Sunday, December 28, 2025
Home Blog Page 5752

नेहमी राज्यपालांच्या अंगणात जाण्यापेक्षा कधीतरी स्वत:च्या अंगणात जावं; थोरातांचा भाजपला टोला

मुंबई । भाजपच्या ‘महाराष्ट्र बचाव’ आंदोलनानंतर सध्या महाराष्ट्रात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये घनघोर वाकयुद्ध सुरु आहे. भाजपने आपल्या आंदोलनात ‘मेरा आंगण, मेरा रणांगण’ या कॅचलाईनचा वापर केला होता. हाच धागा पकडत राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजप नेत्यांना ट्विटरवर चिमटा काढला आहे.

”भाजप नेत्यांनी कायम राज्यपालांच्या अंगणात जाण्यापेक्षा कधीतरी स्वत:च्या अंगणात म्हणजेच स्वतःच्या मतदारसंघात जाऊन जनतेला मदत करावी, असे थोरात यांनी म्हटले. चंद्रकांत दादांचे आंगण नेमके कोणते? देवेंद्र फडणवीस तरी आपल्या अंगणात नागपूरला गेले का? त्यांच्या अंगणात काँग्रेस कार्यकर्तेच मदतकार्य करत आहे,” असा टोलाही थोरात यांनी ट्विटरच्या माध्यमातून भाजप नेत्यांना लगावला.

कोरोनाच्या संकटकाळात राजकारण करायचे नाही. केंद्र व राज्य सरकारने एकमेकांच्या सहकार्याने काम करायचे, या पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाला काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी साथ दिली. पण मोदी यांच्या पक्षाचेच नेते राज्यात त्यांच्या आवाहनाला बगल देत आहेत. सत्ता गेल्यामुळे राज्यातील भाजपचे नेते वैफल्यग्रस्त झाले असून, सत्तेसाठी त्यांची तडफड चालली आहे, असंही थोरात यांनी म्हटले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

महाविकास आघाडीचं पॅकेज ऐकून भाजपचे डोळे पांढरे होतील – हसन मुश्रीफ

कोल्हापूर । आमचं सरकार बारा बलुतेदार आणि कामगारांसाठी मोठं पॅकेज जाहीर करेल तेव्हा भाजपचे डोळे पांढरे झाल्याशिवाय राहणार नाही, असा टोला राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपला लगावला आहे. त्यामुळं केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकारही आर्थिक पॅकेज जाहीर करणार असल्याचे संकेत हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत.

भाजपने महाराष्ट्रात ५० हजार कोटींचं पॅकेज जाहीर करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी भाजपने महाराष्ट्र बचाव आंदोलनही छेडले आहे. त्यावर बोलताना हसन मुश्रीफ यांनी हे संकेत दिले आहे. केंद्राने २० लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं. त्यात सगळं कर्जच आहे. पेंडिंग आणि लेंडिंगमध्ये खूप फरक असतो. या पॅकेजने काहीही फायदा होणार नाही. हे कसले पॅकेज? अशा शब्दांत मुश्रीफ यांनी केंद्राच्या पॅकेजची टर उडवली.

३ लाख कोटी कर्ज एमएसईबीला देण्यात आल्याचं सांगण्यात आलं. बँका दारात उभ्या करत नाहीत, त्यांना कर्ज कोणी देत नाही. पेंडिंग आणि लेंडिंग यामध्ये खूप मोठा फरक आहे. याचा लोकांना काहीही फायदा होत नाही, असं सांगतानाच आमचं सरकार जेव्हा पॅकेज जाहीर करेल तेव्हा भाजपचे डोळे पांढरे होतील, असा दावा त्यांनी केला.

जीएसटीची थकबाकी गेली तरी कुठे?
जीएसटीच्या मुद्द्यावरून मुश्रीफ यांनी भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला. जीएसटीच्या १२ हजार कोटीची थकबाकी कुठे गेलीय? कोविड विरोधात लढण्यासाठी पीएम केअर फंडमधून आतापर्यंत किती पैसा दिला? पीएम केअर फंडला सर्वाधिक पैसा पीएम केअर फंडला गेला. पण महाराष्ट्राला ४०० कोटी दिले. उत्तर प्रदेशला १५०० कोटी दिले, हा कुठला न्याय? असा सवालही त्यांनी केला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

