हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा कर्णधार आणि स्टार सलामीवीर रोहित शर्माने (Rohit Sharma) आयसीसी वनडे रँकिंग मध्ये (ICC One Day Ranking) मोठी झेप घेत दुसऱ्या क्रमांकावर उडी घेतली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत चमकदार कामगिरी करत रोहितने हा कारनामा केला आहे. आता रोहितच्या पुढे फक्त पाकिस्तानचा बाबर आझम आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे रोहित शर्मा सध्या ३७ वर्षाचा आहे, या वयात सुद्धा त्याने आपल्या कामगिरीत सातत्य राखत युवा खेळाडूंसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. रोहितनंतर तिसऱ्या क्रमांकावर शुभमन गिल आणि चौथ्या क्रमांकावर विराट कोहलीचा नंबर लागतोय.
श्रीलंका विरुद्धच्या मालिकेत जिथे विराट कोहलीसह संपूर्ण भारतीय संघ फिरकीपुढे चाचपडत होता अशा पिचवर रोहितने (Rohit Sharma) धमाकेदार बॅटिंग केली. पहिल्या सामन्यात रोहित शर्माने ५८ धावांची खेळी केली. त्यानंतर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने 64 धावा केल्या. यानंतर मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या वनडेत रोहितने ३५ धावांची खेळी केली. यात सुद्धा आश्चर्याची बाब म्हणजे रोहितने तब्बल 141.44 च्या स्ट्राइक रेटने या धावा केल्या होत्या. भलेही भारताने श्रीलंकेविरुद्धची सिरीज हारली असेल मात्र रोहितला त्याच्या देदीप्यमान कामगिरीचा आयसीसी रँकींगमध्ये मोठा फायदा झाला आणि शुभमन गिलला मागे टाकत तो क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर पोचला. ताज्या क्रमवारीनुसार शुबमन गिलचे ७६३ गुण आहेत तर रोहित शर्माचे ७६५ रेटिंग गुण आहेत. तर बाबर आझम 824 रेटिंग गुणांसह अग्रस्थानी आहे.
रोहितचा दमदार फॉर्म कायम – Rohit Sharma
रोहित शर्माचे वय जस जस वाढत आहे तस तस त्याचा खेळ आणखी उंचावत आहे. 2024 च्या T20 विश्वचषकापासून रोहित जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. समोर जलदगती गोलंदाज असो किंवा फिरकीपटू असो, आपल्या खास शैलीत रोहित समोरच्या गोलंदाजांचे वाभाडे काढत असतो. आत्ताही रोहित शर्मा (Rohit Sharma) हाच एकमेव फलंदाज आहे जो फुल्ल फॉर्मात आहे. रोहित शर्माने आतापर्यंत 265 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या 257 डावांमध्ये त्याने 49.16 च्या सरासरीने 10866 धावा केल्या आहेत. या कालावधीत हिटमॅनने 31 शतके आणि 57 अर्धशतके केली आहेत. त्याने तब्बल ३ वेळा एकाच डावात २०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये रोहितची सर्वोच्च धावसंख्या २६४ धावा आहे.
Railway News : देशभरामध्ये रेल्वेचे जाळे पसरवण्याचे काम सुरू आहे. ज्या मार्गावर रेल्वे अद्याप पोहोचली नाही तिथेही रेल्वे सुरू करण्याचा प्रत्यत्न शासनाकडून केला जात आहे. अशा रीतीने त्यांना नागपूर विभागाकडून सुरू असलेल्या एका कामाबाबत मध्य रेल्वेने अपडेट दिली आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने सेलू रोड स्थानकावर रविवारी नॉन इंटरलॉकिंगचं कठीण काम यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. त्यामुळे सेलू रोड स्थानकावर नॉन इंटरलॉकिंग च्या कामामुळे रेल्वेने एक मोठा टप्पा गाठला (Railway News) आहे.
रेल्वे विभागाला 44 किलोमीटरचा तिसरा व चौथा मार्ग कमी वेळेत पूर्ण करण्यासाठी टीम काम करीत होती. आता उर्वरित मार्गावरील काम हे मार्च 2025 पर्यंत पूर्ण करण्याची अपेक्षा (Railway News) आहे.
याबाबत माहिती देताना विभागीय (Railway News) रेल्वे व्यवस्थापक मनीष अग्रवाल यांनी सांगितले की नॉन इंटरलॉकिंग कामासाठी रेल्वे अंदाजे 250 कर्मचारी कार्यरत ठेवले. याशिवाय रात्रीच्या वेळी ट्रॅफिक ब्लॉक्सच्या वेळी सर्व नियोजित कामे वेळेच्या (Railway News) आत करण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी दिली. सेलू रोड स्थानकावरील काम पूर्ण झाल्यामुळे नागपूर वर्धा तिसरा आणि चौथा रेल्वे मार्ग पूर्ण करण्यासाठीचा एक महत्त्वाचा टप्पा गाठला असल्याची माहिती रेल्वेचे अधिकारी पुष्कर श्रीवास्तव यांनी दिली आहे.
