Thursday, January 1, 2026
Home Blog Page 5673

महसूल विभागातील कर्मचाऱ्याचा मुलगा वाळू तस्करीच्या प्रकरणात फरार; 40 लाखांची वाळू जप्त

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी |

अवैद्य वाळू माफियांच्या वर उंब्रज पोलिसांची धडक कारवाई करत मसूर व वाण्याचीवाडी मधून 40 लाख 51 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यावेळी १ जणाला अटक करण्यात आली आहे. संबंधीत बेकायदा वाळु उपसा प्रकरणात कराड महसुल विभागातील कर्मचाऱ्याचा मुलगा असल्याने प्रशासकिय स्थरावर हे प्रकरण दडपणयाचे प्रयत्न सुरु असुन जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालणेची मागणी नागरिकांमधुन होत आहे

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वाण्याची वाडी ता. कराड येथील सार्वजनिक ओढ्याच्या पात्रात दहा तारखेला मध्यरात्री 12 वाजता अवैद्य वाळूचे चोरून उत्खनन सुरू असल्याचे नियुक्त पथकाला माहिती मिळाली. त्यानुसार केलेल्या कारवाईत वाळू उपसा करत असलेले दोन जण दिसून आले. नियुक्त पथकाने त्यांच्याकडे विचारणा केले असता एक जण पळून गेला तर दुसऱ्याला जागेवरच पकडला असून त्याचे नाव तुषार वसंत यादव वय.27 व मुळगाव काले असून सध्या संतोषी माता नगर मसूर येथे राहत असल्याचे सांगितले.

सदर वाळू तस्करांकडून 40 लाख 51 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल तीन ब्रास वाळू आणि मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. या कारवाईत तुषार यादव व अमित चंद्रकांत पारवे यांचे विरुद्ध कोणत्याही शासकीय परवान्याशिवाय चोरून वाळू उत्खनन करणे आणि चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला असून तुषार यादव यास अटक करण्यात आली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश मयेकर करीत आहेत.

तसेच अकरा तारखेला रात्री दोन वाजता मसूर येथे चिखली रोडवर विनोद कांबिरे राहणार कांदेवाडी आणि आकाश अधिकराव चव्हाण राहणार चिखली हे नंबर प्लेट नसलेल्या ट्रॅक्टर डम्पिंग मधून वाळूची वाहतूक करीत असताना पकडले. त्यांना विचारपूस करीत असताना ट्रॅक्टर चालक विनोद कांबिरे हा वाळू सह ट्रॅक्टर घेऊन पळून गेला. त्याच्यावर वाळूचोरी व शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपी आकाश चव्हाण यास अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जाधव करीत आहेत.

वरील दोन्ही ठिकाणची कारवाई उंब्रचे पोलीस निरीक्षक व प्रभारी अधिकारी अजय गोरड यांना गोपनीय मिळालेल्या माहितीनुसार नियुक्त पथकाने कारवाई केली आहे. पथकातील सहाय्यक फौजदार गणेश भोसले, हवालदार राजेंद्र साळुंके, कॉन्स्टेबल दत्तात्रय लवटे, अभिजीत पाटील ,अनिल देशमुख, अमोल निकम स्वप्नील मोरे यांचा कारवाईत सहभाग होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

लोणार सरोवरावचे पाणी लाल रंगाचे होण्याचे कारण काय? घ्या जाणुन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील प्रसिद्ध असणारे, जगामध्ये आश्चर्य मानले जाणारे लोणार सरोवर हे गेल्या ३-४ दिवसांपासून लाल रंगाचे झाले आहे. याबाबत जेव्हा येथील तहसीलदार सैफन नदाफ यांना समजले तेव्हा त्यांनी तात्काळ या पाण्याचे नमुने घेऊन वनविभागाला तपासणी साठी पाठविले होते. जगातील तिसऱ्या आणि देशातील पहिल्या क्रमांकाचे हे सरोवर लाल झाल्याने याची चर्चा संशोधक तसेच अभ्यासकांमध्ये होते आहे. मात्र यामुळे घाबरून जाण्याचे काही कारण नाही अशी माहिती मी लोणारकर टीमचे सदस्य तसेच पर्यावरण प्रेमी संतोष जाधव यांनी दिली आहे. एरवी उल्कापातामुळे तयार झालेल्या बेसाल्ट खडकातील या खाऱ्या पाण्याच्या सरोवराच्या गुणधर्मामुळे अभ्यासकांची रेलचेल या परिसरात असते.

