Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 548

Vinesh Phogat Disqualified : भारताला धक्का!! कुस्तीपटू विनेश फोगट अंतिम सामन्यासाठी अपात्र; नेमकं काय कारण?

Vinesh Phogat Disqualified

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पॅरिस ऑलिम्पिक मधून भारतासाठी अतिशय धक्कादायक आणि दुर्दैवी बातमी समोर येत आहे. भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगट अंतिम सामन्यासाठी अपात्र (Vinesh Phogat Disqualified) ठरली आहे. विनेशचे वजन ५० किलोग्रॅम पेक्षा थोडं जास्त भरल्याने ती आता फायनलमध्ये खेळू शकणार नाही. खरं तर संपूर्ण देशाला तिच्याकडून गोल्ड मेडलची अपेक्षा होती. मात्र विनेशचे वजन काही ग्राम जास्त भरल्याने ती अपात्र घोषित झाली आहे. यामुळे तिचे सुवर्ण पदकाचे स्वप्न सुद्धा अधुरे राहिले आहे. भारतासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जातोय.

खूप प्रयत्न करूनही अपात्र – Vinesh Phogat Disqualified

तिने मंगळवारच्या लढतींसाठी वजन केले परंतु नियमानुसार, स्पर्धेच्या दोन्ही दिवशी कुस्तीपटूंना त्यांच्या वजन श्रेणीत राहावे लागते. सर्व अडचणींना झुगारून अंतिम फेरीत पोहोचलेल्या विनेशने वजन मंगळवारी रात्री अंदाजे 2 किलो जास्त होते. ती रात्रभर झोपली नाही आणि वजन कमी करण्यासाठी जॉगिंगपासून स्किपिंग आणि सायकलिंगपर्यंत तिने सर्वकाही प्रयत्न केले तरीही काही ग्राम तिचे वजन जास्तच भरल्याने ती अंतिम सामन्यासाठी अपात्र (Vinesh Phogat Disqualified) ठरली आहे. विनेश आता फायनल खेळू शकत नाही.

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत विनेश बिगरनामांकित म्हणून दाखल झाली आणि तिला आव्हानात्मक ड्रॉ मिळाला होता. पहिल्याच सामन्यात तिच्यासमोर टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या जपानच्या युई ससाकीचे आव्हान होते. पण, २९ वर्षीय विनेश फोगटने अव्वल मानांकिस सुसाकीला चीतपट केले. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत माजी युरोपियन विजेत्या ओक्साना लिव्हा आणि उपांत्य फेरीत पॅन अमेरिकन्स स्पर्धेतील विजेती युस्नेलिस गुजमन या दोघीनाही अस्मान दाखवत विनेशने दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्यामुळे देशवासीयांच्या आशाही उंचावल्या होत्या. मात्र आता जास्तीच्या वजनामुळे विनेश फोगटचा अपात्र घोषित करण्यात आल्याने भारतासाठी हा मोठा धक्का आहे.

Vinesh Phogat : तुझ्या यशाचा आवाज दिल्लीपर्यंत ऐकू येतोय; विनेश फोगटसाठी राहुल गांधींची खास पोस्ट

Vinesh Phogat Rahul Gandhi

हॅलो महाराष्ट ऑनलाईन । पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने (Vinesh Phogat) दमदार कामगिरी करत अंतिम सामन्यात धडक मारली आहे. ऑलिम्पिक इतिहासात फायनलमध्ये धडक मारणारी विनेश फोगाट भारताची पहिलीच महिला कुस्तीपटू ठरली असून संपूर्ण देशभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनीही विनेश फोगाटचे अभिनंदन केलं आहे. मात्र मागील वर्षी घडलेल्या कुस्तीवीरांच्या आंदोलनावरून केंद्र सरकारवर अप्रत्यक्षपणे निशाणा सुद्धा साधला आहे. राहुल गांधींनी याबाबत ट्विट केलं आहे.

काय आहे राहुल गांधींचे ट्विट?

जगातील ३ सर्वोत्तम कुस्तीपटूंना एकाच दिवसात पराभूत केल्याने आज विनेशसह संपूर्ण देश भावूक झाला आहे. ज्यांनी विनेश आणि तिच्या सहकाऱ्यांचा संघर्ष खोटा ठरवला आणि त्यांच्या हेतूवर आणि क्षमतेवरही प्रश्न उपस्थित केले, त्यांना उत्तरे मिळाली आहेत. ज्यांनी तिला रडवलं ती संपूर्ण सत्ताव्यवस्था आज भारताच्या शूर कन्येसमोर कोसळली आहे. चॅम्पियन्सची हीच ओळख आहे, ते मैदानातूनच उत्तर देतात. विनेशला खूप खूप शुभेच्छा. पॅरिसमधील तुझ्या यशाचा आवाज दिल्लीपर्यंत स्पष्टपणे ऐकू येत आहे असं म्हणत राहुल गांधी यांनी विनेश फोगट हिचे कौतुक केलं आहे.

