Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 542

CSMT रेल्वे स्थानकावर RDX स्फोटक ठेवल्याची धमकी

CSMT Station RDX

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतील सर्वात गजबजलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल (CSMT) रेल्वे स्टेशनवर RDX स्फोटक ठेवल्याचा धमकीचा कॉल (CSMT Station RDX) आल्याने खळबळ उडाली. अज्ञात इसमाने जीआरपी कंट्रोल रूमला फोन करत सीएसएमटी रेल्वे स्थानकावर आरडीएक्स ठेवल्याची धमकी दिली. यानंतर संपूर्ण यंत्रणा खडबडून जागी झाली. स्टेशनवर सर्वत्र झाडाझडती केली मात्र हाती काहीही लागलं नाही. या सर्व घटनेनंतर पोलिसांनी धमकीचा कॉल करणाऱ्या आरोपीला बेड्या ठोकल्या.

याबाबत अधिक माहिती अशी कि, मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे आरडीएक्स ठेवल्याबद्दल जीआरपी नियंत्रण कक्षाला कॉल आला. एका अज्ञात व्यक्तीने सीएसएमटी येथे आरडीएक्स ठेवल्याचा दावा केला. या फोन कॉल नंतर जीआरपी पोलिसांनी स्थानिक पोलिसांना आणि बॉम्बशोधक पथकाला याबाबतची माहिती दिली. संपूर्ण सीएसएमटी परिसरात RDX स्फोटकांचा शोध घेण्यात आला, परंतु काहीही सापडले नाही. यानंतर पोलिसांनी सदर धमकी देणाऱ्या अज्ञात इसमाचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्याचे लोकेशन ट्रेस केलं असता सीएसएमटीजवळच असल्याचे स्पष्ट झालं.

कॉल करण्यासाठी वापरण्यात आलेला नंबर मुंबई आणि बिहार या दोन्ही ठिकाणी ट्रेस करण्यात आला होता. अखेर पोलिसांनी काही तासांतच या व्यक्तीला पकडले. सचिन शिंदे असे संशयिताचे नाव असून त्याने आरडीएक्सचा वापर करून सीएसएमटी उडवून देण्याची धमकी दिली होती. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. यापूर्वी सुद्धा पोलिसांना अनेक निनामी कॉल आल्याचे आपण बघितलं आहे. देशाची राजधानी दिल्लीतही बॉम्ब ठेवल्याच्या धमक्या गेल्या महिन्यात दिल्या होत्या. मात्र तपासाअंतर्गत हे सर्व निनामी कॉल असल्याचे स्पष्ट झालं होते.

Shirdi International Airport : शिर्डी विमानतळावर जप्तीची टांगती तलवार ? नेमकं काय आहे प्रकरण ?

Shirdi International Airport : अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी हे तीर्थक्षेत्र देश विदेशात प्रसिद्ध आहे. देश विदेशातून येथे लोक साईबाबांच्या दर्शनासाठी येत असतात. म्हणूनच येथील बस स्थानक , रेल्वे स्थानकाचा विकास करण्यात आला. शिवाय येथे विमानतळ सुद्धा बांधण्यात आले मात्र आता या विमानतळावर जप्तीची टांगती तलवार आहे ? याचे कारण काय ? जप्तीची नोटीस कोणाकडून पाठवण्यात आली आहे ? नेमके हे (Shirdi International Airport) काय प्रकरण आहे जाणून घेऊया …

आठ कोटी तीस लाखांचा कर थकवल्या प्रकरणी शिर्डी विमानतळाला जप्तीची नोटीस शिर्डी ग्रामपंचायतीकडून बजावण्यात आली आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 129 अन्वये ही नोटीस बजावल्यामुळे एकच खळबळ (Shirdi International Airport) उडाली आहे.

काय आहे प्रकरण? (Shirdi International Airport)

शिर्डी विमानतळ हे कोपरगाव तालुक्यातल्या काकडी- मल्हारवाडी ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये येते. विमानतळ प्राधिकरणाने काकडी ग्रामपंचायतचा आठ कोटी 30 लाखांचा कर थकवलाय. त्यामुळे ग्रामपंचायतींना शिर्डी विमानतळ प्रशासनाला जंगम मालमत्ता जप्तीचं वॉरंट बजावले. 2017 पासून विमानतळ प्रशासनाकडून विविध स्वरूपातील कर थकीत आहे. अनेकदा पाठपुरावा करूनही (Shirdi International Airport) थकबाकी जमा होत नाही आणि याच कारणामुळे ग्रामपंचायतीने जप्तीची नोटीस बजावली आहे.

