Monday, December 22, 2025
Home Blog Page 534

BOB FD Rate | बँक ऑफ बडोदाने ग्राहकांना दिली मोठी भेट! FD व्याज दरात केली एवढी वाढ

BOB FD Rate

BOB FD Rate | भविष्याच्या दृष्टिकोनातून लोक आपल्या मुलांसाठी त्याचप्रमाणे आपले निवृत्तीनंतरच्या आयुष्य सुखात जावे. यासाठी आजच काही ना काही बचत करत असतात. मार्केटमध्ये अनेक सुविधा उपलब्ध असतानाही अनेक लोक आजही बँकांच्या एफडीमध्ये गुंतवणूक करतात. कारण बँकांची FD ही त्यांना अत्यंत सुरक्षित आणि चांगली परतावा देणारी योजना वाटते. त्यामुळे अनेक बँका देखील त्यांच्या ग्राहकांना वेगवेगळ्या एफडीचे पर्याय देत असतात.

अशातच आता देशातील सगळ्यात मोठी सरकारी बँकांपैकी बँक ऑफ बडोदाने (BOB FD Rate) त्यांच्या एफडीच्या दरांमध्ये बदल केलेला आहे. या बँकेने त्यांच्या 3 कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीच्या दरांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल केलेले आहे . त्यांनी हे नवीन दर 13 ऑगस्टपासून लागू केलेले आहेत. आता ही बँक सात दिवसांपासून ते दहा वर्षाच्या एफडीवर नवनवीन ऑफर देत आहे. आता हे व्याजदर नक्की कसे आहेत? हे आपण जाणून घेऊया.

BOB च्या FD वर व्याजदर | BOB FD Rate

  • 7 दिवस ते 14 दिवस – सामान्य लोकांसाठी: 4.25 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 4.75 टक्के
    15 दिवस ते 45 दिवस – सामान्य लोकांसाठी: 4.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 5 टक्के
  • 46 दिवस ते 90 दिवस – सामान्य लोकांसाठी: 5.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 6 टक्के
  • 91 दिवस ते 180 दिवस – सामान्य लोकांसाठी: 5.60 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 6.10 टक्के
  • 181 दिवस ते 210 दिवस – सामान्य लोकांसाठी: 5.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 6.25 टक्के
  • 211 दिवस ते 270 दिवस – सामान्य लोकांसाठी: 6.15 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 6.65 टक्के
  • 271 दिवस आणि त्याहून अधिक आणि 1 वर्षापेक्षा कमी – सामान्य लोकांसाठी: 6.25 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 6.75 टक्के
  • ३३३ दिवस मान्सूनचा धमाका – सर्वसामान्यांसाठी : ७.१५ टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.65 टक्के
  • 360 दिवस – सामान्य लोकांसाठी: 7.10 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.60 टक्के
  • 1 वर्ष – सामान्य लोकांसाठी: 6.85 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.35 टक्के
  • 399 दिवस मान्सूनचा धमाका – सर्वसामान्यांसाठी: 7.25 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.75 टक्के
  • 1 वर्षापासून 400 दिवसांपर्यंत – सामान्य लोकांसाठी: 6.85 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.35 टक्के
  • 400 दिवस ते 2 वर्षे – सामान्य लोकांसाठी: 6.85 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.35 टक्के
  • 2 वर्षांपेक्षा जास्त आणि 3 वर्षांपर्यंत – सामान्य लोकांसाठी: 7.15 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.65 टक्के
  • 3 वर्षांपेक्षा जास्त आणि 5 वर्षांपर्यंत – सामान्य लोकांसाठी: 6.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.15 टक्के
  • 5 वर्ष ते 10 वर्षांपेक्षा जास्त – सामान्य लोकांसाठी: 6.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.50 टक्के

3 तासांत गाठणार राजधानी दिल्ली ; कोल्हापूर- दिल्ली थेट विमानसेवा सुरु होणार

देशभरामध्ये कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. त्यातही छोटी शहरे मोठ्या शहरांना जोडून उद्योग धंदे आणि विकासाला चालना मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. देशातील मोठी शहरे जसे की मुंबई, दिल्ली, बेंगलोर अशा शहरांना छोटी शहरे जोडण्याचा प्रयत्न होत आहे. अशातच आता कोल्हापूरकरांसाठी खुशखबर आहे. कारण कोल्हापूरच्या कनेक्टिव्हिटी मध्ये वाढ होणार असून लवकरच कोल्हापूर – दिल्ली अशी थेट विमानसेवा सुरु होणार आहे. याबाबतची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, येत्या २७ ऑक्टोबर पासून कोल्हापूर ते दिल्ली या मार्गावर थेट विमानसेवा सुरु होणार आहे. या मार्गावर इंडिगो कंपनीची विमानं धावतील. या विमानांची आसन क्षमता जवळपास १८० इतकी असेल.

