Friday, December 26, 2025
Home Blog Page 5778

वाधवान कुटुंबियांना लॉकडाऊनमध्ये प्रवासासाठी शिफारस पत्र देणारे अमिताभ गुप्ता पुन्हा पदावर रुजू

मुंबई । लॉकडाऊनच्या काळात वाधवान कुटुंबीयांना खंडाळा ते महाबळेश्वर प्रवास करण्यासाठी शिफारस पत्र दिल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले गृहविभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता पुन्हा आपल्या पदावर रुजू झाले आहेत. एप्रिल महिन्यात लॉकडाऊन असल्यामुळे आंतरजिल्हा प्रवासास बंदी होती. मात्र, पोलिसांनी अडवल्यानंतर अमिताभ गुप्ता यांचे शिफारस पत्र दाखवत वाधवान यांनी कुटुंबातील २३ जणांस खंडाळा ते महाबळेश्वर असा प्रवास केला होता. ही बाब समोर आल्यानंतर राज्यात एकच मोठी खळबळ उडाली होती.

राज्यात विरोधकांनी यावरुन महाविकास आघाडी सरकारला चांगलेच धारेवर धरले होते. अखेर राज्य सरकारने अमिताभ गुप्ता यांना १० एप्रिलला सक्तीच्या रजेवर पाठवले होते. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासनही राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले होते. दरम्यान चौकशी समितीने अमिताभ गुप्ता यांना निर्दोष ठरवले. त्यामुळे त्यांना पुन्हा प्रधान सचिव पदावर रुजू करुन घेण्यात आल्याचे समजते.

अमिताभ गुप्ता गृहविभागाच्या प्रधान सचिव पदावर पुन्हा रुजू झाल्याने भाजपकडून यावर आक्षेप घेण्यात आला आहे. अमिताभ गुप्ता यांची पुन्हा त्याच पदावर नियुक्ती होणे म्हणजे वाधवान बंधुंना सरकार किंवा सरकार चालवणाऱ्यांकडूनच पास देण्यात आला होता, हे स्पष्ट होते. हे आघाडी सरकार आहे का वाधवान सरकार? या प्रकरणाची सीबीआय चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

मास्क न घातल्यास ४२ लाखांचा दंड आणि ३ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; ‘या’ देशात कडक नियम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण जग सध्या कोरोना या साथीच्या रोगाशी लढा देत आहे, प्रत्येक देश या साथीतून लवकरात लवकर मुक्त होण्यासाठी प्रयत्न करीत आहे, परंतु अद्यापही या रोगावर कोणतीही लस उपलब्ध झालेली नाही, अशा परिस्थितीत सावधगिरी बाळगणेच आवश्यक आहे असे सर्वांना सांगितले जात आहे. म्हणूनच, आपणही सावधगिरी बाळगून या रोगापासून दूर रहावे आणि घराबाहेर पडताना मास्क घालूनच बाहेर पडले पाहिजे, परंतु जगातील काही देशांनी मास्क न वापरल्याबद्दल कठोर शिक्षेची तरतूद केलेली आहे.

कुवैत आणि कतारमध्ये जर एखादी व्यक्ती मास्क घालण्यास विसरला असेल तर त्याच्यावर तुरुंगवासाची शिक्षा तसेच चांगला दंडही ठोठावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येथील आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार दोषी आढळलेल्या व्यक्तीला साधारणपणे तीन महिन्यांसाठी तुरूंगवासाची शिक्षा दिली जाऊ शकते तर,कतारमध्ये यासाठी ३ वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा ठेवण्यात आलेली आहे. इतकेच नव्हे तर कुवेतमध्ये कमाल दंड हा ५,००० दिनार (१६,२०० डॉलर्स) आहे तसेच कतारमध्ये हा दंड ३ पटीने जास्त आहे, म्हणजे २०,००० रियाल (५५,०००डॉलर किंवा ४२ लाख रुपये) आहे

Kuwait issues Iran travel warning after 5 coronavirus cases - News ....