नेहमी अभ्यासक आणि पर्यटक यांची गर्दी असणारे हे सरोवर गेले काही दिवस कोरोनामुळे शांत आहे. गेल्या ३-४ दिवसांपासून या सरोवराचे पाणी लाल रंगाचे झाल्यामुळे सरोवर चर्चेत आले आहे. १० ते ११ पीएच कायम असणाऱ्या या सरोवराचे पाणी कधी वाढते तर कधी कमी होते. आता या सरोवराचे पाणी लाल झाले आहे. मात्र मागच्या वर्षीदेखील दोन दिवस या सरोवराच्या पाण्याचा रंग लाल झाला होता अशी माहिती संतोष जाधव यांनी दिली आहे. डूनालिएला सलीना (dunaliella salina) या शैवालामुळे हा रंग बदलला असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या वर्षी सरोवरातील पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात झाले होते. तसेच सध्याच्या दमट वातावरणामुळे हे शैवाल निर्माण झाले आहे. तसेच वातावरण पूर्ववत झाल्यावर तसेच पावसाचे ताजे पाणी सरोवरात पडल्यावर पाण्याचा रंग पूर्वीसारखा होईल असे त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान लोणार सरोवर संवर्धन व विकास समितीचे सदस्य गजानन खरात यांनी ‘१०.५ पीएच असूनही या सरोवरात एक परिसंस्था तयार झाली आहे. स्पिरुलिना नावाचे घटक असणारे शैवाल या सरोवरात आहे अशी माहिती दिली. उमरिया नावाचे एक सरोवर इराणमध्ये आहे ज्याचे पाणी लाल आहे. अभ्यासातून मिळालेल्या माहितीनुसार वातावरणातील बदलामुळे पाण्याचा खारटपणा वाढून पाणी लाल होते. अशी माहिती समोर आल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या १० वर्षपासून या सरोवराचे पाणी कमी होत आहे. त्यामुळे कदाचित पाण्याचा खारटपणा वाढला असावा असे त्यांनी सांगितले. व अभ्यासातून पाणी का लाल होते आहे हे ही लवकरच समजेल असेही ते म्हणाले. मात्र पाणी लाल होत असल्याने घाबरण्याचे काही कारण नाही अशी माहिती यावेळी देण्यात आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

११ जून १९७५ याच दिवशी भारताने नोंदवला विश्वचषकातील आपला विजय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आतापर्यंत क्रिकेटच्या इतिहासात भारतीय संघाने एकूण तीन वेळा विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. १९८३ साली भारताने कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिज चा पराभव करून वन डे विश्वचषक पटकावला होता. तर त्यानंतर भारताने २००७ साली टी २० विश्वचषक आणि २०११ साली आपल्या दुसऱ्या वन डे विश्वचषकावर महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली नाव कोरले. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात हे तीनही दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहेत. मात्र त्याचवेळी ११ जून १९७५ या दिवसाला भारतीय क्रिकेटमध्ये एक अनन्यसाधारण महत्त्व आहे.

