Friday, December 26, 2025
Home Blog Page 5773

योगीजी, तुमच्या एका निर्णयावर लाखो कामगारांचं जीवन अवलंबून असताना तुम्ही असं वागू नका – सृष्टी के

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशभरातील एकूण स्थलांतराच्या सर्वाधिक स्थलांतर हे उत्तरप्रदेश, बिहार, मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये होते असल्याचे एका अभ्यासात दिसून आले होते. भारतात आणि जगभरात सध्या सुरु असलेल्या कोरोना संकटकाळात सर्व ठिकाणचे स्थलांतरित कामगार आपापल्या गावी परतण्यासाठी हतबल झाले आहेत. सरकारकडून अपेक्षाभंग होत असल्याने ते आता मिळेल त्या मार्गाने शक्य तितक्या लवकर आपल्या घरी परतण्याचा प्रयत्न करीत आहेत. गाझियाबादमधील श्रमिक रेल्वेच्या बुकींगसाठीची गर्दी, स्थलांतरित कामगारांचे विविध ठिकाणचे फोटो पाहता त्यांच्या अवस्थेचे चित्रण करत आहेत. राज्यातील कामगारांची ही अवस्था पाहता उत्तरप्रदेश सरकारवर लोकांमधून द्वेष व्यक्त केला जात आहे. ट्विटरवर सृष्टी के या तरुणीने आपल्या भावना व्यक्त करीत एक व्हिडीओ केला आहे, ज्यात ती उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाच प्रश्न विचारते आहे. 

https://twitter.com/srishtykInc/status/1262631992543281153?s=08

ती म्हणते आहे, ” जेव्हा लाखो लोकांचे आयुष्य तुमच्या एका निर्णयावर अवलंबून असते तेव्हा तुम्हांला खूप सक्षम असल्याचे भासत नाही का? नक्कीच तुम्हाला तुम्ही खूप ताकदवान असल्याचे जाणवत असेल. पण ही भावना इतर लोकांच्या जीवाची किंमत वसूल करून येता कामा नये. आपल्या आजूबाजूचे लोक रोज मरत आहेत. काल गाझियाबाद मध्ये जी गर्दी जमली होती ती कुणाची रॅली किंवा जनसभा नव्हती. आपल्या घरी जाऊ इच्छिणाऱ्या लोकांची ती गर्दी होती ज्यातला एक माणूस म्हणत होता मला मरायचे आहे पण माझ्या जमिनीवर… अशी अनेक बालके आहेत जी मरत आहेत आणि त्यांना मोठे होण्याची संधी मिळणार नाही आहे. भर उन्हात अन्न पाण्याशिवाय लोक हजारो मैल चालत आहेत फक्त आपल्या घरी पोहोचण्यासाठी. लोक मदत करू इच्छितात पण तुम्ही ती मदत लोकांपर्यंत पोहोचू देत नाही आहात” अशा कठोर शब्दात ही तरुणी व्यक्त होते आहे. ज्या प्रदेशात जिवंत आणि मृत लोकांना एकाच ट्रक मध्ये घातले जाते अशा प्रदेशात तुम्हाला फिटनेस प्रमाणपत्र हवे आहे? असा सडेतोड प्रश्न ती विचारते आहे. तुमचा अहंकार इतका मोठा होऊ देऊ नका की लोक मृत्युमुखी पडतील, आपल्या घरी जाण्याची आशा गमावून बसतील असे ही तरुणी या व्हिडिओद्वारे सांगते आहे. 

https://twitter.com/srishtykInc/status/1262474849563430914?s=19

देशाच्या कानाकोपऱ्यातून स्थलांतरित कामगार मोठ्या संख्येने उत्तरप्रदेश मध्ये दाखल होत आहेत. त्यामुळे उत्तरप्रदेश सरकारची जबाबदारी वाढली आहे.

