Thursday, January 1, 2026
Home Blog Page 5680

पुण्यातील डाॅक्टरांकडून नागरिकांची लुटमार; हेल्थ सर्टीफिकेटसाठी आकारला जातोय आव्वाच्या सव्वा दर

पुणे । सध्या राज्यात मोठ्या शहरांमध्ये लाखो स्थलांतरित कामगार अडकले आहेत. जे आपल्या घरी परतण्याची वाट बघत आहेत. राज्य शासनाने अशा कामगारांना आपल्या घरी जाता येईल असे जाहीर केल्यापासून अनेक कामगार घरी जाण्याची आशा ठेवून आहेत. त्यांना या प्रवासासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. हे वैद्यकीय प्रमाणपत्र मिळविण्यासाठी कामगारांच्या रांगा सध्या सरकारी व खाजगी रुग्णालयासमोर लागल्या आहेत. मात्र अनेक खाजगी रुग्णालयांमध्ये या कामगारांची लूट केली जात असल्याचे दिसून येते आहे. आयएमए ने याबाबतची नोंद घेऊन खाजगी डॉक्टरांना वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी ५० ते १०० रु आकारण्याचे आवाहन केले होते. मात्र असे आवाहन करूनही या मजुरांची लूट सुरूच आहे.

कोरोना संकटाच्या सुरुवातीच्या पार्श्वभूमीवर या खाजगी डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद ठेवले होते. त्यांना उपचारासाठी दवाखाने उघडण्यासाठी वारंवार विनंती करून देखील त्यांनी आपले दवाखाने उघडले नव्हते. शेवटी सरकारला या डॉक्टरांसाठी कायदेशीर सक्ती करावी लागली होती. मात्र तरीही अनेकांनी याला जुमानले नाही. गरज असताना या डॉक्टरांनी तोंड फिरवले होते आणि आता हे मजुरांची लूट करीत आहेत. पुण्यातील बोरसे नर्सिंग होम मध्ये एका वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी ३५० रुपये आकारल्याचे समोर आले आहे. या अवाजवी दरांमुळे शक्य नसणाऱ्या कामगारांचे मोठ्या प्रमाणात हाल सुरु आहेत.

संबंधित व्यक्तीचे शारीरिक तापमान तपासणे, त्यांना सर्दी खोकला आहे का विचारणे, पूर्वी काही झाले होते का ते विचारणे असे सर्व करण्यासाठी जास्तीत जास्त १० मिनिटांचा वेळ लागतो. आणि यासाठी फार शुल्क आकारण्याची गरजही नसते. मात्र एवढ्याशा कामासाठी देखील अशा डॉक्टरांकडून लूटमार केली जात आहे. सरकारने सामाजिक अलगाव च्या नियमांचे पालन करून हे वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यास सांगितले आहे. आयएमए ने  गरजू मजुरांसाठी कमाल १०० रु पर्यंतचे शुल्क आकारण्यास सांगितले आहे आणि अगदीच कुणाला शक्य नसेल तर माणुसकीच्या नात्याने शुल्क घेऊ नका असे आवाहन केले आहे. मात्र प्रत्यक्षात याचा फारसा परिणाम या डॉक्टरांवर झाला नसल्याचे  दिसून येत आहे. राज्यात लाखो कामगार या प्रमाणपत्रासाठी रांगेत उभे राहत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

मोठी बातमी! २१ ऑक्टोबर आधीच होणार एमपीएससी ची परीक्षा? 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाच्या संचारबंदीमुळे एमपीएससी ची नियोजित परीक्षा रद्द करण्यात आली होती. मात्र परीक्षांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका तयार होत्या. या तयार असणाऱ्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका ज्या प्रत्येक जिल्ह्यातील कोषागार कार्यालयात आहेत. त्या आता सुरक्षा कक्षात ठेवण्याची विनंती करीत २१ ऑक्टोबर पर्यंत त्या सुरक्षित ठेवण्यासाठीची मुदतवाढ एमपीएससीच्या सहसचिवांनी संबंधित जिल्ह्याच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे  आहे. त्यामुळे आता राज्यातील एमपीएससीच्या परीक्षा या २१ ऑक्टोबर आधीच होतील याची निश्चिती झाली आहे.

