Sunday, December 28, 2025
Home Blog Page 5739

साताऱ्यात कोरोनाची दहशत सुरुच, 12 तासांत जिल्ह्यात वाढले तब्बल 58 रुग्ण

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सातारा जिल्ह्याला आज पुन्हा मोठा झटका बसला आहे. मागील १२ तासात तब्बल ५८ नवीन कोरोनाग्रस्तांची वाढ झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. तसेच कोरोनामुळे २ मृत्यूंचीही नोंद झालेली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक आमोद गडीकर यांनी दिली आहे.

आज बुधवारी सकाळी सातारा जिल्ह्यातील विविध कोरोना केअर सेंटर, उपजिल्हा रुग्णालय येथे अनुमानित म्हणून भरती असलेल्या 52 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली. तर उशिरा जिल्ह्यात ५ नवीन सापडल्याचे होते.

तसेच वाई तालुक्यातील असले येथील मुंबई वरून आलेला मधुमेह असलेला 67 वर्षीय कोविड बाधित रुग्ण याचे निधन झाले आहे आणि जांभेकरवाडी ता. पाटण येथील 70 वर्षीय बाधित महिलेचाही मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक गडीकर यांनी दिली आहे.

दरम्यान ताज्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता ३९४ वर पोहोचली आहे. साताऱ्यातील ११ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला असून सध्या जिल्ह्यातील २५५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जिल्ह्यातील १२६ जण कोरोनाच्या आजारातून सुखरुपपणे बरे झाले आहेत.

तालुकानिहाय कोरोना बाधित

माण तालुका- म्हसवड-1, तोंडले-1, भालवडी-1 व लोधवडे-2
सातारा तालुका- जिमनवाडी 2, खडगाव-1, कुस बुद्रुक 1
वाई तालुका- आकोशी-1, आसले-1, मालदपूर 1, देगाव-1 सिद्धनाथवाडी-1 व धयाट-1
पाटण तालुका -धामणी-4, गलमेवाडी 1, मन्याचीवाडी 1, मोरगिरी 2, आडदेव 1, नवारस्ता 1, सदुवरपेवाडी 2,
जांभेकरवाडी 1 (मृत्यु)
खंडाळा तालुका- अंधोटी 2, घाटदरे 1 व पारगाव 7
जावळी – सावरी 3, केळघर 2
महाबळेश्वर तालुका- कासरुड 3, देवळी 3 गोळेवाडी 1
कराड तालुका- खरोड 2, म्हासोली 1, वाजरवाडी 1, उंब्रज 1
फलटण तालुका सस्तेवाडी 1
खटाव- वांझोळी 1 वरची अंभेरी 1

Satara

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

धक्कादायक !! साताऱ्यातील हिंदुस्थान फीड्स कंपनीत २०० हून अधिक मजुरांना कोंडले; घरी जाण्यासाठी मजुरांचा आक्रोश

सातारा प्रतिनिधी | योगेश जगताप

मंगळवारी रात्री सातारा एमआयडीसी येथील पशुखाद्य बनवणाऱ्या हिंदुस्थान फीड्स कंपनीत कामगार आणि सुरक्षारक्षक यांच्यात किरकोळ कारणावरुन बाचाबाची झाली. या बाचाबाचीनंतर दोन कामगारांना गंभीर जखमी केलेल्या धुमाळ (ढमाळ) आडनावाच्या सुरक्षारक्षकालाही बाकी कामगारांनी चांगलाच चोप दिला. यावेळी पोलीस प्रशासनाने आपल्या १० जणांच्या पथकासहित कंपनीतील १०० हून अधिक लोकांच्या आक्रोश करणाऱ्या समुदायाला शांत केलं. “आमच्यावर असाच अन्याय होणार असेल तर आम्हाला या ठिकाणी थांबायचं नाही” असाच पवित्रा या कामगारांनी घेतला असून बुधवारपासून काम बंद करण्याचा इशाराही दिला आहे.