https://twitter.com/srishtykInc/status/1262700913367699456?s=19

‘दबंग’मधील व्हिलन ठरतोय रिअल लाईफमधील कामगारांसाठी हिरो

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशातील स्थलांतरित कामगारांची अवस्था आपण पाहतच आहोत. सर्वोतोपरी केवळ आपल्या घरी पोहोचण्यासाठी हा स्थलांतरित कामगार वर्ग धडपडतो आहे. सरकारकडून एखादी कृती होईल आणि आपल्याला घरी पोहोचता येईल या आशेचे जवळपास निराशेत रूपांतर होत असतानाच श्रमिक रेल्वेची सोय करण्यात आली मात्र सर्वांपर्यन्त ती सुविधा पोहोचली नाही. असे अनेक कामगार आहेत जे अद्यापही घरी जाण्यासाठी धडपडत आहेत. अनेक दानशूर लोक आपापल्या परीने या लोकांना अन्न, पाणी पुरविण्याच्या पद्धतीने मदत करत आहेत. पण या सर्वांमध्ये दबंग सिनेमाचा खलनायक मात्र सर्वांसाठी नायक म्हणून आदर्श बनला आहे. अर्थातच अभिनेता सोनू सूद हा आता या कामगारांसाठी एक आशेचा किरण बनला आहे. कर्नाटक मध्ये अडकलेल्या स्थलांतरित कामगारांसाठी त्यांनी बसेस उपलब्ध करून दिल्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले आहेत. या कामगारांना निरोप देतानाचा त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विविध क्षेत्रातील लोकांसहित अनेकांनी त्यांचे कोतुक आणि अभिनंदन केले आहे. 

सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या या व्हिडीओ मुळे अनेक ठिकाणचे स्थलांतरित कामगार सोनू सूद यांना संपर्क करू पाहत आहेत. सोशल मीडियावर त्यांना तुम्हीच आमची शेवटची आशा असल्याचे सांगत मदतीसाठी आर्जव करत आहेत. या लोकांना सर्व बाजूनी मदतीचे आश्वासन देत मी तुमच्या सोबत आहे असेही सोनू सूद यांनी सोशल मीडियावर सांगितले आहे. नुकतेच त्यांनी आपण घरी बसून कंटाळलो आहोत आणि काही असे लोक आहेत जे घरी पोहोचण्यासाठी त्यांचा जीव धोक्यात घालत आहेत असे विधान केले होते. त्यांच्या या विधानाने त्यांची या कामगारांप्रती असणारी आस्था पाहून विविध ठिकाणांहून लोक त्यांना मदतीसाठी विनंती करत आहेत.

सगळीकडून कौतुक होत असताना “मी माझे कर्तव्य बजावत आहे” असे ट्विट त्यांनी केले आहे.

आता अंतिम आदेश माझाचं! प्रशासकीय गोंधळ टाळण्यासाठी ठाकरेंनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई । लॉकडाऊन आणि कोरोनाच्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीसंदर्भातील आदेशांमध्ये राज्य पातळीवरील अधिकाऱ्यांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये समन्वय नसल्याचे दिसून आले होते. अनेक ठिकाणी स्थानिक प्रशासनाने परस्पर आदेश काढल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रशासकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून सोमवारी यासंदर्भतील निर्देश जारी करण्यात आले.

आज राज्य सरकारने लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या. या सूचनांमध्ये स्थानिक पातळीवर परस्पर कोणतेही बदल करू नका, असे स्पष्ट बजावण्यात आले आहे. शासनाने काढलेल्या आदेशाशिवाय किंवा त्याच्या उलट कोणतेही आदेश काढायचे असल्यास स्थानिक प्रशासनाला मुख्य सचिवांची परवानगी घ्यावी लागेल, असे मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे.

स्थानिक प्रशासन राज्य पातळीवर काढलेल्या आदेशांची अंमलबजावणी न करता आपल्या स्तरावर वेगळे आदेश आणि निर्णय घेत असल्याने गोंधळाची स्थिती निर्माण होते. हा गोंधळ होऊ नये म्हणून आता कोणताही निर्णय घेताना मुख्य सचिवांच्या परवानगीचे बंधन घालण्यात आल्याचे सांगितले जाते. एकूणच आता प्रशासनावर वचक ठेवून सर्व सूत्रे आपल्याला हातात ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी जाणीवपूर्वक पुढाकार घेतल्याचे दिसत आहे.