५ एप्रिल ला एमपीएससीची परीक्षा होणार होती. मात्र संचारबंदीमुळे ती रद्द करण्यात आली. उत्तरपत्रिका व प्रश्नपत्रिका या कोषागार कार्यालयात सुरक्षित ठेवण्यासाठी ३१ एप्रिल पर्यंतची मुदतवाढ मागण्यात आली होती. मात्र संचारबंदी लांबल्यामुळे आता परीक्षाही पुढे गेल्या असल्याने आता एमपीएससीच्या सहसचिवांनी २१ ऑक्टोबर पर्यंत तयार असणाऱ्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका या सुरक्षा कक्षात ठेवाव्यात यासाठी मुदतवाढ मागितली असून तसे त्यांनी पत्र संबंधित निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविले आहे. दरम्यान राज्यातील साधारण २ लाखाहून अधिक विद्यार्थी या परीक्षेची तयारी करीत आहेत. बरेच जण आपले मुळगाव सोडून एमपीएससीसाठी म्हणून मोठ्या शहरात येत असतात. अशा अनेक विद्यार्थ्यांची निराशा परीक्षा पुढे गेल्याने झाली आहे. तसेच यूपीएससीने देखील त्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर आता एमपीएससीने २१ ऑक्टोबर पूर्वी परीक्षा घेण्याचे नियोजन केले असून पुढील १५ दिवसात ते वेळापत्रक जाहीर करणार आहेत.अशी माहिती समोर आली आहे.

दरम्यान मागच्या वर्षी उत्पादन शुल्क विभागाच्या ३३ उपनिरीक्षक, १७९ लिपीक  टंकलेखक,  १२६ कर सहाय्यक, १६ विद्युत अभियांत्रिकी सेवा आणि १ हजार १४६ स्थापत्य अभियांत्रिकी सेवा या पदांसाठी परीक्षा झाली होती. ज्याचे निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत. त्यासाठी विद्यार्थ्यांनी केलेल्या पाठपुराव्याच्या पार्श्वभूमीवर जुलै ऑगस्ट पर्यंत निकाल जाहीर करण्याचे नियोजन असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान सामाजिक अलगावचे नियम पाळून परीक्षा घेतल्या जाणार असून गरज पडल्यास परीक्षा केंद्रे बदलण्याची तयारीही दाखविण्यात आली आहे. राज्यसेवेची पूर्वपरीक्षा आणि पोलीस उपनिरीक्षक पदांच्या परीक्षा होणार आहेत. तसेच आता प्रलंबित निकाल ही लवकरच जाहीर केले जाणार आहेत. अशी माहिती समोर आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

‘भाजपने व्हर्च्युअल रॅलीसाठी १५० कोटी खर्च केले, हेच पैसे मजुरांसाठी वापरता आले नसते का?’

रांची । केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे इतर बडे नेते सध्या पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणुकीचा प्रचार करत आहे. या व्हर्च्युअल रॅलीच्या आयोजनासाठी तब्बल १५० कोटींचा खर्च आला असेल. हेच पैसे देशभरातील मजुरांना त्यांच्या गावी मोफत पोहोचवण्यासाठी वापरता आले नसते का, असा सवाल झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी उपस्थित केला. ते मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

हेमंत सोरेन यांनी म्हटले की, केंद्र सरकारकडून आमच्या अपेक्षा तर खूप साऱ्या आहेत. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे झारखंडला केंद्राकडून अजून एकही व्हेंटिलेटर मिळालेला नाही. आम्ही अत्यंत तुटपुंज्या साधनसामुग्रीसह काम करत आहोत. मात्र, कोरोनाच्या संकटातही व्हर्च्युअल रॅलीजचे आयोजन करणारा भाजप आपल्याच धुंदीत वावरत आहे, अशी टीका हेमंत सोरेन यांनी केली. दरम्यान, अमित शाह यांनी व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा श्रीगणेशा केला होता. काल मंगळवारी त्यांनी पश्चिम बंगालच्या मतदारांशीही संवाद साधला होता. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

