Thursday, January 1, 2026
Home Blog Page 5676

पुण्यात ४७ कोटी रुपयांच्या नकली नोटा जप्त; आर्मी जवानासह ६ जणांना अटक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बनावट नोटांचा कारभार करणारे एक रॅकेट नुकतेच पुणे येथे उघडकीस आले आहे. बुधवारी “चिल्ड्रेन्स बँक ऑफ इंडिया”च्या नावाची डमी बिले आणि यूएस डॉलरसह सुमारे ४७ कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिस उपायुक्त (गुन्हे शाखा) बच्चन सिंह यांनी याविषयी सांगितले की, या प्रकरणात भारतीय सैन्याच्या एका शिपायासह सहा जणांना अटक करण्यात आली आहे. बच्चन सिंह म्हणाले की,’ आता या नोटांची तपासणी केली जात आहे, मात्र बर्‍याच नोटांमध्ये ”चिल्ड्रन बँक ऑफ इंडियाची”ची डमी बिले वापरली आहेत.

शेख अलीम गुलाब खान (सैन्य जवान), सुनील बद्रीनारायण सारडा, रितेश रत्नाकर, तुफैल अहमद मोहम्मद इशाक खान, अब्दुल गनी रहमतुल्ला खान, अब्दुल रहमान अब्दुल गनी खान अशी अटक करण्यात आलेल्या सहा आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी केलेल्या मोजणीत ४३.४ कोटी रुपये बनावट भारतीय चलन आणि ४.२ दशलक्ष अमेरिकन डॉलरचे चलन मिळाले आहेत.

पुणे पोलिस गुन्हे शाखेचे डीसीपी बच्चन सिंह म्हणाले,’ दोन दिवसांपूर्वीच आम्हाला एमआयकडून याविषयीची माहिती मिळाली होती, त्या आधारे आम्ही हे संयुक्त ऑपरेशन केले. त्याअंतर्गत आम्ही बुधवारी सहा जणांना अटक केली. आरोपींची भारत तसेच इतरही अनेक देशांच्या बनावट नोटा मिळालेल्या आहेत. ते म्हणाले, ‘अटक केलेल्या या सहा आरोपींपैकी एक लष्करातील शिपाई आहे. तोही या प्रकरणातील आरोपी आहे.

या बनावट नोटांचा स्रोत शोधण्यासाठी सध्या चौकशी सुरू असल्याचे डीसीपीनी सांगितले. पुणे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, पुणे पोलिस आणि सैन्याच्या दक्षिणी कमांड इंटेलिजन्स युनिटने केलेल्या या संयुक्त कारवाईत पुण्यातील विमान नगर या भागात छापा टाकून या टोळीचा पर्दाफाश केला. बच्चन सिंह पुढे म्हणाले की,’ या टोळीचे सदस्य अस्सल म्हणून बनावट नोटा देऊन लोकांची फसवणूक करत असत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

राजू शेट्टींना राष्ट्रवादीने दिली विधानपरिषदेच्या आमदारकीची ऑफर

कोल्हापूर । राज्यात मोठी राजकीय घडामोड पाहायला मिळत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यपाल कोट्यातून विधानपरिषदेच्या आमदारकीची ऑफर देण्यात आली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा निरोप घेऊन राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राजू शेट्टी यांना विधानपरिषदेच्या आमदारकीची ऑफर दिली असल्याचे समजत आहे. जयंत पाटील आज राजू शेट्टींच्या कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ इथल्या निवासस्थानी पोहोचले होते. यावेळी ही ऑफर दिल्याचं म्हटलं जात आहे.

दरम्यान, या ऑफरबाबत राजू शेट्टी यांना विचारलं असता ते म्हणाले की, “प्राथमिक चर्चा सुरु झाली आहे. शरद पवार यांच्याशी यासंदर्भात थेट बोलणं झालेलं नाही. जयंत पाटील माझ्या आईच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आले होते, त्यावेळी आमच्यात प्राथमिक चर्चा झाली. यापुढे अजूनही चर्चा होणार आहे.” असं सपष्टीकरण राजू शेट्टी यांनी दिलं आहे.