संपूर्ण जग कोरोना विषाणूविरूद्ध लढत आहे
आखाती देशांमध्ये आत्तापर्यंत कोरोना विषाणूमुळे ६९३ मृत्यू झालेले आहेत, याव्यतिरिक्त १,३७,४०० हून अधिक संसर्ग झाल्याचे नोंदवले गेले आहे, भारताबद्दल बोलायचे झाल्यास भारतात गेल्या २४ तासात झाली आहे ५२४२ नवीन प्रकरणे समोर आली आहेत. देशातील कोविड -१९ मध्ये संक्रमित लोकांची संख्या वाढून ९६१६९ झाली आहे. कोरोना विषाणूमुळे केंद्र सरकारने देशभरात सुरु असलेला लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढवला आहे. केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व सामाजिक, राजकीय आणि धार्मिक कार्यक्रम हे ३१ मेपर्यंत बंद राहतील.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

मोदी सरकारचं पॅकेज फसवं; जीडीपीच्या १० टक्के नव्हे तर फक्त 0.91 टक्केच- पी. चिदंबरम

नवी दिल्ली । कोरोना संकटात लॉकडाऊनमुळं ठप्प पडलेल्या अर्थचक्राला गती देण्यासाठी मोदी सरकारनं मेगा आर्थिक पॅकेज जाहीर केलं. तब्बल 20 लाख कोटी रुपयांचं हे पॅकेज असल्याचं पंतप्रधानांनी जाहीर केलं. त्यावर सलग ५ दिवस पत्रकार परिषदांमधून घोषणांची सरबत्तीही झाली. मात्र, आज मोदी सरकारच्या 20 लाख कोटींच्या या पॅकेजवर आज काँग्रेसनं जोरदार हल्लाबोल केला. हे पॅकेज 20 लाख कोटींचं नाही तर प्रत्यक्षात केवळ 1 लाख 86 हजार 650 कोटी रुपयांचं आहे. हे पॅकेज सरकारी दाव्यानुसार जीडीपीच्या १० टक्के नाही तर केवळ 0.91 टक्के आहे, असा दावा माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केला आहे. सरकारकडून प्रत्यक्ष मदत कमी आणि केवळ कर्जे आणि जुन्याच योजनांची पुनरावृत्ती कशी आहे याचा पाढा त्यांनी पत्रकार परिषदेत वाचला.

केंद्र सरकारचं यावर्षीचं वार्षिक आर्थिक बजेट हे 30 लाख कोटी रुपयांचं होतं. या बजेटच्या पलीकडे ज्या घोषणा आहेत त्याच केवळ आर्थिक मदत म्हणून गृहीत धरल्या जाऊ शकतात. यात ज्या मोजक्या गोष्टी पात्र ठरतात त्याची यादी चिदंबरम यांनी दिली. ही बेरीज केवळ अवघी 1 लाख 86 हजार कोटी असल्याचाही दावा केला. या पॅकेजमध्ये तळागाळातले गरीब, स्थलांतरित मजूर, भूमीहीन शेतकरी, कामधंदा गमवावे लागलेले कर्मचारी यासारख्या अनेक घटकांच्या हाती काहीच लागलं नसल्याचाही आरोप चिदंबरम यांनी केलाय.

दरम्यान, सरकारनं या पॅकेजचा पुनर्विचार करून या आर्थिक संकटात नागरिकांना खरीखुरी मदत करायची असेल तर किमान 10 लाख कोटी रुपयांचं आर्थिक पॅकेज तयार करावं, अशीही मागणी चिदंबरम यांनी केली. ज्या मनरेगाला काँग्रेसच्या अपयशांचं थडगं असं संबोधलं जात होतं, ती मनरेगासारखी योजनाच या संकटाच्या काळात सरकारला आधार वाटतेय, असाही टोला त्यांनी लगावला. या पॅकेजमधल्या अनेक योजना या दीर्घकालीन, काही केवळ कर्जाच्या योजना असून धोरणात्मक निर्णय घेताना संसदीय समित्यांचा विचार सरकारनं करायला हवा होता, असाही आरोप चिदंबरम यांनी केलाय. त्यामुळे आता यावर सरकारकडून काय उत्तर येतं हे पाहावं लागेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

IPL भरवण्याबाबत BCCI ने केले ‘हे’ मोठे विधान…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूमुळे सध्या सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये सरकारकडून क्रीडा संकुल आणि स्टेडियम ​​सशर्तपणे उघडण्याची परवानगी मिळाली आहे. मात्र असे असूनही, बीसीसीआयने सध्याच्या परिस्थितीत आयपीएल आयोजित करण्याबाबत विचार करणे हे फार घाईचे ठरणार असल्याचे म्हटले आहे.