वास्तव परिस्थिती काय? – दरम्यान या घटनेनंतर कामगारांच्या कंपनीतील राहणीमानाची आणि त्यांच्या समस्यांची माहिती घेतली असता धक्कादायक बाब समोर आली आहे. हिंदुस्थान फीड्समध्ये मालवाहतुकीचं काम करणाऱ्या २०० हून अधिक हमालांना मागील २ महिन्यांपासून अधिक काळ कंपनीतच राहण्यास सांगितलं आहे. हे कामगार बिहार आणि काश्मीर राज्याचे रहिवासी आहेत. लॉकडाऊन सुरु झाल्यापासून हे कामगार कंपनीमधेच राहत असून यांच्या राहण्याची, स्वच्छतेची, फिजीकल डिस्टन्सिंगची कोणतीच काळजी व्यवस्थितरित्या कंपनी प्रशासनाकडून घेण्यात आलेली नाही. कामगारांना बाहेर जाता येऊ नये म्हणून गेटवरील सुरक्षारक्षकांमार्फत दबाव टाकण्यात येत असून बऱ्याचदा मारहाणही केली जात असल्याचं मत कामगारांनी व्यक्त केलं.

कामगारांना कोंडलं ? – होय. सरकार आणि प्रशासनातर्फे मागील १५ दिवसांपासून कामगारांना त्यांच्या त्यांच्या राज्यात जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था करुन दिली जात आहे. मात्र या कंपनीतील कामगारांना रात्रंदिवस कामासाठी राबायला लावलं जात आहे. आणि घरी जायचा विषय काढला की वेळ मारुन नेली जात आहे. रामचंद्र मंडल यांच्या मते, “आम्हाला मोबाईल आणि टीव्हीवरुन मिळणाऱ्या बातम्यांतून ट्रेन,बस सुरु झाल्याचं समजतं, आमचे दुसऱ्या राज्यातील काही मित्रसुद्धा घरी जातानाचे व्हिडियो पाठवतात, पण ज्यावेळी आम्ही गावाला जायचा विषय काढतो त्यावेळी शहरात कोरोना वाढलाय, तुमच्यात एकाला झाला तर बाकीच्यांनाही त्रास होईल अशा प्रकारे घाबरवलं जातं. राकेशच्या मते, “आम्हालासुद्धा बायका-मुलं आहेत, या अडचणीच्या काळात आम्हालाही त्यांच्यासोबत असावं असं वाटतं मात्र कंपनी फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार करुन आमच्याकडून काम करुन घेत असल्याचं तो पुढे बोलताना म्हणाला.

सोशल/फिजीकल डिस्टनसिंग आणि स्वच्छतेचं काय? – लॉकडाऊन काळात कंपन्यांना जर काम सुरु ठेवायचं असेल तर कामगारांची योग्य काळजी घेण्याच्या सूचना सरकारकडून करण्यात आल्या आहेत. मात्र याठिकाणी सोशल डिस्टनसिंगचा पूर्णपणे बोजवारा उडालेला पाहायला मिळाला. एका हॉलमध्ये ५० हून अधिक लोकांची राहण्याची सोय केली गेली असून याच ठिकाणी दुकानसामानही आणून टाकण्यात आलं आहे. एवढ्या लोकांसाठी केवळ एक फॅनची सोय केली असून अनेक खाटांना तर प्लायवूडच्या फळ्याच नसल्याचं धक्कादायक चित्र समोर आलं. पाणी भरण्यासाठी दोन नळ असून या दोन्ही ठिकाणी प्रचंड दुर्गंधी पाहायला मिळाली. २०० लोकांसाठी असणाऱ्या टॉयलेट बाथरुमसाठी पाण्याचे नळसुद्धा व्यवस्थित नाहीत. संपूर्ण टॉयलेट बाथरूमचा घाण वास येत असताना अशाच परिस्थितीत राहण्याची शिक्षा या कामगारांना मागील २ महिन्यांपेक्षा अधिक काळ मिळाली आहे. आजारी पडल्यानंतर दवाखान्यात जायचं म्हटलं तरी जाऊ दिलं जात नाही असंही कामगार पुढे बोलताना म्हणाले.

