Monday, December 22, 2025
Home Blog Page 532

Western Railway Bharti 2024 | पश्चिम रेल्वे मुंबई अंतर्गत मोठी भरती सुरु, अशाप्रकारे करा अर्ज

Western Railway Bharti 2024

Western Railway Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. जेणेकरून त्यांना देखील एक चांगली नोकरी मिळते. आणि घरबसल्या सगळ्या गोष्टींची माहिती मिळते. आज देखील आम्ही अशीच एका भरतीची माहिती घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता पश्चिम रेल्वे मुंबई (Western Railway Bharti 2024) एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत गट क आणि गट ड या पदाचा रिक्त जागा आहेत. या पदांच्या एकूण 64 रिक्त जागा आहेत. आणि त्या जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊन देखील अर्ज करू शकता. त्याचप्रमाणे 16 ऑगस्ट 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरू होईल. तसेच 14 सप्टेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदरच अर्ज करायचा आहे. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

महत्त्वाची माहिती | Western Railway Bharti 2024

  • पदाचे नाव – गट क, गट ड
  • पदसंख्या – 64 जागा
  • नोकरीचे ठिकाण – मुंबई
  • वयोमर्यादा – 18 ते 25 वर्ष
  • अर्ज शुल्क – 500 रुपये
  • अर्जपद्धती – ऑनलाइन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 16 ऑगस्ट 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 सप्टेंबर 2024

रिक्त पदे

गट क – 21 जागा
गट ड – 43 जागा

अर्ज कसा करावा ? | Western Railway Bharti 2024

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • आम्ही खाली एक लिंक देत आहोत. त्या लिंकवर क्लिक करून देखील तुम्ही अर्ज करू शकता
  • अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे.
  • 14 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या तारखे अगोदरच अर्ज करा.

पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

Ola Electric Bike Launched : Ola ने लाँच Electric Bike; किंमत फक्त 74,999 रुपये

Ola Electric Bike Launched

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील आघाडीची इलेक्ट्रिक टू-व्हीलर उत्पादक कंपनी ओला इलेक्ट्रिकने अखेर आपली पहिलीवहिली इलेक्ट्रिक बाईक बाजारात लाँच (Ola Electric Bike Launched) केली आहे. ओला रोडस्टर असं या बाईकचे नाव आहे. दिसायला अतिशय स्पोर्टी लूक देणारी ओला ची इलेक्ट्रिक बाईक अवघ्या 74,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आली आहे. रोडस्टर एक्स, रोडस्टर आणि रोडस्टर प्रो अशा एकूण तीन व्हेरियंटमध्ये ही बाईक बाजारात आली आहे. आजपर्यंत तुम्ही ओलाची इलेक्ट्रिक स्कुटर बघितली असेल, पण आता तुम्ही ओलाच्या इलेक्ट्रिक बाईकचा आनंद घेऊ शकतो. आज आपण आय बाईकचे संपूर्ण स्पेसिफिकेशन जाणून घेऊयात….

Ola Roadster X

ओला रोडस्टरमध्ये 2.5 kWh, 3.5 kWh आणि 4.5 kWh अशा ३ बॅटरी पॅकचा पर्याय आहे. ओलाचा दावा आहे की ही बाईक 124 kmph चा टॉप स्पीड देईल. या बाईकचा 4.5 kWh क्षमतेच्या बॅटरी पॅकच्या माध्यमातून ग्राहक 200 किलोमीटर पर्यंत अंतर सहज पार करू शकतात. या इलेक्ट्रिक बाईकची किंमत कंपनीने 74,999 रुपये ठेवली आहे. ओलाची हि सरावात स्वस्त इलेक्ट्रिक बाईक आहे.

Ola Roadster Ola Electric Bike Launched

ओला रोडस्टरमध्ये 3.5 kWh, 4.5 kWh आणि 6 kWh बॅटरी पॅकचा पर्याय आहे. एकदा फुल्ल चार्ज केल्ल्यानंतर हि बाईक तब्बल २४८ किलोमीटर अंतर प्रवास करू शकते असा कंपनीचा दावा आहे. गाडीचे टॉप स्पीड १९४ किलोमीटर प्रतितास आहे. एवढच नव्हे तर अवघ्या 2 सेकंदात 0 ते 40 किमी प्रतितास वेग पकडण्यास हि बाईक सक्षम आहे. या इलेक्ट्रिक बाईकची किंमत 1,04,999 रुपये आहे.

