Friday, January 2, 2026
Home Blog Page 5664

लग्न कधी करणार? आदित्य ठाकरे म्हणतात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील तरुण आमदारांपैकी एक आमदार अशी ओळख शिवसेनेचे आमदार तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आदित्य ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. सतत तरुणवर्गाशी संपर्क असल्याने तरुणवर्गातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. तसेच बॉलिवूडमधील कलाकारही त्यांना सोशल मीडियावर शुभेच्छा देताना दिसून आहेत. अभिनेत्री दिशा पटाणी हिने सकाळी ट्विटरवरून आदित्य ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा दोघांच्या नात्याबद्दल चर्चा होत आहेत. तसेच आदित्य ठाकरे यांच्या लग्नाचाही विषय निघतो आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील तरुण आमदारांसोबत मुलाखतीत अवधूत गुप्ते यांनी आदित्य ठाकरे यांना लग्न कधी करणार असे विचारले होते त्यावर त्यांनी अत्यंत मिश्किल उत्तर दिले होते.

अवधूत गुप्ते यांनी हा प्रश्न विचारत आदित्य ठाकरेंची गंमत करण्याचा प्रयत्न  केला होता. रश्मी वहिनींनी किती वर्ष जबाबदारी घ्यायची? असे विचारले असता आदित्य ठाकरे यांनी आमदार म्हणून माझी जबाबदारी आईंने मुख्यमंत्र्यांवर सोपवली आहे असे उत्तर दिले होते. यावर दिशा पटाणी हिचे अप्रत्यक्षरीत्या नाव घेत त्यांनी, ‘पण आम्हाला बातम्यांमध्ये काहीतरी दिसत असतं ..’ असे म्हणत ‘उत्तर हमको पटनी चाहिये’ असा गंमतीशीर उल्लेख केला होता. आदित्य ठाकरे यांनीही अगदी शिताफीने तुमची दिशा चुकली आहे असे उत्तर दिले होते. तसेच त्यांनी आईने आधीच जबाबदारी सोडून दिली आहे असेही सांगितले होते. यावर  आमदार धीरज देशमुख यांनी ते एलिजिबल आणि अव्हेलेबल असल्याचे सांगत आहेत म्हणल्यावर उपस्थितांमध्ये हशा फुटला होता.

आता आदित्य ठाकरे कधी आणि कुणासोबत लग्न करणार  येणाऱ्या काळात सर्वाना समजेलच आता मात्र दिशा पटाणी आणि त्यांचे नाव चांगलेच चर्चेत आहे. त्यांच्या वाढदिनी  सर्वानी तो साध्या पद्धतीने साजरा करावा असे आवाहन त्यांनी केले होते. ते राज्याचे पर्यावरण मंत्री आहेत. हा प्रश्न ज्या मुलाखतीत विचारला गेला होता त्यामध्ये धीरज देशमुख, आदिती तटकरे, आदित्य ठाकरे, रोहीत पवार, झिशान सिद्दीकी, ऋतुराज पाटील देखील समाविष्ट होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

अँटी डोपिंग संस्था ‘नाडा’ने पुजारा, जडेजा, केएल राहुलसह ५ क्रिकेटपटूंना बजावली नोटीस

नवी दिल्ली । देशात लॉकडाऊन असताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) ५ क्रिकेटपटूच्या राहण्याच्या ठिकाणाबद्दल माहिती न दिल्याबद्दल राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्था अर्थात नाडाने संबंधित खेळाडूंना नोटीस बजावली आहे. यामध्ये चेतेश्वर पुजारा, लोकेश राहुल, रविंद्र जडेजा या पुरुष खेळाडूंसह महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि दिप्ती शर्मा यांचा समावेश आहे.

बीसीसीआयच्या केंद्रीय करारात समावेश असलेल्या या ५ क्रिकेटपटूंच्या राहण्याच्या ठिकाणाची माहिती न दिल्याबद्दल नाडाने नोटीस दिली आहे. हे ५ खेळाडू जे एनआरटीपीच्या ११० खेळाडूंमध्ये आहेत. बीसीसीआयने या खेळाडूंच्या राहण्याच्या ठिकाणाची माहिती दिली नसल्याने स्पष्टीकरण मागितले आहे, असे नाडाचे नवीन अग्रवाल यांनी सांगितले.