मुजोरी नक्की कुणाची? – बाहेरुन आलेले लोक हे कंपनीच्या तुकड्यावर जगतायत आणि दारु पिऊन कंपनीतील मराठी लोकांना त्रास देतायत असा खोटा प्रचार मंगळवारी रात्रीच चालवण्यात आला. पोलिसांदेखत हा विषय वाढू लागल्यानंतर पोलिसांनी कामगारांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आणि बुधवारी सकाळी कंपनीत पुन्हा भेटीला येऊ असं आश्वासन दिलं. कंपनीतील माने नावाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने साताऱ्यातील एका स्थानिक चॅनेलला आमची पॉझिटिव्ह बातमी कर म्हणून कंपनीच्या गेटवरुनच वार्तांकन करायला लावलं. यात त्या बातमीदाराने कामगार मुजोरी करुन कंपनी प्रशासनाला त्रास देत असल्याची धादांत एकांगी आणि खोटी बातमी शूट केली, तेही केवळ ऐकीव माहितीवरुन. ज्याअर्थी कंपनीचे प्रोडक्शन मॅनेजर सर्व वस्तुस्थिती पाहिल्यानंतर कामगारांच्या जगण्याच्या एकूण परिस्थितीचा जाब विचारला असता निरुत्तर झाले, त्याठिकाणी केवळ फोनवरुन प्रकरणं मॅनेज कशी होऊ शकतात? कामगार वर्ग हा पैशांसाठी स्वाभिमान गहाण ठेवणार नाही हाच आक्रोश येथील प्रत्येकाच्या बोलण्यातून जाणवत होता. अशा परिस्थितीत कामगारांची स्थिती पाहण्याचं सौजन्य ना पोलिसांनी दाखवलं ना कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी. फडके नावाच्या मॅनेजरनी केवळ मी जखमींना दवाखान्यात घेऊन आलोय, बाकी आमची लोकं बघतील तिथलं काय असेल ते म्हणत फोन ठेऊन दिला. ज्या कामगारांच्या जीवावर कंपनी चालण्याची स्वप्नं बाळगली जातात त्या कामगारांशी बोलायला वेळ देण्याऐवजी परप्रांतीय विरुद्ध स्थानिक वाद रंगवण्याला काहीच अर्थ नव्हता.

पुढे काय? – प्रकाश रिशीदेव आणि जयकुमार या कामगारांना सिक्युरिटी इनचार्ज ढमाळ/धुमाळ यांच्याकडून गंभीर मारहाण झाली आहे. या मारहाणीच्या प्रत्युत्तरात सिक्युरिटी इनचार्ज सुद्धा जखमी झाले आहेत. प्रत्यक्ष घटनास्थळावर ते उपलब्ध नसल्याने (कामगारांच्या मते – त्यांनी तिथून पळ काढला) अधिक माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. प्रत्यक्ष वार्तांकन सुरु असताना कामगारांच्या निवासस्थानातील लाईट घालवण्याचा प्रकारही घडला. एकूणच या सर्व प्रकरणानंतर कामगारांच्या मनातील घरी जाण्यासाठी असलेली खदखद बाहेर आली आहे. कामगार कायद्याच्या कुठल्याच नियमांत न बसणारं काम (१२ ते १८ तासांचं) या कामगारांकडून करुन घेतलं जात असून या कामगारांनी तात्काळ घरी जाण्याची ईच्छा व्यक्त केली आहे. माध्यम प्रतिनिधींना कंपनीच्या आत डोकावण्याची संधीच मिळाली नाही तर आमच्या आयुष्यात काय सुरुय हे कसं समजणार हा जखमी कामगारांनी विचारलेला प्रश्न प्रशासनाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आहे. छोट्या-मोठ्या भांडणानंतर कामगारांना लाडीगोडी लावण्याचा प्रकार होत असेल तर ते कामगारांच्या दीर्घकालीन हितासाठी निश्चितच शोभणारं नाही.

