Sunday, December 21, 2025
Home Blog Page 574

BSNL Recharge Plans : BSNL चे परवडणारे रिचार्ज प्लॅन!! 6 रुपयांच्या खर्चात 395 दिवस मज्जा

BSNL Recharge Plans

BSNL Recharge Plans । जिओ, एअरटेल यांसारख्या आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्जच्या किमती वाढवल्यानंतर अनेक ग्राहकांचा कल हा देशी टेलिकॉम कंपनी BSNL कडे वळू लागला आहे. बीएसएनएलचे रिचार्ज अतिशय कमी किमतीत उपलब्ध असल्याने ग्राहकांसाठी मोठा दिलासा आहे. मागील २० दिवसात अनेक ग्राहकांनी बीएसएनएलचे सिम कार्ड घेण्यास सुरुवात केली आहे तर अनेकांनी आपलं जिओ किंवा एअरटेलचे सिम कार्ड बीएसएनएल मध्ये पोर्ट केलं आहे. तुम्ही सुद्धा बीएसएनएलचे ग्राहक असाल तर आज आम्ही तुम्हाला कंपनीने स्वस्तात मस्त रिचार्ज प्लॅन बद्दल सांगणार आहोत. यानंतर तुम्हीच ठरवा कि कोणत्या रिचार्ज तुमच्यासाठी बेस्ट आहे.

BSNL 336 दिवसाची व्हॅलिडिटी असणारा प्लॅन –

BSNL च्या या रिचार्ज प्लॅनची किंमत 1199 रुपये आहे. या प्लॅन अंतर्गत अनलिमिटेड कॉलिंग आणि 24 जीबी इंटरनेट डेटा उपलब्ध आहे. तसेच ग्राहकांना दररोज 100 एसएमएसची सुविधाही देण्यात येत आहे. या रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडिटी 336 दिवसांची आहे. म्हणजेच ग्राहकांना दररोज फक्त 3.56 रुपये खर्च पडतोय.

BSNL चा 365 दिवसाची व्हॅलिडिटी असणारा प्लॅन-

BSNL च्या या रिचार्ज प्लॅनची (BSNL Recharge Plans) किंमत 1999 रुपये आहे. या प्लॅन अंतर्गत अनलिमिटेड कॉलिंग आणि 600 GB इंटरनेट डेटा उपलब्ध आहे. तसेच ग्राहकांना दररोज 100 एसएमएसची सुविधाही देण्यात येत आहे. तसेच या रिचार्ज प्लॅन अंतर्गत गेम, झिंग म्युझिक आणि ट्यूनचाही ऍक्सेस मिळतोय. या रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडिटी 1999 दिवसांची आहे. म्हणजेच ग्राहकांना दररोज फक्त 5.47 रुपये खर्च पडतोय.

BSNL 1198 रुपयांचा रिचार्ज – BSNL Recharge Plans

BSNL च्या या रिचार्ज प्लॅनची किंमत 1198 रुपये आहे. या प्लॅन अंतर्गत ग्राहकांना दर महिन्याला 300 मिनिटे कॉलिंग, 3GB डेटा आणि 30 SMS ची सुविधा मिळतेय. बीएसएनएलच्या या रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडिटी 365 दिवसाची आहे. म्हणजेच ग्राहकांना दररोज 3.28 रुपये खर्च पडतोय.

BSNL चा 395 दिवसाची व्हॅलिडिटी असणारा प्लॅन-

BSNL च्या या रिचार्ज प्लॅनची किंमत 2399 रुपये आहे. या प्लॅन अंतर्गत अनलिमिटेड कॉलिंग , दररोज 2 जीबी इंटरनेट डेटा आणि 100 एसएमएसची सुविधा देण्यात आली आहे. बीएसएनएलच्या या रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडिटी तब्बल 395 दिवसाची आहे. या रिचार्ज प्लॅन ची किंमत 2399 असल्याने ग्राहकांना रोजचा खर्च अवघा 6 रुपये पडतोय. त्यामुळे हा रिचार्ज प्लॅन ग्राहकांच्या खिशाला चांगलाच परवडतोय असं म्हंटल पाहिजे.

.

IRCTC : भेट द्या भगवान शंकराच्या पवित्र स्थळांना ; IRCTC ने आणले ‘श्रावण स्पेशल टूर पॅकेज’

IRCTC : पाऊस बरसू लागला की वेध लागतात श्रावण महिन्याचे. हा महिना अत्यंत पवित्र महिना मानला जातो. तेवढेच नाही तर या महिन्यात उपवास पकडले जातात. श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी शिव शन्करची आराधना केली जाते. या काळात ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेणे सुद्धा पवित्र मानले जाते. म्हणूनच अनेक जण या काळात ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी बाहेर पडतात. तुम्ही देखील असा काही प्लॅन केला असेल तर आम्ही तुमच्यासाठी एक जबरदस्त माहिती घेऊन आलो आहोत. होय …! IRCTC कडून श्रावणात ज्योतिर्लिंगाचे दर्शन घडवण्यासाठी जबरदस्त टूर पॅकेजचे आयोजन केले आहे. चला जाणून घेऊया …

