Thursday, January 1, 2026
Home Blog Page 5675

वरुणराजाच्या जोरदार आगमनाने परभणी जिल्हा सुखावला!

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे |

परभणी शहरसह जिल्हामध्ये रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली. बुधवारी रात्री उशिरा सुरू झालेल्या पाऊसाने जिल्ह्यात सर्वदूर जोरधार पडत पाणी पाणी केलयं. यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह, पाऊस झाला आहे. झालेल्या या पावसाचा सर्वाधिक फटका, जिल्ह्यातील तालुक्यांना जोडणाऱ्या वाहतुकीवर झाला असून, परभणी – जिंतूर आणि परभणी – गंगाखेड रोडच्या रखडलेल्या कामामुळे, वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. या दोन्ही महामार्ग रस्त्याचे काम मागील अनेक वर्षांपासून सुरु असून, ते पूर्ण होऊ शकलेले नाही. यामुळे दुचाकी आणि पायी प्रवास करणार्‍या नागरिकांना, रस्त्यावर साठलेल्या या पाण्यामधून रस्ता काढावा लागत आहे. तर मोठी वाहने पाण्यामधून जाऊ शकत नसल्याने, वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

जिल्ह्यात रात्री एकूण ३३ .६५ मिमी पावसाची नोंद झालीय. यात सर्वाधिक मानवत तालुक्यात ६१ मीमी पाऊस झाला आहे.त्या पाठोपाठ परभणी तालूका ४८ .३८, पाथरी ४८. ३३, सेलू ३२ .२०, सोनपेठ २६ , पालम २३ .६७, पूर्णा २३ .२०, गंगाखेड २१, तर सर्वात कमी जिंतूर मध्ये १८ मिमी पावसाची नोंद घेण्यात आलीय. दरम्यान १ जुन पासुन आतापर्यंत जिल्ह्यात ७० .३४ मिमी पावसाची नोंद असुन सर्वाधिक ११३.६६ मिमी पाऊस पाथरी तालुक्यात तर सर्वात कमी जिंतुर तालुक्यात ३७ .१६ मीमी पावसाची नोंद झाली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

सरकार ‘या’ शेतकऱ्यांना राहत पॅकेज देण्याच्या तयारीत; लवकरच होऊ शकते घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकार आता एक खास मदत पॅकेज तयार करीत आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शेतकर्‍यांच्या या रिलिफ पॅकेजमध्ये बफर स्टॉकवरील सब्सिडी, एक्सपोर्ट सब्सिडीसह ४ महत्त्वपूर्ण योजनांचा समावेश असू शकतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार साखरेचा एमएसपी वाढवण्याचा प्रस्तावही यावेळी ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे साखरेचा एमएसपी हा प्रति किलो २ रुपयांनी वाढू शकतो. एमएसपीची किमान विक्री किंमत वाढविण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या मंजुरीपूर्वीच घेता येईल. तसेच सॉफ्ट लोनही १ वर्षापर्यंत वाढविण्याचा प्रस्तावही यावेळी ठेवला जाऊ शकतो. सॉफ्ट लोनच्या कालावधीत वाढ झाल्यामुळे कंपन्याची सुमारे ७,५०० कोटींची बचत होईल.

आता काय होईल- सूत्रांच्या माहितीनुसार, खाद्य मंत्री यांच्यासमवेत या बैठकीत मदत पॅकेजवर चर्चा झाली आहे. या मदत पॅकेजचा मसुदा लवकरच पीएमओला पाठविला जाईल. सूत्रांच्या माहितीनुसार, मदत पॅकेजअंतर्गत ४ महत्त्वपूर्ण प्रस्ताव देण्यात आलेले आहेत.

या ४ मोठ्या घोषणा होऊ शकतात
(१) सूत्रांच्या मते, साखरेच्या बफर स्टॉकवर सब्सिडी देण्याचा प्रस्ताव आहे. बफर स्टॉकच्या साखरेला १३.५ टक्के अनुदान मिळते. ४० लाख टन साखरेचा बफर स्टॉक सुमारे १६०० कोटींचा नफा मिळवून देतो.