कोल्हापूर ते दिल्ली विमानसेवा सुरु करण्यासाठीचा प्रस्ताव हा भारतीय विमान प्राधिकरण महासंचालकांच्याकडे अंतिम टप्प्यात असून लवकरच याला मान्यता मिळणार असल्याची माहिती धनंजय महाडिक यांनी एका माध्यमाशी बोलताना दिली आहे.

काय असेल वेळ ?

मिळालेल्या माहितीनुसार सकाळी 10:10 मिनिटांनी दिल्लीतून विमान उड्डाल करेल आणि दुपारी बारा वाजून 55 मिनिटांनी कोल्हापूर विमानतळावर पोहोचेल. त्यानंतर 1:25 मिनिटांनी कोल्हापूर विमानतळावरून इंडिगो विमानाचे उड्डाण होईल आणि सायंकाळी चार वाजून पंधरा मिनिटांनी ते दिल्लीला पोहोचेल.

पर्यटनाला चालना

दरम्यान ही सेवा सुरु झाल्यास अनेकांना याचा फायदा होणार आहे. कोल्हापूर हे साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असून याठिकाणी देश विदेशातून पर्यटक येत असतात. ही विमानसेवा सुरु झाल्यास पर्यटकांचा ओघ कोल्हापुरात वाढण्याची आशा आहे. त्यामुळे पर्यटनाला चालना मिळणार आहे. तसेच उद्योग धंद्यानिमित्त कोल्हापुरातून थेट दिल्ली प्रवास करणाऱ्यांसाठी सुद्धा ही सेवा सोयीची होणार आहे. कारण बाय रोड किंवा ट्रेनच्या साहाय्याने प्रवास केल्यास प्रवाशांचा खूप वेळ खर्च होतो. थेट विमानसेवा सुरु झाल्यास प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.

CMYKPY Pune MahanagarPalika Bharti 2024 | पुणे महानगरपालिका अंतर्गत 682 पदांसाठी भरती सुरु; असा करा अर्ज

CMYKPY Pune MahanagarPalika Bharti 2024

CMYKPY Pune MahanagarPalika Bharti 2024 | जे लोक नोकरीच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. अनेक लोकांना पुण्यामध्ये नोकरी करण्याची इच्छा असते. त्यामुळे आज आम्ही अशा पुण्यात नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या लोकांसाठी एक पुणे महानगरपालिका अंतर्गत भरती घेऊन आलेलो आहोत.

ही भरती CMYKPY पुणे महानगरपालिका (CMYKPY Pune MahanagarPalika Bharti 2024) अंतर्गत होणार आहे. त्या भरती अंतर्गत कनिष्ठ अभियंता, फुलमन मेकॅनिक, ऑटो इलेक्ट्रिशन, वेल्डिंग, पेंटिंग इत्यादी पदांच्या रिक्त जागा आहेत आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. या पदाच्या एकूण 682 रिक्त जागा आहेत. या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता त्याचप्रमाणे 19 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखे अगोदरच अर्ज करा.

महत्त्वाची माहिती | CMYKPY Pune MahanagarPalika Bharti 2024

  • पदाचे नाव- कनिष्ठ अभियंता, फोलमन, ऑटो इलेक्ट्रिशन, वेल्डिंग, पेंटिंग
  • पदसंख्या – 682 जागा
  • नोकरीचे ठिकाण – पुणे
  • वयोमर्यादा – 18 ते 35 वर्ष
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 ऑगस्ट 2024

अर्ज कसा करावा ?

