Thursday, January 1, 2026
Home Blog Page 5674

ठाकरे सरकारला जागे करण्यासाठी मनसेचे हॉर्न वाजवा आंदोलन

मुंबई । कोरोना संकट आणि त्यात लॉकडाऊमुळे डबघाईला आलेल्या वाहतूक व्यवसायाला पुन्हा उभारी मिळावी यासाठी राज ठाकरे यांच्या मनसेने दंड थोपटले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशावरुन एका अभिनव आंदोलनाने राज्य सरकारला जागे करायचे आहे. शुक्रवार १२ जूनला संध्याकाळी ५ वाजता हे आंदोलन करण्यात येणार आहे. मनसे नवनिर्माण वाहतूक सेनेच्यावतीने फक्त १ मिनिट हॉर्न वाजवणार आहे अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना अध्यक्ष संजय नाईक यांनी दिली आहे.

‘फक्त एक मिनिट हॉर्न वाजवा आंदोलन’ हे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांची स्वतःची लढवय्या ओळख दाखवणारे आंदोलन असेल,’ असे संजय नाईक यांनी सांगितलं आहे. कोरोनामुळे आधीच संकट ओढवले आहे. वाहतूक व्यवसाय अडचणीत आला आहे. त्यामुळे वाहतूक व्यवसायातील सर्वांचा आक्रोश बहीऱ्या राज्य सरकारच्या कानावर जावा, झोपेचं सोंग घेतलेलं राज्य सरकार खडबडून जाग व्हावे यासाठी हे आंदोलन आहे, अशी माहिती संजय नाईक यांनी दिली.

महाराष्ट्र सैनिकांनी तसेच वाहनचालक-मालकांना आवाहन करण्यात आले आहे. मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे. आंदोलन करताना #MNSHornOKPlease हा हॅशटॅग वापरा आणि आंदोलन यशवी करावे, असे आवाहन संजय नाईक यांनी केले आहे. त्याचवेळी हे आंदोलन एक संधी आहे. ज्यांनी ज्यांनी आपल्या पक्षाला, आपल्याला डिवचलं आहे, चिडवलं आहे त्यांना आपली लढवय्या ओळख दाखवण्याची संधी असल्याचे ते म्हणालेत.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

अमेरिकेतील गेम डिझायनर तरुणाने बनवला LED मास्क; तुम्ही बोलताय कि हसताय ‘हे’ समजणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात सुरु असलेल्या लॉकडाउनमुळे कोरोना विषाणूचा या साथीच्या रोगाला रोखण्यात काही प्रमाणात यश मिळालेले आहे परंतु केवळ तेच या व्हायरसपासून बचाव करण्यासाठी पुरेसे नाही आहे. एका ताज्या अभ्यासानुसार असा दावा केला आहे की, लॉकडाउन बरोबरच फेस मास्क लावला तर हे टाळता येते. जरी बाजारात अनेक प्रकारचे मास्क मिळत आहेत, मात्र सोशल मीडियावर यावेळी एक खास प्रकारच्या मास्कची चर्चा होते आहे, ज्यामध्ये एलईडी बसविण्यात आली आहे.

हा फेस मास्क अमेरिकन गेम डिझायनर आणि प्रोग्रामर टायलर ग्लेयल याने तयार केला आहे. द न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, हा मास्क लावताच प्रकाश पडेल. या कपड्याच्या मास्कमध्ये एकूण १६ एलईडी लाइट आहेत. ही लाइट आपण कधी बोलतो आणि केव्हा आपण गप्प असतो हे सांगेल. आपण हसल्यानंतर या मास्क समोर स्माइली सिम्बॉल तयार केले जाते. या मास्कची किंमत सुमारे ३८०० रुपये असल्याचे सांगितले जाते.

 

अशी सुचली कल्पना
अमेरिकन प्रोग्रामर टेलरच्या म्हणण्यानुसार अचानक असा मास्क बनवण्याची कल्पना त्याच्या मनात आली. तो म्हणतो, ‘मला असा मास्क ऑनलाईन सापडला नाही,त्यामुळे मी तो स्वतः तयार केला. यात ९-वॉल्टची बॅटरी आहे जी एलईडी पॅनेलला सपोर्ट देते. या मास्कमध्ये एलईडीशी जोडलेला एक व्हॉईस पॅनेल आहे. जेव्हा एखादा माणूस बोलतो आणि शांत बसण्यासारखे वागतो तेव्हा ही लाईट लागते. टेलर म्हणतो, “मी आत्ता ते फक्त माझ्यासाठीच बनवले आहे. माझी आत्ता त्याला विकण्याची कोणतीही योजना नाही.”

