Sunday, December 21, 2025
Home Blog Page 573

प्रहार पक्ष, विधानसभेला ‘या’ विद्यमान आमदारांना घाम फोडणार

Prahar Janshakti Party Bacchu Kadu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बच्चू कडू… (Bacchu Kadu) या नावानं आपल्या प्रहार पक्षाच्या (Prahar Janshakti Party)
माध्यमातून अनेक प्रस्थापितांना घाम फोडला… सरकार कुणाचंही असो मंत्रीपदासाठी बच्चू भाऊंचं नाव चर्चेत कायम असतं… ते म्हणायला महायुतीत असले तरी महायुतीत नाहीत… आणि महाविकास आघाडीही त्यांच्यापासून फारशा अंतरावर नाही… थोडक्यात सत्ता समतोल कसा साधायचा? याचं पॉलिटिक्स बच्चुभाऊंना चांगलं जमतं… वंचित, गोरगरीब आणि सामान्यांच्या प्रश्नाला न्याय देत त्याचं राजकारण करण्याची कला महाराष्ट्रात फक्त त्यांनाच जमली… म्हणूनच प्रहार आता महाराष्ट्रातील 20 विधानसभा मतदारसंघातील प्रस्थापितांवर येणाऱ्या विधानसभेला प्रहार करतील अशी एकूणच माहिती समोर येतेय… महाराष्ट्रात अनेक दबावगट तयार झाले असले तरी राजकारणाची अचूक नस ओळखून प्रहार या 20 मतदारसंघांवर असा काही प्रभाव टाकू शकतो, ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होऊ शकते… त्यामुळे बच्चु भाऊ यांनी टारगेट केलेले 20 मतदारसंघ नेमके कोणते आहेत? आणि या सर्व ठिकाणी प्रहार कशी ताकद देऊन विधानसभेत दिसेल? त्याचाच हा सविस्तर आढावा…

बच्चू कडू आणि प्रहारच्या राजकारणाची मुळं जिथं रुजली त्या अचलपूर विधानसभेत (Achalpur Constituency) सलग चार टर्म आमदार असल्याने बच्चू कडू सांगतील ती काळ्या दगडावरची पांढरी रेघ असं म्हणत अचलपुरची जनता त्यांच्या पाठीशी कायम असते…यासोबत मेळघाटमध्ये राजकुमार पटेल प्रहरचे आमदार असल्याने या दोन जागा प्रहार यंदाही आरामात निकाली काढतील… असं सध्या चित्र आहे…शेजारच्या दर्यापूरचे आमदार बळवंत वानखडे यांना अमरावतीत लोकसभेला बच्चू कडू यांनी मदत केली. त्यामुळे या मदतीचा बच्चू कडू यांना दर्यापूरमध्ये फायदा होऊ शकतो. तर बडनेरामध्ये रवी राणा आणि महाविकास आघाडी यांच्या विरोधातील मतांसाठीही प्रहारला मतदान होऊ शकते. अमरावतीत रवी राणा यांना टफ फाईट बच्चू कडूच देऊ शकतात. त्यांना अंगावर घेऊ शकतात अशी त्यांची इमेज तयार झाली आहे. नवनीत राणा यांच्यामागे भाजपने सारी ताकद लावूनही प्रहारच्या प्रभावाने राणांना आपली खासदारकी वाचता आली नाही… त्यामुळे लोकसभेपाठोपाठ विधानसभेलाही राणा दांपत्याच्या प्रस्थापित राजकारणाला बच्चू भाऊच पुरून उरतील, असं एकूणच चित्र आहे…

आता येतो तो हायव्होल्टेज चांदवड विधानसभा मतदारसंघात… चांदवडमध्ये कांद्याचा मुद्दा गाजला होता. पहिले कांद्याचे आंदोलन इथूनच सुरु झाले होते… लोकसभेप्रमाणेच ही निवडणूक देखील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढवली गेल्यास प्रहारला मतदान होऊ शकते… त्यामुळे इथले भाजपचे स्टॅंडिंग आमदार राहुल आहेर आणि काँग्रेसचे शिरीषकुमार कोतवाल यांना इथून प्रहारचा उमेदवार निर्णायक लढत देऊ शकेल… तर दुसऱ्या टोकाला माण खटावमध्ये प्रहार कणाकणाने पक्षाची ताकद वाढवत असून आता मजबूत पक्ष संघटन झालय.. म्हणूनच प्रहारकडून ज्यांच्या नावावर पहिल्यांदा शिक्कामोर्तब झाला त्या अरविंद पिसे यांच्याकडे सगळ्यांच्याच नजरा खिळल्या आहेत… जयकुमार गोरे हे इथले स्टँडिंग भाजप आमदार असले तरी पाण्याच्या प्रश्नांपासून ते अनेक पातळ्यांवर त्यांच्याबद्धल मतदारसंघात सध्या विरोधात वारं आहे.. महाविकास आघाडीडून प्रभाकर देशमुख इच्छुक असले तरीही तिकीट फिक्स म्हणता येणार नाही. त्यात पिसे यांनी कार्यकर्त्यांचं जाळ विणत प्रहार पक्ष मतदार संघात तळागाळात जाऊन पोहोचवलाय… पिसे यांच्या पाठीशी असणारी जनशक्ती आपल्या मागे राहावे यासाठी अनेक राजकीय मातब्बरांनी त्यांच्या कार्यालयाचे उंबरे झिजवले… पण ते कायम एकनिष्ठ राहून आता स्वतः प्रहारचे उमेदवार असल्याने सातारा जिल्ह्याला प्रहारचा पहिला आमदार मिळेल, असा तगडा विश्वास सध्या पक्षाला आहे…

