Thursday, January 1, 2026
Home Blog Page 5679

आता ATM मशीनला कुठेही हात न लावता काढता येणार पैसे; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आता एटीएम कार्डधारक एटीएम मशिन्सच्या स्क्रीनला आणि बटणांना स्पर्श न करताही पैसे काढू शकतील. एम्पेज पेमेंट सिस्टम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने मास्टरकार्ड बरोबरच्या कराराखाली एक कार्डलेस एटीएम आणला आहे. यामुळे एटीएम मशिन्सला स्पर्श करण्याची आवश्यकता कमी होईल आणि ते सुरक्षितही असेल.

आता काही सेकंदातच पैसे निघतील – युझर्स सुरक्षित मार्गाने या ४ सोप्या स्टेप्सला फॉलो करून कॅश काढू शकतील.

पहिले आपले बँकिंग अ‍ॅप उघडा. यानंतर एटीएममधील क्यूआर कोड स्कॅन करा. त्यानंतर बँकिंग अ‍ॅपमध्ये किती पैसे काढायचे आहेत ती रक्कम अधिकृत करा आणि एटीएममधून कॅश घ्या. यात एटीएममध्ये कोणतेही फिजिकल डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरण्याची गरज नाही, ज्यामुळे अनावश्यक होणारा संपर्क कमी होईल. सध्याच्या कोरोनाच्या या संकटात रोख रक्कम काढण्यासाठीचा हा एक चांगला पर्याय आहे.

हे कार्डलेस ‘एटीएम पावर्ड बाय मास्टरकार्ड’ एटीएम युझर्स ना जवळच्या इनेबल्ड एटीएमचे लोकेशन डिजिटलपणे शोधण्यात मदत करेल. पैशांच्या व्हिड्रॉलसाठी आपल्याला मोबाइल फोनवर त्यांचे बँकिंग अ‍ॅप वापरुन क्यूआर कोड स्कॅन करणे आवश्यक असेल.

कंपनीने एक निवेदन जारी केले आहे की, Empays IMT पेमेंट सिस्टमशी करार केला आहे, ज्या अंतर्गत ते मास्टरकार्ड कार्डलेस एटीएम आणि ईएमव्ही रोख पैसे काढण्याच्या व्यवहाराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी IMT पेमेंट सिस्टममागील बेसिक टेक्नोलॉजीला अपग्रेड करेल. .

IMT पेमेंट सिस्टम ही जगातील कार्डलेस कॅशलेस काढण्यासाठीची सर्वात मोठे एटीएम नेटवर्क आहे आणि देशभरातील ४०,००० एटीएममध्ये उपलब्ध आहे.

यामध्ये एटीएमशी कोणताही शारीरिक संपर्क न करता एटीएममधून पैसे काढणे सुलभ होते आणि यासाठी एसएमएस टेक्नोलॉजीचा वापर करते. Empays ला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने राष्ट्रीय पेमेंट सिस्टम म्हणून अधिकृत केले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री? भाजी आणि फळांनंतर आता ‘या’ कारणामुळे महागणार खायचे तेल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरस या सतीच्या रोगाने ग्रस्त असलेल्या लोकांना आता महागाईचा सामना करावा लागू शकतो. त्याचा परिणाम हा आगामी काळात आपल्या स्वयंपाकघरात दिसून येईल, यामुळे आपले महिन्याचे बजेटही खराब होऊ शकते. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार भारत सरकार आता खाद्य तेलावरील आयात शुल्क वाढविण्यावर विचार करीत आहे. हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि कॅन्टीन उघडल्यानंतर फळ तसेच भाज्यांचे दरही वाढण्याची शक्यता आहे.

काही काळापूर्वीच मोदी सरकारने आत्मनिर्भर भारत असे जाहीर केले आणि ते वाढविण्यावर भर दिला. आता आयात शुल्कात वाढ करून देशातील तेलबियांचे उत्पादन वाढविणे हे भारत सरकारचे पुढील उद्दीष्ट आहे. आपला देश खाद्यतेलांच्या बाबतीत आत्मनिर्भर व्हावा, अशी सरकारची इच्छा आहे. कारण यामुळे अनेक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल, देशातील रोजगाराच्या संधी वाढतील तसेच देशाचे आयात शुल्कही कमी होईल.