राज्यपाल कोट्यातून विधानपरिषदेच्या काही जागा भरायच्या आहेत. त्यासाठी राष्ट्रवादीने हालचाली सुरु केल्या आहेत.जयंत पाटील यांनी राजू शेट्टी यांना राजू शेट्टीचे राजकीय विरोधक सदाभाऊ खोत यांना भाजपने आपल्या कोट्यातून विधानपरिषदेची जागा दिली होती. तशीच ऑफर राजू शेट्टींना देण्यात आली आहे. त्यामुळे राजू शेट्टी काय निर्णय घेणार हे पाहावं लागेल. दरम्यान, विधानपरिषदेवरील राज्यपाल नियुक्त एकूण 12 जागा भरायच्या आहेत. त्यामधील किमान चार जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येऊ शकतात. त्यामुळे शेट्टी यांच्यासारखा अनुभवी नेता विधानपरिषदेत जावा अशी शरद पवारांची भूमिका असल्याचं कळतं.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

आगामी T20 World Cup स्पर्धा होणार कि नाही? ICC ने घेतला ‘हा’ निर्णय

मुंबई । कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 World Cupचे आयोजन होणार की नाही, या मुद्द्यावर आयसीसीने बुधवारी आयोजित केलेल्या बैठकीत कोणत्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) यंदाच्या टी -२० विश्वचषकातील भवितव्याबद्दल निर्णय घेण्यासाठी आणखी एक महिना थांबण्याचा निर्णय घेतला. यासंबंधीत ठोस निर्णय घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला आणखी वेळ हवा आहे. जुलै महिन्यात या संदर्भात ICC ची बैठक होणार आहे.

व्हिडिओ कॉन्फरन्समधून झालेल्या बोर्डाच्या बैठकीनंतर आयसीसीचे मुख्य कार्यकारी मनु सावनी म्हणाले, ‘आम्हाला यावर निर्णय घेण्यासाठी एकच संधी मिळणार आहे आणि ती संधी योग्यच असली पाहिजे. त्यामुळे आम्ही आमच्या सदस्य, खेळाडू आणि सरकारकडून सतत सल्ले घेत आहोत ज्यामुळे आम्ही योग्य त्या निर्णयावर पोहोचू’ असं ते म्हणाले.

दरम्यान, पुढील महिन्यापर्यंत करोनाची स्थिती पाहून विश्वचषकाच्या आयोजनाबाबतचा निर्णय घेण्यात येईल असं आयसीसीकडून सांगण्यात आलं आहे. जर टी -२० विश्वचषकाच्या आयोजनावर स्थगिती देण्यात आली तर आयपीएलचं आयोजन करण्यात येवू शकतं असं देखील सांगण्यात येत आहे. बीसीसीआयसाठी आयपीएल अत्यंत महत्त्वाची आहे. कारण आयपीएल स्पर्धा झाली नाही तर बीसीसीआयला जवळपास ३ हजार कोटींचे नुकसान होवू शकेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

महाविकासआघाडी सरकारमध्ये काँग्रेसची खदखद? बोलावली महत्त्वाची बैठक

मुंबई । महाविकासआघाडी सरकारमध्ये सामील असलेल्या काँग्रेस नेत्यांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचं बोललं जात आहे. सरकारच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतलं जात नसल्याच्या नाराजीतून काँग्रेसच्या मंत्र्यांची आज महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीत सरकारमध्ये काय भूमिका घ्यायची याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे मंत्री सुनील केदार यांच्या मुंबईतील निवासस्थानी काँग्रेसच्या मंत्र्यांची बैठक होत आहे. राज्यातील सध्याच्या संकटाच्या काळात घेतले जाणारे विविध निर्णय तिन्ही पक्षांनी चर्चा करुन घेणं काँग्रेसला अपेक्षित आहे. मात्र निर्णय घेताना आणि मंत्रिमंडळाच्या निर्णय प्रकियेत शिवसेना आणि राष्ट्रवादीचे वर्चस्व दिसून येते आहे. त्यात सहभाग नसल्याची काँग्रेसची धारणा झाली आहे.

महाविकासआघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर उपमुख्यमंत्री न मिळाल्याने देखील काँग्रेस नाराज होती. त्यानंतर विधान परिषदेत एक जागा कमी मिळाली तेव्हा ही काँग्रेस नाराज झाली. आता निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतलं जात नसल्याने काँग्रेस पुन्हा नाराज असल्याची चर्चा आहे. याआधी काँग्रेसच्या नेत्यांनी महत्त्वाच्या निर्णयांमध्ये आम्हाला विश्वासात घेतलं जात नाही अशी तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली होती. स्वत: बाळासाहेब थोरात यांनी देखील याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत याबाबत चर्चा केली होती. पण तरी आज काँग्रेसवर बैठक होत असून. बैठक घेण्यामागचं कारण एकमेव कारण महाविकासआघाडी सरकारमध्ये काँग्रेस मंत्र्यांची नाराजी असल्याचे म्हटलं जात आहे.

राज्य सरकारमध्ये काँग्रेसची एक तृतीयांश भागीदारी असून विधानसभा अध्यक्षपदासह महसूल, ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम ही खाती काँग्रेसकडे आहेत. मात्र आता सरकारच्या निर्णय प्रक्रियेमध्ये अपेक्षित महत्त्व मिळत नसल्याची खदखद काँग्रेसमध्ये आहे. गृह, आरोग्य ही महत्त्वाची खाती राष्ट्रवादीकडे आहेत. निर्णय प्रक्रियेमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीचे वर्चस्व दिसत आहे. कोरोनावरील उपाययोजनांमध्ये काँग्रेसच्या मंत्र्यांचा काहीही सहभाग नाही. त्यामुळे काँग्रेस नेते आणि मंत्री नाराज आहेत अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.’

आता अमिताभ बच्चन सांगणार गुगल मॅपवर रस्ता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूडचे महानायक म्हणून भारतात प्रसिद्ध असणारे बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांचे जगभरात अनेक चाहते आहेत. भारतात तर त्यांचा एक प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे जो अक्षरशः त्यांच्या प्रेमातच आहे. अमिताभ बच्चन हे त्यांच्या अभिनयासोबत भारदस्त आवाजासाठी देखील प्रसिद्ध आहेत. वयाची पंचाहत्तरी ओलांडूनही त्यांनी अनेक आव्हानात्मक भूमिका निभावल्या आहेत. आणि वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी दरवेळी वेगवेगळ्या ढंगाच्या भूमिका केल्या आहेत. आता ते त्यांच्या भारदस्त आवाजात नेटकऱ्यांना गुगल मॅपवरून पत्ता शोधायला मदत करणार आहेत. अशी माहिती समोर आली आहे.

मिड डे ने दिलेल्या एका वृत्तात असा खुलासा करण्यात आला आहे. सध्या गुगल ऑडिओ फॉर्म मध्ये पत्ता सांगणाऱ्या एका ऍपवर काम करत असल्याचे सांगण्यात आले. या ऍप्लिकेशन मध्ये कृत्रिम बुद्धिमतेवर चालणारे सॉफ्टवेअर असणार आहे. या सॉफ्टवेअरच्या ऑडिओ फॉर्मला बिग बी आवाज देण्याची शक्यता आहे. यासाठी गुगलने सध्या अमिताभ बच्चन यांच्याशी संपर्क केला आहे. दोघांमध्ये चर्चा सुरु आहेत. तसेच यासाठी कोट्यवधी रुपये मानधन गुगलने बिग बी ना देऊ केल्याचे सांगितले जात आहे.