या कामांचा समावेश
नॉन इंटरलॉकिंग कामासह, दोन नवीन लूप लाईन, एक साईडिंग, एक लांब पल्ल्याची लूप लाईन आणि गाड्यांच्या क्रॉस हालचालीसाठी 20 नवीन टर्न आऊट जोडल्या गेल्या आहेत. नॉन इंटरलॉकिंगच्या कामात सध्याच्या यार्डला जोडल्या गेल्या आहेत त्यामुळे रेल्वे वाहतूक सुधारणा करण्यासाठी मदत होणार आहे.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उद्या १५ ऑगस्ट, देशाचा स्वातंत्र्यदिन… त्यानिमित्ताने पोलीस, अग्निशमन दल, गृहरक्षक दल आणि नागरी संरक्षण आणि सुधारणा सेवांच्या एकूण 1037 जवानांची शौर्य आणि सेवा पदकांसाठी निवड करण्यात आली आहे. या सर्वाना 15 ऑगस्ट रोजी पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. गृह मंत्रालयाकडून याबाबतची यादी जाहीर करण्यात आली आहे. केंद्र सरकार दरवर्षी शूरवीरांना पदक देऊन त्यांचा सन्मान करत असते.
गृह मंत्रालयाने पदक मिळविणाऱ्यांची जी काही नावे जाहीर केली आहेत. त्यामध्ये एडीजी सुवेंद्र कुमार भागल, डीआयजी कल्पना सक्सेना, इन्स्पेक्टर सुगंधा उपाध्याय आणि उत्तर प्रदेशचे एसआय रामवीर सिंग यांना राष्ट्रपती पदके देण्यात येणार आहेत. यावेळी शौर्यासाठी राष्ट्रपती पदक (PMG) पदक 1, शौर्य पदक 213, विशिष्ट सेवेसाठी 94 जणांना राष्ट्रपती पदक तर गुणवान सेवेसाठी 729 जवानांना पदक देऊ सन्मानित करण्यात येणार आहे.
A list of Awardees of President's Medal for Distinguished Service/Medal for Meritorious Service on the occasion of Independence Day 2024. pic.twitter.com/OIBwBMwTdS
एकूण 213 शौर्य पदकांपैकी 208 पदके GM पोलीस कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. यामध्ये जम्मू-काश्मीर पोलिसांना सर्वाधिक 31, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राचे प्रत्येकी 17-17, छत्तीसगडचे 15 जवान, मध्य प्रदेशचे 12, झारखंड, पंजाब आणि तेलंगणाचे 07-07 जवान, सीआरपीएफ, एसएसबीचे 52 जवान. 14 कर्मचारी, 10 CISF कर्मचारी, 06 BSF कर्मचारी आणि उर्वरित पोलीस कर्मचारी इतर राज्ये/UTs आणि CAPF जवानांचा समावेश आहे.
विशिष्ट सेवेसाठी (PSM) 94 ज्यांना पदके जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक 75 पदके पोलीस सेवेसाठी जाहीर करण्यात आली आहे तर 8 अग्निशमन सेवेसाठी, 8 नागरी संरक्षण-होमगार्ड सेवेसाठी आणि 3 सुधारात्मक सेवेसाठी देण्यात आले आहेत. त्यानंतर गुणवंत सेवेसाठी (MSM) 729 पदकांपैकी 624 पदके पोलीस सेवेला, 47 अग्निशमन सेवेला, 47 नागरी संरक्षण आणि होमगार्ड सेवेसाठी आणि 11 सुधारात्मक सेवेला देण्यात आली आहेत.म्हणजेच या एकूण सर्व पदकांमध्ये पोलिसांनी बाजी मारल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे.
Mumbai Mhada : मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी स्वस्तात घरं उपलब्ध करून देण्यासाठी म्हाडा ही संस्था प्रचलित आहे. अनेक जण म्हाडाच्या लॉटरीची आतुरतेने वाट बघत असतात.