प्रशासकीय गोंधळाच्या मुद्दयावर भाजपने केले होते मुख्यमंत्र्यांना लक्ष
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अधिकाऱ्यांवर वचक नाही. सरकार मुख्यमंत्री चालवतात की अधिकारी हेच कळत नाही, अशी टीका भाजपकडून करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी वानखेडे स्टेडियमवर कोविड सेंटर उभारण्याच्या मुद्द्यावरुन मुंबईच्या महापौर आणि आयुक्त इकबाल चहल यांनी परस्परविरोधी भूमिका घेतल्याने वादंग निर्माण झाला होता. त्यावरुन भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारला लक्ष्य केले होते. याच पार्श्वभूमीवर आता प्रशासनावर वचक ठेवून सर्व सूत्रे आपल्या हातात घेतली आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

PF मधील पैसे ऑनलाईन कसे काढायचे; जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या साथीचा प्रसार रोखण्यासाठी सध्या देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. या लॉकडाऊनमध्ये भासणारी पैशांची कमतरता दूर करण्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) ने ऑनलाइन आधार-बेस्ड फॅसिलिटीचा उपयोग करुन आपल्या रिटायरमेंटच्या बचतीतून पैसे काढण्यास परवानगी देत आहेत. यासाठी सदस्य ,ईपीएफओच्या,पोर्टलवर ऑनलाईन दावा करू शकतात. -https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/

यासाठीच्या अटी
ईपीएफओच्या इंटिग्रेटेड पोर्टलचा वापर करून ऑनलाईन पैसे काढण्यासाठी सदस्याकडे एक्टिविडेट UAN (युनिव्हर्सल अकाउंट नंबर) आणि ईपीएफओ खात्यास त्याच्या बँक अकाउंटचे डिटेल आणि आधार लिंक असणे आवश्यक आहे. तसेच, कंपनीबरोबर ई-केवायसी अप्रूड आणि वेरिफाइड केलेले सणे आवश्यक आहे.

कंपनी कडून अप्रूव्हल 
लॉग इन केल्यानंतर सदस्याने ‘Manage’ वर क्लिक करावे आणि नंतर केवायसीसाठी आधार नंबर आणि बँक अकाउंट डिटेल भरावा. नोकरी देणारी कंपनी किंवा संस्थेद्वारे यासाठीचे अप्रूव्हल मिळणे आवश्यक आहे आणि नोकरी सोडल्यानंतर कमीतकमी दोन महिन्यांनंतर ऑनलाइन या क्लेमवर दावा केला जाऊ शकतो.

काय आहे क्लेम प्रक्रिया
पोर्टलवर लॉग इन केल्यानंतर, मेन पेजवरील “ऑनलाइन सर्विसेस” या टॅबवर क्लिक करा आणि नंतर ‘क्लेम’ फॉर्म निवडा, जो की एक संयुक्त फॉर्म क्रमांक, 31, 19, 10 सी आणि 10 D आहे. सदस्यासाठी माहिती पेजवर अपडेट केली जाईल. त्यानंतर रजिस्टर्ड बँक अकाउंट क्रमांकाचे शेवटचे चार अंक टाकणे आवश्यक आहे. बँक अकाउंटच्या व्हेरिफिकेशनसाठी पुढे जाण्यासाठी ‘सर्टिफिकेट ऑफ अंडरटेकिंग’ या पॉप अपची आवश्यकता असते.

एकदा व्हेरिफिकेशन झाल्यानंतर सदस्य ‘क्लेम साठी पुढे चला’ वर क्लिक करू शकतात. त्यानंतर इच्छित असलेले पैसे (desired withdrawal) काढण्याचा पर्याय निवडावा आणि रक्कम अपडेट करावी. चेकची स्कॅन केलेली कॉपी अपलोड करावी लागेल तसेच सदस्याला तिथे आपल्या पत्त्याचा उल्लेखही करावा लागेल. या व्यवहाराला प्रमाणित करण्यासाठी सदस्याच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर ओटीपी पाठविला जाईल. याची पडताळणी झाल्यानंतरच, दावा सादर करावा लागेल.

कोविड १९ ईपीएफ पैसे काढणे
ईपीएफओने कोविड -१९ च्या संकटामुळे उद्भवलेल्या या आर्थिक आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सदस्याच्या खात्यातून अंशतः पैसे काढण्याची परवानगी देखील दिलेली आहे. तीन महिन्यांच्या बेसिक आणि महागाई भत्ता (डीए) किंवा खात्यात ७५ % क्रेडिट बॅलन्स यापैकी जी रक्कम कमी असेल ती काढू शकाल. यासाठी ‘कोविड -१९ पँडेमिक’ हा पर्याय निवडणे आवश्यक आहे आणि त्यानंतर ‘पीएफ अ‍ॅडव्हान्स’ क्लेमवर क्लिक करणे आवश्यक आहे.

