Wednesday, December 31, 2025
Home Blog Page 5696

सोन्याची दुकानेही उघडली; ग्राहकांना घ्यावी लागेल ‘हि’ काळजी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या ७० दिवसांपासून बंद असलेली सोन्याची दुकाने आता उघडत आहे. मात्र कोरोनामुळे या बदललेल्या वातावरणात ज्वेलर्सनीही बर्‍याच गोष्टी बदलल्या आहेत. सध्याच्या या वातावरणात जर आपण सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी गेल्यास तर तुम्हाला अगदी नवीन वस्तू पहायला मिळतील. गेल्या दोन दिवसांत सोन्याच्या किंमतींमध्ये मोठी घसरण झाली आहे. शुक्रवारी दिल्ली बुलियन मार्केटमधील १० ग्रॅम सोन्याची किंमत ही २० रुपयांनी घसरून ४७२६८ रुपये झाली आहे. गुरुवारी दिल्लीत सोन्याच्या दहा ग्रॅमच्या किंमती २७४ रुपयांनी घसरल्या नंतर ती ४७,१८५ रुपयांच्या पातळीवर गेली आहे. बुधवारी पहिल्याच दिवशी सोन्याची किंमत १० ग्रॅम साठी ४७,४५९ रुपये होती.

आता आपल्या जवळच्या ज्वेलर्सच्या दुकानातही बरेच बदल झाले आहेत
देशाची राजधानी दिल्लीत आताज्वेलर्सची दुकाने सुरू झाली आहेत. आता येथे येणाऱ्या ग्राहकांचे थर्मल स्क्रीनिंग करण्यात येत आहे. तसेच मास्क आणि हातमोजे घालूनच शोरूममध्ये प्रवेश करणे अत्यावश्यक झाले आहे. कर्मचारी आणि ग्राहकांसाठी सोशल दिस्तानसिंग अवलंबले जात आहे.

यावेळी एंट्री गेटवरच सॅनीटायजेशनची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. दागिन्यांच्या सॅनीटायजेशनसाठीही एक नवीन मार्ग अवलंबला जात आहे. दागिन्यांमध्ये आता UV रेज़ द्वारे संक्रमणाचा धोका कमी केला जात आहे. ग्राहकाने दागदागिन्यांना स्पर्श केल्यानंतर UV बॉक्समध्ये घातले जातात. ज्वेलर्स असे म्हणतात की या UV किरणांमुळे दागिन्यांच्या गुणवत्तेवर कोणताही परिणाम होत नाही.

ज्वेलर्स डिस्काउंट देत आहेत
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक मोठे ज्वेलर्स सध्या डिस्काउंट देत आहेत. कारण गेल्या काही दिवसांत दागिन्यांच्या मागणीत तीव्रपणे घट झाली आहे. संध्यच्या आर्थिक पेचप्रसंगी जेव्हा बाजारात सर्वाधिक गोंधळ दिसून येतो तेव्हा सोन्यात गुंतवणूक करणे हा सर्वात उत्तम पर्याय मानला जातो. कारण तेथे कमी जोखीम आणि चांगल्या उत्पन्नाची हमी आहे. गेल्या एका वर्षात सोन्यावर सुमारे ४० टक्के रिटर्न मिळाला आहे.

वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या अहवालानुसार सन २०२० च्या पहिल्या तिमाहीत सोन्यातील गुंतवणूकीसाठी प्रचंड मागणी आहे. या अहवालात असे म्हटले आहे की, या वर्षाच्या आधारावर सोन्याची मागणी ८० टक्क्यांनी वाढून ५३९.६ टनांवर पोहोचली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा 26 वा बळी; आणखी 19 जणांचा अहवाल आला पॉझिटिव्ह

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

सातारा जिल्हयातील एकोणीस जणांचे रिपोर्ट काल रात्री उशिरा कोविड बाधित आले आहेत. तसेच कृष्णा मेडिकल कॉलेज,कराड येथे वडगांव ता. खटाव येथील 75 वर्षीय पुरुष कोविड बाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्याला मधुमेह व उच्च रक्तदाबाच्या त्रासामुळे मेंदुच्या पक्षाघाताची लक्षणे होती. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली आहे.