सध्या अमिताभ बच्चन हे कोरोनामुळे इतर सेलिब्रिटींसारखे घरीच असले तरी ते सतत त्यांच्या चाहत्यांच्या समोर येत असतात. त्यांनी कोरोनाच्या या संकटकाळात जनजागृतीचे अनेक व्हिडीओ घरातून केले आहेत. जे प्रसारितही झाले आहेत. तसेच घरातूनच कौन बनेगा करोडपतीचे प्रश्नाही ते विचारत आहेत. त्यांच्या इंस्टाग्राम वरून ते सातत्याने त्यांच्या चाहत्यांशी संवाद साधत असतात. त्यांचा आगामी गुलाबो सीताबो हा सिनेमा १२ जूनला ऍमेझॉन प्राईमवर डिजिटली प्रदर्शित केला जाणार आहे. तर एकूण आता बिग बी चा भारदस्त आवाज आपल्याला गुगलच्या ऍपवर देखील ऐकायला मिळणार आहे.

आणि फोटोग्राफरला पाहून धावत सुटली मल्लिका शेरावत; व्हिडीओ व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या बोल्ड लूक्स आणि सीनमुळे नेहमीच चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे मल्लिका शेरावत होय. सध्या मल्लिका शेरावत सिनेमांमध्ये फारशी दिसत नाही. मात्र सोशल मीडियावरून ती दिसत असते. २००४ मधील मर्डर या सिनेमातील बोल्ड सीनमुळे मल्लिका शेरावत सर्वाना माहित झाली होती. सर्व तरुणवर्गाला या सिनेमाने आकर्षित केले होते. या सिनेमातील तिच्या सीनमुळे ती सेक्स सिम्बॉल बनली होती. तिचा एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ती पळताना दिसत आहे.

बांद्रा येथे पार्क मध्ये फिरतानाचा हा व्हिडीओ आहे. ज्यामध्ये ती चालत येत आहे. तिच्या तोंडाला मास्क असल्याने ती ओळखू येत नाही मात्र तेथील फोरोग्राफरने तिला लगेच ओळखले. त्याने तिला मॅडम जॉगिंग असे म्हंटल्यावर मल्लिका पळू लागते. असे दिसते आहे. त्या फोटोग्राफर जवळ जाऊन ती सगळेच घाबरले असे म्हणून हसते असा हा गंमतीशीर व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. यावर अनेकांनी कमेंट्स ही केल्या आहेत.

https://www.instagram.com/p/CBNzALDAuyo/  

आपल्या वादग्रस्त विधाने आणि बोल्ड सीन, फोटो यांच्यामुळे चर्चेत असणारी मल्लिका आता या व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. ख्वाहिश, प्यार के साईड इफेक्ट्स, आप का सुरूर, वेलकम, हिस्स या सिनेमांमध्ये तिने काम केले आहे. अलीकडे तिने कोणत्या सिनेमात काम केलेले नाही.

जिथे हिंदू नाहीत तिथे धर्मनिरपेक्षता नाही – कंगना रनौत 

मुंबई ।  काश्मीर मध्ये सोमवारी हिंदू सरपंच अजय पंडित यांची दहशतवाद्यांनी हत्या केली होती. यावर देशभरातून अनेक संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. अभिनेता अनुपम खेर आणि क्रिकेटर सुरेश रैना नंतर आता अभिनेत्री कंगना रनौत ही या विषयावर बोलली आहे. नेहमीच आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे प्रसिद्ध असणारी कंगनाने या  व्हिडीओत देखील आपले परखड मत मांडले आहे.  या प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त करीत असताना अजय पंडित यांचे बलिदान व्यर्थ जाता काम नये असे ती म्हणाली आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम वरून शेअर केलेल्या व्हिडिओत जिथे हिंदू नाहीत तिथे धरणमनिरपेक्षता नाही असे विधान केले आहे.

