Sunday, December 21, 2025
Home Blog Page 572

Atal Bamboo Farming Yojana | बांबूची शेती करण्यासाठी सरकारकडून मिळणार 7 लाखांचे अनुदान; जाणून घ्या योजनेची माहिती

Atal Bamboo Farming Yojana

Atal Bamboo Farming Yojana | आपला देश हा शेतीप्रधान देश आहे. आपल्या देशातील जवळपास 75 टक्के लोकसंख्या शेती या व्यवसायावर अवलंबून असते. त्यामुळे सरकार देखील आपल्या शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत असतात. ज्याचा फायदा शेतकऱ्यांना होतो आणि त्यांना त्यातून चांगली शेती करता येते. अशातच शासनाने आणखी एक योजना राबवलेली आहे. याची माहिती अनेकांना नाही. परंतु या योजनेतून शेती करण्यासाठी सरकारकडून अनुदान देखील मिळत असते. सरकारच्या या योजनेचे नाव अटल बांबू समृद्धी योजना (Atal Bamboo Farming Yojana ) असे आहे. ही योजना महसूल विभागातील रोजगार हमी योजना विभागातर्फे बांबू लागवडीसाठी राबवली जाते.

या योजनेअंतर्गत (Atal Bamboo Farming Yojana ) शेतकऱ्यांना या योजनेतून रोप आणि मजुरीच्या रूपात लाभार्थ्यास 3 वर्षापर्यंत 6 लाख 90 हजार रुपयांपर्यंतच्या अनुदान दिले जाते. जास्तीत जास्त बांबू लागवड करावी, गे या योजनेमागील सरकारचे उद्दिष्ट आहे. बांबू लागवडीसाठी सध्याचे पावसाळ्याचे वातावरण हे अत्यंत पोषक आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना बांबू लागवड करायची आहे. त्यांनी लवकरात लवकर या योजनेसाठी अर्ज करावा. जेणेकरून बांबू लागवड करण्यासाठी त्यांना सरकारकडून अर्ज मिळेल. यासाठी रोजगार हमी योजनेतून तुम्हाला अर्ज करावा लागेल. अर्ज केल्यानंतर रोजगार हमी योजनेकडून तुमची अंतिम निवड केली जाईल.

यावर्षी वनविभागाने बांबूची जवळपास 14 लाख 67 हजार 50 विविध प्रकारची रोपे तयार केलेली आहे. ही रोप 15 रोपवाटिकांमध्ये तयार करण्यात आलेली आहे. आणि अत्यंत सवलतीच्या दराने ही रोपे सध्या विकली जात आहे. सरकारच्या या अटल बांबू समृद्धी योजनेअंतर्गत महाराष्ट्र बांबू विकास मंडळाकडून बांबू लागवड करता येते. यामध्ये वैयक्तिक शेतकरी शेतकरी उत्पादित कंपन्या आणि संस्था समूह अर्ज करू शकतात. तसेच शासकीय जमिनीवर देखील तुम्ही ही बांबूंची लागवड करू शकता.

योजनेसाठी लागणारी आवश्यक कागद | Atal Bamboo Farming Yojana

या योजनेचा अर्ज करताना तुम्हाला तुमच्या अर्जासोबत आधार कार्ड, शेतकरी असल्याचा सातबारा उतारा, आठ अ उतारा, बँक पासबुकची झेरॉक्स या कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल.

शेतकऱ्याची मोठी फसवणूक; 5400 डीएपी खतांच्या बॅगेत मिळाली माती

DAP fertilizeer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | यंदा दरवर्षीच्या तुलनेत सर्वाधिक पाऊस पडलेला आहे. पावसाचा जोर वाढल्याने अनेक शेतीच्या कामांना देखील चांगलाच वेग आलेला आहे. अनेक ठिकाणी दुष्काळसूदृश्य परिस्थिती जरी निर्माण झालेली असली, तरी शेतकरी मात्र आता शेतीच्या कामाला लागलेला आहे. शेतांसाठी लागणारे खत, बी बियाणे या सगळ्याची तयारी चालू आहे. अशातच आता पुन्हा एकदा कृषी विभागाने शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या एका मोठ्या कंपनीवर कारवाई केलेली आहे. त्या कंपनीने शेतकऱ्यांना बोगस डीए खतांची विक्री केलेली आहे. या खताच्या नावाखाली त्यांनी बॅगमध्ये माती विकण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे.

