Thursday, January 1, 2026
Home Blog Page 5677

निवृत्तीला १ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल युवराज सिंगने मानले चाहत्यांचे आभार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने बरोबर १ वर्षापूर्वी आजच्याच दिवशी १० जून २०१९ रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. युवराजने क्रिकेटमधून निवृत्त होऊन १ वर्ष लोटले आहे पण तरीही चाहत्यांच्या मनातील त्याचे स्थान अगदी आहे तसेच आहे. म्हणूनच आज सकाळपासून #MissYouYuvi हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. चाहत्यांचे हे प्रेम पाहून युवीनेही त्याच्या ट्विटर हँडलवर एक खास मेसेज शेअर केला आहे.

युवराजने बुधवारी ट्वीट केले की, “डिअर फॅन्स,मी तुमचे प्रेम पाहून कृतज्ञ आहे. क्रिकेट हे नेहमीच माझे आयुष्य असेल,पण तुम्ही जणू माझ्या आयुष्याचा एक भाग आहात. चला तर मग आपण सर्व COVID-19 च्या विरुद्ध एक जबाबदार नागरिक म्हणून एकत्र होऊ या. कोविड विरूद्धच्या या युद्धातील सरकारच्या सूचनांचे पालन करणे सुरू ठेवा. त्याचबरोबर या कठीण काळात गरजू लोकांना मदत करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजे. “

 

युवराजच्या निवृत्तीला १ वर्ष पूर्ण झाल्यावर सचिननेही एक ट्विट केले आणि चेन्नईतील एका कॅम्पमध्ये पंजाबच्या या क्रिकेटपटूला पाहिल्यावर घडलेल्या घटनेची आठवण केली. सचिनने लिहिले की, “तुझ्या निवृत्तीला १ वर्ष झाले आहे. मी तुला पहिल्यांदा चेन्नईच्या शिबिराच्या वेळी पाहिले होते आणि मला मदत करता आली नाही. पण माझ्या लक्षात आले की पॉईंटच्या ठिकाणी तू खूपच चपळता दाखवता होता. तुझ्या ६ सिक्सर्सबद्दल बोलण्याची गरज नाही, हे स्पष्टच झाले आहे की तू कोणत्याही मैदानावर विध्वंस करू शकतो. “

 

 

युवराज सिंगने २००३ ते २०१७ पर्यंत ४० कसोटी, ३०४ एकदिवसीय आणि ५८ टी -२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. एकदिवसीय सामन्यात त्याने ३६.५५ च्या सरासरीने ८,७०१ धावा केल्या आहेत ज्यामध्ये १४ शतके आणि ५२ अर्धशतकांचा समावेश आहे. इतकेच नाही तर त्याने वन डे सामन्यात ३६.६८ च्या मदतीने १११ बळी देखील घेतलेले आहेत.

युवराज सिंग हा भारतीय संघातील अशा काही खेळाडूंपैकी एक आहे ज्याने अनेक कठीण प्रसंगी संघासाठी कामगिरी बजावली. यात २००० सालची चॅम्पियन्स ट्रॉफी, २००७ चा टी -२० वर्ल्ड कप आणि २०११ च्या वर्ल्ड कपचा समावेश आहे. भारतीय संघाला या तिन्ही प्रमुख स्पर्धा जिंकुणी देण्यात युवराज सिंगने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये युवराज सिंग हा जगातील एकमेव खेळाडू आहे ज्याने ६ चेंडूत ६ षटकार ठोकले आहेत. त्याचबरोबर या फॉर्मेटमध्ये सर्वात जलद १२ चेंडूत ५० धावा बनवण्याचा विक्रमही युवराज सिंगच्या नावावर आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

पिसाळलेल्या वानराच्या हल्यात महिला गंभीर जखमी; वनविभागाचा हलगर्जीपणा भोवला !

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे |

परभणी जिल्ह्यातील झरी येथे एका वानर टोळीने  मागील काही दिवसापासुन उच्छाद मांडला असून  बुधवारी सकाळी त्यातील पिसाळलेल्या एका वानराने  कडाडून चावा घेऊन महिलेला गंभीर जखमी केल्याची घटना घडल्याने गावात भातीचे वातावरण पसरले आहे .