म्हणून ‘नाडा’ने बीसीसीआयला मागितलं स्पष्टीकरण
एनडीएएमएसच्या सॉफ्टवेअरमध्ये आमच्याबद्दल जाणून घ्या (KYC) यासंदर्भातील जो अर्ज आहे तो भरण्याच्या दोन पद्धती आहेत. एक तर खेळाडू स्वत: ते भरू शकात किंवा त्याच्या संघटनेकडून फॉर्म भरणे अपेक्षित असते. काही खेळाडू इतके शिकलेले नसतात किंवा त्यांच्याकडे इंटरनेट नसते. त्यामुळे ते हा फॉर्म भरू शकत नाहीत. त्यासाठी त्यांना संबंधित संघटनेची मदत घ्यावी लागते. त्यामुळेच संबंधित खेळाडूंची संघटना त्यांच्या राहण्याच्या ठिकाणाची माहिती अपलोड करतात. अनेक वेळा क्रिकेटपटूंना देखील हा माहिती भरताना अडचणी येतात. क्रिकेटला देखील असाच नियम लागू आहे. पण संबंधित क्रिकेटपटू शिक्षित आहेत. कदाचित त्यांच्याकडे वेळ नसेल किंवा अन्य काही कारण असेल. त्याच्या राहण्याच्या ठिकाणाची माहिती देण्याची जबाबदारी बीसीसीआयने घेतली होती. पण गेल्या ३ महिन्यांपासून ही माहिती दिली गेली नाही.

बीसीसीआयने दिलं ‘हे’ शुल्लक कारण
५ क्रिकेटपटूंची माहिती दिली गेली नाही यासाठी बीसीसीआयने पासवर्डमध्ये गोंधळ झाला, असे कारण दिले. आता हा प्रश्न मिटवण्यात आला असून यावर बीसीसीआयशी चर्चा केली जाईल. माहिती देण्यास असमर्थ ठरल्याच्या ही तीन पैकी पहिली चूक मानली जाईल. यापुढे बीसीसीआय कशी भूमिका घेते हे पाहावे लागले, असे अग्रवाल म्हणाले.कोरोना व्हायरस लॉकडाऊनच्या काळात खेळाडूंना त्यांच्या राहण्याच्या ठिकाणाची माहिती देणे बंधनकारक आहे. माहिती न देण्याची चूक तीन वेळा केली तर २ वर्षाची बंदी घातली जाऊ शकते.

तर बीसीसीआयने ‘हे’ का केलं नाही?
खर तर हा लॉकडाऊनचा कालावधी होता. संबंधित खेळाडू घरीच होते. त्यातील अनेक जण इस्टाग्राम आणि पॉडकास्ट करताना दिसत होते. जर बीसीसीआयला पासवर्ड संदर्भात काही अडचणी येत होत्या तर त्यांनी संबंधित खेळाडूंना माहिती भरण्यास सांगितले पाहिजे होते. कदाचित यावेळी नाडा ही गोष्ट फार गंभीरपणे घेणार नाही. पण भविष्यात ही गोष्टी अडचणीची ठरू शकते, असे बीसीसीआयमधील एका अनुभवी अधिकाऱ्याने सांगितले.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

“XXX या काल्पनिक कथेसाठी इतका गोंधळ का?” – हिना खान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याला एकता कपूरच्या XXX ही वेब सीरिजची जोरदार चर्चा होते आहे. नुकतेच हिंदुस्तानी भाऊ या युट्युबरने एकता कपूर विरोधात पोलीसांत तक्रार दाखल केली होती. या वेब सीरिजमधील काही दृश्ये ही आक्षेपार्ह असल्याचे त्याचे म्हणणे आहे. यावर एकता कपूरने माफी मागुन हे प्रकरण संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही तिच्यावर होणारी टीका अद्यापही थांबलेली नाही. आता अभिनेत्री हिना खान ही एकता कपूरच्या समर्थनार्थ मैदानात उतरली आहे. “एका काल्पनिक कथेसाठी इतका गोंधळ का?” असा प्रश्न तिने यावेळी उपस्थित केला आहे.