क्लेम स्टेटस
ऑनलाईन सेवा टॅब अंतर्गत सदस्य चेक क्लॅम स्टेटसद्वारे पोर्टलवर आपल्या क्लेमची स्थिती तपासू शकतात. ईपीएफमधून पैसे काढणे याचे फायदे आणि तोटे दोन्हीही आहेत. हे देखील लक्षात घेण्याची आवश्यकता आहे कारण ते आकर्षक कर मुक्त, गॅरेंटेड रिटन्स देते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Lockdown 4.0ची गाईडलाईन जाहीर; जाणून घ्या, राज्यात काय सुरु आणि काय बंद राहणार?

मुंबई । सध्या संपूर्ण देशात लॉकडाउन 4.0 सुरु झाला आहे. पहिल्या ३ लॉकडाउनच्या तुलनेत चौथ्या लॉकडाउनमध्ये नियम थोडे शिथिल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य शासनातर्फे चौथ्या टप्प्याच्या लॉकडाउनसाठी सविस्तर नियमावली जाहीर करण्यात आली आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत या नियमावलीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. यामध्ये सर्वाधिक महत्त्वाचा बदल म्हणजे यापुढे राज्यात एकूण तीन झोनमध्ये कोरोनाबाधित क्षेत्रांची विभागणी करण्यात आलेली असेल. रेड झोन, नॉन रेड झोन आणि कंटेन्मेंट झोन अशा स्वरुपात ही विभागणी केलेली असेल. ज्या धर्तीवर संबंधित परिसरामध्ये लॉकडाऊनच्या नियमांची आणखी करण्यात आलेली आहे. कंटेन्मेंट झोनमध्ये मोठ्या प्रमाणावर नियम अधिक कठोर असतील. जेथे अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणत्याही प्रकारची शिथिलता देण्यात आलेली नाही. तर, रेड आणि ऩॉन रेड झोनमध्ये त्याचं स्वरुप काहीसं बदललेलं असेल.

लॉकडाउन 4.0मध्ये रात्रीची संचारबंदी
-संध्याकाळी ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत सर्व सेवा बंद राहणार आहेत.

-अत्यावश्यक सेवा वगळता संध्याकाळी ७ ते सकाळी ७ पर्यंत बाहेर पडायला मज्जाव असेल.

-६५ वर्षांवरील वृद्ध, गरोदर महिला, इतर आजार असलेल्या व्यक्ती, १० वर्षांखालील मुलं यांनी घरीच थांबावं, वैद्यकीय कारणासाठीच त्यांना घराबाहेर पडण्याची मुभा.

रेड झोन आणि बिगर रेड झोन विभागणी

– रेड झोनमध्ये मुंबई आणि एमएमआरमधील सर्व महापालिका, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक,       धुळे, जळगाव, अकोला, अमरावती या महापालिका.

– उरलेली सर्व क्षेत्र बिगर किंवा नॉन रेड झोन क्षेत्र म्हणून घोषित.

– कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी.

-कंटेन्मेंमट झोनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद होणार.

रेड झोनमध्ये काय सुरू राहणार

– अत्यावश्यक सेवेची सर्व दुकानं सुरु राहतील.

– इतर दुकानांना परवानगी, त्याबाबत स्थानिक प्रशासन निर्णय घेणार.

– स्थानिक प्रशासनाने परवानगी दिली तर दारूची दुकानं सुरू करता येणार, दारूची होम डिलिव्हरी करता येणार आहे.

– टॅक्सी, रिक्षा सेवा बंद राहणार.

– दुचाकीवर एकालाच प्रवास करण्याची परवानगी.

-मॉल्स, परवानगी नसलेली दुकाने, परवानगी नसलेली इतर आस्थापनं साफसफाईसाठी सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळात सुरू ठेवू शकतात

– दस्त नोंदणी कार्यालय, आरटीओ कार्यालय सुरू करण्याची परवानगी

-विद्यापीठ, महाविद्यालयात उत्तरपत्रिका तपासणी, निकाल लावण्यासाठी ५ टक्के कर्मचारी उपस्थित ठेवण्यास परवानगी

नॉन रेड झोनमधील नियम

– स्पोर्टस् कॉम्प्लेक्स, स्टेडियम, खुल्या जागा वैयक्तिक व्यायामासाठी सुरू राहणार, पण सामुहिक जमावाला बंदी

– जिल्हांतर्गत बससेवा ५० टक्के प्रवासी क्षमतेने चालविण्यास परवानगी

-सर्व दुकानं आणि बाजारपेठा सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत सुरू राहणार, मात्र गर्दी झाल्यास हे बंद करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासन घेऊ शकते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