काय आहे ग्रामपंचायतीचे म्हणणे? (Shirdi International Airport)

शिर्डी विमानतळाची उभारणी करत असताना गावातल्या हजारो हेक्टर जमिनींचं भूसंपादन करण्यात आलं होतं. त्यावेळी काकडी गावात पायाभूत सुविधा आणि ग्रामविकासासाठी निधी देण्याचे आश्वासन महाराष्ट्र राज्य विमानतळ व विकास प्राधिकरणाकडून देण्यात आलं होतं. मात्र या सर्व आश्वासनांची पूर्तता झालीच नाही. त्यातच ग्रामपंचायतीच्या आठ कोटी 30 लाखांचा कर प्राधिकरणाने थकवला आहे. त्यामुळे गावाच्या विकासाला देखील अडथळे निर्माण होत आहेत म्हणूनच ग्रामपंचायतीकडून नोटीस बजावण्यात (Shirdi International Airport) आली आहे.

कशावर येणार जप्ती? (Shirdi International Airport)

विमानतळाची टर्मिनल बिल्डिंग , पेट्रोल पंप, एटीसी टॉवरसह मालमत्ता जप्तीचे वॉरंट ग्रामपंचायतीने बजावले आहे. कर जमा न केल्यामुळे आम्ही आमच्या अधिकाराचा वापर करून जंगम मालमत्ता जप्त करणार असल्याचा इशारा सरपंच पूर्वी गुंजाळ आणि उपसरपंच (Shirdi International Airport) भाऊसाहेब सोनवणे यांनी दिला आहे.

Cleaning Tips : पावसाळ्यात स्वयंपाक घरातल्या ट्रॉली उघडताच येतो कुबट वास ? करा ‘हे’ सोपे उपाय

Cleaning Tips : पावसाळा आला म्हंटल की आजुबाजुचा खुलणारा हिरवागार निसर्ग , उंचावरून कोसळणारे जलप्रपात , गरमागरम कांदाभजी, चहा चा आस्वाद घेणे म्हणजे आहाहा …! पण पावसाळा अनेक आजार आणि अनेक नकोशा गोष्टी सुद्धा घेऊन येतो. पावसाळया नकोशी वाटणारी गोष्ट म्हणजे बुरशी.

पावसाळ्यात भिंती लाकूड एव्हढेच काय कपड्यांवर सुद्धा बुरशी येते. पावसाळयाच्या दिवसात पुरेसे ऊन नसल्यामुळे हवा कोंदट होऊन घरात कुबट वास यायला लागतो. शिवाय किचनच्या ट्रॉली मधून देखील कुबट वास येतो. मग हा वास कसा घालवायचा ? यासंबंधीच्या काही ट्रिक्स (Cleaning Tips) आपण पाहुयात…

  • पावसाळ्याच्या दिवसात दररोज रात्री झोपण्यापूर्वी ट्रॉल्या उघडून ठेवा, रात्रीच्या वेळी त्यातून थोडी मोकळी हवा जाऊ द्या, जेणेकरून बंदिस्त जागेतला कोणत वास निघून जायला मदत होईल.
  • पावसाळ्यात दर पंधरा दिवसांनी ट्रॉली बाहेर काढून घ्या आणि ती जागा (Cleaning Tips) घासून, पुसून स्वच्छ करा. ती जागा पुसताना पाण्यात थोडं विनेगर घाला. यामुळे कोंदटपणा कमी होईल.
  • किचन ट्रॉली मध्ये येणारा कोंदट वास घालवण्यासाठी तुम्ही डांबर गोळ्यांचा वापर करू शकता.
  • रात्रीच्या वेळी लिंबाचे काप करा आणि त्यावर थोडा बेकिंग सोडा टाकून ते ट्रॉलीच्या आत मध्ये ठेवून द्या. त्यामुळे कोंदट वास (Cleaning Tips) निघून जायला मदत होईल.
  • एक चांगला उपाय म्हणजे उदबत्तीचे रिकामे पुडे हे तुम्ही ट्रॉलीच्या खाली जमिनीवर ठेवू शकता. यामुळे दुर्गंधी (Cleaning Tips) कमी होऊन ती जागा सुगंधित होईल.