IRCTC ने पवित्र श्रावण महिन्यात श्रावण स्पेशल टूर पॅकेज आणले आहे. या पॅकेजमध्ये 7 ज्योतिर्लिंगांचे एकाच वेळी दर्शन दिले जाणार आहे. यामध्ये भोजन आणि निवास सेवा मोफत असेल. हा प्रवास ३ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. ‘सात ज्योतिर्लिंग यात्रा श्रावण स्पेशल’ असे या टूर पॅकेजचे नाव आहे. ही सहल 9 रात्री 10 दिसांची असेल . IRCTC च्या या टूर पॅकेजमध्ये तुम्हाला नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण दिले जाईल. या पॅकेजमध्ये तुम्हाला प्रवास विमाही मिळेल.

7 ज्योतिर्लिंगांचे दर्शन

  • महाकालेश्वर
  • ओंकारेश्वर
  • त्रिमकेश्वर
  • भीमेश्वर
  • गृहेश्वर
  • परि बाजीनाथ
  • मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग

किती आकारले जाईल भाडे ?

IRCTC चे हे टूर पॅकेज बुक करण्यासाठी तुम्हाला 20,900 रुपये खर्च करावे लागतील. तसे पाहायला गेल्यास पॅकेजनुसार किंमती बदलतात. जर तुम्ही स्लीपर कोच पॅकेज बुक केले तर तुम्हाला 20,900 रुपये खर्च करावे लागतील. तुम्ही थर्ड एसी तिकीट बुक केल्यास 34,500 रुपये मोजावे लागतील. 2AC तिकीट बुक करण्यासाठी तुम्हाला 48,900 रुपये द्यावे लागतील. त्यामुळे आगामी श्रावण महिन्यात या तूर पॅकेज सोबत 7 ज्योतिर्लिंगांचे दर्शन घ्यायला हरकत नाही.

Bussiness Idea | केवळ 50 हजार रुपये गुंतवणूक करून सुरु करा ‘हा’ व्यवसाय; महिन्याला होईल बक्कळ कमाई

Bussiness Idea

Bussiness Idea | आजकाल खूप शिक्षण घेऊन देखील अनेकांना नोकऱ्या मिळत नाही. त्याचप्रमाणे नोकरी मिळाली तरी तरुणांना त्यांच्या आवडीनुसार काम मिळत नाही. आणि पगारही तेवढा मिळत नाही. त्यामुळे अनेक लोक आता स्वतःचा व्यवसाय (Bussiness Idea) करण्याकडे वळू लागलेले आहेत. छोटासा का होईना, पण स्वतःचा व्यवसाय असावा. असे आजकाल अनेकांना वाटते. कारण नोकरीचा काही भरोसा नसतो. नोकरी कधीही गेली, तरी आपल्याकडे एक इन्कम सोर्स असावा असे अनेकांना वाटते. परंतु हा व्यवसाय नक्की कोणता करावा? त्यासाठी किती पैसे लागतील? याबद्दल अनेकांना माहित नसते. त्यामुळे त्यांना व्यवसाय (Bussiness Idea) सुरू करता येत नाही.

तुम्ही अगदी छोट्या प्रमाणात गुंतवणूक करून देखील एखाद्या छोट्या व्यवसायापासून (Bussiness Idea) सुरुवात करू शकता. ज्या व्यवसायाला बाजारात जास्त मागणी आहे. तसेच त्या व्यवसायाची आपल्याला माहिती असावी आणि रॉ मटेरियल अगदी स्वस्त दरात आणि सहजपणे उपलब्ध होत आहे का? त्याचप्रमाणे हा व्यवसाय करण्यासाठी आपल्याकडे पुरेशी जागा आहे का? या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही योग्य तो व्यवसाय निवडणे खूप गरजेचे असते. आज आपण अशाच एका व्यवसायाबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यामध्ये तुम्ही अगदी कमी खर्चामध्ये चांगले उत्पन्न घेऊ शकता.

एलईडी बल बनवणे | Bussiness Idea

आज-काल लाईट बिल मोठ्या प्रमाणात येते. त्यामुळे अनेक लोक हे घरात एलईडी बल्ब वापरतात
त्यामुळे तुम्ही हा एलईडी बल्ब बनवून विक्री करू शकता. हा व्यवसाय खूप चांगल्या पद्धतीने चालतो. त्याचप्रमाणे सरकारच्या माध्यमातून या व्यवसायासाठी तुम्हाला प्रशिक्षण देखील दिले जाते. आणि या व्यवसायामुळे तुमच्यासोबत इतर अनेक लोकांना रोजगार देखील प्राप्त होईल. एलईडी बल्ब हे खूप टिकाऊ असतात. त्याचप्रमाणे ते तुटण्याची आणि फुटण्याची भीती खूप कमी असते. हे बल्ब जवळपास 50 हजार तास चालतात. त्यामुळे सध्या एलईडी बल्बची मागणी बाजारात मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.