स्वतःला बुद्धिजीवी  तसेच देशातील कलाकार लोक अनेकदा हातात बोर्ड घेऊन, मेणबत्त्या, दगड घेऊन निषेध करताना दिसतात. ते  रस्त्यावर येतात तो मुद्दा आंतरराष्ट्रीय करतात.  मुद्द्याच्या मागे जिहादी कारण असेल तरच ते हे करतात. एखाद्याला न्याय मिळवून द्यायचा असेल तेव्हा हे जिहादी अजेंड्यावाले लोक धर्मनिरपेक्षतेच्या चामडीखाली लपून बसतात. असे ती म्हणाली. तसेच मुळात काश्मीर मध्ये इस्लाम कसा आला. याबद्दल तिने माहिती दिली. आणि जो धर्म अणूरेणूवर देखील प्रेम करायला शिकवतो त्याला तुम्ही धर्मनिरपेक्षता म्हणता का? असा प्रश्नही विचारला. तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या व्हिडिओत निवेदन केले आहे. की त्यांनी हिंदूंना पुन्हा काश्मीर मध्ये वसवावे.

https://www.instagram.com/p/CBQFFbEg7_c/

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिने पंडितांना त्यांच्या काश्मीर मध्ये पार्ट नेले जावे, त्यांच्या जमिनी त्यांना परत दिल्या जाव्यात आणि त्यांना तिथे पुन्हा वसविले जावे अशी विनंती केली आहे. या व्हिडिओत ती म्हणाली इतिहास साक्ष आहे, जिथे हिंदू नाहीत तिथे धर्मनिरपेक्षता नाही. १९८९ मध्ये मोठ्या प्रमाणातील दहशतवादी घटनांमुळे हिंदूंनी काश्मीरमधून पलायन केले होते. त्यांनी जम्मू जवळच्या आश्रय शिबिरांमध्ये निवारा घेतला होता. आता मोठ्या प्रमाणात हे  पंडित इथेच आहेत. अगदी मोजकेच पंडित काश्मीर मध्ये शिल्लक आहेत. त्यांचीही हत्या केली जात आहे. याबाबत आता निषेध व्यक्त केला जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले बेंजामिन नेत्यानाहू यांचे अभिनंदन 

वृत्तसंस्था । इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज फोनवर संभाषण झाले. नेत्यानाहू यांनी मागच्याच महिन्यात इस्रायल मध्ये त्यांचे सरकार स्थापन केले आहे. यावेळी नरेंद्र मोदी यांनी नुकताच पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारल्याबद्दल तसेच विक्रमी ५ व्या वेळेस हे पदग्रहण केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. यावेळी दोघांनी विविध विषयांवर चर्चा केल्याची माहिती मिळाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूच्या या साथीत तसेच इतर क्षेत्रातील सहकार्य वाढविण्याविषयी चर्चा केली तसेच कोरोना विषाणूनंतर भारत आणि इस्रायल यांचे परस्पर संबंध यावर चर्चा केली तसेच त्यांचा सकारात्मक प्रतिसाद आहे, अशी माहिती मिळाली आहे. तसेच मोदींनी नेत्यानाहू यांना ही परिस्थिती नियंत्रणात आल्यावर भारत भेटीला येण्याचेही निमंत्रण दिले असल्याची माहिती समोर आली आहे.

याअगोदर या दोन्ही नेत्यांनी कोरोना विषाणूच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर दोनदा सल्लामसलत केली होती. नेत्यानाहू यांच्या विनंतीवरून भारताने इस्रायल ला हॅड्रॉक्सिक्लोरीन आणि इतर वैद्यकीय उपकरणे पुरविली होती. मोदींनी देखील नेत्यानाहू यांच्याशी उत्कृष्ट संवाद झाला असल्याचे ट्विट केले आहे. एकाच वर्षात सलग तीन निवडणुकांमध्ये स्पष्ट जनादेशासाठी संघर्ष करून शेवटी १७ मे रोजी त्यांनी सरकार स्थापन केले आहे.