सरकारने रविवारी ३१ मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याची घोषणा केली. लॉकडाऊन असूनही, देशभरातील क्रीडा संकुले आणि स्टेडियम प्रेक्षकांविना उघडता येतील, अशी मार्गदर्शक सूचना गृह मंत्रालयाने जाहीर केली आहे. मात्र , अशा स्पर्धा आयोजित करण्यावरील बंदी कायम ठेवण्यात आली आहे ज्यामध्ये मोठ्या संख्येने प्रेक्षक एकत्र येण्याची शक्यता आहे. बीसीसीआयनेही सरकारच्या या आदेशाचे स्वागत केले आहे.

बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमाळ यांनी सोमवारी सांगितले की,’सरकारने स्टेडियम उघडण्यास परवानगी दिली असली तरी ३१ मे पर्यंत देशभरात हवाई प्रवासावर बंदी आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत आयपीएलच्या १३ व्या सत्राच्या आयोजनाचा विचार करणे हे फार घाईचे ठरेल. कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन तसेच विदेशी खेळाडूंच्या प्रवाशावर बंदी असल्याने बीसीसीआयने एप्रिलमध्ये आयपीएलला अनिश्चित काळासाठी तहकूब केले.’

‘यावर्षी बीसीसीआय आयपीएल स्पर्धा आयोजित करण्याचा विचार करीत आहे का?’ असे विचारले असता धुमाळ म्हणाले की, ‘सध्याच्या परिस्थितीत या स्पर्धेचे आयोजन करण्याबद्दल विचार करणे हे फार घाईचे ठरेल.’ ते म्हणाले की, ‘जगभरातील परदेशी प्रवासावरील बंदी काढून क्रिकेट कॅलेंडरकडे पाहिल्यानंतर आयपीएलसाठी एखादी विंडो बघावी लागेल.’ दरम्यान, आयपीएलचे फ्रँचायझी संघ बीसीसीआयच्या आयपीएल नियोजनावरील निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत.

आयपीएलच्या एका फ्रेंचायझीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले की,’ सरकारच्या या आदेशाचा बीसीसीआयवर परिणाम होईल आणि यामुळे आयपीएलच्या आयोजनासाठीची सकारात्मक परिस्थिती निर्माण होईल.’

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

‘EMI’ वसुली आणखी ३ महिने स्थगित होण्याचे संकेत

नवी दिल्ली । लॉकडाउनमध्ये उद्योग व्यवसाय ठप्प झाल्याने रिझर्व्ह बँकेने तीन महिन्यांसाठी कर्ज वसुली स्थगित करण्याचे निर्देश दिले होते. मार्च, एप्रिल आणि मे असे ३ महिने बँकांनी कर्ज हप्ते वसुली स्थगित केली आहे. दरम्यान, लॉकडाउन ३१ मेपर्यंत वाढवल्याने आता कर्ज हप्ते स्थगितीचा कालावधी आणखी तीन महिने वाढवला जाईल, असे ‘एसबीआय’ने आपल्या अहवालात म्हटलं आहे. तसे झाल्यास जून, जुलै आणि ऑगस्ट असे आणखी 3 महिने कर्जदारांची ‘EMI’ मधून सुटका होणार आहे. ज्या कंपन्यांना ३ महिन्यांचा अतिरिक्त कालावधी मिळेल त्यांना ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत कर्ज हप्ते भरण्याची गरज नाही. त्यानंतर कंपन्या सप्टेंबरमध्ये काही अंशी कर्जफेड आणि त्यावरील व्याज भरू शकतील, असे एसबीआयने म्हटलं आहे.