व्यवसाय कसा सुरू करायचा ?

तुम्ही अगदी कमीत कमी गुंतवणूक करून देखील हा व्यवसाय करू शकता. तुम्हाला उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत अनेक संस्था एलईडी बल बनवण्याची प्रशिक्षण देतात. या प्रशिक्षणामध्ये तुम्हाला एलईडीचे बेसिक नॉलेज, एलईडी ड्रायव्हर आणि फिटिंग टेस्टिंग त्याचप्रमाणे त्याचे साहित्य, मार्केटिंग, सरकारच्या अनुदान योजना या इतर अनेक गोष्टींची माहिती दिली जाते. तुम्ही केवळ 50000 भांडवलामध्ये हा व्यवसाय सुरू करू शकता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला मोठे दुकान वगैरे किंवा युनिट टाकण्याची गरज नाही. तुम्ही अगदी घरात देखील हा व्यवसाय सुरू करू शकता.

कमाई किती होईल ?

एलईडी बल्ब हा बाजारामध्ये साधारण सध्या 100 रुपयांना विकला जातो. म्हणजेच तुम्हाला यातून दुप्पट नफा देखील होऊ शकतो. तुम्ही तर एका दिवसाला शंभर बल्ब बनवले आणि ते विकले, तर तुम्ही दिवसाला पाच हजार रुपयांपर्यंतचा नफा मिळू शकतो. अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक महिन्याला 1 लाख 50 हजार रुपयांपर्यंत नफा कमवू शकता.

भूम परंडा विधानसभा मतदारसंघात तानाजी सावंत यांची आमदारकी धोक्यात??

Bhum Paranda tanaji sawant

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खेकड्यांच्या पोखरण्याने धरण फुटलं… ते त्या हापकिनकडून औषध घेणं बंद करा… या आणि अशा अनेक स्टेटमेंटने नेहमीच चर्चेत राहणारं नाव म्हणजे तानाजी सावंत (Tanaji Sawant)… शिंदेंच्या बंडात फ्रंटला असणाऱ्या या नावाने ठाकरेंचा, पत्रकारांचा, विरोधकांचा… अगदी जमेल आणि मिळेल तसा रोखठोक समाचार घेतला… पण हेच सावंत सध्या ज्या आमदारकीच्या जीवावर मंत्रिपद मिरवतायत त्याच भूम परंडा मतदार संघात सावंत साहेब सध्या रेड झोन मध्ये आहेत… बंडाळी करून मंत्रीपद दिमाखात मिरवणाऱ्या सावंतांचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी आता राहुल भैया फिरसे… या घोषणेच्या… नावाच्या… मागे ठाकरे – पवारांनी ताकद लावायला सुरुवात केलीय…

खरंतर राष्ट्रवादीतून राजकारणाची बाराखडी गिरवणाऱ्या तानाजी सावंतांना पुढचं भविष्य दिसत नसल्यामुळे त्यांनी 2016 च्या आसपास शिवसेनेचं शिवबंधन हाती बांधण्याचा निर्णय घेतला… अगदी कमी कालावधीत सावंत उद्धव ठाकरेंच्या खास मर्जीतले बनले… त्यांना विधान परिषदेवर घेण्यात आलं… इतकच काय तर फडणवीस – ठाकरे सरकारमधील शेवटच्या मंत्रिमंडळ विस्तारात सावंतांना कॅबिनेट मंत्री पदही देण्यात आलं… यावरून ठाकरेंचा सावंतांवर डोळे झाकून किती विश्वास होता? याचा अंदाज आपल्याला येतो… पण तानाजी सावंतांना जनतेतून निवडून जाण्याची इच्छा होती…. म्हणूनच 2019 ला त्यांना शिवसेनेकडून भूम परंड्याची उमेदवारी देण्यात आली….

तसं पाहायचं झालं तर धाराशिवचा भूम परांडा मतदार संघ हा राष्ट्रवादीचा पारंपारिक बालेकिल्ला… राहुल मोटे यांनी सलग तीन टर्म भूम परंड्याची आमदारकी आपल्याकडे ठेवून नवा रेकॉर्ड तयार केला होता… अगदी 2014 ची मोदी लाटही मोटेंच्या विजय घोडदौडीला रोखू शकली नाही… फक्त 1995साली शिवसेनेकडून ज्ञानेश्वर पाटलांनी याच मतदारसंघात आमदारकी मिळवत, भूम परंड्यात शिवसेनेला बेस मिळवून दिला होता… इतकंच काय तर तालुक्याच्या राजकारणात सावंत बंधूंना स्पेस मिळवून देण्यात ज्ञानेश्वर पाटलांनीच मदत केली… राहुल मोटे आमदार असताना ज्ञानेश्वर पाटलांनी सत्ता नसूनही मतदार संघावरची पकड तसूभरही ढळू दिली नाही… पण उमेदवारी मिळून सुद्धा त्यांना विधानसभेला मोटेंना मात काही देता येत नव्हती… पण या सगळ्या राजकारणाच्या दरम्यान तानाजी सावंतांनी थेट मातोश्रीशी संधान बांधून संपर्कप्रमुख, उपनेते असं करत थेट विधान परिषदेची आमदारकीही पदरात पाडून घेतली… यापुढे जाऊन फडणवीस ठाकरे सरकारच्या शेवटच्या टप्प्यात कॅबिनेट मंत्रीपदाचीही माळ पदरात पाडून घेतली…