इस्लाम स्वीकारा किंवा मृत्यूला सामोरे जा… बांगलादेशातून हिंदूंना संपवण्याचे कट्टरपंथीयाचे आदेश?

abu najm fernando bin al-iskandar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेख हसीना यांनी बांग्लादेशच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतरही बांग्लादेश मधील हिंसाचार थांबायचं नाव घेईना. खास करून हिंदू नागरिक आंदोलकांचे लक्ष्य बनत आहेत. बांग्लादेश मधील हिंदू यामुळे धोक्यात आले असून अनेक ठिकाणी हिंदूंची घरे आणि मंदिरे जाळण्याचा प्रयत्न झाला आहे. यामुळे बांग्लादेश मधील हिंदू धर्माच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असतानाच आता स्वत:ला इस्लामिक विद्वान म्हणवून घेणाऱ्या अबू नजम फर्नांडो बिन अल-इस्कंदर यांनी बांगलादेशातून हिंदूंना पूर्णपणे नेस्तनाबूत करण्याचे आवाहन केले आहे. इस्लामिक न्यायशास्त्राचा हवाला देत त्यांनी म्हटले आहे की, हिंदूंकडे दोनच पर्याय आहेत, त्यातील पहिला पर्याय म्हणजे मृत्यूला कवटाळणे आणि दुसरा पर्याय म्हणजे इस्लाम धर्म स्वीकारणे..

स्वत:चे पीएचडी विद्यार्थी म्हणून वर्णन करणाऱ्या अल-इस्कंदरने ट्विटमध्ये म्हटले आहे की, “मला हे जाणून समाधान वाटत आहे की अहल-ए-सुन्ना इस्लामिक न्यायशास्त्राच्या चारपैकी तीन विचारधारांचे म्हणणे आहे की हिंदूंकडे फक्त दोनच पर्याय असावेत.” एक म्हणजे तलवारीला सामोरे जावा आणि दुसरा म्हणजे इस्लामचा स्वीकार करा. त्यांनी पुढे म्हंटल, ‘हिंदूंनी आभार मानले पाहिजे की ते सध्या हनफीचा सामना करत आहेत, मलिकी, शफी किंवा हनबली नाही.’ सर्व सुन्नी मुस्लिमांमधील मुस्लिम कायद्याच्या या चार प्रमुख विचारधारा आहेत.

त्यांनी हनबली इस्लामिक कायद्याचा हवाला देत म्हटलं, सौदी अरेबिया आणि कतारमधील प्रबळ सुन्नी विचारधारा, ज्यामध्ये असे म्हटले आहे की मुस्लिमांपेक्षा वेगळे ओळखण्यासाठी हिंदूंनी डोक्याच्या पुढील बाजूचे केस मुंडन करावे. मुस्लिमांपेक्षा कमी दर्जाचे असल्यामुळे गैर-मुस्लिमांना कसे अपमानास्पद वागणूक मिळावी, हे दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. ज्या हिंदूंनी मुस्लिम देशांमध्ये राहून त्यांच्यापेक्षा खाली राहणे स्वीकारले त्यांच्याबद्दल मला कोणतीही अडचण नाही असं म्हणत अबू नजम फर्नांडो बिन अल-इस्कंदर यांनी स्वतःला उदारमतवादी चेहरा करण्याचा प्रयत्नही केला आहे. बांगलादेशातील अल्पसंख्याकांवर होणारे हल्ले हे हिंदू प्रचार असल्याचे त्यांनी वर्णन केले आणि बांगलादेश हिंदू प्रभाव आणि हस्तक्षेपापासून मुक्त होईल अशी आशा व्यक्त केली.

Viral Video | पाऊस सुरु असताना फोनवर बोलत होता तरुण; वीज कोसळली आणि पुढे….

Viral Video

Viral Video | माणसाने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर खूप जास्त प्रगती केलेली आहे .अगदी बैलगाडीपासून ते विमानापर्यंतचा प्रवास देखील माणसांनी केलेला आहे. माणसाने कितीही विज्ञानाचा वापर केला तंत्रज्ञानाचा वापर केला, तरी निसर्गापुढे शेवटी त्याला नमते घ्यावेच लागते. कारण निसर्ग पुढे कोणाचे काहीही चालत नाही. निसर्गाने प्रकोप सुरू केला, तर त्याचा आपल्यावर खूप वाईट परिणाम होऊ शकतो. आणि याचेच एक उदाहरण म्हणजे सध्या एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. ज्यामध्ये निसर्गात काय झाले आहे हे आपण पाहू शकतो.