यानंतर मतदारसंघ येतो तो उमरग्याचा… तब्बल 15 वर्ष आमदार असूनही उमरगा मतदारसंघात पायाभूत सुविधा, रोजगार, औद्योगिक प्रकल्प, शिक्षण संस्था, एमआयडीसी याची वाणवा आहे. उमरगा शहरातही आठवड्यातून एकदा पाणी येते. त्यामुळेच ज्ञानराज चौगुले यांच्याबद्दल बरीच नाराजी असल्याचे मतदारसंघात दिसून येते. पण यामुळे इथे ठाकरे गटाला मतदान होईल, असंही म्हणता येणार नाही. कारण चौगुले बंडा आधी तेरा वर्ष शिवसेनेचाच भाग होते. त्यामुळे जनता महायुतीला तर कंटाळली आहेच… पण ठाकरेंच्या शिवसेनेला आणि महाविकास आघाडीलाही कंटाळली आहे. अशा परिस्थितीत बच्चू कडू इथे गेमचेंजर ठरू शकतात. उमेदवारांना तिसरा पर्याय तगडा मिळाल्यास मतदान करताना प्रहारला इथे मोठा गेन मिळू शकतो…

अकोट हा चांदूरबाजार आणि आचलपूरला लागूनच असलेला तालुका… या मतदारसंघातही प्रहारचं चांगलं मतदान आहे. प्रहारचे प्रदेशाध्यक्ष हेच इथून दरवर्षी उमेदवार असतात.. गेल्या टर्मला तब्बल 30 हजारांचं त्यांचं मतदान येणाऱ्या काळात आणखीन पुढे जाईल यात शंका नाही… त्यामुळे भाजपचे स्टॅंडिंग आमदार प्रकाश भारसाकळे यांना प्रहारचा सध्या मोठा धोका आहे… काँग्रेसकडून महेश गणगणे यांनीही गतवेळी प्रहारच्याच धसक्याने इथून माघार घेतली होती. आता ते लढवतील की नाही हे त्यांना आणि पक्षालाच माहिती पण प्रहारचा उमेदवार इथे गेमचेंजर करणार एवढं नक्की.. रामटेकमध्येही प्रहारला असणारा सपोर्ट दुर्लक्षित करून चालणार नाही… त्यात युती आणि आघाडींच्या इच्छुकांच्या ताकदीचा विचार करता प्रहारसाठी यंदा घोडेमैदान जवळचं आहे… गतवेळी प्रहारच्या उमेदवाराने इथे 24 हजार मते घेतली होती. यंदा हा आकडा वाढून विजयापर्यंतही जाऊ शकतो.

रावेरमध्ये सध्या अनिल चौधरी हे नाव चांगलंच चर्चेत आलय… चौधरी हे मागच्या बऱ्याच दिवसांपासून विधानसभेची तयारी करतायत… शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आंदोलन करतायत…. बच्चू कडू यांनीही अनेकदा आंदोलनांना उपस्थित लावत चौधरी यांना ताकद दिलीय… नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत रक्षा खडसे प्रहारच्या कार्यकर्त्यांना डावलत असल्याचा आरोप करत भाजपला मतदान न करण्याचा आवाहन प्रहारने केले होते. त्यावेळी अनिल चौधरी चर्चेत आले होते… येणाऱ्या विधानसभेला ते रावेरमधून पुन्हा घाव घालणार असल्याने प्रहारला इथून विजयाचे जास्त चांस्नेस आहेत…धुळे ग्रामीण आणि धुळे शहर या दोन्ही मतदारसंघात मतदारांना गृहीत धरून चालत नाही… याचे उदाहरण मतदारांनी मागील काही निवडणुकांमध्ये दाखवून दिले आहेच… याचाच विचार करून शेती, माती आणि वंचितांच्या प्रश्नांना डोळ्यासमोर ठेवून प्रहार राजकारणात उतरल्याने इथल्या राजकीय निष्क्रियतेचा फायदा प्रहारच्या पथ्यावर पडू शकतो…

कारंजा मतदारसंघात राजेंद्र पाटणी यांच्या निधनानंतर इथे नेतृत्वाची मोठी पोकळी तयार झाली आहे… त्यात विरोधात तगडा उमेदवार असल्याने इथे भाजपच्या उमेदवाराला थेट प्रहरसोबत दोन हात करावे लागणार आहेत…मुखेड आणि जळगाव जामोद या दोन्ही विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपचे स्टॅंडिंग आमदार असले तरी अँटीइन्कंबंसीचा मोठा फटका या विद्यमान आमदारांना बसण्याचे फुल टू चान्सेस आहेत… पण इथे दुसऱ्या आघाडीचीही ताकद कमी असल्याने प्रहार या दोन्ही जागांवर निर्णायक इम्पॅक्ट टाकू शकते…अहमदपूर चाकूर मतदारसंघाचा लोकसभेचा निकालच इथले स्टँडिंग आमदार महायुतीच्या बाबासाहेब पाटलांच्या विरोधात गेलाय… त्यामुळे इथं सत्ताधाऱ्यांविरोधात वातावरण असलं तरी आघाडीला इथं प्रहारला विश्वासात घेतल्याशिवाय राजकारण करता येणार नाही, एवढं मात्र नक्की…यासोबतच परभणी, राधानगरी आणि निलंगा याही विधानसभा मतदारसंघात प्रहारची ताकद वाखणण्याजोगी असल्याने त्याला बच्चूभाऊंची साथ मिळाली तर इथे निकाल कोणत्याही बाजूने झुकू शकतो…