सॉल्व्हेंट एक्सट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया (एसईए) चे व्यवस्थापकीय संचालक बी.सी. व्ही. मेहता यांनी याविषयी माध्यमांना सांगितले की, खाद्यतेलाच्या आयातीला आळा घालण्यासाठी आणि देशात तेलबियांचे उद्योग वाढविण्यासाठी सरकारने सल्ला मागितला आहे. आम्ही तेलबिया उत्पादन वाढविण्यासाठी अनेक सूचना दिल्या आहेत.

सरकारच्या योजना राबविणाऱ्या स्त्रोतांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जर देशाने मलेशियाकडून पाम तेलाची आयात केली, आणि सरकारने त्यावरील कर वाढविला तर किंमती वाढल्यामुळे त्याची आयात कमी होईल. ज्यामुळे मोहरी, सोयाबीन आणि शेंगदाणा तेलबियांची मागणी वाढेल आणि हि मागणी वाढताच त्याचे उत्पादन वाढेल. तसेच या करातून येणाऱ्या पैशाचा वापर देशातील तेलबियांच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी केला जाईल, असे सरकारचे म्हणणे आहे.

आणखी एक सरकारी अधिकारी म्हणाले की,’ या करात पाच टक्क्यांनी वाढ केली जाऊ शकते. भारत प्रत्येक तेलाच्या आयातीवर इतके अब्ज डॉलर्स खर्च करतो – सरकार असे म्हणतात की,’ गेल्या काही वर्षांत देशात खाद्यतेलांची आयात वाढली आहे. देशात खाद्यतेलाच्या एकूण वापरापैकी सुमारे ७० टक्के तेल हे आयात केले जाते. ज्यावर वर्षाकाठी सुमारे १० अब्ज डॉलर्स खर्च होतात. दुसरीकडे जर आपण कराबद्दल बोललो तर भारतातील क्रूड मोहरी तेल, सोयाबीन तेल आणि सूर्यफूल यांच्या कच्च्या तेलावर सुमारे ३५ टक्के आयात शुल्क आकारले जाते. रिफाईंड पाम तेलावर ३७.५ टक्के तर रिफाइंड तेलावर ४५ टक्के आयात शुल्क लागू आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

‘लॉ’च्या विद्यार्थ्यांना दिलासा! बार काउन्सिल ऑफ इंडियाने अंतिम सत्र वगळून परीक्षा केल्या रद्द

नवी दिल्ली । कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बार काउन्सिल ऑफ इंडियाने विद्यार्थ्यांच्या दृष्टीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. देशातील विधी  महाविद्यालयांमध्ये अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना अंतिम वर्ष वगळता यंदा परीक्षा द्यावी लागणार नाही. सर्वांना परीक्षेशिवाय प्रमोट केले जाणार आहे. मात्र अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागणार आहे. बार काउन्सिल ऑफ इंडियाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, लॉ  पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना वगळून अन्य सर्व विद्यार्थ्यांना त्यांचे मागील वर्षाचे गुण आणि चालू वर्षाचे अंतर्गत मूल्यमापनाचे गुण याआधारे प्रमोट केले जाईल. बार काउन्सिल ऑफ इंडियाने नवे निर्देशही जारी केले आहेत.

दरम्या, कॉलेज उघडल्यानंतर जर संस्थांची इच्छा असेल तर ज्या वर्षीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट केले आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी अंतिम सत्र परीक्षा घेता येऊ शकेल असंही बार काउन्सिल ऑफ इंडियाने स्पष्ट केलं आहे. मात्र, यासाठी एक वेळेची विशिष्ट मर्यादा असेल. जर विद्यार्थी या परीक्षेत यशस्वी झाला नाही, तर त्याला पुन्हा डिग्री पूर्ण होईपर्यंत एक संधी आणखी मिळेल. ही परीक्षा क्लिअर केल्यानंतरच पदवी दिली जाईल.३ किंवा ५वर्षांचा एलएलबी कोर्स करत असलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षेत समाविष्ट होण्याचीही परवानगी दिली जाईल.