 

“वेब सीरिजमधील काही सीन्समध्ये सैनिकांचा अपमान केला जात असल्याचे सांगितले जात होते. तसेच सैनिकांचा अपमान कोणीही सहन देखील करु नये. अनवधानाने झालेली चुकी दुरुस्त करण्यात आली आहे. मात्र यासाठी एका महिलेला बलात्काराची धमकी दिली जातेय. एखाद्या काल्पनिक कथेसाठी एका महिलेच्या कुटुंबियांना धमकावणं योग्य आहे का? असा प्रश्न यावेळी हिना खाननं विचारला आहे.” हिनाचं हे ट्विट सोशल मीडियावर सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

हे प्रकरण नक्की काय आहे जाणून घेउयात ?
एकता कपूरच्या XXX ही वेब सीरिज आहे. ‘XXX’ या वेब सीरिजच्या दुसऱ्या सिजनमध्ये भारतीय सैन्य दलातील एका सैनिकांची स्टोरी दाखवण्यात आली आहे. यामध्ये हा जवान सिमेवर असताना त्याची बायको इतर पुरुषांसोबत अनैतिक संबंध ठेवताना दाखवण्यात आले आहे. या कथेमुळे समाजात चुकीचा समज पसरत आहे आणि सैनिकांच्या कुटुंबियांचा अपमान होत आहे, असा आरोप करत हिंदुस्तानी भाऊने एकता कपूरच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल केली होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

शाहिद आफ्रिदीला कोरोनाची लागण; गौतम गंभीर म्हणाला…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदी याला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. आफ्रिदीने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याबाबतची माहिती दिली. गेल्या काही महिन्यांपासून आपल्या संस्थेच्या माध्यमातून आफ्रिदी पाकिस्तानातील अनेक गरजू व्यक्तींना मदत करत होता.

तसेच आफ्रिदी गेल्या काही दिवसांपासून आपल्या भारता विरोधी केलेल्या वक्तव्यांमुळेही चांगलाच चर्चेत आला होता. त्यावेळी त्याच्या प्रत्येक वक्तव्याला भारताचा माजी खेळाडू आणि सध्याचा भाजपाचा खासदार असलेल्या गौतम गंभीरने सडेतोड प्रत्युत्तर दिले. त्यामुळे सोशल मीडियावर अनेकदा या दोन्ही खेळाडूंमध्ये शाब्दिक युद्ध सुरु व्हायचं. मात्र आता आफ्रिदीला कोरोनाची लागण झाल्याची बातमीकळल्यानंतर गौतम गंभीरने तो यामधून लवकरात लवकर बरा व्हावा असे म्हंटले आहे.

 

गंभीर पुढे म्हणाला “माझी अशी इच्छा आहे की कोणालाही या विषाणूची लागण होऊ नये. माझ्यात आणि आफ्रिदीमध्ये राजकीय मतभेद असले तरीही त्याने यामधून लवकरात लवकर बरं व्हावं असं मला वाटतंय. आफ्रिदीपेक्षाही आपल्या भारत देशातील प्रत्येक कोरोनाग्रस्त रुग्ण यामधून बरे व्हावे अशी माझी इच्छा आहे.” गौतम गंभीर ‘सलाम क्रिकेट २०२०’ या कार्यक्रमामध्ये बोलत होता.

सध्या पाकिस्तानमध्ये कोरोनाचे एक लाख ३२ हजारहून अधिक रुग्ण झाले आहेत तसेच आतापर्यंत तेथे अडीच हजारहून अधिक जणांचा मृत्यू देखील झाला आहे तसेच ५० हजार पाकिस्तानी या कोरोनामधून पूर्णपणे बरे झालेले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

एकाच दिवसात मुंबई पोलीस दलातील ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