या सगळ्याचा सार सांगायचा झाला तर एकट्या विदर्भातच नाही तर त्यासोबत उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातही यंदा बच्चू कडूंच्या प्रहारची जादू पाहायला मिळेल… केवळ तिसरा पर्याय न देता… फक्त मतांचं विभाजन करणे याच एका परपजने प्रहारचे हे उमेदवार निवडणूकीत उतरले नाहीयेत, तर विजयाचा गुलाल अंगावर घेणं यासाठी पक्षानं आणि प्रत्येक उमेदवारानं प्रहार घराघरात पोहचवलीय…त्यामुळे यश अपयश हा पुढचा भाग असला तरी विधानसभेला बच्चू कडू यंदा निर्णायक लढत देत प्रस्थापितांच्या राजकारणावर प्रहार करतील, एवढं मात्र नक्की…

अजितदादांना मोठा धक्का!! बड्या नेत्याने घेतली शरद पवारांची भेट; लवकरच पक्षप्रवेश होणार

ajit pawar sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजित पवार (Ajit Pawar) गटाला सर्वात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबाजानी दुर्राणी (Babajani Durrani) यांनी रात्री शरद पवारांची भेट घेतली आहे. यापूर्वी बाबाजानी दुर्राणी यांनी जयंत पाटील यांचीही भेट घेतली होती. तेव्हापासूनच बाबाजानी दुराणी शरद पवार (Sharad Pawar) गटात जाणार अशा चर्चा सुरु झाल्या. आता शरद पवारांसोबतच्या भेटीनंतर खुद्द बाबाजानी दुर्राणी यांनीच आपण पवार गटात प्रवेश करणार असल्याचे सांगितलं आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वीच अजित पवारांना हा मोठा धक्का मानला जातोय.

काल परवाच बाबाजानी दुर्राणी यांचा मुलगा जुनैद दुर्राणी शरद पवार गटाच्या बैठकीत सहभागी झाले आणि तिथे त्यांनी आपल्या वडिलांसाठी विधानसभेचं तिकीटही मागलं. यानंतर बाबाजानी दुर्राणी हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचा चर्चानी जोर धरला. एकीकडे या चर्चा सुरु असतानाच आता खुद्द बाबाजानी दुर्राणी यांनी छत्रपती संभाजीनगर येथे शरद पवारांची भेट घेतल्याने त्यांचा पक्षप्रवेश निश्चित झाला आहे. आपण शरद पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचं सुद्धा बाबाजानी दुर्रानी यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितलं.

मी शरद पवारांच्या नेतृत्वात भविष्यात काम करणार आहे. मी सुरुवातीपासून 1985 पासून शरद पवारांच्यासोबत आहे. मध्यंतरी थोडं आठ-दहा महिन्यांचं डायव्हर्जन झालं. मात्र समविचारी पक्षांसोबत काम करणं सोप्प जाते असं बाबाजानी दुराणी यांनी म्हंटल. अजित पवार सुद्धा फुले शाहू आंबेडकरांच्या विचारानेच काम करतात. पण त्या ठिकाणी दोन्ही बाजूने जे पक्ष आहेत. त्याच्यामुळे आमच्यासारख्या अल्पसंख्यांक विचाराच्या कार्यकर्त्याच विटंबना होत असल्यासही दुर्राणी म्हणाले. ज्याठिकाणी कार्यकर्ते, नेता आणि मतदारांमध्ये मतभेद होतात तिथे काम करणं कार्यकर्ते आणि नेत्यालाही कठीण होऊन बसतं असं मत दुर्राणी यांनी व्यक्त केलं.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर बाबाजानी दुर्राणी हे अजित पवारांसोबत आले होते. त्यांची नुकतीच विधान परिषदेच्या आमदारकीची टर्म संपली आहे. पुन्हा त्यांनी विधान परिषदेचं तिकीट मागितलं होतं. पण पुन्हा अजित पवारांकडून त्यांना संधी मिळाली नाही. त्यामुळेच ते नाराज असल्याची माहिती आहे.

मला भ्रष्टाचाराचा सुभेदार म्हणणारे स्वतः गुजरातमधून तडीपार झालेले; पवारांचा अमित शहांना सणसणीत टोला

amit shah sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शरद पवार (Sharad Pawar) हे भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे सुभेदार आहेत अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी पुण्यात येऊन केली होती. त्यावर आज पवारांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे, मला भ्रष्टाचाराचा सुभेदार म्हणणारे स्वतः गुजरातमधून तडीपार झालेले होते असा सणसणीत टोला शरद पवार यांनी अमित शाह याना लगावला. शेषराव चव्हाण लिखित ‘पद्मविभूषण शरद पवार – द ग्रेट एनिग्मा’ या पुस्तकाच्या डॉ. मकदूम फारुकी यांनी केलेल्या उर्दू अनुवादाचे ज्येष्ठ उर्दू साहित्यिक नुरूल हसनन यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते.

शरद पवार म्हणाले, आठ दिवसांपूर्वी अमित शाहांनी माझ्यावर टीका केली. माझ्याबाबत काहीतरी बोललं गेलं. ते म्हणाले की, देशात जेवढे भ्रष्टाचारी आहेत, त्यांचे सरदार शरद पवार आहेत. आश्चर्याची बाब आहे. गुजरात दंगल झाली होती. त्यावेळी कायद्याचा गैरवापर केला, म्हणून सुप्रीम कोर्टाने अमित शाह याना तडीपार केलं होतं. आज तोच माणूस आपल्या देशाचा गृहमंत्री आहे हे आपलं दुर्दैव,यावरूनच विचार करा कि आज आपला देश कोणत्या दिशेला जात आहे. असं म्हणत पवारांनी अमित शाह यांच्यावर टीका केली तर माझा माझ्या बोटावर पुर्ण विश्वास आहे. मी माझं बोट कुणाच्याही हातात देणार नाही, असा टोला नरेंद्र मोदींना लगावला.