सध्या देशभरात संपूर्ण पावसाने थैमान घातलेले आहे. अनेक ठिकाणी पावसासह मोठ्या प्रमाणात गारपिट आणि वीज देखील आहे. यामुळे पिकांचे नुकसान झालेले आहे. तसेच वीज सोडून अनेक शेतकऱ्यांचा जीव देखील गेलेला आहे. अशातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे. ती म्हणजे पावसात झाडाच्या खाली उभे राहून फोनवर बोलत असलेल्या एका तरुणाच्या अंगावर चक्क विज पडली आहे. आणि त्यामुळे त्याच्या मोबाईलचा स्फोट झालेला आहे. तो खाली कोसळलेला आहे. अनेकवेळा आपण ऐकलेले आहे की, पावसात झाडाखाली उभे राहून कधीच फोनवर बोलू नये. परंतु आपण कधी यावर विश्वास ठेवत नाही. पण ही घटना आपल्यासमोर आलेली आहे.

https://www.instagram.com/reel/C9xPQ5StM4F/?utm_source=ig_embed&ig_rid=f32f8418-eb14-4074-b2e9-ff81b3debd15

वायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये (Viral Video) पाहू शकता की, रिमझिम पाऊस चालू आहे. त्यावेळी एक तरुण झाडाखाली बाईकवर बसून फोनवर बोलत असतो. त्यावेळी अचानक आवाज येतो आणि वीज कोसळते हा तरुण एका क्षणामध्ये जमिनीवर कोसळतो. हा सगळा प्रकार कॅमेरात कैद झालेला आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्या अंगावर काटा येईल. वीज चमकत असताना झाडांच्या थांबल्याने आजपर्यंत अनेकांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे नागरिकांनी पावसात गेल्यावर नक्कीच सतर्क राहण्याची गरज आहे.

जेव्हा आपण फोनवर बोलत असतो. तेव्हा आपला मोबाईल हा टॉवरसोबत कनेक्ट झालेला असतो. ज्यावेळेस आपण बोलतो, त्यावेळी ध्वनी लहरींद्वारे दुसऱ्या व्यक्तीपर्यंत आपला आवाज पोहोचतो. या ध्वनी लहरी आकाशातून मार्गक्रमण करत असतात. अशावेळी जेव्हा या विजा चमकतात, तेव्हा त्या विजा लहरींद्वारे आपल्यापर्यंत पोहोचतात.

या मुस्लिम देशात मुलींचे लग्नाचे वय होणार 9 वर्ष; जगभरातून चिंता व्यक्त

Wedding

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | फार पूर्वी मुलींचे लग्न खूप कमी वयातच केले जायचे. परंतु मुलींची मानसिक आणि शारीरिक वाढ या सगळ्याचा विचार करून भारतामध्ये त्याचप्रमाणे इतर अनेक देशांमध्ये देखील मुलींचे लग्नाचे कमीत कमी वय हे 18 वर्षे झालेले आहे. कारण या वयात मुली सज्ञान होतात. त्यामुळेच त्यांच्यासाठी 18 वर्षानंतरच लग्न केले जाते. यामुळे मुलींना शिक्षण देखील घेता येते आणि स्वतःच्या पायावर उभे देखील राहता येते. परंतु अशातच आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे एका मुस्लिम देशात मुलींचे लग्नासाठी 9 वर्ष करण्याचा प्रस्ताव केलेला आहे. आणि संसदेत याबद्दलचे विधायक देखील मांडण्यात आलेले आहेत. आता हा देश कोणता आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

इराकमध्ये संसदेमध्ये मुलींचे लग्नाचे वय कमी करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे. यावेळी मुलींचे लग्नाचे वय हे कमीत कमी 9 वर्षापर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव दिलेला आहे. आणि या विधेयकावरून संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणात वाद देखील निर्माण झालेला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील याबाबत जनता व्यक्त केली जात आहे.