Srinivas Venkataraghavan - 1975 and 1979

पहिल्यावहिल्या क्रिकेट विश्वचषकाचे आयोजन १९७५ मध्ये करण्यात आले होते. या स्पर्धेआधी १९७४ मध्ये भारताने इंग्लंडविरुद्द दोन वन डे सामने खेळले होते, ज्यात भारताचा पराभव झाला होता. भारताने त्यावेळी श्रीनिवासराघवन व्यंकटराघवन यांच्या नेतृत्वाखाली या विश्वचषक स्पर्धेत सहभाग घेतला होता. यावेळीच्या स्पर्धेत एकूण आठ संघ होते. १९७५ च्या या विश्वचषक स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात इंग्लंडने भारताचा २०२ धावांनी दणदणीत पराभव केला. मात्र त्यानंतर झालेल्या पूर्व आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारताने जोरदार मुसंडी मारताना वन डे विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासातील आपला पहिला विजय नोंदविला होता. ती तारीख होती ११ जून १९७५…

१९७५ च्या विश्वचषक स्पर्धेत वन डे सामने हे ६०-६० षटकांचे खेळवले गेले तसेच प्रत्येक संघाच्या गोलंदाजांना १२-१२ षटके टाकण्याची परवानगी होती. पूर्व आफ्रिकेने भारताविरूद्धच्या सामन्यात या नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतासाठी वेगवान गोलंदाज मदन लाल आणि सय्यद अबिद अली यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करत संघाला चांगली सुरुवात करून दिली होती.

India At The 1975 World Cup - When Players Went on a Holiday

त्या काळातील भारतीय संघातील स्टार फिरकी गोलंदाज बिशन सिंग बेदी यानेही जोरदार कामगिरी करत आफ्रिकन फलंदाजांना धावा करण्याची फारशी संधीच दिली नाही. बेदीने आपल्या १२ षटकांमध्ये केवळ ६ धावा दिल्या आणि एक बळी टिपला. त्याने ८ षटके निर्धाव टाकली. त्यामुळे पूर्व आफ्रिकेचा संघ हा केवळ १२० धावांवरच तंबूत परतला. १२१ धावांच्याया लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाला सुनील गावस्कर आणि फारूक इंजिनिअर या सलामीवीरांनी ३० व्या षटकातच विजय मिळवून दिला आणि हा सामना १० गडी राखून जिंकवून दिला. या सामन्यात गावसकरने नाबाद ६५ तर फारूक इंजिनियरने नाबाद ५४ धावा फटकावल्या होत्या.

June 7, 1975: Gavaskar's 174-ball 36* in first ever World Cup ...

या स्पर्धेततील तिसर्‍या सामन्यात भारताला न्यूझीलंडविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. या पुढेही भारतीय संघ स्पर्धेत काही खास कामगिरी करू शकला नाही आणि विजेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडला. या विश्वचषकातील अंतिम सामना हा इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये खेळला गेला. त्या अंतिम सामन्यात इंग्लंडला १७ धावांनी पराभूत करत वेस्ट इंडिजने हा पहिलावहिला विश्वचषक जिंकला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ, पण केंद्रानं समूह संसर्गाची शक्यता नाकारली

नवी दिल्ली । मागील काही दिवसांपासून देशात विशेषकरून मुंबई आणि दिल्लीत कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याने समूह संसर्ग होण्यास सुरुवात झाली असल्याची भीती व्यक्त केली जात होती. दरम्यान, केंद्र सरकारने देशात कोरोना समूह संसर्गाला सुरुवात झाली नसल्याचे सांगितलं आहे. ‘भारत खूप मोठा देश आहे आणि त्यादृष्टीने प्रभाव कमी आहे. भारतात समूह संसर्ग झालेला नाही,’ अशी माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक बलराम भार्गव यांनी दिली आहे.

आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावेळी लॉकडाउन लागू केल्याने कोरोनाचा वेगाने होणारा फैलाव रोखण्यात यश मिळाल्याचं अधोरेखित केलं. ‘शहरी भागात करोनाचा फैलाव थोडा जास्त झाला आहे. पण लॉकडाउन करत आपण जी पावलं उचलली त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यात आणि वेगाने त्याचा होणार फैलाव थांबवण्यात यश मिळालं,’ असं बलराम भार्गव यांनी सांगितलं आहे.