‘त्या’ एका चुकीमुळं डोनाल्ड ट्रम्प यांचे बॅंक डिटेल्स झाले जगजाहीर

वृत्तसंस्था । कोरोना व्हायरस संपूर्ण जगात थैमान घालत आहे. बलाढ्य समजल्या जाणारी अमेरिकाही त्याला अपवाद नाही. अमेरिकेतही कोरोनाचा प्रकोप मोठ्या प्रमाणावर आहे. अशा सगळ्या गंभीर वातावरणात आता ट्रम्प हे नाव वारंवार चर्चेत आहे. कधी कोरोनाच्या साथीला चीनच जबाबदार असल्याचे रोज आगपाखड करण्यावरून, तर कधी जागतिक आरोग्य संघटनेवर चीनला पाठीशी घातल्याचा आरोप केल्याचं वक्तव्य करून ट्रम्प रोज आंतरराष्ट्रीय पटलावर चर्चेत आहेत. मात्र, वारंवार चर्चेत राहण्यासाठी धडपडणारे ट्रम्प आता एका प्रकरणात चर्चेत आल्यानं त्यांच्यावर नामुष्कीची वेळ आली आहे. कारण व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरींनी चुकून डोनाल्ड ट्रम्प यांचे बँक डिटेल्स सगळ्या जगाला सांगून टाकले आहेत. व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी केली मॅकनेनी यांनी करोनासंबंधीची माहिती देताना अनावधानाने डोनाल्ड ट्रम्प यांचे बँक डिटेल्स सांगून त्यांना अडचणीत टाकलं आहे.

सविस्तर माहितीनुसार, व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिव केली मॅकनेनी या पत्रकाराना कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ट्रम्प यांनी काय काय कामं केली? काय निर्णय घेतले ते सांगत होत्या. त्यावेळी काही दस्तावेज दाखवताना त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे बँक डिटेल्सही सांगून टाकले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या खासगी खात्याचे बँक डिटेल्स यामुळे जगाला समजले. १ लाख डॉलरचा चेक केली मॅकनेनी दाखवत होत्या. त्याचवेळी ट्रम्प यांच्या खासगी खात्याची माहितीही त्यांनी पत्रकारांना दाखवून टाखली.

कोरोनाच्या संकटापासून वाचण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचं तीन महिन्यांचं वेतन अमेरिकेच्या आरोग्य आणि मानव सेवा विभागाला दिलं आहे. यासंदर्भातच एक लाख डॉलरचा चेक साईन करण्यात आला होता. केली मॅकेनिन यांनी हा चेक दाखवताना ट्रम्प यांच्या खात्याची माहितीही देऊन टाकली. या सगळ्या प्रकारानंतर ट्रम्प सरकारच्या एका अधिकाऱ्याने पत्रकारांवरच राग काढला. ट्रम्प हे त्यांचं तीन महिन्यांचं वेतन हे कोरोनाशी लढण्यासाठी देत आहेत. ही बातमी महत्त्वाची आहे यापेक्षा त्यांचे बँक डिटेल्स सगळ्यांना समजले यालाच महत्त्व दिलं जातं आहे या गोष्टीला काय अर्थ आहे? असाही प्रश्न या अधिकाऱ्याने विचारला. ‘द गार्डियन’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

अनिल अंबानीवर कोसळलं संकट; २१ दिवसांत ५००० कोटी भरण्याचे लंडन न्यायालयाचे आदेश

नवी दिल्ली । रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांना लंडनमधील न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. न्यायालयाने त्यांना येत्या २१ दिवसांत तीन चिनी बँकांना ७१७ मिलियन डॉलर्स (५००० कोटी) चुकते करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अगोदरच आर्थिक तंगीचा सामना करत असलेल्या अनिल अंबानी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, रिलायन्स कम्युनिकेशन लिमिटेडने २०१२ साली कर्ज घेतले होते. या व्यवहारासाठी अनिल अंबानी यांनी वैयक्तिक हमी दिली होती. त्यामुळे न्यायालयाने अनिल अंबानी यांच्याकडून पैसे वसूल करण्याचे आदेश दिल्याचे समजते.

मात्र, अनिल अंबानी यांच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, अनिल अंबानी यांनी कधीही या कर्जासाठी वैयक्तिक हमी दिली नव्हती. त्यामुळे हे अनिल अंबानी यांचे वैयक्तिक कर्ज नाही. अनिल अंबानी यांनी अशा कोणताच कागदपत्रांवर स्वाक्षरी केली नव्हती. त्यामुळे आता अनिल अंबानी या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी कायदेशीर सल्ला घेत आहेत. लंडनमधील न्यायालयाच्या आदेशानुसार अंबानी यांना चीनच्या इंडस्ट्रीयल अँड कमर्शियल बँक, चायना डेव्हलपमेंट आणि एक्झिम बँक ऑफ चायना यांना पैसे द्यावे लागणार आहेत.