अमरावती कृषी विभागाने शेतकऱ्यांना खताऐवजी माती दिल्याचा प्रकार उघडकीस आणलेला आहे. त्यामुळे आता बोगस खते आणि बियाणे विकणाऱ्या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ सुरू झालेली आहे. आणि या लोकांवर कड क कारवाई करण्याची आता मागणी केली जात आहे.

अमरावती जिल्ह्यामध्ये हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे. एका कृषी केंद्रातील खतांचे नमुने घेतले. त्यावेळी त्या खता ऐवजी माती असल्याचा प्रकार समोर आलेला आहे. पुण्यातील खत निर्मिती कंपनी रामा फर्टीकॅम लिमिटेड या कंपनीने अमरावती जिल्ह्यामध्ये 322 आणि 10 : 26. : 26 या खताच्या 2100 बॅक अशा 5400 खतांच्या बॅगांची विक्री केलेली होती. परंतु यामध्ये वेगळे नमुने आढळून आले. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान देखील झालेले आहे.त्यांनी या खतांऐवजी बॅगमध्ये माती भरून दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

आता या कंपनीची जवळपास 453 खताची पोती जप्त करण्यात आलेली आहे. आणि त्यावर अमरावती शहरांमध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. या खताची विक्री करणाऱ्या कंपन्या आणि व्यक्ती वरती कारवाई करण्यात यावी, असे अमरावती कृषी विभागाने सांगितले आहे.

या आधी देखील शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे अनेक प्रकार समोर आलेले होते. आणि त्यांच्यावर कारवाई देखील करण्यात आलेली होती. परंतु आता अमरावतीमध्ये घडलेल्या खळबळजनक प्रकाराने सगळे शेतकरी जागरूक झालेले आहेत. आणि बनावट खत विकणाऱ्या कंपन्यांवरही आता बंधन आलेली आहेत.

Mumbai Local Megablock : मुंबईकरांनो जरा जपूनच ! रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

megablock mumbai

Mumbai Local Megablock : मागच्या दोन दिवसात मुंबईत पाऊस असल्यामुळे लोकलचा वेग मंदावला आहे. असे असताना लोकलच्या प्रवाशांकरिता आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. उद्या रविवारी दिनांक २८ जुलै रोजी मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारी तुम्ही जर लोकल ने प्रवास करायचा विचार करत असाल तर रेल्वेने दिलेले वेळापत्रक हे नक्की पहा आणि मगच रेल्वेचा प्रवासाला (Mumbai Local Megablock) निघा.

म्हणून मेगाब्लॉक …(Mumbai Local Megablock)

उपनगरी रेल्वे मार्गावरच्या रुळांची दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणेतील काही तांत्रिक कामं करण्यासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेघा ब्लॉकमुळे काही गाड्या दुसऱ्या मार्गावर वळवण्यात येतील तर काही गाड्या उशिराने (Mumbai Local Megablock) धावणार आहेत.

मध्य रेल्वे

मध्य रेल्वेच्या मार्गाबाबत सांगायचं झाल्यास मध्य रेल्वे मार्गावर रविवारी सकाळी 11 वाजून पाच मिनिटांपासून ते दुपारी तीन वाजेपर्यंत माटुंगा मुलुंड आणि दौंड जलद मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉगच्या दरम्यान सीएसएमटी इथून सुटणाऱ्या जलद मार्गावरील लोकल सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. ठाण्याच्या पुढे या जलद लोकल डाउन जलद मार्गावर वाळवण्यात येतील आणि ठाणे इथून सुटणाऱ्या जलद मार्गावरील लोकल सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. त्यानंतर अपजलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील. या सेवा (Mumbai Local Megablock) नियोजित वेळेच्या पंधरा मिनिटांनी उशिरा पोहचतील याची नोंद घ्यावी.