नुकतीच म्हाडाची मुंबई मंडळासाठीची सोडत जाहीर करण्यात आली असून 9 ऑगस्ट पासून याची अर्ज विक्री सुरू करण्यात आली आहे. म्हाडाची ही घर खरेदी करण्यासाठी तुम्ही संकेतस्थळावरून सुद्धा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. मात्र तुम्ही असे करत असाल तर थांबा ! कारण सध्या म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 2030 घरांच्या सोडतीसाठी बनावट संकेतस्थळ (Mumbai Mhada) तयार करून लोकांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याची बाब समोर आली आहे
म्हाडा कडून ऑनलाइन अर्ज करण्याची मुभा देण्यात आली असल्यामुळे आपण घरच्या घरी अर्ज करू शकता आणि याच कारणामुळे अनेक जण म्हाडाच्या मुंबई लॉटरीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याला प्राथमिकता देत आहेत. मात्र एक बनावट संकेतस्थळ सुद्धा तयार करण्यात आले असून याद्वारे फसवणुकीची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे मुंबई मंडळाच्या सोडतीची (Mumbai Mhada) इत्यंभूत माहिती या बनावट संकेतस्थळावर देण्यात आली असून अर्जाची अनामत रक्कमही या संकेतस्थळावरून अदा करून घेतली जात आहे. या प्रकरणाची गंभीर दखल प्राधिकरणाकडून घेण्यात आली असून अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
म्हाडाच्या मुंबई मंडळासाठी 9 ऑगस्ट पासून अर्ज विक्री आणि अर्ज स्वीकृती प्रक्रिया सुरू झाली आहे. (Mumbai Mhada) अशातच म्हाडाचे संकेतस्थळ संत गतीने सुरू असल्याने इच्छुक अर्जदारांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो आहे. त्यातच म्हाडाच्या सोडतीच्या संकेतस्थळाचे हुबेहूब बनावट संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. त्यामुळे या संकेतस्थळावरून अर्ज भरून घेतले जात आहेत इतकेच नव्हे तर अर्जाबरोबर अनामत रक्कमही भरून घेण्यात येत आहे. याबाबत मुंबई मंडळाकडे एक तक्रार आल्यानंतर हे सर्व प्रकरण समोर आले आहेत आणि या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे.
कसे ओळखाल बनवट संकेतस्थळ ? (Mumbai Mhada)
आता प्रश्न असा उरतो की बनावट संकेतस्थळ आणि म्हाडाचे खरे संकेतस्थळ हे कसे ओळखावे? तर म्हाडा प्राधिकरणाने mhada. Gov.in या अधिकृत संकेतस्थळावरच अर्ज आणि अनामत रक्कम भरावी असं आवाहन केलं आहे तर mhada. Org हे बनावट संकेतस्थळ असून अशा व इतर संकेतस्थळावर अर्ज भरू नये तसेच अनामत रक्कमही भरू नये असं आवाहन म्हाडा कडून (Mumbai Mhada) करण्यात आले आहे.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्वराज्याची पहिली राजधानी.. अस्सल गाव खेड्यातला कोकण ते दुसऱ्या टोकाला मुंबईत मिसळलेला रायगड जिल्हा… इथलं राजकारणही इथल्या दऱ्याखोऱ्यांसारखं किचकट, गुंतागुंतीच आणि समजून घ्यायला अवघड… अगदी चालू स्थितीबद्दल बोलायचं झालं तर रायगड जिल्ह्यातील सर्वच्या सर्व सात विधानसभा मतदारसंघावर महायुतीचा दबदबा आहे…तर महाविकास आघाडी शून्यावर आहे… नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे सगळे बुरुज ढासळले असले तरी रायगड आणि मावळ या दोन्ही मतदारसंघावर महायुतीच्याच उमेदवारांनी सरशी मारली… त्यामुळे अदिती तटकरे, भरतशेठ गोगावले, प्रशांत ठाकूर या राजकारण्यांपासून ते उरण, पेण आणि अलिबाग सारख्या अटीतटीच्या मतदारसंघात यंदा आमदार कोण होतोय? रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघाचा निकाल कसा लागतोय? आमदार कोण होतोय? तेच जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये…
यातला पहिला मतदारसंघ येतो तो कर्जतचा… 2019 ला राष्ट्रवादीच्या सुरेश लाड यांना धोबीपछाड देत शिवसेनेचे महेंद्र थोरवे आमदार झाले.. शिवसेनेच्या फुटीत शिंदे गटात सामील झाले… मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कर्जत विधानसभेतून ठाकरे गटाच्या उमेदवाराला लीड मिळाल्याने थोरवे यांची आमदारकी डेंजर झोनमध्ये आहे… त्यात अजित पवार गटाचे सुधाकर घारेही उमेदवारीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून असल्याने आमदार साहेबांचं टेन्शन वाढवलंय… त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर सुधाकर घारे तुतारी वाजवणार किंवा मशाल पेटवणार यावर इथलं पुढचं राजकारण स्पष्ट होईल.. पण सध्यातरी कर्जत – खालापूरचा कौल मविआच्या बाजूने आहे.. त्यात ठाकरे गटाकडून नितीन सावंत हे ही उमेदवारीच्या रिंगणात आहेच..