काल रात्री उशिरा प्राप्त झालेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यातील होळ येथील 7 व तांबवे येथील 6, कराड तालुक्यातील तुळसण येथील 5, खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील 1 यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये 3 ते 65 वर्षे वयोगटातील अकरा पुरुष व आठ महिलांचा समावेश असुन एक जण प्रावास करुन आलेला व अठरा जण कोविड बाधित रुग्णांचे निकट सहवासित आहेत.

दरम्यान, जिल्ह्यात आज कोरोनाने २६ वा बळी घेतला आहे. आत्ता पर्यंत जिल्ह्यात एकूण ५०० हुन अधिक जणांना कोरोनाची लागण झाली असून पुणे मुंबईहून प्रवास करून आलेल्या नागरिकांच्या संपर्कातून कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असल्याचे समाजत आहे. जिल्हा प्रशासनाकडून बाहेरून प्रवास करून आलेल्यांना होम क्वारंटाईनमध्ये राहून नियमांचे योग्य पालन करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

ज्योतिरादित्य सिंधियांनी ट्विटर बायोमधून ‘भाजप’ला काढून टाकले; तर्कवितर्कांना उधाण

भोपाळ । दोन महिन्यांपूर्वी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपच्या गोटात दाखल झालेले ज्योतिरादित्य सिंधिया पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आता ट्विटरमधील बायोत स्वत:चा उल्लेख जनतेचा सेवक आणि क्रिकेटप्रेमी असा करायला सुरुवात केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटच्या बायोमध्ये भाजपचा उल्लेख काढून टाकल्याचे समजते. त्यामुळे मध्य प्रदेशच्या राजकारणात पुन्हा एकदा रंगत येण्याची शक्यता आहे. यानंतर गदारोळ निर्माण झाल्यानंतरही सिंधिया यांनी कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात नवे तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत.

हे असू शकते कारण..
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ज्योतिरादित्य सिंधिया यांचे केंद्रात मंत्रिपद मिळण्याची चर्चा होती. मात्र, कोरोनामुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबवणीवर पडला आहे. अशातच मध्य प्रदेशातील विधानसभा पोटनिवडणुकीत त्यांच्या समर्थकांना भाजपकडून उमेदवारी मिळण्यात अडचणी येत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सिंधिया यांच्या गोटातील अस्वस्थता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर आता ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भाजपवर दबाव टाकायला सुरुवात केल्याचे समजते.

याआधीही ज्योतिरादित्य यांनी ट्विटर बायोत बदल करत दिलेत राजकीय भुकंपाचे संकेत
तर दुसरीकडे भाजपने मात्र पोटनिवडणुकीत सिंधिया यांच्या २२ समर्थकांना तिकीट दिल्याचा दावा केला आहे. मात्र, त्यामुळे भाजपमध्ये बंडखोरीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सिंधिया समर्थकांच्या विजयाची वाट अवघड मानली जात आहे. या सगळ्या घटनाक्रमावर सिंधिया समर्थकांकडून जाहीर भाष्य केले जात नसले तरी दबक्या आवाजात बऱ्याच उलटसुलट चर्चा सुरु आहेत. त्यामुळे ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडून भाजपवर दबाव टाकला जात आहे. सिंधिया यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्यापूर्वीही अशाचप्रकारे ट्विटरवरून पक्षाचा उल्लेख हटवला होता.

Capture 33

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

मुंबईहून अचलपुरला गावी परतलेल्या २३ वर्षीय युवकाला कोरोनाची लागण

अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई |

अमरावती जिल्हातील अचलपुर तालुक्यात असणारर्‍या व काकडा गावात मुंबईहून दिनांक २६ मे रोजी आलेल्या एका २३ वर्षीय युवकाचा कोरोना अहवाल आज सकाळी सकारात्मक आलेला आहे. विशेष म्हणजे या युवकामधे कोणतेही कोरोनाची लक्षणे आढळून आली नाहीत. मात्र तरीही याचा थ्रोट स्वॅब अहवाल कोरोना सकारात्मक आल्याने आता चींता व्यक्त होत आहे.

