Sunday, December 28, 2025
Home Blog Page 5751

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लिहलं कोविड योद्ध्यांना भावनिक पत्र

मुंबई । महाराष्ट्रावर आलेल्या कोरोनाच्या संकटात आज डॉक्टर पोलीस, नर्स, सफाई कामगार आणि इतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र देशाची सेवा करत आहेत. या कोविड योद्ध्यांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भावनिक पत्र लिहून त्यांचे आभार मानले आहेत. त्यांच्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. शिवाय हे युद्ध आपल्याला शस्त्राने नाही तर सेवेने जिंकायचे आहे असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. याचबरोबर कोविड योद्धा म्हणून काम करण्याची तयारी दर्शविलेल्या सर्व कोविड योद्ध्यांना सलाम करताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्यांना व्यक्तिशः पत्र लिहून आभार व्यक्त केले आहेत.

आपल्या सर्वांना वैयक्तिक स्वरूपात पत्र लिहिताना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून माझी छाती अभिमानाने फुलून गेली आहे. हीच आपल्या महाराष्ट्राची आणि मराठी मातीची महान परंपरा आहे. संकटकाळात आपण मागे हटत नाही. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांप्रमाणे कणखर होतो. आज आपण सगळेच कोरोना साथीच्या भीषण संकटाशी युद्ध करत आहोत. हे युद्ध साधे नाही. या संकटात एक ‘सैनिक’ बनून आपण मैदानात उतरला आहात. माझ्या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्र रक्षणासाठी सज्ज झाला आहात, हे निश्चितच कौतुकास्पद आहे, अशा भावना मुख्यमंत्र्यांनी या पत्रात मांडल्या आहेत.

हे युद्ध सुद्धा सीमेवरील सैनिकांप्रमाणेच लढावे लागेल. महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक जणू आज एक सैनिक बनूनच संकटाचा मुकाबला करताना दिसत आहे. आपणासारखे कोविड योद्धा आता युद्धात उतरल्याने मला मुख्यमंत्री म्हणून मोठे बळ मिळाले आहे. ही एकप्रकारे देशसेवा आणि देवपूजाच आहे. हीच आपली संस्कृती आहे. शस्त्रापेक्षा ही मोहीम आपल्याला सेवेने जिंकायची आहे. थोडक्यात सेवा हेच आपले शस्त्र राहील. हा महाराष्ट्र, महाराष्ट्रातील जनता आपल्या रक्ताची आणि नात्याचीच आहे. महाराष्ट्राच्या हाकेला प्रतिसाद देत आपण पराक्रमाच्या परंपरेस जपत आहात. आपले आभार कसे मानवेत? ही सेवा महाराष्ट्राच्या व शिवरायांच्या चरणी रुजू झाल्याशिवाय राहणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी पत्रात पुढे नमूद केले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

मी लुक्क्यांना धमकी देत नाही; निलेश राणेंचे रोहित पवारांवर पुन्हा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निलेश राणे त्यांच्या ट्विटर च्या पोस्ट मुळे या काळात चांगलेच चर्चेत आले आहेत. आपल्या विशिष्ट शैलीमुळे त्यांचे ट्विट चांगलेच गाजते आहे. महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याविरोधात केलेल्या ट्विटमुळे त्यांनी तृतीयपंथीयांचा रोष ओढावून घेतला होता. नंतर त्यांना माफीही मागावी लागली. आता त्यांनी आमदार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्या एका मुलाखतीतील विधानाला उत्तर देत मी अशा लुक्क्यांना धमकी देत नाही असे ट्विट केले आहे.