  • या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत.
  • आम्ही तुम्हाला लिंक देत आहोत. त्या लिंकवर क्लिक करून देखील तुम्ही अर्ज करू शकता
  • 19 ऑगस्ट 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Mansoon Update | 15 ऑगस्टनंतर महाराष्ट्रात पुन्हा वाढणार पावसाचा जोर; हवामान विभागाने दिली माहिती

Mansoon Update

Mansoon Update | यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रात खूप जास्त पाऊस पडला. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये पाऊस (Mansoon Update) झाला. परंतु गेल्या चार-पाच दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर कमी झालेला आहे. यावर्षी पाऊस देखील चांगला पडल्याने अनेक नद्यांमध्ये धरणांमध्ये पाणी साठ्यात देखील वाढ झालेली आहे. हवामान विभाग देखील पावसाबद्दल त्याचबद्दल धरणांच्या पाणी पातळीबद्दल नेहमीच माहिती देत असतात. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात आत्तापर्यंत 29 टक्के जास्त पाऊस झालेला आहे. तर 15 ऑगस्टनंतर पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून आलेली आहे.

पावसाचा जोर वाढणार | Mansoon Update

सध्या महाराष्ट्रमध्ये पावसाचा जोरात अत्यंत कमी झालेला आहे. परंतु आता 15 ऑगस्टनंतर राज्यात पुन्हा एकदा पावसाचे प्रमाण वाढण्याची माहिती हवामान विभागाने दिलेली आहे. 22 ऑगस्टपर्यंत पावसाचा जोर वाढणार आहे. आणि ऑगस्ट महिन्याचा संपेपर्यंत हा पावसाचा जोर असाच राहणार आहे. हवामान विभागाच्या दिलेल्या माहितीनुसार आज महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता नाही. परंतु अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असणार आहे.

यावर्षी समाधानकारक पाऊस (Mansoon Update) पडल्याने पाणी साठ्यात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. अनेक धरणे दरवर्षीपेक्षा जास्त भरलेली आहेत. यावर्षी भाटघर, वीर आणि उजनी ही धरणे जवळपास 100% भरलेली आहे. त्याचप्रमाणे मीरा देवघर हे धरण 97.20% भरलेले आहे. चाकसमान हे धरण 99.2% भरलेले आहे. पवना हे धरण 95.27% दर भरलेले आहे. त्याचप्रमाणे खडकवासला हे धरण 81.43% भरलेले आहे. तसेच पानशेत ते धरण 99.13 टक्के भरलेले आहे. या धरणांमधील पाणीसाठा वाढल्याने या धरणांमधून निसर्ग देखील सुरू आहे. त्यामुळे मुळा, मुठा, भीमा, मीरा या नद्यांच्या पात्रात देखील पाण्याची आवक वाढलेली आहे. त्याचप्रमाणे सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये जी धरणे आहेत त्यांच्यात देखील पाण्याची पातळी चांगली आहे. या ठिकाणी धरणे जवळपास 80% पर्यंत भरलेली आहेत.

Independence Day 2024 | पाकिस्तान भारताच्या एक दिवस आधी स्वातंत्र्य दिन का साजरा करतो? हे आहे कारण

Independence Day 2024

Independence Day 2024 | 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. संपूर्ण भारतीयांच्या दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा होता. त्याआधी जवळपास दीडशे वर्षे इंग्रजांनी भारतावर राज्य केले होते. परंतु 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. या स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतिवीरांनी त्यांच्या प्राणाची अहोती दिलेली आहे. आणि त्यामुळेच हा सुवर्ण दिवस संपूर्ण भारताला बघायला मिळालेला आहे. स्वातंत्र्यानंतर अखंड भारताऐवजी भारत आणि पाकिस्तान असे दोन देश उदयास आले. परंतु आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की, पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन हा 14 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. जर या दोन देशांना एकाच दिवशी स्वातंत्र्य मिळाले आहे, तर हे दोन देश स्वातंत्र्य दिन दोन वेगवेगळ्या दिवशी का साजरे करतात? याबद्दलची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

भारत आणि पाकिस्तान हे दोन देश स्वतंत्र होऊन आता 78 वर्षे पूर्ण झालेले आहे. परंतु 14 ऑगस्ट 1947 रोजी सगळ्यात आधी पाकिस्तान या देशाला स्वातंत्र मिळाले तर त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत आणि पाकिस्तान हे दोन ब्रिटिश राजवटीतून स्वतंत्र झाले. दोन्ही देशांना स्वातंत्र मिळाले होते, तरीही पाकिस्तानने भारताच्या एक दिवस आधी म्हणजे 14 ऑगस्ट 1947 रोजी मुस्लिम बहुल राष्ट्र म्हणून आपला स्वातंत्र्य दिन साजरा केला. तर भारताने दुसऱ्या दिवशी म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून स्वातंत्र्य दिन साजरा केला.