संबधीत युवक हा मुंबईहून गावात येताच त्याला संस्थात्मक वीलीगीकरन कक्ष बुरळघाट येथेच ठेवल्याने कोनीही गावातील व्यक्ती त्याच्या संपर्कात येऊ शकले नाही. अन्यथा अधीक बाधीत होऊ शकले असते अशी माहीती अचलपूर चे तहसीलदार मदन जाधव यांनी दीली. मुंबईहून दी. २६ मे ला हा युवक त्याच्या ५ मित्रांसोबत खाजगी वाहनाने आलेला होता. मात्र प्रशासनाने गावात येताच या युवकाला विलीगीकरन कक्षामधे १४ दीवस थाबन्यासाठी सांगीतले आहे . मात्र काही पारीवार बाहेरहुन आलेल्या आपल्या पाल्यांना कीवा संबंधीतांना विलगीकरनात ठेऊ नये असा आग्रह करतात. जर असे झाल्यास कोरोना बाधीत व्यक्तिंच्या संपर्कातील परीवाराला लागण होऊ शकते . त्यामुळे कोनीही बाहेरील आलेल्या व्यक्तिंना घरामधे न ठेवता संस्थात्मक विलीगीकरनात ठेवनेच योग्य असते असे आवाहन तहसीलदार मदन जाधव यांनी केलेले आहे.

युवकाच्या संपर्कात आणखी कोणी आलेला आहे का यासाठी विचारपूस सुरू असुन संबधीत परीसर आधीच सील करण्यात आलेला आहे. तर सपुर्ण परीसरावर प्रशासनाची नजर आहे. मात्र अचलपूर शहरामधे काही नागरीक नियमांचे पालन करत नसल्याचे दीसत आहे. ते अत्यंत धोकादायक आहे असे तहसीलदारांनी सांगीतले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

वैद्यकीय परीक्षा 15 जुलैपासून; विद्यार्थ्यांना गावात परीक्षा देण्याची मुभा

मुंबई । वैद्यकीय परीक्षा 15 जुलैपासून घेतल्या जाणार असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून विद्यार्थी शिकत असलेल्या महाविद्यालयात तसंच गावाजवळच्या परीक्षा केंद्रांवर त्यांना परीक्षा देता येणार आहे. केंद्रीय परिषदांनी दिलेल्या निर्देशानुसार आणि विद्यापीठ परीक्षा मंडळाच्या ठरावानुसार उन्हाळी 2020 वैद्यकीय परीक्षा 15 जुलैपासून घेण्याचे (प्रथम वर्ष वैद्यकीय अभ्यासक्रम 2019 वगळून) विद्यापीठाने जाहीर केले आहे. यासंबंधीचे अभ्यासक्रम निहाय वेळापत्रक लवकरच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाणार आहे.

परीक्षार्थी आणि महाविद्यालयांच्या सोयीसाठी ही परीक्षा टप्प्याटप्प्याने घेतली जाईल. कोरोनाच्या संसर्ग काळात विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून गावातच किंवा विद्यार्थी ज्या महाविद्यालयांमध्ये शिकत आहेत, त्याच ठिकाणी त्यांची प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यानुसार विद्याशाखा आणि जिल्हानिहाय परीक्षा केंद्रांची यादी आठ ते दहा दिवसांमध्ये विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिली जाईल. तसेच कोरोनाच्या संसर्गामुळे यंदा विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीनुसार परीक्षा केंद्र बदलता येणार.