नुकतीच रोहित पवारांनी बीबीसी मराठी ला ऑनलाईन मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत मुलाखतकाराने निलेश राणेंच्या बद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रोहित पवार यांनी आता मी त्यांच्या विधानांकडे फारसे लक्ष देत नाही. पवार साहेबांनी साखरेवर केंद्र सरकारशी केलेल्या पत्रव्यवहारावर निलेश राणेंनी दिलेल्या प्रतिक्रियेवर रोहित पवार यांनी त्यांच्याशी संवाद केला होता. मात्र नंतर त्यांची भाषा आणि त्यांचे विचार पाहता, विचारांची पातळी पाहता मला त्यांच्याशी संवाद साधण्यात फार स्वारस्य वाटले नाही आणि मी प्रतिक्रिया देणे बंद केले असून आता मी दुर्लक्ष करतो आहे. आणि त्यांच्या धमक्यांना मी घाबरत नाही असे ते म्हणाले होते.

 

यावर निलेश राणे यांनी ट्विट केले असून “अरे येड्या मी धमकी दिलीच नाही, अशा लुक्क्यांना मी धमकी देत नाही आणि राहिला विषय विचारांच्या लेव्हलचा तर तुला समजेल त्याच भाषेत समजवलं तुला” असे ट्विट त्यांनी केले आहे. माझा आणि निलेश राणे यांचा फारसा संबंध आलेला नाही. त्यांच्या बंधूंशी काही वेळा चर्चा होत असते पण निलेश राणेंशी संवाद साधण्याची ईच्छा नाही आहे असेही रोहित पवार या मुलाखतीत म्हणाले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

कराड तालुक्यात पुन्हा ५ तर पाटण १ नवीन कोरोनाग्रस्त; जिल्ह्यातील रुग्णसंख्या 247 वर

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे दाखल असणारे 6 नागरिकांचा अहवाल कोरोनाबाधित आल्याची माहिती जिल्हा शल्यचिक्सिक डॉ आमोद गडीकर यांनी दिली आहे. यामध्ये म्हासोली ता. कराड येथील 1 मुलगी (वय 15), 1 पुरुष (वय 71 ), ढेबेवाडी फाटा ता. कराड येथील 1 मुलगी (वय 18) 1 युवक (वय 23) 1 महिला (वय 44), गलमेवाडी कुंभारगाव ता. पाटण येथील 1 युवती (वय 24) असे एकूण 6 जणांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तसेच 14 जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याचेही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.

139 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने तपासणीला पाठविले
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, येथील 20, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 44, ग्रामीण रुग्णालय, वाई येथील 11, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 54, उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथील 2 व ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथील 8 असे एकूण 139 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस. पुणे यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या- 247 झाली असून या पैकी उपचार घेत असलेले कोरोनाबाधित रुग्णसंख्या 127 इतकी असून कोरोना मुक्त होवून घरी गेलेले रुग्णसंख्या 114 आहे तर मृत्यु झालेले 6 रुग्ण आहेत.

Satara

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

मुंबई लोकल सुरु करा! शरद पवार, उद्धव ठाकरे रेल्वेमंत्र्यांशी बोलणार

मुंबई । राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये मुंबईतील लोकल ट्रेन सुरु करण्याबाबत एकमत झाले. किमान अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी तरी लोकल सेवा सुरु करावी, असे बैठकीत निश्चित झाले. त्यानुसार आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याशी चर्चा करणार आहेत. यावेळी ते मुंबईची लाईफलाईन सुरु करण्याची विनंती रेल्वेमंत्र्यांना करतील.

याशिवाय, बैठकीत लॉकडाऊन संपल्यानंतर काय करायचे यासंदर्भातही चर्चा झाली. लॉकडाऊन कसा शिथील करता येईल, यावर बैठकीमध्ये बराच खल सुरु होता. येत्या ३१ तारखेला लॉकडाऊनचा कालावधी संपत आहे. त्यामुळे आता लवकरच राज्य सरकारकडून नव्या सूचना जारी केल्या जाऊ शकतात.