काही दिवसांपूर्वीच अनिल अंबानी यांनी आपल्या डोक्यावरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी बीएसईएस आणि यमुना डिस्कॉम या दोन वीज कंपन्यांमधील मोठा हिस्सा विकण्याचा निर्णय घेतला होता. या दोन्ही कंपन्यांचे मिळून सध्या ४४ लाख ग्राहक आहेत. यापूर्वीही त्यांनी आपल्या वीज वितरण कंपनीची विक्री केली होती. त्यांनी आपली रिलायन्स एनर्जी ही कंपनी अदानी समुहाच्या अदानी ट्रान्समिशन लिमिटेडला विकली होती. यानंतर आता अनिल अंबानी वीज कंपन्यांमधील ५१ टक्के हिस्सा विकणार असल्याचे कळते. हा हिस्सा विकत घेण्यासाठी ब्रुकफिल्ड एसेट मॅनेजमेंट, ग्रिनको एनर्जी, टोरंट पावर या कंपन्यांसह ८ कंपन्यांनी रस दाखवल्याचे समजते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

धक्कादायक! सातव्या पतीची हत्या करून पत्नीची आत्महत्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मध्य प्रदेशातील बालाघाटातून एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. जिथे एका ५५ वर्षीय व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या केली. या जोडप्याचे १० वर्षांपूर्वी लग्न झाले होते. ज्यामध्ये पत्नी नबाई हिचे हे सातवे लग्न तर तिचे पती लोकराम यांचे हे दुसरे लग्न होते. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

गुरुवारी दुपारपासून परिसरातील लोकांनी या दोघांना पाहिलेले नव्हते. सकाळी शेजारच्या गावातल्या बकीगुडा येथून मृताच्या मोठ्या मुलाला बोलावून घेऊन घराचा दरवाजा उघडला गेला, त्यानंतर पहिल्या खोलीत त्याच्या आईचा मृतदेह जमिनीवर पडलेलय अवस्थेत होता. जेव्हा दुसरी खोली उघडली तेव्हा त्याचे वडील लोकराम हे छताला लटकलेले होते.

मुलगा रामकिशोर चौधरी यांनी पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. चौकशीत पतीने पत्नीची हत्या करुन स्वत: ला गळफास लावून घेतला असे सांगण्यात आले. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. बिरसा पोलिस स्टेशनचे प्रभारी रविकांत दहेरिया म्हणाले की,” मारैटोला येथील एका घरात पती-पत्नीचा मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि समोरच्या खोलीत तसेच घरातील तिसऱ्या खोलीत महिलेचा मृतदेह जमिनीवर पडलेला आढळून आला.

असे मानले जाते की कौटुंबिक वादामुळे ही घटना घडली आहे. दोघांच्या शवविच्छेदनात त्यांनी मद्यपान केल्याची नोंद झाली आहे. मृताचे घर आतून बंद झाले होते, परंतु पोलिस या प्रकरणाचा सविस्तरपणे तपास करत आहेत. मृतकाचा मोठा मुलगा रामकिशोर चौधरी याने आपल्या वडिलांनी पुन्हा लग्न केल्याचे सांगितले. त्याच्या आईचे हे सातवे लग्न होते. दोघेही १० वर्ष एकत्र राहत होते आणि सध्या घरापासून दूर बिरसा येथे राहत होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

फेसबुकच्या कर्मचाऱ्यांना कायमसाठी वर्क फ्रॉम होम, परंतु…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संकट आणि लॉकडाऊनच्या दरम्यान, फेसबुकने आपल्या सर्व कर्मचार्‍यांना वर्क फ्रॉम होम देण्याची ऑफर दिली आहे. कंपनी ही ऑफर बर्‍याच काळासाठी सुरू ठेवू शकते. कंपनीचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी म्हटले आहे की,’ कंपनी आपल्या कर्मचार्‍यांना कायमचेच वर्क फ्रॉम होम करण्याची ऑफर देऊ शकते. झुकेरबर्ग म्हणाले की,’ फेसबुकला ‘वर्क फ्रॉम होम’ या धोरणाला प्रोत्साहन द्यायचे. ते म्हणाले पुढे म्हणाले की,’ फेसबुकला वर्क फ्रॉम होम यापुढेही चालू ठेवायचे आहे.’

