Friday, December 26, 2025
Home Blog Page 5772

बोनी कपूर यांच्या घरातील नोकर कोरोना पॉझिटिव्ह; संपूर्ण कुटुंब क्वारंटाईन

मुंबई । भारतातील कोरोना रुग्णांचा आकडा दरदिवशी वाढतोच आहे. कोरोना व्हायरसमुळे गेले २ महिन्यांपासून भारतात लॉकडाऊन आहे. तरीही कोरोना संसर्ग आणखी पसरतंच आहे. राज्याची राजधानी असलेल्या मुंबईला कोरोनाने विळखा घातला असून येथील रुग्ण संख्या वाढतच आहे. अशातच बॉलिवूडमध्येही कोरोनाने शिरकाव केला असून कलाकार, त्यांच्या कुटुंबियांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. आता चित्रपटसृष्टीतील निर्माते बोनी कपूर यांच्या घरातील काम करणारा एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्याचं समोर आलं आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बोनी कपूर यांच्या लोखंडवाला स्थित घरात काम करणारा 23 वर्षीय नोकराची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. काम करणारा हा तरुण गेल्या शनिवारी आजारी होता. त्यानंतर बोनी कपूर यांनी त्याला टेस्ट करण्याचं सांगितलं होतं. त्याला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं. टेस्टचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या सोसायटी आणि बीएमसीच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर बीएमसी आणि राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांकडून त्या तरुणाला क्वारंटाईन सेंटरमध्ये नेण्यात आलं.

दरम्यान, बोनी कपूर यांनी याबाबत माहिती देताना म्हणाले कि,’मी, माझी मुलं आणि घरातील इतर स्टाफ यांना कोणालाही कोणतीचं लक्षणं नाहीत. शिवाय घरातील कोणताच सदस्य लॉकडाऊन झाल्यापासून घरातून बाहेर गेला नाही’ असंही बोनी कपूर यांनी सांगितलंय.महाराष्ट्र सरकार आणि बीएमसीने या संपूर्ण परिस्थितीत त्वरित प्रतिसाद दिल्याबद्दल बोनी कपूर यांनी राज्य सरकार आणि बीएमसीचे आभार मानले आहेत. बीएमसीकडून, त्यांच्या वैद्यकीय पथकाकडून देण्यात आलेल्या सूचनांचं आणि सल्ल्याचं काळजीपूर्वक पालन करु असंही बोनी कपूर म्हणाले. त्यांच्या घरात काम करणारा व्यक्ती लवकरात लवकर बरा होऊन पुन्हा घरी येईल अशा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

दिलासादायक! राज्यात आज सर्वाधी १ हजार २०० कोरोनाग्रस्तांना डिस्चार्ज

मुंबई । आज दिवसभरात १२०० कोरोना रुग्णांना दवाखान्यातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. एका दिवसात बरे झालेली हि आजवरची सर्वात मोठी संख्या आहे. अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तसेच मागील २४ तासात राज्यात कोरोनाचे २ हजार १०० नवीन रुग्ण सापडले असून आता राज्यातील एकूण रुग्णसंख्या ३७ हजार पार गेली आहे अशी माहितीही टोपे यांनी यावेळी दिली.

कोरोनासोबत आपल्याला जगावं लागणार आहे. कोरोनासोबत राहावं लागणार आहे. कारण संपूर्ण जग कोरोनामुळे थांबू शकत नाही. आता आपल्याला आपले व्यवहार सुरु करावे लागतील मात्र योग्य ती खबरदारी हि घ्यावीच लागेल असे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले आहे.

दरम्यान, सोशल डिस्टंसिंग आणि शासनाचे नियम पाळूनच आपण कोरोनाला हरवू शकतो असे म्हणत टोपे यांनी नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. नॉन रेड झोन परिसरांत बससेवा सुरळीत सुरु करण्यात येणार आहेत. तसेच अशा भागात लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले आहेत असाही टोपे यांनी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

धक्कादायक! मुंबईत १००हून अधिक कोरोनाग्रस्त बेपत्ता

मुंबई । राज्यात कोरोनाने थैमान घातलं आहे. राज्याची राजधानी असलेलं मुंबईला कोरोनाचा सर्वात जास्त तडाखा बसला आहे. मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या २१ हजारांहून अधिक झाली आहे. कोरोनाला रोखण्याचं आव्हान असतानाच, महापालिकेला एका मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. प्रयोगशाळांमध्ये चाचणी करताना, चुकीचा पत्ता आणि मोबाइल नंबर देणाऱ्या व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर, त्यांचा शोध घेणं अडचणीचं ठरत आहे. महापालिकेनं ही माहिती दिली. कोरोना चाचणीवेळी संबंधित व्यक्तीचा संपर्क क्रमांक, निवासी पत्ता घेतला जातो. त्यातील काही जण योग्य माहिती देत नाहीत किंवा प्रयोगशाळांतील कर्मचारी अनावधानानं चुकीची माहिती भरतात. अशावेळी चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांचा शोध घेण्यात अनेक अडचणी येत आहेत.