Ola Roadster Pro-

ओला रोडस्टर प्रो हे ओलाच्या इलेक्ट्रिक बाइकचे टॉपचे व्हेरिएंट आहे. या बाइकमध्ये 16 kWh क्षमतेचा बॅटरी पॅक आहे. कंपनीचा दावा आहे कि एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर ओलाचे टॉपचे व्हॅरिएन्ट तब्बल 579 किलोमीटर रेंज देऊ शकते. कंपनीने या बाइकमध्ये 4 रायडिंग मोड (हायपर, स्पोर्ट, नॉर्म आणि इको) आहेत. (Ola Electric Bike Launched)

ओला इलेक्ट्रिकचे संस्थापक आणि सीईओ भाविश अग्रवाल यांनी म्हंटल की, या सर्व बाईकचे बुकिंग अधिकृतपणे सुरू झाले आहे. हे कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून बुक केले जाऊ शकते. कंपनी रोडस्टर एक्स आणि रोडस्टरची डिलिव्हरी पुढील वर्षी जानेवारीपासून सुरू करण्याचा विचार करत आहे. तर, रोडस्टर प्रो साठी बुकिंग Q4 FY26 पासून सुरू होईल.

Ganeshotsav 2024 : गणेशभक्तांसाठी महत्त्वाची बातमी ! मंडळांच्या कार्यालयाचे भाडे होणार कमी

Ganeshotsav 2024 : अवघ्या महाराष्ट्राला ज्याची ओढ लागली आहे असा यंदाच्या वर्षीचा गणेशोत्सव येत्या ७ सप्टेंबर पासून सुरु होत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हा सण धुमधडाक्यात साजरा होतो. या दरम्यान अनेक सार्वजनिक मंडळांकडून गणपतीची स्थापना केली जाते शिवाय विविध कार्यक्रमही आखले जातात. मोठ्या गणेश मंडळांच्या बाबतीत राज्य शासनाकडून एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. चला (Ganeshotsav 2024) जाणून घेऊयात

वर्षभर कार्यक्रम राबवणाऱ्या मोठ्या गणेशोत्सव मंडळांना त्यांच्या कार्यालयाचं भाडं कमर्शियल दराप्रमाणे घेतलं जातं. ते रेसिडेन्शियल दराने घेण्यात यावं अशी मागणी या मंडळांकडून करण्यात आली होती. आता सरकारनं ही मागणी पूर्ण केली आहे. कार्यालयाचे भाडं हे कमर्शियल दराने घेतल्यामुळे मोठे (Ganeshotsav 2024) थकबाकी मंडळांच्या वर होती. शिवाय त्याच्यावरील व्याज रद्द करावा आणि भाड्याच्या रकमेमध्ये 50 टक्के कपात करावी अशी मागणी देखील करण्यात आली होती. याचबरोबर अग्निशामक दलाचे लाखो रुपयांचे भाडे मंडळाला भरावे लागत होते ते भाडे पूर्णपणे माफ करण्यात आल्याचे माहिती देखील मंत्री केसरकर यांनी दिली आहे.

घेतले जाणार महत्वपूर्ण निर्णय (Ganeshotsav 2024)

मूर्तिकारांच्या प्रश्नाबाबत बोलताना केसरकर यांनी सांगितले की मूर्तिकारांच्या प्रश्नावर सुद्धा चर्चा झाली. मूर्तिकारांना साहित्य सबसिडी योजना राबविण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे असे त्यांनी सांगितले.

लालबागचा राजा किंवा इतर मोठ्या मंडळाच्या आजूबाजूचे पार्किंग लॉट गणेशोत्सव काळामध्ये मोफत करण्यात येणार आहेत. (Ganeshotsav 2024) हा महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

याशिवाय केसरकर यांनी बोलताना सांगितले की पर्यावरण पूरक गणेशोत्सव कसा साजरा केला जाईल यासाठी विशेष पुढाकार (Ganeshotsav 2024) घेतला जाणार आहे.