मार्क झुकेरबर्ग म्हणाले की,” येत्या १० वर्षांत कंपनीचे सुमारे ५० टक्के कर्मचारी रिमोटली वर्किंग करतील. त्यांना कार्यालयात येण्याची गरज नाही. या निर्णयामुळे कर्मचार्‍यांचा कोणत्याही संसर्गापासून बचाव होईल. ते म्हणाले की,” ‘वर्क फ्रॉम होम’ केल्यामुळे कर्मचार्‍यांच्या पगारावर परिणाम होईल, मात्र ते मार्केट रेटच्या नुसार असतील आणि लोकेशन नुसार त्याच्याबाबत वेगवेगळ्या पद्धतीने निर्णय घेतला जाईल.

Facebook expands branded content program, will mark posts as 'paid'

ते म्हणाले पुढे की,” या ‘वर्क फ्रॉम होम’ पॉलिसीमुळे केवळ कर्मचार्‍यांनाच सोयीचे होणार नाही तर त्यामुळे कंपनीचा खर्चही कमी होईल, कारण ‘वर्क फ्रॉम होम’मुळे कंपनीच्या खाणे, वीज आणि इंटरनेटयावरील खर्च कमी होईल. या निर्णयाचा कंपनीच्या वित्त आणि कर्मचार्‍यांच्या पॅकेजवर काय परिणाम होईल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ते म्हणाले की,” यामुळे फेसबुकच्या ६० टक्के कर्मचार्‍यांना फ्लेक्झिबल वर्क एनवायरनमेंट आवडेल. ‘वर्क फ्रॉम होम’ मिळाल्यामुळे कम्पनीच्या सुमारे ५० टक्के कर्मचार्‍यांना इतर शहरांमध्ये जाणे सोयीचे होईल, कारण त्यांना स्वस्त शहराकडे जायचे आहे.

तसेच दुसरीकडे फेसबुकने असेही म्हटले आहे की,” लॉकडाऊननंतर ते केवळ २५ टक्के कर्मचाऱ्यांना घेऊन कार्यालयात काम करतील. इतरांकडे ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याचा पर्याय असेल. ज्या कर्मचार्‍यांना ‘वर्क फ्रॉम होम’ करायचे आहे त्यांना १ जानेवारी २०२१ पर्यंत त्यांची संपूर्ण माहिती आणि त्यांचे लोकेशन द्यावे लागेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

भारताच्या ‘त्या’ चार भागांवर ड्रॅगनची नजर

नवी दिल्ली । चीनकडून होणाऱ्या घुसखोरीच्या घटनांवर नजर टाकली तर त्यामध्ये एक समान पॅटर्न दिसून येतो. भारत आणि चीनमध्ये लडाख ते अरुणाचल प्रदेशपर्यंत ३,४८८ किलोमीटरपर्यंत सीमारेषा आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिले आहे.

२०१५ पासून चीनने भारतीय हद्दीत केलेल्या घुसखोरीच्या घटनांवर नजर टाकली तर ८० टक्के घुसखोरीच्या घटना या चार भागांपुरता मर्यादीत आहेत. यातले तीन भाग हे पश्चिम सेक्टरमध्ये येणाऱ्या पूर्व लडाखमधले आहेत. काही दिवसांपूर्वी पॅनगाँग टीएसओ तलावाच्या भागात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये जबरदस्त हाणामारी झाली होती. त्यात दोन्ही बाजूचे सैनिक जखमी झाले होते.

घुसखोरीच्या एकूण घटनांपैकी ट्रिग हाइटस आणि बुर्त्से या लडाखमधील दोन भागांमध्ये चीनकडून घुसखोरीच्या दोन तृतीयांश घटना घडल्या आहेत. २०१९ पासून चीनने दमचिलीच्या विरुद्ध दिशेला असलेल्या दोलीटँगो या नव्या एका भारतीय भागामध्ये घुसखोरी सुरु केली. २०१९ मध्ये चीनने इथे ५४ वेळा घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. त्याआधीच्या चार वर्षात चीनने तिथे फक्त तीन वेळा घुसखोरी केली होती.