मुंबईत पॉझिटिव्ह असलेले असे १०० हून अधिक रुग्ण सध्या ‘बेपत्ता’ आहेत. हे अनेक कारणांमुळे होत असून, त्यात रुग्णांची माहिती चुकीची नोंदवणे हे मुख्य कारण आहे, असं पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी मुंबई मिररला सांगितले. अशा रुग्णांचा शोध घेण्याचे अनेक मार्ग आमच्याकडे आहेत. मालमत्ता नोंदणी किंवा मतदार यादीत आम्ही त्यांची नावे शोधतो. सोमवारी मी वांद्रे पूर्व विभागाचा आढावा घेत असताना, काही कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या चाचण्या केल्या आणि वांद्रे पूर्व असा पत्ता सांगितला. अशावेळी त्या व्यक्तींचा शोध घेणं कठीण होऊन जातं, असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आधार क्रमांकच्या माध्यमातून ‘बेपत्ता’ असलेल्या व्यक्तींची सविस्तर माहिती मागितली आहे. मात्र, त्यांना अद्याप तशी मान्यता मिळालेली नाही, असंही त्यांनी सांगितलं. एन प्रभागात विक्रोळीतून १२ करोनाबाधित रुग्ण गायब आहेत. अधिकारी त्यांचा शोध घेण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहेत. ज्यांचा कोणताही ठावठिकाणा नाही अशा करोनाबाधित रुग्णांमध्ये अंधेरी पूर्वेकडील २७ जण आहेत. त्यातील अनेक जण झोपडपट्टी परिसरातील आहेत. धारावीत २९ व्यक्तींचा अद्याप कोणताही ठावठिकाणा नाही. त्यातील काही जणांचा शोध घेण्यात यश मिळालं आहे. खासगी प्रयोगशाळांमध्ये चुकीचा पत्ता आणि मोबाइल क्रमांक देऊन चाचणी करणाऱ्या व्यक्तींचाही समावेश आहे, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

धक्कादायक ! परभणीत दोन दिवसाचे स्त्री अर्भक झाडाझुडपात फेकले; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे

पाथरी तालुक्यातील देवेगाव येथे गावच्या बाहेर असणाऱ्या झाडाझुडुपांमध्ये सोमवारी सायंकाळी दोन दिवसाचे स्त्री अर्भक मृत अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. या प्रकरणी अज्ञाता विरुद्ध पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देवेगाव येथील गाव शेजारी असणाऱ्या पांदण रस्त्याच्या परिसरात सोमवार १८ मे रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास मोकळ्या मैदानात क्रिकेट खेळणाऱ्या लहान मुलांचा चेंडू हरवला असता ,तो शोधताना त्यांना झाडाझुडुपांमध्ये एक अर्भक असल्याचे दिसले. लहान मुलांनी घाबरलेल्या अवस्थेत गावकऱ्यांना यासंदर्भात माहिती दिली. दरम्यान गावकऱ्यांनी याठिकाणी पाहण्यासाठी गर्दी केली होती. यातील काही ग्रामस्थांनी पाथरी पोलिसांना घटनेचे माहिती दिली. पोलीस कर्मचारी रात्री ७ च्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले होते .यावेळी झाडातील मृत अर्भक ताब्यात घेऊन ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी दाखल केले असता १ ते २ दिवसाच्या मृत अर्भकाच्या अंगावर अनेक जखमा दिसून आल्या .