मास्क धुण्यापूर्वी लाईट काढली जाऊ शकते
टेलर म्हणतो की, ‘ हा मास्क कपड्याने बनलेला आहे, म्हणूनच तो वॉशेबल देखील आहे. जेव्हा त्याला धुवायचे असेल तेव्हा ते लाइटचे पॅनेल काढून टाकले जाऊ शकते. कारण त्यात एलईडी लाईट आहेत, जे काही तासांनंतरही गरम होतात म्हणून मुलांसाठी ते योग्य नाही आहे

एलईडी फेस मास्क म्हणजे काय?
एलईडी फेस मास्क वेगवेगळ्या वजनाच्या प्रकाश किरणांचे उत्सर्जन करून त्वचेच्या विविध समस्यांवर ईलाज करतात. उदाहरणार्थ, एम्बर लाईट जे की चेहऱ्यावरील कोलेजन आणि इलेस्टिनला उत्तेजित करण्यास मदत करते. लाल एलईडी लाइट चेहऱ्यावरील सूज कमी करते आणि ब्लड सर्क्युलेशन वाढविण्यात मदत करते. त्याच वेळी, त्यातील निळ्या प्रकाशामुळे मुरुमांमुळे तयार होणारे बॅक्टरीया नष्ट होतात.

प्रश्न का उठत आहेत?
न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, बर्‍याच लोकांनी याविषयी तक्रार केली की, या एलईडी फेस मास्कचा आपल्या डोळ्यावर दुष्परिणाम होतो. त्यांचा वापर केल्याने आपले डोळे खराब होऊ शकतात. अनेक युझर्सनी आपल्याला डोळ्यांच्या इंफेक्शनची समस्या झाल्याची तक्रार केली आहे. त्यांचा असा विश्वास आहे की हा एलईडी फेस मास्क डोळ्यांसाठी धोकादायक आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

अमेरिकेतील कोरोना संकटात ट्रम्प फोडणार निवडणूक प्रचाराचा नारळ

वॉशिंग्टन । जगात सर्वाधिक कोरोनाचा प्रादुर्भाव अमेरिकेत झाला आहे. देशात दररोज १५ हजारहून अधिक रुग्ण वाढत आहेत. इथल्या एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २० लाखांच्या वर गेली आहे. १ लाख १२ हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अशा वेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक प्रचाराचा नारळ फोडण्याचे ठरवलं आहे.

ट्रम्प या महिन्यापासून आगामी निवडणुकांसाठी प्रचार सभांचा धडाका सुरू करणार आहे.एकीकडे ट्रम्प यांच्यावर अमिरिकेत कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती हाताळता आली नसल्याचा आरोप होत असताना त्यांनी प्रचार सभा घेणार असल्याचे जाहीर केलं आहे.

यावर्षी नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका होणार असून 3 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्याअनुषंगानं डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरुवातीला टेक्सास, फ्लोरिडा, रिझोना आणि उत्तर कॅरोलिना येथे निवडणूक सभा घेणार असल्याचे जाहीर केले.

कोरोना विषाणूच्या संकटामुळे गेल्या ३ महिन्यांपासून निवडणूक रॅली अमिरिकेत बंद आहेत. परंतु आता डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा त्याला सुरुवात करणार आहेत. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे पुन्हा एकदा उमेदवार असणार आहेत, जुलैमध्ये याची अधिकृत घोषणा होईल. दुसरीकडे डेमोक्रॅट्स पक्षाचे उमेदवार असलेले बिडेन यांनी उमेदवाराला पाहिजे तितकी मते मिळविली आहेत.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

लॉकडाउनमध्ये टाटा मोटर्सची मोठी ऑफर; ‘या’ गाड्यांवर बिग डिस्काऊंट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसमुळे देशात लॉकडाउन सुरु झाल्यामुळे ऑटोमोबाईल व्यवसाय एप्रिलपासून पूर्णपणे बंद झाला होता. मे महिन्यात मात्र लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर पुन्हा कामकाज सुरू केले आहे. त्यामुळे आपल्या वाहनांची विक्री वाढविण्यासाठी अनेक कंपन्या बाजारात अनेक आकर्षक ऑफर आणत आहेत. अशा परिस्थितीत जून महिन्यात भारतीय कंपनी टाटा मोटर्सने कारच्या विक्रीसह पुन्हा एकदा आपला व्यवसाय सुरू केला आहे. टाटाने Tiago, Tigor, Nexon आणि Harrier कार मॉडेल्सवर मोठ्या ऑफर दिलेल्या आहेत.

