Sunday, December 28, 2025
Home Blog Page 5753

सोन्याच्या किंमतींत लॉकडाऊन मध्ये भरमसाठ वाढ; जाणून घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । २५ मार्चपासून देशभरात सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या चार टप्प्यातील पहिल्या, तिसर्‍या आणि चौथ्या टप्प्यात सोन्याच्या किंमतींनी अनेक विक्रम नोंदवले. २५ मे ते १४ एप्रिल या कालावधीत लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन १.० मध्ये २४ कॅरेट सोन्याची किंमत २६१० रुपयांनी वाढली तर दुसऱ्या टप्प्यातही सोन्याची चमक वाढली होती. १४ एप्रिल ते ३ मे दरम्यान सोन्याचे भाव केवळ १२१ रुपयांनी वाढले, परंतु तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच लॉकडाउन ३.० म्हणजे ३ मे ते १७ मे या कालावधीत सोन्याचे पुन्हा वाढले आणि ते प्रति १० ग्रॅम ११५४ रुपयांवर गेले. १८ मे ते ३१ मे दरम्यान लॉकडाउन ४.० लागू आहे. यास एक आठवडा उलटला आहे, मात्र २२ मेपर्यंत सोन्याची किंमत ७९४ रुपयांवर गेली आहे. मात्र, यावर्षी जानेवारी ते २२ मे या कालावधीत सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम सुमारे ७००० रुपयांनी महाग झाले आहेत.

लॉकडाऊन                                 २४ कॅरेट सोन्याचे दर बदला (रुपये / १० ग्रॅम)
पहिला टप्पा                                                        २६१०
दुसरा टप्पा                                                          १२१
तिसरा टप्पा                                                       ११५४
चौथा टप्पा                                                          ७९४
स्रोत: आयबीजेए

लॉकडाउनमध्ये अनेक रेकॉर्ड बनलेले आणि मोडलेले

९ एप्रिल रोजी प्रथमच सोन्याच्या भावात ४५२०१ रुपयांची वाढ दिसून आली. याच्या चार दिवसांनंतरच हा विक्रम मोडला गेला आणि १३ एप्रिल रोजी सोन्याचे दर दहा ग्रॅम ४६०३४ रुपयांवर पोहोचले. सोन्याने या दिवशी आपला नवीन सर्वकालीन विक्रम स्थापित केला, मात्र १५ एप्रिल रोजी तो कोसळला. सोन्याने प्रति १० ग्रॅम ४६५३४ रुपये वाढून नवीन शिखर गाठले. या विक्रमांना दुसर्‍याच दिवशी १६ एप्रिलला ब्रेक लागला आणि १० ग्रॅम सोन्याची किंमत ४६,९२८ रुपये होती. यानंतर १५ मे रोजी सोन्याने ४७०६७ रुपयांवर पोहोचून नवा विक्रम केला. यानंतर १७ मे रोजी पुन्हा नवीन विक्रम नोंदवत ४७८४६रुपयांवर पोहोचले.

तारीख        24 कॅरेट सोन्याची किंमत          23 कॅरेट सोन्याची किंमत          22 कॅरेट सोन्याची किंमत
22 मे                  47067                                         46911                                     43144
17 मे                  47861                                         47756                                     43920
4 मे                    45913                                         45729                                     42056
13 एप्रिल            46034                                         45850                                     42056
25 मार्च              43424                                         43250                                     39776
स्रोत: आयबीजेए

या महिन्यात दहा ग्रॅम सोने ५० हजार रुपयांपर्यंत पोहोचू शकतं
कोरोना संकट अधिक गडद होत असताना, अमेरिका-चीनमधील वाढत्या व्यवसायाचा तणाव यामुळे त्याच महिन्यात सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम ५० हजार रुपयांपर्यंत पोहोचू शकते. तज्ञांच्या मते, कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या सापळ्यात आलेली आहे. त्याच वेळी, अमेरिका आणि चीनमधील व्यापार तणाव पुन्हा वाढत आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांच्या सोन्याचा कल वाढला आहे.