देवेगाव येथील सुदर्शन विठ्ठल गलबे यांनी माहिती दिल्यावरून पाथरी पोलिसात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक टोपजी कोरके अधीक तपास करत आहेत. दरम्यान अत्यंत निर्दयीपणे स्त्री अर्भकाला झाडाझुडपात फेकणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यात यावा अशी ग्रामस्थांमधून आता मागणी होत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

देशात आत्तापर्यंत ३९ हजारांपेक्षा कोरोनाग्रस्त बरे होऊन घरी परतले

नवी दिल्ली । भारतात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर फैलावत आहे. लॉकडाउन लागू करून पन्नासहून अधिक दिवस होऊन सुद्धा कोरोनाचा वेग मंदावला नाही आहे. भारतात कोरोनाग्रस्तांच्या आकड्यानं १ लाखांचा टप्पा पार करून कोरोनाचा मुक्काम देशात आणखी काही दिवस राहणार असल्याचे संकेत दिले आहेत. या सर्व चिंताजनक परिस्थितीत एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार मागील २४ तासांमध्ये २ हजार ३५० कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजच्या बरे झालेल्या आकड्यांना जोडून संपूर्ण देशात आत्तापर्यंत ३९ हजार १७४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

भारतात सध्याचा कोरोना रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ही ३८.७३ टक्के इतकी आहे असंही  केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून गण्यात आलं आहे. भारतात कोरोना रुग्णांची संख्या १ लाखांच्या पुढे गेली आहे. असं असलं तरीही आत्तापर्यंत ३९ हजार १७४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात मिळाल्यानं आरोग्य यंत्रणांना याचं श्रेय जातं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

केंद्र सरकारचा घुमजाव! लॉकडाऊन काळात कर्मचाऱ्यांना पूर्ण पगार देण्याचा आदेश मागे

नवी दिल्ली । देशव्यापी लॉकडाऊन जाहीर करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योग कंपन्यांनी कामगारांना पूर्ण वेतन देण्याचं आवाहन केलं होतं. पण अवघ्या २ महिन्यांच्या आत केंद्र सरकारवर आपला आदेश मागे घेण्याची वेळ आली आहे. मोदींनी दिलेला शब्द त्यांच्याच सरकारच्या एका नोटिफिकेशनमध्ये ३६० अंशाच्या कोनात फिरवला गेला आहे. त्यानुसार लॉकडाऊनच्या काळात युनिट बंद असलं तरी कर्मचाऱ्यांना त्यांचा पूर्ण पगार द्यावा हा आदेश मोदी सरकारने आता मागे घेतला आहे.

मोदी सरकारने आपल्या निर्णयावरून घुमजाव कारण्यामागे सुप्रीम कोर्ट कारणीभूत आहे. लॉकडाउनमुळे उद्योग ठप्प पडले आहेत, अशा आर्थिक संकटाच्या अवघड स्थितीत कर्मचाऱ्यांचे वेतन बंधनकारक करणं म्हणजे उद्योग कंपन्यांच्याही घटनात्मक अधिकारांवर अतिक्रमण असल्याचा दावा करत सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल केली आहे. त्यावर सुप्रीम कोर्टानेही कंपन्यांची बाजू योग्य ठरवत त्याबाबत केंद्र सरकारला विचारणी केली होती. त्यावर अंतिम निर्णय येण्याच्या आतच सरकारला आपली चूक लक्षात आली असावी. त्यामुळेच आता हा आदेश मागे घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

स्थलांतरित कामगारांसाठी गीतकार गुलजार यांची भावनिक कविता  

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दरदिवशी हजारो किमी पायपीट करत, सायकलवरून प्रवास करत कोणत्याही परिस्थितीत आपल्या घरी पोहोचू इच्छिणाऱ्या  स्थलांतरित कामगारांची छायाचित्रे समोर येत आहेत. दिवसेंदिवस या कामगारांचे हाल वाढत आहेत. आपल्या कविता, शेर, शायरी आणि लेखनाने भारतीयांवर भुरळ घातलेले गीतकार, लेखक गुलजार यांनी नुकतीच या कामगारांच्या अवस्थेवर एक हृदयस्पर्शी कविता लिहिली आहे. या कवितेत त्यांनी गावातील जीवनाचे वर्णन करीत तिथल्या जगण्याबद्दल वर्णन केले आहे. त्याबरोबरच शहरातील यांत्रिकताही शब्दबद्ध केली आहे. या कामगारांच्या वेदना आणि गावी जाण्याची ओढ याचे नेमके मर्म गुलजार यांनी या कवितेत मांडले आहे. 