या ऑफर प्रत्येक राज्यात आणि वेगवेगळ्या डीलर्सकडे वेगवेगळ्या असणार असल्याचे कंपनीने नुकतेच जाहीर केले आहे. या सवलती निवडक मॉडेल्स आणि गाड्यांवर असतील. म्हणूनच टाटा कार्सने आपल्या ग्राहकांना या ऑफर्स बद्दल अधिकपणे जाणून घेण्यासाठी जवळच्या डीलर्सकडे जाण्याचा सल्ला दिला आहे.

टाटा मोटर्सच्या एंट्री-लेव्हल Tiago वर २८,००० रुपयांचा डिस्काउंट देण्यात येत आहे. यात १५,००० रुपयांची कॅश बॅक, १०,००० रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि ३,००० रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट सामील आहे. त्याच वेळी, Tigorवर एकूण ४५,००० रुपयांचा डिस्काउंट देण्यात येत आहे. यामध्ये २०,००० रुपयांची कॅश बॅक, २०,००० रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि ५,००० रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट सामील आहे.

Harrier SUV मध्ये ४५,००० रुपयांचा डिस्काउंट देण्यात येत आहे, यासह ३०,००० रुपयांच्या एक्सचेंज बोनस तसेच १५,००० रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट मिळत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

आता आळंदीही कंटेन्मेंट झोन म्हणुन जाहीर; वारकर्‍यांत चिंता

पुणे । संत ज्ञानेश्वर यांचे समाधीस्थळ अर्थात आळंदी हे तीर्थक्षेत्र होय. आळंदी येथे कोरोनाने एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ज्ञानेश्वरांच्या पादुकांच्या प्रस्थान सोहळ्याला आता दोनच दिवस राहिले आहेत. दिनांक १३ जुनला ज्येष्ठ वद्य अष्टमीला हा सोहळा होणार आहे. या पार्श्वभूमीवर आळंदीतही धर्मशाळा, मठ आणि लॉजमध्ये बाहेरून येणाऱ्या व्यक्तींना प्रतिबंध करण्यात आला आहे. व आळंदीला कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन पोलीस उपायुक्त आणि प्रांताधिकारी संजय तेली यांनी प्रतिबंध नियम लागू केला असल्याची माहिती दिली आहे. जर या प्रतिबंधाच्या विरोधात कुणी काही केले तर त्यांच्यावर साथरोग प्रतिबंध अधिनियम आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला जाईल अशी माहिती देण्यात आली आहे. बाहेरून येणाऱ्या व्यक्तींना १४ दिवस विलगीकरणात राहावे लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

नागरिकांचे आरोग्य जपण्यासाठी वारकऱ्यांनी आळंदीत न येता घरातूनच संतांचे पूजन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच ज्ञानेश्वर माउलींचा प्रस्थान सोहळा हा काही मोजक्याच व्यक्तींच्या उपस्थितीत पार पडणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. सध्या सर्वत्र सुरु असणाऱ्या कोरोनाच्या संकटात घरी राहूनच भाविकांनी पूजा करा असे सांगितले आहे. माउलींचा प्रस्थान सोहळा झाल्यानंतर पादुका या मंदिरातील मागील बाजूच्या दर्शनमंडपात ३० जूनपर्यंत ठेवल्या जातील अशी माहिती देण्यात आली आहे. या काळात देऊळवाडा सर्वसामान्यांसाठी पूर्णतः बंद राहील असे सांगण्यात आले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

चिंताजनक! मागील १० दिवसांत देशामध्ये ९० हजार लोकांना कोरोनाची बाधा

नवी दिल्ली । देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढताना दिसत आहे. धक्कादायक म्हणजे १ जून ते १० जूनपर्यंत देशात ९० हजार नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाचे संकट अद्यापही टळले नसल्यामुळे नियमांचे पालन करणं अत्यंत गरजेचं आहे. दरम्यान, दिलासादायक बाब म्हणजे देशात कोरोनापासून बरे होणाऱ्यांची संख्या कोरोना रुग्णांपेक्षा अधिक आहे. सध्या भारतात कोरोना रुग्णांची संख्या जवळपास २.८ लाखांवर पोहोचली आहे.

