Friday, December 26, 2025
Home Blog Page 5771

औरंगाबादेत आज ४१ नवीन कोरोनाग्रस्त; एकूण रुग्णसंख्या १ हजार ११७ वर

औरंगाबाद प्रतिनिधी । औरंगाबाद जिल्ह्यात आज 41 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1117 झाली आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. गणेश नगर, खंडोबा मंदिर, सातारा गाव (1), न्याय नगर, गल्ली नं. 7 (2), पुंडलिक नगर, गल्ली नं 7 (1), पोलिस कॉलनी (2), लिमयेवाडी, मित्र नगर (1), शरीफ कॉलनी (1), न्याय नगर, गल्ली न.1 (1), रोहिदास नगर, मुकुंदवाडी (3), मराठा गल्ली, उस्मानपुरा (2), कैलास नगर, गल्ली नं.2 (3), जुना मोंढा, भवानी नगर, गल्ली नं.5(2), शिवशंकर कॉलनी, तानाजी चौक, बालाजी नगर (2), इंदिरा नगर (1), खडकेश्वर (1), माणिक नगर (1), जयभीम नगर (4), पुंडलिक नगर (5), जिल्हा सामान्य रुग्णालय (1), संजय नगर (1), सिटी चौक (1), बालाजी नगर (1), आझम कॉलनी (1) आणि फुलंब्री तालुक्यातील बाबरा, भिवसने वस्ती (2), कन्नड तालुक्यातील धनगरवाडी, औराळा (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 16 महिला व 25 पुरुषांचा समावेश आहे.

शेतकऱ्यांनी केले कांद्याला क्वारंटाईन, अपेक्षित भाव मिळत नसल्यानं निर्णय

सोलापूर प्रतिनिधी । कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच शेतमालाला चांगला उठाव होऊन त्याला चांगला दरही मिळेल, या भाबड्या आशेने शेतकऱ्यांनी सध्या रब्बी हंगामातील कांदा आपल्या शेतातच क्वारंटाईन करून ठेवने पसंद केले आहे . सध्या सगळीकडे रब्बी उन्हाळी कांद्याची काढणी सुरू आहे . सोलापूर जिल्ह्यातील रोपळे येथील शेतकरीही कांदा काढणीत व्यस्त आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर रोपळे येथील सेवानिवृत्त कृषी पर्यवेक्षक मधुकर गुंजाळ या शेतकऱ्याने ही लॉकडाऊन नंतरच कांदा बाजारात विक्रीसाठी काढणार आहेत.

अशा परिस्थीतीत यंदा कांदा पिकाचा उत्पादन खर्च दुपटीने वाढला आहे. कोरोना रोगाच्या पार्श्वभूमिवर त्यामानाने कांदा पिकाला बाजारात उठाव होत नाही. म्हणून शेतकऱ्यांच्या हातात कांद्यासाठी अपेक्षीत दरही मिळत नाही. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी आपला कांदा काढणीपश्चात साठवणूकीवर भर दिला आहे. शेताच्या मशागतीपासून ते कांदा साठवणूकीपर्यंत कांद्याला प्रतिक्वींटल सुमारे पाचशे रुपये उत्पादन खर्च झाला आहे.

दरम्यान, बाजारात एक नंबरच्या कांद्याला प्रतिक्वींटल ४०० ते ५०० रुपये दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या परिस्थितीत कांदा विकणे परवडत नाही. म्हणून शेतकऱ्यांनी कांदा साठवून त्याची सावकाश विक्री करण्याचे नियोजन केले आहे. मात्र नैसर्गीक आपत्तीचा सामना करत कोरोनाचा प्रादुर्भाव कधी कमी होतोय आणि लॉक डाऊन कधी उठतय यावरच शेतकऱ्यांना कोरंटाईन केलेला कांदा बाहेर काढण्याचे नियोजन करावे लागणार आहे.