कोरोना व्हायरसमुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे वैद्यकीय परीक्षा अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. यानंतर वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांची भेट घेऊन चर्चा केली. वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा येत्या 15 जुलैपासून घेण्याची विद्यापीठाची तयारी आहे. तसा प्रस्तावही विद्यापीठाने दिला आहे. याबाबत राज्यपालांना माहिती दिल्याचे, अमित देशमुख यांनी सांगितले होतं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

कोरोनाच्या छायेत किल्ले रायगडावर शिवप्रेमींविना शिवराज्याभिषेक सोहळा साजरा

रायगड । कोरोनाच्या संकटामुळे यंदा किल्ले रायगडावर होणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा छत्रपती संभाजीराजे आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला. यापूर्वी शिवराज्याभिषेक सोहळ्याचे रायगडावरून थेट प्रक्षेपण होणार होते. मात्र, निसर्ग चक्रीवादळाच्या थैमानामुळे रायगड जिल्ह्याच्या अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. मोबाईल टॉवरसुद्धा पडले आहेत. रेंज कमी प्रमाणात असल्याने तुम्हाला सोहळा दाखवण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करु, अशी ग्वाही छत्रपती संभाजीराजे यांनी ट्विटरवरुन दिली.

६ जून रोजीदेशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो शिवप्रेमी कशाचीही पर्वा न करता दरवर्षी किल्ले रायगडावर पोहोचत असतात. फक्त महाराजांचा राज्याभिषेक सोहळा डोळ्यांत साठवून घेण्यासाठी.दरवर्षी ६ जूनला हजारो किलोमीटरचा प्रवास करुन शिवप्रेमी गडावर येत असतात. परंतु कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येमुळे यंदाच्या वर्षी एकही सण साजरा करता आलेला नाही. त्यामुळे किल्ले रायगडावर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत राज्याभिषेक सोहळा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे यांनी शिवप्रेमींना शिवराज्याभिषेक सोहळा तोच जोश, तोच उत्साह, तो क्षण पुन्हा अनुभवायचा आहे, पण आपल्या गडातून म्हणजे आपल्याच घरातून असं आवाहन केलं होत. छत्रपती संभाजीराजे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शिवप्रेमी आज रायगडावर जमले नाहीत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

सांगली जिल्ह्यात कोरोनाचा पाचवा बळी : मुंबईहून आलेल्या ५८ वर्षीय महिलेचा झाला मृत्यू

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे |

जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच आज जिल्ह्यात कोरोनाचा पाचवा बळी गेला. आटपाडी तालुक्यातील झरे येथील ५८ वर्षाची महिला कोरोना बाधित होती. त्यांना मिरजेतील आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आलं होत. त्यांची प्रकृती गेली काही दिवस चिंताजनक होती. मध्य रात्री दोन वाजण्याच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सांगली जिल्ह्यात कोरोनाचा पाचवा बळी गेल्याने खळबळ उडाली आहे. अद्याप कोरोना बाधितांपैकी पाच जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु असून सध्या व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी सांगितले.

जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्या प्रवाशांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळत आहेत. सध्या मुंबई तसेच अन्य राज्यातून आलेले प्रवासी दाखल होत आहेत. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. बाहेरून जिल्ह्यात येणाऱ्यामध्ये सध्या कोरोनाचे रुग्ण सापडत असल्याने जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आटपाडी तालुक्यातील झरे येथे सहा दिवसांपूर्वी मुंबईतील नेरुळ येथून ५८ वर्षीय महिला आली होती, ती महिला कोरोनाबाधित असल्याचे तपासणीत स्पष्ट झाले होते. सदरच्या महिलेस १ जून रोजी उपचारासाठी मिरजेतील कोरोना रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात दाखल केले होते. त्या महिलेच्या घरातील पाच वर्षाच्या बालकामध्येही कोरोनाची लक्षणे आढळून आली. त्याची कोरोनाच्या तपासणीसाठी स्वॅब घेण्यात आले होते. त्याचा अहवालही पॉझिटिव्ह आला. मुंबईहून आलेल्या महिलेला कोरोना सोबतच मधुमेह, थायरॉईड, दमा आणि हृदयविकाराचा आजार असल्याने त्यांना अधिक त्रास जाणवू लागला असल्याने त्यांना एनर्जेटिव्ह व्हेंटीलेटवर काही दिवसांपासून उपचार होते. उपचार सुरु असतानाच आज पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. सांगलीतील विजयनगर येथील बँक कर्मचाऱ्याचा १९ एप्रिल रोजी मृत्यू झाल्याने जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या बळीची नोंद झाली होती. कडेगाव तालुक्यातील भिकवडी खुर्द येथील ६५ वर्षीय वृद्धाचा दुसरा, शिराळा तालुक्यातील मोहरे येथील ५० वर्षीय व्यक्तीचा तिसरा, ३० मे रोजी कडेगाव तालुक्यातील नेर्ली येथील ५७ वर्षीय व्यक्तीच्या मृत्यू झाल्याने चौथ्या बळीची नोंद झाली होती. आता आटपाडी तालुक्यातील झरे येथील ५८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात कोरोनाचा पाचवा बळी गेला आहे.

