलन . विखूरलेल्या दिव्यांग बांधवांना बच्चूभाऊ कडू यांच्या रूपाने पहिले सक्षम नेतृत्व मिळाले.

त्यांच्या या आंदोलनाची दखल अखेर केंद्र सरकारलाही घ्यावी लागली. त्यांच्या आंदोलनाचं फलित म्हणजे 1995 साली संजय गांधी निराधार योजनेचा मासिक हप्ता 600 रुपयावरून 1000 रुपयांपर्यंत गेला. दिव्यांग बांधवासाठीचा 3% राखीव निधी 5% पर्यंत गेला. 1995 च्या अपंग पुनर्वसन कायद्याची कडक अंमलबजावणी सुरु झाली. ग्राम पंचायत, नगर परिषद, महानगरपालिका येथे 3% निधी, 3% गाळे वाटप, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 3% आरक्षण या सर्व हक्कांना नवसंजीवनी मिळाली. बच्चू भाऊंच्या या सर्व कार्याची पोचपावती म्हणजे महाराष्ट्र राज्य सरकारने स्थापन केलेलं दिव्यांग मंत्रालय होय. आजही बच्चूभाऊ कडू यांचा आवाज दिव्यांग बांधवासाठी महाराष्ट्र विधानसभेत घुमतो आहे

दरम्यान, काही दिवसांपूर्वी बच्चू कडू यांनी जेष्ठ नेते शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. मात्र आपण तकरी, शेतमजूर आणि दिव्यांगबांधव यांचे मुद्दे घेऊनच शरद पवारांना भेटलो. तूर्तास महायुती सोडून महाविकास आघाडीसोबत जाण्याचा कोणताही हेतू नाही असं बच्चू कडू यांनी त्यावेळी स्पष्ट केलं होते. मात्र शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांगबांधवांसाठी आम्ही काहीही करू असं म्हणत बच्चू कडू यांनी थेट महायुतीला इशाराही दिला होता. जो काही निर्णय असेल तो आम्ही १ सप्टेंबर नंतर जाहीर करू असं म्हणत बच्चू कडू यांनी राज्यातील महायुती सरकारला अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रातही राजकारण आणखी बदलण्याची शक्यता आहे.

Mpox Virus | Mpox विषाणूचा जगभर कहर; ही लक्षणे दिसताच त्वरित उपचार घ्या

Mpox Virus

Mpox Virus | तीन वर्षांपूर्वी कोरोना या विषाणूने संपूर्ण जगभर थैमान घातले होते. आता कुठे या विषाणूतून जग संपूर्णपणे सावरलेले दिसत आहे. परंतु कोरोना या विषाणूचा प्रभाव जरी कमी असला, तरी आता जगापुढे एक नवीन संकट उभे राहिले आहे. ते म्हणजे आता संपूर्ण जगामध्ये एमपॉक्स या विषाणूचे संकट आलेले आहे. जगातील जवळपास 116 देशांमध्ये एमपॉक्स (Mpox Virus) या विषाणूचा फैलव झालेला आहे. एमपॉक्सला मंकीपॉक्स देखील म्हणतात. सध्या या एमपॉक्स विषाणूचा कहर पाहता जागतिक आरोग्य संघटनेने आपत्कालीन स्थिती जाहीर केलेली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार हा जवळपास 1958 मध्ये हा विषाणू माकडांमध्ये सापडला होता आणि त्यानंतर हा विषाणू मानवामध्ये पसरू लागला.

भारतामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव किती आहे. हे आपण जाणून घेणार आहोत. सध्या भारतामध्ये या रोगाचा जास्त प्रादुर्भाव नाही, तरी जागतिक आरोग्य संघटनेने असे म्हटले आहे की, जानेवारी 2022 ते जून 2024 या दरम्यान एमपॉक्सची 27 प्रकरणे भारतात नोंदवली गेलेली आहे. आणि या विषाणूमुळे आतापर्यंत भारतात एका व्यक्तीचा मृत्यू देखील झालेला आहे. तज्ञांच्या म्हणण्यानुसार भारतात या विषाणूचा कोणताही धोका होण्याची शक्यता नाही. कारण त्यावर सध्या लस देखील उपलब्ध आहे. परंतु आंतरराष्ट्रीय विमानतळावर काटेकोर निरीक्षण करण्यास सांगितलेले आहे. जर तुम्ही वेळेवर या रोगाची लक्षणे ओळखली तर हा आजार नक्कीच नियंत्रित करता येतो.