हार्बर मार्ग

हार्बर मार्गावर सकाळी 11:05 मिनिटांपासून ते संध्याकाळी चार वाजून पाच मिनिटांपर्यंत पनवेल वाशी अप आणि दौंड हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीमध्ये पनवेल बेलापूर येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या हार्बर मार्गावरील लोकल सेवा आणि सीएसएमटी येथून पनवेल बेलापूर कडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकल सेवा रद्द होतील. पनवेल इथून (Mumbai Local Megablock) ठाण्याकरिता सुटणाऱ्या ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवा बंद राहतील तर सीएसएमटी ते वाशी दरम्यान विशेष लोकल धावतील ब्लॉक कालावधीमध्ये ठाणे वाशी नेरूळ स्थानकादरम्यान ट्रान्स हार्बर वरील लोकल सेवा सुरू राहणार आहेत.

पश्चिम रेल्वे(Mumbai Local Megablock)

तर पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवारी रात्री अकरा वाजल्यापासून ते पहाटे चार 35 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. हा रात्र कालीन ब्लॉक आहे. ब्लॉक असलेल्या काळात बोरीवली ते भाईंदर अप आणि डाऊन थीम्या मार्गावर रात्र कालीन मेगाब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीमध्ये बोरिवली ते भाईंदर रेल्वे स्थानकादरम्यान धीम्या मार्गावरील लोकल सेवा जलद मार्गावर वाळवण्यात येतील. ब्लॉक कालावधीत काही लोकल सेवा रद्द होणार आहेत. रविवारी पश्चिम रेल्वेवर दिवसा कोणताही (Mumbai Local Megablock) मेगा ब्लॉक नसणार आहे. याची लोकलच्या प्रवाशांनी नोंद घ्यावी अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Gold Price Today : अनेक दिवसांच्या घसरणीनंतर अखेर सोने पुन्हा महागले; आजच्या किमती जाणून घ्या

Gold Price Today 27 july

हॅलो महाराष्ट ऑनलाईन । केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारने सोन्याची कस्टम ड्युटी 15 टक्क्यांवरून 6 टक्के केल्यानंतर सोन्याच्या किमती (Gold Price Today) दणकट आपटल्या होत्या. मागील ४ दिवसात जवळपास ५००० रुपयांनी सोने स्वस्त झाले, त्यामुळे खरेदीदार ग्राहकांमध्ये समाधानाचे वातावरण बघायला मिळालं. मात्र आज खूप दिवसांच्या घसरणीनंतर सोन्याच्या दरात किरकोळ वाढ पाहायला मिळाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर २४ कॅरेट १० ग्राम सोन्याचा भाव सध्या 69121 रुपये असून कालच्या तुलनेत या किमतीत 93 रुपयांची वाढ झाली आहे. तर गुड रिटर्न नुसार, एक तोळा २४ कॅरेट सोन्याचा भाव 69,000 रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

मागील आठ्वड्यापासून सोने चांदीच्या किमतीत (Gold Price Today) प्रचंड घसरण पाहायला मिळाली. MCX आज २४ कॅरेट १० ग्राम सोन्याचा भाव 69121 रुपये आहे तर चांदीच्या किमतीत मात्र भलीमोठी वाढ झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज नुसार एक किलो चांदी 2896 रुपयांनी वाढून तिची किंमत 87790 इतकी झाली आहे. तर गुड रिटर्न नुसार, २२ कॅरेट १० ग्राम सोन्याचा दर ६३२५० रुपये आहे तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ६९००० रुपये आहे. . तुम्ही घरबसल्या मिस्ड कॉलद्वारे सुद्धा सोन्या-चांदीची किंमत तपासू शकता. 22 कॅरेट सोन्याचे आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता.

गुड रिटर्न नुसार सोन्याचा भाव – Gold Price Today

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)-

पुणे- 63,250 रुपये
मुंबई – 63,250 रुपये
नागपूर – 63,250 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 69,000 रूपये
मुंबई – 69,000 रूपये
नागपूर – 69,000 रूपये

सोन्याची शुद्धता कशी तपासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

New Rules From 1 August 2024 | 1 ऑगस्टपासून बदलणार ‘हे’ नियम; सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार कात्री

New Rules From 1 August 2024

New Rules From 1 August 2024 | नवीन महिना सुरू झाला की, वेगवेगळ्या प्रकारचे नियम बदलत असतात. बँकांबद्दल त्याचप्रमाणे सिलेंडरच्या दरामध्ये, सोने, चांदीच्या दरांमध्ये त्याचप्रमाणे क्रेडिट कार्ड या सगळ्या गोष्टींमध्ये काही ना काही बदल होत असतात. परंतु त्यातले काही नियम असे असतात. जे सर्वसामान्य माणसांच्या खिशावर अतिरिक्त भार वाढतात. अशातच आता 1 ऑगस्ट पासून (New Rules From 1 August 2024)काही नियम बदलणार आहेत. ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्य माणसांना होणार आहेत. आता ते कोणते नियम असणार आहेत? हे आपण जाणून घेऊया.