राज्यांनी सुरक्षेची काळजी घेणं गरजेचं असून त्यात शिथीलता आणली जाऊ शकत नाही. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्यांनी पाळत ठेवण्यासोबतच नव्या योजना आखण्याची गरज असल्याचं आरोग्य अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं.’आज देशात रिकव्हरी रेट ४९.२१ टक्के आहे. उपचार घेऊन बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या कोरोनाच्या अक्टिव्ह रुग्णांपेक्षा जास्त आहे. ही दिलासा देणारी गोष्ट आहे’ असं आरोग्य मंत्रालयाचे सह-सचिव लव अग्रवाल यांनी यावेळी बोलताना सांगितलं.

दरम्यान, देशात कोरोनासंबंधी रोज नवे रेकॉर्ड नोंदवले जात आहेत. मागील २४ तासांत कोरोनामुळे ३५७ जणांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसात इतक्या जणांच्या मृत्यूची नोंद होण्याची ही पहिलीच वेळ आहे. तर दुसरीकडे सर्वाधिक ९ हजार ९९६ रुग्णांची नोंद झाली. तसेच १ जूनपासून १० जूनपर्यंत सुमारे ९० हजार कोरोनाचे रुग्ण वाढल्याचे वृत्त समोर आलं आहे. तर नुकतेच दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिल्लीत समूह संसर्गाला सुरुवात झाली असं सांगितलं. तसेच जून अखेरपर्यंत दिल्लीत कोरोनाग्रस्तांची संख्या साडे ५ लाखापर्यंत पोहचेल असं म्हटलं आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

 

मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमधील दुकानांना भीषण आग

मुंबई । दक्षिण मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट परिसरात भीषण आग लागली आहे. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास ही आग लागली असून आगीमागचं कारण अद्यापही समजलं नाही आहे. मार्केट परिसरातील आगीचं स्वरुप आणि धुराचे प्रचंड लोट पाहता ही आग मार्केट इमारतीच्या बहुतांश भागात पसरल्याचं कळत आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवळपास ६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग लागल्याच्या घटनेनं क्रॉफर्ड मार्केट परिसरात एकच गोंधळ आणि भीती पाहायला मिळाली.

प्राथमिक माहितीनुसार सायंकाळच्या सुमारास ही आग लागल्याचं कळत आहे. मार्केटमध्ये असणाऱ्या ४ गाळ्यांना ही आग लागली ज्यानंतर ती वेगानं परसरल्याचं म्हटलं जात आहे. आग लागली त्याचवेळी तातडीनं अग्निशमन दलाला याची माहिती देण्यात आली. ही आग लेवल २ म्हणजेच मध्यम स्वरुपाची असल्याची माहिती समोर येत आहे.

अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठीचे प्रयत्न सुरु असून, त्यांना बऱ्याच अंशी यशही मिळालं आहे. या आगीत सौंदर्य प्रसाधनं आणि स्टेशनरी साहित्याच्या ५ ते ६ दुकानांचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान आग इतक्या भीषण स्वरुपानं पसरत गेली की आगीच्या विळख्यात मार्केटमधील अनेक दुकानं आल्याचं म्हटलं जात आहे. मुंबईतील गजबजलेल्या परिसरात असणाऱ्या या मार्केट परिसरात गुरुवारी तुलनेने गर्दी कमी होती.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

 

 

कोकण दौऱ्यानंतर शरद पवारांनी सरकारला दिला ‘हा’ मास्टर प्लान; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यासोबत २ तास चर्चा

मुंबई । राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी नुकताच दोन दिवसीय दौरा केला. या नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीत व स्थानिकांशी केलेल्या संभाषणाद्वारे प्राप्त झालेल्या माहितीबाबत त्यांनी आज राज्याचे मा. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. या बैठकीत नुकसान भरपाईत वाढ करण्याच्या मुद्द्यास प्राधान्य देण्यात आले. सर्व भागातील नुकसान पाहता प्रत्यक्षात घटनास्थळी पंचनामे करून त्याची आकडेवारी घ्यायला हवी. यात सर्वप्रथम विद्युत व पाणी पुरवठा कसा सुरळीत करता येईल यावर भर द्यायला हवा. अशी चर्चा झाली.