एमपॉक्सची लक्षणे | Mpox Virus

एमपॉक्स या विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीची त्वचा लाल होते आणि दोन ते तीन आठवडे ती तशीच राहते. तसेच त्या रुग्णाला जास्त प्रमाणात ताप येतो, घसा खवखवतो, डोकेदुखी, स्नायू दुखी, पाठ दुखी आणि थकवा येत असतो.

जागतिक आरोग्य संघटनेने काय सांगितले

सध्या जगातील एमपॉक्स या विषाणूचा प्रादुर्भाव पाहता, जागतिक आरोग्य संघटनेने आपत्कालीन स्थिती जाहीर केलेली आहे. सध्या अनेक देशांमध्ये या एमपॉक्स रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. हा एक संसर्गजन्य आजार आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचे देखील सांगितलेले आहे.

मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करा, माझा पाठिंबा आहे; ठाकरेंचं काँग्रेस- राष्ट्रवादीला आवाहन

uddhav thackeray maha vikas aghadi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडीचा (Maha Vikas Aghadi) मुख्यमंत्री कोण हे आधी ठरवूया, शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण तुम्ही मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करा, माझा पाठिंबा आहे असं मोठं विधान शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलं आहे. कोणत्याही नेत्याची या पदासाठी निवड करावी, मी तयार आहे, असं आवाहन ठाकरेंनी काँग्रेस- राष्ट्रवादीला केलं आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आज महाविकास आघाडीचा संयुक्त मेळावा पार पडला. यावेळी आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदावरून थेट भाष्य केलं.

उद्धव ठाकरे म्हणाले, आपण आधी एक शपथ घेऊया किआपण महाराष्ट्राचं हित जपू,. उमेदवारी मिळाली नाही तरी चालेल. पण यांना झोपवू याची शपथ घ्या. आपल्यात काड्या घालणारे लोक आहेत जे महायुतीत बसलेत. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असा सवाल ते करत आहेत. मात्र मी आज सर्वांच्या समोर सांगतो, पृथ्वीराज चव्हाण, शरद पवार साहेब तुम्ही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा, माझा तुम्हाला पाठिंबा असेल. कारण मी माझ्यासाठी लढत नाही. मी महाराष्ट्रासाठी लढतो असं उद्धव ठाकरे म्हणाले. त्यामुळे आत्ताच मुख्यमंत्री कोण ते जाहीर करा असं आवाहन ठाकरेंनी काँग्रेस- राष्ट्रवादीला केलं. महाराष्ट्र झुकवण्याची कोणाची हिंमत होणार नाही. जो महाराष्ट्राला झुकवण्याचं काम करतो त्याला गाडून टाकतो हा इतिहास आहे असं म्हणत ठाकरेँनी भाजपला इशारा दिला.

ते पुढे म्हणाले, आम्ही ३० वर्ष भाजपसोबत युतीत होतो. भाजपाच्या युतीत असताना आम्ही जो अनुभव घेतला, त्या अनुभवाची पुनरावृत्ती आम्हाला नको. आमच्या युतीत जागा जाहीर व्हायच्या. बैठका व्हायच्या. त्या बैठकीचे हे ठरायचं कि ज्याच्या जागा जास्त येतील, त्याचा मुख्यमंत्री.. आणि हेच धोरण आम्ही एकमेकांच्या पायावर धोडे टाकण्यासाठी वापरायचो. कारण तुझ्या जागा जास्त आल्या तर तुझा मुख्यमंत्री होईल, म्हणून तुझी जागा मी पाडणार आणि माझ्या जागा तू पाडणार . त्यामुळे पाडापाडीच्या राजकारणात युतीला काहीही महत्त्व राहिलं नाही. त्यामुळे आधी मुख्यमंत्री कोण ते ठरवा आणि मग पुढे जाऊ असं आवाहन उद्धव ठाकरेंनी काँग्रेस- राष्ट्रवादीला केलं आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीची पहिल्यांदाच संयुक्त मेळावा होत आहे म्हणून यजमानपद स्वीकारुया असा मी विचार केला. या मेळाव्यात ओपनिंग बॅट्समॅनची भूमिका बजावुया असं मी ठरवलं. ओपनिंग बॅट्समनचं कसं असतं, चांगला स्कोअर केला तर केला नाहीतर विकेट फेकायची, बाकीचे प्लेअर आहेतच खेळणारे, त्यांची बॅटिंग बघू, असा माझा विचार होता, असे उद्धव ठाकरे मिश्किलपणे म्हणाले.