अंतिम वर्षासाठी संबंधित संस्था किंवा विद्यापीठे परीक्षा आयोजित करण्याच्या अन्य योग्य पद्धती अवलंबू शकतात. त्या वर्षीचे सत्र परीक्षांचे अंतर्गत गुण दुप्पट केले जाऊ शकतात, किंवा प्रत्येक पेपरसाठी प्रोजेक्ट किंवा रिसर्च रिपोर्ट तयार करायला सांगता येऊ शकते. विद्यापीठांना निर्देश दिले आहेत की परीक्षेचे आयोजन करताना उच्च शैक्षणिक स्तर लक्षात घेतला जायला हवा. सोबतच विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि आरोग्याशीही कुठल्याही प्रकारची तडजोड केली जाऊ नये.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

देशातील या मोठ्या सरकारी बँकेचे ग्राहकांना गिफ्ट; एवढा स्वस्त केला तुमचा EMI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शासकीय बँक असलेल्या कॅनरा बँकेने आपल्या कर्जाचे व्याज दर कमी करण्याची नुकतीच घोषणा केली आहे. रेपो रेट लिंक्ड इंटरेस्ट रेट (RLLR) हे ०.४० टक्क्यांनी कमी करण्यात आले आहेत. ते आता ६.९० टक्क्यांवर खाली आले आहे. बँकेने मार्जिनल कॉस्‍ट ऑफ फंड्स बेस्‍ड लेंडिंग रेट ही (एलसीएलआर)०.२० टक्क्यांनी कमी केलेला आहे. हे नवीन दर ७ जूनपासून लागू झालेले आहेत. याविषयी कॅनरा बँक म्हणते की,’ सर्व नवीन रिटेल लोन (गृहनिर्माण, शिक्षण, कार) आणि लघु उद्योगांना दिले जाणारे लोन (एमएसएमई) हे आरएलएलआरशी जोडले गेलेले आहेत. अलीकडेच इतर काही बँका जसे की पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ इंडिया आणि यूको बँक यांनी एमसीएलआरशी संबंधित रेपो दर आणि व्याज दरातही कपात केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) देखील ते कमी करण्याची घोषणा केली आहे.

कॅनरा बँकेच्या ग्राहकांची दरमहा EMIवर होईल बचत – कॅनरा बँकेकडून व्याज दर कमी केल्यावर एक वर्ष एमसीएलआर ७.५८ टक्क्यांवरून ७.६५ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. सहा महिन्यांसाठीचा एमसीएलआर हा ७.६० टक्क्यांवर आला आहे. एक दिवस आणि एक महिन्याचा एमसीएलआर ०.२०-०.२० टक्क्यांनी कमी करून ७.३० टक्के झाला आहे. एमसीएलआर कमी झाल्यामुळे बँकेचे घर, कार आणि वैयक्तिक कर्ज आणखीनच स्वस्त होईल.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) मे मध्ये रेपो दरात ०.४० टक्के कपात केली होती. त्याचा रेपो दर हा चार टक्के इतका करण्यात आला आहे. तेव्हापासून सर्व बँका आपल्या कर्जावरील व्याज दर कमी करत आहेत. ही कपात आरएलएलआर आणि एमसीएलआर या दोन्हीमध्ये केली गेली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

न्यूझीलंडनंतर आणखी एक देशानं केली कोरोनामुक्त झाल्याची घोषणा

वृत्तसंस्था । जगात कोरोनाचा कहर सुरु असताना न्यूझीलंडनंतर आणखी एका देशाने कोरोनावर पूर्णपणे मात केली आहे. टांझानियाचे अध्यक्ष जॉन मागुफुली यांनी देश कोरोना मुक्त घोषित केला आहे. याची घोषणा करताना ते म्हणाले की, हे केवळ देवाच्या आशीर्वादामुळेच शक्य झाले आहे. तरीही त्यांनी देशवासियांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले.