सांगली जिल्ह्यात नव्याने १० जण कोरोना पॉझिटिव्ह; शिराळा तालुक्यातील मणूदर बनले हॉटस्पॉट

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाड होत असून बुधवारी नव्याने 10 रुग्णांची भर पडली. यापैकी पाच जण बाधितांच्या संपर्कातील आहेत. शिराळा तालुक्यातील मणूदर हॉटस्पॉट बनला असून तेथे पुन्हा चार जण पॉझिटिव्ह आढळले. तेथील 40 वर्षांचा पुरुष, 38 वर्षीय पुरुष, 17 वर्षाचा मुलगा व 16 वर्षाच्या मुलगीचा समावेश आहे. विट्यातील कोरोना बाधिताचा अकरा वर्षाचा मुलगा व 67 वर्षीय सासरा, आटपाडी तालुक्यातील तालुक्‍यातील विठलापूर येथील 96 वर्षीय महिलेला कोरोना बाधित झाली आहे. मांगलेमध्ये बाधिताच्या संपर्कातील अकरा वर्षाचा मुलगा, तसेच पलूस तालुक्यातील कुंडल येथील 55 वर्षांचा पुरुष, कडेगाव तालुक्यातील वांगीमध्ये 69 वर्षीय वृद्ध यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. कोरोनाबाधित रुग्णांपैकी आठ जणांची प्रकृती गंभीर आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत 192 रुग्ण आढळले असून उपचाराखाली 81 रुग्ण असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली.

जिल्ह्यात कोरोना बधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली असून सर्वाधिक रुग्ण शिराळा तालुक्यात आढळत आहेत. या भागातील बहुतांशी लोक मुंबईला नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने असतात. ते परतत असल्याने तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. मात्र सर्वाधिक रुगण मणदूरमध्ये आढळत असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. मणदूरमध्ये बाधितांच्या संपर्कातील पुन्हा चार जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. चाळीस वर्षांचा पुरुष, 38 वर्षीय पुरुष, 17 वर्षाचा मुलगा व 16 वर्षाच्या मुलगी हे बाधिताच्या संपर्कातील असल्याने त्यांना संस्था क्वॉरंटाईन करण्यात आले होते. काही रुग्णांना काहीसा त्रास होवू लागला होवू लागला होता. त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने त्यांचे कोरोनाच्या तपासणीसाठी स्वॅब घेण्यात आले होते, या चारही जणांचा अहवाल बुधवारी दुपारी आला असून बाधित असल्याचे स्पष्ट झाले.

विट्यातील बाधितचा मुलगा सासराही पॉझिटिव्ह
विट्यातील 34 वर्षीय कोरोना बाधिताचा अकरा वर्षाचा मुलगा आणि त्याच्या 67 वर्षीय सासऱ्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली होती. त्या दोघांची तपासणी केली असता त्यांचा अहवाल ही पॉझिटिव्ह आला आहे.

विठलापूरला 96 वर्षाची आजी पॉझिटिव्ह
वाळवा तालुक्यातील कामेरी येथे 94 वर्षीय आजी कोरोना बाधित आढळली होती. उपचारानंतर त्या आजीने कोरणा वर मात केली होती. त्यानंतर आटपाडी तालुक्यातील विटलापूर येथे 96 वर्षाची आजी पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. या आजीमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली. त्यामुळे तिची तपासणी केली कोरोना चाचणीच्या अहवालानंतर आजी बाधित असल्याचे स्पष्ट झाले.