करोना विषाणूमुळे पडलेला आर्थिक प्रभाव कमी करण्यासाठी मे महिन्याच्या मध्यावधीत ही घोषणा होण्याची शक्यता आहे. अनेक उद्योगांनी चालू महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापूर्वी व्यवसाय चालू होण्याची कोणतीही शक्यता नसल्याचे बँकांना कळवले आहे. त्यातच जमा रकमेचे व्याज कोणत्याही परिस्थितीत ३१ मे नंतर करण्याची शक्यताही नाही. त्यामुळे कर्ज वसुलचा कालावधी वाढविण्याची सूचना काही बँकांनी रिझर्व्ह बँकेला केली होती. याबाबत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातीव बँकांच्या प्रमुखांसमवेत चर्चा केली होती. बँकांच्या मते या अतिरिक्त अवधीनंतर व्यवसायात अतिरिक्त रोख तरलतेचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. बँकांनी दिलेल्या माहितीनंतर केलेल्या सूचनेवर रिझर्व्ह बँकेने कोणतेही आश्वासन दिलेले नसून, वाढते लॉकडाउन पाहता या समस्येत भर पडण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

साताऱ्यातील ३ तर कराडातील ४ कोरोनारुग्ण झाले ठणठणीत; २ वर्षांच्या चिमुकलीचीही कोरोनावर मात

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मात्र सातारकरांची एक दिलासादायक बातमी आहे. जिल्ह्यात कोरोनावर मात करून कोरोना आजारातून ठणठणीत होऊन घरी परतणाऱ्यांचा आकडा वाढत आहे. आज जिल्ह्यातील एकूण चार कोरोना बाधित रुग्णांना दवाखान्यातून डिस्चार्ज देण्यात आला असून ते बरे झाले आहेत अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक आमोद गडीकर यांनी दिली आहे.

आज डिस्चार्ज मिळालेल्या कोरोना रुग्णांमध्ये कराड येथील कृष्णा हॉस्पिटल मधील ४ तर सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयातील ३ कोरोनाग्रस्तांचा समावेश आहे. यामध्ये कराड तालुक्यातील मलकापूर येथील 37 वर्षीय पुरुष, त्याची 2 वर्षीय मुलगी, आगाशिवनगर येथील 68 वर्षीय पुरुष आणि खोडशी येथील 68 वर्षीय पुरुष आदींचा समावेश आहे. हॉस्पीटल स्टाफने टाळ्यांच्या गजरात या रुग्णांना डिस्चार्ज दिला असून ते आता कोरोनमुक्त झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे. कृष्ण हॉस्पिटल येथील चार जणांचे 14 दिवसांनंतरचे दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह आलेने त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला.

दरम्यान, जिल्ह्यातून आत्तापर्यंत कराडमधुन ७३ जण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत तर 1 जणांचा मृत्यू झाला आहे. तर कराड तालुक्यात आजपर्यंत एकूण ५९ कोरोनाग्रस्तांनी कोरोनावर मात केली आहे. यावेळी कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, डॉ. रोहिणी बाबर, डॉ. संजय पाटील, डॉ. व्ही. सी. पाटील, कराडचे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्यासह अन्य स्टाफ उपस्थित होता.

Satara

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

‘उद्धव ठाकरेंचे नेतृत्व कमी पडतंय असं मी कुठेही म्हटलं नाही’- पृथ्वीराज चव्हाण

सातारा । पुणे श्रमिक पत्रकार संघात झालेल्या एका वार्तालापात चव्हाण यांनी कोरोनानंतरच्या राज्यातील परिस्थितीवर भाष्य केलं होतं. सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना जबाबदारी दिली पाहिजे. तसंच, लोकप्रतिनिधी व मंत्र्यांचा सल्ला घेतला पाहिजे,’ असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं होतं. मात्र, त्यानंतर चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यावर आज एका वृत्तवाहिनीशी बोलताना खुलासा करत चव्हाण यांनी ही चर्चा फेटाळून लावली. उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व कमी पडतंय असं वक्तव्य मी कुठेही केलेलं नाही. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बाबतीत मी केवळ मुख्यमंत्र्यांना सल्ला दिला होता. प्रसारमाध्यमांनी माझं म्हणणं चुकीच्या पद्धतीनं मांडलं असा खुलासा चव्हाण यांनी केला आहे.

माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे . नेतृत्व कमी पडतंय असं मी कुठंही म्हटलेलं नाही. प्रशासकीय व्यवस्थेवर मी जरूर बोललो होतो. अनेक अधिकाऱ्यांकडं कुठलीही जबाबदारी नाही तर काही अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त जबाबदारी आहे. असं न करता प्रत्येकाला जबाबदारी द्यावी, असा सल्ला मी मुख्यमंत्र्यांना दिला होता. हे ताबडतोब व्हायला हवं, असंही मी म्हटलं होतं. हे सगळं रेकॉर्डवर आहे. ते कुणीही ऐकावं आणि निष्कर्ष काढावा, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

आघाडीमध्ये विसंगती आहे हे दाखवण्याचा भाजपचा प्रयत्न
मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण सर्वाधिक आहेत याची आम्हाला सर्वांनाच काळजी आहे. एक लोकप्रतिनिधी आणि नागरिक म्हणून हे कसं आटोक्यात येणार याची काळजी मलाही आहे. त्या काळजीतून मी काही बोललो असेन तर त्यातून कुणी कमी पडतंय असा निष्कर्ष काढणं योग्य नाही. खरंतर आघाडीमध्ये विसंगती आहे हे दाखवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, असा आरोपही चव्हाण यांनी केला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

‘त्या’ गाण्याचं नरेंद्र मोदींनी ही केलं कौतुक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन l देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळे देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था थांबली आहे. यामुळे अनेक नागरिक बेरोजगार झाले आहेत. अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अनेक नागरिक आपल्या मूळ गावापासून लांब शहरात अडकून पडले आहेत.तर काही नागरिक हे आपल्या गावी पायी जात आहेत. मात्र अशा परिस्थितीत देशातील लोकांमध्ये उत्साहाचं वातावरण तयार करण्यासाठी लोकप्रिय गायकांनी एकत्र येत एक गाणं बनवलं आहे. भारताच्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी हे गाणं ट्विट केलं आहे. तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या गाण्याची स्तुती केली आहे.

हे गाणं प्रत्येकाला प्रेरित करणारे आणि प्रत्येकामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण करणारे आहे. या गाण्यामध्ये स्वयंपूर्ण भारताचा जयघोष करणारे स्वर आहेत. असे ट्विट पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे.

‘वन नेशन वन वॉइस- जयतु जयतु भारतम’ असे या गाण्याचं नाव आहे. कोरोना च्या कठिण परिस्थितीत लोकांमधील उत्साह कायम ठेवण्यासाठी हे गाणं तयार करण्यात आलं आहे. नमस्कार आमच्या २११ कलाकारांनी एकत्र येत स्वावलंबी भारताच्या भावनेतून प्रेरित होऊन या गाण्याची निर्मिती केली आहे. हे गाणं सर्व भारतीयांना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आम्ही अर्पण करत आहोत. असे ट्विट लता मंगेशकर यांनी केलं आहे.

Gold Price Today | सोन्याचे भाव भिडले गगनाला; जाणून घ्या काय आहे कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसच्या महामारीचा उद्रेक होण्याबरोबरच अमेरिकेच्या चीनबरोबरील व्यापार कराराच्या तणावामुळे सोन्याची झळाळी पुन्हा एकदा वाढलेली दिसून येते आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या जोरदार संकेतांमुळे भारतीय फ्युचर्स मार्केट एमसीएक्सवर सोन्याची किंमतीने सोमवारी पुन्हा उचल घेतली आहे. देशांतर्गत वायदे बाजारामध्ये सलग चौथ्या हंगामात सोन्याच्या किंमती वाढतच राहिल्या. सोन्याबरोबरच चांदीच्या किमतीही वेगाने वाढत असल्याचे दिसून आले आहे.

सोन्याची किंमत पोहोचली विक्रमी उच्चांकावर
जूनच्या मल्टी कमोडिटी एक्सचेंज मध्ये सोन्याचा भाव हा मागील सत्राच्या तुलनेत ३६ रुपयांनी वाढून ४७७४३ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला होता, तर आत्ता सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ४७७७० रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. त्याचबरोबर, एमसीएक्सवरील चांदीचा भाव हा मागील सत्राच्या तुलनेत १४२२ रुपये किंवा ३.०४ टक्क्यांनी वाढून ४८१४० रुपये प्रतिकिलो राहिला.