दुसरीकडे विनेश फोगटचा कुस्तीपटू मित्र बजरंग पुनिया यानेही केंद्र विनेशच्याविजयानंतर केंद्र सरकारवर निशाणा साधला. याबाबत बजरंग पुनियाने ट्विट करत म्हंटल, विनेश फोगट, भारताची सिंहीण जिने आज मागच्या पुढच्या सामन्यांमध्ये विजय मिळवला. 4 वेळा जागतिक चॅम्पियन आणि विद्यमान ऑलिम्पिक चॅम्पियनचा पराभव केला, त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत माजी विश्वविजेत्याचा पराभव केला. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, या मुलीला तिच्या देशात लाथ मारून चिरडण्यात आले, या मुलीला तिच्या देशात रस्त्यावर ओढले गेले ही मुलगी जग जिंकणार आहे पण या देशातील व्यवस्थेने तिचा पराभव केला असं म्हणत बजरंग पुनिया याने एकप्रकारे मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

विनेश कडून गोल्ड मेडलची अपेक्षा- Vinesh Phogat

दरम्यान, ऑलिम्पिकच्या १२८ वर्षांच्या इतिहासात फायनल खेळणारी विनेश ही पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली आहे आहे. ३ मिनिटांच्या पहिल्या फेरीत विनेशनं १-० अशी आघाडी घेतली. दुसऱ्या फेरीत विनेशने चांगली टेकडाउन करत आणखी ४ गुण मिळवले. संपूर्ण सामन्यादरम्यान विनेशने अतिशय वर्चस्ववादी खेळ दाखवत जगाचे लक्ष्य आपल्याकडे वेधले. आता अंतिम सामन्यात तिच्याकडून गोल्ड मेडलची अपेक्षा देशवासियांना आहे.

बांगलादेशातील हिंसाचाराचा थेट भारतीय शेतकऱ्यांना फटका; शेतमालाची निर्यात झाली ठप्प

Farmers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या बांगलादेशमध्ये खूपच हिंसक असे वातावरण झालेले आहे. बांगलादेशातील या वातावरणानंतर आता भारताने आपल्या सीमा देखील बंद केलेल्या आहेत. म्हणजे भारतातून बांगलादेशमध्ये ज्या काही शेतमालांची निर्यात होत होती. ती आता पूर्णपणे थांबवलेली आहे. भारताकडून बांगलादेशला जवळपास 75 टक्के शेतमाला हा निर्यात होत होता. परंतु आत्ताच्या या घडीला दोन्ही देशांचे मोठे नुकसान होणार आहे. कारण त्यांना देखील शेतमाल कमी पडणार आहे. आणि भारतातील शेतमाल जास्त विकला न केल्याने भारताला देखील आर्थिक फटका बसणार आहे. त्याचप्रमाणे नाशिकमधून दररोज 70 ते 80 ट्रक कांद्याचे हे बांगलादेशला निर्यात होत असतात. परंतु बांगलादेशला निर्यात होणारे कांद्याचे शेकडो ट्रक आता बांगलादेशच्या सीमेवरच थांबवलेले आहेत. त्यामुळे भारतातील शेतकऱ्यांना मात्र याचा मोठा फटका बसणार आहे. .

या एका ट्रकमध्ये जवळपास 30 टन एवढा कांदा भरला जातो. मागील आठवड्यात बांगलादेशकडे गेलेल्या कांद्याचे शेकडो ट्रक सीमेवर अडकून पडलेले आहेत. त्यामुळे आता हा कांदा कोलकत्ता मध्येच अगदी कमी भावात विकायला लागू शकतो. 50000 टन कांद्याचा टप्पा पार करण्यापर्यंत आता भारतातील कांदा निर्यात दराने शेतकऱ्यांची देखील मोठ्या प्रमाणात धडपड सुरू झालेली आहे. नाशिकमधून जवळपास 80 टक्के कांदा येत असतो. परंतु आता कांद्याचे ट्रक अडवल्याने कोट्यावधी रुपयांचे व्यवहार देखील थांबलेले आहेत.

या घटनेनंतर आता भारतातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलेले आहे. आणि बांगलादेशमध्ये जी अस्थिर परिस्थिती आहे. त्यामुळे भारताची दळणवळण व्यवस्था देखील थांबलेली आहे. यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसत असल्याचे देखील पत्रात लिहिले आहे. अशा शेतकऱ्यांना दिल्याशिवाय देण्याची नागरिक देखील राजू शेट्टी यांनी केलेली आहे.

बांगलादेशमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात हिंसाचार चालू आहे. यातच त्यांच्या पंतप्रधानांनी देखील राजीनामा देऊन सोडलेला आहे. या हिंसाचारात गेल्या तीन दिवसांमध्ये 300 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी देखील समोर आलेली आहे. त्यामुळे बांगलादेशाचे भारताशी असणारे मोठे व्यवहार देखील बंद झालेले आहेत. या दोन्ही देशांमध्ये अनेक जीवनावश्यक वस्तूंची देवाण-घेवाण होत असते. परंतु आता या अहिंसक वातावरणामुळे सगळेच व्यवहार बंद झालेले आहेत.