अद्याप पॉझिटिव्ह रुग्णांपैकी पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे. शिराळा तालुक्यातील मणदूर येथील ८१ वर्षाच्या पुरूष रूग्णास ऑक्सिजनवर उपचार अद्याप सुरू असून सदर रूग्णाची स्थिती स्थीर आहे. औंढी येथील ५५ वर्षीय पुरुष सद्यस्थितीत इन्व्हेजीव व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलेला असून सदर रुग्णांची स्थिती चिंताजनक आहे. शिराळा तालुक्यातील खिरवडे येथील ५६ वर्षीय व्यक्तीवर नॉन इनव्हेजिव व्हेंटिलेटरवर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे. साळशिंगेतील साठ वर्षीय व्यक्तीची प्रकृती गंभीर असल्याने त्यांनाही व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली. दरम्यान जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या हि १४३ वर गेली असून सध्यस्थितीत ५८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

भारताने कोरोनाग्रस्तांच्या संख्येत इटलीलाही टाकले मागे; मागील २४ तासात सर्वाधिक रुग्ण सापडले

नवी दिल्ली । देशात दोन महिन्याच्या कडक लॉकडाऊननंतरही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. मागील २४ तासांमध्ये देशभरात कोरोनाचे ९ हजार ८८७ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा २,३६,६५७ इतका झाला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये भारतात प्रत्येक दिवशी कोरोनाचे जवळपास १० हजार नवे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे इटलीला मागे टाकत सर्वाधिक कोरोना रुग्ण असणाऱ्या देशांच्या यादीत भारत सहाव्या क्रमांकावर आला आहे.

देशातील तज्ज्ञांनी काही दिवसांपूर्वी जून किंवा जुलै महिन्यात भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव शिगेला पोहोचेल, असा अंदाज वर्तवला होता. हा अंदाज आता खरा ठरताना दिसत आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांत देशात सातत्याने ९५०० पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जगात सर्वप्रथम कोरोनाचा मोठा फटका बसलेल्या इटलीला रुग्णसंख्येच्याबाबतीत भारताने मागे टाकले आहे. त्यामुळे भारतातील परिस्थिती चिंताजनक झाली आहे.

महाराष्ट्र हे देशातील कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेले राज्य आहे. मुंबई हा राज्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत आहे. महाराष्ट्रात शुक्रवारी कोरोनाचे २४३६ नवे रुग्ण आढळून आले. मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्याही २५ हजार ७६८ वर पोहचली असून मृतांचा आकडा १५०० वर गेला आहे. राज्यात आतापर्यंत २८४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.जगभरात आतापर्यंत तब्बल ६६ लाख लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर ३.९१ लाख लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

आई कुटुंब सांभाळावे इतक्या काळजीने मतदारसंघ सांभाळते; रोहित आर आर पाटीलांची भावनिक पोस्ट

सांगली । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर आर पाटील यांच्या पत्नी सुमन पाटील यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त आबांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी फेसबुकवर एक भावनिक पोस्ट शेयर केली आहे. आई कुटुंब सांभाळावे इतक्या काळजीने मतदारसंघ सांभाळते असं म्हणत रोहित यांनी आईच्या कामाचे कौतुक करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आई, गृहिणी, शेतातील कष्टाची कामे करणारी माझी आई. तिचा आणि राजकारणाचा कधी जास्त संबंध आला नाही. आबा राजकारणात असून राजकारण व समाजकारण जरी करत असले तरी आई राजकारणा पासून अलिप्तच होती. अचानक आबांच्या जाण्याने आमच्या कुटुंबावर, मतदारसंघावर शोककळा पसरली. आम्ही आबा गेले आणि पोरके झालो. अशाच कठीण काळात शरद पवार साहेबांनी आईवर पोट निवडणुकी मध्ये मतदारसंघाची जबाबदारी टाकली. सर्वांच्या असलेल्या प्रेमामुळे आई पोट निवडणुकीत निवडून आली असे रोहित यांनी सांगितले आहे.