एलपीजी गॅसची किंमत | New Rules From 1 August 2024

1 ऑगस्ट 2024 पासून एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये मोठा बदल होऊ शकतो. दर महिन्याच्या सुरुवातीला एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती यातील कंपन्या बदलत असतात. त्यामुळेच दर महिन्याला एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत बदलली जाते. जुलैमध्ये 19 किलोच्या व्यवसाय सिलेंडरच्या दरात मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आली होती. त्यामुळे ऑगस्ट महिन्यातही सिलेंडरची किंमत कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

उपयुक्तता व्यवहारिक नियम

जुलैमध्ये क्रेडिट कार्ड द्वारे उशिरा पेमेंट विज बिल भाडे आणि इतर गोष्टींमध्ये बदल केलेले होते. तुम्ही महाविद्यालय किंवा शाळेच्या वेबसाईटवरून थेट पेमेंट करू शकत नाही. यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने कोणताही थर्ड पार्टी वापरून पेमेंट करावे लागेल. तुम्ही जर हे पेमेंट केले तर तुम्हाला 1 टक्के शुल्क भरावे लागेल. परंतु याची व्यवहार मर्यादा ही 3हजार रुपये एवढी आहे.

HDFC बँक क्रेडिट कार्ड नियम

1 ऑगस्ट 2024 पासून एचडीएफसी च्या बँकेच्या नियमांमध्ये काही बदल होणार आहे. ते म्हणजे आता बँकेकडून टाटा न्यू इन्फिनिटी आणि टाटा न्यू प्लस या क्रेडिट कार्डमध्ये बदल केले जाणार आहेत. त्यामुळे या कार्डधारकांना टाटा व्यवहारांवर 1.5 नवीन नाणी मिळणार आहेत.

EMI प्रक्रिया शुल्क

आता तुम्ही जर उशिरा EMI केला तर तुम्हाला 299 पर्यंत चार्ज भरावा लागणार आहे. एचडीएफसी बँकेच्या मते हे शुल्क जीएसटी अंतर्गत आहे. तुम्ही जर बँकेतून कोणताही थर्ड पार्टी पेमेंट ॲप द्वारे पेमेंट केले, तर तुम्हाला एक टक्का शुल्क भरावे लागणार आहे.

गुगल मॅप नियम

गुगल मॅपने देखील 1 ऑगस्टपासून काही नवीन नियम लागू केलेले आहे. कंपनीने आता भारतातील त्यांच्या सेवांचे शुल्क 70% पर्यंत कमी आलेले आहे. तसेच गुगल मॅप आता त्यांच्या सेवेसाठी डॉलर्स ऐवजी भारतीय रुपयांमध्ये शुल्क आकारणार आहे.

राहुल गांधींचा अनोखा अंदाज; मोच्याच्या दुकानात स्वतः च चप्पल शिवली

Rahul Gandhi On Sultanpur

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा अनोखा अंदाज पुन्हा एकदा पाहायला मिळालं. राहुल गांधींचा ताफा गुप्तरगंजमधील आमदार नगरमधील रामशेत मोची यांच्या दुकानात अचानक थांबला. लोकांना काय समजायच्या आधीच राहुल गांधीनी नी शूज आणि चप्पलही शिवल्या तसेच दुकानदार रामशेटशी संवादही साधला. धंदा करत असताना येणाऱ्या अडचणी सुद्धा जाणून घेतल्या. यावेळी आम्ही तुमचा आवाज बनू अशी ग्वाही राहुल गांधी यांनी दिली.