याबरोबरच गणेशोत्सव काळामध्ये मुंबईच्या लोकल ट्रेन रात्रभर चालू ठेवण्याच्या सूचना रेल्वे मंत्रालयाला करणार आहोत असं केसरकर (Ganeshotsav 2024) यांनी सांगितलं

Cleaning Tips : हॉटेलच्या टॉवेलसारखे चमकतील घरचे टॉवेल ; साफ करण्यासाठी वापरा ‘या’ सोप्या टिप्स

Cleaning Tips : टॉवेल ही रोजच्या वापरातली गोष्ट आहे. टॉवेल ही अशी वस्तू आहे जी आपण रोजच्या रोज वापरत असतो आणि ती स्वच्छ ठेवायला हवी. पण बऱ्याचदा हे टॉवेल काळे कुट्ट झालेले असतात. शिवाय या टॉवेल्स ना डाग पडून अनेकदा दुर्गंधी यायला लागते. विशेषतः पावसाळ्यामध्ये टॉवेल चांगले वाळले नसल्यामुळे कुबट वास यायला लागतो. म्हणूनच आज आम्ही असे काही टिप्स तुम्हाला सांगणार (Cleaning Tips) आहोत ज्याच्यामुळे तुमचे टॉवेल हे हॉटेल मधल्या टॉवेल सारखे चकचकीत दिसतील

गरम पाणी (Cleaning Tips)

टॉवेल नेहमी गरम पाण्यात धुवावे. गरम पाणी घाण आणि बॅक्टेरिया सहजपणे काढून टाकते. एवढेच नाही तर कपडे लवकर स्वच्छ होतात.

ब्लिच (Cleaning Tips)

जर तुम्हाला पांढरे टॉवेल धुवायचे असतील तर त्यासाठी ब्लिच वापरा. हे टॉवेल चमकदार ठेवण्यास ब्लीच मदत करते. शिवाय त्यामुळे बॅक्टेरिया ही नष्ट होतात. पण जर टॉवेल रंगीत असतील तर कृपा करून ब्लिच वापरू नका. कारण यामुळे कलर जाण्याची शक्यता असते. तुम्हाला कलर टॉवेलला ब्लीच वापरायचे असेल तर कलर सेफ ब्लिच वापरण्याचा पर्याय सुद्धा उपलब्ध आहे.

व्हिनेगार

टॉवेल साफ केल्यानंतर शेवटी स्वच्छ धुण्यासाठी एक कप पांढरा व्हिनेगर घाला. व्हिनेगर टॉवेल (Cleaning Tips) मऊ करण्यास आणि कोणत्याही प्रकारचा वास जर येत असेल टॉवेलला तर तो काढून टाकण्यास मदत करते.

फॅब्रिक सॉफ्टनर

टॉवेल मऊ आणि जर तुम्हाला फ्रेश ठेवायचे असतील तर चांगल्या पद्धतीचं फॅब्रिक सॉफ्टनर वापरा (Cleaning Tips) आणि त्यामुळे तुमचे टॉवेल फ्रेश आणि कायम सुगंधित राहतील

टॉवेल चांगले कोरडे करा.

खरंतर टॉवेलचे कापड हे जाड असल्यामुळे अनेकदा टॉवेल नीटसे वाळले जात नाहीत. शिवाय पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तर टॉवेल चांगले वाळले जात नाहीत आणि त्यामुळे त्याला वास यायला लागतो. टॉवेल ड्रायर किंवा चांगल्या सूर्यप्रकाशामध्ये वाळवायला विसरू नका.

बेकिंग सोडा (Cleaning Tips)

तुम्ही टॉवेल स्वच्छ करत असताना एक कप बेकिंग सोडा घाला. त्यामुळे टॉवेलचा दुर्गंध दूर होण्यास मदत होईल.