बाहेर पडा काम करा, महाराष्ट्राला स्ट्राँग करा – पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेले अडीच तीन महिने देशात कोरोनामुळे सर्वत्र संचारबंदी आहे. देशातील रुग्णसंख्या वाढते आहे. देशातील सर्वाधिक रुग्णसंख्या महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्राने ८८ हजारचा आकडा पार केला आहे. मात्र संचारबंदीमुळे सर्वत्र अर्थव्यवस्था ही  कोलमडली आहे. अशा परिस्थितीत आता अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी काम करावे लागणार आहे. मात्र अद्याप नागरिकांच्या मनात कोरोनाची भीती आहे. त्यामुळे आपल्याला कोरोना होणार नाही ना? या भीतीने अनेकांनी घरातून बाहेर न पडण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांना प्रोत्साहित करीत रोहित पवार यांनी बाहेर पडा काम करा, महाराष्ट्राला स्ट्राँग करा असे आवाहन महाराष्ट्रातील नागरिकांना केले आहे.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आपल्या सोशल मीडिया अकॉउंटवर सतत कार्यरत असतात. या माध्यमातून ते नागरिकांशी सतत संपर्कात असतात. आता महाराष्ट्रात संचारबंदीच्या पाचव्या टप्प्यात मिशन बिगिन अगेन च्या माध्यमातून महाराष्ट्राला या संकटातून सावरण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. कोरोनाशी लढा सुरु आहेच मात्र अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठीही आता लढावे लागणार आहे. म्हणूनच पवार यांनी जनतेला आवाहन केले आहे. ‘कोरोनाच्या भितीने अनेकांच्या मनात घर केलंय. पण आता ही भिती झुगारुन घरात न बसता बाहेर पडूनच कोरोनाशी लढावं लागणार आहेत. नियमांचं शस्र हाती घेऊन आपण बाहेर पडलो तर आपल्यावर हल्ला करण्याची संधीच कोरोनाला मिळणार नाही.’ असे ट्विट पवार यांनी केले आहे.

 

राज्यात आता हळूहळू सर्व कामकाज सुरु केले जात आहे. मात्र सर्वाना सामाजिक अलगाव चे नियम बंधनकारक असणार आहेत. म्हणून घाबरून जाऊन घरात बसून उपयोग नाही. कधीतरी घरातून बाहेर पडावेच लागेल असे म्हणत रोहित पवार यांनी हे ट्विट केले आहे. त्यांनी ‘ बाहेर पडा काम करा, महाराष्ट्राला स्ट्रॉंग करा.’ असे आवाहन सर्वाना केले आहे. कोरोना संकटातून सावरून अर्थव्यवस्था पुन्हा पूर्वीच्या स्थितीत आणण्याचे नवे आव्हान सरकारपुढे असणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

PM Kisan Scheme अंतर्गत ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार वर्षाला ६ हजार रुपये; पहा नवीन यादीत तुमचे नाव आहे का?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोदी सरकारच्या शेतकर्‍यांशी संबंधित सर्वात विशेष योजनांपैकी एक योजना असलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा अनेक राज्यांनी पुरेपूर लाभ घेतला आहे. त्यापैकी यूपी हे राज्य आघाडीवर आहे, तिथूनच या योजनेला सुरुवात केली गेली होती. पश्चिम बंगाल वगळता सर्व भाजपा आणि बिगर भाजपा शासित लोक आपल्या शेतकर्‍यांना अधिकाधिक पैसे मिळवून देण्याचा प्रयत्न करीत आहेत.

यूपी, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, बिहार, गुजरात, राजस्थान, कर्नाटक आणि तामिळनाडू ही राज्ये आघाडीवर आहेत. त्यात भाजप शासित आणि बिगर-शासित राज्येही सामील आहेत. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या मते, ८ जूनपर्यंत ९ कोटी ८३ लाख शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.

भाजपा आणि त्याच्या मित्रपक्षांचे शासन असलेले राज्ये:

यूपी -22603619 शेतकर्‍यांना लाभ मिळाला आहे.
मध्य प्रदेशातील 7152643 शेतकरी या लाभार्थी यादीमध्ये आहेत.
हरियाणामध्ये 1678267 शेतकर्‍यांना फायदा झाला आहे.
आसाममध्ये 3111250 शेतकर्‍यांना लाभ झाला आहे.
गुजरातमध्ये 5329394 शेतकर्‍यांना फायदा झाला
या यादीमध्ये उत्तराखंडमधील 779154 शेतकर्‍यांचा समावेश आहे.
बिहारमध्ये जेडीयू आणि भाजपचे शासन असून त्यांचे 6677343 शेतकरी लाभार्थी आहेत.
-हिमाचल प्रदेशमध्ये 893197 शेतकरी लाभार्थी आहेत.
कर्नाटकमध्येही 5138119 शेतकर्‍यांना फायदा झाला आहे.