पाथरी तालुक्यातील झरी गाव शिवारात वानराच्या  टोळीने मागील काही महिन्यापासून चांगलाच धुमाकूळ घातला आहे. गाव परिसरात ये -जा करणा-या ग्रामस्थांवर हल्ला केल्याच्या घटनेने भितीचे वातावरण निर्माण झाले असताना बुधवार १o जून रोजी सकाळी ९ च्या सुमारास एका महिलेवर याच टोळीतील एका वानराने हल्ला करून कडाडून चावा घेऊन गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. यावेळी जखमी महिलेला उपचारासाठी मानवत येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे असुन हल्लेखोर वानरांचा बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांनी वन विभागाला मागणी केली आहे.

मागील अनेक दिवसापासून वन विभागाला यासंबंधी वारंवार तक्रार करूनही वन विभागाने या प्रकारे कडे दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांचे म्हणणे आहे .

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

नियंत्रणात्मक उपाययोजनेसाठी परभणी जिल्ह्यात हुमणी भुंगेरे व्यवस्थापन अभियान सुरू

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे |

परभणी जिल्ह्यातील बऱ्याचशा गावात हुमणी किडींचे भुंगेरे मोठ्या संख्येने सायंकाळच्या वेळेला दिसून येत आहेत. त्यामुळे भुंगेऱ्यांचा वेळीच बंदोबस्त नाही केला तर या वर्षी मोठ्या प्रमाणात हुमणी किडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती निर्माण करणे क्रमप्राप्त झाले असून शेतकऱ्यांनी हुमणी भुंग्यांसाठी वेळीच नियंत्रणात्मक उपाययोजना कराव्यात असे आवाहन जिल्हा कृषी अधिक्षक संतोष आळसे यांनी केले आहे.
ते पाथरी तालूक्यातील बाभळगाव येथे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हुमणी भुंगेरे व्यवस्थापन अभियान शुभारंभ प्रसंगी बोलत होते.

बाभळगाव येथे सोमवार ८ जुन रोजी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संतोष आळसे , विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ.यु.एन.आळसे उपविभागीय कृषि अधिकारी सागर खटकाळे तालुका कृषि अधिकारी शिंदे आदी कर्मचारी यांच्या उपस्थितीत या अभियानास सुरुवात करण्यात आली .

यावेळी पेठ बाभळगाव शिवारातील बाभूळ , कडुलिंब , बोर , आदी झाडावरील भुंगे – याचे निर्मुलन करण्याचे प्रात्यक्षिक डॉ.आळसे यांनी दाखवले . तीन प्रकारे भुंगेरे नष्ट करण्याचा सल्ला ही यावेळी देण्यात आला . प्रकाश सापळे लावून , झाडावर किटकनाशकांची ( क्विनॉलफॉस किंवा क्लोरोपायरीफॉस २ मिली प्रती लिटर पाणी ) फवारणी करून व झाडं हलवून पडलेले भुंगेरे गोळा करून रॉकेल मिश्रीत पाण्यात टाकुन ते नष्ट करावेत असाही कृषी सल्ला शेतकऱ्यांना देण्यात आला. सोबत पेरणी करतांना मेटारायझीयम अनासोपली नावाची बुरशी ८-१० किलो / एकर किंवा फोरेट १० जी ८ किलो / एकर या प्रमाणात द्यावीत अशी शिफारस करण्यात आली.

दरम्यान जिल्हा कृषी अधिक्षकांनी सर्व क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना गावोगावी सायंकाळच्या वेळी जाऊन हुमणी भुंगे – यांबाबत शेतकऱ्यांना अवगत करून नियंत्रणाचे उपाय करण्याचे आदेश देत बीबीएफ ( रुंद वरंबा सरी ) चे प्रात्यक्षीत दाखवून प्रत्येक गावांत बीबीएफ वर पेरणी करण्यासाठी शेतक – यांना प्रोत्साहीत करण्याचे आवाहन केले आहे .