कामगार म्हणतायत..!! – चांगला पगार घेणारे अनेक लोक लॉकडाऊन सुरु झाला की घरी बसले, ५०-६० लोक पळूनसुद्धा गेले, मात्र कंपनीचं नुकसान होऊ नये म्हणून आम्ही थोडावेळ थांबलो, कळ काढली. पण कंपनीसाठी कुत्र्यागत राबूनसुद्धा आम्हाला हीन दर्जाची वागणूक मिळणार असेल तर आम्हाला ही कंपनी नको आणि हे कामसुद्धा नको. आम्हाला जबरदस्तीने या ठिकाणी कोंडण्यात आलं असून तात्काळ आमची सुटका करावी अशी मागणी या कामगारांनी केली आहे.

या सर्व प्रकारानंतर कंपनी, पोलीस प्रशासन आणि जिल्हाधिकारी काय भूमिका घेणार याकडे सातारकर जनतेसोबत महाराष्ट्राचंही लक्ष लागून राहिलं आहे.

 

https://twitter.com/yogeshsjagtap/status/1265377918609309697?s=19

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

धक्कादायक ! परभणी जिल्ह्यात कोरोना रुग्ण बाधीतांच्या संख्येत ३१ ने वाढ

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे

परभणी जिल्हावाशीयांसाठी मंगळवारची रात्र टेन्शन देणारी ठरली असून संध्याकाळी साडे आठ वाजता आलेल्या रुग्ण तपासणी अहवालाने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. आज सायंकाळपर्यंतची ३६ रुग्णसंख्या आता जवळजवळ दुप्पट होत ६७ वर पोहोचली आहे. सापडलेले ३१ रुग्ण पूर्वी सापडलेल्या तालुक्यांमधीलच असल्याची आकडेवारी सांगत आहे. जिल्ह्यात मागील आठवड्यापासून कोरोणा संसर्ग बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे .सापडलेले सर्व रुग्ण मुंबई पुणे येथून आल्याचे निष्पन्न झाले होते. त्यांच्या संपर्कातील व संशयित जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांचे तपासणी अहवाल आज साडेआठ वाजता आले असता यातील ३१जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

त्यामध्ये पूर्णा तालुक्यात १० ,सेलू मध्ये २, गंगाखेड ४,पालम १ तर परभणी तालुक्यामध्ये १२ जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. मंगळवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत २६५जणांचे तपासणी अहवाल नांदेड येथील प्रयोगशाळेमध्ये हे प्रलंबित होते पैकी ३४ अहवाल अनिर्णायक आहेत. असे प्रशासनाकडून सांगण्यात आलयं.

जिल्ह्यात अत्यंत वेगाने वाढणारी कोरोना ग्रस्तांची संख्या आता चिंता वाढवत असून वाढती रुग्णसंख्या पाहता , प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हा प्रशासनाकडून २६ मे सकाळी सात वाजल्यापासून ते २८ मे संध्याकाळी बारा वाजेपर्यंत जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे . त्यामध्ये शहर व नगरपालिका हद्दीतील तीन किमी पर्यंत संचारबंदी करण्यात आली आहे. आता जिल्ह्यातील नागरिकांनी घरातच रहात जिल्हा प्रशासनाला सहकार्य करत काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

भारतीय चिनी सैन्यातील उच्चस्तरीय कमांडर यांची सीमेवर भेट 

वृत्तसंस्था । लदाख च्या सीमेवर भारताने नुकताच एक रस्ता बनविण्याचे ठरविले असून तसे करण्यास सुरुवातही केली आहे. मात्र चीन भारताने हे करू नये अशा भूमिका घेत आहे. यावरून काही दिवस दोन्ही सीमांवर तणाव आहे. मात्र भारताने तरीदेखील आपले काम सुरु ठेवण्याचे ठरविले होते. यावरून दोन्ही देशांच्या सीमांवर तणाव होता. याबाबतच २२ आणि २३ मे रोजी LAC (वास्तविक नियंत्रण रेषा) वर चीन तथा भारतातील उच्चस्तरीय कमांडर्स यांनी भेट घेतल्याचे सूत्रांकडून समजले आहे.