अध्यक्ष जॉन मगुफुली यांनी स्थानिक आरोग्य अधिकारी, अग्रभागी आरोग्य सेवा कर्मचारी आणि देशाला कोरोना विषाणूंपासून मुक्त करण्यासाठी प्रार्थना करणारे नागरिक यांना याचं श्रेय दिले आहे. देशाची राजधानी डोडोमा येथे असलेल्या चर्चमध्ये मगुफुली यांनी ही घोषणा केली. मास्कपासून मुक्ती मिळाल्यामुळे त्यांनी सेलिब्रेशन देखील केलं. ते म्हणाले की, “देश आता कोरोनाच्या धोक्यातून बाहेर आला आहे आणि लोकांची भीतीही संपली आहे.” गेल्या आठवड्यात, मागुफुली यांनी माहिती दिली होती की, रुग्णालयात फक्त ४ कोरोना रुग्ण आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार टांझानियाने 29 एप्रिलपासून कोरोना विषाणूचा कोणताही डेटा जाहीर केलेला नाही. शेवटच्या वेळी जेव्हा कोरोनाची नोंद केली गेली होती तेव्हा तेथे 509 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. त्यापैकी 21 जणांचा मृत्यू झाला होता. टांझानिया या आफ्रिकी देशातील बहुतेक लोकं दारिद्र्य रेषेखालील आहे. स्थानिक डब्ल्यूएचओच्या अधिकाऱ्यांनी देखील टांझानियामध्ये सामाजिक अंतरांचे उल्लंघन केल्यामुळे आणि धार्मिक स्थळे उघडी ठेवल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. मे महिन्यात अमेरिकेच्या टांझानिया येथील दूतावासानेही रूग्णालयात रुग्णवाढल्यानंतर इशारा दिला होता.

राष्ट्रपती मागुफुली यांना सुरुवातीपासूनच टांझानियामध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाविषयी चिंता व्यक्त केली नव्हती. ते देशवासीयांना सांगायचे की, ‘कोरोना विषाणूपासून मुक्त होण्यासाठी प्रार्थना करा. कोणताही विषाणू येशूच्या शरीरात टिकू शकत नाही.’ टांझानियामध्ये आता विद्यापीठे, महाविद्यालयं आणि आंतरराष्ट्रीय प्रवास पुन्हा सुरू करण्यात आला आहे. प्राथमिक व माध्यमिक शाळा अजूनही बंद आहेत.

Tanzania

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

केवळ धर्माच्या आधारावर सोसायटीमध्ये फ्लॅट नाकारणं हा देखील वर्णभेद- इरफान पठाण

मुंबई । अमेरिकेत जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय व्यक्तीच्या मृत्यूनंतर बरेच जण आपापले अनुभव शेअर करत आहेत. क्रिकेट विश्वातही वर्णभेदी टिप्पणी झाल्याबाबत काही क्रिकेटपटूंनी आपलं मत व्यक्त केलं आहे. आता भारतीय क्रिकेट संघाचा माजी गोलंदाज इरफान पठाणने याबाबत भाष्य केलं आहे. धर्माच्या आधारावर वर्णभेद हा मुद्दा त्याने मांडला आहे.

इरफान पठाणने मंगळवारी (9 जून) एक ट्वीट केलं होतं, ज्यात त्याने धर्माच्या आधारावर वर्णभेदाचा मुद्दा उपस्थित केला होता. ” वर्णभेद केवळ त्वचेच्या रंगापुरता मर्यादित नसून,एखाद्या सोसायटीमध्ये धर्म पाहून घर खरेदी करु न देणं हा देखील वर्णभेदाचाच भाग आहे.” असं मत 35 वर्षीय इरफानने आपल्या ट्वीटमधून व्यक्त केलं आहे. इरफानचे हे ट्वीट आतापर्यंत हजारो लोकांनी लाईक आणि रिट्वीट केलं आहे. मात्र काही ट्विपल्सने इरफानच्या या ट्वीटचा विरोधही केला आहे.