कॉंग्रेस व इतर पक्ष असलेली राज्ये-

छत्तीसगडमध्ये 2427910 शेतकरी लाभार्थी आहेत.
केरळमध्ये 3067712 शेतकर्‍यांनी लाभ घेतला आहे.
राजस्थानच्या 6463353 शेतकर्‍यांचा या यादीमध्ये समावेश आहे.
महाराष्ट्रातील 9964421 शेतकरी यात सामील झाले आहेत.
पंजाबमधील लाभार्थ्यांची संख्या वाढून 2342427 झाली आहे.
ओडिशामध्ये 3694751 शेतकर्‍यांनी लाभ घेतला आहे.
तामिळनाडूमध्ये 4049364 शेतकर्‍यांना फायदा झाला आहे.
तेलंगणामध्ये 3659658 शेतकरी लाभार्थी आहेत
झारखंडमध्ये 1747745 शेतकरी आहेत जे याचा फायदा घेतात

या यादीमध्ये आपले नाव कसे तपासावे?
केंद्र सरकारने सर्व लाभार्थ्यांची संपूर्ण यादी पंतप्रधान किसान योजना वेबसाइट pmkisan.gov.in वर अपलोड केली आहे. या वेबसाईटवरील ‘फार्मर्स कॉर्नर’ वर जाऊन, आपला आधार किंवा मोबाइल नंबरद्वारे आपल्याला पैसे मिळाले आहेत की नाही हे तपासू शकता.

-आपण यापूर्वीच जर अर्ज केला असेल आणि तुमचा आधार योग्यप्रकारे अपलोड झाला नसेल किंवा काही कारणास्तव आधार क्रमांक चुकीच्या पद्धतीने प्रविष्ट केला गेला असेल तर त्याची माहितीही आपल्याला त्यामध्ये सापडेल.

यात शासनाने सर्व लाभार्थ्यांची संपूर्ण यादी अपलोड केलेली आहे. फक्त एवढेच नाही तर आपल्या अर्जाची सध्याची स्थिती काय आहे. याबाबत आधार क्रमांक / बँक खाते / मोबाइल नंबरद्वारेही शेतकर्‍यांना माहिती मिळू शकते.

ऑनलाइन यादी पाहण्यासाठी सोप्या स्टेप्स
>> pmkisan.gov.in या वेबसाइटवर जा.
>> मेन पेजवरील मेनू बार पहा आणि येथे ‘फार्मर कॉर्नर’ वर जा.
>> ‘लाभार्थी यादी’ च्या लिंक वर क्लिक करा.
>> यानंतर आपले राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव यांचा तपशील भरा.
>> हे भरल्यानंतर,Get Reportवर क्लिक करा आणि संपूर्ण यादी मिळवा.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

कोरोनामुळे आगामी संसदेच्या पावसाळी अधिवेशनावर टांगती तलवार; ‘या’ पर्यायांचा होत आहे विचार

नवी दिल्ली । देशात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. दिल्लीत कोरोनाबाधितांची संख्या मोठी आहे. अशा वेळी येत्या जुलै महिन्यात होणाऱ्या संसदेचे अधिवेशन चालविण्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. संसदेतील खासदारांची आसन व्यवस्था चिटकून असल्यानं तिथे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन केले तर सर्वच खासदारांना जागा मिळू शकत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत हायब्रीड आणि व्हर्चुअल द्वारे अधिवेशन घेण्याच्या पर्यायाबद्दल विचार केला जात आहे.

या पर्यायानुसार जे आवश्यक आहेत अशांना उपस्थित राहण्याची परवानगी देता येईल आणि इतर खासदारांचा घरूनच व्हिडीओद्वारे व्हर्चुअल अधिवेशनात सहभाग घेता येईल. परंतु सोशल डिस्टन्सिंगचा नियमानुसार खासदारांसाठी संसदेत बसण्यासाठी जागा अपुरी आहे. त्याशिवाय महत्त्वाच्या बिलांवर मतदान कसे करणार, असे प्रश्नही संसद प्रशासनासमोर उभे ठाकले आहेत.