(२) दुसरा प्रस्ताव – चीनी निर्यातीवर सब्सिडी देण्याचा आहे. साखर निर्यातीवर १०५०० / टन सब्सिडी मिळते आहे. साखरेच्या ६० लाख टन साखरेच्या निर्यातीवर सुमारे ६ हजार कोटी रुपयांचा फायदा आहे.

(३) तिसरा प्रस्ताव – सॉफ्ट लोनमध्ये एक वर्षाची वाढ करण्याचा प्रस्ताव आहे. सॉफ्ट लोनच्या अंतर्गत ७ टक्के स्वस्त व्याजावर कर्ज उपलब्ध आहे. सॉफ्ट लोनची मुदत वाढवली तर सुमारे ७,५०० कोटी रुपये कंपन्यांकडे येतील.

(४) चौथा प्रस्ताव – साखरेचा एमएसपी (किमान विक्री किंमत) वाढविण्याचा प्रस्ताव आहे. सुरुवातीच्या प्रस्तावानुसार, एमएसपी प्रति किलो दोन रुपयांनी वाढू शकेल. एमएसपी वाढविण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या मंजुरीपूर्वी घेता येईल.

सन २०१९-२० या वर्षात देशभरातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांमुळे साखर उत्पादन २२ हजार कोटींच्या पुढे गेले आहे. साखर उत्पादन वर्षाची नोंद दर वर्षी १ ऑक्टोबर ते ३० सप्टेंबर पर्यंत केली जाते.

राज्य सल्लागार किंमतीकडे (एसएपी) पाहिले तर साखर कारखान्यांवरील ऊस उत्पादकांची थकबाकी ही २२ हजार ७९ कोटींवर गेलेली आहे. केंद्राने जाहीर केलेल्या फेअर अ‍ॅण्ड रेव्हेनरेटिव्ह प्राइस (एफआरपी) संदर्भात ही थकबाकी १७ हजार ६८३ कोटी रुपये इतकी आहे.

एफआरपी हा ऊस खरेदीचा दर असून केंद्र सरकार ते घोषित करते, तर राज्य सरकार त्यांच्या वतीने लावलेल्या जादा किंमतीला एसएपी म्हणतात. तथापि, मंत्रालयाचे असे म्हणणे आहे की गेल्या वर्षी मे महिन्यापर्यंतची थकबाकी ही २८ हजार कोटींवर पोहोचली होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

गुड न्यूज! मान्सून महाराष्ट्रात दाखल; शेतकरी सुखावला

मुंबई । निसर्ग चक्रीवादळामुळे मान्सून ला पोषक वातावरण तयार झाले असून यंदा मान्सून वेळेआधीच दाखल होणार असल्याचे हवामान खात्याने जाहीर केले होते. त्यानुसार आज महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले आहे. याबाबत कुलाबा वेधशाळेने घोषणा केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्रातील दक्षिण कोकण, दक्षिण मध्य भाग मान्सूनने व्यापला आहे. मान्सून उत्तरेकडे सरकण्यासाठीचे वातावरण अनुकूल असून यामुळे बळीराजा सुखावला आहे. सध्या शेतकऱ्यांची पेरणी सुरु असून मान्सून वेळेआधी दाखल झाला असल्याने शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे.

हर्णे, सोलापूर, रामगुंड येथे आज जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच मुंबई, पालघर येथे १३, १४ जून रोजी मुसळधार पावसाची शक्यता सांगण्यात आली आहे. तसेच पुढील दोन दिवसांत राज्यात सर्वत्र पावसाची शक्यता आहे.