सध्याच्या घडीला मुंबईतील कोरोना रुग्णांच्या संख्येने २५ हजाराचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या काही दिवसांत सातत्याने दिवसाला १५०० पेक्षा नव्या रुग्णांची नोंद होत आहे. नजीकच्या काळात हा आकडा आणखी वाढेल, अशी भीती आहे. त्यामुळे मुंबईत लोकल सेवा सुरु करणे, कितपत योग्य ठरेल, हा प्रश्नच आहे.

दरम्यान, आता रेल्वे मंत्रालय मुंबईतील लोकल सेवा सुरु करण्यासंदर्भात काय निर्णय घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. यापूर्वी रेल्वे मंत्रालयाने १ जुनपासून प्रत्येक दिवशी २०० लांब पल्ल्याच्या गाड्या चालवण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. या एक्स्प्रेस गाड्यांच्या तिकीट आरक्षणालाही शुक्रवारपासून सुरुवात झाली. या सर्व गाड्या बिगरवातानुकूलित (नॉन एसी) असतील. तर सध्या राजधानी मार्गावर फक्त वातानुकूलित एक्स्प्रेस चालवल्या जात आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

सचिनचे वडील UPSC च्या विद्यार्थ्यांना मराठी लिटरेचर शिकवायचे; IPS अधिकार्‍याने सांगितली आठवण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  तेलंगणातील राचकोंडा जिल्ह्याचे आयपीएस अधिकारी महेश भागवत यांनी आपल्या इंस्टाग्राम अकॉउंट वरून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत त्या क्षणाची आठवण त्यांनी सांगितली आहे. त्यांची आणि सचिनची भेट किती महत्वपूर्ण आणि भावनिक होती हे त्यांच्या फोटोखालील आशयाने लक्षात येते. त्यांचे आणि सचिन सोबत असणारे विशेष नातेही त्यांनी या पोस्टद्वारे सांगितले आहे. हैद्राबाद येथील उप्पल क्रिकेट मैदानावर २२ मे २०१७ रोजी ते सचिनला भेटले होते.

महेश भागवत यांनी त्यांची यूपीएससीची तयारी मुंबई येथे केली होती. त्या काळातली एक विशेष आठवण त्यांनी शेअर केली. सचिनचे वडील प्रसिद्ध कादंबरीकार रमेश तेंडुलकर यांच्याकडून महेश भागवत यांनी मराठी विषयाचे धडे घेतले आहेत. त्यामुळे सचिनची भेट झाल्यावर रमेश तेंडुलकर यांच्या आठवणी जाग्या झाल्या. यावेळी तो भावुक झाल्याचे त्यांनी त्यांच्या पोस्टद्वारे सांगितले. हैद्राबाद मध्ये आयपीएल च्या अंतिम सामन्याच्या वेळी दोघांची भेट झाली होती. या भेटीदरम्यान त्यांनी मुंबई इंडियन्स च्या विजयासाठी त्याचे अभिनंदन केल्याचेही त्यांनी लिहिले आहे.

WhatsApp Image 2020-05-23 at 6.31.40 PM

रमेश तेंडुलकर हे मराठीतील ख्यातनाम कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध आहेत. मुंबईत यूपीएससीची तयारी करीत असताना महेश भागवत यांनी एसआयएसी मध्ये १९९३-९४ च्या दरम्यान त्यांनी रमेश तेंडुलकर यांच्याकडून मराठीचा पाठ घेतला होता. सचिनसोबत भेट म्हणजे रमेशजींच्या आठवणीचा उजाळाही होता. अशा पद्धतीने त्यांचे व सचिनचे विशेष नाते त्यांनी शेअर केले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

देशासाठी पदक जिंकणाऱ्या ललिता बाबरचा एक वर्षांचा मुलगासुद्धा ‘कोविड योद्धा’ बनतो तेव्हा..!!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या तुलनेत महाराष्ट्राची संख्या सर्वाधिक आहे. प्रशासन उपाययोजना राबवत आहे. उपाययोजनांसाठी राज्य सरकारने जनतेला मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करण्याचे आवाहन केले आहे. या निधीतून जमा होणारी रक्कम कोरोनामुळे ओढवलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी केला जाणार आहे.अनेकांनी यामध्ये मदत केली आहे. आता या यादीत महाराष्ट्राची धावपटू ललिता बाबर आणि तिचे पती महसूल सेवेत असणारे डॉ संदीप भोसले यांचेही नाव आले आहे. त्यांच्या मुलाच्या पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी या दाम्पत्याने ५०,०००रु मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिले आहेत.

महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील एका छोट्या गावातून असलेल्या ललिता बाबर या रिओ दि जेनेरिओ समर ऑलिम्पिक मध्ये ३२ वर्षांमध्ये निवड झालेल्या पहिल्या व्यक्ती आहेत. या ऑलिम्पिक मध्ये महिलांच्या ३००० मीटर धावण्याच्या स्पर्धेत त्यांनी ९:२२:७४ या वेळेसह १०वे स्थान पटकावले होते. २०१५ साली एशिया चॅम्पियनशिप मध्ये त्यांनी सुवर्ण पदक पटकावले होते. ऍथलेटिक्स मधील योगदानाबद्दल २०१६ साली तिला राष्ट्रपतींनी अर्जुन पुरस्कार देऊन गौरवीत केले होते.

 

महाराष्ट्राच्या छोट्या गावातून येऊन ऑलिम्पिक मध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणारी धावपटू म्हणून महाराष्ट्राला त्यांचा अभिमान आहे. या संकटकाळात राज्याच्या मदतीसाठी त्यांनी दिलेल्या रकमेमुळे त्यांची समाजप्रती असणारी बांधिलकी ही दिसून येते आहे. त्यांनी केलेल्या मदतीसाठी त्यांचे आभार मानून त्यांचा मुलगा रुद्रप्रताप याला मुख्यमंत्र्यांनी शुभाशीर्वाद दिले आहेत. दरम्यान राज्यातील रुग्णांची संख्या ४४ हजार पार झाली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

‘रेडी’मध्ये सलमान खानसोबत काम केलेल्या मोहित बघेल याचे कर्करोगाने निधन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सलमान खानसोबत ‘रेडी’ या चित्रपटात काम केलेला मोहित बघेल याचे आज शनिवारी निधन झाले. लेखक आणि दिग्दर्शक राज शांडिल्य यांनी ट्विटरवर मोहितच्या मृत्यूविषयी माहिती दिली आहे. मोहित बऱ्याच दिवसांपासून कर्करोगाशी झुंज देत होता. २६ वर्षांचा असलेला मोहित रेडीमध्ये छोटी अमर चौधरीच्या भूमिकेत दिसला होता.

राज शांडिल्य यांनी ट्वीट केले- “मोहित माझ्या भावा, इतक्या लवकर जाण्याची काय गरज होती? मी तुला सांगितले होते ना, पहा ही संपूर्ण इंडस्ट्री तुझ्यासाठी थांबली आहे, लवकर ठीक होऊन ये,तु खूप चांगली अ‍ॅकटिंग करतो, म्हणूनच पुढच्या चित्रपटाच्या सेटवर तुझी वाट पाहीन … आणि तुला यावंच लागेल. ॐ साई राम #cancer RIP.

मोहित रेडी व्यतिरिक्त, २०१९ मध्ये परिणीती चोप्रा आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या जबरिया जोडी या चित्रपटात दिसला होता. छोटे मियां या कॉमेडी शोमधून त्याने आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली होती. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार राजने मोहितला त्याच्या पुढच्या चित्रपटासाठी साइन केले होते. मोहितने राजला आपला गुरू मानले होते आणि त्याच्याबरोबर कॉमेडी सर्कसमध्येही त्याने काम केले आहे.

 

मोहितचा जन्म १९९३ मध्ये मथुरा, उत्तर प्रदेशा येथे झाला होता. त्याच्या अभिनयावरील प्रेमामुळेच तो मुंबईला आला.