यावर्षी सोन्याने 7000 रुपयांची उसळी घेतली

महिना                                                                  किंमत
17 मे 2020                                                          47861
3 एप्रिल 2020                                                      43936
24 फेब्रुवारी 2020                                                 44,472
जानेवारी 2020                                                     41000
डिसेंबर 2019                                                       39108
नोव्हेंबर 2019                                                      38031
ऑक्टोबर 2019                                                    38578
सप्टेंबर 2019                                                       36913
ऑगस्ट 2019                                                       38656
जुलै 2019                                                            34517
जून 2019                                                            34206
मे 2019                                                               32098
एप्रिल 2019                                                         31756
मार्च 2019                                                           31734
फेब्रुवारी 2019                                                      32981
जानेवारी 2019                                                     33056
(किंमत दहा ग्रॅम)

सोने संकटकाळातील साथीदार
केडिया अ‍ॅडव्हायझरीचे संचालक अजय केडिया म्हणाले की,” कोरोनाव्हायरसचा उद्रेक झाल्यामुळे जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या सापळ्यात अडकली आहे, तर अमेरिका आणि चीनमधील व्यापार तणाव पुन्हा वाढत आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांचा कल हा सोन्याच्या सुरक्षित गुंतवणूकीकडे वाढत आहे. त्याचबरोबर एंजल ब्रोकिंगचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता म्हणाले की,’ सोने हे सध्या गुंतवणूकदारांचे पसंतीच्या गुंतवणूकीचे साधन आहे कारण सोने हे संकटकाळातील साथीदार आहे.’

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

टिक-टॉक हा एक चायनीज व्हायरस; शक्तिमान फेम मुकेश खन्नांनी पोस्ट केला इंस्टाग्राम व्हिडिओ

नवी दिल्ली । गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर टिक-टॉकर्स विरुद्ध युट्यूबर्स यांचे युद्ध रंगले आहे. यात आता शक्तिमान या लोकप्रिय मालिकेत पहिल्या भारतीय सुपर होरोची भूमिका साकारणारे अभिनेते मुकेश खन्ना यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. प्ले स्टोअरवर टिक-टॉकचे रेटिंगही कमी झालं ही इतक्या वाईट बातम्यांमध्ये एक चांगली बातमी समोर आली असून एका चायनीज व्हायरस आपल्यापासून दूर जातो आहे असं झालं आहे. अशी तिखट प्रतिक्रिया त्यांनी दिली.

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका व्हिडिओत मुकेश खन्ना यांनी चायनीज वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्याचबरोबर टिकटॉकमुळं तरुण पिढीचे नुकसान होत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. टिकटॉकचं रेटिंग कमी झाल्यानंतर त्यांनी आनंद व्यक्त केला.


View this post on Instagram

 

टिक टोक टिक टोक घड़ी में सुनना सुहावना लगता है। लेकिन आज की युवा पीढ़ी का घर मोहल्ले सड़क चौराहे पर चंद पलों की फ़ेम पाने के लिए सुर बेसुर में टिक टोक करना बेहुदगी का पिटारा लगता है।कोरोना चायनीज़ वाइरस है ये सब जान चुके हैं।पर टिक टोक भी उसी बिरादरी का है ये भी जानना ज़रूरी है। टिक टोक फ़ालतू लोगों का काम है।और ये उन्हें और भी फ़ालतू बनाता चला जा रहा है।अश्लीलता, बेहुदगी, फूहड़ता घुसती चली जा रही है आज के युवाओं में इन बेक़ाबू बने विडीओज़ के माध्यम से। इसका बंद होना ज़रूरी है।ख़ुशी है मुझे कि इसे बाहर का रास्ता दिखाया जा रहा है।मैं इस मुहिम के साथ हूँ।

A post shared by Mukesh Khanna (@iammukeshkhanna) on

ट्यूबर कॅरी मिनाटीचा टिक-टॉकवरील रेकॉर्डब्रेक व्हिडिओ यूट्यूबकडून डिलीट झाल्यानंतर त्याचे चाहते व अनेक युट्यूबर्सनं त्याविरोधात आवाज उठवला होता. मुकेश खन्ना यांनीही व्हिडिओ डिलीट करणं चुकीचं असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. जर तुम्हाला व्हिडिओ डिलीटचं करायचा आहे तर ते सगळे व्हिडिओ डिलीट करा जे आपत्तिजनक आहेत असं मुकेश खन्ना म्हणाले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

