Sunday, December 28, 2025
Home Blog Page 5738

दिल्लीत IRS अधिकाऱ्याची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या 

नवी दिल्ली । दिल्लीतील चाणक्यपुरी परिसरात एका आयआरएस अधिकाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आपल्या निवासस्थानी छताच्या पंख्याला गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली आहे. ते १९८८ च्या बॅचचे भारतीय रिव्हेन्यू अधिकारी होते. या अधिकाऱ्यांचे नाव केशव सक्सेना असे होते. जे भारतीय आयकर विभागात प्रधान आयुक्त म्हणून काम करत होते. त्यांचे वय ५७ वर्षे होते.

नवी दिल्लीतील उच्च परिसर चाणक्यपुरी येथे बापू धामचे ते रहिवासी होते. त्यांनी त्यांच्या स्टडी रूम मधील फॅनला बेडशीट ने गळफास लावून घेतला आहे. मृताच्या शरीरावर अस्थिबंधन चित्र सापडले आहे. अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. सकाळी ७ वाजता त्यांच्या पत्नीच्या हे निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ चाणक्यपुरी परिसरातील रुग्णालयात नेण्यात आले मात्र तिथे डॉक्टरनी ते मृत झाल्याची घोषणा केली आहे.

 

अधिकाऱ्यांनी आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ज्या खोलीत त्यांनी आत्महत्या केली आहे. त्या खोलीत एक सुसाईड नोट सापडली आहे. त्यावर पोलीस अद्याप तपास करीत आहेत. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

पीयूषजी घाणेरडं राजकारण आणि मनाचे खेळ थांबवा! नवाब मालिकांचा रेल्वेमंत्र्यांना सल्ला

मुंबई । श्रमिक रेल्वे गाड्या सोडण्यावरून केंद्र आणि राज्य सरकार आमने-सामने आले आहेत. विशेष श्रमिक रेल्वेगाड्या सोडण्यावरून राज्य आणि रेल्वेमंत्री यांच्यातील सुरू झालेला वाद अद्यापही थांबलेला नाही. राज्याला आवश्यक तितक्या गाड्या उपलब्ध करून देण्याचं आश्वासन रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिलं होतं. त्यानंतर त्यांच्याकडून मजुरांविषयीची आवश्यक माहिती विचारली जात आहे. या सगळ्या वादात प्रशासकीय गोंधळ निर्माण झाला असल्याचं समोर येत आहे.

पीयूष गोयल यांच्याकडून सातत्यानं राज्य सरकारकडं विचारणा करणारे ट्विट होत असून रेल्वेमंत्र्यांचे यांचे ट्विटमधील दावे आणि वास्तविक स्थिती यात अंतर असल्याच्या मुद्द्यावरून राज्य सरकार आणि रेल्वेमंत्र्यांमध्ये खटके उडत आहेत. अशावेळी राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी ‘हे घाणेरडं राजकारण आणि तुमच्या मनाचे खेळ थांबवण्याचं आवाहन गोयल यांना केलं आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी राजकारण थांबवण्याचं आवाहन केलं आह

“मागील दोन दिवसांपासून रेल्वेमंत्री राजकारण करत आहेत. मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसवरून (एलटीटी) ४९ रेल्वे गाड्या सोडण्यात येतील, असं त्यांनी सांगितलं होतं. दुसरीकडे विभागीय रेल्वे व्यवस्थापक सांगत आहेत की, १६ गाड्यांपेक्षा जास्त गाड्या आम्ही सोडू शकत नाही. ४९ गाड्यांच्या हिशोबानं तिथे प्रवासी जमा झाले आणि रेल्वे प्रशासन गाड्या सोडण्यासाठी तयार नाही.