गेल्या पन्नास वर्षात चीनने या सीमेवर मोठ्या प्रमाणात विकास कार्य केले आहे. ज्या सीमेवरून वाद सुरु आहे. त्या गलवान भागात चीनने चारपदरी महामार्ग देखील बनविला आहे. तिथे काही बांधकाम देखील केले आहे. पण जेव्हा भारताने इथे आपले रस्ते बनवायला सुरुवात केली आहे. तेव्हा चीनने याचा विरोध केला आहे. कारण रस्ते बनवले तर त्यासोबत सैनिकांना राहण्यासाठी काही बंकर्स पण बनविले जातील. यामुळे चीनने याला विरोध केला होता. आणि सीमेवर चीनचे सैनिक व भारताचे सैनिक यांच्यामध्ये तणाव दिसून येत होता. हा तणाव कमी करण्याच्या दृष्टीने दोन्हीकडच्या उच्चस्तरीय कमांडर्सनी भेट घेतल्याचे सूत्रांकडून समजले आहे.

 

तर काही वेळापूर्वी मिळालेल्या माहितीनुसार उत्तराखंडच्या सीमेवर चीनने स्वतःची ताकद वाढविली आहे. हे पाहून भारताने देखील आपली ताकद वाढविली आहे. सुरुवातीला सिक्कीम, लडाख आणि आता उत्तराखंड परिसरात चीनने आपली ताकद वाढविली आहे. सीमांवर विवाद आहेत मात्र अद्याप काही हालचाली झाल्या नाहीत. भारतावर गलवान घाटात सतत तणाव वाढविण्याचे काम करत असल्याचा चीनचा आरोप आहे. पण चीनला भारताच्या ताकदीचा अंदाज असल्याने हल्ला होण्याची शक्यता सांगता येत नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

विरोधी पक्ष नेत्यांनी प्रत्यक्ष खर्चाचे पॅकेज किती आणि कर्जाचे पॅकेज किती याची आकडेवारी सादर करावी – पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्याला केंद्राकडून २, ७०, ००० रु आल्याचा दावा केला तसेच त्याची आकडेनिहाय वर्गवारी ही सादर केली. यानंतर काँग्रेस नेते यांनी आपले मत मांडले आहे. यामध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी ही सर्व रक्कम थेट महाराष्ट्राच्या तिजोरीत येणार असल्याचे भासविले असून ते तसे नसल्याचा दावा करत फडणवीस यांनी केंद्राच्या वतीने प्रत्यक्ष रोख रकमेचे पॅकेज आणि कर्जाचे पॅकेज अशी आकडेवारी दिली तर आपण सकारात्मक चर्चा करू शकू असे सांगितले आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांनी या व्हिडिओमध्ये या रकमेची आकडेनिहाय माहिती देताना म्हंटले आहे, ‘विविध जागतिक वित्तीय संस्थांच्या विश्लेषणानुसार केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये फक्त २ लाख कोटी रुपये हे रोख रकमेचे (फिस्कल स्टीम्युलस) आहेत आणि उर्वरित पॅकेज हे कर्जाच्या स्वरूपातील (मॉनेटरी स्टीम्युलस) आहे. हे पाहता महाराष्ट्राच्या वाट्याला जास्तीत जास्त २० हजार कोटी रुपये येऊ शकतात.  रिझर्व्ह बँकेकडून महाराष्ट्राच्या वार्षिक उत्पन्नाच्या (जीएसडीपीच्या) ५% रक्कम कर्ज म्हणून उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले आहे आणि ती रक्कम जवळपास १ लाख ६० हजार कोटी आहे असे सांगण्यात आले मात्र ती केवळ दिशाभूल आहे. आताच्या परिस्थितीत राज्यांना आधीपासूनच जीएसडीपीच्या ३% कर्ज घेण्याची परवानगी होती, ती आता २% वाढवून ५% पर्यंत वाढवली हे खरे जरी आहे, परंतु त्या वाढीव २% पैकी फक्त ०.५% रक्कम म्हणजेच जास्तीत जास्त १५-१६ हजार कोटी रक्कम तातडीने मिळू शकतील. उर्वरित १.५% रक्कमेची उचल (सुमारे ४५ हजार कोटी रुपये) करण्याआधी अनेक अटी आणि निकष लावण्यात आलेले आहेत.’

ही  मांडणी करत असताना त्यांनी सांगितले की, केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजमध्ये विविध घटकांना कर्ज रुपाने रक्कम देण्याची तयारी दाखविण्यात आली आहे. पण त्यामध्ये अनेक अटी आहेत. जो त्या अटी आणि शर्ती पूर्ण करेल व ज्याची कर्ज परतफेड करण्याची क्षमता असेल त्यालाच ते कर्ज मिळू शकेल. उदा: किरकोळ विक्रेत्यांसाठी ५ हजार कोटी किंवा सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांसाठी ३ लाख कोटी रुपये. परंतु हे घटक ते कर्ज घेऊ शकतील का व ते उत्सुक नसतील तर राज्य किंवा केंद्र शासन त्यांना सक्ती करू शकत नाहीत. याची काहीच स्पष्टता नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे पात्र नसणाऱ्या आणि उचल न घेतलेल्या कर्जाची रक्कम महाराष्ट्राला मदत म्हणून दाखवणे ही हातचलाखी आहे. असेही ते म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

मान्सूनपूर्व परिस्थितीचा मुख्यमंत्री ठाकरेंकडून आढावा

मुंबई । मे महिना संपल्यातच जमा आहे. जून सुरु होताच मान्सूनची चाहूल लागण्याची शक्यता आहे. राज्यात आता कोरोनाची परिस्थिती सर्वाधिक बिकट आहे. अशा परिस्थितीत मान्सूनसाठी आपण तयार असले पाहिजे. आधीच संचारबंदीमुळे नुकसानीस सामोरे जावे लागले आहे. मान्सूनमध्ये कोणते नुकसान होऊ नये यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मान्सूनपूर्व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. या बैठकीसाठी राज्यभरातून संबंधित उपस्थित होते. यावेळी आम्ही बचाव कार्य करू पण सध्याच्या कोरोनाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर सावधगिरी बाळगली पाहिजे असे सांगितले.

 

राज्यात सर्वत्र पावसाची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे. संचारबंदीमुळे राज्यात आर्थिक समस्या निर्माण झाल्या आहेत. मागच्या वर्षी राज्याच्या विविध भागात आलेल्या पुराचाही धोका नाकारता येत नाही. म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री विजय वडेट्टीवार, एमओएस प्राजक्त तनपुरे, रेल्वे, सैन्य, नौदल, हवाईदल, तटरक्षक दल, आयएमडी आदींच्या मुख्य सचिवांसोबत मान्सूनपूर्व पूर्वतयारी आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये सावधगिरीच्या दृष्टीने कोणकोणती पूर्वतयारी गरजेची आहे. याबद्दल चर्चा झाली तसेच मुख्यमंत्र्यांनी तसे आदेशही दिले.

 

सध्याचे कोरोनाचे संकट अफाट आहे. त्यामुळे आम्ही बचाव कार्य करूच पण या परिस्थितीमध्ये आपण अधिक सावधगिरी बाळगली पाहिजे म्हणून प्रयत्नशील राहण्यास मुख्यमंत्री यांनी सांगितले. त्याला अनुसरून आवश्यक असणारी संरक्षणात्मक उपकरणे, किट, मास्क उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना केल्या आहेत. त्यानुसार लवकरात लवकर कार्यवाही करण्यास सुरुवात केली जाईल असे त्यांनी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

आता भारत अमेरिकेत तयार करेल नवीन गुहा ! जिथे साठवले जाईल कोट्यवधी टन तेल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या कमी झालेल्या किंमतीचा फायदा घेण्यासाठी भारत आता अमेरिकेत कच्चे तेल साठवण्याच्या पर्यायावर विचार करीत आहे. भारतात सध्या सर्व लोकल स्टोरेज पूर्णपणे परवडण्यायोग्य नाही आहे. तेलमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सोमवारी सीएनबीसी टीव्ही १८ वाहिनीशी बोलताना ही माहिती दिली. गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियानेही अशीच पावले उचलल्याची माहिती त्यांनी दिली होती. स्वस्त झालेल्या कच्च्या तेलाचा फायदा घेण्यासाठी ऑस्ट्रेलियालाही अमेरिकेच्या स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्वमध्ये कच्चे तेल साठवायचे आहे.