अगदी सिस्टिमॅटिक खेळलेल्या या चालींमुळे मतदार संघात शिवसेनेचा चेहरा म्हणून तानाजी सावंत फ्रंटला आले…. माजी आमदार ज्ञानेश्वर पाटलांचं राजकारण मागे पडलं… एवढंच नाही तर पाटलांना डावलून 2019 ला भूम परंडा मतदारसंघातून शिवसेनेचं तिकीट मिळवण्यातही सावंतांना यश आलं…. त्यामुळे 2019 ला आमदारकीचा रेकॉर्ड ब्रेक करणारे राष्ट्रवादीचे राहुल मोटे विरुद्ध शिवसेनेकडून तानाजी सावंत असा अटीतटीचा सामना झाला…. 15 वर्ष आमदार असूनही रखडलेली विकास काम, पाणी प्रश्न, जनतेच्या जगण्या मरण्याच्या महत्त्वाच्या प्रश्नांना न्याय देण्यात मोटे सपशेल फेल ठरले… तर दुसऱ्या बाजूला सावंत यांनी शिवजल क्रांतीच्या माध्यमातून केलेली सिंचनाची कामे, नदी नाला खोलीकरण, सामूहिक विवाह सोहळे, दुष्काळात केलेली सामान्यांना मदत, चारा छावणी यासह साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलेला आधार त्यामुळे सावंतांना मोठा जनाधार मिळाला… आणि राष्ट्रवादीचा झालेला भूम परंड्याचा बालेकिल्ला सावंतांच्या रूपाने पुन्हा शिवसेनेला मिळाला…

तानाजी सावंत भूम परंड्याचे आमदार झाले… पण ठाकरेंनी ज्या सावंतांवर विश्वास टाकला… आमदारकी दिली… त्याच सावंतांनी शिंदेंच्या बंडात सहभागी होत अक्षरशः यु टर्न घेतला… शिंदे गटाची बाजू मांडताना त्यांनी ठाकरेंवर अनेक गंभीर आरोप केलेच पण त्यांच्या क्रेडिबिलिटीवरतीही शंका उपस्थित केली…. याचं फळ त्यांना कॅबिनेट मंत्रीच्या स्वरूपात मिळालं खरं… पण पुढचं राजकारण त्यांच्यासाठी गुंतागुंतीचं झालं त्याचं काय? गद्दारीचा लागलेला टॅग, मंत्रीपदावर असताना वादग्रस्त वक्तव्यांनी ढासळलेली इमेज आणि आक्रमक स्वभावाचा तोटा हे सगळं पाहता भूम परंड्याची जनता ही विद्यमान आमदार सावंत साहेबांवर चांगलीच नाराज आहे, हे वेगळ्या शब्दात सांगायला नको…. म्हणूनच की काय नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतही ठाकरेंच्या उमेदवाराला म्हणजेच ओमराजे निंबाळकरांना याच भूम परंडा मतदारसंघाने सर्वात मोठं लीड दिलंय… यावरून स्पष्ट होतं की सावंतांना यंदा भूम परंडा पुन्हा एकदा विधानसभेवर काही पाठवत नसते…

एमआयडीसी नसणं…पर्यायाने रोजगार नसणं… यासोबतच रखडलेले जलसिंचन प्रकल्प आणि शेतकऱ्यांचे पिक विमा याही गोष्टींची पूर्तता विद्यमान आमदार साहेब पूर्ण करू शकले नसल्यामुळे आणि बंडाळीमुळे सावंतांच्या विरोधात वातावरण आहे हे तर क्लिअर कट सांगता येऊ शकतं… बाकी लोकसभेत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळालेलं 81 हजारांचं भलं मोठं लीड पाहता तिन्ही घटक पक्षांतील इच्छुकांना आमदारकीची स्वप्न पडू लागलीयेत… शरद पवार गटाकडून राहुल मोटे यांचं नाव यात सर्वात जास्त आघाडीवर आहे… तर ठाकरेंकडून माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनीही विधानसभेची तयारी केलीये… दुसऱ्या बाजूला तानाजी सावंत मुळात भूम परंड्यातून निवडणूक लढवतील का? यावरच मोठी शंका उपस्थित केली जातीये… ते मतदारसंघात फिरकत तर नाहीच… पण श्रीकांत शिंदे यांचे वर्गमित्र असणारे डॉ. राहुल घुले यांची मतदार संघातील लगबग, धावपळ आणि गाठीभेटी पाहता शिंदे गटाकडून राहुल घुले यांच्या उमेदवारीवरही शिक्कामोर्तब शकतो…