आम्हाला वाटतं रेल्वेमंत्री पीयूष गोयल, रेल्वे विभाग आणि केंद्र सरकार जाणूनबजून राजकारण करत आहे. हे योग्य नाही. ‘एलटीटी’वर जी परिस्थिती निर्माण झाली, त्याला पीयूष गोयल जबाबदार आहेत. ४९ रेल्वे तुम्ही सोडणार होतात. त्या सोडा. प्रवासी येऊन उभे आहेत, गर्दी वाढत आहे. जी परिस्थिती निर्माण होत आहे, त्याची जबाबदारी पीयूष गोयल यांची आहे. त्यांनी घाणेरडं राजकारण आणि मनाचे खेळ थांबवावेत,” अशी टीका नवाब मलिक यांनी केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

मोठी बातमी! टी -२० विश्वचषक २०२२ मध्ये जाण्याची शक्यता

वृत्तसंस्था । आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या सर्व उच्चधिकाऱ्यांची आज टेलीकॉन्फरन्स वर मिटिंग झाली आहे. या मीटिंगमध्ये यावर्षी होणारा टी -२० विश्वचषक २०२२ मध्ये जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सर्वत्र असणाऱ्या कोरोनाच्या वातावरणामुळे जर या निर्णयाचे औपचारिकरण झाले तर येत्या काही महिन्यात सभासदांना त्यांची ब्लु प्रिंट पाठवता येणार आहे. गुरुवारी होणाऱ्या बोर्ड मीटिंगमध्ये विश्वचषक २०२२ मध्ये जाण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता आहे. आयसीसी च्या एका सभासदाकडून ही माहिती मिळाली आहे. त्यांनी आपले नाव जाहीर न करण्यास सांगितले आहे.

कोरोनाच्या या स्थितीत हा चषक होण्याची फारच कमी शक्यता आहे. १५ मे ला आयसीसी च्या इव्हेंट्स समितीने अनेक पर्याय सांगितले आहेत. ज्यामध्ये ऑस्ट्रेलिया ही स्पर्धा ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२२ मध्ये नेण्याची शक्यता आहे. तर भारत २०२१ मध्ये स्पर्धेचे आयोजन करण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार भारत ऑस्ट्रेलिया मध्ये सामन्यासाठी जाणार आहेच तसेच इंग्लंड हि भारतात सामन्यांसाठी येणार आहे. आफ्रिका टी -२० मालिकेचा केवळ प्रश्न आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार टी -२० विश्वचषक पुढे जाण्याची शक्यता दाट आहे. जगभरातील या परिस्थितीत पुढचे काही दिवस कोणतेच सामने होण्याची शक्यता नाही आता मात्र प्रत्यक्ष घोषणा झाल्याशिवाय काहीच नक्की होणार नाही. आयसीसी बोर्ड देखील भारतातील २०२१ मधील वर्ल्ड टी २० करमुक्त करण्याच्या मुद्दय़ावर चर्चा करणार आहे. सरकारकडून स्पष्ट चित्र मिळावे यासाठी लॉकडाऊनमुळे बीसीसीआयने अधिक वेळ मागितला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

लॉकडाउन मध्ये सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या किमती घसरल्या; जाणून घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशांतर्गत बाजारात सलग तिसर्‍या दिवशी सोने खरेदी करणे स्वस्त झाले आहे. मे महिन्यात सोने विक्रमीवर पातळी ४७,९८० रुपयांपर्यंत पोहोचल्यानंतर आता स्थानिक बाजारात सोन्याची घसरण ४६,७९९ रुपये झाली आहे. यापूर्वी मंगळवारी २४ कॅरेट सोन्याचा म्हणजेच गोल्ड ९९९ ची किंमत शुक्रवारपेक्षा ३०१ रुपयांनी स्वस्त झाली होती. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनची वेबसाइट (ibjarates.com) त्यांची सरासरी किंमत अपडेट करत असते.

सोने स्वस्त का झाले ? तज्ञांचे असे म्हणणे आहे की, बर्‍याच देशांमध्ये व्यवसाय पुन्हा सुरू झाले आहेत. म्हणूनच स्टॉक मार्केटमध्ये पुन्हा हालचाल दिसू लागली आहे. त्यामुळे सोन्याकडे गुंतवणूकदारांचा कल कमी झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव प्रति औंस १७१० डॉलरवर गेले आहेत. ही गेल्या दोन आठवड्यांतील सर्वात नीचांकी पातळी आहे.