Railway IRCTC | भारतीय रेल्वेकडून नैनिताल फिरण्याची सुवर्णसंधी; कमी बजेटमध्ये होणार लॉन्ग ट्रिप

Railway IRCTC

Railway IRCTC | या वर्षीचा ऑगस्ट महिना खूप खास आहे. कारण ऑगस्ट महिन्यात अनेक सण असतात. आणि त्यामुळे सुट्ट्या देखील असतात. त्याचप्रमाणे यावेळेस 15 ऑगस्ट 19 ऑगस्ट असा एक लॉंग विकेंड आलेला आहे. जर तुम्ही देखील आता मस्त पावसाच्या वातावरणात बाहेर कुठे फिरायला जायचा प्लॅन करत असाल. पण तुमचे बजेटमध्ये जास्त नसेल, तर आता तुम्हाला याबद्दल काहीही चिंता करायची गरज नाही. कारण भारतीय रेल्वेने (Railway IRCTC) तुमच्यासाठी एक चांगली संधी आणलेली आहे. यामध्ये तुम्ही अगदी कमी बजेटमध्ये देखील प्रवास करू शकता. यामध्ये तुम्हाला नैनीताल ट्रिप करण्याची एक चांगली संधी येत आहे. आता याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया.

कशी असेल ट्रिप ? | Railway IRCTC

तुम्ही जर अजूनही नैनीतालचे सौंदर्य पाहिले नसेल, तर तुम्ही या ठिकाणचे सौंदर्य लवकरच पाहू शकता. कारण आता भारतीय रेल्वेने चांगली संधी आणली आहे. तुम्ही अगदी कमी बजेटमध्ये या ठिकाणी प्रवास करू शकता. आणि तेथील निसर्गाचा आनंद घेऊ शकता. भारतीय रेल्वेच्या या टूर पॅकेजमध्ये तुम्हाला राहण्याची आणि जेवणाची देखील सोय उपलब्ध झालेली आहे. तुम्ही IRCTCच्या (Railway IRCTC) अधिकृत वेबसाईटला भेट देऊन टूर पॅकेज देखील बुक करू शकता. या टूरमध्ये तुम्ही नैनीताल आणि आसपास असणाऱ्या सगळ्या प्रसिद्ध ठिकाणांना भेट देऊ शकता. ही टूर पाच दिवसांची असणार आहे. यासाठी तुम्ही गुरुवारी सुरुवात करू शकता. या ठिकाणी भेट देण्यासाठी केवळ 11 हजार 675 रुपयांचा खर्च येणार आहे. यामध्ये तुमच्या सगळेच गोष्टी कव्हर होणार आहे आता आपण याबद्दलचे सविस्तर माहिती जाणून घेऊया. पॅकेजचे नाव नैनीताल सिटी ऑफ लेक, पॅकेज कालावधी चार रात्र पाच दिवस, प्रवास मोड – ट्रेन कवर केलेले डेस्टिनेशन – नैनिताल

कोणत्या सुविधा मिळणार?

या टूर पॅकेजमध्ये तुम्हाला राउंड ट्रिप ट्रेनचे तिकीट देखील मिळणार आहे. त्याचप्रमाणे नॉन एसीची हॉटेल देखील उपलब्ध असेल. यामध्ये तुम्हाला सकाळचा नाश्ता आणि रात्रीच्या जेवणाची सुविधा उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे जवळच्या ठिकाणांना भेट देण्यासाठी तुम्हाला कॅप देखील उपलब्ध होईल.

किती पैसे लागतील ? | Railway IRCTC

या ट्रिपमध्ये जर तुम्ही एकटे प्रवास करत असाल, तर तुम्हाला 27 हजार 65 रुपये एवढे लागतील. त्याचप्रमाणे दोन लोकांना प्रति व्यक्ती 14, 875 रुपये द्यावे लागेल जर तुम्ही तीन व्यक्तींचा प्रवास करत असेल, तर प्रति व्यक्ती 11,675 रुपये भरावे लागेल. लहान मुलांची ही वेगळी द्यावी लागेल बेडसाठी पाच ते अकरा वर्षासाठी तुम्हाला 7600 द्यावे लागतील तर बेडशिवाय तुम्हाला 7015 द्यावे लागतील.

Kej Vidhan Sabha : केजमध्ये नमिता मुंदडा- संगीता ठोंबरे यांच्या भांडणात साठे आमदार होतायत?

Kej Vidhan Sabha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बीडमध्ये बजरंग बाप्पा जायंट किलर ठरले… पंकजाताईंना पराभवाचा धक्का बसला… कमळावर तुतारी भारी पडली… आता हाच सिलसिला विधानसभेलाही पाहायला मिळेल… जिल्ह्यात अनेक विधानसभेत कमळ विरुद्ध तुतारी अशा संघर्षाला निवडणूक जाहीर होण्याच्या आधी तोंड फुटलेलं असताना दुसऱ्या बाजूला केज विधानसभा मतदारसंघात भाजप विरुद्ध भाजप असाच काहीसा संघर्ष अद्याप तरी दिसतोय… असं म्हणण्याचं कारण म्हणजे केजच्या भाजपच्या विद्यमान आमदार नमिता मुंदडा यांच्या विरोधात भाजपमधीलच माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी दंड थोपटले असून काहीही झालं तरी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय… अर्थात पक्षाने तिकीट नाकारलं तरी वेगळी वाट धरली जाईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी मीडियाच्या माध्यमातून आधीच दिलाय… त्यामुळे मुंदडा विरुद्ध ठोंबरे यांच्यात उमेदवारीवरून सुरू झालेल्या घमासनाचा फायदा उचलत पृथ्वीराज साठे इथून आमदारकीचा हाबाडा करण्याचे जास्त चान्सेस आहेत… त्यामुळे केजमध्ये भाजप उमेदवारी कुणाला देतय? केज मध्ये यंदाही आमदारकीला महिलाराजच चालेल? की बजरंग बाप्पांच्या पावलावर पाय ठेवून पृथ्वीराज साठे मतदारसंघातून जोरदार तुतारी वाजवतायत? याच सगळ्या प्रश्नांची उत्तर सांगताना केजचा पुढचा आमदार कोण होतोय? ते जाणून घेऊया …