अंतिम वर्षाच्या परिक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांना १ कोटीचे विमा कवच द्यावे; महाराष्ट्र पदवीधर संघटनेचे राज्यपालांना पत्र

मुंबई । महाराष्ट्र सरकारने अंतिम वर्षातील विद्यर्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. राज्यातील कोरोनाचे वाढते रुग्ण पाहून त्यांनी हा निर्णय घेतला होता. यामुळे विद्यार्थीवर्गाला दिलासा मिळाला होता. मात्र राज्याचे राज्यपाल भारतसिंह कोश्यारी यांनी या निर्णयावर आक्षेप घेत परीक्षा घेण्यास सांगितले आहे. यावर आता महाराष्ट्र पदवीधर संघटनेने राज्यपालांना पत्र लिहून काही मागण्या केल्या आहेत. अंतिम वर्षाच्या परिक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांना १ कोटीचे विमा कवच द्यावे अशी मागणी याद्वारा करण्यात आली आहे.

राज्यपाल हे सर्व विद्यापीठांचे कुलगुरूच आहेत. त्यामुळे त्यांनी परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यापूर्वी विद्यार्थी वर्गाच्या मागण्या लक्षात घेऊन निर्णय घ्यावा असे आवाहन संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अमित कोळेकर यांनी केले आहे. तसेच यावेळी त्यांनी विद्यार्थ्याच्या हिताच्या काही मागण्या राज्यपाल कोश्यारी यांच्या समोर ठेवल्या आहेत.

महाराष्ट्र पदवीधर संघटनेने याबाबत विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे व गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याचे म्हंटले आहे तसेच पालकांनी विद्यार्थ्याना कोणाच्या जिम्मेदारी वर पाठवावे हे राज्यपालांनी स्पष्ट करावे व त्याची जबाबदारी स्वतः घ्यावी, विद्यार्थ्यांच्या प्रवासाची राहण्याची , खाण्याची सोय राज्यपालांनी व्यक्तीत खर्चातून करावी, प्रत्येक विद्यार्थ्याला १ कोटीचे विमा कवच द्यावे, देव न करो पण एकाध्या विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाली व तो दगावला तर त्याच्या परिवाराची पूर्ण जबाबदारी राज्यपालांनी घ्यावी. अशा मागण्या केल्या आहेत.

राज्यपालांनी परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर आक्षेप घेतला असून परीक्षा घेण्यास सांगितले आहे. पदवीधर संघटनेने त्यांच्या या आक्षेपावर खेड व्यक्त केला आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या परिस्थितीत परीक्षा घेतल्या तर विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होईल असेही त्यांनी म्हंटले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

पालघर लिंचिंग प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची केंद्र, राज्याला नोटीस

नवी दिल्ली । महाराष्ट्रातील पालघर येथे हिंसक जमावाकडून दोन साधूंच्या हत्येच्या चौकशीची मागणी करण्याता आली आहे. साधुंच्या हत्याप्रकरणी सीबीआय किंवा एनआयएमार्फत चौकशी करण्यात यावी यासाठी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेनंतर आज सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि महाराष्ट्र सरकारसह अन्य पक्षांना नोटीस बजावली आहे. सर्व पक्षांना जुलैच्या दुसर्‍या आठवड्यात जबाब नोंदविण्यास सांगितले गेले आहे.

या प्रकरणाची सीबीआय किंवा एनआयए चौकशी व्हावी या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात दोन याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांमध्ये घनश्याम उपाध्याय नावाच्या कुटुंबाने साधू आणि जुना आखाडा यांच्या नातेवाईकांसह एनआयए चौकशीची मागणी केली आहे. यापूर्वी १ मे रोजी सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली होती, त्यात न्यायालयाने महाराष्ट्र पोलिसांना तपासाचा सद्यस्थिती अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या खंडपीठाने महाराष्ट्र सरकारला यासंदर्भात चार आठवड्यात उत्तर देण्यास सांगितले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात आतापर्यंत१०० हून अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