पाकिस्तानच्या स्वातंत्र्याचे कारण | Independence Day 2024

भारत आणि पाकिस्तान हे वेगळ्या होण्यामागे आणि वेगवेगळ्या दिवशी स्वातंत्र्य दिन साजरी करण्यामागे अनेक कारणं आहेत. त्यामागे अनेक तर्क देखील लावले गेलेले आहे. परंतु इतिहासकारांचे असे म्हणणे आहे की, 14 ऑगस्ट रोजी पाकिस्तान या देशाला स्वतंत्र देश म्हणून मान्यता मिळाली होती. त्यामुळे यामुळे त्यांनी त्याच दिवशी त्यांच्या स्वातंत्र्याचा उत्सव साजरा केला. परंतु असे देखील म्हटले जाते की, त्यावेळी तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड माऊंटन बॅटन हे ब्रिटिश सरकारचे प्रतिनिधी होते. त्यांनी 14 ऑगस्टला पाकिस्तानकडे आणि 15 ऑगस्टला भारताकडे त्यांची सत्ता हस्तांतरित केली. आणि याच कारणामुळे पाकिस्तान भारताच्या एक दिवस आधी स्वातंत्र्य दिन साजरा करतो.

भारत आणि पाकिस्तान यांच्या स्वातंत्र्य दिनाच्या प्रश्नांबाबत असे देखील म्हटले जाते की, या दोन्ही देशांची प्रमाण वेळ ही वेगवेगळी होती. पाकिस्तानची प्रमाण वेळ ही भारतापेक्षा 30 मिनिटे मागे होती. जेव्हा भारतात 12 वाजलेले होते तेव्हा पाकिस्तानमध्ये 11:30 वाजलेले होते. आणि याच वेळी ब्रिटिश सरकारने भारतीय स्वातंत्र्य कायद्यावर सही केली. त्यावेळी रात्रीचे 12 वाजले होते. म्हणूनच भारत हा 15 ऑगस्ट रोजी आणि पाकिस्तान 14 ऑगस्ट रोजी त्यांचे स्वातंत्र्य दिन साजरे करतात. भारत आणि पाकिस्तान हे अगदी एक दिवसाच्या अंतराने स्वातंत्र्य दिन का साजरे करतात? याबद्दल अनेक इतिहासकारांनी जाणकार लोकांनी वेगवेगळ्या प्रकारचे तर्कवितर्क लावलेले आहेत.

गुजरातच्या नेत्यांचा अजितदादांवर दबाव, कटकारस्थाने करणाऱ्याला एक दिवस…; रोहित पवारांचे ट्विट चर्चेत

rohit pawar ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बारामती लोकसभा निवडणुकीत सुप्रिया विरुद्व सुनेत्राला उभं करणं हि माझी चूकच होती अशी कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. अजितदादांच्या या विधानानंतर शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, मात्र रोहित पवारांनी मात्र ट्विट करत यावर थेट भाष्य केलं. यावेळी रोहित पवारांनी (Rohit Pawar) गुजरातच्या नेत्याचा अजित पवारांवर दबाव होता असेही म्हंटल आहे. एवढंच नव्हे तर महाराष्ट्र नासवणाऱ्या कलाकाराला मात्र महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेच्या सहकार्याने राज्याच्या राजकीय पटलावरून एक दिवस नक्की बाजूला सारेल असा वादाही रोहित पवारांनी अजितदादांना दिला.

काय आहे रोहित पवारांचे ट्विट ?