1962 पासून आतापर्यंत म्हणजे एकूण तेरा विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने पाच वेळा राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपने प्रत्येकी चार वेळा तर अपक्षाने एक वेळा या मतदारसंघातून निवडणूक जिंकली… पण इथं खऱ्या अर्थाने वर्चस्व गाजवलं ते विमल मुंदडा यांनी… 1990 पासून 2009 पर्यंत या मतदारसंघातून विमल मुंदडा या दोन वेळा भाजपकडून तर तीन वेळा राष्ट्रवादी काँग्रेस करून सलग पाच वेळा निवडून गेल्या… तब्बल दहा वर्ष विविध खात्यांचा मंत्रिपदाचा अनुभव त्यांनी केजच्या विकासाच्या कामी लावला… अपर जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक आणि भूमी अधिग्रहण कार्यालयांच्या टोलेजंग प्रशासकीय इमारती बांधल्या… आरोग्य मंत्री असताना तर त्यांनी राज्यातील पहिलं महिला रुग्णालय केजमध्ये आणलं… पाणी प्रश्नापासून ते तालुक्याला जिल्हा बनवण्यासाठी विमल मुंदडा यांच्या कामाला नाकारून चालणार नाही….

पण 2012 ला कॅन्सरच्या दुर्धर आजारात विमल मुंदडा यांचे दुर्दैवी निधन झालं… मुंदडा यांच्या निधनानंतर केज विधानसभेत पोटनिवडणूक लागली… तेव्हा राष्ट्रवादीकडून पृथ्वीराज साठे तर भाजपकडून संगीता ठोंबरे निवडणूक रिंगणात होत्या… मात्र सहानुभूती राष्ट्रवादीच्या पाठीशी असल्याने पृथ्वीराज साठे इथून निवडून आले… पण आश्चर्याची बाब म्हणजे भाजपच्या संगीता ठोंबरे यांनी पोटनिवडणूक असतानाही आपल्या पहिल्याच निवडणुकीत तब्बल 77 हजार मतं घेत राष्ट्रवादीला मोठा झटका दिला…अर्थात याचे पडसाद 2014 च्या विधानसभेला उमटलेच… राष्ट्रवादीने यावेळेस पृथ्वीराज साठेंना होल्डला ठेवून मुंदडा यांच्या सुनबाई नमिता मुंदडा यांना निवडणूक रिंगणात उतरवलं… पण मुंदडा कुटुंबाच्या वर्चस्ववादी राजकारणाला शह देत 2014 ला पहिल्यांदाच भाजपच्या संगीता ठोंबरे आमदार झाल्या…. 2019 ला मात्र केज विधानसभेत मोठी उलथा पालथं झाली… दस्तूर खुद्द शरद पवार यांनी केज विधानसभेची 2019 ची उमेदवारी नमिता मुंदडा यांना जाहीर केली… पण मुंदडा यांच्या डोक्यात काही वेगळंच होतं… पक्षांतर्गत चढाओढ आणि तत्कालीन जिल्हाध्यक्ष बजरंग बाप्पा सोनवणे आपलं काम करणार नाही, असा अंदाज घेऊन मुंदडा यांनी हातातील घड्याळ सैल करत पंकजाताईंच्या हातून कमळ घेत भाजपची उमेदवारी मिळवली… राष्ट्रवादीने ही आयत्या टाइमिंगला पृथ्वीराज साठे यांना उमेदवारी देत केजची निवडणूक प्रतिष्ठेची केली… पण अखेर मुंदडा कुटुंबाचा वारसा पुढे चालवत अखेर नमिता मुंदडा आमदार झाल्या… पण यावेळेस मतदारसंघातला राष्ट्रवादीचा सूर्य मावळला तो कायमचाच…

कट टू 2024. केज विधानसभेतून बजरंग बाप्पांच्या बाजूने लीड आल्याने नमिता मुंदडा यांची आमदारकी धोक्यात आहे, ते तर कन्फर्म दिसतंय… त्यातही 2019 ला पक्षाने शब्द दिला म्हणून शांत बसले… पण आता काहीही झालं तरी आमदारकी लढणारच, असं म्हणत संगीता ठोंबरे हट्टाला पेटल्याने भाजप समोर कोणाला तिकीट द्यायचं? हा मोठा प्रश्न असणार आहे… त्यात नमिता मुंदडा या उच्चशिक्षित आहेत.. तरुण आहेत… आपल्या चिमुकल्या तीन महिन्याच्या मुलाला घेऊन विधानसभेतला त्यांचा फोटोही बराच व्हायरल झाला होता… पण असं असलं तरी त्यांचा मतदारसंघातील कनेक्ट पुरता तुटल्याचं बोललं जातं… त्यात मतदारसंघातील प्रश्न, समस्या आणि जनसंपर्काच्या बाबतीतही मुंदडा यामागे आहेत, असं स्थानिक लोक सांगतात…