पवार पुढे म्हणाले, देशाची राज्यघटना बदलण्यासाठी लोकसभेत ४०० जागा पाहिजे असे विधान कर्नाटकच्या भाजपच्या नेत्याने केले होते. नरेंद्र मोदी यांच्या अनेक सहकारी नेते हेच सांगत होते. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांसाठी भारतीय राज्यघटना दिली, तिला वाचविण्यासाठी जनतेने भाजपला धडा शिकवला, याचा सर्वाधिक आनंद आहे. जनतेने नेहमीच सावध राहण्याची गरज आहे. अन्यथा, देशाची सत्ता हाती असलेले लोक देशाला चुकीच्या मार्गावर नेतील’, असे पवार म्हणाले.

Weather Update | राज्यात आजही पावसाचे संकट कायम; ‘या’ विभागांना दिला सतर्कतेचा इशारा

Weather Update

Weather Update | गेल्या आठवड्याभरापासून राज्यामध्ये सर्वत्र ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळताना दिसत आहे. हवामान विभाग देखील रोजचा पावसाचा (Weather Update) अंदाज देत आहे. जेणेकरून नागरिकांना आधीच काळजी घेऊन खबरदारी घेता येईल. पुण्यात देखील गेल्या चार दिवसापासून चांगलाच पाऊस चालू आहे. अनेक नागरिकांची गैरसोय देखील झालेली आहे.

अशातच हवामान विभागाने आज म्हणजे 27 जुलै रोजी पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुण्यात आजही मुसळधार पावसाची (Weather Update) शक्यता आहे. त्यामुळे या विभागात आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे हवामान विभागाने पुण्यातील घाट माथ्यावर देखील पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे जे लोक वीकेंडला फिरण्याचा प्लॅन करत आहे. त्यांनी अत्यंत काळजी घेऊन निसर्गाचा आनंद आनंद घ्यायचा आहे.

त्याचप्रमाणे कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये देखील आज अति मुसळधार पाऊस (Weather Update) पडण्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आज अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. त्यामुळे या विभागांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.

कोकणासह मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये देखील आज मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. या ठिकाणी 40 ते 50 किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी देखील हा एक धोक्याचा इशारा देण्यात आलेला आहे.

साताऱ्यातील घाटात देखील आज मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यात देखील आज हवामान विभागाने पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे. त्यामुळे या विभागात आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे

या सर्व ठिकाणी मुसळधार पाऊस (Weather Update) तर पडणारच आहे. परंतु त्यासोबतच सोसाट्याचा वारा देखील वाहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे. त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये देखील तूरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील घाट विभागात मात्र चांगलाच मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे.

Railway Recruitment 2024 | भारतीय रेल्वेत 7934 पदांसाठी मेगाभरती सुरु; येथे करा अर्ज

Railway Recruitment 2024

Railway Recruitment 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. आता उमेदवारांना थेट सरकारी नोकरी लागणार आहे. ही भरती आता भारतीय रेल्वेमध्ये (Railway Recruitment 2024) चालू झालेली आहे. केंद्र शासनांतर्गत ही एक मोठी भरती राबवली जात आहे त्यामुळे जे लोक नोकरीच्या शोधात आहे त्यांच्यासाठी ही एक खूप मोठी संधी आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

रिक्त पदे | Railway Recruitment 2024

भारतीय रेल्वे अंतर्गत सिविल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकामुनिकेशन इंजिनिअर या पदांची भरती केली जाणार आहे.

रिक्त पदांची संख्या

सदर भरती अंतर्गत एकूण 7934 रिक्त जागांची भरती केली जाणार आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख

30जुलै 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

29 ऑगस्ट 2024 ही या भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखे अगोदर सर्च करा.

अर्ज प्रक्रिया

या भरती अंतर्गत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार 18 ते 36 या वयोगटातील असणे गरजेचे आहे.

अर्ज शुल्क

या भरती अंतर्गत अर्ज करताना सामान्य श्रेणीतील उमेदवारांना 500 रुपये असणार आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 250 रुपये फी असणार आहे.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

Flipkart : GOAT सेलनंतर, फ्लिपकार्टवर बंपर सेल , ‘या’ स्मार्टफोन्सवर सवलतींचा पाऊस

Flipkart : अलीकडेच फ्लिपकार्टवर GOAT सेल सुरू करण्यात आला होता आणि यादरम्यान अनेक उत्पादने प्रचंड सवलतींसह उपलब्ध होती, परंतु आता ही विक्री संपली आहे. या काळात तुम्ही स्वस्तात फोन खरेदी करण्याची संधी गमावली असेल तर काळजी करू नका. कारण , फ्लिपकार्टवर पुन्हा एक नवीन सेल सुरू झाला आहे आणि तुम्ही 5 दिवसांसाठी त्याचा लाभ घेऊ शकता. हा सेल खासकरून स्मार्टफोन्ससाठी सुरू करण्यात आला असून फोन खरेदीदार (Flipkart) ऑफर्स आणि डील्सच्या माध्यमातून सवलतीचा लाभ घेऊ शकतील.