मुंबई । कोरोनाशी सुरु असलेल्या युद्धात लढणाऱ्या खाकी वर्दीतील अनेक योद्ध्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. लॉकडाउन जाहीर झाल्यापासून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस कर्मचारी अहोरात्र ड्युटी बजावत आहेत. पण हे करत असताना अनेकांवर मृत्यू ओढवला आहे. दरम्यान, शनिवारी एकाच दिवशी मुंबईत ४ पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईतील बोरिवली, वाकोला आणि दिंडोशी या पोलीस ठाण्यांमध्ये हे कर्मचारी तैनात होते. मुंबईत आतापर्यंत २६ पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शुक्रवारी हाती आलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात मागील २ दिवसात १२९ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या ३ हजार ३८८ इतकी झाली आहे. आत्तापर्यंत राज्यात ४० पोलिसांचा करोनाची बाधा होऊन मृत्यू झाला आहे. तर ३ हजार ३८८ पैकी आत्तापर्यंत १९४५ पोलिसांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई याबाबत बोलताना म्हणाले, ‘लॉकडाउन जाहीर होऊन ३ महिने होत आले आहेत. पहिल्या दिवसापासून सर्वात जास्त ताण पोलीस दलावर आहे. १८ तास सलग तर काही वेळा २० तास पोलीस अधिकारी आणि कर्मचारी फिल्डवर काम करत आहेत. ५५ पेक्षा जास्त वय असणाऱ्या कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्येच काम करण्यास सांगत आहोत. ज्यांना व्याधी आहेत अशा पोलीस कर्मचाऱ्यांनाही गर्दीत पाठवलं जाऊ नये अशा सूचना आहेत. पण आपल्याकडे गरज आहे त्यापेक्षा कमी पोलीस उपलब्ध आहेत. त्यांचे कामाचे तास कमी व्हावेत यासाठी आपण होम गार्डची मदत घेत आहोत. पोलिसांवरील ताण कमी कसा करता येईल यासाठी प्रयत्न सुरु आहे,’ अशी माहिती शंभुराजे देसाई यांनी दिली.

‘मुंबईत संसर्ग वाढत असताना सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची जबाबादारी पोलीस दलावर आहे. कुठे गर्दी झाली तरी आधी पोलिसांना बोलावलं जातं. गर्दीच्या ठिकाणी पोलीस पोहोचत असतात यामुळे त्यांचा जास्त लोकांशी संपर्क येतो. कर्तव्य बजावत असताना पॉझिटिव्ह असणाऱ्या रुग्णांशी संपर्क आल्यावर त्यांचं निधन होणं खूप वाईट बाब आहे,’ अशी भावनाही शंभुराजे देसाई यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

VIDEO: ‘तो’ प्रसंग पाहून छत्रपती संभाजीराजेंनी शेतात जाऊन ओढलं तिफण; व्हिडिओ व्हायरल

कोल्हापूर । राज्यात सध्या मान्सूनच्या पावसाने हजेरी लावल्यामुळे पेरणीच्या कामांना वेग आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही बळीराजा पेरणीच्या कामाला जोमानं शेतात राबत आहे. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील केर्ली परिसरातील एका शेतात अशीच पेरणी सुरू होती. त्यावेळी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी चक्क शेतात जाऊन शेतकऱ्यांसोबत तिफण ओढली. त्यांचा हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

 

छत्रपती संभाजी राजेंनी आपला अनुभव ट्विटवर शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या, ते म्हणाले,’स्वतःच्या घामाने धरणी मातेला भिजवून जगाला पोसणाऱ्या बळीराजाला किती कष्ट सोसावे लागतात याचा अनुभव घेता आला. तिफणीला ओढताना एका फेरीतच माझा श्वास फुलून गेला. मला लगेच मास्क काढून ठेवावा लागला, असे संभाजीराजे यांनी सांगितले. कोरोनामुळे संपूर्ण जगाला थांबावं लागलं. पण बळीराजाला थांबून चालणार नाही, अन तो थांबणारही नाही इतकंच नाही तर हा अनुभव मला समृद्ध करून गेला. जगाच्या पोशिंद्या शेतकरी राजाचे संपूर्ण जगाने ऋण व्यक्त करत त्यांचा सन्मान केला पाहिजे अशी भावना संभाजीराजे यांनी ट्विटरवर व्यक्त केली.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

 

जिगरबाज कामगिरी! सुरक्षा दलांनी एकाच आठवड्यात १६ दहशतवाद्यांचा केला खात्मा

श्रीनगर । जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे सर्व प्रयत्न हाणून पाडत त्यांचा खात्मा करण्याचा धडाकाच भारतीय सैन्याकडून सुरु आहे. सुरक्षा दलाकडून शनिवारी कुलगाम जिल्ह्यात झालेल्या चकमकीत २ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या भागात शुक्रवार रात्रीपासून चकमक सुरु होती. या चकमकीनंतर दहशतवाद्यांकडून हत्यारं आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे.