हर्षवर्धन जाधवांची राजकारणातून अचानक निवृत्ती; राजकीय वर्तुळात खळबळ

औरंगाबाद प्रतिनिधी । माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आज राजकारणातून निवृत्ती घेतली आहे. फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट करून जाधव यांनी याबाबत माहिती दिली आहे. हर्षवर्धन यांनी अचानक राजकीय सन्यास घेतल्याची घोषणा केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. माझी पत्नी इथून पुढे माझी राजकीय वारसदार असेल असं जाधव यांनी व्हिडिओध्ये सांगितले आहे. हर्षवर्धन जाधव दोन वेळा कन्नडचे आमदार राहिले आहेत. राजकीय आणि कौटुंबिक कलहामुळे हर्षवर्धन जाधव अनेकदा चर्चेत होते. जाधव हे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचे जावईदेखील आहेत.

“लॉकडाउन सुरु असल्याने सर्वजण वाचनाचा छंद जोपासत आहेत. मी देखील माझा अध्यात्मिक वाचनाचा छंद जोपासला. यामधून आपण ज्या गोष्टींसाठी विनाकारण पळत राहतो त्याची जाणीव मला झाली. म्हणून मी राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या राजकारणाची उत्तराधिकारी माझी पत्नी संजना जाधव असेल. आपल्याला जे काही प्रश्न असतील ते तुम्ही संजना जाधव यांच्याकडून सोडवून घ्यावेत अशी विनंती मी करतो”. असं हर्षवर्धन जाधव यांनी सांगितले आहे.

https://www.facebook.com/233568413961102/videos/242865453480876/

“प्रत्येक घरात वाद होत असतात. पण त्याचा चुकीचा अर्थ लावला जाऊ नये. मी संजना जाधव यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. रावसाहेब दानवेंच्या आशिर्वादाने आणि नेतृत्त्वाखाली संजना जाधव उत्तुंग भरारी घेतील याबाबत मनात शंका नाही. त्यामुळे आपण सर्वांना राजकीय, शासकीय मदतीसाठी संजना जाधव यांच्याशी संपर्क साधावा,” असं जाधव यांनी सांगितलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

आता कोरोनासोबत आनंदाने जगणं शिकलच पाहिजे, त्यासाठी हे झक्कास १७ उपाय

 हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न हे जगभरातून केले जात आहेत. अनेक शास्त्रज्ञ लस शोधण्यात व्यस्त आहेत. सध्या संक्रमण टाळण्यासाठी संचारबंदी ही जगात अनेक ठिकाणी लागू करण्यात आली आहे. मात्र इतक्या लवकर आणि सहज हा विषाणू आपल्यामधून जाणार नाही असे शास्त्रज्ञांनी आणि अभ्यासकांनी सांगितले आहे. त्यामुळे या विषाणूची लस येईपर्यंत अथवा याचा समूळ नायनाट होईपर्यंत घरातच वाट पाहत बसणे शक्य नाही. त्यामुळे आपण घराबाहेर पडून आपले दैनंदिन जीवन जगू शकतो. अशी माहिती यु.एस.ए मधील मेरीलँड विद्यापीठातील संसर्गजन्य रोग क्लिनिक चे प्रमुख डॉ फहीम युनूस यांनी दिली आहे.

Faheem Younus, MD (@FaheemYounus) | Twitter
आता थोडेसे प्रामाणिक आणि व्यावहारिक – संसर्गजन्य रोग क्लिनिक, मेरीलँड विद्यापीठ, यु.एस.ए प्रमुख. 