Independence Day 2024 | भारतातील ‘या’ राज्यात साजरा केला जात नाही 15 ऑगस्ट, कारण जाणून वाटेल वाईट

Independence Day 2024

Independence Day 2024 | आज संपूर्ण भारत देश हा आपल्या 78 व्या स्वातंत्र्य दिनाच्या तयारीमध्ये मग्न झालेला आहे. संपूर्ण देशात मोठे उत्साहाचे वातावरण दिसत आहे. 15 ऑगस्ट हा दिवस हा एक राष्ट्रीय सण आहे. मोठ्या उत्साहात या सणाचे सेलिब्रेशन केले जाते. 78 वर्षांपूर्वी आपल्या देशाला इंग्रजांच्या जुलमी राजवटीतून मुक्त करण्यासाठी अनेक लोकांनी अहोती दिलेली आहे. आणि त्याच लोकांना आणि आपल्या तिरंग्याला आदरांजली वाहण्यासाठी संपूर्ण देशामध्ये हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. अगदी शांततेत आणि उत्साहाने हा सण साजरा केला जातो. परंतु आपल्या देशात असे एक राज्य आहे, ज्या देशात 15 ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिन (Independence Day 2024) साजरा केला जात.

पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या गोवा या राज्यांमध्ये 15 ऑगस्ट साजरा केला जात नाही. संपूर्ण देशात जरी या दिवशी उत्साहाचे वातावरण दिसत असले, तरी गोव्यात मात्र अत्यंत शांततेत हा दिवस जातो. कारण भारत स्वतंत्र झाल्यानंतरही गोवा हे राज्य पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली होते. याच गोव्यावर पोर्तुगीजांनी तब्बल 400 वर्षे राज्य केलेले आहे. त्या भारताला स्वातंत्र्य 1947 साली मिळाले. परंतु त्यानंतर 14 वर्षांनी म्हणजेच 1961 साली गोवा हा पोर्तुगीजांच्या राजवटीतून मुक्त झाला आणि त्यामुळेच 15 ऑगस्ट रोजी गोव्यात स्वातंत्र्य दिन साजरा केला जात नाही.

1510 रोजी पोर्तुगीजांनी गोव्यावर हल्ला केला आणि संपूर्ण गोवा त्यांच्या ताब्यात घेतलं. या लोकांनी अनेक वर्षे इथे राज्य केलं. भारताच्या स्वतंत्र नंतरही गोवा पोर्तुगीजांपासून मुक्त करण्यासाठी खूप प्रयत्न झाले. परंतु अनेक प्रयत्न यशस्वी झाले आणि पोर्तुगीजांनी प्रत्येक वेळी भारत सोडण्यास नकार दिला. कारण त्यांना भारतात त्यांचा व्यवसाय वाढवायचा होता.

गोवा हे राज्य मसाल्याच्या दृष्टीने खूप प्रसिद्ध आहे. या ठिकाणी वेलची, काळी मिरी, केसरच्या बागा आहेत. त्यामुळे व्यापाराच्या दृष्टिकोनातून हे राज्य अत्यंत महत्त्वाचे होते. त्यामुळे पोर्तुगीजांना या राज्यातून प्रचंड नफा कमवता आला. त्यांनी दीर्घकाळ गोव्यामध्ये त्यांचे वास्तव्य ठेवले. गोव्याला पोर्तुगीजांच्या ताब्यातुन मुक्त करण्यासाठी भारताने हवाई हल्ल्यासोबत लढाईसाठी देखील लष्कर तयार केले होते. आणि त्यानंतरच गोव्याला मुक्त करण्यामध्ये यश आले होते. 19 डिसेंबर 1961 रोजी गोवा हे पोर्तुगीजांच्या तावडीतून मुक्त झाले. त्यामुळे गोवा त्यांचा स्वातंत्र्य दिन हा 15 ऑगस्ट ऐवजी 19 डिसेंबर रोजी गोवा मुक्ती दीन म्हणून साजरा करतात.