Mukhyamantri Ladaki Bahin Yojana | लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यासाठी बँक सीडींग स्टेटस महत्वाचे; अशाप्रकारे करा चेक

Mukhyamantri Ladaki Bahin Yojana

Mukhyamantri Ladaki Bahin Yojana | महाराष्ट्र सरकारने महिलांना केंद्रस्थानी ठेवून या विधानसभेच्या आधी अनेक योजना आणलेल्या आहेत. त्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात गाजत आहे. या योजनेचे अर्ज प्रक्रिया देखील गेल्या महिन्यांपासून सुरू झालेली आहे. नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये आर्थिक मदत केली जाणार आहे.

अनेक महिलांना 14 ऑगस्टपासून या योजनेचा लाभ द्यायला सुरुवात झालेली आहे. अनेक महिन्यांमध्ये जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे पैसे देखील जमा झालेले आहेत. 17 ऑगस्टपर्यंत सर्व पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे असे देखील सांगण्यात आलेले आहेत. परंतु अनेक महिलांना या योजनेचा लाभ देण्यामध्ये अडचणी निर्माण झालेले आहेत. अनेक महिलांचे आधार क्रमांक आणि त्यांचे बँक खाते एकमेकांची लिंक नसल्याने ही एक मोठी समस्या निर्माण झालेली आहे.

त्यामुळे तुम्ही जर या योजनेचा अर्ज केला असेल, तर तुम्हाला आता तुमचा आधार कार्ड तुमच्या बँक खात्याची लिंक आहे की नाही हे पाहणे खूप गरजेचे आहे. तसेच कोणते बँक खाते आधार कार्डची लिंक आहे. हे देखील माहिती असणे गरजेचे आहे. आता त्याची संपूर्ण प्रक्रिया आपण समजून घेऊया.

तुम्ही लाडकी बहीण योजनेचा अर्ज करताना त्या अर्जामध्ये बँकेचा खाते क्रमांक जो दिला आहे. तो तुमच्या आधार क्रमांक अशी लिंक आहे की नाही हे महत्त्वाचे आहे. तुमचे जर आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. तुम्ही जरी या योजनेसाठी पात्र असाल, तरी देखील तुम्हाला ही समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे तुमची बँक सीडींग स्टेटस जाणून घेणे आणि बँक खाते आधार क्रमांकला लिंक करणे खूप गरजेचे आहे.

अशाप्रकारे चेक करा बँक खाते आणि आधार क्रमांक लिंकचे स्टेटस | Mukhyamantri Ladaki Bahin Yojana

  • तुम्हाला जर बँक सीडींग स्टेटस टाक तपासायचे असेल, तर तुम्हाला युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
  • वेबसाईट ओपन झाल्यावर तुम्हाला हवी ती भाषा निवडायची आहे.
  • त्यानंतर तुम्हाला आधार सर्विस हा पर्याय दिसत आहे.
  • पर्यावर क्लिक करून तुम्हाला आधार लिंकिंग स्टेटस हा पर्याय दिसेल.
  • हा पर्याय दिसल्यावर तुम्हाला एक नवीन विंडो ओपन होईल.
  • त्यावर बँक शेडिंग स्टेटस हा पर्याय देखील दिसेल.
  • त्यानंतर त्या क्रमांकावर क्लिक करावे आणि तुमचा आधार क्रमांक आणि समोर दिलेल्या कॅपचा कोड टाकून लॉगिन करावे.
  • त्यानंतर आधार कार्ड सिलिंग असलेल्या तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येईल हा ओटीपी तुम्ही त्या वेबसाईटवर टाकावा त्यानंतर लॉगिन होईल.
  • यानंतर तुमचे बँक सीडींग स्टेटस या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्या आधार क्रमांकशी कोणते बँक खाते लिंक आहे हे देखील तुम्हाला लगेच समजेल.