१. कदाचित आपल्याला पुढचे काही महिने किंवा वर्षे Covid-१९ सोबत राहावे लागेल. त्यामुळे हे नाकारून किंवा घाबरून चालणार नाही. आपले आयुष्य निरुपयोगी होऊ देऊ नका. या वस्तुस्थितीसह जगणे शिकूया
२. ४-५ लिटर गरम पाणी पिऊन पेशींच्या आत गेलेल्या Covid -१९ विषाणूला तुम्ही नष्ट करू शकत नाही. फारतर अनेकदा बाथरूमला जाऊ शकता.
३. हात धूत राहणे आणि १-२ मीटर भौतिक अंतर राखणे ही  सुरक्षित राहण्याची उत्तम पद्धत आहे.
४. जर तुमच्या घरी Covid -१९ चा रुग्ण नसेल तर तुमच्या घरातील पृष्ठभागाचे सतत निर्जंतुकीकरण करण्याची गरज नाही आहे.
५. पॅक केलेला माल, गॅस पंप, शॉपिंग कार्ट तसेच एटीएम कार्ड यांच्यामुळे संसर्ग होत नाही. हात धूत राहा आणि नेहमीप्रमाणे तुमचे आयुष्य जगा.
६. Covid -१९ चा संसर्ग अन्नातून होत नाही. याचा संसर्ग फ्लू सारख्या संसर्ग बिंदूतून होतो. घरी खाद्यपदार्थ ऑर्डर केल्यामुळे Covid -१९ चे संक्रमण झाल्याचा कोणताच धोका दाखवला गेला नाही.
७. तुम्ही तुमची वास घेण्याची क्षमता (सेन्स) गमावू शकता हे Covid -१९ चे एकमेव अनपेक्षित लक्षण आहे.
८. घरी आल्यावर त्वरित कपडे बदलण्याची आणि अंघोळ करण्याची आवश्यकता नाही. शुद्धता हे पुण्य आहे. मानसिक आजार (विकृती) नाही.
९. Covid -१९ चा विषाणू हवेमध्ये लटकून राहत नाही. हा श्वसनमार्गाचा संसर्ग आहे. त्याला संपर्काची आवश्यक्ता असते.
१०. हवा शुद्ध आहे तुम्ही बागेत फिरायला जाऊ शकता (फक्त सुरक्षित शारीरिक अंतर ठेवून)
११. Covid -१९ विषाणूच्या विरोधात सामान्य साबण वापरणे ठीक आहे. तो विषाणू आहे जिवाणू नाही.
१२. खाद्यपदार्थांची ऑर्डर दिल्याबाबद्दल काळजी बाळगण्याची आवश्यक्ता नाही. पण अगदीच वाटत असेल तर तुम्ही ते मायक्रोवेव्ह मध्ये गरम करू शकता.
१३. आपल्या चपलांमधून Covid -१९ चे विषाणू घरात आणणे म्हणजे दिवसातून दोनदा विजेचा झटका लागण्यासारखे आहे. मी २० वर्षांपासून या विषाणू विरोधात काम करतो आहे. याचे संक्रमण असे होत नाही.
१४. व्हिनेगार, उसाचा रस, आले वापरून विषाणूपासून बचाव करता येत नाही. हे रोगप्रतिकार शक्तीसाठी आहेत उपचारासाठी नाहीत.
१५. खूप काळ मास्क वापरल्याने तुमच्या श्वासोच्छ्वास क्रियेत आणि ऑक्सिजन घेण्याच्या प्रक्रियेत व्यत्यय येऊ शकतो. केवळ गर्दीच्या ठिकाणीच तो वापरा.
१६. हातमोजे घालणे देखील वाईट कल्पना आहे. विषाणू सहज हातमोजामध्ये जमा होऊ शकतो आणि तुम्ही चेहऱ्याला स्पर्श केल्यावर तुमच्या शरीरात प्रवेश करू शकतो. त्यामुळे सतत हात धूत राहणे उत्तम आहे.
१७. नेहमी निर्जंतुक वातावरणात राहिल्याने प्रतिकारशक्ती कमकुवत होते. रोगप्रतिकार शक्ती वाढविणारे अन्न खात असाल तरी तुमच्या घरातून बाहेर बागेत किंवा समुद्रकिनाऱ्यावर जात जा. घरी बसून तळलेले, मसालेदार आणि गोड अन्नपदार्थ खाऊन रोगप्रतिकारशक्ती वाढत नाही तर रोगप्रतिकारकांच्या साथीने ती वाढत असते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

राज्यपाल आणि संजय राऊत यांच्यातील ‘हे’ मनोमीलन नव्या पर्वाची नांदी आहे का?

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यपाल नियुक्त कोट्यातून विधानपरिषदेवर वर्णी लागत नसल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांवर टीका केली होती. राजभवन हा राजकारणाचा अड्डा बनत असल्याची टीका राऊत यांनी केली होती. राऊत यांची ही टीका ताजी असतानाच आज त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनावर जाऊन भेट घेतल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

राऊत आणि राज्यपाल यांच्यात तब्बल १५ ते २० मिनिटे चर्चा झाली. त्यामुळे या भेटीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राऊत बॅकफूटवर गेलेले दिसले. राज्यपाल आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आहेत. त्यांचे आणि माझे खूप जुने संबंध आहेत. खूप दिवस त्यांना भेटलो नव्हतो. त्यामुळे आज त्यांची सदिच्छा भेट घेतली, असं राऊत म्हणाले.