निलेश राणे रोहित पवारांना म्हणतात हा तर ट्रेलर; असली भाषा माझ्याबरोबर करायची नाही

हॅलो महाराष्ट्र आॅनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार आणि भाजप नेते निलेश राणे यांच्यातील ट्विटर वाॅर चांगलेच रंगले आहे. दोघेही एकमेकांवर टिकास्त्र सोडत आहेत. निलेश राणे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर साखर कारखान्यांवरुन टिका केली होती. त्यानंतर रोहित पवारांनी आजोबांच्या मदतीला उतरत राणे यांना कुकुटपालनावरुन टोला मारला होता. यानंतर बर्‍याच शाब्दिक चकमकींनंतर आता राणे यांनी हा तर ट्रेलर आहे. माझ्याबरोबर असली भाषा करायची नाही असे म्हणत रोहित पवार यांना सुनावले आहे.

सर्वात प्रथम निलेश राणे यांनी शरद पवारांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून साखर कारखान्यांबाबत चिंता व्यक्त करण्यावरुन टीका केली होती. “साखर विषयावर किती पैसे महाराष्ट्रात खर्च झाले ह्यावर आॅडिट झालंच पाहिजे. साखर कारखाने करोडोंची उलाढाल करतात, राज्य सरकार, राज्य बँक, जिल्हा बँका सगळे साखर व्यवसायाला वर्षों वर्ष साथ देत आलेत” असं राणे यांनी म्हटले होते.

रोहित पवार यांनी राणे यांच्या शरद पवारांवरील ट्विटला प्रत्युत्तर देत शरद पवारांनी साखर उद्योगासह ‘कुक्कुटपालन’ व इतर उद्योगातील दुरवस्थेबाबतही केंद्राला पत्र पाठवून उपाययोजना सुचवल्या आहेत. साहेब प्रत्येक गोष्ट अभ्यासपूर्वक मांडत असल्यानेच पंतप्रधान मोदीजीही त्यावर सकारात्मक विचार करतात. त्यामुळे काळजी नसावी. असे म्हणले होते. यातील कुकुटपालनाचा टोला राणे यांना विशेष लागला होता. त्यानंतर राणे यांनी “मी साखरेवर बोललो पवार साहेबांवर नाही… कुकुटपालनाची मागणी केली असेल तर तुझ्यासाठी चांगली आहे, तुला गरज आहे. साखरेवर बोल्यावर मिरची का लागली??? मतदार संघावर लक्ष दे सगळी कडे नाक टाकू नकोस नाही तर साखरकारखान्या सारखी हालत होईल तुझी” असे म्हटले होते.

यानंतर राष्ट्रवादीचेने नेते आणि राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे रोहित पवारांच्या बाजुने मैदानात उतरले होते. राष्ट्रवादीवाले टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतात असं विधान केलं होतं. त्यानंतर राणे यांनी शेलक्या भाषेत तनपुरे यांना प्रत्युत्तर दिले होते. यावर रोहित पवार यांनी “आपले विचार, आपली भाषा व आपलं काम यातून आपण कोण आहोत हे लक्षात येतं. काही गोष्टींकडे दुर्लक्ष करून त्या सोडून द्यायच्या असतात, पण एकाच गोष्टीला कवटाळून आपल्या विचारांचं प्रदर्शन करण्यात निलेश राणे यांचा नंबर पहिला लागतो” असं म्हणत तनपुरे यांना राणे यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन केले होते.

आता यावर निलेश राणे यांनी पुन्हा रोहित पवार यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. हा “बोलणाऱ्याची लायकी बघून उत्तर देतो मी. धमकी आणि कळ काढायची भाषा माझ्याबरोबर करायची नाही. प्रदर्शन नाही हा ट्रेलर आहे. तुझ काम माहीत आहे मला, बोलत राहिलास तर त्याचं पण ट्रेलर देईन मग लोकंच चप्पलेच्या प्रदर्शनात बसवतील तूला” असं म्हणत राणे यांनी पिक्चर अभी बाकी है असंच काहीसं म्हणत रोहित पचार यांना चेतावणी दिली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

निलेश राणे ‘या’ गोष्टीत नंबर वन – रोहित पवार

हॅलो महाराष्ट्र आॅनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार आणि भाजप नेते नितेश राणे यांच्यात मागील काही दिवसांपासून चांगलेच ट्विटर वाॅर रंगले आहे. साखर उद्यागाचे आॅडिट करण्याच्या मागणीवरुन सुरु झालेले हे शाब्दिक युद्ध आता चांगलेच वाढले आहे. यात राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंनी यांनीही उडी घेत रोहित पवारांची बाजू घेतली होती. त्यानंतर राणे यांनी तनपूरे यांच्यावर शेलक्या भाषेत टिका केली होती. आता रोहित पवारांनी एकाच गोष्टीला कवटाळून आपल्या विचारांचं प्रदर्शन करण्यात निलेश राणे यांचा नंबर पहिला लागतो असे म्हणत एक ट्विट केले आहे.