कर्नाटक सरकारच्या महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या गृहलक्ष्मी योजनेला खीळ

gruhlaxmi yojana congress

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महायुती सरकारनं महिला सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली… खरंतर या योजनेला महाविकास आघाडीचा घटक असणाऱ्या काँग्रेसचा विरोध आहे… पण अगदी लाडक्या बहिणीसारखीच एक योजना काँग्रेस कर्नाटक मध्ये राबवतय… जीचं नाव आहे गृहलक्ष्मी योजना… अगदी कर्नाटक सरकारच्या योजनेप्रमाणेच लाडकी बहीण योजना देखील आहे… पण समसमान योजनेसाठी काँग्रेसने वेगवेगळी भूमिका घेतली… आणि आता त्यात मोठा गाजावाजा करत घोषणा केलेली महालक्ष्मी योजनाही वादात सापडली… नेमकं काय घडलंय? त्याचाच हा रिपोर्ट…

काँग्रेसने कर्नाटकातील आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात ज्या पाच मी दिल्या होत्या त्यातील एक महत्त्वाची हमी होती ती गृहलक्ष्मी योजनेची… राज्यातील महिलांना दरमहा दोन हजार रुपये देण्याची मदत करणारी ही योजना काँग्रेस सरकार निवडून आल्यावर सुरूही करण्यात आली… राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे यांसारख्या बड्या नेत्यांच्या हातून या योजनेचा शुभारंभ झाला… पण तब्बल तीन महिने उलटून गेले तरी कर्नाटकातील महिला लाभार्थ्यांना लक्ष्मी काही बघायला भेटलेली नाही… मागच्या वर्षी 15 ऑगस्ट ला सुरू करण्यात आलेल्या या योजनेचा काही अपवाद वगळता मे पर्यंत कार्यक्रम ठीकठाक सुरू होता… मात्र मागील तीन महिन्यांपासून हे पैसे न आल्यानं योजना बंद झाली की काय? अशी म्हणण्याची वेळ आता कर्नाटकातील महिला विचारू लागले आहेत… पण किमान सरकार दरबारी तरी योजना बंद झाल्याची… थकबाकी असल्याची.. कोणतीही नोंद नाही…

मुख्यमंत्री सिद्धरामय्या योजनेची रक्कम केवळ एका महिन्याची थकीत असल्याचे सांगतायत खरं, पण वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे… विधानसभा निवडणुकीत फक्त दोन वेळा योजनेचे पैसे आल्यानंतर पुन्हा सरकारने कोणतीही रक्कम जमा केलेली नाही, असं स्पष्ट म्हणणं महिला लाभार्थी मांडतायत… त्यामुळे या निमित्ताने काही मूलभूत प्रश्न आता पडतायेत, महाराष्ट्रात महायुती सरकारने आणलेल्या लाडकी बहीण योजनेला काँग्रेस एकीकडे विरोध करतेय… आवश्यकता वाटली म्हणून सुप्रीम कोर्टाचेही दरवाजे ठोकवण्याची तसदी काँग्रेसने घेतली… पण महिलांना पैसे देण्याच्या धर्तीवर काँग्रेसने हिमाचल प्रदेश आणि कर्नाटक मध्ये मात्र अशाच योजनेची घोषणा केली, त्याला मात्र विरोध नाही… यावरून काँग्रेसच्या दुटप्पी भूमिकेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ लागलय…

त्यामुळे महिला, वंचित, गरीब कल्याणासाठी, आम्ही आहोत, असं म्हणणाऱ्या काँग्रेससाठी , निवडणुकीआधी एक, आणि निवडणुकीनंतर एक… अशा घेतलेल्या स्टॅन्डमुळे , पक्षाला टीकेचं धनी बनावं लागणार… एवढं मात्र नक्की… म्हणूनच , महाराष्ट्रात महायुती सरकारने, अशाच काहीशा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला, काँग्रेसने केलेला विरोध, हा फक्त राजकीय भूमिका म्हणूनच घेतलाय, असा आरोपही , आता केला जातोय… त्यामुळे काँग्रेसने, महिलांसाठी घोषणा केली… आणि वाया गेली… असं म्हटलं , तर वावगं ठरणार नाही… बाकी तुम्हाला काय वाटतं? कर्नाटकातील काँग्रेसच्या महालक्ष्मी योजनेबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा…