त्यामुळे नमिता मुंदडा की संगीता ठोंबरे? यांपैकी कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब करायचं? यावरून केजमध्ये भाजपची चांगलीच अडचण होऊ शकते… त्यात विधानसभेला तुतारीला मिळालेलं लीड पाहता लोकसभेचा निकाल विधानसभेलाही कायम राहिला तर पृथ्वीराज साठे यांना तुतारी वाजवून आमदारकीचा हाबाडा करण्याचे फुल टू चान्सेस आहेत…केज विधानसभा मतदारसंघांमध्ये वंजारी समाजाचे मतदान हे निर्णायक असतं… जवळपास 80 हजार मतदान हे वंजारी समाजाचे तर एक लाखांपेक्षाही जास्त मतदान हे मराठा समाजाचे आहे. त्या खालोखाल 45 हजार मतदान हे मुस्लीम यासोबतच 50 हजार मतदान हे ओबीसी करतात… थोडक्यात ओबीसी – वंजारी आणि मराठा – मुस्लिम – दलित यांची एकगठ्ठा मतं कुठल्या बाजूने झुकणार? यावरही केज विधानसभेचा निकाल कुठल्या बाजूने लागणार? हे स्पष्ट सांगता येईल…

भाजपमध्ये मुंदडा यांच्या ऐवजी पक्षातील पदाधिकारी आणि मतदार ठोंबरे यांच्या नावाची मागणी करतायत… त्यामुळे ठोंबरे आल्या तर अटीतटीची लढत केजमध्ये पाहायला मिळू शकते… त्यामुळे हा सगळा राजकीय सारीपाट पाहिला तर केजमध्ये पृथ्वीराज साठे यांच्यासाठी घोडे मैदान थोडं सोपं असल्याचं सांगता येऊ शकतं… बाकी तुम्हाला काय वाटतं? केजचा पुढचा आमदार कोण? नमिता मुंदडा – संगीता ठोंबरे की पृथ्वीराज साठे, तुमचं मत कुणाला? ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.

Mukhyamantri Ladaki Bahin Yojana | लाडकी बहीण योजनेचा अर्ज मंजूर की नामंजूर? अशाप्रकारे करा चेक

Mukhyamantri Ladaki Bahin Yojana

Mukhyamantri Ladaki Bahin Yojana | मागील महिन्यात राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Ladaki Bahin Yojana) सुरू केली. या योजनेची घोषणा झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात याच योजनेची चर्चा चालू आहे. गेल्या एक महिन्यात या योजनेसाठी जवळपास लाखो महिलांनी अर्ज केलेले आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील गरीब आणि दुर्बल महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये आर्थिक मदत केली जाणार आहे. अनेक लोकांनी या योजनेचा अर्ज केलाय. परंतु पुढेच आपल्या अर्जाचे काय झाले? आपला अर्ज मंजूर झालाय की नाही?हे अजूनही अनेक लोकांना माहीत नाही. तर आज आपण तुमचा अर्जाची स्थिती नक्की काय आहे हे जाणून घेणार आहोत.

तुमचा अर्ज मंजूर झाला आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी गुगल प्ले स्टोअर वरून नारीशक्ती ॲप डाऊनलोड करावा लागेल. यामधून तुम्ही योजनेचा फॉर्म भरू शकता. परंतु या ॲपवर सध्या अनेक तांत्रिक अडचणी येत आहे. यामुळे तुम्ही वेबसाईटवर जाऊन देखील हा अर्ज करू शकता. अगदी काही मिनिटातच हा अर्ज भरून होईल.

फॉर्मची स्टेटस कसे चेक कराल ? | Mukhyamantri Ladaki Bahin Yojana

  • यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी नारीशक्ती दूध ॲप उघडायचा आहे त्यानंतर त्या लाभार्थी महिलेचा मोबाईल नंबर टाकायचा आहे.
  • तुमच्या अकाउंट लॉगिन होईल आणि लॉगिन केल्यानंतर तुम्हाला ओटीपी येईल तो ओटीपी व्हेरिफाय करायचा आहे.
  • यानंतर तुम्ही मेन मेनूमध्ये यापूर्वी केलेले अर्ज असा पर्याय दिसेल त्या अर्जावर क्लिक करून तुमच्या अर्जाची स्टेटस पाहू शकता.
  • अर्ज उघडल्यानंतर तुम्हाला कळेल की तुमचा अर्ज मंजूर झाला आहे की नाही

अर्जाचा फॉर्म मंजूर झाला आहे की नाही ?