आदरणीय दादा, खा. सुप्रियाताईंच्या विरोधात सुनेत्रा काकींना उमेदवारी देण्याचा निर्णय दादांचा असूच शकत नाही अशी खात्री होती. ती चूक होती म्हणून एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत त्याची तुम्ही कबुली दिली, परंतु तुमचे मित्रपक्ष मात्र उलट प्रचार करत हा दादांचाच निर्णय असल्याचे सांगतात. याला तुम्ही ‘चूक झाल्याचे नाव देत असलात’ तरी प्रत्यक्षात हा दिल्लीत बसलेल्या गुजरातच्या नेत्यांचा दबाव होता. आता विधानसभेला ‘असाच दबाव माझ्या मतदारसंघाच्या बाबतीत आपल्यावर असल्याची’ चर्चा आहे.

दबावाला बळी पडणे हा वैयक्तिक विषय असला तरी स्वाभिमान, विचारधारा आणि साहेबांना सोडून तुम्ही भाजपचं मांडलिकत्व स्वीकारलं आणि यामध्ये एक क्षमता असलेला नेता बळीचा बकरा ठरला, याचं मात्र पक्षाचा एक कार्यकर्ता आणि एक पुतण्या म्हणून कायम दुःख राहील. पण ही कटकारस्थाने करणाऱ्या तसंच महाराष्ट्र नासवणाऱ्या कलाकाराला मात्र महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेच्या सहकार्याने राज्याच्या राजकीय पटलावरून एक दिवस नक्की बाजूला सारेल, हा माझा तुम्हाला पक्का वादा आहे.

अजित पवार काय म्हणाले होते?

एका मुलाखतीत बोलताना अजित पवारांनी म्हंटल कि, अनेक घरांमध्ये राजकारण चालतं. पण राजकारण हे घरामध्ये शिरून द्यायचं नसतं. लोकसभेला मात्र माझ्याकडून चूक झाली. मी माझ्या बहिणीविरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं. तेव्हा पार्लामेंट्री बोर्डाकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला गेला. आता एकदा बाण सुटल्यावर माघारी घेता येत नाही. परंतु आज माझं मन मला सांगतं तसं व्हायला नको होतं,” असं म्हणत आपल्या चुकीची स्पष्ट कबुली अजित पवारांनी दिली.

सचिन- गांगुली पुन्हा क्रिकेटच्या मैदानात? BCCI सुरु करणार नवी स्पर्धा

Legend League

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात T-20 क्रिकेटची लोकप्रियता चांगलीच वाढत आहे. जगातील अनेक देशात T-20 लीग स्पर्धा होत असतात. आपल्या भारतात सुद्धा इंडियन प्रीमिअर लीग (IPL) दरवर्षी होते. मात्र आता IPL च्या धर्तीवरच BCCI स्वतःची लीजंड्स खेळाडूंची लीग (Legend League) सुरू करण्याच्या विचारात आहे. या लीग मध्ये सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली, सेहवाग आणि युवराज यांच्यासारखे भारतीय क्रिकेटवर एकेकाळी अधिराज्य गाजवलेले निवृत्त खेळाडू आपल्याला खेळताना दिसू शकतात. असं झाल्यास भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी हा मोठा आनंदाचा क्षण ठरेल.

अलीकडेच भारताच्या काही माजी खेळाडूंनी बीसीसीआयचे सचिव जय शाह यांची भेट घेतली आणि त्यांना लीजेंड्स लीग आयोजित करण्याची विनंती केली. आयपीएलप्रमाणे लिजेंड्स लीगचे आयोजन असावे अशी माजी क्रिकेटपटूची इच्छा आहे.म्हणजेच वेगवेगळ्या शहरांच्या नावाने संघाची नावे असावी. आयपीएल प्रमाणेच या स्पर्धेत सुद्धा जगभरातील निवृत्त खेळाडूंसाठी बोली लावावी अशी माजी खेळाडूंची इच्छा आहे. आता हे किती शक्य आहे याचा विचार बीसीसीआय करत आहे. जे हे शक्य झालं तर आयपीएल प्रमाणेच लिजंड लीगचा आनंद भारतीय क्रिकेटप्रेमींना घेता येणार आहे.