एका वाक्यात सांगायचं झालं तर इच्छुकांची याही टर्मला भूम परांडा विधानसभा मतदारसंघात भाऊ गर्दी असली तरी वारं मात्र महाविकास आघाडीच्या बाजूने आहे, एवढं मात्र नक्की… बाकी ज्यानं निवडून दिलं तोच मतदारसंघ रिस्की बनल्यामुळे आता तानाजी सावंत निवडणूक लढवण्याची रिस्क घेणार का? सावंत नसतील तर भूम परंड्याचा मतदार संघात मशालीचा की तुतारीचा उमेदवार आमदारकीचा गुलाल उधळतोय? तुम्हाला काय वाटतं? भूम परंड्याचा यंदाचा आमदार कोण होतोय? ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

Beauty Tips : खोबऱ्याचे तेल आणि तुरटी एकत्र करून लावा ; मिळतील आश्चर्यकारक फायदे

Beauty Tips : तुरटी ही जवळपास प्रत्येकाच्या घरात असतेच. तुरटी ही क्लिनींग एजंट म्हणून काम करते. शिवाय तुरटी ही निर्जंतुकीकरणाचे काम करते. म्हणूनच तुम्ही बऱ्याचदा पहिले असेल जुन्या काळी दाढी केल्यानंतर पुरुष तुरटीचा खडा आपल्या चेहऱ्यावरून फिरवत असायचे. याशिवाय खोबऱ्याचे तेलही गुणाकरी असते. केसांच्या वाढीसाठी आणि केस मुलायम होण्यासाठी खोबऱ्याच्या तेलाचा आवर्जून वापर केला जातो. आजच्या लेखात आपण खोबरेल तेल आणि तुरटी या दोन्हीचा वापर कसा करता येईल याची (Beauty Tips) माहिती घेऊया…

केस होतील काळे (Beauty Tips)

हल्ली अनेकांना अकाली केस पांढरे होण्याची समस्या उद्भवते. म्हणूनच तुरटी आणि खोबऱ्याचे तेल नियमित केसांना लावले तर कोलेजनचं उत्पादन अधिक होते आणि हळूहळू नॅचरली केस काळे होऊ लागतील.

पिंपल्स दूर होतील (Beauty Tips)

तुरटी आणि खोबऱ्याच्या मिश्रणाने पिंपल्स दूर होण्यास मदत मिळते. तुरटीमधील अॅंटी-सेप्टीक गुण इन्फेक्शन रोखण्यास मदत करतात. तर खोबऱ्याचं तेल हीलिंगचं काम करते. त्यामुळे तुम्हाला जर वारंवार पिंपल्स येत असतील (Beauty Tips) तर तुम्ही हा उपाय जरूर करून पहा.

रुक्ष केस होतील मुलायम

खोबऱ्याच्या तेलाममध्ये अॅंटी-बॅक्टेरिअल आणि अॅंटी-फंगल गुण असतात. जे केसांमध्ये होणारं इन्फेक्शन दूर करतात. सोबतच केसांना मुलायम करण्याचं काम करतात. म्हणूनच केसांना खोबरेल तेल लावा.

केसांकरिता वापरण्याची पद्धत (Beauty Tips)

जर तुम्हाला तुरटी आणि खोबऱ्याच्या तेलाचे फायदे करून घ्यायचे असतील तर पुढे दिलेल्या पद्धतीप्रमाणे (Beauty Tips) तुम्ही ते वापरू शकता.

  • यासाठी एका वाटीमध्ये थोडं खोबऱ्याचं तेल घ्या.
  • हे तेल गॅसवर गरम करा.
  • यात तुरटी बारीक करून टाका.
  • यांचं चांगलं मिश्रण करा.
  • कोमट असताना हे मिश्रण डोक्याच्या त्वचेवर लावा.
  • हलक्या हाताने मसाज करा.
  • अर्धा तास तसंच ठेवा नंतर केस धुवून घ्या.
  • आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा उपाय कराल तर तुम्हाला (Beauty Tips) खूप छान परिणाम दिसून येईल.

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना वादाच्या भोवऱ्यात; अर्थ विभागाचा आक्षेप?

Ladki Bahin Yojana objection

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिंदे सरकारकडून महिलांसाठी माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा (Ladki Bahin Yojana) करण्यात आली. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी हि योजना लागू करण्यात आली असून या योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला १५०० रुपये महिलांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे. सरकारच्या या घोषणेनंतर राज्यभरातील महिलावर्गात मोठ्या आनंदाचे वातावरण असतानाच आता हि महत्वाकांक्षी योजना आता वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. कारण अर्थ विभागानेच आता लाडकी बहीण योजनेवर आक्षेप घेतला आहे. महिलांसाठी आधीच वेगवेगळ्या योजना सुरु असताना लाडकी बहीण योजनेची गरज काय? असा सवाल अर्थ खात्याने केलाय.