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

लोणार सरोवरातील पाण्याचा रंग होतोय लाल; प्रशासनाकडून शोध घेण्याच्या सुचना

वृत्तसंस्था । महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्हयातील उल्कापातामुळे तयार झालेले लोणार सरोवर हे सर्वत्र प्रसिद्ध आहे. हे बेसाल्ट खडकातील एकमेव आघाती विवर आहे. या सरोवराच्या जतनासाठी व संवर्धनासाठी लोणार विवर हे वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केले आहे. या सरोवराच्या भोवती अनेक प्राचीन मंदिरे आहेत. या सरोवराचे महत्व जास्त आहे. या सरोवराचे पाणी लाला रंगाचे होत असल्याचे परिसरातील तहसीलदार सैफन नदाफ यांनी दिली आहे. याबाबत तपासणीची कार्यवाहीही सुरु केल्याचे त्यांनी सांगितले आहे.

गेल्या २ -३ दिवसात या सरोवराच्या पाण्याचा रंग लाल होतो आहे. हे लक्षात आल्यावर वनविभागाला विश्लेषणासाठी या पाण्याचे काही नमुने पाठविण्यात आले आहेत. अशी माहिती नदाफ यांनी दिली आहे. सरोवराचे पाणी लाल का होत आहे या एक चिकित्सेचा विषय बनला आहे. त्याचे कारण लवकर शोधण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत असे त्यांनी सांगितले आहे. त्यासाठी त्याचे नमुने गोळा करण्यात आले आहेत असे त्यांनी सांगितले.

 

भारतीय वन्य अधिकारी परवीन कासरान यांनी या बाबत ट्विटर द्वारे माहिती दिली आहे. हे  पाण्यातील शैवालामुळे झाले आहे असे त्यांनी सांगितले आहे. बहुधा युगेना हिमॅटकोकस (Euglena, Haemmatococus)  या शैवालामुळे हे घडले आहे असे मला वाटते असे ट्विट त्यांनी केले आहे. ते म्हणाले , ‘माझ्या एका ऍस्ट्रोबयोलिजस्ट मित्राच्या म्हणण्यानुसार तेजस्वी सूर्य आणि त्याचे तापमान यापासून बचावासाठी हे शैवाल ऑस्टेझानथिन (austaxanthin) हे रंगद्रव्य निर्माण करत असते त्यामुळे लाल रंग आला असेल.’  प्रत्यक्ष चाचणीनंतर नक्की कारण लवकरच समोर येईल.

 

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

डीआरएसवरून कर्णधार कोहलीने जडेजाला केले ट्रोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय कर्णधार विराट कोहली हा क्रिकेटमधील सर्व प्रकारच्या फॉरमॅट मध्ये सध्याच्या काळातील सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे. तसेच आता कर्णधार म्हणूनही त्याचा आलेख उंचावतो आहे. मात्र जेव्हा कधी डीआरएस घ्यायचा विचार समोर येतो तेव्हा त्याचे नशीब अनेकदा त्याच्याशी विश्वासघात करते. क्रिकेटच्या सामन्यादरम्यान कोहली अनेकदा विचार न करता किंवा घाईघाईने डीआरएस घेताना दिसून येतो. हेच कारण आहे की, डीआरएस घेण्यावरून त्याच्यावर बर्‍याच वेळा टीका केली जाते.

कोहलीच्या या उणीवेचा फायदा उचलत भारतीय अष्टपैलू रवींद्र जडेजाने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये कोहली डीआरएस घेताना दिसत आहेत. जडेजाने यावेळी कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “देखो भाई मैंने नहीं बोला रिव्यू लेने को।”


View this post on Instagram

 

Dekho bhai meine nai bola hai review lene [email protected] #DRS #skipper

A post shared by Ravindra Jadeja (@royalnavghan) on Jun 9, 2020 at 10:17pm PDT

 

जडेजाच्या या फोटोवर कोहलीने वेळ न घालता एक अतिशय मजेदार रिप्लाय दिला. कोहलीने रिप्लाय मध्ये लिहिले की, “तुला तर सगळेच आउट वाटतात. डीआरएस घेतल्यानंतरच तुला सगळे डाउट्स येतात.” कोहलीच्या रिप्लायनंतर जडेजाची ही पोस्ट सोशल मीडियावर बरीच व्हायरल झाली आहे.