चौथ्या लॉकडाउनमध्ये सरकारचे नवीन मार्गदर्शक तत्वे जाहीर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन l देशात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे सरकारने आतापर्यंत एकूण 4 लॉकडाऊन जाहीर केले आहेत. आता चौथा लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनने अर्थव्यवस्थेचे मात्र कंबरडे मोडले आहे. ही अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी सरकारने काही नियम शिथिल केले होते. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्हे हे रेड झोनमध्ये आहेत. मात्र महाराष्ट्र सरकारने आता रेडझोनच्या बाहेर म्हणजे ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये काही नियम शिथिल केले आहेत.

राज्य सरकारने ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये बस, टॅक्सी वाहतुकीस परवानगी दिली आहे. दरम्यान मुंबई, पुणे, नाशिक, सोलापूर,मालेगाव, औरंगाबाद महापालिका क्षेत्र रेड झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. मात्र इतर जे जिल्हे ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील जिल्हे आहेत. त्या जिल्ह्यात काही नियम हे शिथिल केले आहेत.

त्यामुळे आता ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे. या नागरिकांना आता जीवनावश्यक वस्तू व्यतिरिक्त इतरही वस्तू खरेदी करता येणार आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! JEE Main 2020 परीक्षेचा अर्ज भरण्याची पुन्हा एक संधी

नवी दिल्ली । देशातील आयआयटींमधील अभियांत्रिकीच्या पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा JEE Main ला अर्ज करायचा राहिला असेल तर त्वरा करा, आणखी एक संधी चालून आली आहे. जे विद्यार्थी कुठल्या कारणाने जेईई मेन्ससाठी अर्ज करू शकले नाहीत, त्या सर्वांना पुन्हा एक संधी देण्यात आली आहे. याबाबतची घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनी केली आहे. JEE Main परीक्षेचा अर्ज करण्याचं राहून गेलेल्या विद्यार्थ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

पोखरियाल यांनी ट्विटमध्येही म्हटलं आहे की ‘ज्या विद्यार्थ्यांनी परदेशी जाऊन शिक्षण घेण्याची योजना रद्द केली आहे, त्यांना भारतात राहून शिक्षण घ्यायची संधी दिली जात आहे. मी नॅशनल टेस्ट एजन्सीला सल्ला दिला होता की अशा विद्यार्थ्यांना जेईई मेन २०२० ला बसण्याची एक संधी मिळायला हवी.’

एनटीएद्वारे जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार जेईई मेन २०२० साठी अर्ज करण्याची लिंक पु्न्हा सक्रीय करण्यात आली आहे. १९ मे २०२० पासून ही लिंक अक्टिव्ह झाली आहे. विद्यार्थी आजपासूनच १९ मे पासूनच अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्जांची अखेरची तारीख २४ मे २०२० आहे. लक्षात घ्या की जेईई मेन २०२० परीक्षा देण्याची ही अखेरची संधी आहे.

कोरोना व्हायरसमुळे जगासमोर मोठं संकट उभं ठाकलं आहे. विमान सेवा बंद आहेत. अनेक परदेशी विद्यापीठांची दारं बंद आहेत. ज्या विद्यार्थ्यांना बारावीनंतर परदेशात जाऊन उच्च शिक्षण घ्यायचं होतं त्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे. या विद्यार्थ्यांना जर असे वाटत असेल की देशातच जेईई द्वारे अभियांत्रिकीची पदवी मिळवावी तर या विद्यार्थ्यांना ही एक सुवर्णसंधी आहे.

Jee Main च्या संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

maharashtra times

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

TikTok vs YouTube | टिकटाॅक चे रेटिंग ४.७ वरुन थेट २ वर कसे घसरले? जाणुन घ्या संपुर्ण प्रकरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ट्विटरवर गेल्या अनेक दिवसांपासून युट्यूब आणि टिकटाॅकच्या चाहत्यांमध्ये एक नवीन प्रकारचे युद्ध सुरू झाले आहे. युट्यूब आणि टिकटॉकवर भारी कोण आहे याबद्दल हे वाकयुद्ध सुरु आहे ? एक बाब हि आहे की गूगल प्ले स्टोअरवर टिकटॉकचे रेटिंग सध्या ४.७ वरून २ वर आले आहे. तसेच,काही युझर्सनी गूगल प्ले स्टोअरवर या टिकटाॅकला एकच रेटिंग दिले आहे.