रोहित पवार यांनी अत्यंत सभ्य भाषेत आपले मत व्यक्त केले होते. पवार कुटुंबीयांच्या अंगी असलेल्या सभ्यपणा, सुसंस्कृतपणा, अभ्यासूपणा या गुणांमुळेच आमच्या सारखे असंख्य कार्यकर्ते पवार कुटुंबियांवर मनापासून प्रेम करतात. आणि हो, राष्ट्रवादीवाले टप्प्यात आल्यावर मात्र कार्यक्रम करतात असं ट्विट तनपुरे यांनी केले होते. त्यावर राणे यांनी कोणतरी हिजडा राज्यमंत्री आहे तनपुरे नावाचा ज्याला माझा कार्यक्रम करायचा आहे. असे कार्यक्रम करणारे आम्ही खूप बघितले… समोर आले की पिवळी होते साल्यांची. जागा सांग तनपूरे, येतो मी. अशा आशायाचे ट्विट केले होते.

दरम्यान, आपले विचार, आपली भाषा व आपलं काम यातून आपण कोण आहोत हे लक्षात येतं. काही गोष्टींकडे दुर्लक्ष करून त्या सोडून द्यायच्या असतात, पण एकाच गोष्टीला कवटाळून आपल्या विचारांचं प्रदर्शन करण्यात निलेश राणे यांचा नंबर पहिला लागतो.असं म्हणत रोहित पवार यांनी तनपुरे यांना राणे यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

सातारा जिल्ह्यात दिवसभरात २८ नवीन कोरोनाग्रस्तांची वाढ; एकूण रुग्णसंख्या १६६ वर

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

सातारा जिल्ह्यातील जावळी, खंडाळा, खटाव, पाटण, कराड आणि सातारा या तालुक्यातील प्रवास करून आलेले आणि काही बाधितांचे निकट सहवासीत असे एकूण २० जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच दोन दिवसांपूर्वी बनपुरी येथील क्वारंटाईन मध्ये अचानक मृत्यू पावलेल्या महिलेचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली आहे. आज सकाळी जिल्ह्यात ८ कोरोनाबाधित सापडले होते. त्यानंतर आता २० रुग्ण सापडल्याने आज दिवसभरात एकूण तब्बल २८ नवीन कोरोना रुग्णांची भर पडल्याने सातारा जिल्ह्याची चिंता वाढली आहे.

१० वी १२ वी उत्तीर्ण असणाऱ्यांसाठी खुशखबर ! Indian Army ARO मध्ये विविध पदांच्या जागा

पाटण तालुक्यातील बनपुरी येथे क्वारंटाईन शिक्का असलेल्या महिलेचा अचानक मुत्यू झाला होता. काही दिवसापुर्वी ती महिला मुंबई येथून आली होती. आता त्या महिलेचा कोरोना अहवाल प्राप्त झाला असून ती कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. नवीन सापडलेल्या रुग्णांमध्ये बहुतांश जण हे पुण्या मुंबईहून प्रवास करून आलेले किंवा त्यांचे निकटवर्तीय आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण सापडल्याने जिल्हा प्रशासन हादरून गेले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल असलेला लोणंद येथील मुंबई येथून प्रवास करुन आलेला एक 33 वर्षीय पुरुष व मायणी ता. खटाव येथील अकोला येथून प्रवास करुन ओलेले 55 वर्षीय पुरुष व 48 वर्षीय महिला तसेच कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे म्हासोली गावातील कोविड बाधित रुग्णाचे निकट सहवासित दोन पुरुष अनुक्रमे 45 व 62 वर्षे आणि तीन महिला अनुक्रमे 48, 35 व 60 वर्षे असे एकूण 8 जणांचा अहवाल कोरोनाबाधित आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या १६६ झाली असून या पैकी उपचार घेत असलेले कोरोनाबाधित रुग्णसंख्या 71 इतकी असून कोरोना मुक्त होवून घरी गेलेले रुग्णसंख्या 73 आहे तर मृत्यु झालेले 2 रुग्ण आहेत. जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पुणे मुंबईहून आलेल्या आपल्या गावातील नागरिकांना क्वारंटाईन मध्ये राहून नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Satara