या आठवड्यात काश्मीरमध्ये झालेली ही ४थी चकमक आहे. याआधी शोपियाँ जिल्ह्यात ३ वेगवेगळ्या चकमकींमध्ये हिज्बुलच्या काही प्रमुख कमांडरांसह १४ दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं आहे. त्यामुळे या एकाच आठवड्यात १६ दहशतवाद्यांचा भारतीय सुरक्षा दलांनी खात्मा करण्याची जिगरबाज कामगिरी केली आहे.

यावर्षी सुरक्षा दलाकडून मारण्यात आलेल्या दहशतवाद्यांचा आकडा जवळपास ९५ वर गेला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, देशभरात लागू असणाऱ्या लॉकडाऊनच्या काळात म्हणजेच जवळपास १ एप्रिल ते १० जूनपर्यंत जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या विविध चकमक आणि कारवायांमध्ये सुरक्षा दलाकडून जवळपास ६८ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

.. तर राज्य सरकारचा पाठिंबा काढावा! रामदास आठवलेंचा काळजीपोटी काँग्रेसला सल्ला

मुंबई । काँग्रेस पक्षाच्या पाठिंब्यावर महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले आहे. मात्र निर्णय घेताना काँग्रेसला विश्वासात घेतले जात नाही. तसं असेल तर काँग्रेसनं राज्य सरकारचा पाठिंबा काढावा,’ असा सल्ला रिपब्लिकन नेते व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेसला दिला आहे. ते शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी आठवले यांनी महाविकासआघाडी सरकारच्या कारभारावर टीका केली.

महाराष्ट्रात ३ पक्षांचे सरकार असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निर्णय घेण्यात अडचणी येत आहेत. परिणामी त्यांना पूर्ण गतीने काम करता येत नाही. अशातच काँग्रेस पक्ष नाराज असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून ऐकायला मिळत आहेत. काँग्रेसला निर्णयप्रक्रियेत डावलले जात आहे. काँग्रेसच्या ४२ आमदारांच्या पाठिंब्यामुळे हे सरकार अस्तित्त्वात आले. आता त्याचा मित्रपक्षाला डावलणे ही योग्य गोष्ट नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची ही नाराजी दूर केली पाहिजे. अन्यथा काँग्रेस पक्षाने महाविकासआघाडी सरकारचा पाठिंबा काढावा, असे रामदास आठवले यांनी सांगितले.

गुरुवारी काँग्रेसचे सरकारमधील एक मंत्री सुनील केदार यांच्या निवासस्थानी काँग्रेसच्या नेत्यांची बैठकही झाली होती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह सरकारमधील काँग्रेसचे सर्व मंत्री या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीनंतर सरकारच्या निर्णय प्रक्रियेत काँग्रेसला स्थान मिळावं अशी मागणी बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या या नाराजीची दखल घेतली आहे. शुक्रवारी रात्री त्यांनी दूरध्वनीवरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा केली. तर सोमवारी बाळासाहेब थोरात आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे काँग्रेसची नाराजी दूर होईल, असा अंदाज आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

कोरोना लक्षणांमध्ये ‘या’ आणखी काही संभाव्य लक्षणांचा समावेश

नवी दिल्ली । केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून कोरोना लक्षणांमध्ये आणखी काही संभाव्य लक्षणांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये वास घेण्याची, चव घेण्याची शक्ती अचानक नष्ट होणं या लक्षणांचा कोरोनाच्या नव्या लक्षणांमध्ये समावेश करण्यात आला आहे. तोंडाची चव जाणं, कोणत्याही प्रकारचा वास, गंध न येणं ही कोरोनाची नवी लक्षणं असल्याचं आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.