रायबरेलेची खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी 26 जुलै रोजी मानहानीच्या खटल्यात सुलतानपूरच्या एमपी-एमएलए न्यायालयात हजेरी लावली. न्यायालयीन कामकाज संपवून राहुल गांधी पुन्हा पूर्वांचल एक्सप्रेसवे मार्गे लखनौला रवाना झाले. मात्र पूर्वांचल द्रुतगती मार्गापूर्वी त्यांचा ताफा अयोध्या प्रयागराज महामार्गावरील कुरेभर पोलीस स्टेशन हद्दीतील आमदार नगर चौकाजवळ अचानक थांबला आणि राहुल गांधी गाडीतून उतरले आणि रामचेत नावाच्या मोच्याच्या दुकानाकडे निघाले. दुकानात उतरताच त्यांनी चप्पल कशी शिवतात हे दुकानदाराला विचारलं, आणि बघत बघत स्वताच चप्पल शिवली आणि बुटालाही टाके घातले. राहुल गांधींचा हा अनोखा अंदाज पाहून उपस्थित थक्क झाले.

यानंतर राहुल गांधी यांनी दुकानदाराला विचारले कुटुंब कसे चालते? तेव्हा दुकानातून कधी 100 रुपये तर कधी 50 रुपये मिळतात, असे रामशेट यांनी सांगितले. उत्तर ऐकून राहुल गांधीही विचारात पडले आणि एवढ्या कमी उत्पन्नात तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवतो? असा प्रश्न केला. यावर रामशेटने राहुल गांधींना सांगितलं कि घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे . मला काही आर्थिक मदत मिळाली तर मी नवीन व्यवसाय सुरू करू शकेन. या कामात स्वाभिमान नाही. लोक त्याच्याकडे तुच्छतेने पाहतात. त्यामुळेच मुलाला या कामापासून दूर ठेवण्यात आले आहे. यानंतर रामशेट यांचे सांत्वन करताना राहुल गांधी म्हणाले की, मी सर्वांचा आवाज उठवणार आहे.

ITR File | आता ITR भरणे होणार सुलभ आणि सोप्पे; येत्या 6 महिन्यात नवा कायदा लागू

ITR File

ITR File | आयटीआर भरण्याची अंतिम तारीख जवळ आलेली आहे. त्यामुळे सगळ्यांचीच आता आयटीआर भरण्याची लगबग चालू झालेली आहे. अशातच 23 जुलै रोजी निर्मला सीतारामन यांनी यावर्षीचा अर्थसंकल्प जाहीर केला. आणि आयटीआर (ITR File) बाबत त्यांनी अनेक नवीन माहिती दिलेली आहे. त्यामुळे आता भारतीय आयकर कायदा हा आधीपेक्षा खूपच सोपा आणि सरळ देखील होणार आहे. यासाठीची तयारी केंद्र सरकारने देखील चालू केलेली आहे.

अशातच आता केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाचे चेअरमन रवी अग्रवाल यांनी याबद्दल माहिती दिलेली आहे. त्यांनी सांगितले आहे की, “पुढील सहा महिन्यांमध्ये आयकर कायदा अधिक सोपा होणार आहे.,यासाठी कायद्याची नवी आवृत्ती देखील आणली जाणार आहे. त्यानंतर आयटीआर (ITR File) दाखल करण्याची प्रक्रिया आधीपेक्षा खूपच सहज आणि सोपी होणार आहे. त्याचप्रमाणे इतर प्रक्रिया देखील सोप्या होणार आहेत.”

रवी अग्रवाल यांनी सांगितल्याप्रमाणे आता 66% करदात्यानी नव्या आयकर पद्धतीची स्वतःहून निवड केलेली आहे. या पद्धतीबाबत लोकांमध्ये आकर्षण निर्माण झालेले दिसून येत आहे. त्यामुळे आता येत्या काळात या नवीन आयकर पद्धती अंतर्गत त्यांना अधिक लाभ मिळेल अशी अपेक्षा आहे. आतापर्यंत यावर्षी जवळपास 4 कोटी आयटीआर (ITR File) दाखल झालेले आहेत. अशी माहिती देखील त्यांनी दिलेली आहे.

याबाबत सीबीटी प्रमुखांनी देखील सांगितले आहे की, आयटीआर सह इतर सगळ्या प्रक्रिया सुलभ आणि सहज होण्यासाठी सरकारने देखील आता जास्त लक्ष केंद्रित केलेले आहे. आयटीआर भरण्याची पद्धत जेवढी सहज आणि सोपी होईल, तेवढेच लोकांकडून कायद्याचे नियम पाळणे देखील शक्य होणार आहे. त्याचप्रमाणे हे नियम सुलभ झाल्यानंतर खटल्यातही मोठ्या प्रमाणात घट होण्याची अपेक्षा आहे.