सध्या इराक मध्ये देखील मुलींच्या लग्नाचे वय हे 18 वर्षे आहे. परंतु संसदेत याबद्दलचे विधेयक जर मंजूर झाले, तर मुलींच्या लग्नाचे व्य हे 9 वर्ष होईल आणि त्यावेळी त्या मुलीला जवळपास 15 वर्षाच्या मुलासोबत विवाह करावा लागेल. आणि त्यामुळे या देशामध्ये बालविवाहाचे प्रमाण वाढण्याची देखील भीती व्यक्त केली जात आहे.

अनेक संघटनांनी या विधेयकाला विरोध केलेला आहे. जर असे केले तर महिलांचे अधिकार आणि लैंगिकता नष्ट होईल. त्यामुळे हे विधेयक संसदेत मंजूर केली जाऊ नये. अशी देखील मागणी केलेली आहे. तसेच महिलांची प्रगती देखील थांबणार आहे. मानवी हक्क संघटना सामाजिक संघटना आणि इतर महिला संघटनांनी देखील या विधेयकाला कडाडून विरोध केलेला आहे. जर या विधेयकाची मंजुरी झाली तर मुली तरुण मुलींचे शिक्षण त्यांच्या आरोग्य आणि कल्याणावर निर्बंध येतील. बालविवाहामुळे त्यांना शाळा सोडावी लागेल. त्याचप्रमाणे अगदी कमी वयात होणारी गर्भधारणा घरगुती हिंसाचार यांसारखी प्रकरणे वाढण्याचा देखील धोका आहे.

Travel : पावसाळ्यात तीच तीच ठिकाणं पाहून कंटाळलात ? एक्सप्लोर करा ‘ही’ हटके ठिकाणं

Travel : पावसाळा म्हटलं की लोणावळा, खंडाळा आणि आसपासची धबधबे प्रवाहित होणारी ठिकण आपण नेहमीच पाहायला जातो. मात्र आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला अशा काही ठिकाणाविषयी सांगणार आहोत जी खरोखरच निसर्ग सौंदर्याने भरलेली आहेत. आज आपण गडचिरोली येथील काही निसर्ग संपन्न आणि भेट देण्यासारख्या ठिकाणांबद्दल जाणून घेणार आहोत जर तुम्हाला तुमच्या फॅमिलीसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करायचा असेल तर नक्कीच तुम्ही या पर्यायांचा विचार करू (Travel) शकता. चला तर मग पाहूयात हे ठिकाण (Travel) कोणती आहेत.

अलापल्ली (Travel)

गडचिरोलीला मिळालेलं वरदान म्हणजे इथलं आरण्य इथलं वन वैभव हे पाहण्यासारखे आहे. आलापल्लीला सुद्धा वन वैभव आपल्याला पाहायला मिळेल. येथील विविध प्रकारचे औषधी वनस्पती आणि हिरवाई आपलं मन मोहन टाकेल यात शंका नाही. गडचिरोली मधलं हे ठिकाण एखाद्या उद्यानासारखं विकसित करण्यात आलं आहे. इथे तुम्हाला नेहमी थंड वातावरणाचा अनुभव घेता येईल. पावसाळ्यात तर हे ठिकाण अतिशय सुंदर होऊन जाते. इथे तुम्हाला वेगवेगळे स्थलांतरित पक्षी सुद्धा पावसाळ्यामध्ये पाहायला मिळतील.

वैरागड किल्ला (Travel)

गडचिरोली येथील पाहण्यासारखं दुसरं एक ठिकाण म्हणजे इतिहासाची जवळून साक्ष देणारं ठिकाण वैरागड किल्ला. माहिती नुसार हा किल्ला ९ व्या शतकात बांधण्यात आला आहे. मात्र आता किल्ल्याचा काही पाहायला मिळतो . हा किल्ला खोब्रागडी ते सतनाळा नद्यांच्या संगमावर आहे गडाच्या उंचीवरून आजूबाजूचे दृश्य ही खूप सुंदर दिसतं.