इरफानच्या आधी वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा माजी कर्णधार डॅरेन सॅमी तसंच धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलनेही वर्णभेदावर भाष्य केलं आहे. “आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघात असताना माझ्याविरोधात वर्णभेदी टिप्पणी करण्यात आली होती,” असा आरोप डॅरेन सॅमीने केला होता. संघातील सहकारी आपल्याला कालू नावाने हाक मारायचे. पण मला कालू शब्दाचा अर्थ समजल्यावर फारच धक्का बसला. डॅरेन सॅमीने याबाबत व्हिडीओ शेअर करुन सनरायझर्स हैदराबाद संघातील खेळाडूंनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.

ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

 

चार दिवसांच्या वाढीनंतर आता सोन्याचे भाव घसरण्याची शक्यता; ‘हे’ आहे कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बुधवारी सोन्या-चांदीच्या किंमती मोठ्या प्रमाणात खाली येऊ शकतात. वास्तविक, आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि एमसीएक्सवरील सोन्याच्या किंमतीत घसरण झाली आहे. मंगळवारी दिल्लीत १० ग्रॅम सोन्याची किंमत ४६,८३३ रुपयांवरून ४७,२३५ रुपयांवर गेली. या काळात सोन्याच्या किंमती ४०२ रुपयांनी वाढल्या आहेत. त्याबरोबरच आंतरराष्ट्रीय स्तरावरही सोन्याच्या किंमती प्रति औंस १७.०५ डॉलरवर पोहोचल्या. त्याचबरोबर चांदीच्या किंमतीही सोन्यासारख्या वाढल्या. मंगळवारी दिल्लीत १ किलो चांदीचा भाव ४८,४५१रुपयांवरून वाढून ४९,३४४ रुपये झाला. यावेळी चांदीच्या भावात ८९३ रुपयांची वाढ झाली. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीचे दर प्रति औंस १७.६३डॉलरवर पोचले.

आता काय होईल? तज्ज्ञांचे म्हणणे आहे की शेअर बाजाराने पुन्हा जोर पकडण्यास सुरवात केली आहे. दरम्यान, गुंतवणूकदारांचा कलही सोन्याकडे कमी झाला आणि तो शेअरच्या दिशेने गेला. मात्र, भारत आणि चीनमधील तणाव बर्‍याचदा टाळला जातोय. म्हणूनच सोन्याच्या किंमतींमध्ये नफा बुकिंग होऊ शकते. गेल्या दोन वर्षांत सोन्याने ५०% पेक्षा जास्त नफा दिला आहे. अशा परिस्थितीत आता नफा बुकिंगवर वर्चस्व आहे. लोक जुन्या सोन्याची विक्री करीत आहेत कारण जुने सोनं विकल्यावर चांगली किंमत मिळत आहे.

तज्ञ सांगतात की सोन्याची किंमत ही बर्‍याच गोष्टींवर अवलंबून असते. त्यापैकी आर्थिक आणि राजकीय कारणे ही सर्वात महत्त्वाची आहेत. ही देशांतर्गत तसेच जागतिक दोन्हीही असू शकतात. उदाहरणार्थ, जर आपल्या देशाच्या सरकारने सोन्याच्या आयातीशी संबंधित नवीन नियम लागू केला असेल तर त्याचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर होईल. त्याचप्रमाणे सोन्याची निर्यात करणार्‍या देशात उत्पादन जर एका वर्षात कमी झाले तर त्याचा परिणाम देखील या देशांतर्गत बाजारातील सोन्याच्या दरावरही होईल. त्याचप्रमाणे देशात किंवा परदेशात अशा अनेक घटना घडतात ज्याचा थेट सोन्याच्या किंमतीवर परिणाम होतो.

चला तर मग जाणून घेऊयात सोन्याची किंमत कशी निश्चित केली जाते
आपण बाजारात ज्वेलर्स कडून सोने खरेदी करता ती स्पॉट किंमत किंवा हाजीर भाव असतो. बहुतेक शहरांच्या बुलियन असोसिएशनचे सदस्य बाजार उघडण्याच्या वेळी याची किंमत निश्चित करतात. एमसीएक्स फ्युचर्स मार्केटमध्ये व्हॅट, शुल्क आणि इतर खर्च जोडून या किंमती जाहीर केल्या जातात.