कर्णधार विराट कोहलीचा डीआरएस घेण्याचा रेकॉर्ड खूपच खराब आहे. याचा अंदाज घेता येतो की नोव्हेंबर २०१७ ते ऑक्टोबर २०१९ दरम्यान कोहलीला कर्णधार म्हणून सलग ९ वेळा डीआरएसमध्ये अपयशाला सामोरे जावे लागले. कोहली हा अशा काही मोजक्या खेळाडूंपैकी एक आहे ज्यांचा डीआरएस घेतानाचा रेकॉर्ड फारच खराब आहे. २८ सप्टेंबर २०१७ पासून, कोहलीची कसोटी क्रिकेटमध्ये डीआरएस घेण्याच्या यशाची टक्केवारी ही केवळ ८.३ इतकीच आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

एकदिवसीय क्रिकेटमधील धोनीच्या ‘या’ गुणांचा राहुल द्रविडला आहे अभिमान म्हणाला की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात, भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी फलंदाजी आणि लांबच लांब षटकार मारणारा म्हणून ओळखला जात असे. इतकेच नाही तर वन डे क्रिकेटमध्ये पहिले षटक असो किंवा शेवटचे असो धोनीने आपल्या नैसर्गिक खेळात कधीच तडजोड केलेली नाही. पण हळूहळू जसजसा टीम इंडियाचा भार धोनीच्या अंगावर यायला लागला आणि जेव्हा त्याला टीम इंडियाचे कर्णधारपद दिले गेले तसतसा धोनीने परिपक्वता दाखवत आपल्या फलंदाजीत बदल केले. सामना शेवटपर्यंत नेण्याच्या कलेने त्याला जगातील सर्वात मोठा फिनिशर बनवले. अशाप्रकारे धोनीच्या या कलेचे कौतुक करताना टीम इंडियाचा माजी कर्णधार राहुल द्रविड म्हणाला की,’ धोनी सामन्याच्या शेवटी अशा प्रकारे फलंदाजी करतो की जणूकाही त्याला निकालाची चिंता नसते.’

राहुल द्रविडने ‘ईएसपीएन क्रिकइन्फो’ च्या व्हिडिओ चॅटमध्ये संजय मांजरेकर याच्याशी संवाद साधताना सांगितले की, “मला वाटतं की आपल्याकडे हा गुण असावा किंवा आपण यासाठी स्वतःला ट्रेन केले पाहिजे. हा असा गुण आहे जो माझ्यामध्ये कधीच नव्हता. कोणत्याही निर्णयाचा निकाल माझ्यासाठी महत्त्वाचा होता. धोनीला विचारले पाहिजे की ही त्याची नैसर्गिक गुणवत्ता आहे की त्याने ती विकसित केली आहे.”

महेंद्रसिंग धोनीने २००४ मध्ये बांगलादेशविरूद्ध पदार्पण केले होते, परंतु २००५ मध्ये तो पाकिस्तानविरुद्ध आपल्या नैसर्गिक रूपात दिसून आला. सहा सामन्यांच्या या मालिकेतील दुसर्‍या सामन्यात त्याने १४८ धावांची आक्रमक खेळी केली. आयसीसीच्या तीनही ट्रॉफी (एकदिवसीय विश्वचषक, टी -२० विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी) जिंकणारा तो एकमेव कर्णधार आहे. तसेच २००७ मध्ये टी -२० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाला कमी लेखण्यात आल्यावर तभारताने त्याच्याच कर्णधारपदाखाली हे विजेतेपद जिंकले.