राज्यपाल-मुख्यमंत्र्यांचे संबंध पिता-पुत्राप्रमाणे
राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांचेही मधूर संबंध आहेत. दोघांमध्ये पिता-पुत्राचं नातं आहे. सरकार आणि राज्यपालांमध्ये कोणतीही दरी नाही. आमच्यात दऱ्यावगैरे वाढत नाही, असं सांगतानाच राज्यपाल हे आमचे मार्गदर्शक आहेत. ते पालक असून घटनात्मक प्रमुख आहेत. राज्यपाल हे सर्वांना प्रियच असतात. पण विरोधक जेव्हा राजकारण करतात तेव्हा आम्ही भाष्य करत असतो, असा चिमटाही राऊत यांनी यावेळी काढला. मधल्या काळात मी देसभरातील घटनांविषयी मत व्यक्त केलं होतं. त्याचा मुंबईच्या राजभवनाशी संबंध जोडू नका, असंही ते म्हणाले.

संकटाच्या काळात राजकीय आंदोलनं करणं गैरचं
राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीबाबत राज्यपालांना सर्व माहिती देण्यात येते. राज्यपाल घटनात्मक प्रमुख असल्याने सरकार त्यांना वेळोवेळी सर्व माहिती देत असते. कोरोना रोखण्यासाठी सरकार काय करत आहे, हे सुद्धा राज्यपालांना माहीत असतं. विरोधक दुसऱ्या बेटावर आहेत. त्यांना काहीच दिसत नाही. त्यांचा सरकारशी काहीही संबंध नाही, असा टोला लगावतानाच संकटाच्या काळात राजकीय आंदोलनं करणं गैर आहे. अशावेळी सरकारच्या पाठिशी उभं राहीलं पाहिजे, असंही ते म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

२१ वर्षांपूर्वी पाकिस्तानी संघाने दिल्ली कसोटीत कुंबळेला रोखण्यासाठी आखली होती ‘हि’ योजना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । १९९९ मध्ये दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानावर खेळला गेलेला भारत-पाकिस्तान कसोटी सामना अजूनही चाहत्यांच्या मनात घर करून आहे. हा कसोटी सामना भारतीय संघासाठी अनेक प्रकारे विशेष आहे. या कसोटी सामन्यात भारताचा दिग्गज लेगस्पिनर अनिल कुंबळेने एका डावात १० विकेट घेण्याचा विक्रम रचला होता. असे करणारा कुंबळे हा एकमेव भारतीय गोलंदाज तर जगातील दुसरा गोलंदाज ठरला. आजवर कोणत्याही भारतीय गोलंदाजाला कुंबळेचा हा विक्रम मोडता आलेला नाही. कुंबळेच्याआधी असा पराक्रम १९५६ मध्ये इंग्लंडच्या जिम लेकरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध केला होता.

Anil Kumble's historic 10-wicket haul against Pakistan | Anil ...

या कसोटी सामन्याच्या वेळी पाकिस्तान संघाचा कर्णधार दिग्गज वेगवान गोलंदाज वसीम अक्रम हा होता. अक्रमने आकाश चोप्रासोबत झालेल्या एका व्हिडिओ चॅटमध्ये या कसोटी सामन्याबद्दलच्या आपल्या आठवणी शेअर केल्या आणि सांगितले की,” जेव्हा कुंबळेने ९ बळी घेतले होते तेव्हा आमच्या टिमकडे त्याला १० बळी घेण्याच्या विक्रमापासून रोखण्यासाठी काहीच योजना नव्हती.”