दुसरा मतदारसंघ आहे तो श्रीवर्धनचा…राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कन्या अदिती तटकरे या श्रीवर्धनच्या विद्यमान आमदार… शिवसेनेच्या विनोद घोसाळकर यांना तब्बल 38 हजार 783 मतांनी मात देत आदिती तटकरे निवडून आल्या… मंत्रीही झाल्या… सध्याच्या घडीला श्रीवर्धन मतदारसंघात तटकरे गट ऍक्टिव्ह आहे… म्हणूनच लोकसभेलाही पक्षफुटीचा फारसा इम्पॅक्ट न पडता श्रीवर्धनने महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी लीड दिलं… त्यामुळे सध्या तरी अदिती तटकरे यांच्या विरोधात तगडा प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीच्या बाजूने दिसत नाहीये… पण शरद पवारांनी ज्या काही मोजक्या मतदारसंघात तरुण फ्रेश चेहरे देण्याचा निर्धार केलाय… त्यात श्रीवर्धनचाही समावेश असल्याने आता शरद पवार प्लस उद्धव ठाकरे प्लस शेकाप यांनी काही मेखा टाकल्या तर अदिती तटकरे यांना कडवं आव्हान उभं राहू शकतं, एवढं मात्र नक्की…
तिसरा मतदारसंघ अलिबागचा… शेकापच्या सुभाष पाटील यांना तब्बल 32 हजार 924 मतांनी बॅक फुटला टाकत शिवसेनेच्या महेंद्र दळवी यांनी आमदारकी खेचून आणली… अर्थात जिल्ह्यातील सर्वच आमदारांप्रमाणे दळवीदेखील शिवसेनेच्या फुटीत शिंदें सोबत गेले… शेतकरी कामगार पक्षाशी हाडवैर असणारे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांशी पंगा घेणारे आमदार म्हणून दळवींची ओळख… नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही अलिबागने महायुतीच्या बाजूने कौल दिल्याने दळवी यांची आमदारकी सेफ झोन मध्ये आहे, असं म्हणायला हरकत नाही… मात्र भाजपा जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोईर यांनीही उमेदवारीसाठी दंड थोपटल्याने महायुतीत अलिबागसाठी जागा वाटपाचा तिढा वाढू शकतो… दुसऱ्या बाजूला शेकापकडून चित्रलेखा पाटील, माजी आमदार पंडित पाटील, एडवोकेट. आस्वाद पाटील इच्छुक आहेत… काँग्रेसकडूनही प्रदेश सचिव एडवोकेट. प्रवीण ठाकूर यांनी उमेदवारीची मागणी केली आहे… मात्र शिंदे गटाच्या महेंद्र दळवी विरुद्ध कोण? यावर आत्ताच स्पष्ट बोलणं थोडसं चुकीचं ठरेल…
चौथा मतदारसंघ पेणचा…भाजपचे रवीशेठ पाटील पेणचे विद्यमान आमदार… शेतकरी कामगार पक्षाच्या धैर्यशील पाटील यांचा पराभव करत त्यांनी आमदारकी खेचून आणली होती… तसं पाहायला गेलं तर 40 वर्ष हा मतदारसंघ शेकापचा अभेद्य बालेकिल्ला होता… पण गतवर्षीच्या विधानसभा निवडणुकीत शेकाप 24 हजार मतांनी पिछाडीवर फेकली गेली… त्यामुळे आपलं वर्चस्व पुन्हा सिद्ध करण्याचं आव्हान शेकाप समोर असणार आहे.. त्यातही धैर्यशील पाटील भाजपवासी झाल्याने मतदार संघातील महायुतीची ताकद चांगलीच वाढली आहे.. लोकसभेला धैर्यशील पाटील यांनी दोन पावलं मागे घेतल्याने येणाऱ्या विधानसभेला कुणाला तिकडे द्यायचं? याचं मोठं संकट भाजप समोर असणार आहे…
पाचवा मतदारसंघ उरणचा…2019 ला अपक्ष म्हणून निवडून आलेले महेश बालदी यांनी निवडून आल्यानंतर भाजपला पाठिंबा दिला… त्यामुळे येणाऱ्या विधानसभेला ते भाजपच्या तिकिटावरून निवडणूक लढवण्याची दाट शक्यता आहे… मात्र नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवाराला 13 हजारांचं जबरी लीड मिळाल्यामुळे इथे मविआतून लढत देण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी झालीये… मात्र, विधान परिषदेच्या निकालानंतर मविआमध्येही मतभेदाचे वारे वाहू लागले आहेत. विधान परिषद निवडणुकीत जयंत