  • या मेनूमध्ये जर तुम्हाला इन पेंडिंग टू सबमिट असे दाखवत असेल, तर यावेळी तुमचा अर्ज भरला जात आहे असे आहे.
  • त्यानंतर तुम्हाला Approve असा पर्याय दिसत असेल तर तुमचा अर्ज स्वीकारला गेलेला आहे.
  • त्यानंतर जर In review असे दिसत असेल तर तुमच्या अर्जाचे अर्जाची तपासणी चालू आहे .
  • जर तुम्हाला Rejected असा दिसत असेल तर तुमचा अर्ज नाकारलेला आहे असा अर्थ होतो.

अर्ज करताना लागणारी महत्त्वाची कागदपत्र

  • आधार कार्ड
  • जन्म प्रमाणपत्र
  • पत्त्याचा पुरावा
  • वय प्रमाणपत्र
  • आय प्रमाणपत्र
  • शिधापत्रिका
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

Bangladesh Violence : बांगलादेशमध्ये अवामी लीगच्या 20 हून अधिक नेत्यांची हत्या; दंगलखोरांचा धुडगूस सुरूच

Bangladesh Violence

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बांगलादेशातील हिंसाचार (Bangladesh Violence) अजूनही सुरूच आहे. पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतरही दंगलखोरांचा धुडगूस सुरूच आहे. हिंसाचार करणाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात अल्पसंख्यांकांना लक्ष्य केलं जात आहे. तसेच सत्ताधारी नेत्यांविरोधात रान उठवलं जातंय. धक्कादायक बाब म्हणजे शेख हसीना यांच्या अवामी लीगच्या 20 हून अधिक नेत्यांची हत्या करण्यात आली आहे. तसेच अवामी लीगच्या नेत्यांच्या घराची तोडफोड आणि लूटमार सुद्धा करण्यात आली आहे. एकूणच बांगलादेश मधील एकूण परिस्थिती अतिशय भीषण बनली आहे.

मोहम्मद शाह आलम यांच्या घराला आग– Bangladesh Violence

अवामी लीगच्या अनेक नेत्यांच्या घरांवर आणि उद्योग धंद्यांवर हल्ले केले जात नेत्यांमध्ये पळापळ सुरु झाली आहे. दोन मंत्र्यांना विमानतळावरून देश सोडण्याच्या तयारीत असताना ताब्यात घेण्यात आले आहे. काही नेते रविवारी रात्रीच पळून जाण्यात यशस्वी ठरले आहेत. तर जे अडकलेत त्यांना लक्ष्य केलं जात आहे. अशोकतळा येथील माजी नगरसेवक मोहम्मद शाह आलम यांच्या तीन मजली घराला अज्ञातांनी आग लावल्याने सहा जणांचा मृत्यू झाला. संतप्त जमावाने या भागातील शाह आलम यांच्या तीन मजली घरावर हल्ला केला होता. आंदोलकांनी घराच्या तळमजल्यावर आग लावली. आगीच्या धुरामुळे त्याठिकाणी असलेल्या लोकांचा श्वास गुदमरून मृत्यू झाला, तर 10 जण जखमी झाले आहेत.

बांगलादेशचा प्रसिद्ध अभिनेता शांतो खान आणि त्याच्या वडिलांना जमावाने बेदम मारहाण करून त्यांची हत्या केली आहे. तसेच प्रसिद्ध गायक राहुल आनंद यांचे ढाक्यातील धानमंडी भागातील १४० वर्षे जुने घर दंगेखोरांनी जाळले आहे. जाळण्यापूर्वी या घरात लुटालुट करण्यात आली आहे. खासदार शफीकुल इस्लाम शिमुल यांच्या घराला संतप्त जमावाने आग लावली. आत्तापर्यंत अवामी लीगच्या 20 हून अधिक नेत्यांची हत्या करण्यात आल्याने बांग्लादेशात मोठी खळबळ (Bangladesh Violence) उडाली आहे. दरम्यान, शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर दंगलखोरांनी पोलिस स्टेशन आणि इमारती लुटल्या. ढाक्याचे मीरपूर मॉडेल पोलीस स्टेशनही संतप्त जमावाने पेटवून दिले.

Real Estate : घर खरेदीदारांसाठी खुशखबर ! कराचा बोजा होणार कमी ; मिळणार Indexation चा पर्याय

Real Estate : घर खरेदी करणाऱ्यांकरिता एक मोठी खुशखबर आहे. सरकारने रिअल इस्टेटसाठी लाँग टर्म कॅपिटल गेन (LTCG) नियमात सुधारणा केली आहे. यामध्ये करदात्यांना इंडेक्सेशनशिवाय 12.5 टक्के कमी कर दर किंवा इंडेक्सेशनसह 20 टक्के जास्त दर यापैकी एक निवडण्याची मुभा (Real Estate ) देण्यात आली आहे. चला जाणून घेऊया याबाबत

हा नियम 23 जुलै 2024 पूर्वी खरेदी केलेल्या मालमत्तेवर लागू होईल. यामुळे व्यक्तींना किंवा हिंदू अविभक्त कुटुंबांना (HUF) दोन्ही योजनांतर्गत कमी रक्कम भरण्यास मदत होऊ शकते. ही व्यवस्था स्थावर मालमत्तेसाठी LTCG वर भरीव सवलत देते. वित्त विधेयक 2024 मध्ये सुधारणा (Real Estate) करून हा बदल करण्यात आला आहे.