 

काय आहे पालघर साधू हत्याप्रकरण?
पालघरमधील गडचिंचले गावात हिंसक जमावाने रात्रीच्या सुमारास कल्पवृक्षगिरी (७०), सुशीलगिरी महाराज (३५) आणि त्यांच्या चालकासह तीन जणांची निर्घृण हत्या केली. हत्येनंतर हे सर्व लोक अंधाराचा फायदा घेत गावालगतच्या झाडी झुडपात लपून बसले. दरम्यान, या घटनेची तात्काळ दखल घेत पोलिसांनी संबंधितांना अटक करण्यास सुरु केली. जवळपास १०० जणांना सुरुवातील अटक केल्यानंतर काही दिवसांनी सोशल मीडियावर या हत्याप्रकरणाची व्हिडिओ क्लिप व्हायरल होताच. विरोधकांनी राज्यातील ठाकरे सरकारला घेरले. या काळात प्रकरणाला धार्मिक रंग सुद्धा देण्याचा प्रयन्त झाला.

दरम्यान, महाराष्ट्रातील पालघर येथे दोन साधूंच्या लिंचिंगबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेत असे म्हटले आहे की महाराष्ट्र सरकार आणि पोलिसांच्या तपासावर त्यांचा विश्वास नाही, कारण या प्रकरणात संशयाची सुई पोलिसांवर आहे. अशा परिस्थितीत पोलिसांनी निष्पक्ष चौकशी करणे अपेक्षित नाही. त्यामुळे सीबीआयकडे चौकशी झाली पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

 

रोहित पवारांनी केंद्र सरकारला हात जोडून केली ‘ही’ विनंती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संचारबंदीमुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. देशातील लाखो नागरिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. देशातील नागरिक रोजगाराच्या चिंतेत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी यासंदर्भात एक ट्विट केले असून त्यांनी मनरेगासारख्या योजना ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागात राबविण्याची विनंती त्यांनी केली आहे. त्यांनी या ट्विट मध्ये सरकारला हात जोडून विनंती आहे असे म्हंटले आहे. त्यांनी काही ट्विट मधून मनरेगाच्या तरतुदीचे कौतुक केले आहे तसेच अशा योजना राबविल्या जाव्यात यासाठी विनंती केली आहे.

‘देशात बेरोजगारी प्रचंड वाढलीय. कष्ट करण्याची तयारी असूनही असंघटित क्षेत्रातील लोकांच्या हाताला काम नाही. असे अनेकजण गेल्या महिन्यापासून मला फोन करतायेत. त्यामुळे माझी केंद्र सरकारला हात जोडून विनंती आहे, ग्रामीण व शहरी या दोन्ही भागात ‘मनरेगा’सारखी योजना तातडीने राबवा.’ असे ट्विट पवारांनी केले आहे. ‘मनरेगा’साठी अतिरिक्त ४० हजार कोटी ची तरतूद केली हा चांगला निर्णय आहे.यामुळे ग्रामीण भागातील व शहरातून गावाकडे आलेल्या लोकांच्या हाताला काम मिळण्यास काही प्रमाणात सहकार्य होईल. अशाचप्रकारे ग्रामीण व शहरी लोकांच्या हाताला काम मिळेल व बाजारात मागणी वाढेल, असे निर्णय घ्यावे लागतील.’ असेही त्यांनी सुचविले आहे.