चपराळा वन्यजीव अभयारण्य

गडचिरोलीतलं पाहण्यासारखं तिसरं ठिकाण म्हणजे चपराळा वन्यजीव अभयारण्य. हे अभयारण्य (Travel) म्हणजे महाराष्ट्रातलं लोकप्रिय पर्यटन केंद्र आहे. हे अभयारण्य 140 चौरस किमी परिसरात पसरलेलं आहे. शिवाय अभयारण्य वर्धा आणि वैनगंगा या दोन नदीच्या तीरावर्ती आहे त्यामुळे इथं वर्षभर हिरवेगार वातावरण तुम्हाला दिसेल. शिवाय या अभयारण्यामध्ये वाघ, बिबट्या, अस्वल, कोल्हा असे अनेक प्राणी पाहायला मिळतात. त्यामुळे इथं तुम्ही जंगल सफारीचा आनंद नक्की घेऊ शकता.

मार्कंडा मंदिर (Travel)

गडचिरोली येथील चौथ्या क्रमांकाचे ठिकाण म्हणजे मार्कंडा मंदिर. अगदी नावाप्रमाणेच मार्कंडेय ऋषींनी बांधलेला मंदिर अशी याची ख्याती आहे. हे मंदिर भगवान शिवाला समर्पित असे मंदिर आहे आणि हे खूप प्राचीन असे मंदिर पाहण्यासारखे आहे. हे मंदिर आठव्या ते दहाव्या शतकाच्या दरम्यान बांधलं गेलं
असल्याचं सांगितलं जातं. तर हे मंदिर वैनगंगा नदीच्या काठावर वसले आहे त्यामुळे आजूबाजूची (Travel) दृश्य ही सुंदर आहे. तुम्ही जर वास्तुकलेचा अभ्यास करणारे व्यक्ती असाल तर तुम्हाला या ठिकाणाला भेट देऊन नक्कीच आनंद होईल कारण याची वास्तू कला पाहण्यासारखी आहे.

31 ऑगस्टपूर्वी शेतकऱ्यांना मिळणार 853 कोटी रुपये, धनंजय मुंडेंनी दिली माहिती

Pik vima

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या महाराष्ट्रात सगळीकडे पिक विमा अर्ज भरण्याचे काम चालू होते. देशातील अनेक शेतकऱ्यांनी पीक विम्याचे अर्ज भरलेले आहेत. 15 जुलै ही अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. परंतु आता त्यानंतर राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनीही तारीख वाढवून घेतली. तसेच आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे आता जिल्ह्यातील जवळपास 6 लाख शेतकऱ्यांना पिक विमाचे 853 कोटी रुपये 1 ऑगस्ट पूर्वी मिळणार आहे. त्याबाबतची माहिती धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे.

मागील वर्षी पीक विमा योजनेच्या शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. त्यांना जवळपास 4 लाख 88 हजार शेतकऱ्यांना 853 कोटी रुपये 31 ऑगस्ट पूर्वी त्यांच्या खात्यात जमा झाले होते. त्यामुळे आता जिल्ह्यातील कृषी संबंधित विषयांच्या संदर्भात पुढील येत्या आठवड्यात मुंबई येथे पिक विमा कंपनीचे अधिकारी मंत्री छगन भुजबळ पालकमंत्री दादाजी भुसे यांची एकत्र बैठक झाल्याचे देखील धनंजय मुंडे यांनी सांगितलेले आहे.

अशातच आता काल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार गटाची जनसमानी यात्रा नाशिक जिल्ह्यात आली होती. शेतकऱ्यांसोबत चर्चा केली आणि त्यांच्या प्रश्नांकडे देखील लक्ष दिले. त्यानंतर त्यांनी तेथील शेतकऱ्यांची परिस्थितीची माहिती घेतली. या सभेच्या वेळी त्या ठिकाणी आमदार हिरामण खोसकर आणि माजी आमदार जयंत जाधव हे लोक देखील उपस्थित होते. या लोकांच्या उपस्थितीतच सगळ्या गोष्टीची माहिती घेण्यात आलेली आहे.

याबाबत आता नाशिक जिल्ह्यातील शेतकरी पीक कापणी प्रयोगाद्वारे आणि उत्पन्नात आलेली घट यामुळे 853 कोटी रुपये इन्शुरन्स कंपनीकडून येणे आहे. याबाबतची माहिती देखील या ठिकाणी देण्यात आली. परंतु ही रक्कम आता 31 ऑगस्ट पर्यंत मान्य केली जाणार आहे. आणि जवळपास पाच लाख 88 हजार शेतकऱ्यांना ही रक्कम मिळणार असल्याचे देखील सांगण्यात आलेले आहे.