आता काय चालले आहे ?
जर संपूर्ण जगातील रिसर्च रिपोर्टवर आपला विश्वास असेल तर पुढील काही महिन्यांतही सोन्यातील गुंतवणूक ही सुरूच राहील. अशा परिस्थितीत सोन्याच्या किंमती प्रति १० ग्रॅम ५४,००० च्या पातळीवर पोहोचू शकतात.

लग्नासाठी दागिने खरेदी करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
आपण जर दागदागिने खरेदी करणार असाल तर आम्ही तुम्हांला सांगतो की, जेव्हा आपण खडे असलेले दागिने खरेदी करतो. तेव्हा या प्रकरणात, काही बेईमान ज्वेलर्स संपूर्ण खड्यांचे देखील वजन करतात आणि सोन्याच्या किंमतीसह त्याची किंमत जोडतात. म्हणजेच सोन्याच्या किंमतीच्या बरोबरीने त्यांची किंमत लावली जाते. सामान्यतः परत विकताना या खड्यांचे वजन आणि अशुद्धता मूळ किंमतीतून कमी केली जाते.

(१) सोन्याच्या शुद्धतेनुसार सोन्याचे दागिने वेगवेगळ्या कॅरेटमध्ये येतात. कॅरेट हे सोन्याच्या शुद्धतेचे मापन आहे. सर्वात शुद्ध सोने २४ कॅरेटचे असते. दागिने सहसा २२ कॅरेटमध्ये येतात. यात ९१.६ टक्के सोने आहे.

(२) सोन्याच्या दागिन्यांची किंमत दोन गोष्टींवर अवलंबून असते. पहिले हे की दागिन्यांमध्ये सोन्याचा वाटा २२ कॅरेट आहे की १८ कॅरेट. त्यानंतर सोन्यामध्ये कोणता धातूंचे मिश्रण असणार आहे.

(३) आपण कोणत्या डिझाईनचे दागिने खरेदी करणार यावर शुल्क आकारणे अवलंबून आहे. याचे कारण असे आहे की, प्रत्येक दागिन्यांच्या कट आणि फिनिशिंगसाठी वेगवेगळी स्टाईल वापरली जाते.

(४) हॉलमार्किंग बीआयएस मानक हॉलमार्क सोन्याचे दागिने प्रमाणित करण्यासाठी केली जाते. हे भारतीय मानक ब्यूरोने (बीआयएस) जरी केले आहे. दागदागिने खरेदी करताना आपण हे पाहिलेच पाहिजे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

पृथ्वीराज चव्हाणांनी केली फडणवीसांच्या मदतीच्या आकडेवारीची ‘अशी’ पोलखोल, म्हणाले..

सातारा । महाराष्ट्र सरकारला केंद्र सरकारकडून २ लाख कोटी मिळाल्याच्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्याची राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पोलखोल केली आहे. ‘केंद्र सरकारनं महाराष्ट्राला २ लाख ७० हजार कोटी रुपये दिल्याचा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा दावा फसवा आहे. केंद्र सरकारचे आर्थिक पॅकेज हे कर्जाधारित असून त्यात अनेक अटी व शर्ती आहेत. त्यामुळं फडणवीसांनी कर्ज किती आणि रोख रक्कम किती याची स्वतंत्र आकडेवारी द्यावी,’ असं आव्हान पृथ्वीराज चव्हाण यांनी फडणवीसांना दिलं आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटला एक पत्रक शेअर केला आहे. त्यामधून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्यावर टीका केली असून काही मुद्दे मांडले आहेत.

महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून सुमारे २ लाख ७० हजार कोटी रुपये मिळाले, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तसंच त्यांनी विविध योजनेअंतर्गत महाराष्ट्राच्या वाट्याला येणाऱ्या रकमेचे विवरण दिले. यामध्ये त्यांनी एक गोष्ट भासवण्याचा प्रयत्न केला आहे, की महाराष्ट्राच्या वाट्याचे सगळेच पैसे थेट राज्य सरकारच्या तिजोरीत येणार आहेत. पण मी आधीच सांगितल्याप्रमाणे विविध जागतिक वित्तीय संस्थांच्या विश्लेषणानुसार केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये फक्त दोन लाख कोटी रुपये ही रोख रक्कम आहे. उर्वरित १९ लाख कोटी हे कर्जाच्या स्वरुपातील मॉनेटरी स्टीम्युलस आहे. हे पाहता महाराष्ट्राच्या वाट्याला त्या दोन लाखापैकी जास्तीत जास्त २० हजार कोटी रुपये रोख रक्कम मिळू शकते, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकात म्हटलं आहे.