Northern Railway Bharti 2024 | उत्तर रेल्वे अंतर्गत 4096 रिक्त पदांची भरती सुरु; 10 वी पास उमेवारही करू शकतात अर्ज

Northern Railway Bharti 2024

Northern Railway Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. त्यामुळे अनेक तरुणांना नोकरी मिळतात. आम्ही अगदी घरबसल्या नोकरीची सविस्तर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आज देखील आम्ही अशीच एक माहिती घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता उत्तर रेल्वेमध्ये (Northern Railway Bharti 2024) नोकरीची एक मोठी संधी आहे. उत्तर रेल्वे अंतर्गत शिकाऊ या पदांच्या पदाची भरती केली जाणार आहे. या पदाच्या तब्बल 4096 रिक्त जागा आहेत. आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्याचप्रमाणे 16 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी यासारख्या अगोदरच अर्ज करा. तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

महत्त्वाची माहिती | Northern Railway Bharti 2024

  • पदाचे नाव – शिकाऊ
  • पद संख्या – 4096 जागा
  • वयोमर्यादा – 18 ते 25 वर्ष
  • अर्धशुल्क – 100 रुपये
  • अर्ज पद्धती – ऑनलाइन
  • शैक्षणिक पात्रता – दहावी किंवा आयटीआय पास
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 सप्टेंबर 2024

अर्ज कसा करावा ?

  • या भरतीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.
  • 16 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.

पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

Viral Video | बसमध्ये खरंच भूत की आणखी काय? धक्कादायक व्हिडिओ आला समोर

Viral Video

Viral Video | सोशल मीडियावर आजकाल अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. या वायरल होणाऱ्या व्हिडिओमधूनच आपल्याला जगामध्ये काय चालले आहे. या सगळ्याची माहिती अगदी घरात बसून एका क्लिकवर मिळते. यातील काही व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचे माहिती देणारे असतात. तर काही व्हिडिओ अगदी गमतीसाठी तयार केलेले असतात. असाच एक व्हिडिओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. परंतु तो व्हिडिओ कितपत खरा आहे याबाबत लोकांच्या मनात शंका आहे.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओतील (Viral Video) बसमध्ये भूत असल्याचा दावा करण्यात आलेला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या मनात भीती देखील निर्माण झालेली आहे आणि हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरलेला आहे. परंतु या व्हिडिओमागे नक्की काय सत्य आहे हे आज आपण जाणून घेऊया.

व्हायरल होणारे या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, बसमध्ये काहीतरी विचित्र घडत आहे आणि त्या बसमधील प्रवाशांना याला भूत असे म्हटले आहे. त्याचप्रमाणे काहजण लोकांची फसवणूक केली जात आहे असे देखील म्हणत आहेत. लोकांच्या विविध प्रतिक्रिया या व्हिडिओवर येत आहेत. परंतु या व्हिडिओमध्ये खरंच भूत आहे का हे प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी तज्ञांनी देखील हा व्हिडिओ पूर्णपणे तपासलेला आहे.

https://www.instagram.com/reel/C-iMTKmSXld/?utm_source=ig_embed&ig_rid=33c58b5c-3f0b-45e2-a87e-69423ae5631a

त्यानंतर त्यांनी सांगितलेले आहे की, हा व्हिडिओ (Viral Video) फसवणूक करणारा असू शकतो. किंवा त्यामागे काही तांत्रिक कारणे देखील असू शकतात. काही वेळा प्रकाशाचा खेळ किंवा कॅमेराचा तंत्रज्ञानामुळे काही बिघाड झाला असेल, तर अशा घटना होऊ शकतात. यावर असे सांगण्यात आले आहे की, कॅमेराच्या तंत्रज्ञानामुळे प्रकाशाचे विचित्र परिवर्तन दिसते. त्यावेळी ते कधी कधी भूत असल्याचे आपल्याला भासते. त्यामुळे अशा व्हिडिओवर विश्वास ठेवू नका असे देखील सांगण्यात आलेले आहे.

या बाहेरून होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, संपूर्ण बस रिकामी आहे. बसच्या एका सीटवर एक पिशवी आणि पाण्याच्या बॉटल्स पडलेल्या आहेत. या व्यतिरिक्त त्या बसमध्ये कोणीही नाही. परंतु जेव्हा बस मधील सीसीटीव्ही फुटेज समोर तपासण्यात आले, तेव्हा त्या सीटवर एक माणूस बसलेला दिसत आहे. त्यामुळे सगळेजण या बसमध्ये भूत असल्याचा दावा करत आहे. परंतु तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे तंत्रज्ञानाच्या बिघाडामुळे देखील कधी कधी अशा घटना होतात.