मागील वर्षी म्हणजेच 2023 रोजी नाशिक जिल्ह्यातील जवळपास 5 लाख 88 हजार शेतकऱ्यांनी या पिक विमा योजनेमध्ये सहभाग घेतला होता. या शेतकऱ्यांना जवळपास 79 कोटी रुपयांचा देखील लाभ झालेला होता. तसेच स्थानिक आपत्ती आणि काढणी यांच्या नुकसानापोटी 25 कोटी 89 लाख रुपये मंजूर झालेले होते.

वणी विधानसभा मतदारसंघात भाजपच्या संजय रेड्डी बोदकुरवार यांना कोण अस्मान दाखवेल?

vani vidhan sabha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ब्लॅक डायमंड, खनिजानं समृद्ध असणारी भूमी म्हणून विदर्भात नावावरुपास आलेला मतदारसंघ म्हणजे वणी… तसं पाहायला गेलं तर काँग्रेसचा पारंपारिक बालेकिल्ला असणाऱ्या वणीमध्ये मागील दहा वर्षांपासून भाजपच्या संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी वर्चस्वाचं राजकारण केलं. पण लोकसभेला भाजपचं मायनसमध्ये जाणं ते बोदकुलवार यांच्या विषयी असणारी अँटी इनकंबनसी यामुळे काँग्रेसचा यंदा आमदार फिक्स, अशी एकूणच ग्राउंड रियालिटी आहे… पण काँग्रेस कुणाला उमेदवारी देणार? यावरती एक भलं मोठ प्रश्नचिन्ह उपस्थित करता येऊ शकतं… भाजपाच्या बोदकुलवार यांचा टांगा जागेवर पलटी करण्याची हिम्मत वणीच्या कुठल्या उमेदवाराच्या हातात आहे? त्याचंच हे पॉलिटिकल डिकोडिंग…

मागील पंधरा वर्षांमध्ये या मतदारसंघांतील परिवर्तनवादी मतदारांनी वेगवेगळ्या लोकांना संधी दिली. 1990 ते 1999 या काळामध्ये या भागातून काँग्रेसचे वामनराव कासावार यांनी बाजी मारली. मात्र 2004 मध्ये शिवसेनेचे विश्वास नांदेकर यांनी वणी विधानसभेमध्ये प्रथमच भगवा फडकवला. त्यानंतर शिवसेनेची ताकद सुद्धा वाढत गेली. 2009 मध्ये काँग्रेसचे वामनराव कासावर यांनी मुसंडी मारत विजयश्री खेचून आणली. 2014 च्या मोदी लाटेत भाजपचे नवीन उमेदवार संजीवरेड्डी बोदकूरवार यांनी भाजपला इथं बस्तान बांधून दिलं.. आणि ते तब्बल एक दशक आमदारकीवर ठाण मांडून बसले… पण यंदाचा लोकसभेचा निकाल क्लिअर कट सांगतोय, यंदा वणीत फक्त आणि फक्त काँग्रेसचाच उमेदवार येईल… खरतर मागील दोन टर्म भाजपच्या बोदकूरवार यांच्या विरोधात काँग्रेसने वामनराव कासावार यांनाच निवडणुकीच्या मैदानात उतरवलं… पण त्यांची मतदारसंघातली सध्याची निष्क्रियता पाहता, काँग्रेसचा राजकीय चेहरा म्हणून कार्यकर्त्यांमध्ये आलेला साचलेपणा पाहता एक फ्रेश चेहरा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात यावा, अशी मागणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून होतेय…

यातलं पहिलं नाव येतं ते संजय खाडे यांचं… कासावार यांचे मायनस मध्ये जाणारे मुद्दे पाहता यंदा काँग्रेस खाडेंच्या नावावर शिक्कामोर्तब करणार, हे जवळपास कन्फर्म समजलं जातंय… यामागचं सर्वात महत्त्वाचा फॅक्टर कोणता असेल? तर तो कुणबी वॉटर्सचा… भाजप आणि काँग्रेस सुरुवातीपासूनच कुणबी समाजचं मताधिक्य असणाऱ्या या मतदार संघात नेहमी नॉन कुणबी उमेदवारांना संधी देऊनच लढत दिली गेली… लोकसभेला प्रतिभा धानोरकर यांनी खासदारकीचा गुलाल कपाळाला लावल्याने खाडेंना उमेदवारी देणं काँग्रेसच्या पथ्यावर पडू शकतं… एकतर कुणबी समाज एकगठ्ठा खाडेंच्या पाठीशी राहील… त्याचवेळेला धानोरकर गटही संजय खाडे यांच्या पाठीशी विधानसभेला ताकद लावू शकतील… त्यात दगडा जनसंपर्क असणारा फ्रेश चेहरा, बँकेचे जाळं आणि भव्य विदर्भ शंकर पटाच्या माध्यमातून तालुक्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या खाडेंचा स्वतःचा असा एक व्होट बँक आहे…