महाराष्ट्राच्या वार्षिक उत्पन्नाच्या ५ टक्के रक्कम रिझर्व्ह बँक उपलब्ध करून देणार असून ही रक्कम १ लाख ६० हजार कोटी आहे, असं फडणवीसांचं म्हणणं आहे. हे साफ खोटं आहे. जीएसडीपीच्या ३ टक्के रक्कम आरबीआयकडून घेण्याची परवानगी राज्यांना आधीपासूनच होती. ती आता २ टक्क्यांनी वाढवली असली तरी त्यातील फक्त अर्धा टक्के म्हणजेच १५ ते १६ हजार कोटी तातडीनं मिळू शकतात. उर्वरीत दीड टक्के (सुमारे ४५ हजार कोटी) रकमेसाठी अनेक अटी घालण्यात आल्या आहेत,’ असंही चव्हाण यांनी निदर्शनास आणून दिलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

चिंताजनक! मागील २४ तासांत ७५ पोलीस कोरोनाबाधित

मुंबई । राज्यावरील कोरोना संकट दिवसेंदिवस अधिकच गहिरं होत चाललं आहे. आरोग्य यंत्रणेबरोबरच महाराष्ट्र पोलीस दलाला या विषाणूनं विळखा घातला आहे. गेल्या २४ तासांत राज्यातील ७५ पोलीस कर्मचारी करोनाबाधित असल्याचं निदान झालं आहे. त्यामुळं महाराष्ट्र पोलीस दलातील करोनाबाधित कर्मचारी-अधिकाऱ्यांची संख्या १९६४ झाली आहे. तर पोलीस दलातील मृत्यूची संख्या २०वर पोहोचली आहे. कोरोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यांपैकी ८४९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर १०९५ पोलिसांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत, अशी माहिती राज्य पोलीस दलाकडून देण्यात आली.

कोरोनाबाधितांमध्ये राज्यातील २२३ पोलीस अधिकारी आहेत. तर १७४१ कर्मचारी आहेत. अद्याप १५५ अधिकारी आणि ९४० पोलीस कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत. ६७ पोलीस अधिकारी हे या आजारातून बरे झाले आहेत. ७८२ पोलीस कर्मचारी कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत एका अधिकाऱ्यासह १९ पोलीस कर्मचाऱ्यांचा करोनाच्या संसर्गाने मृत्यू झाला आहे. त्यात मुंबई पोलीस दलातील मृत्यूची संख्या सर्वाधिक आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

त्या पाकिस्तानी कबुतराने भारतात अंडी घातली तर त्यांना इथले नागरिकत्व देणार का? – चेतन भगत 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानात हेरगिरीचे प्रशिक्षण देऊन भारतात पाठविण्यात आलेले एक कबुतर जम्मू काश्मीरच्या कथुआ जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर एका काश्मिरी नागरिकाने पकडले असल्याची घटना घडली आहे. या प्रकरणावर प्रसिद्ध लेखक चेतन भगत व्यक्त झाले आहेत. यावर बोलत असताना जर या कबुतराने भारतात अंडी घातली तर तिच्या पिलांना आपण भारतीय नागरिकत्व देणार का असा मिश्किल सवाल त्यांनी केला आहे.

“हे कबुतर खरंच हेरगिरी करत होतं का? जर हे खरं असेल तर ते कोणाला रिपोर्टिंग करायचं? जर या पाकिस्तानी कबुतराने भारतात अंडी दिली तर त्याच्या पिल्लांना भारतीय नागरिकत्व देणार का? हे कबुतर CAAच्या कायद्याखाली नागरिकत्वाची मागणी करु शकतं का? तो काही तरी म्हणाला असेल? आपण या प्रकरणाच्या खोलाशी जाऊन चौकशी करायला हवी.” अशा आशयाचं ट्विट चेतन भगतने केली आहे. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.  हे संशयित कबुतर हिरानगर परिसरातील मयनारी गावातील नागरिकाने पकडले आहे.