फ्लिपकार्टवर पुन्हा सेल (Flipkart)

Flipkart Month End Mobiles Fest 2024 वर अनेक स्मार्टफोन विकण्यासाठी सेल सुरू करण्यात आला आहे. हा सेल 26 जुलै 2024 रोजी सुरू झाला असून 31 जुलै 2024 रोजी संपेल. या 5 दिवसांमध्ये तुम्हाला स्वस्त दरात स्मार्टफोन मिळवण्याची खास संधी आहे. डिस्काउंटसोबतच फोनवर डिस्काउंट ऑफरही दिल्या जात आहेत. चला जाणून घेऊया ते 2 स्मार्टफोन्स कोणते आहेत जे तुम्ही कमी किमतीत खरेदी करू शकता.

15000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत स्मार्टफोन (Flipkart)

सर्वप्रथम, हे ठरवा की जर बजेट 15,000 रुपयांपेक्षा कमी असेल, तर तुम्ही Flipkart वर सुरू असलेल्या मंथ मोबाईल फेस्ट सेलद्वारे Poco आणि Vivo चे 5G फोन खरेदी करण्याचा विचार करू शकता.

POCO M6 5G (Flipkart)

  • Poco M6 5G फोनमध्ये 6.74 इंच HD+ डिस्प्ले आहे.
  • हा फोन 50MP रियर कॅमेरा आणि 5MP फ्रंट कॅमेरा सह येतो.
  • यात 5000 mAh बॅटरी आणि MediaTek Dimensity 6100+ प्रोसेसर आहे.
  • तुम्ही त्याचा 4 जीबी रॅम + 64 जीबी रॉम व्हेरिएंट 11,999 रुपयांऐवजी 9,499 रुपयांना खरेदी करू शकता.
  • याच्या किमतीवर थेट 20% सूट दिली जात आहे.
  • तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही बँक ऑफरद्वारे फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक कार्डवरून ५% कॅशबॅक मिळवू शकता.

Vivo T3 Lite 5G (Flipkart)

  • Vivo T3 Lite 5G मध्ये 6.56 इंच डिस्प्ले आहे.
  • यात 50MP + 2MP रियर कॅमेरा आणि 8MP फ्रंट कॅमेरा आहे.
  • यात 5000 mAh ची बॅटरी आणि Dimensity 6300 प्रोसेसर आहे.
  • तुम्ही त्याचा 4 जीबी रॅम + 128 जीबी रॉम व्हेरिएंट 14,499 रुपयांऐवजी 10,499 रुपयांना खरेदी करू शकता.
  • त्याच्या किमतीवर थेट 27% सूट दिली जात आहे.
  • तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही बँक ऑफरद्वारे फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक कार्डवरून ५% कॅशबॅक मिळवू शकता.

Google Maps : वरून मेट्रोची तिकिटे बुक करता येणार, सापडणार EV चार्जिंग स्टेशन सुद्धा

Google Maps : हल्ली आपल्याला कोणतीही समस्या असली की आपण लगेच गुगल करतो. मग ते आसपास असणारं ट्राफिक असो किंवा मग जवळपास असणारं एखाद हॉस्पिटल गुगल मॅप्स हे गुगलचे एक महत्वाचं फिचर आहे, एखाद्या ठिकाणाविषयी माहिती देणे , नेव्हिगेशन चेक करणे आणि नवीन ठिकाण शोधायला मदत करणे यासाठी उपयुक्त आहे. Google चे नकाशे हे वाहन चालवणाऱ्या लोकांसाठी एक महत्त्वाचे साधन आहे कारण त्याच्या मदतीने नेव्हिगेशन खूप सोपे होते.

Google Maps आपल्या ग्राहकांना अधिक चांगला अनुभव देण्यासाठी सतत काम करत राहते. हा ट्रेंड सुरू ठेवत, गूगल मॅप्स च्या ऍप मध्ये काही नवीन फीचर्स ऍड करण्यात आली आहेत. ज्यामुळे नेव्हिगेशन सुधारेल आणि इतकेच नाही तर इलेक्ट्रिक वाहन (EV) चार्जिंग स्टेशन शोधणे आणि अगदी मेट्रो तिकीट बुक करणे सुद्धा सोपे होईल. चला जाणून घेऊया…

Google Mapsचे नवीन फीचर्स

  • गुगल मॅप्सने आपल्या मोबाईल ॲपमध्ये अनेक नवीन फीचर्स आणले आहेत, ज्यामुळे युजर्सचे काम अधिक सोपे होईल.
  • या नवीन वैशिष्ट्यांमध्ये उड्डाणपुलांची माहिती, लहान रस्त्यांवर नेव्हिगेट करण्यात मदत आणि EV चालकांना जवळपासचे चार्जिंग स्टेशन शोधण्यात मदत होईल.
  • यासह, वापरकर्ते Google नकाशे ॲपवरून मेट्रो तिकीट बुक करू शकतील आणि ॲपवर रस्ते अपघाताची तक्रार करू शकतील.

फ्लायओव्हर कॉलआउट

  • जर तुम्ही Google Maps वापरत असाल तर तुम्हाला ड्रायव्हिंग करताना फ्लायओव्हर साठी तयारी करण्यास मदत करेल .
  • यासाठी नकाशे नवीन फ्लायओव्हर कॉलआउट फीचरसह अपडेट करण्यात आले आहेत.
  • ही वैशिष्ट्ये या आठवड्यात Android स्मार्टफोन किंवा Android Auto युनिट असलेल्या वापरकर्त्यांसाठी असतील. सुरुवातीपासून भारतातील 40 शहरांमध्ये उपलब्ध असेल.