विशेषज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, ही लक्षणं विशेषत: कोरोना संबंधित नाहीत. कारण फ्लू, ताप किंवा इन्फ्लूएन्झामुळेही (शीतज्वर) व्यक्तीची वास किंवा चव घेण्याची क्षमता बिघडते. परंतु ही कोरोनाची प्राथमिक लक्षणं असू शकतात. ही लक्षणं आढळल्यास त्यानुसार, त्वरीत उपचार करण्यासाठी मदत होऊ शकते. कोरडा खोकला, ताप, श्वसनविषयक समस्या, अशी कोरोना व्हायरसची सुरुवातीची लक्षणं आहेत. त्याशिवाय सांधेदुखी, तीव्र डोकेदुखी, घसा सुजणं, घशाला सूज येणं, घसा खवखवणं, अतिसार, धाप लागणे, कफ, थकवा येणं ही देखील कोरोनाची लक्षण असू शकतात.

कोरोना टेस्ट झाली आणखी स्वस्त; ठाकरे सरकारनं केली ५० टक्के दर कपात

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

 

होय! देशात कोरोनाचा समूह संसर्ग झालाय, केंद्र सरकारने हे सत्य स्वीकारलं पाहिजे- तज्ज्ञ

नवी दिल्ली । भारतात कोरोनाचा समूह संसर्ग झाला आहे, ही बाब आता केंद्र सरकारने स्वीकारली पाहिजे. ही गोष्ट नाकारण्यात अर्थ उरलेला नाही, असे मत ‘एम्स’चे माजी संचालक डॉ. एम.सी. मिश्रा यांनी व्यक्त केले. ‘आऊटलूक’ मासिकाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, सरकारनं पुढे येऊन समूह संसर्ग झाल्याचं मान्य करण्याची वेळ आली आहे. सरकारच्या अडथळ्यामुळे हे सत्य स्वीकारलं जात नाही. समूह संसर्ग झाल्याचं सत्य केंद्र सरकारनं स्वीकारावं, जेणेकरून लोक गैरसमजात राहणार नाहीत आणि अधिक काळजी घेतील.जर देशात समूह संसर्ग झाला नसता तर दररोज १० हजार नवे रुग्ण कुठून सापडत आहेत? त्यामुळे देशात समूह संसर्ग झाला नाही, अशा थाटात वावरणे म्हणजे डोळे झाकून घेण्यासारखे आहे. आपण योग्यप्रकारे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग न केल्यामुळेच भारतात कोरोनाचा समूह संसर्ग झाला असंही डॉ. मिश्रा यांनी सांगितलं.

कोरोनाचा प्रसार वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं देशात लॉकडाउन लागू केला होता. ४ टप्प्यानंतर लॉकडाउन शिथिल करण्यास सुरूवात केली. मात्र, दुसरीकडं करोना बाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे समूह संसर्ग झाल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. मात्र, आयसीएमआरनं हा दावा फेटाळून लावला होता. आयसीएमआरनं वृत्त फेटाळल्यानंतर देशातील अनेक भागांमध्ये समूह संसर्ग झाला असल्याचा दावा डॉ. मिश्रा यांनी केला आहे.

काही दिवसांपूर्वीच ‘एम्स’मध्ये ४०० निवासी डॉक्टर, प्राध्यापक आणि त्यांच्या नातेवाईकांना कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली. यापैकी बहुतांश जणांनी आपल्याला रुग्णालयात नव्हे तर बाहेर असताना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे सांगितले. बाहेर असताना त्यांना कोरोनाची लागण झाली याचा अर्थ हा समूह संसर्ग आहे. कारण यापैकी कोणीही परदेशातून प्रवास करुन परतले नव्हते, याकडे डॉ. मिश्रा यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर अनेकजण घराबाहेर पडल्याने रुग्णांची संख्या वाढली आहे. ज्या भागात एकही रुग्ण नव्हता, तिथेही करोनाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सरकारने पुढे येऊन समूह संसर्ग झाल्याचं मान्य करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे लोक गैरसमजात राहणार नाही आणि अधिक काळजी घेतील, असे डॉ. मिश्रा यांनी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”