हे कबुतर सांकेतिक भाषेत काही संकेत घेऊन जात असल्याचे सांगण्यात आले आहे. कबुतराच्या एका पायाला काहीतरी बांधण्यात आले होते. ज्यावर काही क्रमांक लिहिले होते. या सांकेतिक भाषेचा अर्थ लावण्याचा प्रयत्न संबंधित अधिकारी करीत आहेत. चेतन भगत यांनी मात्र या विषयावर आपले मिश्किल मत व्यक्त केले आहे. पूर्वीच्या काळी कबुतर संदेश पोहोचविण्याचे काम करत होते. त्यामुळे यामध्ये तथ्य असण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

चीनच्या हालचालींचा वेग वाढला, सीमेवर लढाऊ विमाने तैनात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लडाखच्या सीमेवर भारताने रस्ता बांधण्याचे काम सुरु केल्यापासून चीनने सीमेवर आक्रमक हालचाली सुरु केल्याचे दिसून येते आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही देशातील सीमेवर तणावपूर्ण वातावरण आहे. आधी सिक्कीम, मग लडाख आणि आता उत्तराखंड अशा प्रकारे चीन आपले सैन्य सर्वत्र वाढवित असल्याचे दिसून येते आहे. त्यातच आता लडाखजवळील विमानतळावर बांधकाम सुरु झाले असून तिथे धावपट्टी तयार केली जात असल्याचे सॅटेलाईटच्या प्रतिमामधून दिसत आहे. मे च्या सुरुवातीला प्रथम भारत आणि चीनचे सैन्य आमनेसामने आले होते. वादानंतर दोन्हीकडून अतिरिक्त सैन्य तैनात केले जात आहे.

डेट्रेस्फान (detrefsa_) ने तिबेटमधील नगरी गुन्सा विमानतळावरील २  फोटो काढले आहेत. एक ६ एप्रिल २०२० चा आहे तर दुसरा २१ मी २०२० चा आहे. मागच्या महिन्यात एकच धावपट्टी होती मात्र आता दुसऱ्या धावपट्टीचे काम वेगाने सुरु असल्याचे दिसून येत आहे. तिसऱ्या आणखी एका फोटोत या धावपट्टीशेजारी असणारी लढाऊ विमाने स्पष्टपणे दिसत असून ही धावपट्टी या विमानांसाठी असल्याचे सांगितले जात आहे. चीनी सैन्याची ४ विमाने इथे तैनात करण्यात आली आहेत. ही विमाने जे-११ किंवा जे-१७ असू शकण्याचा अंदाज आहे. जे-११ आणि जे-१७ यांची बनावट रशियाच्या सुखोई -२७ सारखी आहे तर भारतीय हवाई दलाचा विचार केल्यास जे-११ आणि जे-१७ ची तुलना सुखोई -३० एमकेआय सोबत होऊ शकते.

डिसेंबर २०१९ मध्ये पहिल्यांदा हि विमाने इथे तैनात करण्यात आली होती. आता ती स्पष्टपणे दिसून येतात. या विमानतळाचे वैशिष्ट्य म्हणजे हे जगातील सर्वाधिक उंच विमानतळ मानले जाते. हे समुद्रसपाटीपासून तब्बल १४ हजार २२ फूट आहे. याचा नागरी उड्डाणासाठी वापर होतोच पण सैनिकी कारवायांसाठी हे विमानतळ प्रसिद्ध आहे. भारतावर इतक्या सहज चीनला हल्ला करता येणार नसला तरी युद्धाची चिन्हे दिसून येत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