मात्र, पाकिस्तानचा कर्णधार अक्रमवर असा आरोप केला जातो की, त्याला कुंबळेला तो रेकॉर्ड करू द्यायचा नव्हता आणि म्हणून त्याने त्या सामन्यात आपल्या सहकारी फलंदाजाला कुंबळेऐवजी दुसर्‍या कोणत्याही गोलंदाजाच्या गोलंदाजीवर बाद होण्याची विनंती केली होती, जेणेकरून तो पूर्ण १० विकेटस घेऊ शकला नसता. मात्र आकाश चोप्राशी झालेल्या या चॅटमध्ये अक्रमने या आरोपाचा पूर्णपणे इन्कार केला आहे. वास्तविक दिल्लीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात हा दुसरा कसोटी सामना खेळला जात होता. दुसर्‍या डावात भारताने पाकिस्तानसाठी ४२० धावांचे विशाल लक्ष्य ठेवले होते. पाकिस्तानी संघाने पहिला कसोटी सामना जिंकला होता. अशा परिस्थितीत त्यांना हा सामना जिंकून मालिकेत २-० अशी आघाडी घ्यायची होती.

सलामीवीर फलंदाज शाहिद आफ्रिदी आणि सईद अन्वर यांनी लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या संघाला जोरदार सुरुवात करुन दिलेली होती. एकही विकेट न गमावता पाकिस्तान १०१ धावा करुन चांगल्या स्थितीत असल्याचे दिसत होते, मात्र येथूनच मग अनिल कुंबळेने आपल्या फिरकीची जादू दाखवायला सुरूवात केली.

कुंबळेने सर्वाधिक ४१ धावांची खेळी करणाऱ्या आफ्रिदीला पहिले पॅव्हेलियनमध्ये धाडले. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या इजाज अहमदला खातेही न उघडता परतीचा मार्ग दाखविण्यात आला. काही षटकांनंतर इंझमाम उल हकही कुंबळेचा शिकार ठरला. यानंतर ठराविक अंतराने पाकिस्तानी संघाच्या विकेट पडण्यास सुरुवात झाली.

20 years on: A look back at Anil Kumble's historic 10-wicket haul ...

अशाप्रकारे, पाकिस्तानी संघाने २०० धावाही गाठल्या नसताना नऊ गडी गमावले होते. भारतीय संघाला आता जिंकण्यासाठी फक्त एका बळीची गरज होती. त्याचवेळी कुंबळेला रेकॉर्ड बनविण्यापासून रोखण्याची कोणतीही योजना आपण आखली नव्हती, असेही अक्रमने सांगितले.

आकाश चोप्राशी बोलताना अक्रम म्हणाला, “नाही, कुंबळेला रेकॉर्ड बनविण्यापासून रोखण्यासाठी मी दुसर्‍या गोलंदाजाच्या गोलंदाजीवर बाद होऊ, हे खेळ भावनेच्याविरूद्ध होते.” मी त्या सामन्यात वकार युनूसला सांगितले की,” तू तुझा नैसर्गिक खेळ कर. मी अनिल कुंबळेच्या चेंडूवर बाद होणार नाही. कर्णधार म्हणून मी युनुसला सांगितले की,” तू कुंबळेला डिफेन्स करत खेळ करू शकतो आणि आपण जवागल श्रीनाथच्या गोलंदाजीवर धावा करू शकतो. पण झालं असं की कुंबळेच षटक संपण्यापूर्वीच मी आउट झालो होतो. भारत आणि कुंबळे या दोघांसाठी तो एक मोठा दिवस होता. ‘

या सामन्यात पाकिस्तानची संपूर्ण टीम २०७ धावांवर बाद झाली होती. कुंबळेने अक्रमच्या रूपात आपला १० वा विकेट घेतला. त्याने ६६ चेंडूत ३७ धावा केल्या आणि अशा प्रकारे भारताने २१२ धावांनी सामना जिंकून मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.

कुंबळेने या सामन्यात इतिहास रचताना २६.३ षटकांत १० गडी बाद करून आपल्या नावावर एका मोठा विक्रम नोंदवला. या व्यतिरिक्त कुंबळेने पहिल्या डावातही ४ बळी मिळवले होते आणि या पूर्ण सामन्यात त्याने भारतीय संघासाठी एकूण १४ बळी घेतले.