EV चार्जिंग स्टेशन (Google Maps)

  • गुगल मॅप्स ना आता टीव्ही चार्जिंग स्टेशन याबद्दल माहिती द्यायला सुरुवात केली आहे.
  • यासाठी कंपनीने एथर इलेक्ट्रिक पे काजम आणि स्टॅटिक यांच्यासोबत पार्टनरशिप केली आहे. जेणेकरून आठ हजार पेक्षा अधिक चार्जिंग स्टेशनची माहिती प्राप्त होणार आहे.

करता येणार मेट्रोचे तिकीट बुक

गुगल मॅप्स नाही युजरसाठी आणखीन एक खास अपडेटेड फीचर आणला आहे याच्या मदतीने तुम्ही मेट्रोचे तिकीट बुक करू शकता.
याच्यासाठी कंपनीने ओ एन डी सी आणि नंबर यात्री यांच्यासोबत भागीदारी केली आहे
याच्या मदतीने युजर कोची आणि चेन्नई मधील मेट्रो लाईन वर यात्रा करताना तिकीट बुक करू शकतात.

IT Jobs: मोठी बातमी !!! भारतातल्या टॉप IT कंपन्यांमध्ये 90,000 फ्रेशर्सना मिळणार संधी

IT Jobs: तुम्ही जर फ्रेशर असाल आणि IT कंपनीमध्ये नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. एप्रिल-जून तिमाहीत आयटी क्षेत्रातील मजबूत कमाई करताना दिसत आहे. म्हणजेच भारतातल्या टॉप कंपन्यांची स्थिती मजबूत आहे. याचाच अर्थ IT कंपन्यांमध्ये नोकऱ्या परत आल्या आहेत आणि देशातील टॉप टेक कंपन्या चालू आर्थिक वर्षात जवळपास 90,000 फ्रेशर्सना नियुक्त करण्याचा विचार (IT Jobs) करत आहेत.

देशातल्या टॉप कंपन्यांचा समावेश (IT Jobs)

महत्वाची गोष्ट म्हणजे आयटी सेवा क्षेत्रातील प्रमुख टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने FY25 मध्ये जवळपास 40,000 फ्रेशर्सची नियुक्ती करण्याची योजना आखली आहे, तर इन्फोसिसने या आर्थिक वर्षात सुमारे 15,000-20,000 फ्रेशर्सची नियुक्ती करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. TCS ने FY25 च्या पहिल्या तिमाहीत 5,452 कर्मचाऱ्यांना कामावर घेतले, ज्यामुळे तीन चतुर्थांश हेडकाउंट कमी झाले. कंपनीत आता 6,06,998 लोकांना रोजगार आहे. शिवाय तत्परतेचा दर देखील पहिल्या तिमाहीत 12.1 टक्क्यांपर्यंत खाली आला.

कंपनीचे मुख्य एचआर अधिकारी मिलिंद लक्कड यांच्या मते, कॅम्पसमधून कर्मचारी घेण्याला प्रधान्य राहणार आहे. “तिमाही दरम्यान, किंवा वर्षभरात, त्याचे काही तिमाही नियोजन देखील घडेल. आमच्याकडे कौशल्याची कमतरता काय आहे हे आम्ही शोधून (IT Jobs) काढतो आणि त्या आधारे आम्ही कामावर घेतो,” असे त्यांनी स्पष्ट केले .

Infosys 20,000 फ्रेशर्स नियुक्त करण्याच्या तयारीत (IT Jobs)

Infosys ने FY24 मध्ये 11,900 फ्रेशर्सची नियुक्ती केली, FY23 मधील 50,000 पेक्षा जास्त 76% कमी. त्याचे मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) जयेश संघराजका यांनी Q1 कमाई कॉल दरम्यान सांगितले की ते वाढीच्या आधारावर यावर्षी 20,000 पर्यंत फ्रेशर्स नियुक्त करण्याचा विचार करत आहेत. HCLTech ची FY25 मध्ये कॅम्पसमधून 10,000 हून अधिक फ्रेशर्सची नियुक्ती करण्याची योजना आहे. त्यात आता 219,401 लोकांना रोजगार मिळाला आहे (या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 8,080 ची भर पडली आहे).

विप्रो 10,000-12,000 कर्मचारी नियुक्त करणार (IT Jobs)

विप्रोचे मुख्य मानव संसाधन अधिकारी सौरभ गोविल यांच्या मते , कंपनी FY25 मध्ये नवीन ऑन-बोर्डिंगचा बॅकलॉग पूर्ण करेल. आयटी सेवा प्रमुख चालू आर्थिक वर्षात सुमारे 10,000-12,000 कर्मचारी नियुक्त करतात. टेक महिंद्राने यापूर्वी सांगितले होते की चालू आर्थिक वर्षात 6,000 फ्रेशर्सची नियुक्ती करण्याची त्यांची योजना (IT Jobs) आहे.

CM Ladaki Bahin Yojana | लाडकी बहीण योजनेचे सगळ्यात मोठे अपडेट; रक्षाबंधनाला सरकार देणार आणखी एक भेट

CM Ladaki Bahin Yojana

CM Ladaki Bahin Yojana | गेल्या काही दिवसापूर्वी महाराष्ट्रातील महायुती सरकारने महिलांसाठी काही योजना जाहीर केल्या आहेत. यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (CM Ladaki Bahin Yojana) या योजनेची सर्वत्र चर्चा आहे. राज्य सरकारने ही योजना जाहीर केल्यानंतर समस्त महिला वर्गाला खूप जास्त आनंद झाला. या योजनेत राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. अशातच आता सरकारने महिलांना आणखी एक भेट देण्याचे ठरवलेले आहे.