तज्ज्ञांचे मत
केडिया अ‍ॅडव्हायझरीचे संचालक अजय केडिया म्हणाले की कोरोनाव्हायरसचा उद्रेक झाल्यामुळे सध्या जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या चक्रात आहे, तर अमेरिका आणि चीनमधील व्यापार तणाव वाढत आहे, ज्यामुळे सुरक्षित गुंतवणूकीकडे गुंतवणूकदारांचा कल वाढतो आहे. आंतरराष्ट्रीय कॉमेक्सवर सोन्याची किंमत सात वर्षांहून अधिक काळ उच्च पातळीवर राहिली आहे. या कोरोनाच्या कालावधीत शेअर बाजारावर होणाऱ्या परिणामांमुळे अमेरिकन मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हला आर्थिक पुनर्प्राप्तीची प्रक्रिया सुस्त होण्याची भीती होती. कॉमेक्सवरील सोन्याचा जूनचा करार हा मागील सत्राच्या तुलनेत १२.८० डॉलर किंवा ०.७३ टक्क्यांनी वधारून १७६९.१० डॉलर प्रति औंसवर होता. त्याचबरोबर चांदीचा जुलैच्या करार हा मागील सत्राच्या तुलनेत २.९८ टक्क्यांनी वधारून १७.९७ डॉलर प्रतिऔंस औंसवर होता.

अँजेल ब्रोकिंगचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता म्हणाले की सोने हे संकटांतील भागीदार असल्याने यावेळी गुंतवणूकदारांच्या गुंतवणूकीचे पसंतीचे साधन बनलेले आहे. ते म्हणाले की जेव्हा लोकं संकटात असतात, तेव्हा त्यांच्याकडे असलेली रोकडच त्यांना मदत करते किंवा लोकांकडे असलेलं सोने हे अडचणीच्या काळात धन वाढवायला मदत करते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

स्थलांतरित मजुरांवर हरियाणा पोलिसांचा लाठीहल्ला, जीव वाचवण्यासाठी मजूर संसार रस्त्यावर टाकून पळाले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | हरियाणातील यमुनानगर परिसरात गावी परतत असणाऱ्या स्थलांतरित कामगारांवर पोलिसांनी लाठीमार केला. पोलिसांचा लाठीमार चुकवण्यासाठी लोकांनी आसपासच्या शेतांचा आधार घेतला, मात्र त्या शेतांतूनही पाठलाग चालूच ठेवत पोलिसांनी कामगारांना नाकीनऊ आणलं.

देशभरातून कधी पायपीट करून, कधी मिळेल त्या साधनाने आपल्या गावी पोहोचणाऱ्या स्थलांतरित कामगारांवर होणारा अन्याय या काही दिवसांत आपल्याला काही नवीन नाही. रोज नव्याने स्थलांतरितांना सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या अनेक घटना आपण ऐकत आहोत. कित्येक मैल प्रवास करून आपल्या गावी परतणाऱ्या काही कामगारांसोबत हरियाणा येथील यमुनानगर परिसरात पोलिसांनी लाठीचार्ज केला. घाबरलेल्या कामगारांनी तिथून पळ काढला पण या नादात त्यांचा संसार रस्त्यावरच पडला. अनेकांच्या सायकली, पायातल्या चपला, कपडे, जीवनावश्यक वस्तू अशा अनेक गोष्टी तिथेच टाकून हे लोक पळून गेले. काहींनी बाजूच्या शेतात धाव घेतली तर काहीजण आल्या रस्त्याने परत गेले. 

स्थलांतरित कामगारांना आपल्या गावी परत पाठविण्यासाठी ज्यापद्धतीने सरकार श्रमिक रेल्वेची सुविधा उपलब्ध करत आहे त्याप्रमाणे गावी परतणाऱ्या या कामगारांसाठीही काही पावले उचलणे गरजेचे आहे. यांना मारहाण करून, हाकलवून दिल्यास यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.  त्यांच्या वैद्यकीय तपासण्यांची सोय करीत, त्यांच्यासाठी अलगाव सुविधा उपलब्ध करणे गरजेचे आहे. अशा पद्धतीने घालवलेल्या कामगारांनी काय करायचे, कुठे जायचे, काय खायचे असे अनेक प्रश्न अशा वागणुकीमुळे उभे राहतात. पायी प्रवास करून परतणाऱ्या या कामगारांसाठी ठोस पाऊल उचण्याची आवश्यकता आहे.