Pune News: ठरलं तर मग ! सिंहगड रोडवरील उड्डाणपूल उद्या होणार खुला

Pune News: मुंबईनंतर राज्यातील सर्वात झपाट्याने विकसित होणाऱ्या पुणे शहराला सध्या वाहतूक कोंडीची मोठी समस्या भेडसावत आहे. मात्र आता पुणेकरांसाठी एक खुशखबर आहे. कारण सिंहगड रोडवरील उड्डाणपूलाचे अखेर उदघाटन होणार आहे. या पुलाच्या उद्घाटनासाठी अखेर मुहूर्त ठरला असून उद्या म्हणजेच 15 ऑगस्ट 2024 रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सकाळी सात वाजता या उड्डाण पुलाचे (Pune News) उद्घाटन होणार आहे.

दरम्यान मागच्या काही दिवसांपासून हा पूल तयार होता केवळ डांबराचा थर देणे बाकी होते. पुण्यामध्ये होणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक कोंडी पाहता पूल का खुला केला जात नाही ? याबाबत पुणेकरांना टिकीची झोड उठवली होती. मात्र अखेर हा पूल आता सुरू होत असून पुणेकरांची वाहतूक कोंडी (Pune News) मधून सुटका होणार आहे.

सिंहगड रोडवरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी राजाराम पूल ते फन टाइम थिएटर दरम्यान उड्डाणपूल बांधला जात आहे. यामध्ये राजारामपुरी चौकातील उड्डाण पुलाचे काम पूर्ण झालं आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून पावसाची (Pune News) संततधार सुरू होती. खाडी ओली असल्याने डांबराचा प्लांट बंद होता. पावसात 50 किलोमीटरचा डांबराचा थर मारल्यास रस्ता लगेच खराब होऊन खड्डे पडू शकतात. म्हणून हे काम केले जात नव्हते. शनिवारी डांबरीकरण (Pune News) करण्यात आले.

दरम्यान, काम पूर्ण होऊनही उद्घाटना अभावी उड्डाणपूल सुरू झालेला नाही. उडडाणपुलावरून वाहतूक सुरू करावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. तरीदेखील उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला केला जात नव्हता. मात्र अखेर आता उड्डाणपुलाच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरला आहे. त्यामुळे या पुलाचे लवकरच उद्घाटन (Pune News) केले जाणार असून हा पूल वाहतुकीसाठी खुला केला जाईल

Independence Day 2024 | घरातील तिरंग्यासोबत सेल्फी अपलोड करून मिळवा, हर घर तिरंगा सर्टिफिकेट

Independence Day 2024

Independence Day 2024 | आपला भारत देश स्वातंत्र्य झालेला उद्या म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी 78 वर्षे पूर्ण होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील संपूर्ण भारतात स्वातंत्र्य दिनाची(Independence Day 2024) जोरदार तयारी चालू आहे. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सगळ्या शाळा, कॉलेज, ऑफिस तसेच काही बिल्डिंगमध्ये देखील ध्वज फडकवून स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. या दिवशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण करतात. त्यामुळे प्रत्येक भारतीयसाठी हा दिवस खूप खास असतो. आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळून 78 वर्षे पूर्ण झालेले आहेत. आणि या दिवशी सगळ्यांनी एकत्र यावे यासाठी नरेंद्र मोदी यांनी एक मोहीम सुरू केली आहे. ती मोहीम म्हणजे हर घर तिरंगा मोहीम.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मोहिमेचा तिसरा टप्प्याला 9 ऑगस्टपासून सुरू केलेला आहे. ही मोहीम आता 15 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे. तिरंगाला आदरांजली वाहण्यासाठी भारतीय नागरिकांनी एकत्र यावे हा या योजने मागील उद्देश आहे. हर घर तिरंगा या मोहिमेचे हे तिसरे वर्ष आहे. 2022 मध्ये आपण सगळ्यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला. त्यानंतर ही मोहीम सुरू करण्यात आली.