विशेष म्हणजे आयसीसी विश्वचषक २०१९च्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यानंतर धोनीने स्वत: ला क्रिकेटच्या मैदानापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला. कारण भारतीय सेनेच्या बटालियनबरोबर त्याला दोन महिने काश्मीरमध्ये प्रशिक्षण घ्यावे लागले. यानंतर परतलेल्या धोनीने अजूनही टीम इंडियाकडून खेळणे योग्य मानले नाही. अशाप्रकारे चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार धोनीने आयपीएल जवळ आल्यानंतर मैदानावर सराव सुरू केलेला होता. अनेक व्हिडिओंमध्ये धोनी जुन्या लयीमध्ये दिसला होता. मात्र कोरोनाच्या या साथीमुळे अचानक सराव शिबिर थांबवावे लागले आणि सर्व खेळाडू आपापल्या घरी परत गेले.

३८ वर्षीय धोनीने भारतासाठी आतापर्यंत ३५० एकदिवसीय सामने आणि ९८ टी -२० चे सामने खेळलेले आहेत, ज्यामध्ये त्याने अनुक्रमे १०,७७३ आणि १६१७ धावा केल्या आहेत. अशा परिस्थितीत धोनी पुन्हा मैदानात परत येईल की नाही, याकडे चाहत्यांचे डोळे लागलेले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

मुख्यमंत्र्यांच्या जागी दुसरे कोण असते तर डोक्याला हात लावला असता – जितेंद्र जोशी 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेले अडीच महिने राज्यातील कोरोनाची स्थितीचे राजकारण केले जात आहे. रोज नव्याने ठाकरे सरकारवर आणि प्रत्यक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आल्या. यासंदर्भात एका वृत्तपत्राच्या ऑनलाईन मुलाखतीत अभिनेता जितेंद्र जोशी याला प्रश्न विचारला असता त्याने मुख्यमंत्र्यांच्या बाजूने मत मांडले आणि मुख्यमंत्र्यांच्या जागी दुसरे कोण असते तर डोक्याला हात लावला असता असे विधान केले

गेल्या दोन अडीच महिन्यांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला जात आहे. मात्र राज्यातील ही परिस्थिती हाताळताना त्यांचा कस लागला आहे. ते सतत विविध माध्यमातून संवाद साधण्याचा, परिस्थितीचा आढावा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. स्वतः जातीने सर्व ठिकाणी लक्ष देत आहेत. परिस्थितीनुसार निर्णय घेत आहेत. याबाबत जितेंद्र जोशी यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले आहे. त्यांनी सर्वांच्या टीकेला उत्तर देत मुख्यमंत्र्यांची बाजू घेतली आहे.

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचं प्रशासन जे काही काम करत आहेत. त्यावर अनेक जण टीका करत आहेत. मात्र ठाकरे सरकार येऊन किती दिवस झाले? टीका करणं सोपं आहे. पण आज करोनाच्या संकटकाळात त्यांच्या जागी इतर कोणीही त्या खुर्चीवर असतं तरी डोक्याला हात लावला असता”, असं जितेंद्र म्हणाले. या मुलाखतीत त्यांनी राज्यातील एकूण परिस्थितीवर भाष्य केले तसेच विविध घटनांवर आपले मत व्यक्त केले आहे. संवेदनशील मनाचा अभिनेता अशी त्याची ओळख आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

‘या’ देशात केवळ ९०० रुपयांसाठी पालकच करतायत आपल्या मुलांचे लैंगिक शोषण; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फिलिपीन्स जगभरात मुलांची पॉर्न इंडस्ट्री आणि मुलांच्या ऑनलाइन सेक्स रॅकेटसाठी कुख्यात आहे. कोरोनाव्हायरसमुळे, आता फिलिपिन्समध्ये लॉकडाउन सुरू आहे, ज्याचा थेट फायदा या कुख्यात उद्योगाला होत आहे. गरीबी आणि उपासमारीमुळे इथली परिस्थिती इतकी बिकट बनली आहे की फक्त १० ब्रिटिश पौंडमध्ये म्हणजे ९६० रुपये देऊन पालक आपल्या स्वत: च्याच मुलांचे लैंगिक शोषण करीत आहेत आणि त्यांना ऑनलाइन लाइव्ह स्ट्रीमिंग करत आहेत.