न्युज एजेन्सी पीटीआयने जाहीर केलेल्या अकडेवारीनुसार भारतात कोरोना रुग्णांची संख्या २ लाख ७७ लाख २८६ वर पोहोचली असून ८ हजार ९९ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यामध्ये कोरोनाच्या विळख्यातून बाहेर येणाऱ्यांची संख्या १.४ लाख आहे. आरोग्य मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार देशात १ लाख ३३ हजार ६३२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर दुसरीकडे आतापर्यंत १ लाख ३५ हजार २०६ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या सर्वात जास्त आहे. बुधवारी महाराष्ट्रात नवे ३ हजार २५४ नवे कोरोना रुग्ण आढळून आले. त्यामुळे आता महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या ९४ लाख ४१ वर पोहोचली आहे. शिवाय आतापर्यंत ३ हजार ३४३८ जणांनी आपले प्राण गमावले आहे. दिलासादायक बाब म्हणजे ४४ हजार ५०० रुग्ण कोरोनमुक्त झाले आहेत.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

वॉटर स्ट्राईक! पाकिस्तानात जाणारे पाणी रोखण्याचे काम सुरु- नितीन गडकरी

नवी दिल्ली । पाकिस्तानला जोरदार दणका देण्यासाठी भारत वॉटर स्ट्राईकची तयारी करत आहे. पाकिस्तानला जाणारे पाणी रोखण्यात भारत लवकरच यशस्वी होईल. पाणी कसे रोखायेच यावर आधारित प्रकल्पाचे काम सुरु आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. ते बुधवारी मध्य प्रदेशात एका व्हर्चुअल रॅलीला संबोधित करताना बोलत होते. पाकिस्तानात जाणारे पाणी रोखण्याचे काम सुरु आहे आणि त्यात आम्ही यशस्वी होवू, असे सांगून ते म्हणाले, त्यानंतर हे रोखलेले पाणी राजस्थान, पंजाब आणि हरियाणा या राज्यांना मिळेल असं त्यांनी यावेळी सांगितलं.

व्हर्चुअल रॅलीला संबोधित करताना गडकरी यांनी पुढे सांगितले की, पंतप्रधान म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांनी नदी जोड प्रकल्पात भर दिला होता, ज्यावर मोदी सरकार वेगवान गतीने काम करत आहे. जेव्हा मी जलसंपदामंत्री होतो, तेव्हा १९७० पासून नऊ प्रकल्प रखडले होते. पंजाब, यूपी, हरियाणा इत्यादी राज्ये भांडत होती, त्यामुळे पाकिस्तानला फायदा होत होता. आम्ही नऊपैकी सात प्रकल्प पूर्ण केले. करारादरम्यान तीन नद्या भारत आणि पाकिस्तानला मिळाल्या, परंतु भारतातील नद्यांचे पाणी पाकिस्तानकडे जात होते, ते आता रोखणार आहोत, असे गडकरी यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदींनी मला सांगितले पाण्याचा प्रश्न आधी सोडविला पाहिजे. पाण्याचा हा वाद संपवण्यासाठी मी जम्मू-काश्मीर, पंजाब, हरियाणा, हिमाचल, उत्तराखंड आणि राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांना बोलावले आणि सात प्रकल्प सुरु केले. याद्वारे आम्ही पाकिस्तानात जाणारे पाणी रोखू शकू. राजस्थान, हरियाणा आणि पंजाबला हे पाणी मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

दुहेरी हत्याकांडाचे गूढ उकलले; चुलत भाऊ, मेहुण्यानेच केली हत्या

औरंगाबाद प्रतिनिधी | बहीण-भावाच्या निर्घृण हत्येने शहराला हादरवून टाकले होते. या हत्येमागील रहस्य उलगडले असून घरात ठेवलेल्या किलोभर सोन्यासाठी चुलत भाऊ आणि त्याच्या मेहुण्यानेच ही हत्या केल्याचे स्पष्ठ झाले आहे. गुन्हेशाखेच्या पथकाने दोन्ही आरोपिना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून चोरी गेलेला माल पोलिसांनी जप्त केला आहे. सतीश काळूराम खंदाडे (रा.पाचन वडगाव), अर्जुन देवचंद राजपूत (रा.वैजापूर,) असे अटकेतील दोघांची नावे आहेत. अटकेतील आरोपी सतीश हा मायताचा चुलत भाऊ आहे तर अर्जुन हा त्याचा मेहुणा आहे.