पाटील यांच्या पराभवाला उद्धव ठाकरे हेच जबाबदार आहेत अशा प्रतिक्रिया उघडपणे उरण, पेण पट्टयातील शेतकरी कामगार पक्षाचे नेते देऊ लागले आहेत. काहीही झाले तरी उरणमध्ये उद्धव सेनेला साथ द्यायची नाही आणि स्वतंत्रपणे निवडणूक लढवायची अशी भाषा आता शेकापचे नेते करू लागले आहेत… त्यामुळे ही सगळी स्थिती विद्यमान आमदार बालदी यांच्याच पथ्यावर पडण्याचे चांसेंस जास्त आहेत… सध्या तरी उरण मतदारसंघातून ठाकरे गटाचे माजी आमदार मनोहर भोईर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, शेकापचे राजेंद्र पाटील यांनी तयारी सुरू केली आहे…
सहावा मतदारसंघ पनवेलचा…भाजपचे प्रशांत ठाकूर हे पनवेल विधानसभेचे विद्यमान आमदार… 2019 ला शेकापच्या हरेश केनी यांचा तब्बल 92 हजार 730 मतांनी एकहाती धुव्वा उडवत आमदारकी खेचून आणली होती… या मतदारसंघात आजही ठाकूर कुटुंबाचं वर्चस्व आहे… त्यामुळे येणाऱ्या निवडणूकीतही ठाकूर यांच्यासाठी चौथ्यांदा घोडामैदान सोपं असेल…मात्र आघाडीकडून बाळाराम पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला तर काट्याने काटा काढावा अशी लढत होऊ शकते…
सातवा आणि शेवटचा मतदारसंघ आहे तो महाडचा…2009 साली महाड मतदारसंघातून शिवसेनेनं भरत गोगावलेंनी तिकीट दिलं आणि ते जिंकलेही. 2009 नंतर 2014 आणि 2019 अशा सलग तीन वेळा भरत गोगावले यांनी महाडची आमदारकी एकहाती जिंकत हॅट्रिक साधली… माणिकराव जगताप यांनी प्रत्येक वेळेस कडवी झुंज दिली.. पण ती अपयशी ठरली… दरम्यानच्या काळात माणिकराव जगताप यांच्या निधनानंतर महाडमध्ये गोगावलेंना म्हणावा असा कडवा प्रतिस्पर्धी उरला नाही… पण शिवसेनेत फूट पडणं… गोगावले शिंदे गटात जाणं… यामुळे महाड मधील शिवसेना दुभंगली… गोगावलेंची ताकद कमी झाली… लोकसभा निवडणुकीत तर त्याचे दृश्य परिणाम दिसून आले… महाड मधून महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना गोगावले अवघ तीन हजाराचं निसटत लीड देण्यात काठावर पास झाले… त्यात जगतापांची कन्या स्नेहल जगताप यांनी आमदारकीचं मैदान तापवल्याने जगताप विरुद्ध गोगावले अशी महाडमध्ये घासून लढत होऊ शकते…तर असा होता रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांचा येणाऱ्या निवडणुकीतला सविस्तर राजकीय आढावा… बाकी या मतदारसंघात कोण निवडून येईल? तुमचा कौल कुणाला? ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा..
Indian Railway : भारतामध्ये रेल्वेचे मोठे नेटवर्क आहे. सध्या असलेल्या गाड्यांसोबतच आता नव्या गाड्या सुद्धा भारतीय रेल्वेकडून आणण्याचा प्रयत्न होत आहे. त्यातही स्वदेशी बनावटीची ‘वंदे भारत एक्सप्रेस’ भारतीय प्रवाशांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. मात्र वंदे भारत एक्सप्रेस बाबत एका महत्त्वाची अपडेट हाती आली असून एका कारणामुळे या रेल्वे गाड्यांचे तीस हजार कोटींचे टेंडर रद्द करण्यात आले (Indian Railway) आहे. चला जाणून घेऊया याबाबत …
भारतीय रेल्वेने 100 वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांची निविदा रद्द केली आहे. महागड्या दरामुळे रेल्वेने ही निविदा रद्द केल्याची माहिती आहे. 100 वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांचे बांधकाम आणि देखभाल करण्यासाठी रेल्वेने 30 हजार कोटी रुपयांची निविदा काढली होती. अल्स्टॉम इंडिया या फ्रेंच कंपनीने या प्रकल्पासाठी सर्वात कमी किंमत सांगितली (Indian Railway) होती.