2024 च्या अर्थसंकल्पात करण्यात आलेली घोषणा

केंद्रीय अर्थसंकल्प 2024 मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी करसंबंधित अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या होत्या. यातील एक महत्त्वाचा बदल रिअल इस्टेट व्यवहाराबाबत होता. या बदलांमध्ये इंडेक्सेशन बेनिफिट काढून टाकणे आणि LTCG टॅक्स 20% वरून 12.5% ​​पर्यंत कमी करणे यांचा समावेश होता. इंडेक्सेशनद्वारे, मालमत्तेची खरेदी किंमत महागाईनुसार वाढविली जाते. यामुळे नफा कमी होतो. परिणामी (Real Estate) कमी कर भरावा लागतो. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास इंडेक्सेशन लाभामुळे कर दायित्व कमी होते.

आता काय झाला बदल ? (Real Estate)

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2024-25 चा अर्थसंकल्प सादर करताना मालमत्तेच्या विक्रीतून मिळणारा इंडेक्सेशन फायदा काढून टाकण्याबरोबरच कर 12.5 टक्के करण्याची घोषणा केली होती. याबाबत विविध स्तरातून नाराजी व्यक्त केली जात होती.

सरकारने मंगळवारी रिअल इस्टेट मालमत्तेवरील एलटीसीजी कराच्या बाबतीत करदात्यांना दिलासा (Real Estate) देण्याचा प्रस्ताव मांडला. आता मालमत्ता मालकांना भांडवली नफ्यावर 20 टक्के किंवा 12.5 टक्के कर दर निवडण्याचा पर्याय असेल. वित्त विधेयक, 2024 मधील या दुरुस्तीचा तपशील लोकसभा सदस्यांना देण्यात आला आहे. सुधारित प्रस्तावानुसार, 23 जुलै 2024 पूर्वी घर खरेदी करणारी व्यक्ती किंवा हिंदू अविभक्त कुटुंब (HUF) महागाईचा प्रभाव न पाहता 12.5 टक्के दराने नवीन योजनेअंतर्गत कर भरण्याची निवड करू शकतात.

Fofsandi Village | महाराष्ट्रातील ‘या’ गावात असतो फक्त 6 ते 7 तासांचा दिवस; मोठ्या संख्येने पर्यटक देतात भेट

Fofsandi Village

Fofsandi Village | आपला महाराष्ट्र हा विविध संस्कृतीने आणि परंपरेने नटलेला आहे. महाराष्ट्रामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत. जे पाहण्यासाठी अगदी परदेशातून देखील लोक येत असतात. त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्रात (Maharashtra) अशा काही आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी आहेत, ज्या ऐकून कोणालाही विश्वास बसणे खूपच कठीण असते. अशातच आपण महाराष्ट्रातील एका अशा गावाबद्दल जाणून घेणार आहोत, जिथे दिवस केवळ सहा ते सात तासांचा असतो. या गावांमध्ये सूर्योदय दोन ते अडीच तास उशिरा होतो. आणि दिवसही कमी असतो. सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये (Fofsandi Village) हे गाव वसलेले आहे. परंतु या गावचे निसर्ग अगदी नयनरम्य आहे. या ठिकाणी अनेक पर्यटक देखील येत असतात. महाराष्ट्रातील या गावाचे नाव अहमदनगर फोफसंडी असे आहे. आता या गावाच्या कथाही तेवढ्या रंजक आहेत. आता त्या गोष्टी आपण जाणून घेऊया.

सुरुवातीला भारतामध्ये ब्रिटिशांची राजवट होती. या राजवटीदरम्यान त्या ठिकाणी फोक नावाचा एक इंग्रज अधिकारी होता. जो सुट्टीच्या दिवशी म्हणजेच रविवारी अत्यंत विश्रांतीसाठी आणि आरामात दिवस घालवण्यासाठी एका गावात येत असे आणि तेच हे गाव आणि तेव्हापासून या ठिकाणाचे नाव फॉफसंडे असे पडले. परंतु त्या शब्दाचा अपभ्रंश होऊन पुढे फोफसंडी हे नाव गावाला मिळाले.

या गावाची विशेष गोष्ट म्हणजे या फोफसंडी (Fofsandi Village) गावात अजूनही ब्रिटिश अधिकाऱ्याच्या त्या गेस्ट हाऊसचे अवशेष आहेत. आणि ते पाहण्यासाठी अनेक लोक येतात. हे गाव निसर्गाच्या सानिध्यात असल्याने निसर्गाने देखील त्याला भरभरून असं प्रेम दिलेले आहे. कारण या गावात नदी, धबधबा, डोंगर, हिरवी वनराई दुर्मिळ पक्षी असे अनेक जैवविविधता आपल्याला या गावात पाहायला मिळते.