या घटने बाबत अधिक माहिती अशी की, शहरातील सातारा परिसर भागात गुरुवारी किरण खंदाडे-राजपूत वय-18, सौरभ खंदाडे-राजपूत वय-16 यांची राहत्याघरी गळा चिरून निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी गाठत तपासला सुरुवात केली होती. त्यावेळी घरात चार चहा चे कप पोलिसांना आढळले होते, त्यावरून ओळखीच्या किंवा जवळच्या व्यक्तीनेच ही हत्या केली असावी असा दाट संशय पोलिसांना होता. त्यावरून पोलिसांनी दोन्ही मायताच्या मोबाईल क्रमांकाची तपासणी सह शास्त्रशुद्ध पद्धतीने तपासाला सुरुवात केली. त्यानंतर चुलत भाऊ सतीश आणि त्याचा मेहुणा अर्जुन या दोघांवर पोलिसांना संशय आल्याने दोघांनाही विचारपूस करण्यात आली. विचारपूस दरम्यान दोघेही सुरुवातीला तोंड उघडण्यास तयार नव्हते त्या नंतर पोलिसांनी खाक्या दाखवताच दोघांनीही गुन्ह्याची कबुली देत ही निर्घृण हत्या घरातील सोन्यासाठी केली असल्याची कबुली दिली. गुन्हेशाखेच्या पोलिसांनी दोघांनाही अटक केली असून त्यांच्या ताब्यातून चोरी केलेलं सोन जप्त करण्यात आलं आहे.

हत्येला कौटुंबिक भांडणाची किनार..

मयत किरण आणि सौरभ यांचा परिवार आणि आरोपी सतीश यांच्या परिवारात शेती वरून वाद सुरू होते. या वादातूनच आरोपी सतीश ने हत्येचा कट रचला असावा अशी चर्चा आहे. हत्या केल्यानंतर घरात सोने असल्याची माहिती सतीश ला असावी त्यामुळे चोरी चा बनाव या मारेकऱ्यांनि केला असावा अशी देखील शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र सध्या स्थितीत चोरीच्या उद्देशाने ही हत्या झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. कोठडी दरम्यान पुढे या प्रकरणातील अनेक अंग समोर येण्याची शक्यता आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

BSNL ग्राहकांना २२ दिवस ‘हि’ सेवा मिळणार पूर्ण मोफत; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बीएसएनएल या भारत सरकारच्या दूरसंचार कंपनीने आता देशातील अनेक शहरांमध्ये १५०० जीबी फायबर-टू-होम (एफटीटीएच) योजना सुरू केली आहे. पूर्वी ही योजना फक्त तेलंगणा आणि चेन्नई सर्कलमध्येच उपलब्ध होती परंतु आता तमिळनाडूमध्येही ही सेवा सुरू केली जात आहे. तसेच कंपनीने यासाठी आपल्या ९९ रुपयांच्या खास टॅरिफ व्हाउचरमध्येही बदल केला आहे. आता या व्हाउचरमध्ये २२ दिवस विनामूल्य पर्सनलाइज्ड रिंग बॅक टोन (पीआरबीटी) ही सेवा दिली जात आहे. या सेवेसाठी कंपनी दरमहा ३० रुपये शुल्क घेते आणि प्रत्येक गाण्याच्या निवडीसाठी युझर्सला १२ रुपये द्यावे लागतात.

९९ रुपयांची ही योजना २२ दिवसांच्या वैधतेसह विनामूल्य पीआरबीटी आणि २५० एफईपी मिनिटांसह अमर्यादित व्हॉईस कॉलिंग देते. यानंतरच्या कॉलिंगसाठी बेस टॅरिफ आकारला जातो.

या शहरांना एफटीटीएच योजनेचा लाभ घेता येणार आहे
या वृत्ताला दुजोरा देत बीएसएनएलचे ज्यूनियर टेलीकॉम ऑफिसर(जेटीओ) एन. सुरेंदर म्हणाले की, ४९९ रुपयांपासून ते १९९९ रुपयांपर्यंतच्या या योजना आता ओमलूर, मेट्टूर, संकगिरी, तिरुचेनगोडे, सालेम, येरकॉड, अतूर, वलापडी, रासीपुरम, नमकक्कल या सर्कल मध्ये उपलब्ध आहेत. ओडिशा आणि पुडुचेरी शहरातील भवानीपटना येथे १५०० जीबी एफटीटीएच योजना आणि इतर एफटीटीएच योजना देखील सुरू केल्या आहेत. १,४९९ रुपये किंमतीची १५०० जीबी एफटीटीएच प्लॅन, ज्यामध्ये अमर्यादित लोकल आणि एसटीडी कॉलची सुविधा आहे आणि २०० एमबीपीएसची १५०० जीबी हाय-स्पीड इंटरनेट आहे, त्यानंतर ही गती २ एमबीपीएसपर्यंत कमी होईल.