कविता ऐकण्यासाठी – https://www.facebook.com/83332960200/posts/10163600272545201/

साथीचा आजार आला आणि सगळे कामगार आपल्या घरी जाऊ लागले. असं म्हणताना ते लिहितात की शहरातील यंत्रांमुळेच तर हातपाय चालत होते, जीवन तर गावातच पेरून आलो होतो . इथे शरीरालाकेवळ प्लग लावले होते. शहरे बंद झाली तसे हे प्लग काढून घेतले आणि शरीर बंद पडले. पण तिथेच मरू जिथे जीवन आहे. अशा भावनिक शब्दात त्यांनी ही कविता लिहिली आहे. अप्रत्यक्षरीत्या शहरामध्ये जगणं हरवून बसलेल्या केवळ यंत्रासारखे कोरडेपणाने राबणाऱ्या या कामगारांची मनस्थितीच जणू त्यांनी शब्दबद्ध केली आहे.

अन्न, पाण्याशिवाय आपल्या घरी नक्की पोहोचू या आशेने चालणाऱ्या या स्थलांतरित कामगारांच्या वेदना लोकांपर्यंत पोहोचवित असताना त्यांच्या भावना नेमक्या शब्दात मांडत गुलजार यांनी सर्वाना विचार करण्यास भाग पाडले आहे. अनेक वर्षे या कामगारांनी शहरे चालविली आहेत. त्यांच्यामुळेच हा प्रगतीचा आणि सुखसोयींनीयुक्त जगण्याचा आनंद आपण घेतो आहोत. मात्र आज त्यांची ही अवस्था हृदयद्रावक चित्र दाखवत असल्याचे त्यांनी आपल्या कवितेतून सांगितले आहे.

गुलजार यांची संपूर्ण कविता –

महामारी लगी थी

घरों को भाग लिए थे सभी मज़दूर, कारीगर.
मशीनें बंद होने लग गई थीं शहर की सारी
उन्हीं से हाथ पाओं चलते रहते थे
वगर्ना ज़िन्दगी तो गाँव ही में बो के आए थे.

वो एकड़ और दो एकड़ ज़मीं, और पांच एकड़
कटाई और बुआई सब वहीं तो थी

ज्वारी, धान, मक्की, बाजरे सब.
वो बँटवारे, चचेरे और ममेरे भाइयों से
फ़साद नाले पे, परनालों पे झगड़े
लठैत अपने, कभी उनके.

वो नानी, दादी और दादू के मुक़दमे.
सगाई, शादियाँ, खलियान,
सूखा, बाढ़, हर बार आसमाँ बरसे न बरसे.

मरेंगे तो वहीं जा कर जहां पर ज़िंदगी है.
यहाँ तो जिस्म ला कर प्लग लगाए थे !

निकालें प्लग सभी ने,
‘ चलो अब घर चलें ‘ – और चल दिये सब,
मरेंगे तो वहीं जा कर जहां पर ज़िंदगी है !

[English Translation by Rakhshanda Jalil]

Migrants, COVID-19

The pandemic raged
The workers and labourers fled to their homes
All the machines ground to a halt in the cities
Only their hands and feet moved
Their lives they had planted back in the villages

The sowing and the harvesting was all back there
Of the jowar, wheat, corn, bajra – all of it
Those divisions with the cousins and brothers
Those fights at the canals and waterways
The strongmen, hired sometimes from their side and sometimes from this
The lawsuits dating back to grandparents and grand uncles
Engagements, marriages, fields
Drought, flood, the fear: will the skies rain or not?
They will go to die there – where there is life
Here, they have only brought their bodies and plugged them in!

They pulled out the plugs
‘Come, let’s go home’ – and they set off
They will go to die there – where there is life.

अनैतिक संबंधातून ३० वर्षीय तरुणाचा ५७ वार करुन निर्घृण खून

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे

अनैतिक संबंधाच्या संशयावरून सांगलीच्या कुपवाड येथील सचिन अण्णासो सुतार या ३० वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने तब्बल ५७ वार करून निर्घृण खून करण्यात आला आहे. आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मिरज ते कुपवाड रस्ता परिसरातील बडे पीर दर्ग्याजवळ खुनाची घटना घडली. तिघा हल्लेखोरांनी हा खून केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात याबाबत नोंद झाली आहे. तिघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

कुपवाड येथील शिवशक्तीनगर परिसरात राहणारा सचिन सुतार हा फॅब्रिकेशनचा व्यवसाय करत होता. आज सकाळी आठच्या सुमारास तो दुचाकीवरून मेहुणे चंद्रकांत सुतार आणि त्याच्या कामगारासह कामासाठी निघाला होता. ट्रिपल सीट तिघेजण कुपवाडहून मिरज रस्त्यावरून निघाले होते. त्याचवेळी मागून तिघेजण दुचाकीवरून आले. बडे पीर दर्ग्याजवळ तिघांनी दुचाकी आडवी मारून सचिनला अडवले. त्यानंतर हल्लेखोरांनी सुऱ्यासारख्या धारदार शस्त्रांनी सचिनवर हल्ला चढवला. हातावर, पाटीवर, छातीवर आणि पोटावर हल्लेखोरांनी तब्बल ५७ वार त्याच्यावर केले. तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. अवघ्या काही सेकंदात सचिनचा तडफडून मृत्यू झाला.