बैठकीत या भागातील फळबागांच्या पुनरुज्जीवनासाठी स्पेशल पॅकेज जाहीर करण्याची निकड मा. मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास पवार यांनी आणून दिली. जेणेकरून या भागातील शेतकरी पुन्हा उभारी घेऊ शकेल. यासाठी केंद्र सरकारकडे मदतीचा प्रस्ताव पाठवण्याची वेळ आल्यास तेदेखील करावे लागेल, असेही ते म्हणाले. त्यांनी यावेळी चक्रीवादळात उद्ध्वस्त झालेल्या फळबागा पुन्हा उभ्या करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची जुनी रोजगार हमी योजना लागू करून, फळबाग लागवड योजनेशी त्याची सांगड घातल्यास हा मार्ग अधिक उपयुक्त ठरू शकेल अशी सूचना बैठक दरम्यान केली. या चक्रीवादळात घरे, बागा यांचे मोठे नुकसान झाले आहे. भिंती-छप्परे आणि झाडे पडल्याने अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे निर्माण झाले आहेत. हे कचऱ्याचे ढिगारे साफ करून घरे, बागा व दुकाने स्वच्छ करावी लागतील. हे मोठे काम असल्याने यासाठी रोजगार हमी योजनेचा वापर करण्याबाबतही या बैठकीत चर्चा झाली.

अन्नधान्य पुरवठा विभागाकडून पीडितांना सध्या ५ किलो तांदूळ वा गहू आणि १ लिटर केरोसिन इतकी विनामूल्य मदत देण्यात येतेय. या भागातील विद्युत व्यवस्था पूर्ववत होण्यास महिन्याचा अवधी लागेल अशी माहिती आहे. त्यामुळे प्रत्येक पीडित कुटुंबाला किमान ५ लिटर केरोसिन दरमहा देण्याची गरजअसल्याचे त्यांनी सुचविले. तसेच पर्यटनक्षेत्राला मोठ्या प्रमाणात निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसला आहे. दिवेआगर, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दापोली, अलिबाग, मुरूड-जंजिरा वगैरे भागात कोरोनापाठोपाठ चक्रीवादळामुळे पर्यटन व्यवसाय अडचणीत आला आहे. त्यामुळे पर्यटनाला चालना देण्यासाठी उपाययोजना करण्यावर भर देण्याची गरज वाटते, असेही त्यांनी सांगितले. याबरोबरच बहुतांश भागातील बँका बंद असल्याने नागरिकांच्या हाती पैसे नाहीत. शेती व इतर व्यवसायांचे जुन्या कर्जांचे हफ्ते भरण्यासाठी तसेच नवीन कर्ज देण्यासाठी बँका सुरू होणे गरजेचे आहे. तसेच नवीन कर्ज घेताना संबंधित बँकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून काही सवलती देता येतील का हे पाहणे जरूरी आहे. अशी चर्चा यावेळी झाली.

दिल्लीत पुन्हा लॉकडाऊन? केजरीवालांची अमित शहांशी चर्चा

नवी दिल्ली । दिल्लीत लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर होणारी गर्दी आणि कोरोनाबाधितांची वाढती संख्या यामुळे सरकारपुढे पुन्हा लॉकडाऊन करण्याशिवाय गत्यंतर नसल्याचं दिसायला लागलं आहे. त्यामुळे दिल्लीतही लॉकडाऊन पुन्हा लागू करण्याचा विचार मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल करत असून त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी त्याबाबत चर्चाही केली आहे.