आई कुटुंब सांभाळावे इतक्या काळजीने मतदारसंघ सांभाळते आहे. आबांची कमी कधी मतदारसंघातील कोणाला काम घेऊन आल्यावर आई जाणवून देत नाही. रात्र असो दिवस असो अविरत आई लोकांचे प्रश्न कसे सोडवता येतील या दृष्टिकोनातून काम करत असते. अशी रोहित यांनी सांगितले आहे. अडचणीच्या काळात जवळचे अनेक लोक पक्ष सोडून गेली. पुन्हा एकदा मजबूत अशा प्रकारे पक्ष बांधणी केली. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता आणली. तसेच नव्याने उभारी घेऊन २०१९ च्या निवडणुकीत ६३ हजार मतांनी राज्यातील २०१९ विधानसभा निवडणुक मधील पहिली महिला आमदार म्हणून निवडून येण्याचा मान आईने मिळवला. असे म्हणत, आई तुझा संघर्ष खूप मोठा आहे. तुझं जसे माझ्यावर प्रेम आहे तसेच मतदारसंघावर प्रेम आहे. माझ्या इतकीच काळजी मतदार संघाची करतेस वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

https://www.facebook.com/rrpatiljrDada/photos/a.599331813536074/1922158567920052/

मास्क न घातल्याने पोलिसांची बेदम मारहाण; एकाचा मृत्यू  

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाच्या संसर्गामुळे सध्या सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. जगभरात प्रशासन सर्व गोष्टींची खबरदारी घेत आहेत. नागरिकांसाठी सामाजिक अलगाव चे नियम बंधनकारक कऱण्यात आले आहेत. जरी संचारबंदी शिथिल केली असली तरी काही नियम काटेकोरपणे पाळण्याची सक्ती करण्यात आली आहे. मात्र बऱ्याच ठिकाणी नागरिक या नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. अनेकदा पोलिसांना कठोर कारवाई करावी लागते. मेक्सिको मध्ये एका व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी मास्क घातला नव्हता म्हणून पोलिसांनी त्याला मारहाण केली या मारहाणीत या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

मेक्सिको मधील गुआदालाजाराया शहरात ही घटना गुरुवारी संध्याकाळी घडली. याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या मारहाणीत मृत झालेल्या व्यक्तीचे नावगियोवन्न लोपेझ आहे त्याचे वय ३० वर्षे होते.  डी लॉस मेमब्रिलोस शहरात नगरपालिकेत पोलिसांनी त्याला मास्क न घातल्यामुळे ताब्यात घेतले होते. या व्यक्तीला मारहाण सुरु असताना नागरिकांनी त्याला सोडण्यासाठी पोलिसांना विनंती केली होती. मात्र त्यांनी ऐकले नाही. या घटनेनंतर तेथील नागरिकांनी संताप व्यक्त करत आंदोलन केले. त्यांनी पोलिसांच्या कारला आग लावली.

लोपेझ ने मास्क घालायला नाही म्हंटले म्हणून पोलिसांनी त्याला रायफल ने मारहाण केली. एका प्रत्यक्षदर्शीने तसा आरोप केला आहे. त्याचा मृतदेह सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आला. बेदम मारहाणीत त्याच्या डोक्यावर तीव्र आघात झाल्यामुळे मृत्यू झाला असल्याचे शवविच्छेदन अहवालात समोर आले. स्थानिकांनी यानंतर पोलिसांच्या कृत्याविरोधात आंदोलन केले. या दरम्यान, पोलीस आणि नागरिकांमध्ये थोडी झटापट ही झाली. नागरिकांनी पोलिसांच्या कारला आग लावली. लोकांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.