सचिनवर हल्ला सुरू असतानाच मेहुणा आणि कामगारांनी घटनास्थळावरून पलायन केले. खुनाची माहिती मिळताच कुपवाड पोलिस तत्काळ घटनास्थळी पोहोचले. आयुष हेल्पलाईन टीमच्या मदतीने मृतदेहाचा पंचनामा केला. त्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी सिव्हील हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला. दरम्यान सचिनच्या खुनामागे अनैतिक संबंधाचे कारण असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले. त्यातूनच त्याचा निर्घृण खून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी तिघा संशयितांना कुपवाड पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरु आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

ये…! डोक्यावरचा भार कमी होणार; बिगर रेड झोनमधील सलून सुरु करण्यास परवानगी

मुंबई । लॉकडाऊनमुळे गेल्या २ महिन्यापासून बंद असलेल्या सलूनची शटर आता खुली होणार आहेत. राज्य शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊन 4.0 नव्या नियामावलीत बिगर रेड झोनमधील सलून सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे गेल्या २ महिन्यांपासून दाढी-केस काढून ऋषी मुनींचा अवतार घेतलेल्या पुरुष मंडळींच्या केसांना आता कात्री लागणार आहे. मात्र सलून सुरु केल्यानंतर मास्क, हँड सॅनिटायझरबाबतचे नियम आणि कोरोना संदर्भातील अटी-शर्थींचे पालन करणे सलून चालकांना बंधनकारक असणार आहे.

राज्यात लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यातही ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये सलून सुरु करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र स्थानिक प्रशासनाने तेथील कोरोनाच्या संसर्ग परिस्थितीनुसार निर्णय घेतल्याने अनेक ठिकाणी सलून बंदच होते. लॉकडाऊनमुळे गेल्या २ महिन्यापासून सलून बंद असल्याने सलून व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसला होता. अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती. काही संघटनानी अटी-शर्थींसह सलून उघडण्याची परवानगी मिळावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती देखील केली होती.

दरम्यान, आता बिगर रेड झोनमधील सलून सुरु झाल्याने तेथील नागरिकांना वाढलेल्या दाढी-केस यांच्यापासून सुटका मिळणार आहे. सलूनमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे कठीण आहे. त्यामुळे सलून जरी सुरु झाले तरी कोरोनाच्या भीतीपोटी नागरिक दाढी-केस कापण्यासाठी सलूनमध्ये जाणार का? हा मोठा प्रश्न आहे. सलून बंद असल्याने सर्वसामन्यांपासून नेते मंडळी, सेलिब्रिटी सर्वांच्याच दाढी, केस वाढल्याचं दिसून येत होतं. सोशल मीडियावर अनेकांनी घरीच दाढी, केस कापल्याचे व्हिडीओ देखील शेअर केले होते, तर काहींना दाढी केस वाढलेला नवा लूक सोशल मीडियावर शेअर केला होता, यामध्ये सेलब्रिटी, नेते मंडळी यांचाही समावेश होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

वुहानच्या ‘त्या’ लॅबमध्येच कोरोनाचा जन्म झाला? WHO करणार निष्पक्ष तपास

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोमवारी कोरोना विषाणूसंदर्भात स्वतंत्र मूल्यमापन करण्यासंदर्भात बहुतेक सदस्य देशांनी केलेल्या आवाहनापुढे जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) झुकली आहे. या साथीच्या प्रसारावरुन अमेरिका आणि चीनमध्ये सध्या तणाव निर्माण झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत तीन लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू तसेच जागतिक अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झालेली आहे.