दिवसभर त्याच किंमती असतात. हेच कारण आहे की, वेगवेगळ्या शहरांमधील सोन्याच्या किंमती वेगळ्या आहेत. याशिवाय स्पॉट मार्केटमधील सोन्याच्या किंमती या शुद्धतेच्या आधारावर निश्चित केल्या जातात. तसेच २२ कॅरेट आणि २४ कॅरेट सोन्याच्या किंमती वेगळ्या आहेत.

एमसीएक्सवर किंमती कशा निश्चित केल्या जातात – मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) भारतीय बाजारपेठेतील सोन्याचा मागणी-पुरवठा हा डेटा गोळा करून आणि जागतिक बाजारातील महागाईची परिस्थिती लक्षात घेऊन सोन्याच्या किंमती ठरवल्या जातात.

लंडनमध्ये असलेल्या लंडन बुलियन मार्केट असोसिएशनच्या समन्वयाने ही संघटना सोन्याची किंमत देखील ठरवते. फ्युचर्स मार्केटचे भाव देशभरात समान आहेत. परदेशात सोन्याचे दर कसे ठरविले जातात – सोन्याच्या किंमती बर्‍याच घटकांनी ठरविल्या जातात.

लंडनमध्ये एक ऑपरेटिंग आणि अ‍ॅडमिनिस्ट्रेटरिंग युनिट आहे जे आंतरराष्ट्रीय स्तरावरील सोन्याच्या किंमती निश्चित करण्यासाठी काम करते. सोन्याची किंमत प्रथम १९१९ मध्ये निश्चित केली गेली.

२०१५ पूर्वी, लंडन गोल्ड फिक्स ही सोन्याची नियामक संस्था होती जी त्याच्या किंमती सेट करतात, परंतु २० मार्च २०१५ नंतर लंडन बुलियन मार्केट असोसिएशन (एलबीएमए) ची स्थापना झाली आणि हे आयसीई प्रशासकीय बेंचमार्क चालवते.

आयसीईने १९१९ मध्ये स्थापन झालेल्या लंडन गोल्ड फिक्स युनिटची जागा घेतली आहे. ही संघटना जगातील सर्व देशांच्या सरकारांशी संबंधित राष्ट्रीय स्तरावरील संस्थांसह एकत्रित सोन्याची किंमत काय असावी याचा निर्णय घेते. लंडनच्या वेळेनुसार सोन्याचे दर दिवसातून दोनदा सकाळी १०:३० वाजता आणि संध्याकाळी ३ वाजता निश्चित केले जातात.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

आमचा कर्ण वादळाने नुकसान झालेल्यांचे अश्रू पुसतोय; श्रीनिवास पाटीलांचे शरद पवारांप्रति गौरवोद्गार

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी |

आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्थापना दिवस आहे. यानिमित्ताने रक्तदानाचा उपक्रम राबविण्याचे राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी ठरविले. तसे त्यांनी आदेश दिले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीमुळे अनेक रक्तदाते आपापल्या गावी निघून गेले आहेत. अशावेळी अनेक रुग्णांना रक्ताची आवश्यकता भासते तेव्हा त्यांना ताजे रक्त मिळत नाही म्हणून पक्षाच्या २२ व्या वर्धापनदिनानिमित्त रक्तदान शिबीर घेण्याचे नियोजन पवार यांनी केल्याचे राष्ट्रवादीचे आमदार श्रीनिवास पाटील यांनी सांगितले. यावेळी त्यांनी आमचा कर्ण वादळाने नुकसान झालेल्यांचे अश्रू पुसतोय असे गौरवोद्गार शरद पवार यांच्यासाठी काढले.