दरम्यान, भारत आणि चीनमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी शुक्रवारी लेहचा दौरा केला. लडाखमधील वादग्रस्त नियंत्रण रेषेजवळ नेमकी काय परिस्थिती आहे, ते त्यांनी फिल्ड कमांडर्सकडून समजून घेतले. लष्करप्रमुखांच्या कुठल्याही दौऱ्याची लष्कराकडून आधी माहिती दिली जाते. पण यावेळी कुठलीही माहिती दिली नाही किंवा फोटो सार्वजनिक करण्यात आले नाहीत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

लडाख मध्ये लपलाय ‘हा’ खजिना ज्याच्यावर आहे लाल ड्रायगनची नजर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील काही काळ चीन हा लडाखवर नजर ठेवून आहे. काहीही झाले तरी त्याला येथे कब्जा करायचा आहे, पण भारताच्या कठोर भूमिकेमुळे त्याची ही युक्ती यशस्वी होऊ शकलेली नाही. अलीकडेच पुन्हा एकदा चिनी सैन्याने एलएसी लाइन ओलांडली आणि भारतीय सीमेवर प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, त्याला भारतीय सैनिकांकडून चोख प्रत्युत्तर मिळाले. मात्र, लडाखवर चीनची नजर येथे लपलेल्या खजिण्यासाठीच आहे हे फार थोड्या लोकांना ठाऊक आहे.

सामरिक तसेच आर्थिक दृष्टीने चीनसाठी लडाख हे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण असे म्हटले जाते की इथले पर्वत हे युरेनियम, ग्रॅनाइट, सोने तसेच रेअर अर्थसारख्य मौल्यवान धातूंनी परिपूर्ण आहेत आणि त्यामुळे चीन त्यांच्यावर डोळा ठेऊन आहे. ज्या गलवण क्षेत्रासाठी चीन आणि भारत यांच्यात वाद सुरू त्याच्या अगदी जवळच असलेल्या गोग्रा पोस्टच्या जवळ ‘गोल्डेन माउंटन’ आहे. असे म्हणतात की या डोंगरावर सोन्याचे बरेच साठे आहेत, ज्यामुळे ड्रॅगन वारंवार इथे घुसखोरी करण्यात गुंतला आहे.

यासह लडाखच्या बर्‍याच भागात उच्च दर्जाचा युरेनियम साठा सापडला आहे. ज्याद्वारे केवळ अणुऊर्जा नाही तर आण्विक बॉम्ब देखल बनवता येतील. २००७ मध्ये जर्मनीने लडाखमधील काही पर्वतांचे नमुने घेतले होते. त्यामध्ये ५.३६टक्के युरेनियम जमा असल्याचे आढळून आले. ते देशातील इतरत्र सापडलेल्या युरेनियमच्या साठ्यापेक्षा जास्त आहे. तेव्हापासून चीनचे या जागेकडे लक्ष आहे आणि त्याला ते आपल्या ताब्यात घ्यायचे आहे.

युरेनियमचा वापर अणुबॉम्बसाठी केला जातो
अलीकडेच चिनी तज्ञांनी अमेरिकेशी वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अणुबॉम्बची संख्या वाढवून १००० करण्याची घोषणा केली आहे. एका अंदाजानुसार सध्या चीनकडे जवळपास २६० अणुबॉम्ब आहेत. जर चीनला १००० अणुबॉम्ब बनवायचे असल्यास त्यांना मोठ्या प्रमाणावर युरेनियमची आवश्यकता भासु शकते. अशा परिस्थितीत चीन येथून युरेनियम काढून आपल्या अणुबॉम्ब वाढविण्यामध्ये मोठे यश मिळवू शकतो.

अरुणाचलच्या सीमेवर सोन्या आणि चांदीचे साठे
अरुणाचल प्रदेशमधील अप्पर सुबानसिरी जिल्ह्यापासून अवघ्या १५ किलोमीटर अंतरावर चीनने सोन्याचे उत्खनन केले आहे. त्याला हे सोने तिबेटमधील युलामेड गावात सापडले आहे. असे म्हटले जाते की या भागातून बरेच सोने, चांदी आणि रेअर अर्थ खनिजे सापडली आहेत, ज्याची किंमत सुमारे ६० अब्ज डॉलर्स एवढी आहे. ते काढण्यासाठी चीनने बोगदे बनविले असून उत्खननानंतर हजारो ट्रक येथे नेले जातात. चीनने या संपूर्ण प्रदेशात रस्ते आणि विमानतळांचे जाळेही तयार केलेले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

देशातील ‘या’ ४ राज्यांत अद्याप एकही कोरोनाबाधित रुग्ण सापडला नाही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूने गेल्या काही दिवसात भारतातही चांगलेच थैमान घातले आहे. देशातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या सव्वा लाख पार करून गेली आहे. तसेच रोज नव्याने संख्येत वाढ होते आहे. देशभरातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये या विषाणूचे संक्रमण झाले आहे. मात्र देशातील ४ राज्यांमध्ये अद्याप एकही कोरोनाबाधित रुग्ण सापडलेला नाही. यामध्ये दमन आणि दिव, लक्षद्वीप, सिक्कीम आणि नागालँड या राज्यांचा समावेश आहे. इथे अजून एकही रुग्ण सापडलेला नाही.