फोफसंडी हे गाव अहमदनगर जिल्ह्यातील अकोला या तालुक्यात आहे. या गावात अनेक प्रकारची लोक राहतात. या गावात बारा वाड्या आहेत यात वडे, पिचड, कोंढार, भगत, गोरे, उंबरे, गवारे, मेमाणे, भांगरे यांसारख्या आडनावाची लोक राहतात. हे गाव निसर्गाच्या सानिध्यात असले तरी भौतिक गरजांपासून हे गाव अजूनही वंचित आहे. या ठिकाणी रस्ता पाणी वीज यांसारख्या गोष्टींची कमतरता आहे. शेतीला देण्यासाठी देखील पाणी नसल्यामुळे या गावात अजूनही लोकांना चांगली पिकं घेता येत नाही.

या गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. पावसाळ्यातील चार महिन्यात हे लोक शेती करतात आणि उरलेल्या आठ महिन्यात ते पुणे, ठाणे यांसारख्या ठिकाणी जाऊन नोकरी करतात. या ठिकाणी भात, वरई, नागली यांसारखी पिके घेतली जातात. गावातील खास आकर्षण हे इथल्या गुहेचे आहे. असे म्हटले जाते की इथल्या एका गुहेमध्ये मांडव्य ऋषींनी तपश्चर्या केली होती. आणि त्यावरूनच त्यांच्या नदीचे नाव मांडवी असे पडलेले आहे. या ठिकाणी पावसाळ्यात खूप जास्त पाऊस असतो आणि धबधबा देखील मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे अनेक लोक या गावाला देखील भेट देतात.

Water Fasting | वॉटर फास्टिंगने होते वजन कमी? जाणून घ्या फायदे आणि तोटे

Water Fasting

Water Fasting | लोकांची बदललेली जीवनशैली, फास्ट फूड खाणे या सगळ्याचा मानवाच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत चाललेला आहे. आणि यातील अगदीच एक सामान्य समस्या म्हणजे लठ्ठपणा. आजकाल बैठेकाम त्याचप्रमाणे सतत प्रक्रिया केलेले अन्न खाणे. यामुळे लोकांचे वजन सातत्याने वाढत चालले आहे. वजन कमी करण्यासाठी प्रत्येकजण काही ना काही उपाय करत असतो. काहीजण डायटिंग करतात. काहीजण एक्सरसाइज करतात रनिंग करतात. परंतु बदलत्या काळानुसार जसे ट्रेण्ड बदलत आहे. तसेच वजन कमी करण्याचे देखील नवनवीन ट्रेंड आता बाजारात आलेली दिसत आहेत.

सध्या वजन कमी करण्यासाठी वॉटर फास्टिंग (Water Fasting) हा उपाय खूप ट्रेंडमध्ये आहे. सोशल मीडियावर आणि इंटरनेटवर देखील वजन कमी करण्यासाठी वॉटर फास्टिंग अत्यंत फायदेशीर आहे. असे सांगितले जात आहे. परंतु आता हे वॉटर फास्टिंग (Water Fasting) म्हणजे नक्की काय आहे? यापासून काय फायदे होतात? याची माहिती आपण जाणून घेऊया.

वॉटर फास्टिंग म्हणजे काय ? | Water Fasting

वॉटर फास्टिंग हा एक प्रकारचा उपवास आहे. यात केवळ पाणी पिले जाते. इतर कोणताही पदार्थ खाल्ला जात नाही. हा एक प्रकारचा अत्यंत कठोर असा उपवास आहे. यामध्ये कुठलीही व्यक्ती फक्त पाणी पिते. त्याशिवाय इतर कोणतेही सॉलिड किंवा लिक्विड पदार्थ खात नाही.

वॉटर फास्टिंगचे फायदे | Water Fasting

वजन कमी होणे

वॉटर फास्टिंग केल्याने वजन झपाट्याने कमी होते. कारण यामुळे शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी शरीरातील जे फॅट्स असतात ते जाळले जातात.

शरीर स्वच्छ होणे

जास्त पाणी पिल्याने आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जाते. त्यामुळे आपले शुद्ध होते. त्यामुळे आपल्या शरीराला आतून स्वच्छ करण्यासाठी वॉटर फास्टिंग करणे खूप गरजेचे असते.

वॉटर फास्टिंग कसे कार्य करते?

वॉटर फास्टिंग करताना आपल्या शरीराला कोणत्याही प्रकारचा अन्नपुरवठा होत नाही. तरी देखील आपले शरीर अत्यंत सुरळीत चालू असते. आपल्याला लागणाऱ्या उर्जेसाठी आपल्या शरीराची उपलब्ध अशी चरबी आहे. त्याचा वापर होते. या प्रक्रियेला केटोसिस असे म्हणतातm केटोसिसदरम्यान शरीरात केटोन बॉडी तयार होतात जे ऊर्जा स्त्रोत म्हणून काम करतात.

वॉटर फास्टिंग करण्यापूर्वी गोष्टी लक्षात ठेवा

  • वॉटर फास्टिंग करणे खूप कठीण आहे यावेळी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
  • वॉटर फास्टिंग करण्यापूर्वी तुमची शारीरिक तपासणी करून घ्या.
  • जर तुम्हाला देखील वॉटर फास्टिंग करायची असेल तर सुरुवात करा आणि कालांतराने कालावधी वाढवा.
  • वॉटर फास्टिंग करताना तुम्ही पुरेसे पाणी पिणे खूप गरजेचे आहे.