द सनच्या एका वृत्तानुसार फिलीपिन्समधून अशा लाइव्ह स्ट्रीमिंगची आणि चाइल्ड पोर्नची मागणी यूकेमध्ये सर्वाधिक आहे. फिलीपिन्समधील बहुतांश व्यवसाय लॉकडाउनमुळे बंद झाले आहेत, ज्यामुळे पैसे मिळवण्यासाठी पालकच आपल्या मुलांचे लैंगिक शोषण करत आहेत. काही दिवसांपूर्वीच एक असे एक कुटुंब समोर आले होते ज्यामध्ये पालक त्यांच्या ५ मुलांचा लाइव इंटरनेटवर एकत्रित शोषण करीत होते. त्यासाठी ते दर तासाला सुमारे १००० रुपये कमावत होते. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या कुटुंबातील सर्वात लहान मुलाचे वय हे केवळ ३ वर्षाचे आहे. इंटरनेटवर हे असे लैंगिक अत्याचाराचे व्हिडीओ पाहणाऱ्यांची संख्याही मोठी होती. लॉकडाऊन दरम्यान, फिलिपिन्सच्या या उद्योगात तीन पटीने वाढ झाली आहे.

हे व्हिडिओ ब्रिटनमध्ये सर्वात जास्त पहिले जात असल्याचे म्हटले जात आहे, आता या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी यूके नॅशनल क्राइम एजन्सी सक्रिय झाली आहे. याशिवाय अमेरिकन एजन्सी एफबीआय आणि युरोपोलदेखील या प्रकरणांचा तपास करत आहेत. इंटरनेट वॉच फाउंडेशनच्या म्हणण्यानुसार, केवळ ब्रिटनमधील लॉकडाऊन दरम्यान सुमारे ९ कोटी लोकांनी अशा प्रकारच्या चाइल्ड पॉर्न शोधण्यासाठी सर्च केला आहे. मुलांचे लाइव पॉर्न सर्च यूकेमध्ये सर्वाधिक केला जात आहे. यासाठी केवळ १० ब्रिटिश पाउंड ते ३० ब्रिटीश पौंड द्यावे लागतात.

नॅशनल क्राइम एजन्सीचे प्रमुख जॉन टॅनॅगो यांच्या म्हणण्यानुसार, आंतरराष्ट्रीय न्याय मिशनने गेल्या ५ वर्षांत फिलिपिन्समधून मोठ्या प्रमाणात सेक्स ट्रॅफिकिंग केलेल्या मुलांना वाचवले आहे. जगभरातील अनेक देशातील लॉकडाऊनमुळे या उद्योगात अचानक तेजी दिसून येत आहे, जे या मुलांच्या भवितव्यासाठी अत्यंत धोकादायक असल्याचे सिद्ध होऊ शकते. जॉन म्हणाले की,’ फिलीपिन्समध्ये चाइल्ड सेक्स-पोर्न उद्योग सर्वात मोठा आहे आणि येथे लोकांना त्यांच्या पसंतीनुसार व्हिडिओ किंवा लाइव्ह कंटेंट सहजपणे उपलब्ध केला जातो. त्यांचे ग्राहक हे बहुतेक वेळा पाश्चिमात्य देशातील असले तरी. सर्व पेमेंट ऑनलाइन आहेत आणि त्यासाठी अनेक बनावट पेमेंट वेबसाइट बनविल्या गेल्या आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार राम मंदिर शिलान्यास; ‘या’ तारखेवर होऊ शकतो शिक्कामोर्तब

नवी दिल्ली । श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या सदस्यांनी पंतप्रधानांना भेटून अयोध्येत निर्माण होणाऱ्या राम मंदिराच्या पायाभरणीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधानांनीही हे आमंत्रण स्वीकारले आहे. ट्रस्टच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २ जुलै रोजी म्हणजेच देव शयनी एकादशीच्या दिवशी पायाभरणी करण्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, पंतप्रधान कार्यालयाने अद्याप ही तारीख निश्चित केलेली नाही.