विविध कर्जाच्या व्याजावर सवलत द्यावी. त्यामुळे प्रत्यक्ष आर्थिक मदतीमुळे क्रयशक्ती वाढून मागणी वाढेल व अर्थव्यवस्थाही गती घेईल. तसेच या निमित्ताने मेकइनइंडिया ची राहिलेली अंमलबजावणीही आपल्याला प्रभावीपणे करता येईल. असे पवार यांनी सांगितले आहे. आर्थिक मंदी व कोरोनामुळे निर्माण झालेली आजची परिस्थिती यात खूप मोठा फरक आहे. मंदीत थोडं-फार तरी उत्पन्न मिळत असतं, पण आज सगळंच ठप्प आहे. त्यामुळे यात केंद्र सरकारची भूमिका महत्त्वाची ठरते. याशिवाय मागणी वाढण्यासाठी खासगी आणि सरकारी गुंतवणूक वाढणे आवश्यक आहे. असे त्यांनी सांगितले आहे. बेरोजगारी कमी करण्याच्या दृष्टीने पवार कार्यरत असल्याचे दिसून येत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

इंधन पेटलं! सलग पाचव्या दिवशीही पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ, जाणून घ्या आजचा दर

नवी दिल्ली । देशात इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. भारतीय तेल मार्केटिंग कंपन्यांनी सलग पाचव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. गुरूवारी दिल्लीत पेट्रोलच्या दरात ६० पैशांनी वाढ झाली असून पेट्रोलचे दर ७४ रूपये प्रती लिटरवर पोहोचले आहेत. तर दुसरीकडे डिझेलचे दर देखील ६० पैशांनी वाढले आहे. त्याचप्रमाणे गेल्या ५ दिवसांपासून पेट्रोल २.७४ रूपये प्रती लिटर आणि डिझेल २.८३ रूपये प्रती लिटर प्रमाणे वाढले आहेत. या इंधन दरवाढीमुळे येत्या काही दिवसांमध्ये देशात आणखी महागाई वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राजधानी दिल्लीत आज पेट्रोलचे दर ७४ रूपये प्रती लिटर आहे. डिझेल ७२.२२ रूपये प्रती लिटरने मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती एक दिवस घसरल्यानंतर पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळत आहे. त्यामुळे तेलाच्या किंमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

देशातील ४ महानगरांमधील पेट्रोल-डिझेलचे दर
दिल्ली       पेट्रोल ७४.०० रूपये प्रती लिटर, डिझेल ७२.२२ रूपये प्रती लिटर
कोलकाता   पेट्रोल ७५.९४ रूपये प्रती लिटर, डिझेल ६८.१७ रूपये प्रती लिटर
मुंबई          पेट्रोल ८०.९८ रूपये प्रती लिटर, डिझेल ७०.९२ रूपये प्रती लिटर
चेन्नई        पेट्रोल ७७.२२ रूपये प्रती लिटर, डिझेल ७०.६४ रूपये प्रती लिटर

कोरेगाव तालुक्यातील कोरोना बाधित पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यु

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी |

रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार सातारा शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल असणाऱ्या कोल्हापूर येथील 39 वर्षीय पुरुषाचा अहवाल कोरोना बाधित आल्याचे खाजगी प्रयोगशाळेने कळविले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. तसेच क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे कोरेगाव तालुक्यातील गिघेवाडी येथील 78 वर्षीय कोरोना बाधित पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. त्याला उच्च रक्तदाब व श्वसन संस्थेचा त्रास होता.

दोन बाधित स्त्रियांची प्रसुती; बाळं लक्षणे विरहीत
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधरण रुग्णालय, सातारा येथे दाखल असणाऱ्या जावली तालुक्यातील गावडी येथील कोरोना बाधित 26 वर्षीय गरदोर महिलेची प्रसुती 30 मे 2020 रोजी झाली असून बाळ व आई सुखरुप असून बाळाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आज तिला डिस्चार्ज देण्यात येणार आहे.