Travel : मुंबईजवळ घ्या उटीचा फील ! विकेंडला प्लॅन करा जबरदस्त प्लॅन

Travel : राज्यभरात सध्या पावसाचा जोर ओसरला आहे. जुलै महिन्यात राज्यात दमदार पाऊस झाल्यामुळे सर्वत्र हिरवळ पसरली आहे. सध्या जोडून सुट्ट्या आल्यामुळे ततुम्ही देखील कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन करीत असाल तर एका अप्रतिम हिल स्टेशन बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. तुम्हाला तुमच्या पार्टनर सोबत क्वॅलिटी टाइम घालवायचा असेल तर हे ठिकाण उत्तम आहे. चला तर मग (Travel) जाणून घेऊया…

आम्हीं ज्या ठिकाणाबद्दल बोलत आहोत हे ठिकाण आहे माथेरान . मुंबई आणि पुण्यापासून हे ठिकाण जवळच आहे. त्यामुळे तुम्ही विकेंडला या ठिकाणाला आवर्जून भेट देऊ शकता. मुंबईहून हे ठिकाण अगदी १ तासाच्या अंतरावर आहे. पुण्याहून हे ठिकाण १२० किमी अंतरावर आहे.राज्यातील हे एक नावाजलेले हिल स्टेशन असून या ठिकाणी हजारो पर्यटक (Travel) भेट देतात.

रोचक इतिहास (Travel)

या ठिकाणाचा इतिहासही तेवढाच रोचक आहे. रायगड जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी ह्यू पॉइंट्झ मॅलेट यांनी मे १८५० मध्ये माथेरान चा शोध घेतला. मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड एल्फिन्स्टन यांनी भविष्यातील हिल स्टेशन म्हणून या ठिकाणाचा विकास केला. परदेशातून आलेल्या इंग्रजांना येथील उष्णतेचा त्रास होत असे म्हणूनच प्रादेशिक उष्णतेपासून वाचण्यासाठी ब्रिटिशांनी माथेरानचा विकास केला इंग्रज कुटुंबं येथे सुट्टी घालवण्यासाठी येत असत. स्वातंत्र्यसैनिक वीरभाई कोतवाल यांचेही हे जन्मस्थान (Travel) आहे.

माथेरानची टॉय ट्रेन (Travel)

येथील सदाबहार हिरवाई तुमचे मन मोहून टाकेल यात शंका नाही. सुंदर डोंगर दऱ्या, पावसाळ्यात प्रवाहीत होणारे धबधबे, आणि जमिनीवर येणारे ढग तुमहाला सुंदर निसर्गाची अनुभूती देऊन जातील यात शंका नाही. शिवाय येथे खूप औषधी वनस्पती आणि वन्यजीव सुद्धा आढळतात. येथील आणखी एक प्रमुख आकर्षण म्हणजे ‘माथेरानची टॉय ट्रेन’ हिलस्टेशन वरून धावणारी ही टॉय ट्रेन (Travel) येथील प्रमुख आकर्षण असून या ट्रेनमध्ये बसून आजूबाजूचा निसर्ग पाहणे म्हणजे एक अप्रतिम अनुभव…

किती येतो खर्च ? (Travel)

प्रवासाठी 500 रुपये तर निवास आणि खाण्यापिण्यासह साधारण २०००ते ३००० रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो. तुम्ही कोणत्या सोयी सुविधा निवडता यावर खरंच अवलंबून राहील.

येथील पाहण्यासारखी ठिकाणे

  • अलेक्झांडर पॉइंट
  • रामबाग पॉइंट
  • छोटा चौक पॉइंट
  • मोठा चौक पॉइंट
  • वन ट्री हिल पॉइंट
  • बेलवेडेअर पॉइंट
  • लॉर्ड्स पॉइंट
  • celia पॉईंट
  • इको पॉइंट
  • मंकी पॉइंट
  • पोर्क्युपिन पॉइंट (सेन्सेट पॉइंट म्हणूनही ओळखला जातो)
  • खंडाळा पॉइंट
  • माधवजी पॉइंट
  • लुईसा पॉइंट