सोशल मीडियावरही बर्‍याच युझर्सकडून भारतात टिकटॉकवर बंदी घालण्याची मागणीदेखील केली जात आहे. गुगल प्ले स्टोअरच्या म्हणण्यानुसार, टिकटॉकला आतापर्यंत सुमारे २४ दशलक्ष युझर्सकडून रेटिंग मिळाले आहे, त्यापैकी बऱ्याच युझर्सकडून या अ‍ॅपला केवळ एकच रेटिंग दिले आहे, ज्यामुळे या अ‍ॅपच्या रेटिंगमध्ये मोठीच घसरण होऊन केवळ दोनच झाले आहे.

त्याचवेळी सुमारे ७ लाख २२ हजार युझर्सनी टिकटॉकच्या लाईट व्हर्जनला रेटिंग दिलेले आहे. त्याच्या लाईट वर्जनचे रेटिंग हे फक्त १.१ इतकेच झालेले आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की YouTube प्ले यूट्यूब अ‍ॅपला सुमारे ७० दशलक्ष लोकांनी रेटिंग दिली आहे.

युट्यूब-टिकटॉक दरम्यान का सुरू झाली फाईट ?
गेल्या कित्येक दिवसांपासून युट्यूब आणि टिकटॉकच्या चाहत्यांमध्ये भांडण सुरू आहे. यामध्ये यूट्यूब युझर्स हे टिकटॉक युझर्सची तर टिकटॉक युझर्स हे यूट्यूबच्या युझर्सची चेष्टा करताना दिसतात. हे प्रकरण तेव्हा वाढले जेव्हा टिकटॉक स्टार आमिर सिद्दीकीने यूट्यूबर्सची खिचाई करणारा एक व्हिडिओ बनविला. त्याने यूट्यूबवर कॉमेडी करणाऱ्यांची खूपच उडविली.

मात्र त्याच्या या व्हिडीओ नंतर गप्प बसतील ते यूट्यूबर्स कसले. यूट्यूबवर कॅरी मिनाटी नावाने एका अकाउंटमधून एक व्हिडिओ रिलीज करण्यात आला, ज्यात त्याने या टिकटॉक स्टार्सची फारच वाट लावली आहे. हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ काही वेळातच लाखो लोकांपर्यंत पोहोचला. यानंतर ट्विटरवरदेखील या वाकयुद्धाला सुरुवात झाली. येथे हजारो लोकांनी मीम्स शेअर करुन एकमेकांवर आपला राग व्यक्त केला. याचा परिणाम असा झाली की, ट्विटरच्या ट्रेंडमध्ये टिकटॉक, यूट्यूब आणि स्कर्टचे वर्चस्व राहिले.

TikTok vs YouTube: CarryMinati roasts Tiktoker Amir Siddiqui ...

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

.. म्हणून अमित शहांनी केला ममता बॅनर्जींना तातडीनं फोन

नवी दिल्ली । अम्फान या वादळाचा सामना करण्यासाठी केंद्र आणि संबंधित राज्य सरकारने पूर्ण तयारी केली आहे. एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या असून नौदल आणि भारतीय सैन्यही अलर्टवर आहे. नागरिकांना आता सुरक्षित स्थळी हलवण्यावर भर दिला जात आहे याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत फोनवर चर्चा केली. यावेळी अमित शहा यांनी ममता बॅनर्जी यांना केंद्राकडून पूर्ण मदतीची हमी दिली. २१ वर्षात पहिल्यांदाच येत असलेल्या या भीषण चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी सरकार सक्रिय झालं आहे.

२० मे रोजी अम्फान वादळ पश्चिम बंगाल आणि बांगलादेशचया हटिया बेट यांच्यामधून अत्यंत रौद्र रुप धारण करुन जाण्याची शक्यता आहे. मंगळवारी या वादळाचा वेग कमी होण्याचाही अंदाज आहे. कोलकाता, हावडा, पूर्व मिदनापूर, उत्तर आणि दक्षिण २४ परगना आणि हुगळी या जिल्ह्यांमध्ये पावसाचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, अम्फान वादळ हे पश्चिम बंगालमधील दीघा आणि बांगलादेशातील हटिया बेटाच्या मधून सुंदरबनला धडक देणं अपेक्षित आहे. किनाऱ्याला धडक देताना वादळाचा वेग १५५ ते १६५ किमी प्रति तास असू शकतो. मंगळवार सायंकाळ किंवा बुधवारपर्यंत या वादळाचा वेग १८५ किमी प्रति तास होईल. या पार्श्वभूमीवर कुणीही समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, अशी सूचना ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये देण्यात आली आहे.