लॉकडाऊन उठवल्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे ३१ जुलैपर्यंत दिल्लीत साडे ५ लाखांपेक्षा अधिक रुग्ण असतील असा अंदाज आहे. त्यामुळे कोरोना रोखायचा असेल तर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही, असं केजरीवाल सरकारला वाटत आहे. दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रायव्हेट हॉटेल, बँक्वेट हॉल, स्टेडियमचा वापर क्वारंटाईन सेंटर आणि कोविड सेंटरसाठी केला जाऊ शकतो अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, दिल्लीत कोरोनाबाधितांची संख्या ३२ हजारांवर पोहचली आहे. गेल्या २४ तासांत १५०० नवे रुग्ण दिल्लीत आढळून आले. दिल्लीत आतापर्यंत कोरोनामुळे ९८४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत मागील ७ दिवसांत ९ हजार ५०० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. देशभरात लॉकडाऊनचे ४ टप्पे झाल्यानंतर देशभरात अनलॉकचा पहिला टप्पा सुरु करण्यात आला. त्यात प्रमुख रेल्वे सेवा आणि मेट्रो सेवा बंद ठेवल्याने सगळा भार सार्वजनिक बस वाहतूक आणि रस्ते वाहतुकीवर येऊ लागला आहे. त्यातून सोशल डिस्टसिंगचे तीन-तेरा वाजत असून कोरोना पसरण्याची भीती आणखी वाढली आहे. मुंबईत गर्दी पाहता पुन्हा लॉकडाऊन करावे लागेल असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दिला. तर दिल्लीतही लॉकडाऊन पुन्हा लागू करण्याचा विचार मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल करत आहेत.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

SBI मध्ये प्रथमच ‘या’ पदाची भरती; पगार तब्बल १ कोटी‌ रुपये

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी बँक म्हणून स्टेट बँक ऑफ इंडियाची ओळख आहे. या बँकेने सध्या एका मोठ्या पदासाठी भरती करण्याची घोषणा केली आहे. मुख्य वित्त अधिकारी (सीएफओ) असं हे पद असून SBIकडून नमूद केल्याप्रमाणे, या पदासाठी वार्षिक पगार १ कोटी दिला जाणार आहे. सहाजिकच पगाराप्रमाणे जबाबदारी देखील फार मोठी असणार आहे. महत्त्वाची गोष्टी ज्या व्यक्तींना १५ वर्षांपेक्षा जास्त अनुभव फक्त तिच व्यक्ती या पदासाठी अर्ज भरू शकते. एसबीआय एवढ्या मोठ्या पदासाठी पहिल्यांदा बाहेरच्या उमेदवाराला नियुक्त करत आहे. सध्या बँकेचे सीएफओ हे सी व्यंकट नागेश्वर आहेत जे उप-व्यवस्थापकीय संचालक आहेत.

SBI, CFO पदासाठी लागणारी पात्रता आणि अनुभव
मुख्य वित्त अधिकारी (सीएफओ) पदासाठी एसबीआयने पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. या पदावर करारानुसार नियुक्ती करण्यात येणार आहे. शिवाय पदासाठी वार्षिक पगार १ कोटी दिला जाणार आहे. CFO पदावरील अधिकाऱ्याचा पगार अध्यक्षाच्या पगारापेक्षा देखील अधिक असतो. करारात नमुद केलेल्या सूचनेनुसार या महत्त्वाच्या पदाचा कालावधी ३ वर्षांचा असणार आहे. सूचनेनुसार १ एप्रिल २०२० पर्यंत उमेदवाराकडे १५ वर्षांचा अनुभव असण्याची गरज आहे. शिवाय उमेदवाराकडे बँक किंवा मोठ्या कंपन्या, सार्वजनिक उपक्रम, आर्थिक संस्थामध्ये काम केल्याचा अनुभव असने बंधनकारक असणार आहे. त्याचप्रमाणे ५ वर्ष वरिष्ठ पदावर काम करण्याचा देखील अनुभव असायला हवा.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