याला दुजोरा देताना बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “आम्हाला या संदर्भात माजी क्रिकेटपटूंकडून प्रस्ताव आला असून, त्यावर विचार केला जात आहे. मात्र, सध्या तरी हा प्रस्ताव सुरुवातीच्या टप्प्यावर आहे. हि लीग यंदा सुरु होण्याची शक्यता नाही मात्र पुढच्या वर्षी लिजंड लीगचा विचार करता येईल. महत्वाची बाब म्हणजे या स्पर्धेत आयपीएलमध्ये खेळत असलेल्या खेळाडूंना संधी मिळणार नाही तर जगभरातील निवृत्त झालेल्या खेळाडूंना खेळता येईल . बीसीसीआयने लीग सुरू केल्यास, ही कोणत्याही क्रिकेट बोर्डाने आयोजित केलेली पहिलीच लीजेंड्स लीग असेल. सध्या होत असलेल्या सर्व लीग खासगी आहेत.

नितेश राणेंची पोलिसांना धमकी!! मस्ती कराल तर, बायकोला….

Nitesh Rane On Police

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पोलिसाना धमकी देत एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. सरकार हिंदूंचे आहे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आहेत, मस्ती कराल तर अशा जिल्ह्यात पाठवू की जिथून तुमच्या बायकोलाही फोन लागणार नाही असा सज्जड दम राणेंनी पोलिसाना दिला. सांगली जिल्ह्यातील पलूस येथे आयोजित शिवशक्ती-भिमशक्ती जनआक्रोश मोर्चा दरम्यान ते लव्ह जिहाद वर बोलत होते. याचवेळी नितेश राणेंनी पोलिसाना लक्ष्य केलं.

उरण आणि धारावी हत्याप्रकरणी पीडितांना न्याय मिळावा आणि दोषींना शिक्षा व्हावी यासाठी सांगलीमध्ये या जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी आपल्या भाषणात नितेश राणे म्हणाले, पोलिस ठाण्यात लव्ह जिहाद बाबत तक्रार देण्यात येणाऱ्या मुलीची तक्रार अर्ध्या तासात घेतली पाहिजे, अन्यथा पुढच्या तीन तासात पोलिस ठाण्यात दाखल होऊन धिंगाणा घालू . हे सरकार हिंदूचे आहे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. तुम्हाला जर तुमच्या पोस्टवर मजा येत नसेल तर अशी काही मस्ती करा, मग तुम्हाला अशा जिल्ह्यात घेऊन जाऊ की जिथून बायको फोनपण लागणार नाही मी काही निवेदन वगैरे देत बसत नाही, ती भाषा मला जमत पण नाही. मी डायरेक्ट कार्यक्रम करतो. नितेश राणे यांनी थेट पोलिसांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने चर्चाना उधाण आलं आहे.

यापूर्वीही पोलिसांवर निशाणा –

दरम्यान, नितेश राणे यांनी यापूर्वीही अनेकदा आपल्या भाषणात पोलिसांना दम दिला आहे. पोलिस काय करणार आहेत, हे फक्त आमचे व्हिडीओ काढतील आणि घरात जाऊन बायकोला दाखवतील असं ते म्हणाले होते. तसेच मी कोणाला घाबरत नाही, आमचा बॉस सागर बंगल्यावर बसलाय असंही ते एकदा म्हणाले होते. यावरून मोठा राजकीय गदारोळही पाहायला मिळाला होता. आता नितेश राणेंनी पुनः एकदा पोलिसांना दम दिल्याने राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे होऊ शकतात समस्या, आहारात करा या पदार्थांचा समावेश

Vitamin B 12 Foods
Vitamin B 12 Foods

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपण निरोगी राहण्यासाठी आपल्या शरीराला सगळ्या पोषक तत्वांची गरज असते. ज्यामुळे आपण चांगले आयुष्य जगू शकतो. आपल्या शरीराच्या योग्य आणि जलद वाढीसाठी हे सगळे पोषक तत्व खूप गरजेचे असते. त्यापैकी विटामिन बी 12 हे एक अत्यंत महत्त्वाचे असे पोषक तत्व आहे. हे पोषक तत्व शरीरातील रक्त चेतापेशी यांना निरोगी ठेवण्यास मदत करत असते. जर विटामिन बी 12 ची कमतरता असेल, तर शरीरात अनेक लक्षणे दिसतात.