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

मुंबईत कोरोना चाचणी केली अन रिपोर्ट येण्याआधीच शिराळा गाठलं; अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

अंत्री खुर्द तालुका शिराळा येथील ४२ वर्षीय पुरुष मुंबई येथून १७ मे रोजी आला आहे. या व्यक्तीची मुंबई येथे स्वॅब तपासणी करण्यात आली होती. आता त्याला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. मात्र स्वॅब घेतला असताना त्याला क्वारंटाईन करण्याऐवजी मुंबईतून बाहेर जाण्यासाठी पास कसा दिला? असा सवाल उपस्थित होत आहे. संबंधित व्यक्तींनेही आपला स्वॅब घेण्यात आल्याची माहिती लपवली. दरम्यान या व्यक्तीच्या संपर्कातील लोकांचा शोध आरोग्य विभागाकडून घेतला जात आहे. जिल्ह्यात आणखी एक कोरोनाचा रुग्ण सापडला, मात्र खानापूर तालुक्यातील साळशिंगेमध्ये अहमदाबादमधून आलेली महिला मंगळवारी कोरोनामुक्त झाली. त्यामुळे सद्यस्थितीत रुग्णांची संख्या २० च राहिली.

अंत्री खुर्दमध्ये नवी मुंबईतील कोपरखैरणे येथून आलेल्या ४२ वर्षीय पुरुष मुंबई येथून १७ मे रोजी आला होता. गावात आल्यानंतर त्या व्यक्तीला होम क्वारंटाईन करण्यात आले होते. मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने त्या व्यक्तीची मुंबई येथे स्वाब तपासणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल मंगळवारी प्राप्त झाला. हा अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला असून तालुका आरोग्य अधिकारी यांनी सदरची व्यक्ती कोरोनाबाधित असल्याची खात्री करून घेतली आहे. या व्यक्तीला मिरज येथे आयसोलेशन कक्षात आणण्यात येत असून या व्यक्तीची मिरज कोवीड लॅब येथे पुनश्च स्वाब घेऊन खात्री करण्यात येणार आहे. तसेच निकटवर्तीयांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये आणण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. व अनुषंगिक उपाययोजना करण्यात येत आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

खानापूर तालुक्यातील साळशिंगे येथे गुजरातमधील अहमदाबाद येथून पती-पत्नी आली होती. या महिलेसोबत गुजरातमधून आलेल्या अन्य लोकांच्या संपर्कामुळे साळशिंगे, गव्हाण आणि भिकवडी खुर्दमधील 5 जणांना कोरोनाची लागण झाली. या महिलेची प्रकृती ठणठणीत असल्याने तिची कोरोना चाचणी घेण्यात आली होती, तिचा अहवाल निगेटिव्ह आल्याने कोरोनामुक्त झाल्याचे स्पष्ट झाले. जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोनाचे ५५ रुग्ण आढळले आहेत, त्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून ३३ जण कोरोनामुक्त रुग्ण झाले होते. त्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यात २० कोरोनाचे रुग्ण असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. साळुंखे यांनी सांगितले.

Sangli

Video: लॉकडाऊनमुळे सलून बंदीचा सचिनला सुद्धा फटका; स्वतः कापले मुलाचे केस

मुंबई । लॉकडाऊनमुले सलून बंद असल्याने सर्वसामन्यांपासून नेते मंडळी, सेलिब्रिटी सर्वांच्याच दाढी, केस वाढल्याचं दिसून येत होतं. सोशल मीडियावर काही जण दाढी केस वाढलेला नवा लूक सोशल मीडियावर शेअर करत आहेत. तर काही जण घरीच दाढी, केस कापल्याचे व्हिडीओ देखील शेअर करत आहेत.