वादळाचा सामना करण्याची आपत्कालीन यंत्रणा सज्ज
गृह मंत्रालयाच्या माहितीनुसार, राज्य आणि केंद्राच्या यंत्रणांच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर धोकादायक ठिकाणच्या नागरिकांना तातडीने हलवण्यात यावं, असे निर्देश कॅबिनेट सचिवांकडून देण्यात आले आहेत. अन्न, पाणी आणि औषधे अशा विविध अत्यावश्यक सेवांच्या पूर्ततेची तयारीही केली जात आहे. अम्फान वादळाचा सामना करण्यासाठी एनडीआरएफच्या ३६ तुकड्या ओदिशा आणि पश्चिम बंगालमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. याशिवाय सैन्य, नौदल आणि नौदलाच्या जहाजांसह नौदलाचे विमाने, हवाई दल आणि तटरक्षक दलालाही सज्ज राहण्यास सांगितल्याची माहिती गृह मंत्रालयाने दिली.

NDRF चे महासंचालक एस एन प्रधान यांनी सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, ‘अम्फान’ वादळाचा धोका लक्षात घ्यायला हवा. कारण बंगालच्या खाडीतून आलेल्या मोठ्या चक्रीवादळाचा सामना करण्याची भारताची ही दुसरी वेळ आहे. कच्ची घरं, घरांची कच्चे छत, नारळांची झाडं, टेलिफोन आणि वीजेचे खांब यांना मोठ्या प्रमाणात या वादळाचा फटका बसू शकतो. १९९९ मध्ये आलेल्या सुपर सायक्लोनमध्ये ९००० हून अधिक जणांनी प्राण गमावले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

सोन्याच्या किंमती गडगडल्या; जाणून घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मंगळवारी सोन्याच्या किंमतीत चांगलीच घसरण दिसून आली आहे. सोमवारी सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅमसाठी ४८ हजार रुपयांपर्यंत पोहोचली होती. मात्र आज, म्हणजे मंगळवारी सोन्याची किंमत खाली आली आहे. आज किरकोळ बाजारात २४ कॅरेट सोन्याची किंमत ४६९६६ रुपये प्रति १० ग्रॅम, तर २२ कॅरेट सोन्याची किंमत ४३,०२० रुपये प्रति १० ग्रॅम झाली आहे.

सोमवारी सोन्याच्या किंमतीत चांगली वाढ झाली होती. सोमवारी संध्याकाळी किरकोळ बाजारात त्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७८६१ रुपयांवर पोहोचली होती.

इंडियन बुलियन आणि ज्वेलर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. आज चांदी एक हजार रुपयांपेक्षा खाली घसरून ४७०१० रुपये प्रति किलो झाली आहे. सोमवारी संध्याकाळी किरकोळ बाजारात ती ४८,१२० रुपये किलो विकली जात होती.

 

दुसरीकडे, सट्टेबाजांच्या जोरदार मागणीमुळे सोमवारी फ्युचर्स मार्केटमध्ये सोन्याचा भाव ४७९ रुपयांनी वाढून ४७,८६० रुपयांवर आला.मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये जून डिलीव्हरीसाठी सोन्याचा भाव ४७९रुपये किंवा १.०१ टक्क्यांनी वाढून ४७,८६० रुपये झाला. १२,८८१ या लॉटसाठी उलाढाल झाली.

ऑगस्टमध्ये डिलीव्हरीसाठी सोन्याचा भाव ४६९ रुपये किंवा ०.९९ टक्क्यांनी वाढून ४८,०३८ रुपये प्रति १० ग्रॅम झाला, ज्याचा ९१२१ या लॉटसाठी उलाढाल झाली.बाजार विश्लेषकांनी सांगितले की, व्यापाऱ्यांनी केलेल्या नव्या खरेदीमुळे सोन्याच्या वायद्याचे भाव वाढले आहेत.तर जागतिक पातळीवर न्यूयॉर्कमधील सोन्याचे भाव ०.९५ टक्क्यांनी वधारून ते १,७७३ डॉलर प्रति औंस झाले.


ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.