यंदा पंढरपुरात विक्रमी वारकरी दाखल; विठ्ठल मंदिरात झाला कोट्यवधींचा निधी जमा

AShadhi Vari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आषाढी वारी ही विठुरायाच्या भक्त जणांसाठी दरवर्षी एका सणाप्रमाणे असते. दरवर्षी लाखो संख्येने वारकरी हे विठुरायाच्या चरणी जातात. अनेक लोक हे दरवर्षी चालत ही वारी पूर्ण करत असतात. या वर्षी देखील आषाढी यात्रेनिमित्त लाखो वारकऱ्यांनी विठुरायाचे दर्शन घेतले. अनेक वारकरी हे एसटीने पंढरपुरात गेले होते. वारकऱ्यांची गैरसाई होऊ नये, यासाठी एसटी महामंडळातर्फे 15 जुलै ते 21 जुलै या दरम्यान जवळपास 5000 विशेष एसटी सोडण्यात आलेल्या होत्या. या 5000 एसटीद्वारे या सहा दिवसांमध्ये 19,186 फेऱ्या झालेल्या आहेत.

या बसमधून तब्बल 9 लाख 53 हजार प्रवाशांनी प्रवास केलेला आहे. तब्बल एसटी महामंडळाला 28 कोटी 92 लाखांचे उत्पन्न झालेले आहे. त्यामुळे यंदाची आषाढी वारीने एक नवीनच विक्रम तयार केलेला आहे. या यात्रेमध्ये विठ्ठलाची तिजोरी देखील चांगलीच भरलेली आहे. म्हणजे मंदिराच्या खजिन्यात यावर्षी तब्बल 8कोटी 34 लाख रुपये जमा झालेले आहेत. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी जवळपास 2 कोटी रुपये जास्त जमा झाल्याची माहिती समोर आलेली आहे. यावर्षी विक्रमी संख्येने भाविक भक्तांनी विठुरायाच्या चरणी दाखल झाले होते.

विठ्ठलाच्या भक्ताची दर्शन घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी आषाढी वारीसाठी मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती या सहा विभागातून अनेक गोष्टींचे नियोजन करण्यात आलेले होते. यासाठी 5000 बसेस वारकऱ्यांसाठी पंढरपूर येथे दाखल झालेल्या होत्या. दरवर्षी यात्रेच्या दोन दिवस आधी वाखरी येथे एक मोठा रिंगण सोहळा संपन्न होतो. या वर्षी देखील या रिंगण सोहळ्यासाठी एसटी महामंडळाकडून 200 बसेस उपलब्ध करून दिल्या होत्या. त्यामुळे एसटीने जाणारे प्रवासी आणि चालत जाणारे भाविक भक्त यामुळे जवळपास 18 ते 20 लाख भाविक भक्त पंढरपुरात दाखल झालेले होते.

यावर्षी विठूरायाची कृपा अशी झाली की, दरवर्षीपेक्षा यावर्षी समाधानकारक पाऊस देखील पडलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांची उरलेली कामे देखील मोठ्या संख्येने पूर्ण केलेली आहे. तसेच विठुरायाच्या तिजोरीत देखील दरवर्षीपेक्षा 2 कोटी रुपये जास्त जमा झालेले आहेत. आता ही निधी कशा स्वरूपात जमा झालेली आहे हे आपण जाणून घेणार आहोत.

विठुरायाच्या चरणी जमा झालेला निधी

  • श्रींच्या चरणाजवळ – 77,6 हजार 694 रुपये
  • भक्तनिवास – 50 लाख 60, 437 रुपये
  • देणगी – 3 कोटी 82 लाख 26 हजार 828 रुपये
  • लाडू प्रसाद – 98 लाख 53 हजार रुपये
  • पूजा – 3 लाख 99 हजार 299 रुपये
  • सोने भेट – 17 लाख 88 हजार 373 रुपये
  • चांदी भेट – 2 कोटी 3 लाख 65 हजार 228 रुपये
  • इतर -3 लाख 64 हजार रुपये

वारं फिरणारच प्रहार लढणारच, रयतेचं सरकार येणारच ..!