प्रत्येक नागरिकांना त्यांच्या घरात ध्वजारोह तिरंगा लावण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. त्यामुळे तुम्ही उद्या म्हणजे स्वातंत्र्यदिनी (Independence Day 2024) तुमच्या घरात ध्वजारोह फडकवू शकता. आणि तुम्ही यासोबत एक सेल्फी देखील अपलोड करू शकता. तुम्ही तुमच्या घरातील तिरंग्यासोबत जर सेल्फी अपलोड केली, तर तुम्हाला हरकती रंगाच्या सर्टिफिकेट देखील मिळणार आहे. भारतीय नागरिकाला सांस्कृतिक मंत्रालयाने दिलेल्या प्रत्येक घरासाठी हर घर तिरंगा हे सर्टिफिकेट मिळू शकते. म्हणजेच या वर्षीचा तुमचा स्वातंत्र्य दिन आणखी खास होणार आहे.

सेल्फी अपलोड करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Rohit Sharma : रोहित शर्माची मोठी झेप!! वनडे रँकिंगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर

Rohit Sharma Ranking

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा कर्णधार आणि स्टार सलामीवीर रोहित शर्माने (Rohit Sharma) आयसीसी वनडे रँकिंग मध्ये (ICC One Day Ranking) मोठी झेप घेत दुसऱ्या क्रमांकावर उडी घेतली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत चमकदार कामगिरी करत रोहितने हा कारनामा केला आहे. आता रोहितच्या पुढे फक्त पाकिस्तानचा बाबर आझम आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे रोहित शर्मा सध्या ३७ वर्षाचा आहे, या वयात सुद्धा त्याने आपल्या कामगिरीत सातत्य राखत युवा खेळाडूंसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. रोहितनंतर तिसऱ्या क्रमांकावर शुभमन गिल आणि चौथ्या क्रमांकावर विराट कोहलीचा नंबर लागतोय.

श्रीलंका विरुद्धच्या मालिकेत जिथे विराट कोहलीसह संपूर्ण भारतीय संघ फिरकीपुढे चाचपडत होता अशा पिचवर रोहितने (Rohit Sharma) धमाकेदार बॅटिंग केली. पहिल्या सामन्यात रोहित शर्माने ५८ धावांची खेळी केली. त्यानंतर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने 64 धावा केल्या. यानंतर मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या वनडेत रोहितने ३५ धावांची खेळी केली. यात सुद्धा आश्चर्याची बाब म्हणजे रोहितने तब्बल 141.44 च्या स्ट्राइक रेटने या धावा केल्या होत्या. भलेही भारताने श्रीलंकेविरुद्धची सिरीज हारली असेल मात्र रोहितला त्याच्या देदीप्यमान कामगिरीचा आयसीसी रँकींगमध्ये मोठा फायदा झाला आणि शुभमन गिलला मागे टाकत तो क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर पोचला. ताज्या क्रमवारीनुसार शुबमन गिलचे ७६३ गुण आहेत तर रोहित शर्माचे ७६५ रेटिंग गुण आहेत. तर बाबर आझम 824 रेटिंग गुणांसह अग्रस्थानी आहे.

रोहितचा दमदार फॉर्म कायम – Rohit Sharma

रोहित शर्माचे वय जस जस वाढत आहे तस तस त्याचा खेळ आणखी उंचावत आहे. 2024 च्या T20 विश्वचषकापासून रोहित जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. समोर जलदगती गोलंदाज असो किंवा फिरकीपटू असो, आपल्या खास शैलीत रोहित समोरच्या गोलंदाजांचे वाभाडे काढत असतो. आत्ताही रोहित शर्मा (Rohit Sharma) हाच एकमेव फलंदाज आहे जो फुल्ल फॉर्मात आहे. रोहित शर्माने आतापर्यंत 265 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या 257 डावांमध्ये त्याने 49.16 च्या सरासरीने 10866 धावा केल्या आहेत. या कालावधीत हिटमॅनने 31 शतके आणि 57 अर्धशतके केली आहेत. त्याने तब्बल ३ वेळा एकाच डावात २०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये रोहितची सर्वोच्च धावसंख्या २६४ धावा आहे.