देशात सर्वाधिक रुग्णसंख्या ही महारष्ट्रात आहे. महाराष्ट्रात आजपर्यँत एकूण ४४५८२ रुग्ण सापडले आहेत. तर दादरा आणि नगर हवेली आणि अरुणाचल प्रदेश इथे सर्वात कमी म्हणजे केवळ एकाच रुग्णाची नोंद झाली आहे. तामिळनाडू, गुजरात, दिल्ली येथे रुग्णसंख्या १० हजार पार झाली आहे. या राज्यांमध्ये अनुक्रमे १४७५३, १३२६८, १२३१९अशी रुग्णसंख्या नोंदवली गेली आहे. राजस्थान, मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेश राज्यांमध्ये १० हजारांच्या आत म्हणजे अनुक्रमे ६४९४, ६१७०, ५७३५ इतके रुग्ण सापडले आहेत. पश्चिम बंगाल – ३३३२, आंध्रप्रदेश- २७०९, बिहार- २१७७, पंजाब- २०२९, तेलंगणा- १७६१, कर्नाटक-१७४३, जम्मू आणि काश्मीर- १४८९, ओडिसा-११८९, हरियाणा-१०६७ या राज्यांमधील संख्या १ हजार ते ५ हजार च्या दरम्यान आहे.

 

केरळ- ७३२, झारखंड- ३०८, आसाम- २५९, चंदीगड-२१८, त्रिपुरा- १७५, छत्तीसगड-१७२, हिमाचल प्रदेश- १६८, उत्तराखंड-१५३ राज्यातील रुग्ण तुलनेने कमी आहेत. गोवा-५४, लदाख-४४, अंदमान आणि निकोबार-३३, मणिपूर-२६, पाँडिचेरी-२६, मेघालय १४ या राज्यांमध्ये अजून कशंभरी पार झालेली नाही. देशभरात संचारबंदी लागू आहे. केरळ राज्याने उत्तम उपाययोजना राबविल्याचे सांगितले जात आहे. मात्र सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात असल्याने महाराष्ट्रातील धोका वाढला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

निष्काळजीपणाचा कळस! गोरखपूरला निघालेली श्रमिक रेल्वेगाडी अचानक पोहोचली ओडिशात

नवी दिल्ली । लॉकडाऊनमुळे विविध राज्यात अडकून पडलेल्या आणि नंतर पायीच घरी जाणाऱ्या परप्रांतीय मजुरांचे हाल होऊ लागल्याने अखेर त्यांना मूळ गावी जाता यावे म्हणून काही विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या आहेत. मात्र, अशीच एक मजुरांना घेऊन जाणारी महाराष्ट्रातून निघालेली रेल्वे उत्तर प्रदेशात जाण्याऐवजी ओडिशाला पोहोचली आणि एकच गोंधळ झाला. दरम्यान आता ही रेल्वे पुन्हा गोरखपूरला रवना करण्यात आली आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, काल गुरुवारी महाराष्ट्रातील वसई रोड स्थानकावरून उत्तर प्रदेशमधील गोरखपूर या ठिकाणी जाण्यासाठी एक श्रमिक रेल्वे निघाली होती. परंतु ती रेल्वे उत्तर प्रदेशात पोहोचण्याऐवजी ७५० किलोमीटर दूर अचानक ओडिशामध्ये पोहोचली. तोपर्यंत रेल्वे मोटरमनला काहीही समजले नाही. या प्रकारामुळे प्रवाशांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यानंतर घाईगडबडीत रेल्वे गोरखपूरकडे रवाना करण्यात आली.

आपला नियोजित मार्ग सोडून ही रेल्वे दुसरीकडे गेलीच कशी असे प्रश्न रेल्वे प्रशासनाला विचारले जात असताना त्यावर आता रेल्वे प्रशासनाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. ही रेल्वे आपला मार्ग सोडून अन्य ठिकाणी गेली नसल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. आम्ही याबाबत एक चाचपणी केली आणि तो एक नियोजनाचा भाग होता, असे रेल्वे कडून सांगण्यात आले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”