एकदिवसीय क्रिकेटमधील धोनीच्या ‘या’ गुणांचा राहुल द्रविडला आहे अभिमान म्हणाला की…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात, भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी फलंदाजी आणि लांबच लांब षटकार मारणारा म्हणून ओळखला जात असे. इतकेच नाही तर वन डे क्रिकेटमध्ये पहिले षटक असो किंवा शेवटचे असो धोनीने आपल्या नैसर्गिक खेळात कधीच तडजोड केलेली नाही. पण हळूहळू जसजसा टीम इंडियाचा भार धोनीच्या अंगावर यायला लागला आणि जेव्हा त्याला टीम इंडियाचे कर्णधारपद दिले गेले तसतसा धोनीने परिपक्वता दाखवत आपल्या फलंदाजीत बदल केले. सामना शेवटपर्यंत नेण्याच्या कलेने त्याला जगातील सर्वात मोठा फिनिशर बनवले. अशाप्रकारे धोनीच्या या कलेचे कौतुक करताना टीम इंडियाचा माजी कर्णधार राहुल द्रविड म्हणाला की,’ धोनी सामन्याच्या शेवटी अशा प्रकारे फलंदाजी करतो की जणूकाही त्याला निकालाची चिंता नसते.’

राहुल द्रविडने ‘ईएसपीएन क्रिकइन्फो’ च्या व्हिडिओ चॅटमध्ये संजय मांजरेकर याच्याशी संवाद साधताना सांगितले की, “मला वाटतं की आपल्याकडे हा गुण असावा किंवा आपण यासाठी स्वतःला ट्रेन केले पाहिजे. हा असा गुण आहे जो माझ्यामध्ये कधीच नव्हता. कोणत्याही निर्णयाचा निकाल माझ्यासाठी महत्त्वाचा होता. धोनीला विचारले पाहिजे की ही त्याची नैसर्गिक गुणवत्ता आहे की त्याने ती विकसित केली आहे.”

महेंद्रसिंग धोनीने २००४ मध्ये बांगलादेशविरूद्ध पदार्पण केले होते, परंतु २००५ मध्ये तो पाकिस्तानविरुद्ध आपल्या नैसर्गिक रूपात दिसून आला. सहा सामन्यांच्या या मालिकेतील दुसर्‍या सामन्यात त्याने १४८ धावांची आक्रमक खेळी केली. आयसीसीच्या तीनही ट्रॉफी (एकदिवसीय विश्वचषक, टी -२० विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी) जिंकणारा तो एकमेव कर्णधार आहे. तसेच २००७ मध्ये टी -२० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाला कमी लेखण्यात आल्यावर तभारताने त्याच्याच कर्णधारपदाखाली हे विजेतेपद जिंकले.

विशेष म्हणजे आयसीसी विश्वचषक २०१९च्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यानंतर धोनीने स्वत: ला क्रिकेटच्या मैदानापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला. कारण भारतीय सेनेच्या बटालियनबरोबर त्याला दोन महिने काश्मीरमध्ये प्रशिक्षण घ्यावे लागले. यानंतर परतलेल्या धोनीने अजूनही टीम इंडियाकडून खेळणे योग्य मानले नाही. अशाप्रकारे चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार धोनीने आयपीएल जवळ आल्यानंतर मैदानावर सराव सुरू केलेला होता. अनेक व्हिडिओंमध्ये धोनी जुन्या लयीमध्ये दिसला होता. मात्र कोरोनाच्या या साथीमुळे अचानक सराव शिबिर थांबवावे लागले आणि सर्व खेळाडू आपापल्या घरी परत गेले.

३८ वर्षीय धोनीने भारतासाठी आतापर्यंत ३५० एकदिवसीय सामने आणि ९८ टी -२० चे सामने खेळलेले आहेत, ज्यामध्ये त्याने अनुक्रमे १०,७७३ आणि १६१७ धावा केल्या आहेत. अशा परिस्थितीत धोनी पुन्हा मैदानात परत येईल की नाही, याकडे चाहत्यांचे डोळे लागलेले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment