Friday, December 26, 2025
Home Blog Page 5777

शीतल आमटेंची कोरोनाविरुद्धच्या युद्धात उडी, वरोरा उपजिल्हा रुग्णालयात सेवेसाठी रुजू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रस्त्यावर पडलेल्या एका कुष्ठरोग्याला पाहून अस्वस्थ झालेल्या बाबा आमटेंनी आपले संपूर्ण आयुष्य आनंदवन फुलविण्यात घालविले. वडिलांच्या समाजसेवेचा वारसा जपत डॉ विकास आमटे आणि डॉ प्रकाश आमटे यांनी लोकसेवेचा पर्याय निवडला. त्यानंतरच्या पिढीनेही या कामातच आनंद मानला. आज स्व. बाबा आमटे यांची तिसरी पिढीही उत्स्फूर्त पणे समाजसेवेच्या कार्यात सहभागी होते आहे. कोरोनाच्या या संकटकाळातही हे कुटुंब सेवेसाठी तत्पर आहे. बाबा आमटे यांच्या नात शीतल आमटे यांनी नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत covid- १९ च्या युद्धात योद्धा म्हणून सहभाग नोंदविला आहे. चंद्रपूर येथील वरोरा उपजिल्हा रुग्णालयात त्या रुजू झाल्या आहेत. यासंदर्भातील ट्विट जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आज केलं.

Covid-१९ चे संकट सुरु झाल्यापासून त्या विविध मार्गानी लोकांचे प्रबोधन करण्याचे काम करत आहेत. लोकांच्या प्रश्नांची उत्तरे देत आहेत. त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट वरून वेबिनार च्या माध्यमातून त्या लोकांच्या प्रश्नांची उत्तरे देत आहेत. covid-१९ काय आहे? त्याचे काय परिणाम होतात? कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे अशा अनेक संशयाचे त्या निराकरण आपल्या वेबिनार मार्फत करत आहेत. मुलांवर चांगले संस्कार करण्यासाठी त्यांना काही शिकवण्याची गरज नसते तर ते आपसूकच आपल्या मोठ्यांकडून शिकत असतात, आणि आमच्याबाबतीत तेच झाले असे नुकत्याच फेसबुकवर झालेल्या एका लाईव्ह मुलाखतीत त्यांनी सांगितले होते. या कुटुंबाच्या आजपर्यंतच्या समाजाप्रती असणाऱ्या बांधिलकीबद्दल सांगावे तितके थोडे आहे. वेळोवेळी समाजाप्रती असणारी आस्था त्यांनी त्यांच्या कृतीतून व्यक्त केली आहे. पुन्हा एकदा त्याचा प्रत्यय येतो आहे.

अनोळखी पुरुषासोबतचा ‘असा’ व्हिडीओ व्हायरल झाला म्हणून पाकिस्तानात दोन तरुणींची हत्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानमध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दोन मुलींना आपला जीव गमवावा लागला आहे. त्याच्या कुटुंबानेच ही हत्या केली आहे. व्हिडिओमध्ये या मुली एका पुरुषासह दिसल्या होत्या. या मुलींपैकी एक १६ वर्षांची आणि दुसरी मुलगी ही १८ वर्षांची होती. काही दिवसांपूर्वीच हा व्हिडिओ पाकिस्तानच्या उत्तर वजीरिस्तानमध्ये व्हायरल झाला होता, ज्यामध्ये या मुली एका मुलासमवेत दिसल्या.

गोळी मारल्यानंतर या दोन्ही मुलींना त्यांच्या कुटुंबातील लोकांनी गावातच एका ठिकाणी पुरले. स्थानिक पोलिसांचे असे म्हणणे आहे की,’ त्यांनी मृतांपैकी एका मुलीच्या वडिलांना तर दुसरीच्या भावाला या खुनाच्या आरोपाखाली अटक केली असून सध्या त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिस या हत्येत सामील असलेल्या कुटुंबातील इतर दोन सदस्यांचाही शोध घेत आहेत.

एका मिनिटापेक्षा कमी लांबीचा असलेला हा व्हिडिओ मागील वर्षीचा असल्याचे सांगितले जात आहे. हा व्हिडीओ अगदी काही आठवड्यांपूर्वीच सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत दिसत असलेल्या तिसऱ्या एका मुलीचाही शोध घेत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्या तिसर्‍या मुलीलाही ठार मारले असल्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे.

अफगाणिस्तानच्या सीमेवरील उत्तर आणि दक्षिण वजीरिस्तानच्या आदिवासी भागात महिलांवर अनेक कडक निर्बंध आहेत आणि इथे त्यांना घराबाहेरही जायची परवानगी नाही आहे. पाकिस्तानच्या आदिवासी भागात ऑनर किलिंग ही सामान्य गोष्ट आहे. सामाजिक कार्यकर्त्यांच्या मते ऑनर किलिंगमुळे इथे दरवर्षी १००० हून अधिक हत्येच्या घटना घडतात.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

मुख्यमंत्री ठाकरेंची तरुण उद्योजकांना हाक; भाडेतत्वावर जमीन देणार

मुंबई । महाराष्ट्र करोना विरुद्ध लढा देत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वेळोवेळी राज्यातील जनतेशी संवाद साधत आहेत. आजही मुख्यमंत्री ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह वरून जनतेशी संवाद साधला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तरुण उद्योजकांना हाक दिली आहे. तसेच यावेळी नवीन उद्योजकांना भाडेतत्वावर जमीन देण्याची घोषणाही ठाकरे यांनी केली आहे. नवीन उद्योगांसाठी एकूण ४० हजार एकर जमीन शासनाने राखून ठेवली असल्याची माहिती देखील ठाकरे यांनी दिली आहे.नवीन उद्योजकांना प्रदूषण न करणे हि अट असणार आहे. ठाकरे यांनी लॉकडाऊन-४ जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज प्रथमच जनतेला संबोधित करत असून करोनाची साथ आणि आर्थिक कोंडी अशा दुहेरी कात्रीत सापडलेल्या महाराष्ट्राला ते कोणती नवी वाट दाखवतात हे पाहावे लागणार आहे.

“३१ मेपर्यंत देश आणि आपला महाराष्ट्रही लॉकडाउनमध्ये आहे. मी आलो की लॉकडाउनच जाहीर करतो असं तुम्हाला वाटत असेल. साहजिक आहे, किती काळ लॉकडाउनमध्ये काढणार ? याला काही उत्तर आहे का? जगात कुणाकडे करोनाचं उत्तर नाही. युद्ध नेहमी शस्त्राने लढलं जातं. मात्र इथे हातात शस्त्र नाही. अंतर ठेवणं आणि जिंकणं हे कठीण आहे. लॉकडाउन वाढवणं हे काही अंशी नक्कीच बरोबर आहे. महाराष्ट्रात आणि मुंबईत करोना रुग्णांची संख्या वाढते आहे. नाशिक, पुणे, औरंगाबाद या ठिकाणीही संख्या वाढते आहे. मग आत्तापर्यंत काय केलं? हा प्रश्न पडलाच असेल. आपण मार्चपासून काळजी घेतो आहोत त्यामुळे रुग्णसंख्या आटोक्यात ठेवू शकलो आहोत. आपण करोनाची श्रृंखला मोडू शकलेलो नाही. मात्र लॉकडाउनच्या गतिरोधकाने आपण करोनावर नियंत्रण ठेवू शकलो आहोत” असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

“येत्या काळात ग्रीन झोन, ऑरेंज झोनमध्ये शिथिलता आणली आहे. येत्या काळात आणखी शिथिलता देणार आहोत असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आजपर्यंत राज्यात ५० हजार उद्योगांना संमती दिली आहे. ५ लाख मजूर यामध्ये काम करत आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं. उद्योगांसाठी काही गोष्टी जाहीर करायच्या आहेत. कारण पॉज बटण दाबलं गेलं आहे. ज्यामुळे जग थांबलं आहे असंही ते म्हणाले आहेत. सरकारला ६ महिने होत आहेत. त्याआधीच या संकटाला सामोरं जावं लागतं आहे. एका हिंमतीने आपण पुढे जातो आहोत. नवीन उद्योग येण्यासाठी वेगळी स्पर्धा आहे. ४० हजार एकरपेक्षा जास्त जमीन नव्या उद्योगधंद्यांसाठी राखीव ठेवली आहे. नवे उद्योजक कदाचित जमीन खरेदी करणार नाहीत मात्र त्यांना भाडे तत्त्वावर जमिनी देऊ” असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

प्रेक्षक नसलेल्या मैदानात क्रिकेट खेळणे म्हणजे नवरी नसताना लग्न करणे – अख्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आत्ता संपूर्ण जगात कोरोना संसर्गामुळे लॉकडाउन सुरु आहे. काही ठिकाणी यामध्ये सूट देण्यात आली आहे, तर काही देश कठोरपणे त्याची अंमलबजावणी करीत आहेत. अशा परिस्थितीत जगभरात विविध खेळांच्या संघटनांवर अजूनही या संकटाचे ढग जमा आहेत.

परिस्थिती सामान्य झाल्यानंतरही क्रिकेट मालिका किंवा स्पर्धा रिकाम्या स्टेडियममध्ये घेण्याचा विचार सध्या केला जात आहे. यातच पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरला असे वाटत आहे की,’रिकाम्या स्टेडियममध्ये क्रिकेट खेळणे म्हणजे वधूशिवाय लग्न करण्यासारखे असेल.’

कोविड १९ साथीच्या आजारामुळे जवळजवळ सर्वच खेळ हे रिकाम्या स्टेडियममध्ये घेण्याचे सध्या नियोजन करण्यात येत आहेत. भविष्यात कोरोना विषाणूच्या संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी, प्रेक्षकांना घरातूनच खेळाचा आनंद घ्यावा लागेल.

माजी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तर हॅलो ऍप लाइव्हवर झालेल्या मुलाखतीत म्हणाला की , “रिकाम्या स्टेडियममध्ये क्रिकेट खेळणे व्यवहारी तसेच टिकाऊ असेल मात्र आपल्याला त्याचा प्रचार करायला हवा असे मला तरी वाटत नाही. रिकाम्या स्टेडियममध्ये क्रिकेट खेळणे म्हणजे वधूशिवाय लग्न करण्यासारखे असेल. कोणताही सामना खेळण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी होणे आवश्यकच आहे. मी अशी अपेक्षा करतो की या वर्षाच्या अखेरीस ही कोरोनाची परिस्थिती सामान्य स्थितीत परत येईल. “

यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीनेही रिकाम्या स्टेडियममध्ये सामने खेळण्याविषयी आपले मत दिले होते. तो म्हणाला होता,’रिकाम्या स्टेडियममध्ये खेळणे हे खूप कठीण होईल. प्रेक्षकांशिवाय ती जादू तयार करणे आणि भरलेल्या स्टेडियममध्ये येणारा उत्साह आणणे कठीण होईल.’

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

बळीराजाला वाचावा! शरद पवारांनी केली मोदींकडे पत्रातून मागणी

मुंबई । कोरोना आणि लॉकडाउनमध्ये अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना मदतीचं आवाहन करणार एक पत्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलं आहे. लॉकडाउनचा आर्थिक फटका शेती क्षेत्राला सुद्धा बसला आहे. अशा परिस्थितीतून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही आवश्यक पावलं उचलावीत असंही शरद पवार यांनी त्यांच्या पत्रात म्हटलं आहे. २० लाख कोटींचं पॅकेज जाहीर केल्यानंतरही त्यामध्ये शेतकऱ्यांबाबत म्हणाव्या तशा काही ठोस तरतुदी नाहीत असं म्हणत शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती. आता पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून शरद पवार यांनी काही गोष्टी मांडल्या आहेत.

आपल्या देशात कोरोनाची साथ पसरली आहे. तसंच लॉकडाउन जाहीर करुन आता ५५ दिवस होत आहेत. अशावेळी मनोधैर्य हरवलेल्या आणि नुकसान सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना उभारी देणं गरजेचं आहे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. सध्या आपल्या देशातील शेतकऱ्यांची अवस्था ही कोरोना संकटामुळे आणि लॉकडाउनमुळे दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. पावसाळा तोंडावर असताना शेतकरी मानसिकदृष्ट्या खचला आहे. शेती हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे या क्षेत्रासाठी ठोस उपाय योजना कराव्यात अशी विनंती मी आपल्याला पत्राद्वारे करतो आहे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

शरद पवारांनी पत्रातून मांडले ‘हे’ मुद्दे

१) शेती क्षेत्रासाठी अर्थमंत्र्यांनी १.६३ लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं हा भाग २० लाख कोटींच्या पॅकेजचा विचार करता ८ टक्के इतका होता.

२) शेतीसंबंधीच्या पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी पॅकेज जाहीर करण्यात आलं. मात्र त्यासाठी लागणारा कालावाधी हा मोठा आहे. सध्या शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. करोना नावाच्या संकटामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत अशात मागणी कमी झाली आहे, अडचणी येत आहेत त्याबाबत विचार व्हावा

३) जे पॅकेज जाहीर करण्यात आलं आहे त्यामुळे तातडीची मदत मिळणार नाही. ज्यांना तोटा सहन करावा लागला आहे त्या शेतकऱ्यांचं काय? लॉकडाउनमुळे अनेक शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचं नुकसान झालं आहे त्याचं काय? अशा काळात त्यांना तातडीने मदत देण्याची गरज आहे. खरिपाच्या दृष्टीने त्यांना नियोजन करता येईल यासाठी केंद्राने प्रयत्न केले पाहिजेत

४) पशूपालन, मत्स्य व्यवसाय, लघु उद्योग, मधमाशी पालन यांच्यासाठी जे पॅकेज जाहीर करण्यात आलं त्याबाबत सरकारने अधिक स्पष्टता द्यावी.

५) सध्या कृषी क्षेत्रात काम करणारा प्रत्येक माणूस हा एक प्रकारच्या नैराश्याखाली जगतोय. तोटा सहन करुन नैराश्यात दिवस काढणाऱ्या शेतकऱ्याला तातडीची मदत देऊन दिलासा देण्याचं काम मोदी सरकारने केलं पाहिजे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

धक्कादायक! अश्लील फोटो काढून पोटच्या मुलानेच केले महिलेला ब्लॅकमेल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या मुलानेच स्वत: च्या आईविरूद्ध संपत्ती हडप करण्याचा कट रचला आहे हे जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. एका मुलावर असा आरोप केला जात आहे की त्याने आपल्या नावावर मालमत्ता करण्यासाठी मोबाईलवरून त्याच्या आईचे अश्लील छायाचित्र काढले आणि नंतर तिला दाखवून ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.

राजस्थानच्या कोटा येथील शिवपुरा भागातील एका महिलेने याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि सांगितले की आपला मुलगाच त्यांना मालमत्तेसाठी ब्लॅकमेल करीत आहे. या ७५ वर्षीय महिलेने पुढे सांगितले की,’ मालमत्तेच्या वादामुळे तिच्या मुलाने तिचे एक अश्लील छायाचित्र काढले आणि ते तो त्यांच्याच कुटुंबातील इतर लोकांच्या फोनवर पाठवू लागला.

या महिलेने सांगितले की,’एका दिवशी ती घरात पूजे दरम्यान हवन करीत होती, तेव्हा मुलाने आग लागल्याचे सांगून आरडाओरड करण्यास सुरूवात केली. त्यानंतर या आगीतून वाचण्यासाठी आपले कपडे उतरवायला सांगितले. अन त्या महिलेने आपले कपडे काढताच त्या आरोपीने हे छायाचित्र काढले.

या प्रकरणाचा तपास करणारे पोलिस अधिकारी ताराचंद यांनी दिलेल्या माहितीनुसार शिवपुरा येथे राहणाऱ्या एका वृद्ध महिलेने २ दिवसांपूर्वी एक तक्रार दाखल केली होती. आपल्या तक्रारीत महिलेने असा आरोप केला आहे की,’ मालमत्तेच्या वादामुळे तिच्या ५० वर्षीय मुलाने तिचा नग्न फोटो काढला आणि तो कुटुंबाच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर पाठविला.

या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली पण त्याने तोपर्यंत तो फोटो मोबाईलवरून डिलीट केला. तांत्रिक तज्ञांच्या मदतीने पोलिसांनी ते छायाचित्र परत मिळवले. त्या छायाचित्राच्या आधारे कोर्टाने आरोपी मुलाला तुरूंगात पाठविले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

पाकिस्तानातील आतंकवादी अड्डे उद्ध्वस्थ करायला भारतीय वायुसेना २४ तास तयार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय वायुसेनेचे (एएएफ) प्रमुख एअर चीफ मार्शल (एसीएम) आरकेएस भदौरिया यांनी सोमवारी पाकिस्तानला चेतावणी दिली. ते म्हणाले की,’ भारतीय हवाई दल एलओसी ओलांडून दहशतवादी छावण्या आणि लॉन्चपॅडस संपवण्यासाठी २४ तास तयार आहे. चीनच्या हवाई उल्लंघनाच्या प्रश्नावर ते म्हणाले की,’ अशा प्रकारच्या मुद्द्यांबाबत ‘कोणतीही चिंता’ नसावी.

न्यूज एजन्सी एएनआयने भारतीय वायु सेना प्रमुख भदौरिया यांना पाकिस्तानी वायुसेनेबद्दल विचारले असता ते म्हणाले,’ हंदवाड़ा चकमकीनंतर भारताने केलेल्या कारवाईमुळे पाकिस्तानने भयभीत होऊन गस्त वाढवली असून आता पाकिस्तान चिंतेत आहे. त्याला उत्तर म्हणून हवाई दलाचे प्रमुख भदोरिया म्हणाले, ‘जेव्हा कधी आपल्या भूमीवर दहशतवादी हल्ला होईल तेव्हा त्यांनी त्याची चिंता करायला हवी आणि ते चिंतीत झाले होते. जर त्यांना या चिंतेमधून बाहेर पडायचे असेल तर त्यांनी भारताविरोधी सुरु असलेला दहशतवाद थांबवावा.’

हंदवाडा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला भारताकडून सूड उगवण्याची भीती आहे का ? असे विचारले असता हवाई दलाचे प्रमुख भदौरिया यांनी न्यूज एजन्सी एएनआयशी संवाद साधताना हे सांगितले.

 

अलीकडेच लडाखमध्ये चीनने हवाई सीमेचे उल्लंघन करण्याच्या प्रश्नावर भदोरिया म्हणाले, “तिथे असामान्य उपक्रम होते. आम्ही अशा घटनांवर लक्ष ठेवतो आणि आवश्यक ती कारवाई करतो. अशा घटनांमध्ये जास्त काळजी करण्याची गरज नाही.” “

 

 

अलीकडेच ९ मे रोजी उत्तर सिक्कीमच्या नाकू ला सेक्टरमध्ये भारतीय आणि चीनी सैनिकांमध्ये चकमक झाली. त्याच वेळी लडाखमधील एलएसी जवळ चिनी सैन्याची हेलिकॉप्टर्स दिसली. यानंतर भारतीय हवाई दलानेही लढाऊ विमानांच्या साहाय्याने तेथे गस्त घालण्यास सुरवात केली.

२ मे रोजी जम्मू-काश्मीरच्या हंदवाडा येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत कर्नल आशुतोष शर्मा यांच्यासह ५ सैनिक शहीद झाले. या चकमकी दरम्यान सैन्याने दोन दहशतवाद्यांना ठार केले. त्यापैकी एक हैदर होता, जो लष्कर-ए-तैयबाचा एक सर्वोच्च दहशतवादी होता. यानंतर, ४ मे रोजी सीआरपीएफच्या गस्त घालत असलेल्या पथकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आणखी ३ सैनिक शहीद झाले तर या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीला हवा आहे घटस्फोट; पाठवली कायदेशीर नोटीस

मुंबई । बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलियाने नवाजकडे घटस्फोटाची मागणी केली आहे. यासाठी तिने कायदेशीर नोटीसही बजावली असल्याचे आलिया सिद्दीकीच्या वकिलांनी प्रसार माध्यमांना सांगितलं. आलियाचे वकील अभय सहाय यांनी नवभारत टाइम्स डॉट कॉमशी बोलताना हे स्पष्ट केलं. ‘आलियाने ७ मे रोजी एक कायदेशीर नोटीस अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीला पाठवली आहे. यात घटस्फोट आणि मेनटेनन्सची मागणी केली आहे.’

‘सध्या घटस्फोटाच्या नोटीसमध्ये जे मुद्दे मांडण्यात आले आहेत त्याबाबत सध्या सांगू शकत नाही. तसेच नोटीसमध्ये लिहिलेल्या अनेक गोष्टी अत्यंत संवेदनशील आहेत. लॉकडाउनमुळे स्पीड पोस्टची सुविधा उपलब्ध नसल्यानं आम्ही ही नोटीस ७ मे रोजी ईमेल आणि व्हॉट्सअपमार्फत पाठवली आहे. आलिया यांनी १३ मे रोजी नवाजुद्दीन यांना कायदेशीर नोटीस पाठवली होती. आतापर्यंत नवाजुद्दीन यांचं कोणतंही उत्तर आलेलं नाही.’

नवाज यांच्या पत्नी आलिया यांनी नवभारत टाइम्स डॉट कॉमशी याबाबत बोलताना सांगितलं की, ‘याक्षणी मी तुम्हाला फार काही सांगू शकत नाही. पण माझ्या वकिलांनी जे काही सांगितलं ते सर्व खरं आहे. अशा पद्धतीच्या गोष्टी आयुष्यात होतात तेव्हा त्यामागे काही कारणं असतात. मला वाटतं लॉकडाउनमध्ये मला आमच्या नात्याबद्दल विचार करायला वेळ मिळाला. अखेर विचार केल्यानंतरच मी घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. नवाज आणि माझ्या नात्यात अनेक दिवसांपासून प्रॉब्लेम होते. अनेक वर्षांपासून आम्ही वेगळेच रहात आहोत.’ असं आलीया यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री ठाकरे आज काय बोलणार? रात्री ८.३० वाजता साधणार जनतेशी संवाद

मुंबई । महाराष्ट्र करोना विरुद्ध लढा देत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वेळोवेळी राज्यातील जनतेशी संवाद साधत असून आज रात्री ८.३० वाजता मुख्यमंत्री पुन्हा एकदा राज्याला संबोधित करणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री राज्याला कोणता संदेश देतात?, याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत. काही लॉकडाऊन-४ जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज प्रथमच जनतेला संबोधित करत असून करोनाची साथ आणि आर्थिक कोंडी अशा दुहेरी कात्रीत सापडलेल्या महाराष्ट्राला ते कोणती नवी वाट दाखवतात हे पाहावे लागणार आहे.

दिवसांपूर्वीच कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग पाहता या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारकडून एका बैठकीत राज्यात लॉकडाऊनचा काळ ३१ मे २०२० पर्यंत वाढवण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. अधिकृत घोषणेमध्ये मात्र लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्याचे स्वरुप नेमकं कसं असणार आहे याची अधिक स्पष्टोक्ती करण्यात आली नव्हती. त्यामुळं आता लॉकडाऊनच्या नव्या टप्प्याविषयी आणि नव्या स्वरुपाविषयी मुख्यमंत्री नेमकी काय माहिती देतात आणि कोणत्या महत्त्वाच्या घोषणा करतात, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

देशात चौथा लॉकडाऊन जाहीर करताना काही प्रमाणात नियम शिथिल करण्यात आले आहेत. रेडझोनमध्ये लॉकडाऊनची काटेकोरपणे अंमलबजावणी कायम ठेवताना ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये बऱ्याच प्रमाणात शिथिलता देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शिवाय त्या त्या राज्यांनाही याबाबत काही अधिकार देण्यात आले आहेत. ते पाहता मुख्यमंत्र्यांचा आजचा संवाद अत्यंत महत्त्वाचा असणार आहे.

राज्यात करोना साथ नियंत्रणात आणण्यासाठी सरकार कोणती पावले उचलत आहे? लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात कोणते नियम असणार आहेत? ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये कोणत्या नव्या सवलती मिळणार आहेत?, रेड झोनमध्ये कंटेनमेंट झोन वगळून बाकी भागात कोणत्या अधिकच्या सेवा सुरू होणार आहेत?, राज्यातील अर्थचक्राला गती देण्यासाठी आणखी कोणत्या सवलती दिल्या जाणार आहेत?, प्रवासी वाहतुकीबद्दल कोणता निर्णय सरकार घेणार आहे?, असे अनेक प्रश्न सामान्य जनतेच्या मनात आहेत. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांच्या आजच्या संबोधनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

लॉकडाऊनमुळे Swiggyने केला ११०० कर्मचाऱ्यांना रामराम!; काही दिवसांत आणखी कर्मचारी कपात होणार

मुंबई । लॉकडाऊनमुळं अनेक व्यवसाय ठप्प पडले आहेत. त्यामुळं या व्यवसायांशी जोडले गेलेल्या अनेक कर्मचाऱ्यांना त्याचा फटका बसला आहे. अनेक कंपन्या व्यवसाय बंद किंवा कमी झाल्यानं कर्मचारी कपात करत आहेत. लॉकडाऊनमुळे Swiggy या ऑनलाईन फूड डिलिव्हरी करणाऱ्या कंपनीने ११०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार येत्या काही दिवसांत विविध शहरांतील Swiggyच्या कर्मचाऱ्यांमध्ये कपात होईल.

दुसरीकडे काही दिवसांपूर्वीच Zomato ने ही आपल्या ५०० कर्मचाऱ्यांना इतरत्र नोकरी शोधण्यास सांगितले होते. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे देशात जवळपास २ महिने लॉकडाऊन आहे. आता लॉकडाऊनचा कालावधी ३१ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे रेस्टाँरंट आणि हॉटेल व्यवसाय अजून काही दिवस ठप्प राहणार आहे. Swiggy आणि Zomato यासारख्या Online food Delivery App ना याचा मोठा फटका बसला आहे.

कोरोनामुळे कदाचित फूड डिलिव्हरी आणि ई-कॉमर्स व्यवसायाला दीर्घकाळ फटका सहन करावा लागेल. कोरोनाचे संकट आणखी किती काळ राहणार, हे सांगता येत नाही. तरीही आपण हिवाळ्यापर्यंत सर्व परिस्थिती सुरळीत होईल, अशी आशा करुयात. यानंतर आपला व्यवसाय अधिक जोमाने धावेल, असा विश्वास Swiggy चे सीईओ श्रीहर्ष मजेटी यांनी व्यक्त केला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”