रेल्वेला प्रति ट्रेन 140 कोटी रुपयांचा करार (Indian Railway)
फ्रेंच MNC Alstom India MD Olivier Loison यांनी एका माध्यमाशी बोलताना सांगितले की आम्ही प्रत्येक ट्रेन तयार करण्यासाठी 150.9 कोटी रुपयांची किंमत ठेवली आहे. पण, रेल्वेला हा करार 140 कोटी रुपये प्रति ट्रेनमध्ये करायचा होता.अल्स्टॉम व्यतिरिक्त स्विस कंपनी स्टॅडलर रेल आणि हैदराबादच्या मेधा सर्वो ड्राईव्ह्सनेही या निविदेसाठी बोली लावली होती. आता या प्रकल्पासाठी रेल्वे नवीन निविदा काढू शकते. निविदा जिंकणाऱ्या कंपनीला 7 वर्षांत 100 ॲल्युमिनियम गाड्या बनवायच्या होत्या. ॲल्युमिनियमपासून बनवलेल्या गाड्या केवळ हलक्याच (Indian Railway) नाहीत तर कमी ऊर्जा वापरणाऱ्याही असतात. मात्र, आतापर्यंत या निविदेबाबत रेल्वेने कोणतेही निवेदन जारी केलेले नाही.
यापूर्वीची निविदा 120 कोटी रुपये प्रति ट्रेन (Indian Railway)
ऑलिव्हियर लॉयसन यांनी सांगितले की, आम्ही भारत सरकारला पाठिंबा देत राहू. यापूर्वी 200 वंदे भारत एक्स्प्रेस बनवण्याची निविदा प्रति ट्रेन 120 कोटी रुपये दराने देण्यात आली होती. ते सर्व स्टीलचे बनलेले होते. आम्ही आमच्या बाजूने योग्य किंमत सांगितली होती. या गाड्या ताशी 220 किमी वेगाने सक्षम बनवल्या जाणार होत्या. आम्ही स्वावलंबी भारत मिशन अंतर्गत पुरवठा साखळीची स्थानिक प्रणाली (Indian Railway) देखील विकसित करणार आहोत.
या निविदेसाठी किमान ५ कंपन्या पुढे येतील अशी भारतीय रेल्वेला अपेक्षा होती. मात्र, अनेक कंपन्या तांत्रिक फेरीत बाद झाल्या. कंपन्यांना प्रोटोटाइप बनवण्यासाठी आणि दरवर्षी 5 जोड्या गाड्या वितरीत करण्यासाठी R&D सुविधा पुरवायची होती. टेंडर जिंकणाऱ्या कंपनीला ट्रेनच्या डिलिव्हरीसाठी १३ हजार कोटी रुपये आणि उर्वरित १७ हजार कोटी रुपये ३५ वर्षांच्या देखभालीच्या नावावर देण्यात आले असते.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपली पृथ्वी त्याचप्रमाणे अंतराळाबाबत देखील अनेक लोकांनी विविध दावे केलेले आहेत. यासोबतच एलियन बाबत देखील अनेक दावे करण्यात आलेले आहे. अशातच आता एक नवा दावा अमेरिकेचे UFO प्रचारक स्टीव्ह बॅसेट यांनी केलेला आहे. त्यांच्यामध्ये कॅथलिक चर्च यांना गेल्या अनेक वर्षापासून UFO बद्दल संपूर्ण माहिती आहे. परंतु त्यांनी ती माहिती लपवून ठेवलेली आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे जर त्यांचा तपास केला तर त्यांच्याकडे दोषी असल्याचे कागदपत्र सापडतील.
माध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीत स्टीव्ह यांनी सांगितले आहे की, चर्चमधील धार्मिक चित्रे ही एलियन्सचे अस्तित्व दाखवतात. कॅथलिक चर्चला देखील या सगळ्याबद्दलची माहिती गेल्या शेकडो वर्षापासून होती. त्याचप्रमाणे त्यांनी केलेल्या दाव्यानुसार 1933 मध्ये पृथ्वीवर जे यान कोसळले त्यातून किमान दहा एलियन्स हे पृथ्वीवर आढळलेले आहे. आणि 11933 मध्येच UFO चा शोध लागलेला आहे.
अमेरिकन सरकारकडेही माहिती होती
अमेरिकेचे माजी हवाई दल अधिकारी डेव्हिड ग्रुश यांनी गेल्या वर्षी दावा केला होता की, अमेरिकेकडे UFO चे तुकडे आहेत. बॅसेट म्हणाले की आतापर्यंतचे पुरावे माफक आहेत. ग्रुशच्या दाव्यांची चौकशी करणे आवश्यक आहे. तपास केला तर हे उघड होईल की अमेरिकन सरकारला एलियन्सचे अस्तित्व 1947 च्या रोझवेल घटनेच्या खूप आधीपासून माहीत होते.