कापूस पणन महासंघ सोबतच चालतं फिरतं जनहित केंद्र सारख्या उपक्रमांच्या माध्यमातूनही खाडेंच्या नावाचा चांगलाच बोलबाला आहे… त्यामुळे कुणबी फॅक्टर, संस्थात्मक जाळ, सामाजिक ते क्रीडा क्षेत्रापर्यंतची मुशाफिरी या सगळ्या गोष्टी निकालात सध्यातरी खाडेंना अप्पर हँड देताना दिसतील… बाकी महाविकास आघाडी कडून ठाकरे गटाचे संजय देरकर यांचं नाव प्रकर्षाने समोर येतंय… ठाकरे गट वणीच्या उमेदवारीसाठी अडून बसला, तर वणीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट येऊ शकतो… मनसेकडून राजू उंबरकर यांनीही वणीसाठी तयारी केली आहेच…

दुसऱ्या बाजूला भाजपकडून विद्यमान आमदार संजीव रेड्डी बोदकूरवार यांची उमेदवारी कन्फर्म समजली जातेच आहे.. पण मतदार संघात आलेला साचलेपणा, आमदार साहेबांमुळे रखडलेली विकास कामे आणि अँटी इन्कंबलसी पाहता भाजप नव्या चेहऱ्याचा आमदारकीसाठी विचार करू शकतो… तेव्हा बोदकुरवार यांचे विरोधात भाजपकडून तारेंद्र बोरडे, विजय चोरडिया, रवी बेलुरकर यांचीही नावं सध्या उमेदवारीच्या स्पर्धेत आहेत… पण हे सगळं असलं तरी जो कुणबी उमेदवार देईल…. तो निवडून येईल… असं काहीसं वणीच्या जनतेचा राजकीय सुरू उमटतोय….

या मतदारसंघात वणी आणि झरी तालुक्यातील काही भागांमध्ये कोळसा खाणी आहेत, मात्र मारेगावसारखा तालुका वणीपासून जवळपास 17 किलोमीटर अंतरावर असल्याने वणीची सावली नेहमीच मारेगाव येथे पाहायला मिळते. मारेगावचे सर्व व्यवहार वणी येथे होतांना दिसतात. त्यामुळे मारेगावच्या समस्यांकडे कायम दुर्लक्ष होत आलंय… मतदार संघातली एमआयडीसीही फक्त नावापुरतीच आहे… उद्योगांच्या नावाने बोंब आहे… सोबतच हाताला काम – खिशाला दाम याचा विचार जनता लांब लांब पर्यंत करीत नाहीये… एका बाजूला कोळसा तर दुसऱ्या बाजूला कापूस म्हणजे ब्लॅक आणि व्हाईट गोल्ड. कापसाची मोठी बाजारपेठ असूनही या मतदारसंघात सूतगिरणी उद्योग नाही. ज्या सूतगिरण्या सुरु झाल्या.. आणि बंदही पडल्या… रुग्णालयीन आणि शासकीय कर्मचाऱ्यांची मनमानी, आरोग्यवस्थेचे वाजलेले तीन तेरा, चंद्रपुरातून स्थलांतरित झालेला दारू व्यापार – आणि त्या पाठोपाठ बिघडलेली मतदार संघाचं सामाजिक स्वास्थ्य आणि नुसत्या घोषणा करूनही रस्त्यावर दिसणाऱ्या रस्त्यांची चाळण… हे सगळं पाहता यंदा मतदार संघात सत्तांतर तर होणारच, पण उमेदवार निवडताना काँग्रेसला अनेक सोशिओ पॉलिटिकल फॅक्टरचा विचार करावा लागेल एवढं मात्र नक्की…