आफ्रिकन ,युरोपियन देश आणि इतर देशांच्या संघटनेने कोविड -१९च्या जागतिक प्रसाराचे स्वतंत्र मूल्यमापन व्हावे असे एक निवेदन डब्ल्यूएचओला दिलेले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही असा दावा केला आहे की नवीन कोरोना विषाणूचा उगम हा चीनमधील प्रयोगशाळेत झाला असल्याचा पुरावा आपल्याकडे आहे, तर वैज्ञानिकांनी या गोष्टीवर जोर दिला आहे की कदाचित या विषाणूने एखाद्या प्राण्यामधून माणसांमध्ये प्रवेश केला आहे.

या आयोजित सभेचे उद्घाटन संयुक्त राष्ट्र संघाचे सरचिटणीस अँटोनियो गुतारेस यांच्या हस्ते झाले. या सभेमध्ये त्यांनी नमूद केले की अनेक देशांनी डब्ल्यूएचओच्या शिफारशींकडे दुर्लक्ष केले. त्यांनी दिलेल्या एका व्हिडिओ संदेशात असे म्हटले आहे की, “अनेक देशांनी वेगवेगळ्या तसेच परस्पर विरोधी रणनीती अवलंबली आहे आणि त्यामुळे आपल्या सर्वांनाच एक मोठी किंमत मोजावी लागली आहे”. या अधिवेशनात जगभरातील अनेक सरकारांचे प्रमुख, राष्ट्रांचे प्रमुख आणि विविध देशांचे आरोग्य मंत्री उपस्थित होते.

जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस एड्रॉनम गॅबेरिएस म्हणाले की, ‘कोरोना विषाणूच्या साथीसंदर्भात यूएन हेल्थ एजन्सीने दिलेल्या प्रतिसादानंतर ते आपले स्वतंत्र मूल्यांकन सुरू करतील. कोविड -१९ च्या साथीच्या रोगासंदर्भात जानेवारी ते एप्रिल दरम्यानच्या प्रतिसादाबद्दल स्वतंत्र निरीक्षणासंबंधी सल्लागार मंडळाने आपला पहिला अहवाल प्रकाशित केला आणि त्यानंतर डब्ल्यूएचओच्या महासंचालकांनी सोमवारी हा ठराव घेतला.

अकरा पानांच्या या अहवालात जगाला एखाद्या रोगाचा उद्रेक होण्याबाबतची चेतावणी देणारी डब्ल्यूएचओ चेतावणी प्रणाली आणि ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायझरी पुरेसे आहे का, असा प्रश्न उपस्थित केला आहे. मात्र, सल्लागार मंडळाचा आढावा आणि शिफारस अमेरिकन प्रशासनाला फारसा समाधानकारक वाटत नाहीये. अमेरिकेने डब्ल्यूएचओवर कोरोना व्हायरसच्या आजाराशी संबंधित चीनची बाजू घेत असल्याचा आरोप केला होता.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी डब्ल्यूएचओवर चीनवरून येणाऱ्या लोकांवर प्रवासी निर्बंध न लादल्याचा आरोप केला. डिसेंबरमध्येच चीनमध्ये प्राणघातक विषाणूचा प्रसार होण्यास सुरवात झाली होती, जी नंतर जगभर पसरली. ट्रम्प यांनी नंतर डब्ल्यूएचओला अमेरिकेकडून दिल्या जाणाऱ्या मदतीवर तात्पुरते स्थगितीचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी आज सांगितले की, कोरोना विषाणूच्या साथीचा सामना करण्यासाठी पुढील दोन वर्षांत जागतिक आरोग्य संघटनेला आपला देश २ अब्ज डॉलर्सची मदत देईल. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) या मेळाव्याला संबोधित करताना शी जिनपिंग म्हणाले की, चीनने डब्ल्यूएचओ आणि इतर देशांना साथीच्या या रोगाचा डेटा वेळेवर उपलब्ध करुन दिला.

ते म्हणाले, “आम्ही कोणताही रोग लपवून न ठेवता या साथीचे नियंत्रण आणि आम्हांला आलेला उपचाराचा अनुभव जगासमवेत शेअर केला.” चिनफिंग म्हणाले, “गरज असताना इतर देशांना मदत करण्यासाठी आमच्या क्षमतेने आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले.” या दोन अब्ज डॉलर्समुळे कोविड -१९चा सामना करण्यास विशेषतः विकसनशील देशांना मदत होईल असेही चीनी अध्यक्ष म्हणाले. फ्रान्स, दक्षिण कोरियाचे अध्यक्ष आणि जर्मन चॅन्सेलर यांनी डब्ल्यूएचओला आपला पाठिंबा दर्शविला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.