यामध्ये सेलब्रिटी, नेते मंडळीचाही समावेश आहे. दरम्यान, या सलून बंदीचा फटका मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला सुद्धा बसला आहे. म्हणूनच या लॉकडाउन काळात हेअर स्टायलिस्ट झाला आहे. आपला मुलगा अर्जुनचे केस कापतानाचा एक व्हिडीओ सचिनने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओला नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळत आहे. चला तर पाहुयात सचिनची हेअर स्टायलिस्ट म्हणून खेळलेली ही इनिंग..

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

जळगाव जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 300 पार, जिल्हावासीयांची चिंता वाढली

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज तेवीस कोरोना बाधित रूग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील विविध ठिकाणी स्वॅब घेतलेल्या 45 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 22 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर तेवीस व्यक्तींचे तपासणी अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत.

पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये धरणगावचे सात, भुसावळ येथील चार, जळगावचे दहा, चोपडा येथील एक तर पळासखेडे, ता.जामनेर येथील एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 320 इतकी झाली आहे. जिल्ह्यातील ह्या वाढत्या रुग्ण संख्येने आता जळगाव करांची चांगलीच चिंता वाढवली आहे. वाढती संख्या बघता आता शहरवासी व जिल्ह्यातील पादुर्भाव झालेल्या ठिकाणी लॉकडाउनच्या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.

जळगाव शहरात व अन्य तालुका ठिकाणी लॉकडाउनचे नियम धाब्यावर बसवले जात आहेत, त्यांमुळे नागरिकांनी आता स्वतः सर्व नियम पाळत घरातच थांबणे आवश्यक असणार आहे.


‘ही’ आहेत राज्यातील ‘रेड झोन’; लॉकडाऊनच्या नवीन नियमावलीनुसार ‘या’ सुविधा होणार येथे सुरू

मुंबई । सध्या संपूर्ण देशात लॉकडाउन 4.0 सुरु झाला आहे. पहिल्या ३ लॉकडाउनच्या तुलनेत चौथ्या लॉकडाउनमध्ये नियम थोडे शिथिल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य शासनातर्फे चौथ्या टप्प्याच्या लॉकडाउनसाठी सविस्तर नियमावली जाहीर करण्यात आली आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत या नियमावलीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. यामध्ये सर्वाधिक महत्त्वाचा बदल म्हणजे यापुढे राज्यात एकूण तीन झोनमध्ये कोरोनाबाधित क्षेत्रांची विभागणी करण्यात आलेली असेल. रेड झोन, नॉन रेड झोन आणि कंटेन्मेंट झोन अशा स्वरुपात ही विभागणी केलेली असेल. ज्या धर्तीवर संबंधित परिसरामध्ये लॉकडाऊनच्या नियमांची आणखी करण्यात आलेली आहे. कंटेन्मेंट झोनमध्ये मोठ्या प्रमाणावर नियम अधिक कठोर असतील. जेथे अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणत्याही प्रकारची शिथिलता देण्यात आलेली नाही. तर, रेड आणि ऩॉन रेड झोनमध्ये त्याचं स्वरुप काहीसं बदललेलं असेल. राज्य सरकारच्या नवीन नियमावलीनुसार राज्यातील काही भाग हे रेड झोन म्हणून घोषित केले आहेत. त्यामुळे हा भाग वगळता राज्यात इतर ठिकाणी अनेक सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत. रेड झोनची यादी नेमकी कोणती हे पाहा….

राज्यातील रेड झोनची यादी
१. मुंबई महानगर प्रदेश – यामध्ये मुंबई महापालिकेसह, ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, मीरा-भाईंदर, भिवंडी-निझामपूर, नवी मुंबई, वसई-विरार या पालिका रेड झोनमध्ये येतात.
२. पुणे महापालिका –
३. सोलापूर महापालिका
४. औरंगाबाद महापालिका
५. मालेगाव महापालिका –
६. नाशिक महापालिका
७. धुळे महापालिका
८. जळगाव महापालिका
९. अकोला महापालिका
१०. अमरावती महापालिका

रेड झोनमध्ये काय सुरू राहणार

– अत्यावश्यक सेवेची सर्व दुकानं सुरु राहतील.

– इतर दुकानांना परवानगी, त्याबाबत स्थानिक प्रशासन निर्णय घेणार.