राज्यावर कर्ज असताना ही योजना कितपत योग्य– Ladki Bahin Yojana

महायुती सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी वार्षिक ४६ हजार कोटींची आवश्यकता असून २५ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मात्र राज्याची आर्थिक स्थिती बरी नाही, राज्यावर ७.८ लाख कोटींचे कर्ज असताना ही योजना कितपत योग्य आहे असा सवाल वित्त विभागाने केलाय. लाडकी बहीण योजनेसाठी (Ladki Bahin Yojana) दर वर्षी ४६ हजार कोटी रुपये कुठून आणणार ? या संदर्भातील तरतूद कशी करायची? असा प्रश्न अर्थ खात्यापुढे आहे. तसेच राज्यावर ७.८ लाख कोटींचे कर्ज असताना ही योजना कितपत योग्य आहे? राज्यातील महिलांसाठी आधीच सामाजिक न्याय,आदिवासी विकास,महिला-बालकल्याण अशा अनेक योजना आहेत. त्यामुळे या योजनेमुळे एकाच लाभार्थ्याला दोन-दोन योजनांचा लाभ मिळण्याची शक्यता असल्याची चर्चा अर्थखात्यात सुरु आहे.

दरम्यान, अर्थ खात्याच्या आक्षेपानंतरही सरकार मधील नेते मात्र कोणत्याही परिस्थितीत आम्ही हि योजना राबवणार यावर ठाम आहेत. पैसे नाहीत म्हणून योजना बंद करायची का? असा उलट सवाल भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केला. तर आमच्या बहिणी काय ऑनलाईन पैसे खर्च करत नाहीत, तर बाजारात जाऊन खर्च करतात आणि यामुळे अर्थव्यवस्था सुधारेल असा दावा सुधीर मुनगंटीवार यांनी केलाय. तर दुसरीकडे शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांनीही या योजनेची पाठराखण केली आहे. आम्ही घेतलेल्या निर्णयाशी सरकार कटिबद्ध आहे. बहिणींच्या खात्यावर पैसे यायला सुरुवात झालीय. ही आमच्या शासन काळातील योजना आहे. आमचे सरकार जेव्हा येईल, तेव्हादेखील आम्ही ही योजना चालू ठेवणार आहोत असं माने यांनी म्हंटल.

LinkedIn | LinkedIn चे सह-संस्थापक रीड हॉफमन यांची भविष्यवाणी; 2034 पर्यंत 9 ते 5 ची नोकरी होणार कालबाह्य

LinkedIn

LinkedIn | लिंक्डइन हे एक खूप मोठे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मवर आपल्याला अनेक नोकरीच्या संधी मिळतात. अशातच आता लिंक्डइनचे सहसंस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष रीड गॅजेट हॉफमन यांनी भविष्यासाठी एक मोठी घोषणा केलेली आहे. त्यांनी सांगितले आहे की 2034 पर्यंत 9 ते 5 या वेळेतील नोकरी या कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल कर्मचारी करतील. त्यांनी केलेल्या धक्कादायक विधानामुळे आता सर्वत्र खळबळ उडाली आहे. यापूर्वी त्यांनी जे काही अंदाज बांधलेले होते. ते खरे ठरलेले आहेत. त्यामुळे आता त्यांनी केलेल्या या विधानानंतर सगळीकडे खळबळ माजली आहे. आणि सगळेजण गांभीर्याने विचार करत आहे.

हॉफमन (LinkedIn) यांनी 1997 मध्ये सोशल मीडियाचा अंदाज वर्तवला होता. त्याचप्रमाणे सोशल मीडियामुळे जगातील सर्व नेटवर्क देखील बदलणार आहेत. ते देखील भाकीत यांनी केले होते. त्यानंतर त्यांनी AI क्रांतीचा घटक असणाऱ्या चार्ट जीटीपी बद्दल देखील त्यांचे विचार मांडलेले होते. आणि त्यांनी मांडलेले हे विचाराशी सगळे तंतोतंत खरे झालेले आहेत. त्यामुळे त्यांनी केलेल्या या अंदाजाबाबत सगळेच जण गंभीरपणे विचार करत आहे. त्यांनी केलेल्या अंदाजानुसार एका दशकात 50% कर्मचारी फ्रीलान्सर असतील आणि बाकीचे कर्मचारी AI च्या माध्यमातून जास्त काम करतील.

त्याचप्रमाणे लवकरच रिझ्युमे ही संकल्पना देखील नष्ट होणार आहे. त्यांचा कर्मचाऱ्यांचा ऑनलाईन पोर्टफोलिओ हा त्यांचा नवीन सीवी असेल, असे देखील त्यांनी सांगितलेले आहे. त्याचप्रमाणे कंपन्या त्यांच्या डिगऱ्या किंवा जॉब या टायटलच्या आधारे नाही,Bतर स्किल्सनुसार कर्मचाऱ्यांना देतील, असे देखील त्यांनी सांगितलेले आहे.