सरकारने आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची व्याप्ती वाढवून त्यामधील महाराष्ट्रातील महिलांना समाविष्ट करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या योजनेनुसार आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (CM Ladaki Bahin Yojana) योजनेतील लाभार्थी महिलांना दरवर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहे. याबाबत लवकरच शासकीय निर्णय आदेश देखील काढण्यात येणार आहे. या योजनेसाठी अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने अंमलबजावणीची तयारी देखील सुरू केलेली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर सरकार महिलांसाठी वेगवेगळ्या योजना आणत आहेत.

त्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा केली होती. या अंतर्गत महिलांना स्वच्छ इंधन उपलब्ध व्हावे, यासाठी ही योजना केली होती. या योजनेअंतर्गत आता पात्र असणाऱ्या महिलांना तीन सिलेंडर वर्षभरात मोफत दिले जाणार आहेत. त्याचप्रमाणे राज्यातील जवळपास 52लाख 16 हजार 412 कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळेल असे देखील उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेले आहे.

तीन सिलेंडर मोफत कसे मिळणार? | CM Ladaki Bahin Yojana

अजित पवारांनी अर्थसंकल्पात या अन्नपूर्णा योजनेच्या घोषणानंतर अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून एक प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे. त्या अंतर्गत आता ज्या महिलांची महिला (CM Ladaki Bahin Yojana) योजनेअंतर्गत लाभार्थी आहेत, त्यांना वर्षाला तीन सिलेंडर मोफत देण्याचे देखील सांगितलेले आहे. सरकार उज्वला योजनेअंतर्गत महिलांना गॅस सिलेंडर मागे 300 रुपये अनुदान देते. एका गॅसची बाजारातील किंमत ही 830 असली, तरी प्रत्येक महिलेला प्रति सिलेंडर 530 रुपये याप्रमाणे तीन सिलेंडर मोफत मिळणार आहे. सरकारने घेतलेल्या या योजनेचा फायदा महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत होऊ शकतो. असे म्हटले आहे. परंतु त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर मात्र अतिरिक्त भार पडणार आहे.

मावळमध्ये सुनील शेळके आणि बाळा भेगडे यांच्यात राजकीय विस्तव

MAVAL ASSEMBLY 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सुनील शेळके (Sunil Shelke) तू आमदार कोणामुळं झाला, तुझ्या सभेला कोण आलं होतं. पक्षाचा अध्यक्ष कोण होतं? तुझ्या त्या अर्जावर माझी सही आहे, हे लक्षात ठेवा. यापुढं असं काही केलं तर मला शरद पवार म्हणतात, हे विसरू नका. मी त्या वाटेने जात नाही, पण गेलो तर मी कोणाला सोडत नाही…. मावळचे अजित पवार गटाचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांना दस्तूर खुद्द शरद पवारांनी दिलेला हा धमकीवजा इशारा… शरद पवारांचा हा रुद्रावतार पाहून सुनील आण्णा शेळकेंच्या आमदारकीवर आभाळ आलय अशी एकच चर्चा सुरू झाली… खरंतर येणाऱ्या मावळ विधानसभा मतदारसंघात खरा संघर्ष असणार आहे तो बाळा भेगडे विरुद्ध सुनील शेळके असा…. पण महायुतीच्या एकाच झोपडीत हे दोन्ही कट्टर विरोधक एकत्र आल्याने यातल्या एकाला बंड करण्याशिवाय पर्याय उरला नाहीये, हे तर क्लिअर कट आहे… मग अशा वेळेस शरद पवार इथं काही विषय खोल करणार का? सीटिंग एमएलए च्या फॉर्म्युला नुसार जर शेळकेंनाच उमेदवारी मिळणार असेल तर भेगडे साहेबांच्या गळाला लागतील का? मावळमधील विधानसभा निवडणूक येणाऱ्या टर्मला नेमकं जिंकतंय कोण? त्याचाच हा खराखुरा ग्राउंड वरचा आढावा….

मावळच्या रांगड्या मातीप्रमाणे इथलं राजकारणही रांगडं असलं तरी या मातीने नेहमीच भाजपच्या बाजूने कौल दिला… 1995 मध्ये रुपलेखा धोत्रे यांनी मावळात भाजपला संधान बांधून दिलं ते कायमचंच… यानंतर दिगंबर भेगडे आणि बाळा भेगडे प्रत्येकी दोन टर्म याच मावळातून विधानसभेवर गेले… आणि मावळच्या राजकारणात भाजी एके भाजप… भाजप दूने भाजप… इतका सारा होल्ड पक्षाने मिळवला होता… बाळा भेगडे यांना फडणवीस सरकारच्या काळात शेवटच्या वर्षी राज्यमंत्रीपदही देण्यात आलं… 2019 ला बाळा भेगडेंना आमदारकीच्या हॅट्रिकची संधी चालून आलेली असताना त्यांना मोठं राजकीय आव्हान उभे राहिलं… पण ते काही वेगळ्या पक्षातून नाही तर त्यांच्याच भाजपमधून…

कारण आमदारकीसाठी दहा ते पंधरा वर्षे वेट अँड वॉच वर असणारे पक्षातीलच इच्छुक आता बंडाच्या मूडमध्ये होते… त्यात रवींद्र भेगडे आणि सुनील शेळके यांच्या आमदार होण्याच्या सुप्त इच्छा कधी लपून राहिल्या नव्हत्या…. भाजप पक्ष वाढीसाठी शेळके अगदी प्रामाणिकपणे काम करत होते…. भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेवर विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी काम केलं…. पण आपल्याला यंदाही डावललं जातंय असं ध्यानात येताच त्यांनी राष्ट्रवादीत उडी घेत विधानसभेचं तिकीटही मिळवलं… भाजपकडून स्टँडिंग आमदार बाळा भेगडे तर राष्ट्रवादीकडून सुनील शेळके यांच्यात 2019 ला अटीतटीचा सामना झाला… आणि शेळकेंनी इतिहास रचत पहिल्यांदाच राष्ट्रवादीचा झेंडा मावळात फडकवला…