परिणीती चोप्रानेही मोहितच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला.तिने ट्वीट केले,’ काम केलेल्या सर्वोत्कृष्ट लोकांपैकी तो एक होता. तो नेहमी आनंदी, सकारात्मक आणि प्रेरणादायक असायचा.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

इग्नूने (ignou) दिली विद्यार्थ्यांना असाइनमेंट सबमिट करण्यास मुदतवाढ

नवी दिल्ली । इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठानं (ignou) जून २०२० च्या सत्रअखेर परीक्षेसाठी असाइनमेंट सादर करण्याची मुदत वाढविली आहे. आता इग्नूचे विद्यार्थी १५ जूनपर्यंत आपले असाइनमेंट सादर करू शकतात. कोरोनाव्हायरस साथीच्या आजारापासून बचाव करण्यासाठी देशभरात असलेला लॉकडाऊन लक्षात घेऊन मुदतीत वाढ करण्यात आली आहे.

जुलै सत्र (वार्षिक अभ्यासक्रम) आणि जानेवारी सत्र (सेमेस्टर आधारित अभ्यासक्रम) मध्ये प्रवेश घेणारे उमेदवार १५ जूनपर्यंत आपले असाइनमेंट सादर करू शकतात. आता प्रोजेक्ट, डेझर्टेशन आणि जर्नलशी संबंधित असाइनमेंट देखील या मुदतीपर्यंत सादर केल्या जाऊ शकतात. इग्नूने जारी केलेल्या निवेदनानुसार विद्यार्थ्यांना प्रादेशिक केंद्रांकडून असाइनमेंटबद्दल अधिक माहिती मिळू शकेल. यापूर्वी इग्नूने ३० एप्रिल ते ३१ मे दरम्यान दोन वेळा टीईई जून 2020 च्या परीक्षेची अंतिम मुदत वाढविली होती. इग्नूने जून टर्म एन्ड परीक्षेसाठी अर्ज भरण्याची मुदतही ३१ मे पर्यंत वाढविली आहे.

लॉकडाऊनमध्ये झालेली वाढ लक्षात घेता इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने (ignou) त्यांच्या टीईई २०२० जूनच्या परीक्षेच्या अर्जाची तारीख ३१ मे पर्यंत वाढवली. आहे. इग्नू परीक्षा देण्यास इच्छुक उमेदवार इग्नू परीक्षा पोर्टलवर ignou.ac.in वर लॉग इन करू शकतात आणि त्यांची नोंदणी करू शकतात. यापूर्वी १ जून २०२० रोजी होणारी टीईई परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. लॉकडाउनमुळे देशभरात असलेल्या इग्नूच्या सर्व ५६ प्रादेशिक केंद्रांवरील सर्व कामकाज स्थगित करण्यात आले आहे. इग्नू पदवी पदवीधर, पदव्युत्तर पदवी, प्रमाणपत्र आणि पदविका स्तरावरील सुमारे २७७ अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

धक्कादायक! एका विहिरीत सापडले ९ मजूरांचे मृतदेह

हैदराबाद । तेलंगणाच्या वारंगल ग्रामीण जिल्ह्यात अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका गावातील विहिरीतून तब्बल ९ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. यातील ६ मृतदेह हे एकाच कुटुंबातील असल्याचं समजत आहे. इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, ही घटना वारंगलच्या गोर्रेकुंटा गावात घडली आहे. गुरूवारी संध्याकाळी ४ मृतदेह सापडले तर शुक्रवारी सकाळी ५ मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले. यापैकी कोणत्याही मृतदेहावर जखमेचे कोणतेही निशाण आढळून आले नाही. ही आत्महत्या असल्याचं पोलिसांनी नाकारलं आहे. जर ही आत्महत्या असतील तर एकाच कुटुंबातील आत्महत्या केली असती यामध्ये आणखी ३ लोकांचा समावेश नसता.

मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमध्ये राहणारे मकसूद आलम आणि त्यांची पत्नी गेल्या २० वर्षांपासून कामाच्या निमित्ताने वारंगल येथे काम होते. उपजिविकेसाठी जूटची बॅग बनवण्याच काम हे दोघे येथे करत होते. आलम हे ६ लोकांच्या कुटुंबासह करीमाबाद येथे भाड्याने राहत होते. मात्र लॉकडाऊननंतर त्यांनी जूट मालकाला गोदामात राहण्याची परवानगी द्यावी अशी विनंती केली. त्यानंतर हे संपूर्ण कुटूंब गोदामातील तळमजल्यावर राहत होते तर बिहारचं श्रीराम आणि श्याम यांचं एक कुटूंब पहिल्या माळ्यावर राहत होतं.

या घटनेची माहिती तेव्हा मिळाली जेव्हा गोदाम मालकाला या कुटुंबासह ३ लोक हरवले असल्याच कळलं. त्यांनतर शोधाशोध सुरू झाल्यावर यांचे मृतदेह विहिरीत सापडले. त्यानंतर आलम, त्याची पत्नी, मुलगी, ३ वर्षांचा नातू, मुलगा सोहेल आणि शाबाद यांच्यासोबतच त्रिपुराचे शकील अहमद आणि बिहारचे श्रीराम आणि श्याम यांचे मृतदेह विहिरीतून काढण्यात आले. या तिघांनी आत्महत्या का केली? असा प्रश्न उभा राहतो. लॉकडाऊनमध्ये काम नसलं तरीही कालांतराने कारखाना सुरू करण्याचा मालकाचा विचार होता. यामुळे या आत्महत्येमागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

.. म्हणून पार वाकून संजय राऊतांनी केला राज्यपालांना नमस्कार

मुंबई । शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राजभवनात जाऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आहे. संजय राऊत यांनी गेल्या काही दिवसांमध्ये राज्यपालांवर बोचरी टीका केली होती. राऊत यांच्या या टीकेमुळे राज्यपाल चांगलेच नाराज झाले होते. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी आज राज्यपालांची भेट घेऊन या कटुतेला तिलांजली दिल्याचे सांगितले जातं आहे. दरम्यान, संजय राऊत यांनी या भेटीवेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना वाकून नमस्कार केला. हा फोटो सोशल मीडियावर काही मिनिटांमध्येच व्हायरल झाला. आता या फोटोबाबत संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

भगतसिंग कोश्यारी हे माझ्यापेक्षा मोठे असल्यामुळे त्यांना नमस्कार केला. आमच्या दोघांमध्ये चांगली चर्चा झाली. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महाविकासआघाडी सरकार चांगलं चालतंय, त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही, असं राज्यपालांना सांगितल्याचं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे. राऊत आणि राज्यपाल यांच्यात तब्बल १५ ते २० मिनिटे चर्चा झाली. त्यामुळे या भेटीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राऊत बॅकफूटवर गेलेले दिसले. राज्यपाल आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आहेत. त्यांचे आणि माझे खूप जुने संबंध आहेत. खूप दिवस त्यांना भेटलो नव्हतो. त्यामुळे आज त्यांची सदिच्छा भेट घेतली, असं राऊत म्हणाले.

राज्यपाल आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातही कोणताही दुरावा नसल्याचे राऊत यांनी या भेटीनंतर स्पष्ट केले. राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांचेही मधूर संबंध आहेत. दोघांमध्ये पिता-पुत्राचं नातं आहे. सरकार आणि राज्यपालांमध्ये कोणतीही दरी नाही. आमच्यात दऱ्या वैगैरे वाढत नाही. ते पालक असून घटनात्मक प्रमुख आहेत. राज्यपाल हे सर्वांना प्रियच असतात. पण विरोधक जेव्हा राजकारण करतात तेव्हा आम्ही भाष्य करत असतो, असे राऊत यांनी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”