उत्तर प्रदेशमधील अयोध्या येथे राम मंदिराच्या पायाभरणीच्या कार्यक्रमाची तयारी आता पूर्ण झाली आहे. राम मंदिर बांधण्यापूर्वी समतलीकरणाचे काम जवळपास पूर्ण होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराच्या पायाभरणीचा कार्यक्रम आयोजित करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. यासाठीच श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या सदस्यांनी पंतप्रधानांना भेटून राम मंदिराच्या शिलान्यास कार्यक्रमात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले आहे.

म्हणून २ जुलै रोजी होऊ शकतो राम मंदिराचा शिलान्यास
येत्या २ जुलै रोजी हिंदु दिनदर्शिकेनुसार देव शयनी एकादशी आहे, अर्थात या नंतर देव झोपी जातात आणि ४ महिन्यांनंतर म्हणजेच कार्तिक महिन्यात देव उत्थान एकादशीच्या दिवशी जागृत होतात. या चार महिन्यांत हिंदूंमध्ये कोणतेही नवे किंवा शुभ कार्य केले जात नाही. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वेळापत्रक काही दिवस अत्यंत व्यग्र आहे. म्हणूनच आता देव शयनी एकादशीची वेळ जवळ येत असल्यामुळे यावेळी जर पायाभरणी केली गेली नाही तर मग पुढील चार महिने ते कार्य करणे शक्य होणार नाही, असे म्हटले जात आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

CBSE बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी पालकांची सुप्रीम कोर्टात धाव

नवी दिल्ली । केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ  म्हणजेच CBSE बोर्डाच्या बारावीच्या उर्वरित विषयांच्या परीक्षा जुलै महिन्यात होऊ घातल्या आहेत. मात्र, कोरोनाचे संक्रमण वाढत असल्याने या परीक्षा रद्द कराव्यात अशी मागणी करत काही पालकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या पालकांनी सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या उर्वरित परीक्षा रद्द करावी अशा मागणीची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे.

CBSE च्या दहावी आणि बारावीच्या उर्वरित परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना आधी झालेल्या विषयांच्या परीक्षांच्या गुणांच्या आधारे सरासरी काढून उर्वरित विषयांचे मूल्यांकन करावे, अशी या पालकांची मागणी आहे. देशभरात करोना संक्रमण वाढत चालले आहे. बारावीच्या परीक्षांसाठी लाखो विद्यार्थी परीक्षा केंद्रांवर हजर राहणार, त्या दरम्यान त्यांना संक्रमणाचा धोका आहे. त्यांच्या आरोग्याचा विचार करून या परीक्षा रद्द कराव्यात असं याचिकाकर्त्यांनी म्हटलं आहे.

CBSE ने बारावी परीक्षा घेण्यासंदर्भातले नोटिफिकेशन १८ मे रोजी जारी केले आहे. यात सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या उर्वरित परीक्षा येत्या १ ते १५ जुलै दरम्यान आयोजित करण्यात आल्याचे म्हटलं आहे. यापैकी सीबीएसई बारावीच्या परीक्षा देशभर होणार आहेत.  दरम्यान, CBSE बोर्डाने जारी केलेलं हे नोटिफकेशन रद्द करण्याची मागणी पालकांनी केली आहे. ‘जुलै महिन्यात करोना संक्रमण उच्चांकी असणार आहे, असं AIIMS चा डेटा सांगत असताना नेमके याच महिन्यात सीबीएसई परीक्षांचे आयोजन करत आहे. हे विद्यार्थ्यांवर अन्याय करणारे आहे,’ असं या याचिकेत म्हटलं आहे.

CBSE देशभरातील १५ हजार परीक्षा केंद्रांवर दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेणार आहेत. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्यासाठी परीक्षा केंद्रांमध्ये वाढ करण्यात आली. आधी तीन हजार परीक्षा केंद्रे होती. सीबीएसई करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेणार असली तरी लाखो विद्यार्थ्यांचे आरोग्य परीक्षांमुळे धोक्यात येऊ शकते,’ अशी भीती या याचिकेत व्यक्त करण्यात आली आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in