या प्लॅनची डिटेल्स जाणून घ्या
कंपनीच्या साइटवर बीएसएनएलच्या ७४९ एफटीटीएच प्लॅनचे नाव ‘सुपर स्टार ३०० एफटीटीएच’ आहे. या प्लॅनमध्ये ३०० एमबी पर्यंत ५० एमबीपीएसचा टॉप स्पीड मिळेल आणि त्यानंतर २ एमबीपीएस हा वेग कमी होईल. बीएसएनएलच्या ग्राहकांना सर्व नेटवर्कवर अमर्यादित विनामूल्य कॉलची सेवाही यामध्ये मिळतील आणि हॉटस्टार प्रीमियमचे कॉम्प्लीमेंटरी सब्सक्रिप्शनही मिळेल. दुसरीकडे, ८४९ रुपयांच्या एफटीटीएच योजनेत ६०० जीबी डेटावर ५० एमबीपीएस स्पीड मिळेल आणि त्यानंतर २ एमबीपीएस हा वेग कमी होईल आणि यामध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग बेनिफिट्स (लोकल + एसटीडी) असतील.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

पावसाळ्या मध्ये मुंबईत कोरोना आणखी थैमान घालणार; आयआयटी मुंबईचा धक्कादायक अहवाल

मुंबई । मुंबई कोरोना विषाणूच्या साथीच्या आजाराच्या विळख्यात आहे. मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अजूनही वाढत आहे. त्यादरम्यान आणखी एक चिंतेत भर टाकणारी बातमी आहे. आयआयटी मुंबईने नुकत्याच सादर केलेल्या अहवालात असे म्हटले आहे की, येत्या पावसाळ्यात मुंबईत कोरोना विषाणूच्या संसर्गाचे प्रमाण अधिक वाढेल त्यामुळं मुंबईत कोरोनाचा उद्रेक होऊ शकतो असं आयआयटी मुंबईने आपल्या अभ्यासात म्हटलं आहे.

आयआयटी मुंबईच्या अभ्यासानुसार पावसाळ्यात कोरोना विषाणूची लागण होण्याची तीव्रता अधिक वाढेल. आर्द्रता वाढल्यामुळे कोरोना विषाणू दीर्घकाळ वातावरणात जिवंत राहू शकतो असा या अभ्यासातून दावा केला आहे. हा अभ्यास आयआयटी मुंबईच्या दोन प्राध्यापकांनी केला आहे. त्यांचा असा विश्वास आहे की, खोकला किंवा शिंकलेल्या थेंबाला जास्त तापमान आणि कमी आर्द्रतेमुळे कोरडे पडण्यास कमी वेळ लागतो. परंतु पावसाळ्यात ओलावा राहील आणि लोकांचा खोकला कोरडा होण्यास जास्त वेळ लागेल. यामुळे, संसर्ग होण्याची आणि पसरण्याची शक्यता आहे. हे संशोधन अमेरिकन जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहे.

इतर देशांतील प्रकरणांचा देखील संशोधनासाठी समावेश आहे. या ताज्या संशोधनानुसार, थेंब कोरडे (ड्रॉपलेट) होण्यासाठी सिंगापूरने कमी लागला आणि जास्त वेळ न्यूयॉर्कमध्ये लागला. म्हणूनच न्यूयॉर्क हे जगातील कोरोना संक्रमणाने सर्वाधिक प्रभावित झालेल्या शहरांपैकी एक आहे, असे या अहवालात म्हटले आहे. दरम्यान, कोरोनाबाधितांच्या संख्येत मुंबईने वुहानला मागे टाकले आहे. आतापर्यंत वुहानमध्ये ५०३४० कोरोनाबाधितांचा आकडा नोंदवला गेला आहे. पण आता मुंबईत ५१,१०० लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना संसर्गाची अशी परिस्थिती केवळ मुंबईतच नाही तर महाराष्ट्रातही कोरोना संसर्ग अत्यंत धोकादायक पातळीवर पोहोचला आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in