आमदार होताच शेळकेंनी वर्चस्वाच्या राजकारणाला सुरुवात केली…. ग्रामपंचायत असो वा बाजार समिती प्रत्येक निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीचा दबदबा कायम ठेवला… त्यासोबतच मतदारसंघात विकास कामांचा सपाटाही सुरूच ठेवला… त्यात गावं दत्तक घेऊन विकासाचं मॉडेल तयार करणं, महिलांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण, विद्यार्थ्यांना परीक्षेच्या काळात मोफत वाहन व्यवस्था, पोलीस कार्यालय, पीडीसी बँकेची इमारत, सरकारी दवाखाना, प्रशासकीय इमारत अशा शहरी विकासाला हात घालत शेळकेंनी मतदार संघातील आपली राजकीय ताकद चांगलीच वाढवलीय… वर्चस्वाचे राजकारण वाढवत तीपटीने वाढवलेला जनसंपर्क, सोशल मीडियावर घातलेला धुमाकूळ यातून आमदार असूनही शेळके शेळके उभ्या महाराष्ट्राला माहित झाले… त्यात अजित पवारांनी वारंवार दिलेली ताकद पाहता राष्ट्रवादीच्या फुटीत ते दादांसोबत आले…. आणि मावळात पुन्हा राजकीय गुंता झाला….

कारण अजितदादांसोबतच आलेले बापू भेगडे, भाजपचे रवींद्र भेगडे व बाळा भेगडे अशा सगळ्यांच्याच आमदारकीच्या स्वप्नांवर शेळकेंनी महायुतीत येऊनमहायुतीत येऊन पाणी फिरवलंय… अजित दादांसाठी शरद पवार गटातील दिग्गजांना शिंगावर घेणं असो किंवा मेरिटच्या बेसिसवर असो सुनील शेळके यांचं काम नेहमी उजवं ठरतं…. त्यामुळे तेच यंदाही महायुतीचे उमेदवार असतील, हे तर फिक्स आहे… जुना भाजपचा केडर आणि नव्याने बांधलेली राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांची फौज असा दोन्ही बाजूंचा फोर्स असल्याने विद्यमान आमदारांना आव्हान देणं विरोधातील उमेदवाराला थोडं जडच जाणार आहे… सध्या तरी भाजपच्या गोटातीलच नेत्यांनी ‘लक्ष विधानसभा’ असं म्हणून पक्षाची अडचण वाढवलीय… तर दुसरीकडे राष्ट्रवादीकडून दत्तात्रय पडवळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता जास्त आहे… पण बापू भेगडे दरम्यानच्या काळात राष्ट्रवादीची तुतारी हातात घेतात का? हे पाहणंही इंटरेस्टिंग करणार आहे… अर्थात येत्या काळात सुनील शेळकेंच्या राजकारणाचे पंख छाटण्यासाठी शरद पवार यांच्या गोटातूनही मोठी फिल्डिंग लागू शकते… राष्ट्रवादीत फुटीर झाल्याने मतदार संघातील शरद पवारांना मानणारा मोठा वर्ग शेळकेंवर नाराज आहे… त्यात पवना धरणग्रस्तांचे रखडलेलं पुनर्वसन, रेड झोनची टांगती तलवार आणि इतर अनेक शहरी प्रश्नांना शेळके न्याय देऊ शकले नाहीत… त्यामुळे कमळाकडून घड्याळाकडे गेलेला मावळ विधानसभा मतदारसंघ येणाऱ्या निवडणुकीत तुतारीकडे शिफ्ट होणार का? हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे…

बाकी लोकसभेच्या लीडमुळे सध्यातरी सुनील शेळके यांची आमदारकी सेफ झोनमध्ये दिसत असली तरी शरद पवार आयत्या टाइमिंगला इथून कोणते राजकीय पत्ते बाहेर काढतात? यावरही इथलं बरचस समीकरणे अवलंबून असणारय… त्यात काँग्रेसनेही मावळच्या जागेचा हट्ट धरल्याने महाविकास आघाडीला ही जागा कुणाला सोडायची? यावर बरीच काथ्याकुट करावी लागणार आहे… त्यात प्रदेश प्रतिनिधी दिलीप ढमाले, प्रदेश सरचिटणीस निखिल कविश्वर, तालुकाध्यक्ष यशवंत मोहोळ आणि उद्योजक रामदास काकडे यांनी आमदारकीसाठी दंड थोपटण्याची तयारी दाखवलीय… पण सध्या तरी मावळातली लढाई शेळके वर्सेस भेगडे याच लाईनअपने पुढे जाईल असं वाटतंय… त्यात महायुतीकडून शेळकेंचं नाव जवळपास कन्फर्म आहे… त्यामुळे प्रश्न उरतो तो फक्त भेगडेंचा… आता या तीन भेगडेंपैकी नेमका कोणता चेहरा आणि कोणत्या पक्षाकडून शेळकेंना कडवं आव्हान देण्यासाठी मैदानात उतरेल? बदललेली राजकीय समीकरणे पाहता मावळातील सर्वात जास्त इंटरेस्टिंग मतदारसंघाचा 2024 चा आमदार नेमका कोण? तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा.