Sunday, December 21, 2025
Home Blog Page 575

Viral Video | चालत्या बसमध्ये जागा मिळवण्यासाठी व्यक्तीने केला जुगाड जादू, पाय घसरला आणि पुढे…

Viral Video

Viral Video | भारतीय हे नेहमीच काही ना काही जुगाड करत असतात. त्यांचे जुगाड असे असतात की, एखाद्या चांगल्या माणसालाही आश्चर्य वाटेल. कोणतीही अडचण असो कोणताही प्रश्न असो, भारतीय लोक यावर नेहमीच जुगाड शोधत असतात. सोशल मीडियावर देखील आपण असे अनेक जुगाड्याचे व्हिडिओ व्हायरल होताना पाहत असतो. अशातच आता एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडिओ एका एसटीमधील आहे. बसण्यासाठी जागा मिळवण्यासाठी एका व्यक्तीने असा जुगाड केलेला आहे की, ते पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

चालत्या बस मध्ये किंवा ट्रेनमध्ये अनेक लोक जागा मिळवण्यासाठी वेगवेगळ्या युक्ती करत असतात. परंतु हे करणे सोपे नाही. काही वेळेस हे या गोष्टी जीवावर देखील बेतू शकते. अशातच आता एका व्यक्तीने बसमध्ये चढताना सीट मिळवण्यासाठी असे काही कृत्य केलेले आहे जे पाहून सगळे थक्क होतील.

या व्हिडिओमध्ये (Viral Video) तुम्ही एक बस उभी असल्याचे पाहू शकता. ज्या बसमध्ये लोक चढत आहेत, त्या बसमध्ये एवढी गर्दी आहे की, लोक बसण्यासाठी गडबड करताना दिसतात. एक व्यक्ती बसच्या खिडकीतून आत जाण्याच्या प्रयत्न करू लागतो. तो खिडकीतून चढू लागताच काही वेळाने खिडकी हलू लागते. कारण खिडकी व्यक्तीचे वजन सहन करू शकत नाही. आता खिडकीजवळ जाताच तो सरळ खाली पडला.

सध्या हा व्हिडिओ (Viral Video) सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. अनेक लोक यावर प्रतिक्रिया देखील देत आहेत काहींना त्याने केलेला हा अतिशहाणपणा आहे. असे वाटत आहे तर काही लोक त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल देखील करत आहे.

Indian Railway: लोको पायलट आणि गार्डसाठी खुशखबर ; रेल्वे घेणार मोठा निर्णय

Indian Railway : रेल्वच्या लोको पायलट आणि गार्ड साठी एक आनंदाची बातमी आहे. लोको पायलटस ना आता रेल्वे साठी आवश्यक असणारी जाड जुड लोखंडी पेटी वाहून नेण्याची गरज नाही. रेल्वे विभागाकडून आता त्यांना ट्रॉली बॅग पुरवन्यासाठी आदेश जारी केला आहे. त्यामुळे आता जुन्या काळातील मेटल गार्ड लाइन बॉक्सेसला अलविदा करण्याची वेळ आली असून रेल्वे कर्मचाऱ्यांचे (Indian Railway) काम आता सोपे होणार आहे.

सर्व लोको पायलट (LPs) आणि गार्ड (ट्रेन व्यवस्थापक) यांच्यासाठी ट्रॉली बॅग्सने बदलले जातील. असे सांगण्यात आले आहे .रेल्वे बोर्डाने जारी केलेल्या आदेशात सर्व झोनल रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना त्याची तात्काळ अंमलबजावणी सुरू (Indian Railway) करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रेल्वे बोर्डाचे वाहतूक परिवहन, संचालक, पुलकित सिंघल, यांनी 19 जुलै 2024 रोजी जारी केलेल्या आदेशात म्हंटले आहे की , सध्याच्या घडीला “धोरणात्मक निर्णय” म्हणून बिल दिले. आत्तापर्यंत, कोणतीही ट्रेन सुटण्यापूर्वी ‘बॉक्स बॉय’ द्वारे इंजिन रूम आणि ब्रेक व्हॅन दोन्हीमध्ये हेवी मेटल बॉक्स लोड केला जातो, मग ती मेल, एक्सप्रेस किंवा मालगाडी असो. बॉक्स बॉईज हे कंत्राटी कर्मचारी आहेत आणि त्यांना केलेल्या (Indian Railway) कामासाठी अल्प रक्कम दिली जाते.

बॉक्समध्ये काय असते ? (Indian Railway)

बॉक्समध्ये कोणत्याही इमर्जन्सी आणि दैनंदिन गरजांच्या वेळी आवश्यक असलेली गंभीर उपकरणे असतात, ज्यामध्ये अतिरिक्त बॅटरीसह वॉकी-टॉकी, लाल आणि हिरवे ध्वज, ब्लॉक वर्किंग मॅन्युअल, एक सामान्य नियम पुस्तिका, कामाचे वेळापत्रक, अपघात पुस्तिका, ए. परफॉर्मन्स बुक, एलएचबी कोच रीसेट करणारी की आणि इतर वस्तूंपैकी (Indian Railway) दहा डिटोनेटर.

काही वर्षांपूर्वी प्रस्तावित केलेल्या या मागणीला कडव्या विरोधाला सामोरे जावे लागले आणि ही मागणी खटल्यात अडकली . यापूर्वी 28 नोव्हेंबर 2022 रोजी अखिल भारतीय रक्षक परिषदेने हायकोर्टात याचिकेद्वारे लढा दिला होता. न्यायालयाने केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाने दिलेल्या निर्णयानुसार जाण्याचा निर्णय घेतला. या संदर्भात केंद्राला कोणतेही निर्देश देण्यास न्यायाधिकरणाने नकार दिला, त्यामुळे रेल्वेला (Indian Railway) स्वतःचा निर्णय घेण्याची मुभा दिली.

Satara Home Guard Bharti 2024 | सातारा होमगार्ड अंतर्गत या पदांकरिता भरती सुरु; असा करा अर्ज

Satara Home Guard Bharti 2024

Satara Home Guard Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो आज देखील आम्ही अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत ती म्हणजे आता सातारा होमगार्ड (Satara Home Guard Bharti 2024) अंतर्गत होमगार्ड या पदाचा रिक्त जागा आहेत या पदाच्या एकूण 771 रिक्त जागा आहेत आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करायचा आहे 25 जुलै 2024 पासून ही भरती चालू होणार आहे तर 31 जुलै 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे त्यामुळे तुम्ही यात पाच दिवसात लवकरात लवकर अर्ज करा आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

महत्वाची माहिती | Satara Home Guard Bharti 2024

  • पदाचे नाव – होमगार्ड
  • पदसंख्या – 471
  • नोकरी ठिकाण – सातारा
  • वयोमर्यादा –20 ते 50वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 25 जुलै 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जुलै 2024
  • शैक्षणिक पात्रता -उमेदवार हा कमीत कमी दहावी उत्तीर्ण असावा.

महत्वाची कागदपत्रे

  • रहीवासी पुरावा आधारकार्ड, मतदान ओळखपन्न
  • शेक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र
  • जन्मदिनांक पुराव्याकरीता SSC बोर्ड प्रमाणपत्र / शाळासोडल्याचा दाखला
  • तांत्रिक अहर्ता धारणकरीता असल्यास तत्सम प्रमाणपत्र.
  • खाजगी नोकरी करीत असल्यास मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र.
  • 3 महिन्याच्या आतील पोलीस चारीत्र्य पडताळणी प्रमाणपत्र

अर्ज कसा करावा ? | Satara Home Guard Bharti 2024

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून देखील अर्ज करू शकता
  • 31 जुलै 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.
  • अर्ज करण्यापूर्वी पीडीएफ जाहिरात सविस्तरपणे वाचा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

तब्बल 44 लाख शेतकऱ्यांना पाच वर्षे मिळणार मोफत वीज; सरकारने काढला जीआर

Farmers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातील शेतकऱ्यांबाबत नेहमीच नवनवीन योजना सरकारकडून आणल्या जातात. यामुळे शेतकऱ्यांना देखील याचा खूप जास्त फायदा होतो. अशातच आता राज्यातील 7.5 अश्वशक्ति पर्यंतच्या कृषी वीज ग्राहक शेतकऱ्यांना पुढील 5 वर्ष मोफत वीज देण्याचा शासन जीआर देखील काढण्यात आलेला आहे. हा जीआर 25 जुलै 2024 रोजी गुरुवारी काढण्यात आलेला आहे. एप्रिल 2024 ते 2019 मार्च यादरम्यान ही योजना लागू राहणार आहे.

44 लाख 3 हजार शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे

ही योजना आता चालू झाल्यानंतर पुढील तीन वर्षे चालू राहणार आहे. आणि नंतर तिचा आढावा घेतल्यानंतरच पुढील कालावधीत ही योजना राबवण्याचा निर्णय सरकारकडून घेतण्यात येणार आहे. असे देखील जीआरमध्ये म्हटलेले आहे. शेतकऱ्यांना कृषी पंपाची वीज मोफत मिळावी. यासाठी मुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात अर्थसंकल्प सादर करताना ही घोषणा केलेली आहे.

कृषी पंपाच्या बिलाच्या वसुलीची चिंता महावितरणाला नेहमीच असते. त्यामुळे आता या वीज बिलाचे 14 हजार 760 कोटी रुपये हे सरकार आता महावितरणाला देणार आहे. त्यामुळे महावितरणाला कोणत्याही प्रकारची चिंता राहणार नाही. कृषी पंप विज दिलाची एकूण थकबाकी ही 50000 कोटी रुपये एवढी आहे.

या योजनेअंतर्गत राज्य सरकार महावितरणाला दरवर्षी 14,760 कोटी रुपयांचे अनुदान देणार आहे. राज्यामध्ये एकूण 47 हजार 41 लाख कृषी पंप ग्राहक शेतकरी आहेत. त्यामुळे एकूण वीज ग्राहकांच्या तुलनेत हे प्रमाण 16% एवढे आहे. कृषी ग्राहक सध्या एकूण 39 हजार 246 दशलक्ष युनिट वार्षिक वीज वापरतात. त्यामुळे राज्यात कृषी पंप रात्री 8 ते 10 तास किंवा दिवसा 8 तास वीज पुरवठा केला जातो.

Foods to reverse Fatty Liver | तुम्हीही फॅटी लिव्हरचे शिकार झाला असाल, तर आहारात करा या पदार्थांचा समावेश

Foods to reverse Fatty Liver

Foods to reverse Fatty Liver | यकृताशी संबंधित आजारांमध्ये फॅटी लिव्हर सर्वात सामान्य आहे. यामध्ये लिव्हरमध्ये जास्त प्रमाणात फॅट जमा होते, त्यामुळे यकृताच्या कार्यात समस्या निर्माण होऊ लागतात. साधारणपणे आपली वाईट जीवनशैली आणि खाण्याच्या सवयी यामागे असतात. म्हणून त्याला नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर म्हणतात. काही पदार्थ फॅटी लिव्हर बरे करण्यासाठी देखील उपयुक्त आहेत. फॅटी लिव्हर बरे करण्यासाठी कोणते पदार्थ आहारात समीर करावेत हे जाणून घेऊयात.

पपई | Foods to reverse Fatty Liver

पपई पचनासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात पपेन आढळते, जे पचन सुधारते. हे यकृतासाठी देखील खूप चांगले आहे, कारण त्यात अँटी-ऑक्सिडेंट आढळतात, जे यकृत निरोगी ठेवण्यास मदत करतात. याशिवाय, पपई यकृताचे डिटॉक्सिफिकेशन करण्यास देखील मदत करते, जे फॅटी यकृत बरे करण्यास खूप मदत करते.

ब्रोकोली

ब्रोकोलीमध्ये अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात, ज्यामुळे ते चांगले आरोग्य राखण्यासाठी खूप मदत करते. यामध्ये सल्फोफेन, फायबर, व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन ए आढळतात, जे अनेक आजारांपासून बचाव करण्यास मदत करतात. ब्रोकोली खाल्ल्याने फॅटी लिव्हर बरा होण्यासही मदत होते.

अक्रोड

अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड आढळते, ज्याला हेल्दी फॅट मानले जाते. फॅटी यकृत बरा करण्यासाठी, निरोगी चरबीयुक्त पदार्थ खाणे महत्वाचे आहे. त्यामुळे तुमच्या आहारात अक्रोडाचा समावेश केल्यास यकृतामध्ये जमा झालेली चरबी कमी होण्यास मदत होते.

हिरव्या पालेभाज्या

फायबरसोबतच हिरव्या पालेभाज्यांमध्ये अँटिऑक्सिडंट्स आढळतात, जे यकृतासाठी खूप फायदेशीर असतात. आम्ही तुम्हाला सांगतो की पचनासाठी फायबर खूप महत्त्वाचे असते, त्यामुळे अन्न सहज पचते. यामुळे यकृतावर कोणताही नकोसा दबाव पडत नाही आणि त्यामुळे फॅटी लिव्हर बरा होण्यासही मदत होते.

ऑलिव तेल

ऑलिव्ह ऑइलमध्ये हेल्दी फॅट्स बरोबरच दाहक-विरोधी गुणधर्म देखील आढळतात, जे फॅटी लिव्हर बरे करण्यात खूप मदत करतात. जळजळ-विरोधी गुणधर्म चरबी जमा झाल्यामुळे यकृतातील जळजळ कमी करतात, ज्यामुळे फॅटी यकृतापासून लवकर आराम मिळतो.

लसूण

लसूण यकृतामध्ये जमा झालेले विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. याशिवाय, त्यात दाहक-विरोधी गुणधर्म देखील आढळतात, जे यकृताची सूज कमी करण्यासाठी प्रभावी आहेत. त्यामुळे लसूण फॅटी लिव्हर बरे करण्यातही खूप मदत करतो.

तुळजापूर विधानसभा मतदारसंघात आमदार राणा जगजीतसिंग रेड झोनमध्ये आहेत

tuljapur rana jagjitsinh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आई तुळजाभवानीचा स्पर्श जिथल्या कणाकणात आहे तो तुळजापूर विधानसभा मतदारसंघ… धार्मिक केंद्र, शक्तीपीठ म्हणून देशभर ख्याती असणाऱ्या या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत भाजपचे दिग्गज नेते राणा जगजीतसिंह पाटील… पण याच नेत्याला येणाऱ्या विधानसभेत पराभव डोळ्यांसमोर दिसू लागलाय… आधी खासदारकीला पत्नी आणि आता विधानसभेला स्वतः तुळजापूरची उमेदवारी धोक्यात येण्यामागचं कारण ठरलीय ती फक्त एक व्यक्ती… ती म्हणजे खासदार ओमराजे निंबाळकर… राणा जगजीतसिंग यांच्या राजकारणावर तुळशीपत्र ठेवण्यासाठी… त्यांचं राजकारण मुळापासून उपटून काढण्यासाठी राणांच्या विरोधातील उमेदवारासाठी आता खासदार साहेबांनी फिल्डिंग लावलीय… त्यामुळे पाटील विरुद्ध निंबाळकर असा पाहायला मिळणारा राजकीय विस्तव तुळजापूर मध्येही पाहायला मिळणार का? राणा जगजीतसिंग हे पुन्हा आमदार होतायत का? तुळजापूरच्या विधानसभेसाठी पडद्याआड नेमकं काय राजकारण चाललंय? त्याचीच ही इनसाईड स्टोरी…

तुळजाभवानीच्या मंदीरात पूजा करताना धोतर परिधान करावं लागतं म्हणूनच की काय तुळजापूरला धोतरवाला आमदार होतो, अशी जणू अलिखीत परंपरा होती.. शिवाजीराव पाटील बाभूळगावकर, शिक्षणमहर्षी आलुरे गुरुजी आणि यानंतर चार टर्म काँग्रेसच्या मधुकरराव चव्हाण या धोतरवाल्या राजकारण्यांनी तुळजापूरची आमदारकी आपल्या ताब्यात ठेवली… अगदी उतारवयातही धोतर घालून विधीमंडळ गाजवणारा राजकारणी म्हणून मधुकररावांची ओळख होती… लोकल बोर्ड, जिल्हा बँक, मराठवाडा विकास महामंडळाचे अध्यक्षपद ते विधानसभेचे उपाध्यक्षपदही त्यांनी याच आमदारकीच्या जीवावर कमावलं… आघाडी सरकारच्या काळात ते काही काळ मंत्री देखील राहिले… पण एवढा सारा राजकीय वारसा लाभूनही मतदारसंघाचा म्हणावा असा विकास झाला नाही… त्यात तरुण आमदार देण्याची भाषा प्रत्येक निवडणुकीत करण्यात आली… पण त्याला विरोधकांना यश काही आलं नाही… पण 2018 पासूनच अशोक जगदाळे यांनी फिल्डींग लावत मधुकरराव चव्हाणांच्या विरोधात रान तापवलं…

मतदारसंघातील महिलासाठी देवदर्शन सहल, फिरता दवाखाना, टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा, जनावरासाठी चारा वाटप करत यंदा काहीही झालं तरी तुळजापूरची आमदारकी मिळवायचीच… असं जणू स्वतःशी चंग त्यांनी बांधला होता.. पण या सगळ्यात नवा ट्विस्ट आला तो म्हणजे निवडणुकीच्या काही दिवसांआधीच लोकसभेत पराभवाचा दणका बसलेल्या राणा जगजीतसिंग यांनी राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश करत भाजपकडून तुळजापूरची उमेदवारी मिळवली… प्रचाराला अवघे काही दिवसच मिळूनही जगदाळेंनी मधुकररावांच्या विरोधात तयार केलेल्या वातावरणाचा फायदा राणा जगजीतसिंग यांना मिळाला… आणि प्रस्थापित मधुकरराव चव्हाणांचा पराभव करत तुळजापुरातून आमदारकी मिळवली…थोडक्यात 2019 ला धोतर नेसणारा आमदार म्हणून तुळजापूरची जी परंपरा होती ती मोडीत काढण्यात राणा जगजीतसिंग यांना यश आलं… राणा जगजीतसिंग यांनी जिल्ह्यातील आपलं राजकारण पुन्हा जिवंत ठेवलं…

पण आपल्या पत्नीला स्वतःच्याच हक्काच्या मतदार संघातून तब्बल 52 हजार मतांची पिछाडी असल्यामुळे आता लोकसभेला अर्चना पाटील यांच्या पराभवानंतर आता विधानसभेला राणा जगजीतसिंग पाटलांची तुळजापूरची आमदारकीही धोक्यात आलीय… म्हणूनच की काय एकेकाळी जिल्ह्यावर वचक ठेवणाऱ्या याच राणा जगजीतसिंह यांच्या विरोधात मैदानात उतरण्यासाठी अनेक इच्छुकांची भाऊगर्दी झालीये… महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी या जागेसाठी दावा ठोकलाय… राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नुकतीच शरद पवारांची भेट घेऊन तुळजापूर आपल्याकडे घ्यावा, अशी विनंती केली… तर मधुकरराव चव्हाण यांचा हा पारंपारिक बालेकिल्ला असल्यानं इथून काँग्रेसचाच उमेदवार असावा, असा रेटा काँग्रेस नेत्यांनी लावलाय… तिसरीकडे तुळजापूर मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकावा, हे बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक शिवसैनिक आमदारकीची तयारी करतायत… त्यात स्पेसिफिकली बोलायचं झालं तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अशोक जगदाळे तर देवानंद रोजकरी देखील यंदा राणा जगजीत सिंह पाटलांना अस्मान दाखवत जायंट किलर ठरू शकतात… अर्थात महाविकास आघाडीचा खासदार या नात्याने आणि जुनं राजकीय वैर असल्यानं ओमराजे आपली सारी यंत्रणा या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी लावतील, हे वेगळ्या शब्दात सांगायला नको…

बाकी विद्यमान आमदार म्हणजेच राणा जगजीतसिंह यांच्या मतदारसंघातील प्लस-मायनस बद्दल बोलायचं झालं तर शेतकऱ्यांसाठी सर्वाधिक जास्त पीकविमा मतदारसंघात आणणारा आमदार म्हणून सध्या त्यांचं कौतुक केलं जातंय… औद्योगिक विकासासाठी त्यांनी केलेलं कामही कौतुकास्पद आहेच… पण जलसिंचनाचा अभाव, मंजूर न झालेला देवस्थानचा विकास आराखडा आणि रोजगार ते शिक्षणासारख्या सोयी सुविधा मतदारसंघात याव्यात, याबाबत असणारी निष्क्रियता या गोष्टी आमदार साहेबांना मायनस मध्ये घेऊन जाणाऱ्या आहेत… एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते, ती म्हणजे मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून पहिल्यांदाच म्हणजे 2019 ला राणा जगजीतसिंह पाटलांनी राष्ट्रवादीतून भाजपात येत निवडणूक लढवल्यामुळे तुळजापुरात पहिल्यांदाच कमळ फुललं होतं… पण एक टर्म पूर्ण होण्याच्या आतच पुन्हा इथं कमळाच्या पाकळ्या सुकून जात तुतारी, हाताचा पंजा किंवा मशालीचा उजेड तुळजापुरात पडेल, असा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करू लागलेत… जर राणा जगजीतसिंह यांचा तुळजापुरातून पराभव झालाच तर पाटील कुटुंबाच्या राजकीय अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं… आता ते या सगळ्यातून सहीसलामत बाहेर पडून पुन्हा आमदार कसे होतायत? हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे…

महाविकास आघाडीचा जागेचा तिढा सुटू शकला नाही तर बंडखोरांमुळे राणा जगजीत सिंह यांच्या आमदारकीच्या वाटा सुकर होतील, हे वेगळ्या शब्दात सांगायला नको… बाकी तुम्हाला काय वाटतं? तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचा यंदाचा आमदार कोण? राणा जगजीत सिंह पाटील, अशोक जगदाळे की देवानंद रोजकारी? तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा…

HMD ने भारतात लाँच केले 50MP सेल्फी कॅमेरावाले 2 Mobile; किंमत किती पहा

HMD Crest and Crest Max

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नोकिया मेकर कंपनी HMD ने भारतीय बाजारात HMD Crest आणि Crest Max नावाचे स्मार्टफोन लाँच केले आहेत. या दोन्ही स्मार्टफोनमध्ये 6.67-इंचाचा FHD डिस्प्ले देण्यात आला असून 50MP सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे. दोन्ही मोबाईल एकाच स्टोरेज व्हेरिएन्ट मध्ये लाँच करण्यात आले आहेत. आज आपण या दोन नव्या स्मार्टफोनचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमत याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात

डिस्प्ले –

HMD Crest आणि Crest Max मध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.67-इंचाचा FHD+ OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला गोरिल्ला ग्लासचे संरक्षण मिळते. कंपनीने या दोन्ही स्मार्टफोनमध्ये Unisoc T760 प्रोसेसर वापरला असून हे सँर्टफोन Android 14 वर आधारित ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतो . यातील HMD Crest मध्ये 6 जीबी रॅम आणि Crest Max मध्ये 8 जीबी रॅम उपलब्ध आहे. या दोन्ही मोबाईलला 2 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स मिळतील.

कॅमेरा

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, HMD Crest मध्ये 50MP चा मुख्य कॅमेरा, 2MP चा सेकंडरी कॅमेरा आणि समोरील बाजूला 50MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला. तर Crest Max मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आलाय. यामध्ये 64MP चा मुख्य कॅमेरा, 5MP चा सेकंडरी कॅमेरा आणि 2MP चा मुख्य कॅमेरा आहे. तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला 50MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी मोबाईल मध्ये 5000mAh बॅटरी बसवण्यात आली असून हि बॅटरी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

किंमत किती?

HMD Crest च्या 6GB रॅम + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 14,499 रुपये आहे तर Crest Max च्या 8GB रॅम + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 16,499 रुपये आहे.तुम्ही हे दोन्ही स्मार्टफोन Amazon वरून खरेदी करू शकता.

ठाकरे-पवारांनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी; मनोज जरांगेचं आव्हान

jarange patil on thackeray pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणाबाबत उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले या विरोधी पक्षातील नेत्यानी आपली भूमिका स्पष्ट करावी, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिले पाहिजे की नाही हे त्यांनी सांगावं असं आव्हान मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दिले आहे. विरोधक जर मराठा आरक्षणाबाबत (Maratha Aarakshan) आपली भूमिका स्पष्ट करत करतील तर सत्ताधाऱ्यांनी मराठा आरक्षणाचा निर्णय मार्गी लावावा ,वाट पाहू नये असेही जरांगे पाटलांनी म्हंटल आहे. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले याना मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आव्हान दिले होते. आता जरांगे पाटलांनीही फडणवीसांच्या सुरात सूर मिसळला आहे.

आम्ही सर्वसामान्य गोरगरिबांसाठी लढणार आहे. आपल्या समाजाला मोठं करायचं असेल तर सर्वांनी एकत्र यायला पाहिजे असं मनोज जरांगे पाटीलांनी म्हंटल. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी की मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिले पाहिजे की नाही. जर विरोधक भूमिका स्पष्ट करत नसतील तर सरकराने मराठा आरक्षणाचा निर्णय मार्गी लावावा ,विरोधकांची वाट पाहू नयेत, असे मत जरांगे पाटील यांनी मांडले. जरांगे पाटलांच्या या आव्हानानंतर विरोधक कोंडीत पकडण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांना मात्र बळ मिळेल असं बोललं जातंय.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील मंगळ काही दिवसांपासून भाजप नेत्यांना थेट अंगावर घेत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्यावरही त्यांनी तिखट शब्दात सडकून टीका केली होती. आजही त्यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला. भाजपच्या लोकांचे डोके काम करत नाही, मला थांबवण्यासाठी प्रयत्न नाही. आम्ही त्यांना भाव देत नाही. शेवटी मराठापुढे शांत बसले नाही तर तुमचं राजकीय करीअर मराठा संपवून टाकेल, असा इशारा जरांगे पाटलांनी भाजपला दिला.

Kargil Vijay Diwas 2024 | 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

Kargil Vijay Diwas 2024

Kargil Vijay Diwas 2024 | 26 जुलै हा आजचा दिवस दरवर्षी संपूर्ण भारतामध्ये कारगिल दिवस (Kargil Vijay Diwas 2024) म्हणून साजरा केला जातो. हा दिवस भारताच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी 1999 च्या कारगिल युद्धात अनेक जवानांनी त्यांच्या प्राणांची आहुती दिली. आणि त्याच देशासाठी प्राणांची आहोती देणाऱ्या जवानांच्या शौर्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. यावर्षी कारगिल दिवसाच्या (Kargil Vijay Diwas 2024)25 व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भेट देणार आहेत.

कारगिल विजय दिवसाचा इतिहास | Kargil Vijay Diwas 2024

कारगिल विजय दिवसाचा इतिहास 1971 च्या सुरुवातीस भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धाशी जोडलेला आहे, ज्यामुळे ‘बांग्लादेश’ नावाचा स्वतंत्र देश म्हणून पूर्व पाकिस्तानची निर्मिती झाली. यानंतरही, दोन्ही देश एकमेकांशी भिडत राहिले, ज्यात आजूबाजूच्या डोंगराळ भागांवर लष्करी चौक्या तैनात करून सियाचीन ग्लेशियरवर वर्चस्व मिळविण्याच्या लढाईचा समावेश आहे. त्यांनी 1998 मध्ये त्यांच्या अण्वस्त्रांची चाचणी देखील केली होती, ज्यामुळे दोघांमध्ये दीर्घकाळापासून वैर होते.

त्यामुळे शांतता आणि स्थैर्य राखण्यासाठी आणि तणावाचे निराकरण करण्यासाठी, फेब्रुवारी 1999 मध्ये ‘लाहोर घोषणापत्र’ वर स्वाक्षरी करून काश्मीर समस्येच्या द्विपक्षीय शांततापूर्ण निराकरणाकडे वाटचाल करण्याचे वचन दिले गेले.

जेव्हा पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर कब्जा | Kargil Vijay Diwas 2024

पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवाद्यांनी, एका नापाक हालचालीत, उत्तर कारगिलमधील नियंत्रण रेषेच्या (एलओसी) भारतीय बाजूमध्ये घुसखोरी केली आणि काश्मीर आणि लडाखमधील दुवा तोडण्यासाठी आणि अशांतता निर्माण करण्यासाठी उंच टेकडीवर कब्जा केला.

मे 1999 मध्ये भारताला घुसखोरीची जाणीव झाल्यावर भारतीय लष्कराला ‘ऑपरेशन विजय’ सुरू करावे लागले आणि कारगिल युद्ध झाले. काश्मीरमधील कारगिल जिल्ह्यात आणि नियंत्रण रेषेवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात मे ते जुलै 1999 पर्यंत हा संघर्ष चालला. दुर्गम डोंगराळ भागात सुमारे दोन महिने घनघोर युद्ध झाले. ‘ऑपरेशन विजय’ अंतर्गत, भारतीय लष्कराने पाकिस्तानी घुसखोरांना हुसकावून लावले आणि टायगर हिल आणि इतर सामरिक स्थानांवर यशस्वीपणे कब्जा केला.

26 जुलै 1999 रोजी भारतीय जवानांनी तीन महिन्यांच्या संघर्षानंतर हा विजय मिळवला. कारगिल विजय दिवस दरवर्षी 26 जुलै रोजी भारताच्या युद्धातील विजय, भारतीय सैनिकांचे शौर्य आणि बलिदान यांचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो.

कारगिल विजय दिवसाचे महत्त्व

कारगिल विजय दिवसाचे आयोजन हे राष्ट्रीय एकात्मतेचे आणि देशभक्तीचे शक्तिशाली प्रतीक आहे. कारगिल युद्धाने भारताच्या कानाकोपऱ्यातील लोकांना सैन्याच्या समर्थनार्थ एकत्र केले. शिवाय, युद्धातील शौर्य आणि पराक्रमाच्या कथा येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देतात, त्यांच्यामध्ये राष्ट्राप्रती कर्तव्य आणि समर्पणाची भावना जागृत करतात. हुतात्म्यांचे बलिदान विसरले जाऊ नये म्हणून कारगिल विजय दिवसही साजरा केला जातो.

Paris Olympics 2024 live stream : कुठे आणि कसं पहाल Olympics ची ओपनिंग सेरेमनी? एका क्लिक वर जाणून घ्या

Paris Olympics 2024 live stream

Paris Olympics 2024 live stream। खेळाचा महाकुंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेला आजपासून सुरुवात होणार आहे. यंदाची ऑलिम्पिक पॅरिस मध्ये आयोजित करण्यात आली असून जगभरातुन 200 हून अधिक देशांतील खेळाडू पॅरिसमध्ये दाखल झाले आहेत. 26 जुलैपासून ते 11 ऑगस्ट पर्यंत ऑलिम्पिकचे नियोजन करण्यात आलं आहे. यावर्षीच्या ऑलिम्पिक मध्ये एकूण ३२ खेळ खेळण्यात येतील आणि 329 स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं आहे . सर्वानाच काय ऑलिम्पिक चा आनंद लुटण्यासाठी पॅरिसला जाणे शक्य नाही. परंतु तुम्ही घरबसल्या टीव्ही किंवा मोबाईलच्या साहाय्याने ऑलिम्पिक सामने बघू शकता. आज Olympics ची ओपनिंग सेरेमनी आहे. ती कुठे आणि कशी बघावी हेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

रात्री 11 वाजता ओपनिंग सेरेमनी- Paris Olympics 2024 live stream

भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजता 26 जुलै2024 रोजी पॅरिस ऑलिम्पिक ओपनिंग सेरेमनी सुरु होईल. भारतीय मीडिया कंपनी Viacom18 ने भारतात पॅरिस 2024 ऑलिम्पिकचे प्रसारण करण्याचे विशेष अधिकार प्राप्त केले आहेत. डिजिटल पार्टनर 26 जुलैपासून उन्हाळी ऑलिंपिकचे कव्हरेज देईल. Viacom18 संपूर्ण कार्यक्रमात 20 समवर्ती फीड्स ऑफर करेल. (Paris Olympics 2024 live stream)

Sports18 नेटवर्क पॅरिस ऑलिंपिक 2024 प्रसारित करेल आणि JioCinema सोबत सर्वसमावेशक कव्हरेज सुद्धा देईल.

Sports18 – 1 तमिळ आणि तेलगू भाषेच्या पर्यायांव्यतिरिक्त क्रीडा स्पर्धांचे इंग्रजीमध्ये प्रसारण करेल.

Sports18 – 2 हिंदीमध्ये ऑलम्पिकचे लाईव्ह कव्हरेज देईल.

तुम्ही जर मोबाईल वरून पॅरिस ऑलिम्पिकचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू इच्छित असाल तर त्यासाठी तुम्हाला जिओ सिनेमा अँप तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावं लागेल आणि मोबाईल नंबर टाकून सुरु करावं लागेल. याठिकाणी तुम्ही अगदी फ्री मध्ये ऑलिम्पिकचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकाल. यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क भरण्याची आवश्यकता नाही.

यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा ऐतिहासिक असेल कारण उद्घाटन सोहळा स्टेडियमच्या बाहेर होणार आहे. ऑलिम्पिकच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडणार आहे. या भव्य दिव्य उद्घाटन सोहळ्याला सुमारे 6 लाख लोक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. पॅरिसमध्ये 80 मोठे स्क्रीन लावण्यात येणार आहेत. जेणेकरून संपूर्ण शहरातील लोकांना Olympics ची ओपनिंग सेरेमनी पाहता येईल.