डॉक्टरच्या संपर्कातील मुलगाही बाधित
शिराळा तालुक्यातील मांगले येथे दोन दिवसांपूर्वी खासगी डॉक्टर आणि त्याचा भाऊ कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. डॉक्टरच्या संपर्कातील काही लोकांना संस्था क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. त्यापैकी अकरा वर्षाच्या मुलग्याला सर्दी, खोकला आणि ताप येऊन त्रास होऊ लागल्याने त्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. त्याला मिरजेतील रुग्णालयात तपासणीसाठी पाठवले होते. त्याच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

पलूस तालुक्यातील कुंडल या गावातही बुधवारी कोरोनाने शिरकाव केला. या तालुक्यात मागील चार दिवसात नऊ रुग्ण आढळले आहेत. कुंडल येथे 55 वर्षीय व्यक्ती 23 मे रोजी रायगड येथून आली होता. येथे त्या व्यक्तीचा भाचा आहे. रायगडमधून आल्यानंतर त्या व्यक्तीला होम क्वॉरंटाईन केले होते. त्याच्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळली होती, त्याबाबत तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती देवून त्यांना मिरजेतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे कोरोनाच्या तपासणीसाठी स्बॅब घेण्यात आला होता, 55 वर्षीय व्यक्तीही पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा आरोग्य विभागाकडून शोध घेण्यात येत आहे. कडेगाव तालुक्यातील वांगी येथील 69 वृद्धामध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्याने त्याला मिरजेतील रुग्णालयात दाखल केले होते. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याच्या संपर्कातील व्यक्तींना क्वॉरंटाईन कक्षात दाखल केले आहे.

सातारा जिल्ह्यात दिवसभरात ४० नवे कोरोनाग्रस्त; रुग्णसंख्या ६८९ वर

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सातारा जिल्ह्यात बुधवारी सकाळी २० आणि रात्री २० असे एकुण ४० नवे कोरोनाग्रस्त सापडले आहेत. यामुळे जिल्ह्यातील एकुण कोरोना बाधितांचा आकडा आता ६८९ वर पोहोचला आहे. अशी माहीती जिल्हा शल्यचिकीत्सक डाॅ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. सद्यस्थितीत जिल्हयात 241 कोरोना बाधितांवर उपचार सुरु आहेत. आज दिवसभरात जिल्ह्यात 18 जण कोरोना मुक्त झाले आहेत. जिल्हयात आतापर्यन्त 419 जण कोरोना मुक्त झाले आहेत.

सातारा जिल्ह्यातील विविध कोरोना केअर सेंटर, उपजिल्हा रुग्णालय येथे अनुमानित म्हणून भरती असलेल्या 20 जणांचे रिपोर्ट बुधवारी रात्री उशिराने पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. यामध्ये खंडाळा तालुक्यातील आसवली येथील 25 वर्षीय पुरुष, पाटण तालुक्यातील जांभेकरवाडी येथील 30 वर्षीय पुरुष, महाबळेश्वर येथील 29 वर्षीय महिला, जावली तालुक्यातील भणंग येथील 21 वर्षीय पुरुष व 24 वर्षीय महिला, धोंडेवाडी येथील 63 पुरुष, 57 वर्षीय पुरुष, सातारा तालुक्यातील पिंपळवाडी धावडशी येथील 15 वर्षीय मुलगी व 12 वर्षीय मुलगा, शाहुपुरी सातारा येथील 58 वर्षीय पुरुष, वाई तालुक्यातील व्याजवाडी येथील 27, 29 वर्षीय पुरुष व 22 वर्षीय महिला, पाचवड येथील 39 वर्षीय महिला व 13 व 16 वर्षाच्या मुली, वेळे येथील 59 वर्षीय पुरुष, माण तालुक्यातील गोंदवले ब्रुद्रुक येथील 63 वर्षीय महिला, खटाव तालुक्यातील मासूरने येथील 24 वर्षीय पुरुष व गुरसाळे येथील 39 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.

दरम्यान, जिल्हयात एकुण 28 जणांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यु झाला आहे. पुणे, मुंबई या शहरांतून प्रवास करुन आलेल्या नागरिकांना होम क्वारंटाईनमध्ये राहून नियमांचे कडक पालन करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.