यामुळे स्मृती भ्रंश होणे, हात आणि पाय सुन्न होणे मुंग्या येणे,स्नायू कमकुवत होणे, चिडचिड होणे, चालताना असंतुलन होणे नाही, यांसारख्या गोष्टींचा प्रभाव होतो. त्यामुळे विटामिन बी 12 ची पातळी नियंत्रणात असणे. खूप गरजेचे असते विटामिन बी 12 ची कमतरता ओळखून वेळीच तुमच्या आहारात विटामिन बी 12 ने समृद्ध असलेल्या पदार्थांचे सेवन करणे खूप गरजेचे असते. आता हे कोणते पदार्थ आहेत हे आपण जाणून घेऊया.

डेअरी प्रोडक्ट

डेअरी प्रॉडक्ट म्हणजेच दूध, चीज, दही यांमध्ये कॅल्शियम खूप जास्त प्रमाणात असते. त्यामुळे अनेक लोकही दररोज याचे सेवन करतात. पण या डेअरी प्रॉडक्टमध्ये विटामिन बी12 देखील खूप चांगल्या प्रकारे असते. त्यामुळे जर तुम्ही या डेअरी प्रॉडक्टचा रोज तुमच्या जेवणामध्ये समावेश केला, तर तुम्हाला विटामिन बी 12 चांगल्या प्रमाणात मिळेल.

चिकन

जे लोक मांसाहारी आहेत त्यांच्यासाठी चिकन हा प्रोटीनचा हे खूप चांगला स्त्रोत आहे. हे चवीला देखील खूप चांगले लागते आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात विटामिन बी 12 असतो. चिकनमध्ये यकृत हे व्हिटॅमिन बी 12 चा चांगला स्रोत आहे त्यामुळे तुम्ही जर मांसाहारी असाल तर तुम्ही तुमच्या आहाराची कंचा समावेश नक्कीच करू शकता.

अंडी

अंडी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये अनेक पोषण तत्व असतात. अंड्यांमध्ये जास्त प्रमाणात प्रोटीन असते. त्याचप्रमाणे विटामिन b 12 ने देखील अंडे समृद्ध आहे. त्यामुळे विटामिन बी 12 शरीरातील कमतरता दूर करण्यासाठी तुम्ही अंड्याच्या सेवन करू शकता. अंड्यातील पिवळ्या बलकमध्ये विटामिन बी 12 जास्त प्रमाणात असते. त्यामुळे तुम्ही नाश्त्यांमध्ये अंड्याचा समावेश करू शकता.

लाल मांस

लाल मांस, विशेषत: गोमांस यकृत, हे देखील व्हिटॅमिन बी 12 च्या सर्वोत्तम स्त्रोतांपैकी एक आहे. तुम्ही शरीरातील विटामिन बीट वेलची कमतरता भरून काढण्यासाठी तुमच्या आहारात लाल माणसाचा समावेश करू शकता यामुळे तुम्हाला इतरही अनेक फायदे होतील.

मासे

माशांमध्ये मानवाच्या शरीराला लागणारे अनेक पोषण तत्त्वे असतात सॅल्मन, ट्यूना आणि ट्राउट सारखे चरबीयुक्त मासे हे व्हिटॅमिन बी 12 चे उत्कृष्ट स्त्रोत आहेत. या माशांमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिडही भरपूर असते, जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते.

राज्यात ठाकरे सरकार येताच लाडक्या बहिणींच्या 1500 रुपयांत भरगोस वाढ होईल

uddhav tahckeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण व्हावे यासाठी शिंदे सरकारने माझी लाडकी बहीण योजना (Mazi Ladki Bahin Yojana) सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे एकीकडे महिलावर्गत आनंदाचे वातावरण असताना दुसरीकडे सरकारमधीलच आमदार रवी राणा आणि महेश शिंदे यांनी मात्र आम्हाला आशीर्वाद नाही दिला तर तुमचे १५०० रुपये काढून घेऊन असा दम महिलांना दिल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या. यावरून शिवसेना ठाकने सामना अग्रलेखातून खरपूस समाचार घेतला आहे. तसेच निवडणुकीनंतर राज्यात ठाकरे सरकार आलं तर लाडक्या बहिणींच्या १५०० रुपयांत भरगोस वाढ होईल अशी ग्वाहीही दिली आहे.