– स्थानिक प्रशासनाने परवानगी दिली तर दारूची दुकानं सुरू करता येणार, दारूची होम डिलिव्हरी करता येणार आहे.

– टॅक्सी, रिक्षा सेवा बंद राहणार.

– दुचाकीवर एकालाच प्रवास करण्याची परवानगी.

-मॉल्स, परवानगी नसलेली दुकाने, परवानगी नसलेली इतर आस्थापनं साफसफाईसाठी सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळात सुरू ठेवू शकतात

– दस्त नोंदणी कार्यालय, आरटीओ कार्यालय सुरू करण्याची परवानगी

-विद्यापीठ, महाविद्यालयात उत्तरपत्रिका तपासणी, निकाल लावण्यासाठी ५ टक्के कर्मचारी उपस्थित ठेवण्यास परवानगी.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

धक्कादायक ! भारताच्या भू-भागावर नेपाळने केला दावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताशी सीमा विवाद सुरू असताना नेपाळच्या मंत्रिमंडळाने एक नवीन राजकीय नकाशा प्रकाशित केला आहे. ज्यामध्ये नेपाळी प्रदेशात लिपुलेख, कालापानी आणि लिंपियाधुरा हे भारतीय प्रदेश दाखविण्यात आले आहेत. परराष्ट्रमंत्री प्रदीप कुमार गयावली यांनी हे जाहीर करण्याच्या काही आठवड्यांआधीच असे सांगितले होते की,’ भारताशी सुरु असलेला हा सीमाप्रश्न सोडविण्यासाठी सामोपचाराने प्रयत्न सुरू आहेत. नेपाळच्या सीमेवरील कालापानी, लिंपियाधुरा आणि लिपुलेख यांना परत देण्याच्या मागणीसाठी नेपाळच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या खासदारांनीही संसदेत यासाठी एक विशेष ठराव पास केलेला होता.

नेपाळ आणि भारत यांच्यातील हा विवादित भाग कालापानीजवळील एक दुर्गम भाग आहे. भारत आणि नेपाळ दोघेही कलापानीला आपला अविभाज्य भाग मानतात. भारत त्याला उत्तराखंडच्या पिथौरागड जिल्ह्याचा भाग, तर नेपाळ त्याला आपल्या धरचुला जिल्ह्याचा भाग म्हणून संबोधतो. गायवाली म्हणाले की, ‘भू-व्यवस्थापन मंत्रालय लवकरच नेपाळचा अधिकृत नकाशा जाहीर करेल.“मंत्री परिषदेने ७ प्रांत, ७७ जिल्हे आणि ७५३ स्थानिक पातळीवरील प्रशासकीय विभागांमध्ये नेपाळचा नकाशा प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला आहे,” असे त्यांनी सोमवारी ट्विटरवर सांगितले.

गायवाली यांनी गेल्याच आठवड्यात भारतीय राजदूत विनय मोहन क्वात्रा यांना बोलावून उत्तराखंडमधील लिपुलेखला धारचुलाशी जोडणार्‍या प्रमुख मार्गाच्या बांधकामाच्या निषेधार्थ एक नोट दिली होती. उत्तराखंडमधील पिथौरागड जिल्ह्यात नुकताच उद्घाटन केलेला रस्ता पूर्णपणे आपल्या हद्दीत येतो, असे भारताने म्हटले होते. नेपाळचे अर्थमंत्री आणि सरकारचे प्रवक्ते युवराज खतिवडा यांनी सोमवारी सांगितले की पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाने देशाच्या या नव्या राजकीय नकाशाला मान्यता दिली आहे.

मंत्रिमंडळाचा हा निर्णय सुवर्ण हस्ताक्षराने लिहिला जाईल, असे संस्कृती, पर्यटन व नागरी उड्डाण मंत्री योगेश भट्टराई म्हणाले. मात्र , सत्ताधारी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि नेपाळ कम्युनिस्ट पक्षाच्या स्थायी समितीचे सदस्य, गणेश शाह म्हणाले की, कोरोना विषाणूविरुद्ध लढत असलेल्या या अशा वेळी नेपाळ आणि भारत यांच्यात या नव्या पावलामुळे अनावश्यक तणाव निर्माण होईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.