भारताच्या या विजयात कुंबळे व्यतिरिक्त सलामीवीर फलंदाज सद्गोपन रमेशची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली. रमेशने दोन्ही डावात भारताकडून अर्धशतक ठोकले होते. त्याने पहिल्या डावात ६० धावा तर दुसऱ्या डावात तो ९६ धावांवर बाद झाला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

नेटफ्लिक्स युझर्स लक्ष द्या! ‘या’ गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यास अकाऊंट होईल सस्पेंड

नवी दिल्ली । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक देशात लॉकडाऊनचा निर्णय घेतला. घरात बसून वेळ घालवण्यासाठी अनेकांची पावलं डिजिटल प्लॅटफॉर्मकडे वळली. सध्या नेटफ्लिक्स, ऍमेझॉन प्राईम अशा डिजिटल प्लॅटफॉर्मची मागणी वाढली आहे. अनेकजण टिव्ही पाहण्यापेक्षा या डिजिटल प्लॅटफॉर्मना जास्त पसंती देत आहेत. अशात नेटफ्लिक्सने मोठा निर्णय घेतला आहे.

ज्यांच्याकडे नेटफ्लिक्स आहे, परंतु ते नेटफ्लिक्सचा वापर करत नाही, अशांना कपंनी एका नोटिफीकेशनच्या माध्यमातून विचारणा करणार आहे. जर युझर्सने नोटिफीकेशकडे दुर्लक्ष केले तर त्या युझर्सचा अकाऊंट सस्पेंड करण्यात येणार आहे. त्यानंतर युझरला पुन्हा नेटफ्लिक्सचा वापर करायचा असेल तर युझरला पुन्हा नवीन प्लॅन घ्यावा लागणार आहे. अशी माहिती नेटफ्लिक्सनं आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून दिली आहे.

नेटफ्लिक्सचे प्रोडक्ट इनोव्हेशन हेड एडी वू यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या युझरने गेल्या एक वर्षापासून नेटफ्लिक्सचा वापर केलेला नाही, त्यांना आम्ही त्यांचे नेटफ्लिक्सचे अकाऊंट सस्पेंडबाबत विचारणा करत आहोत. दरम्यान, इनऍक्टिव्ह अकाऊंट हे त्यांच्या युझरबेसच्या एक टक्क्यापेक्षाही कमी असल्याचंही त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे जर युझर्सना आपली मेंबरशिप कायम सुरू ठेवायची असल्यास त्यांना तशी माहिती द्यावी लागणार आहे. ग्राहकांची संख्या कमी होणं ही नेटफ्लिक्ससाठी मोठी बाब नसल्याचं देखील एडी वू यांनी यावेळी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

उद्धव ठाकरेंचा ‘हा’ फोटो शेअर करून नितेश राणेंनी उडवली खिल्ली 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट मुळे नितेश राणे सतत चर्चेत असतात. आपल्या ट्विटर अकॉउंट सतत काहीतरी शेअर करून ते वादाच्या भोवऱ्यात अडकत असतात. आता आणखी एका पोस्टमुळे ते चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सार्वजनिक रित्या खिल्ली उडवली आहे. त्यांच्या ट्विटर अकॉउंट वरून एक संपादित फोटो शेअर केला आहे. त्यांच्या या फोटोमुळे ट्विटर वरील ठाकरे समर्थकांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले आहे.

रामायणात हनुमानाने आपली छाती फाडून प्रभू श्री राम आणि सीता यांचे चित्र दाखविले होते. असे अनेक फोटो आहेत. असाच एक फोटो संपादित करून हनुमानाच्या जागी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा चेहरा व प्रभू श्री राम व सीता यांच्या जागी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचा चेहरा लावला आहे. उद्धव ठाकरे यांचा हा फोटो त्यांनी शेअर केल्यावर तात्काळ त्यांच्या समर्थकांनी असे खूप फोटो आहेत जे आम्हीही शेअर करू शकतो अशा कमेंट केल्या आहेत. तर काही हिंदुत्ववादी लोकांच्याही संतप्त प्रतिक्रिया त्यांच्या पोस्टवर दिसून येत आहेत.