क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधरण रुग्णालय, सातारा येथे दाखल असणाऱ्या माण तालुक्यातील बनवडी येथील कोरोना बाधित 25 वर्षीय गरदोर महिलेची 10 जून 2020 रोजी सकाळी सुरक्षित प्रसुती झाली आहे. बाळ व आई सुखरुप असून बाळ लक्षणे विरहीत आहे. डॉ. सुनिल एम. सोनवणे, स्त्री रोग तज्ञ वर्ग-1 व विभाग प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरु आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

अरे बापरे! मुंबईतील ४० टक्के जनता कंटेन्मेंट झोनमध्ये

मुंबई । मुंबईत कोरोना रुग्णांची वाढती संख्या असलेल्या भागात मुंबई महानगरपालिकेनं कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केले आहेत. सध्याच्या घडीला मुंबईतील २४ विभागांत एकूण ७९८ कंटेन्मेंट झोन आहेत. यात १८९५७ करोना रुग्ण आढळले आहेत. तर या झोनमधील ४५८८ इमारतींना सील करण्यात आलं आहे. महापालिकेनं जाहीर केलेल्या आकडीवारीनुसार, या ७९८ कंटेन्मेंट झोनमध्ये ४२ लाख लोकं राहतात. तर, पालिकेनं सील केलेल्या इमारतींमध्ये ८ लाखांहून अधिक लोक राहतात. या आकडेवारीनुसार, १.२५ कोटी लोकसंख्या असलेल्या मुंबईत जवळपास ५० लाख लोकं कंटेन्मेंट झोन व सील केलेल्या घरात राहत आहेत.

मुंबईतील कंटेन्मेंट झोन
एम पूर्व व आर- उत्तर विभागात १००हून अधिक कंटेन्मेंट झोन आहेत. एम पूर्व विभागात ११५ कंटेन्मेंट झोन असून तिथे १०२१ करोना रुग्ण आहेत. तर, आर- उत्तर विभागात ११६ कंटेन्मेट झोन आहेत तिथे करोनाचे ३३२ रग्णांची नोंद झाली आहे. सगळ्यात अधिक कंटेन्मेंट झोन ९ डी या विभागात आहेत. तिथे १९१ रुग्ण आहेत. तर, सी विभाग टी विभाग १०-१० कंटेन्मेंट झोन आहेत.

मुंबई प्रशासनाने कंबर कसली
मुंबईत करोना रुग्णांची संख्या वाढतीच आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत मुंबईनं चीनलाही मागे टाकलं आहे. शहरात आता ५० हजारांच्यावर कोरोनाचे रुग्ण आहेत. मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महानगरपालिका आणि प्रशासनाने कंबर कसली आहे. शहरात सध्या २९ हजार ऍक्टिव रुग्ण आहेत. यातील ६५ टक्के रुग्ण हे झोपडपट्टी व चाळीतील आहे. झोपडपट्टी व चाळीत कोरोनाचा प्रसार थांबवणे हे महानगरपालिकेसमोर आव्हान आहे. पालिकेनं तिथं फिव्हर क्लिनिक सुरू केल्यामुळं जास्तीत जास्त कोरोनाच्या टेस्ट केल्या जात आहेत.

महाविद्यालयांची वार्षिक फी माफ करावी; जनता दल (सेक्युलर) ची मागणी

मुंबई । कोरोना संकटामुळे राज्यातील महाविद्यालयांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. अद्याप महाविद्यालये सुरु होण्याचीही शक्यता दिसत नाही आहे. त्यामुळे बरेच विद्यार्थी निराशेत आहेत. याला अनुसरून जनता दल (सेक्युलर) विद्यार्थी संघटनेने महाराष्ट्र राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना पत्र लिहून महाविद्यालयांची वार्षिक फी माफ करण्याची मागणी केली आहे.

महाविद्यालयांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. सर्व उद्योगधंदे बंद असल्याकारणाने अनेकांना काम नाही आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्याकडून वार्षिक फी घेऊ नये तसेच जे पेपर रद्द करण्यात आले आहेत. त्या पेपरची फी पुढील सत्रात लागू करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.

जनता दल (सेक्युलर) विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संग्राम नाथाभाऊ शेवाळे यांनी ही मागणी केली आहे. मागच्या महिन्यात अंतिम वर्षातील विद्यर्थ्यांसोबत सर्वांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.