यावर्षी कच्च्या तेलाच्या किंमतीत ४०% घट झाली आहे
प्रधान म्हणाले, “आम्ही आमच्या देशातील इन्वेस्टमेंटचा दुसर्‍या देशात साठवण्याच्या शक्यतेचा शोध घेत आहोत. आम्ही अमेरिकेत अशी शक्यता पाहात आहोत जिथे कच्चे तेल साठवले जाऊ शकते.” २०२० मध्ये आतापर्यंत कच्च्या तेलाच्या किंमतीत ४० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाली आहे. मात्र, गेल्या काही आठवड्यांमध्ये त्यामध्ये किंचितसी वाढ झाली आहे.

९ दशलक्ष टन तेल जहाजांमध्ये स्टोअर
भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा ग्राहक आणि तेल आयात करणारा देश आहे. प्रधान म्हणाले की स्वस्त दराचा फायदा घेऊन आम्ही ५.३३ दशलक्ष टनाचा स्ट्रॅटेजिक स्टोरेज केलेला आहे. जगातील विविध भागांत सध्या ९ दशलक्ष टन तेल जहाजांमध्ये स्टोअर आहे.

भारत ८० टक्के तेल आयात करतो
भारत आपल्या गरजेच्या ८० टक्के तेल आयात करतो. प्रधान म्हणाले की, भारताने साठवलेल्या स्टोअरची संख्या ही एकूण आवश्यकतेच्या २० टक्के आहे. सरकार हे स्ट्रॅटेजिक स्टोरेज वाढवून १ दशलक्ष टनांवर नेण्याचा विचार करत आहे.

याक्षणी भारताने किती तेल साठवले आहे ?
भारत जगातील तिसर्‍या क्रमांकाचा कच्च्या तेलाचा आयात करणारा देश आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले की भारतात ५३.३ लाख टनाचा स्ट्रॅटेजिक स्टोरेज केलेला आहे जो पूर्णपणे भरला आहे. याशिवाय जहाजांमध्येही सुमारे ८५ ते ९० लाख टन तेल साठा आहे. त्याचा मोठा भाग आखाती देशांमध्ये आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

आमदार रवी राणा यांनी अभियंत्याला चांगलेच फटकारले, ठक संपेपर्यंत बसवले खाली 

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई

अमरावती जिल्ह्यामध्ये सध्या पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर आहे. परीसरातील अनेक भागात पाण्याचा तुटवडा भासत आहे. लोकांना पाणी सोडले जात नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत. यासंदर्भात बडनेराचे आमदार रवी राणा यांनी आज झालेल्या पाणी टंचाईच्या बैठकीत संबंधित अभियंत्याला चांगलेच फटकारले. अभियंता पुरोहित यांना संपूर्ण बैठकीत खाली बसवून त्यांनी त्यांची चांगलीच खबर घेतली. यामुळे उपस्थित अभिकारी, कर्मचारी चांगलेच भयभीत झाले होते.

“लोकांना प्यायचं पाणी देऊ शकत नाही आपण? ७० हजार रुपये पगार घेता आणि लोकांना पाणी सोडता येत नाही तुम्हाला? यानंतर जर कुणाची तक्रार आली तर कारवाई केली जाईल. आणि काम करायचे नसेल तर राजीनामा द्या आणि निघून जा काम न करणाऱ्या लोकांची आम्हाला काहीच गरज नाही. आम्हाला काम करणारे लोकच लोकच हॅव आहेत कामचोर नको आहेत. प्रत्येक गावातील टाकीचे नियोजन, त्यांना पाणी सोडणे अशा सर्व गोष्टी करण्याचा दम दिला.” तसेच उपस्थित अधिकाऱ्याला याचा अहवाल देण्याचेही आदेश दिले.

उन्हाळ्याच्या तीव्रतेने त्रस्त नागरिकांना पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू नये यासाठी आणि पाणीटंचाई वर मात करण्यासाठी आमदार रवी राणा यांनी महानगरपालिका, जिल्हा प्रशासन व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची  संयुक्त बैठक घेतली होती. कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यातील नागरिक पाण्यापासून वंचित राहणार नाही यासाठी अधिकारी व कर्मचारी यांनी दक्ष राहावे, हलगर्जीपणा , हयगय खपवून घेतली जाणार नाही असा दम आमदार रवी राणा यांनी भरला व भर सभेत शाखा अभियंता पुरोहित यांना खडसावले व बैठक संपेपर्यंत जमिनीवर बसवून ठेवल्याने मात्र चांगलीच खळबळ उडाली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

रशियामध्ये कोरोना विषाणूची सुमारे ९००० नवीन प्रकरणे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोमवारी रशियामध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या सुमारे ९००० नवीन घटना समोर आल्या आहेत. यामुळे इथे संक्रमित लोकांची संख्या ३,५०,००० पेक्षा जास्त झाली आहे. गेल्या २४ तासांत ९२ संक्रमित लोकांच्या झालेल्या मृत्यूमुळे येथील मृतांचा आकडा हा ३,६३३ वर पोहोचला आहे. रशियाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.

रशियातील कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण तुलनेने कमी असल्याचे सांगितले जात आहे, यावर पश्चिमेकडील तज्ञांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. बरेच लोक असेही म्हणत आहेत की,’ सरकार या आकडेवारीत फेरबदल करू शकते. तसेच ते या व्हायरसशी संबंधित मृत्यूंबद्दलची अचूक माहिती देत ​​नाही आहेत. मात्र, रशियन अधिकाऱ्यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की,’ कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे इथे मृत्यूंची संख्या कमी राहिली आहे.’

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

इटलीनंतर आता जपानची पर्यटकांसाठी अनुदानाची योजना; सरकार देणार निम्मा प्रवास खर्च

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण जग सध्या कोरोना विषाणूच्या संकटाशी झगडत आहे. कोरोना व्हायरसच्या या संकटाच्या पार्श्वभूमीवर जगभरात आर्थिक कार्यक्रम बंद आहेत. त्याचा सर्वात वाईट परिणाम हा पर्यटन क्षेत्रावर झाला आहे. दरम्यान, कोरोनावर नियंत्रण मिळवल्यानंतर देशातील राष्ट्रीय आणीबाणी दूर करणार्‍या जपानने आपल्या देशात पर्यटनाला चालना देण्यासाठी एक विशेष योजना सुरू केली आहे. या अंतर्गत जपान पर्यटकांना ५० टक्के अनुदान देईल. म्हणजेच जपानमध्ये जाणाऱ्या लोकांचा निम्मा खर्च हा जपान सरकार करेल. यापूर्वीच इटलीनेही हवाई खर्चाची निम्मी रक्कम ते देणार असल्याची घोषणा केली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार जपानच्या टूरिझम एजन्सीने पर्यटकांना पर्यटनस्थळांवर पुन्हा आकर्षित करण्यासाठी ही पर्यटन अनुदानाची योजना आखलेली आहे. त्याअंतर्गत पर्यटकांसाठी अर्थसंकल्पामध्ये काही भाग सरकार उभा करणार आहे. मात्र, सुरुवातीला ही योजना केवळ स्थानिक पर्यटकांनाच लागू होईल. तज्ज्ञांच्या मते, प्रवास बंदी हटवल्यानंतर इतर देशांतील पर्यटकांनाही या पॅकेजमध्ये समाविष्ट केले जाईल. एका अंदाजानुसार या योजनेसाठी जपानला एकूण १२.५ अब्ज डॉलर्स खर्च करावे लागतील. ही योजना जुलै पासून सुरु होणार असल्याचे समजते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.