सोशल डिस्टन्सिंग नियमांनुसार राज्यसभेत सुमारे ६० सभासद आणि लोकसभा व मध्यवर्ती सभागृहात १०० पेक्षा सदस्य बसू शकतील. गॅलरीत खासदारांना बसवले तरीही एकूण सदस्यांच्या संख्येपेक्षा कमीच असेल. अन जर सरकारने वादग्रस्त विधेयक आणले किंवा भारतीय अर्थव्यवस्थेवर कोविडचा परिणाम अशा मुद्द्यांविषयी चर्चा केली गेली असेल तर, विरोधी खासदार संसदेत उपस्थित राहून गदारोळ घालतील. त्यामुळे ते संसदेचं कामकाज ऑनलाइन पाहतील असे वाटते नाही. तसेच महत्त्वाच्या बिलावर मतदान असेल तर खासदार कसे भाग घेतील, असे प्रश्न लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी बोलविलेल्या बैठकीत आले.

दरम्यान, जुलै महिन्यातच दिल्लीतील कोविड रूग्णांची संख्या १० लाखावर जाण्याचा अंदाज दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे वयोवृद्ध असलेल्या खासदारांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची, असा प्रश्न संसदेच्या सचिवांसमोर आहे. तर विद्यमान इमारतीमध्ये खासदारांसह सत्र घेणं कठीण आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

देशात इंधन दर वाढीचा भडका; सलग चौथ्या दिवशी वाढले पेट्रोल-डिझेलचे भाव

नवी दिल्ली । भारतीय तेल कंपन्यांनी सलग चौथ्या दिवशी इंधनाचे दर वाढवल्याने देशात इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. पेट्रोल-डिझेलचे दर वाढले असून रविवारपासून सुरु असणाऱ्या दरवाढीमध्ये आज पेट्रोलचे दर ४० पैसे प्रती लीटर तर डिझेलचे ४५ पैसे प्रति लीटरने वाढवण्यात आले आहेत. मंगळवारी तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात ५८ पैशांची तर डिझेलच्या दरात ५४ पैशांची वाढ केली होती.

आजच्या दरवाढीनंतर मुंबईतील पेट्रोलचा दर ८०.४१ रुपये प्रति लीटर तर डिझेलचा दर ७०.३७ रुपये प्रति लीटर झाले आहे. रविवारी पहिल्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी ६० पैसे प्रति लीटरची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर सोमवारीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ६० पैशांची वाढ झाला होती. दिल्लीतील आजचा पेट्रोलचा दर वाढून ७३.४० रुपये प्रति लीटर आणि डिझेलचा दर ७१. रु६२पये प्रति लीटर इतका झाला आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने करवाढ केल्यानंतरही कंपन्यांनी त्याचा भार ग्राहकांच्या खिशावर पडू न देण्याचा निर्णय घेत किंमती वाढवल्या नव्हत्या. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किंमती दोन दशकांमध्ये सर्वात कमी असतानाच सरकारने ६ मे रोजी तेल कंपन्यांकडून पेट्रोलवर प्रति लीटर १० रुपये तर डिझेलवर प्रति लीटर १३ रुपये कर आकारण्यास सुरुवात केल्याचे पीटीआयने दिलेल्या वृत्तामध्ये म्हटलं आहे. मात्र आता हळूहळू कंपन्यांनी या कराचा बोजा ग्राहकांवर टाकण्यास सुरुवात केल्याचे तेल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्या असणाऱ्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमीटेडबरोबर हिंदुस्ताना पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडनेही १४ मार्चपासून इंधनाच्या दरांमध्ये रोज बदल करण्याचा निर्णय तात्पुरता मागे घेतला होता. मात्र लॉकडाउनचे नियम शिथिल केल्यानंतर दररोज इंधनदरवाढ होत असतानाच चित्र मागील ४ दिवसांपासून पहायला मिळत आहे. केंद्र सरकारने मार्चमध्ये प्रती लीटरमागे ३ रुपयांनी अबकारी कर वाढवल्याने तेल कंपन्यांनी दरवाढ थांबवली होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

निसर्गग्रस्तांना NDRFच्या नियमापेक्षा जास्त मदत देणार; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

मुंबई । निसर्ग चक्रीवादळाने राज्यात मोठे नुकसान झाले.चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला बसला आहे. या जिल्ह्यांमध्ये प्रचंड नुकसान झाले आहे. घरांची मोठी पडझड झाली असून वृक्षही कोसळून पडलेत. शेतीच्या नुकसानासोबतच महावितरण कंपनीचेही मोठे नुकसान झाले आहे. चक्रीवादळांचे ज्या नागरिकांचे नुकसान झाले आहे, त्यांना राज्यातील महाविकास आघाडी सरकारने जास्तीची मदत करणार असल्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्तांना मोठा दिलासा मिळणार आहे.

निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना राज्य सरकारचा एनडीआरएफच्या ( NDRF) नियमापेक्षा जास्त मदत करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. पूर्ण नष्ट झालेल्या घराला दीड लाखांची मदत मिळणार आहे. यापूर्वी ९५ हजार मिळत होते. तर काही प्रमाणात पडझड झाली आहे त्यांना ६ हजाराहून आता १५ रुपये मिळणार आहे. घरांची पडझड झाली नाही मात्र नुकसान झालं आहे, त्यांना ३५ हजार रुपये देण्यात येणार आहेत.

NDRF च्या निकषांच्यावरती जो खर्च लागेल, तो राज्य सरकार देणार आहे. तसा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. नुकसान झालेल्याना १० हजार रोख रक्कम देण्यात येणार आहे. शेतीचे हेक्टरी नुकसान झालेल्या शेताला २५ हजाराहून ५० हजार रुपयांची मदत करण्यात येणार आहे. तर कम्युनिटी किचन सुरु करण्यावर भर देण्यात आला आहे. तसेच पुढील २ महिने मोफत धान्य देण्यात येणार आहे. त्यामुळे नुकसाग्रस्तांच्या पोटापाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

चिंता वाढली! पुणे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा १० हजार पार

पुणे । पुणे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा १० हजारच्या पुढंं गेला आहे. पुणे शहरासह विविध तालुक्यांमध्ये मागील १२ तासांत ५३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. पुणे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या मंगळवारी रात्रीपर्यंत ९ हजार ९५९ होती. त्यानंतरच्या १२ तासांत पुणे शहरासह जिल्ह्यातील इतर भागांत मिळून ५३ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळं रुग्णसंख्येनं १० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. आतापर्यंत कोरोनाग्रस्तांचा आकडा १० हजार ०१२ वर पोहोचला आहे.

महाराष्ट्रात मुंबईनंतर कोरोनाच्या महामारीचा सर्वाधिक फटका पुणे जिल्ह्याला बसला आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यातील कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असून जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरुवातीला पुणे व पिंपरी-चिंचवड या शहरांपुरता मर्यादित होता. इथं रोजच्या रोज रुग्णांची संख्या वाढत होती.

तोपर्यँत ग्रामीण भागाला याची झळ बसली नव्हती. मात्र, इतर ठिकाणांहून जिल्ह्यात आलेल्या लोकांमुळं कोरोनाचा फैलाव ग्रामीण भागांतही झाला. आंबेगाव, जुन्नर, हवेली, मुळशी, खेड अशा सर्वच तालुक्यांत करोनानं शिरकाव केला. त्यानंतर तिथंही रुग्णांची संख्या वाढत गेली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

दिलासादायक! देशात कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांच्या संख्येत पहिल्यांदाच वाढ

नवी दिल्ली । देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्यानं वाढत आहे. कोरोनाबाधितांची संख्या येणाऱ्या दिवसात वाढण्याची शक्यता असताना कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या सध्या उपचार घेणाऱ्यांच्या संख्येपेक्षा जास्त अधिक नोंदवल्या गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून आज सकाळी जारी केलेल्या आकडेवारीत ही दिलासादायक बाब समोर आली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशात कोरोनाची लागण झालेल्या १ लाख ३३ हजार ६३२ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर १ लाख ३५ हजार २०६ कोरोनाचे रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या २.७६ लाखांवर गेली आहे.

दरम्यान, कोरोनाबाधित रुग्णवाढीचा वेग अजूनही कमी झाला आहे. मागील २४ तासांत कोरोना व्हायरसचे ९९८५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यादरम्यान २७९ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. भारतात आज सकाळी ९ वाजेपर्यंत कोरोनाची एकूण संख्या २लाख ७६ हजार ५८३ होती. तर कोरोनाने मृ्त्यू झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७७४५ वर पोहोचली आहे. महाराष्ट्र कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव झाला आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या ९० हजारांवर गेली असून राज्यात आतापर्यंत कोरोनाने ३२८९ जणांचा मृत्यू झाला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”