bacchu kadu prahar janashkati prahar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकऱ्यांना, गोरगरिबांना, अपंगाना, दीनदुबळ्यांना नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला आता ज्यांची गरज आहे जाणून घेऊया त्या लोकनायकाबद्दल… बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्याबद्दल.. बच्चू कडू यांचे नाव ओम प्रकाश बाबाराव कडू, त्यांचा जन्म 5 जुलै 1970 साली झाला. त्यांनी युवकांचे संघटन तयार करून शेतकरी दिव्यांग आणि स्थानिकांचे अनेक प्रश्न त्यांनी आक्रमकपणे समोर आणले. आपल्या अभिनव आंदोलनातून बच्चू कडू महाराष्ट्रात विशेष प्रसिद्ध आहे. 2019 मध्ये स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये बच्चू कडू यांनी शिवसेनेच्या कोट्यातून जलसंपदा व लाभक्षेत्र विकास ,शालेय शिक्षण, महिला व बालविकास ,इतर मागासवर्ग सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग ,विमुक्त जाती ,भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार या खात्याच्या राज्यमंत्री पदाची शपथ 30 डिसेंबर 2019 रोजी घेतली होती.

महाराष्ट्रामध्ये ते बच्चुभाऊ या नावाने लोकप्रिय आहेत. आमदार बच्चू कडू यांचे जीवन संघर्षाने भरलेले आहे.गरीब, अज्ञान, पीडित, अपंगांचे यांचे दुःख सोबतीला घेऊन संवेदना हरविलेल्या व्यवस्थेशी बच्चु भाऊ झुंजत आहे. कुठल्याही पदाची लालसा किंवा त्यांची अपेक्षा न बाळगता उपेक्षितांचे अश्रू पुसून आनंदाचं सुख त्यांच्या ओंजळीत देणं हे बच्चूभाऊंच्या जीवनाचं ध्येय. आज-काल संघटना कमी होत चालली आहे माणसं एकत्र येत नाहीत, लढत नाहीत अशा काळात प्रहारच्या माध्यमातून बच्चू कडू यांनी खूप मोठ संघटन उभारलं आहे. बच्चू कडू यांचं दिव्यांगासाठी करत असलेले काम अतिशय प्रेरक आहेत ते संत गाडगेबाबांचा वारसा नेटाने चालवत आहेत.

बच्चू कडू म्हणतात परिवर्तनाची सुरुवात ही स्वतःपासून झाली पाहिजे कुठलाही सकारात्मक बदल आधी स्वतःमध्ये झाला पाहिजे मग आजूबाजूची परिस्थिती आपोआप बदलायला लागते. अनाथ अपंग विधवा वृद्ध व माझा खचलेला शेतकरी अजिबात वंचित राहता कामा नये मग माझा देह शेवटपर्यंत त्यांच्यासाठीच झीजत राहीला तरी चालेल. बच्चू कडू म्हणजे अचलपूर विधानसभा मधून सलग चार वेळा बिनविरोध निवडून आलेले लोकनायक. बच्चू कडू हे अन्यायाविरुद्ध पेटून उठतात, बच्चू कडू यांना शेतकरी मायबाप जनतेचा कैवारी, रुग्णांचा मसीहा अपंगाचा आधारस्तंभ असं कित्येक नावांनीसंबोधलं जातं. बच्चू कडू हे हटके आंदोलन करण्यासाठी देशभरात प्रसिद्ध आहेत. अश्या या बच्चू कडूंची आता फक्त विदर्भाला नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला गरज आहे. आता जनतेलाही हवे आहेत महाराष्ट्रासाठी बच्चू कडू !

World Hepatitis Day 2024 | सावधान ! पावसाळ्यात वाढतो हिपॅटायटीसचा धोका, अशाप्रकारे घ्या स्वतःची काळजी

World Hepatitis Day 2024

World Hepatitis Day 2024 | पावसाळ्यामध्ये अनेक आजारांची लागण होत असते. लोकांना लोकांना कितीही आवडत असला, तरी पावसासोबत अनेक आजारी येत असतात. या काळात पाणी दूषित असते. त्यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. त्याचप्रमाणे डासांमुळे देखील अनेक आजार होण्याची भीती असते. हिपॅटायटीस हा त्यापैकी एक असा आजार आहे. जो अत्यंत गंभीर असा आहे. हा एक संसर्गजन्य आजार आहे. या आजाराचे विषाणू हे गुदाशय किंवा तोंडातून शरीरात प्रवेश करतात. हिपॅटायटीसचे ए आणि ई यांसारखे अनेक प्रकार आहेत. त्यामुळे हा आजार सध्या एक गंभीर आजार बनत चाललेला आहे.