लॉकडाउनचा इस्रोच्या ‘मिशन गगनयान’ मोहिमेला फटका

बेंगळुरू । कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनचा अनेक क्षेत्रांना बसला आहे. त्यात अवकाश संशोधन क्षेत्राचाही समावेश झाला आहे. चांद्रयान मोहीम शेवटच्या टप्प्यात अयशस्वी झाल्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं (ISRO) मिशन गगनयान मोहिमेवर काम सुरू केलं आहे. भारताची ही पहिली मानवरहित अवकाश मोहीम आहे. या मोहिमेवर काम सुरू असताना देशात लॉकडाउन झाला. त्याचा परिणाम मिशन गगनयानवर होण्याची चिन्ह आहेत. यासंदर्भात ‘पीटीआय’ वृत्तसंस्थेनं इस्रोच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं वृत्त दिलं आहे.

‘कोरोनामुळे काही प्रमाणात व्यत्यय आला आहे. पण अजून निश्चितपणे तसं सांगता येणार नाही. आमच्याकडे अजून सहा महिन्यांचा कालावधी आहे, त्यामुळे अंदाज घेण्याची गरज आहे. आम्ही ते जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. मिशन गगनयान मोहिमेच्या वेळापत्रकात थोडा बदल होऊ शकतो. पण, संपूर्ण मूल्यमापन केल्यानंतरच हे लक्षात येऊ शकेल. सध्या याबाबत निश्चित काही सांगता येणार नाही. कारण या मोहिमेवर काम करणाऱ्या पथकानं अद्याप विलंब होण्याबद्दल कोणतेही संकेत दिलेले नाहीत,’ असं इस्रोच्या अधिकाऱ्यानं ‘पीटीआय’शी बोलताना सांगितलं.

इस्रोनं सध्या मिशन गगनयान मोहिमेवर लक्ष केंद्रीत केलं आहे. या मोहिमेतंर्गत सुरूवातीला मानवरहित दोन फ्लाईट्स पाठवण्याचं नियोजन संस्थेनं केलं आहे. यातील पहिली फ्लाईट्स डिसेंबर २०२० मध्ये, तर दुसरी फ्लाईट जुलै २०२१ मध्ये पाठवण्यात येणार आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

सरकारमध्ये निर्णय प्रक्रियेत स्थान द्या! काँग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई । राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये नाराज असलेल्या काँग्रेसच्या मंत्र्यांची आज मुंबईमध्ये बैठक पार पडली. काँग्रेसचे मंत्री सुनील केदार यांच्या मुंबईतील निवासस्थानी काँग्रेसच्या मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीला बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, वर्षा गायकवाड, सतेज पाटील, नाना पटोले, विजय वडेट्टीवार हे मंत्री उपस्थित होते. या बैठकीनंतर ‘काही प्रश्न नक्कीच आहेत. सरकारमध्ये निर्णय प्रक्रियेत स्थान मिळायला पाहिजे’, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली. ही गोष्ट मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालू, असंही थोरात यावेळी म्हणाले.

राज्याचे काही प्रश्न घेऊन एकत्र चर्चा केली. चक्रीवादळ झालं त्या पाहणीसाठी विजय वडेट्टीवर गेले होते. सरकार म्हणून सुद्धा आमचे काही प्रश्न आहेत. मुख्यमंत्र्यांसाठीही आमचे काही प्रश्न आहेत. आम्ही तीन पक्ष आहोत. आमच्याही काही मागण्या आहेत. निर्णय प्रक्रियेत आम्हाला सामील करणं अपेक्षित आहे, त्याबद्दल मुख्यमंत्र्यांशी बोलू,’ असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.

दरम्यान, महाविकासआघाडीचं सरकार चालवताना निर्णय प्रक्रियेत स्थान मिळत नसल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे. कोरोनाच्या संकटात घेण्यात येणारे निर्णय तिन्ही पक्षांची चर्चा करून घेणं काँग्रेसला अपेक्षित आहे. सध्याच्या निर्णय प्रक्रियेत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व दिसतंय, त्यामुळे निर्णयांमध्ये सहभागी नसल्याची काँग्रेसची धारणा झाली आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in