टीम इंडियात सुनील नारायणची एन्ट्री?? गंभीर मोठा डाव टाकणार

gautam gambhir (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर आपल्या पहिल्याच सिरीजमध्ये गौतम गंभीर (Gautam Gambhir) मोठा डाव टाकण्याची शक्यता आहे. आयपीएल मध्ये अष्टपैलू खेळाडू सुनील नारायणला सलामीला पाठवून गौतम गंभीरने नवी खेळी केली होती आणि नारायणने सुद्धा पहिल्या चेंडूपासून चौकार षटकार मारत समोरच्या गोलंदाजाला बॅकफूटवर ढकलण्याचे काम केलं होतं. गंभीर आता भारतीय संघात सुद्धा हाच बदल करण्याची शक्यता आहे. कोलकाता नाईट रायडर्ससाठी जे काम सुनील नारायण करायचा तेच काम आता भारतीय संघासाठी वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) करताना दिसू शकेल.

मीडिया रिपोर्ट्स नुसार, गौतम गंभीरने वॉशिंग्टन सुंदरला हार्ड हिटिंगची भूमिका दिली आहे. वॉशिंग्टन सुंदरला सलग दोन सत्रात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करायला लावली आहे. महत्वाची बाब म्हणजे या दोन्ही सरावा दरम्यान वॉशिंग्टन सुंदरने फक्त चौकार आणि षटकारांचा सराव केला आहे. हे पाहता टॉप ऑर्डरमध्ये वॉशिंग्टन सुंदर पिंच हिटरची भूमिका बजावू शकतो, असा अंदाज लावला जाऊ शकतो. असं झाल्यास गौतम गंभीरने खेळलेला हा सर्वात मोठा मास्टरस्ट्रोक म्हणता येईल.

सुनील नारायण प्रमाणे वॉशिंग्टन सुंदर सलामीला आला तर यशस्वी जैस्वालला बाहेर बसावं लागू शकते. कारण दुसरा सलामीवीर शुभमन गिल हा उपकर्णधार आहे त्यामुळे त्याला बाहेर बसवलं जाण्याची शक्यता अजिबात नाही. त्यामुळे गौतम गंभीरचा फॉर्म्युला अंमलात आणला तर गिल आणि सुंदरची जोडी ओपनिंग करताना दिसू शकते. उद्या श्रीलंकेविरुद्व भारताचा पहिला T20 सामना असून दोन्ही संघ विजयासाठी उत्सुक आहेत. पल्लेकेले येथील स्टेडियमवर हा सामना आयोजित करण्यात आला असून रात्री ७ वाजता सामन्याला सुरुवात होईल. सूर्यकुमार यादव फुल्ल टाइम टीम इंडियाचा T20 कर्णधार झाल्यानंतर आणि गौतम गंभीर प्रशिक्षक झाल्यानंतर भारताचा हा पहिलाच दौरा आहे.

Railway News : गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना पश्चिम रेल्वेची भेट ! 6 विशेष गाड्यांचे नियोजन

Railway News : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. कोकणात तर हा सण मोठ्या प्रमाणात साजरा होतो. यानिमित्ताने राज्याच्या कानाकोपऱ्यात वसलेला कोकणवासी आवर्जून आपल्या घराकडे परतत असतो. त्यामुळे महिनाभर आधी रेल्वे आणि एसटीचे बुकिंग सुरु केले जाते. तरीदेखील रेल्वे गाडयांना गर्दी होतेच. अगदी हीच बाब लक्षात घेऊन मध्य रेल्वे सोबत पश्चिम रेल्वेने सुद्धा गणेशोत्सवासाठी जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वेकडून याबाबत वेळापत्रक देखील जारी करण्यात आले आहे. चला पाहुयात (Railway News) कोणत्या गाड्या या काळात धावणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गणेशोत्सवा दरम्यान ट्रेनच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मुंबई सेंट्रल ठोकूर, मुंबई सेंट्रल सावंतवाडी रोड, वांद्रे टर्मिनस कुडाळ ,अहमदाबाद कुडाळ, विश्वमित्र कुडाळ आणि अहमदाबाद मंगळुरू स्थानका दरम्यान विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळणार (Railway News) आहे.

बुकिंग कधीपासून ?

गाडी क्रमांक 09001, 09009,09015, 09412, 09150 आणि 09424 यांसाठी 28 जुलै 2024 पासून सर्व PRS काउंटर आणि IRCTC वेबसाइटवर बुकिंग सुरू होणार आहे. तुम्ही IRCTC चाय वेसाईट्वर जाऊन गाड्यांसाठी (Railway News) बुकिंग करू शकता.

काय आहे वेळापत्रक ?

मुंबई सेंट्रल – सावंतवाडी रोड

ट्रेन क्रमांक 09009 मुंबई सेंट्रल – सावंतवाडी रोड स्पेशल या गाडीच्या २६ फेऱ्या होणार असून ही गाडी बोरिवली, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, या ठिकाणी दोन्ही दिशेने थांबेल. कनकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ स्थानकावर (Railway News) थांबेल.