स्टीव्ह बॅसेटच्या दाव्यानंतर, तज्ञ व्हॅटिकनच्या अभिलेखागारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांना हजारो वर्षांच्या रेकॉर्डमध्ये प्रवेश करण्यासाठी होली सी या चर्चच्या सर्वोच्च प्रशासकीय मंडळाकडून परवानगी घ्यावी लागेल. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष एलियन्सच्या अस्तित्वाचा औपचारिक खुलासा करेपर्यंत चर्च संशोधकांना आत जाऊ देणार नाही, असे सांगितले आहे.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे विचार घेऊन पुढे जात आहेत असं म्हणत प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केल्यानंतर आज खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर पलटवार केला आहे. प्रकाश आंबेडकरांना जर याचे भान असते तर त्यांनी अशाप्रकारचे वक्तव्य केले नसते, रामदास आठवले हे सुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रमाणे देशात काम करत आहेत. मग आम्ही आठवलेंना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारा, संघटना याचे खरे वारसदार मानायचं का? असा सवालही राऊतांनी केला. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, प्रकाश आंबेडकर हे आंबडेकर आहेत. आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आजही मानतो. या देशावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार आहेत. प्रकाश आंबेडकरांना जर याचे भान असते तर त्यांनी अशाप्रकारचे वक्तव्य केले नसते. रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे, राजेंद्र गवई हे सर्व आंबेडकरांच्या खरे वारसदार आणि विचारधारेचे शिलेदार आहेत, असं जर आम्ही म्हणालो तर त्यात चुकीचे काहीही नाही. गेली अनेक वर्ष रामदास आठवले या महाराष्ट्रात आंबेडकरांचा विचार पुढे नेत आहेत. अनेक वर्ष ते सत्तेत आहेत. काम करतायत. त्यांचे सर्वांशीच सलोख्याचे संबंध आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर देशात ज्या पद्धतीने काम करत होते, त्यापद्धतीनेच रामदास आठवले हे काम करत आहेत. याचा अर्थ आम्ही असं म्हणायच का? कि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारा, संघटना याचे खरे वारसदार आहेत. त्यामुळे माणसाने जर ज्ञान असेल तर त्या ज्ञानाचा मान राखून बोललं पाहिजे अशा शब्दांत राऊतांनी प्रकाश आंबेडकरांना सुनावले.
संजय राऊत पुढे म्हणाले, प्रकाश आंबडेकर हे आमच्यासोबत येण्याचा प्रयत्न करत होते. ते महाविकासआघाडीचे घटक होते. लोकसभेत आम्ही त्यांना अकोल्यासह ७ जागा देऊ केल्या होत्या. तरीही ते त्यांच्या बाजूला वळले, ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आणि भूमिकेचा विचार अजिबात करत नाहीत असं राऊत म्हणाले. या महाराष्ट्रात दोन असे नेते आहेत, जे अशाप्रकारे हस्तकाचे काम करतात. कधी मोदी-शाहांना पाठिंबा देतात, कधी बेईमान शिंदे गटाला पाठिंबा देतात, हे दोन महाराष्ट्रातील जे नेते आहेत. त्यांच्यावर आता महाराष्ट्राला विचार करण्याची वेळ आली. लोकसभेत यांचं कोणी ऐकलं नाही. पाडापाडी करणं आणि त्या बदल्यामध्ये व्यवहार करणं हे या २ नेत्यांचं काम आहे. आपण सर्वांनी एकत्र येऊन या धर्मांध शक्तींना, महाराष्ट्रद्रोही शक्तींना धडा शिकवायला हवा. या हस्तकांनी संपूर्ण देशात निवडणुका लढवाव्यात, उमेदवार उभे करावे म्हणजे त्यांना जास्त पैसे मिळतील. असं म्हणत संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यासह राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या स्वस्त मोबाईल साठी ओळखल्या जाणाऱ्या itel कंपनीने भारतीय बाजारात A50 सिरीज अंतर्गत आणखी २ कमी पैशातील स्मार्टफोन बाजारात आणले आहेत. itel A50 आणि A50C असं या दोन्ही मोबाईलची किंमत असून त्याची सुरुवातीची किंमत अवघी 5599 रुपये आहे. किंमत कमी असली तरी यामध्ये अनेक भन्नाट फीचर्स मिळतात. आज आपण या दोन्ही स्मार्टफोनचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमत याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया….
itel A50 चे फीचर्स –
itel A50 मध्ये 60Hz रिफ्रेश रेट 6.6-इंचाचा HD+IPS डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला 720 x 1612 पिक्सल रिझोल्युशनचा सपोर्ट मिळतो. स्मार्टफोनमध्ये 3GB आणि 4 GB रॅमचा पर्याय मिळत असून 64GB स्टोरेज आहे. itel A50 मध्ये कंपनीने Unisock चा T603 प्रोसेसर बसवला असून हा मोबाईल Android 14 Go एडिशनवर काम करतो. मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, स्मार्टफोनमध्ये 8MP AI कॅमेरा देण्यात आला असून सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला ५ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी itel A50 मध्ये 5 हजार mAh बॅटरी बसवण्यात आली असून हि बॅटरी टाइप-सी चार्जिंग पोर्टच्या मदतीने तुम्ही चार्ज करू शकता. हा स्मार्टफोन काळा, निळा, सोनेरी आणि हिरव्या रंगात लाँच करण्यात आला असून त्याची किंमत 6,499 रुपयांपासून सुरू होते.