 

प्रभू श्री रामचंद्र यांच्या जागी शरद पवार यांचा फोटो शेअर करून त्यांचा अपमान केल्याच्या कमेंट्स करण्यात आल्या आहेत तर असेच काही संपादित फोटोही कमेंटमध्ये टाकण्यात आले आहेत. तर राणेंच्या छातीत असे किती फोटो दिसतील अशाही कमेंट करण्यात आल्या आहेत. नितेश राणे यांचे भाऊ निलेश राणे काही दिवसांपूर्वीच तृतीयपंथीयांच्या क्रोधाला बळी पडले होते. मात्र त्यांनी नंतर तृतीयपंथीयांची माफी मागितली होती. आता या पोस्ट नंतर नितेश राणे असेच काहीसे ठाकरे समर्थकांच्या क्रोधाला बळी पडले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

कोरोना संक्रमणाच्या बाबतीत ब्राझील जगात २ ऱ्या क्रमांकावर; ३ लाख ३० जणांना बाधा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेनंतर आता ब्राझीलमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाची संख्या जगात सर्वाधिक झाली आहे. आदल्याच दिवशी रशिया जगातील दुसर्‍या क्रमांकावर होता. १९९६९ नवीन कोरोना प्रकरणांच्या वाढीनंतर आता ब्राझील दुसर्‍या स्थानावर आला आहे. ब्राझीलमध्ये ३ लाख ३० हजार ८९० लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर अमेरिका आणि रशियामध्ये अनुक्रमे १६ लाख ४५ हजार आणि ३ लाख २६ हजार कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.

कोरोना साथीच्या आजाराचे सर्वात मोठे केंद्र अमेरिका आहे, जिथे ९७ हजाराहून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे . आता ब्राझील देखील याच दिशेने वाटचाल करत आहे. येथे, गेल्या काही आठवड्यापासून दररोज सुमारे १५ हजार नवीन रुग्ण पॉझिटिव्ह होत आहेत तसेच दररोज सुमारे एक हजार मृत्यू देखील होत आहेत. गेल्या २४ तासांत १९९६९ नवीन संसर्गित रुग्ण आढळले आहेत आणि ९६६ लोक मरण पावले आहेत. तत्पूर्वी १७५६४ लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत आणि १,१८८ लोक हे मरण पावलेले आहेत. तज्ञ म्हणतात की येथे वास्तविक आकडेवारी १५ पट जास्त असू शकते.

ब्राझीलमध्ये संक्रमित ३.३० लाख पैकी १ लाख ३५ हजार लोक उपचारानंतर बरे झाले आहेत. तेथे १ लाख ७४ हजार ऍक्टिव्ह प्रकरणे आहेत, म्हणजेच बर्‍याच लोकांना सध्या कोरोनाची लागण झालेली आहे तसेच त्यांच्यावर रुग्णालयात उपचारही सुरू आहेत. सक्रिय प्रकरणाकच्छा बाबत ब्राझीलचे जगातील तिसरे स्थान आहे तर रशिया दुसर्‍या क्रमांकावर आहे. रशियामध्ये रिकव्हरीचा दरही कमीच आहे, यामुळे ऍक्टिव्ह प्रकरणांची संख्या ही २ लाख २३ हजार आहे.

ब्राझील नंतर सर्वात ऍक्टिव्ह प्रकरणे फ्रान्स आणि भारतात आहेत. भारतात रिकव्हरीचा दर ४१ टक्के आहे. येथे संक्रमित १ लाख २५ हजारांपैकी ५१ हजारांहून अधिक लोक बरे झाले आहेत. तेथे ७३ हजार ऍक्टिव्ह प्रकरणे आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Video: राहुल गांधींनी घेतली गावी निघालेल्या मजुरांची भेट; व्हिडिओ वायरल

नवी दिल्ली । लॉकडाउनमध्ये स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नांवर सतत आवाज उठवणारे कांग्रेसचे माजी अध्यक्ष, खासदार राहुल गांधी यांनी स्थलांतरित मजुरांचे दु:ख जाणून घेतले. याचा व्हिडिओ त्यांनी आपल्या यूट्यूब चॅनेलवर प्रसिद्ध केला. आज सकाळी ९ वाजता शेअर केला. या व्हिडिओत मजुरांनी आपल्याला येत असलेल्या अडचणी राहुल गांधी यांना सांगितल्या. हे स्थलांतरित मजूर ७०० किमीचा प्रवास पायी करत आहेत. त्यांना गाठून राहुल गांधी यांनी अनेक प्रश्न विचारले. त्या प्रश्नांची उत्तरे देत या मजुरांनी आपल्याला येत असलेल्या अडचणी सांगितल्या.

काँग्रेसनं शेअर केलेला राहुल गांधींच्या मजूर भेटीचा हाच तो व्हिडिओ

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”