ही गाडी मुंबई सेंट्रल येथून दररोज (मंगळवार वगळता) 12.00 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 02.30 वाजता सावंतवाडी रोडला पोहोचेल. ही ट्रेन 2 ते 16 सप्टेंबर 2024 दरम्यान धावणार. ट्रेन क्रमांक 09010 सावंतवाडी रोड – मुंबई सेंट्रल स्पेशल सावंतवाडी रोडवरून दररोज (बुधवार वगळता) 04.50 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 20.10 वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल. ही ट्रेन 3 ते 17 सप्टेंबर 2024 दरम्यान (Railway News) धावणार आहे.

मुंबई सेंट्रल – ठाकूर साप्ताहिक (Railway News)

मुंबई सेंट्रल – ठाकूर साप्ताहिक स्पेशल ही गाडी बोरिवली, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी येथे दोन्ही दिशेने धावेल. , मडगाव, कारवार, गोकर्ण रोड, कुमटा, मुर्डेश्वर, मुकांबी रोड बयंदूर, कुंधापुरा, उडुपी, मुल्की आणि सुरतकल स्टेशनवर (Railway News) थांबेल

ही गाडी दर मंगळवारी मुंबई सेंट्रलवरून 12.00 वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी 08.50 वाजता ठाकूरला पोहोचेल. ही ट्रेन 03 ते 17 सप्टेंबर 2024 पर्यंत धावेल. त्याचप्रमाणे ट्रेन क्रमांक ०९००२ ठाकुर – मुंबई सेंट्रल साप्ताहिक स्पेशल ही ठाकुर येथून दर बुधवारी रात्री ११.०० वाजता सुटेल आणि मुंबई सेंट्रलला दुसऱ्या दिवशी ०७.०५ वाजता पोहोचेल. ही ट्रेन 04 ते 18 सप्टेंबर 2024 पर्यंत धावणार (Railway News) आहे.

Ujani Dam | केवळ 54 दिवसात उजनी धरण मृत साठ्यातून जिवंत साठ्यात; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

Ujani Dam

Ujani Dam | गेल्या आठवड्याभरापासून संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडत आहेत. अनेक नदी, नाले, धरणे ओसांडून वाहताना दिसत आहे. अशातच सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी असणारे महत्त्वाचे असे धरण उजनी धरण (Ujani Dam) हे चांगलेच भरलेले आहे. आज सकाळी 9 वाजता या धरणाने शून्य पातळी ओलांडलेली आहे. केवळ 54 दिवसात हे उजनी धरण मृत साठ्यातून जिवंत साठ्यात आलेले दिसत आहे. 54 दिवसात या धरणांमध्ये तब्बल 33 टीएमसी पाणी आलेले आहे. त्याचप्रमाणे हा पाऊस जर असाच सुरू राहिला तर पुढील पाच दिवसात हे धरण 100% भरण्याची शक्यता आहे.

पुणे जिल्ह्यातील उजनी धरणामध्ये (Ujani Dam)गेल्या दोन-तीन दिवसापासून चांगलाच पाऊस चालू आहे. त्यामुळे या धरणातील पाणीसाठ्यात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसत आहे. त्यामुळे हा पाणीसाठा आता मायनसमधून प्लसमध्ये गेलेला दिसत आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने हे धरण अतिशय महत्त्वाचे आहे. धरणामध्ये पाणी साठल्याने शेतकऱ्यांना देखील चांगलाच आनंद झालेला आहे.

उजनी धरणात 1 लाख 60 हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरु | Ujani Dam

केवळ 54 दिवसात उजनी धरण (Ujani Dam) हे पुन्हा मृत साठ्यातून जिवंत साठ्यात आलेले आहे. सध्या उजनी धरणात एक लाख 60 हजार होत आहे. त्याचप्रमाणे पाऊस सुरू राहील दुपारपर्यंत ही आवक 2 लाख पर्यंत वाढणार आहे. त्याचप्रमाणे आज रात्रीपर्यंत तर पाऊस वाढला तर हा साठा २५% जिवंत साठ्यात पोहोचणार आहेत. त्याचप्रमाणे पुढील चार-पाच दिवस पाऊस राहिला तर उजनी धरण हे 100 टक्के भरणार आहे. अशी माहिती समोर आलेली आहे.

गेल्या वर्षी भीषण पाणीटंचाई होती. त्यामुळे उजनी धरणाची नीचांक पातळी ही – 60% एवढी झाली होती. परंतु जून महिना सुरू होताच, पावसाने सुरुवात केली आणि गेल्या चार दिवसातच या पावसाने चांगला पाणीसाठा जमा केलेला. उद्या सकाळपर्यंत हे धरण 25 टक्के पाणीसाठा ओलांडणार आहे. त्याचप्रमाणे मुळा, मुठा, इंद्रायणी आणि भीमा या नद्यांमधून मोठा विसर्ग देखील उजनी धरणाकडे येत आहे.