सामना अग्रलेखात नेमकं काय म्हंटल?

पैशांचा वापर करून मते विकत घेण्याचा फंडा म्हणून राज्य सरकारने आता ‘लाडकी बहीण’ योजनेची घोषणा केली. बहिणींच्या खात्यात महिन्याला 1500 रुपये सरकारी तिजोरीतून जातील व त्या बदल्यात या बहिणींनी घटनाबाहय सरकारला मते द्यावीत असे एकंदरीत नियोजन आहे. म्हणजे सरकारी पैशांनी मते विकत घेण्याची ही योजना आहे. हे आम्ही म्हणत नसून सरकार पक्षाचे आमदार व नेतेच तसे वक्तव्य करून लाडक्या बहिणींना धमक्या देऊ लागले आहेत. सरकारचे एक लोचट मजनू आमदार रवी राणा यांनी अमरावतीत जाहीर केले आहे की, आगामी विधानसभा निवडणुकीत मलाच मते द्या, नाहीतर तुमच्या खात्यातून ‘लाडकी बहीण’ योजनेचे 1500 रुपये काढून घेईन. ही धमकीच म्हणायला हवी. भाजपची लाडकी बहीण व रवी भाऊची लाडकी पत्नी नवनीत राणा यांचा दारुण पराभव अमरावतीच्या सुजाण जनतेने केल्यापासून राणा महाशयांचा तोल सुटला आहे व ते मतदारसंघातील बहिणींना धमक्या देऊ लागले आहेत. राणांपाठोपाठ मिंधे गटाचे एक आमदार महेश शिंद यांनीही असेच फूत्कार सोडले आहेत. “विधानसभा निवडणुकीत विरोधात काम केले तर ‘लाडकी बहीण’ योजनेतून नाव वगळून टाकू, अशी धमकी या महाशयांनी दिली आहे.

वास्तविक पैसा सरकारचा, योजना सरकारची आहे. पुन्हा हा सरकारी पैसा काही मुख्यमंत्री महोदयांच्या खिशातून आलेला नाही. त्यामुळे या सरकारी योजनेचा लाभ बहिणींनी घ्यायला हवा, पण पैशांच्या बदल्यात मत हवे असा फूत्कार सरकार पक्षाचे लोक सोडत आहेत. फक्त रवी राणाच नव्हे, तर सत्ताधारी पक्षांचे अनेक आमदार, मंत्री, पदाधिकारी याच सुरात बोलत आहेत. ही बाब निवडणूक आयोगाने गांभीर्याने घेणे गरजेचे आहे,” असं ठाकरे गटाने म्हटलं आहे. राज्यातील भगिनींनी सध्या हे 1500 रुपये जरूर घ्यावेत, मात्र राज्यात ‘ठाकरे’ सरकार येताच या 1500 मध्ये भरघोस वाढ होईल याची खात्री बाळगा. रवी राणा यांच्यासारखे सरकारी लोचट मजनू लाडक्या बहिणींच्या खात्यातील पैसे काढून घेण्याची भाषा करतात हा समस्त लाडक्या बहिणींचा अपमान आहे. हा पैसा यांच्या बापजाद्यांचा आहे काय किंवा सरकारी लुटीतला आहे काय? हा प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे.

मिथ्यांचे राज्य हे पेशांचे राज्य आहे. पेशांतून आलेले राज्य हे बदफैलींचे राज्य असते. तसे नसते तर लाडक्या बहिणींचा असा अपमान झाला नसता. एकीकडे बहीण म्हणून दरमहा 1500 रुपये देण्याच्या बतावण्या सरकार करीत आहे आणि दुसरीकडे आम्हाला मत दिले नाही तर हे पैसे तुमच्या खात्यातून काढून घेऊ, ‘लाडकी बहीण’ योजनेतून नाव वगळू अशा जाहीर धमक्या सत्तापक्षातील लोचट मजनू [देत आहेत. मिधे सरकारची खरी ‘नियत’च त्यामुळे चव्हाटय़ावर आली आहे. राज्यातील समस्त भगिनी या अपमानाचा योग्य बदला योग्य वेळी घेतील, याविषयी आमच्या तरी मनात शंका नाही! असं म्हणत सामनातून सरकारवर निशाणा साधला आहे.