itel A50C चे फीचर्स-
itel A50C मध्ये 720 x 1612 पिक्सल रिझोल्युशनसह 6.6-इंचाचा IPS डिस्प्ले देण्यात आला आहे. मोबाईल मध्ये Unisoc T603 प्रोसेसरबसवण्यात आला असून हा स्मार्टफोन सुद्धा ते Android 14 Go एडिशनवर काम करतो. itel च्या मोबाईल मध्ये 2 जीबी रॅम आणि 32जीबी इंटर्नल स्टोरेज देण्यात आलं आहे. मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, itel A50C मध्ये 8 MP चा ड्युअल रियर कॅमेरा आहे. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉल साठी समोरील बाजूला 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी itel A50C मध्ये 4 हजार mAh बॅटरी बसवण्यात आली असून हि बॅटरी टाइप-सी चार्जिंगला सपोर्ट करते. itel A50C मोबाईल ब्लॅक, ब्लू, गोल्डन आणि ग्रीन कलरमध्ये लाँच कऱण्यात आला असून त्याची सुरुवातीची किंमत 5599 रुपयांपासून सुरू होते.
BOB FD Rate | भविष्याच्या दृष्टिकोनातून लोक आपल्या मुलांसाठी त्याचप्रमाणे आपले निवृत्तीनंतरच्या आयुष्य सुखात जावे. यासाठी आजच काही ना काही बचत करत असतात. मार्केटमध्ये अनेक सुविधा उपलब्ध असतानाही अनेक लोक आजही बँकांच्या एफडीमध्ये गुंतवणूक करतात. कारण बँकांची FD ही त्यांना अत्यंत सुरक्षित आणि चांगली परतावा देणारी योजना वाटते. त्यामुळे अनेक बँका देखील त्यांच्या ग्राहकांना वेगवेगळ्या एफडीचे पर्याय देत असतात.
अशातच आता देशातील सगळ्यात मोठी सरकारी बँकांपैकी बँक ऑफ बडोदाने (BOB FD Rate) त्यांच्या एफडीच्या दरांमध्ये बदल केलेला आहे. या बँकेने त्यांच्या 3 कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीच्या दरांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल केलेले आहे . त्यांनी हे नवीन दर 13 ऑगस्टपासून लागू केलेले आहेत. आता ही बँक सात दिवसांपासून ते दहा वर्षाच्या एफडीवर नवनवीन ऑफर देत आहे. आता हे व्याजदर नक्की कसे आहेत? हे आपण जाणून घेऊया.
BOB च्या FD वर व्याजदर | BOB FD Rate
7 दिवस ते 14 दिवस – सामान्य लोकांसाठी: 4.25 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 4.75 टक्के 15 दिवस ते 45 दिवस – सामान्य लोकांसाठी: 4.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 5 टक्के
46 दिवस ते 90 दिवस – सामान्य लोकांसाठी: 5.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 6 टक्के
91 दिवस ते 180 दिवस – सामान्य लोकांसाठी: 5.60 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 6.10 टक्के
181 दिवस ते 210 दिवस – सामान्य लोकांसाठी: 5.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 6.25 टक्के
211 दिवस ते 270 दिवस – सामान्य लोकांसाठी: 6.15 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 6.65 टक्के
271 दिवस आणि त्याहून अधिक आणि 1 वर्षापेक्षा कमी – सामान्य लोकांसाठी: 6.25 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 6.75 टक्के
३३३ दिवस मान्सूनचा धमाका – सर्वसामान्यांसाठी : ७.१५ टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.65 टक्के
360 दिवस – सामान्य लोकांसाठी: 7.10 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.60 टक्के
1 वर्ष – सामान्य लोकांसाठी: 6.85 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.35 टक्के
399 दिवस मान्सूनचा धमाका – सर्वसामान्यांसाठी: 7.25 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.75 टक्के
1 वर्षापासून 400 दिवसांपर्यंत – सामान्य लोकांसाठी: 6.85 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.35 टक्के
400 दिवस ते 2 वर्षे – सामान्य लोकांसाठी: 6.85 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.35 टक्के
2 वर्षांपेक्षा जास्त आणि 3 वर्षांपर्यंत – सामान्य लोकांसाठी: 7.15 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.65 टक्के
3 वर्षांपेक्षा जास्त आणि 5 वर्षांपर्यंत – सामान्य लोकांसाठी: 6.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.15 टक्के
5 वर्ष ते 10 वर्षांपेक्षा जास्त – सामान्य लोकांसाठी: 6.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.50 टक्के