क्राईम पेट्रोल फेम अभिनेत्रीची इंस्टाग्राम वर पोस्ट टाकून आत्महत्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनोरंजन क्षेत्र प्रचंड चमक असणारे क्षेत्र आहे असे म्हणतात. भले भले यामध्ये गुंतून जातात आणि जेव्हा वास्तवाचे भान होते तेव्हा निराश होतात. अभिनय क्षेत्रात आपले नशीब अजमावायला मुंबईत आलेली अभिनेत्री प्रेक्षा मेहता हिच्यासोबत असेच काहीसे झाल्याचे प्रथमदर्शनी वाटते आहे. कोरोनामुळे इंदौर ला आपल्या आईवडिलांकडे काही दिवसांसाठी गेलेल्या प्रेक्षाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. यामागचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.

https://www.instagram.com/p/CAe5DhIlnSI/?utm_source=ig_web_copy_link

आपल्या सोशल इंस्टाग्राम अकॉउंट वर मृत्यूच्या रात्री तिने एक स्टोरी पोस्ट केली आहे ज्यामध्ये ती म्हणते आहे, “सगळ्यात वाईट असते माणसाची स्वप्ने मरून जाणे” तिच्या या स्टेट्सवरून ती नैराश्यात होती असे दिसून येते. गेले काही दिवस  ती काम मिळत नसल्याने नैराश्यात होती हे तिच्या एकूण वागण्यावरून दिसत होते. या नैराश्यातच तिने आत्महत्या केली असल्याचे तिच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे.

https://www.instagram.com/p/B9joQ0zFbxL/?utm_source=ig_web_copy_link

सोमवारी रात्री ती सर्वांशी बोलून तिच्या खोलीत गेली काहीवेळ तिचा मोबाईल वापरत होती. सकाळी जेव्हा तिचे वडील तिच्या खोलीत गेले तेव्हा तिने गळफास लावल्याचे निदर्शनास आले. तिला तातडीने दवाखान्यात नेले असता तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्तरांनी सांगितले. मुंबईतील संचारबंदीमुळे ती आपल्या गावी आई-वडिलांकडे गेली होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

आणि त्याने चक्क किंग कोब्राला घातली अंघोळ! पहा व्हिडीओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मे महिना संपत आला आहे. तसा उन्हाचा तडाखाही वाढतो आहे. वातावरणात सर्वत्र उष्मा आहे. अशावेळी डोक्यावरून थंड पाण्याची अंघोळ कुणाला आवडणार नाही. अर्थात कोणत्याही प्राण्याला, पक्ष्याला कडक उन्हात थंड पाण्याची अंघोळ नक्कीच आवडेल. आपण फारतर कुत्र्यांना अंघोळ घालतो. पण कुणी चक्क किंग कोब्राला अंघोळ घातल्याचे ऐकिवात नसेल. असाच एक थक्क करणारा व्हिडीओ समोर आला आहे. ओडिसा येथील वनाधिकारी सुसंथ नंदा यांनी त्यांच्या ट्विटर वरून हा व्हिडीओ शेअर ज्यामध्ये एक मनुष्य चक्क एका भल्यामोठ्या किंग कोब्राला अंघोळ घालतो आहे.

हा व्हिडीओ याआधीही व्हायरल झाला आहे. किंग कोब्रा हा सापांच्या विषारी जातींपैकी एक जात आहे. ज्याच्या दंशाने मनुष्याचा मृत्यू होण्याच्याच शक्यता सर्वाधिक असतात. मात्र या व्हिडिओत हा भयानक वाटणारा किंग कोब्रा अत्यंत शांतपणे, कोणत्याही रागाशिवाय पाणी घालून घेतो आहे असे दिसते आहे. हे दिसायला सुंदर असले तरी घातक असू शकते त्यामुळे तुम्ही प्रयत्न करू नका असेही नंदा यांनी हा व्हिडीओ शेअर करताना म्हंटले आहे. अनेकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

भारतामध्ये जंगलात अनेक विषारी सापांच्या जाती आढळतात. किंग कोब्रा हा विषारी जातीतील सर्वज्ञात साप आहे. मनुष्यवस्तीपासून दूर  दाट जंगलात राहणे हा जास्त पसंद करतो. काही मर्यादित काळापुरतेच सहचारी जीवन जगतो. याच्या विषाने मनुष्य अर्ध्या तासात मारू शकतो. हा इतर सापांना देखील खातो. भारतात दक्षिण व पूर्व जंगलात हा सापडतो. या व्हिडिओवर अनेकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”