कराड येथे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयात हे रक्तदान घेण्यात आले. यावेळी त्यांनी विविध दानाचे महत्व सांगताना दान केले पाहिजे असे सांगितले. अन्नदान, द्रव्यदान, अवयवदान या समस्या लोकांपुढे येत आहेत.अगदी मूत्रपिंडाचे देखील दान केले पाहिजे असे ते म्हणाले. तसेच दानाची सुरुवात ही कर्णापासून होते हे सांगत असताना त्यांनी शरद पवार आमचे कर्ण आहेत. आणि तो सध्या वादळाने नुकसान झालेल्या पीडितांचे अश्रू पुसतोय असे ते म्हणाले.

कराड येथील यशवंतराव चव्हाण कॉलेजमध्ये कराड दक्षिण, उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिरात सुमारे 300 हून अधिक रक्तदात्यांनी केले रक्दान. यावेळी सिक्कीमचे माजी राज्यपाल खासदार श्रीनिवास पाटील, पालकमंत्री तथा सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते रक्तदात्याना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. तर शरद पवार यांच्या आवाहनानुसार रक्तदान शिबिर घेण्यात आले असून त्यास लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच सर्वसामान्यांना न्याय देण्याची भूमिका कायम राष्ट्रवादीची राहिली आहे, असे मतही पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

…म्हणून पुणे विद्यापीठाने अंतिम वर्षाची परीक्षा घेण्याची तयारी केली सुरु

पुणे । राज्यातील पदवी अभ्यासक्रमांच्या अंतिम सत्र परीक्षा रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. मात्र तसा लेखी आदेश अद्याप न आल्याने पुणे विद्यापीठाने परीक्षा घेण्याची तयारी सुरू केली आहे. याबाबत माहिती देताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. एन. एस. उमराणी म्हणाले की, “८ मेच्या राज्य शासनाच्या आदेशामध्ये अंतिम वर्ष वगळता बाकी वर्षांची परीक्षा होणार नाही असं नमूद केलं होतं. यानंतर अजून कोणताही नवीन आदेश शासनाकडून आलेला नाही. त्यामुळे ८ मेचं सर्क्यूलर हेच विद्यापीठासाठी बंधनकारक आहे. या सर्क्यूलरमध्ये नमूद केल्याप्रमाणे अंतिम वर्षाची परीक्षा घेण्याची तयारी विद्यापीठाकडून सुरु आहे.”

फक्त अंतिम वर्षाची परीक्षा होणार असा शासनाने आदेश काढल्यानंतर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात अंतिम वर्षाचीही परीक्षा होणार नाही असं सांगितलं होतं. यावर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आक्षेप घेतला. यानंतर अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करण्याच्या संदर्भात कोणताही अधिकृत जीआर शासनाकडून काढण्यात आलेला नाही, असं विद्यापीठाचं म्हणणं आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अंतिम वर्षासाठी जवळपास 2 लाख 46 हजार विद्यार्थी प्रविष्ट आहेत. ही परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठाला विविध कोर्सेसच्या एकूण दोन हजार प्रश्नपत्रिका सेट कराव्या लागणार आहेत. विद्यापीठाकडून पारंपरिक पद्धतीची लेखी परीक्षा घेतली जाईल. यामध्ये दीड तासाची 50 किंवा 40 गुणांची प्रश्नपत्रिका असेल.

दरम्यान, पदवी परीक्षा न घेता सरसरी गुणांच्या आधारे मूल्यांकन करण्याचे सरकारने जाहीर केले असले तरी अद्याप याबाबत कोणताही शासननिर्णय प्रसिद्ध न झाल्याने विद्यार्थ्यांमध्येही संभ्रम वाढू लागला आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठानेही परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. व्यावसासिकी अभ्यासक्रमांच्या परीक्षांबाबत परीक्षा घेण्याबाबतच्याही अद्याप स्पष्ट सूचना नाहीत. अंतिम सत्रांच्या परीक्षा मात्र रद्द करण्यात येत असल्याची घोषणा स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तरीही तसा लेखी आदेश अद्याप न आल्याने पुणे विद्यापीठाने परीक्षेची तयारी करून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.

ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in