या गंभीर संसर्गाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने, दरवर्षी 28 जुलै हा जागतिक हिपॅटायटीस दिवस (World Hepatitis Day 2024) (जागतिक हिपॅटायटीस दिवस 2024) म्हणून साजरा केला जातो. व्हायरल हिपॅटायटीस दूर करण्यासाठी जनजागृती करणे हा हा दिवस साजरा करण्याचा उद्देश आहे. अशा परिस्थितीत, आज हिपॅटायटीस टाळण्यासाठी न्यूबर्ग डायग्नोस्टिक्स, नोएडा येथील पॅथॉलॉजिस्ट सल्लागार डॉ. विज्ञान मिश्रा यांनी दिलेल्या काही टिप्स सांगणार आहोत

स्वच्छ पाणी प्या

पावसाळ्यात जलप्रदूषण ही एक सामान्य समस्या आहे, ज्यामुळे हिपॅटायटीस होऊ शकतो. त्यामुळे हे टाळण्यासाठी नेहमी उकळलेले किंवा फिल्टर केलेले पाणी प्यावे. घरी वॉटर प्युरिफायर वापरा. याशिवाय प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवा.

हाताची स्वच्छता राखणे | World Hepatitis Day 2024

हिपॅटायटीस, विशेषतः हिपॅटायटीस ए आणि ई, जे फेटो-ओरल मार्गाने पसरतात, टाळण्यासाठी हाताची स्वच्छता महत्वाची आहे. यासाठी, खाण्यापूर्वी, शौचालय वापरल्यानंतर आणि संभाव्य दूषित पृष्ठभागाच्या संपर्कात आल्यानंतर आपले हात साबणाने आणि पाण्याने चांगले धुवा.

स्वच्छ आणि ताजे अन्न खा

दूषित होण्याची शक्यता वाढल्यामुळे पावसाळ्यात रस्त्यावरील अन्न आणि कच्चे खाद्यपदार्थ खाणे विशेषतः धोकादायक ठरू शकते. म्हणून, सुरक्षित राहण्यासाठी, ताजे आणि शिजवलेले अन्न निवडा. कच्चे सॅलड खाणे टाळा आणि फळे आणि भाज्या व्यवस्थित धुतल्या आहेत किंवा सोलल्या आहेत याची खात्री करा.

पूरग्रस्त भाग टाळा

पावसाळ्यात, पुराच्या पाण्यात जाणे टाळा, कारण त्यात हिपॅटायटीसचे विषाणू असू शकतात. तुम्ही पुराच्या पाण्याच्या संपर्कात आलात तरीही, नंतर तुम्ही स्वतःला पूर्णपणे स्वच्छ केल्याची खात्री करा आणि संसर्ग टाळण्यासाठी कोणत्याही खुल्या जखमांवर ताबडतोब उपचार करा.

टाकाऊ वस्तूंची योग्य विल्हेवाट लावा

हिपॅटायटीसचा प्रसार रोखण्यासाठी, कोणत्याही प्रकारच्या टाकाऊ वस्तूंची, विशेषतः मानवी कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावा. सांडपाणी व्यवस्था योग्यरितीने काम करत असल्याची खात्री करा आणि चांगल्या विल्हेवाटीची व्यवस्था नसलेल्या ठिकाणी जाणे टाळा. तसेच स्वच्छतेच्या योग्य सुविधांचा वापर करा आणि उघड्यावर शौच करू नका.

लसीकरण करा | World Hepatitis Day 2024

विशिष्ट प्रकारचे हिपॅटायटीस टाळण्यासाठी लसीकरण हा अत्यंत प्रभावी मार्ग आहे. हिपॅटायटीस ए आणि बी लस घेण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या, विशेषत: तुम्हाला जास्त धोका असल्यास किंवा रोग पसरण्याची शक्यता असलेल्या भागात राहत असल्यास.