Friday, December 26, 2025
Home Blog Page 5776

कोरोनापासून बचावासाठी डोनाल्ड ट्रम्प घेतायत ‘हे’ भारतीय औषध

मुंबई । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कोरोनाची लागण होऊ नये म्हणून मागच्या आठवडयाभरापासून हायड्रॉक्सीक्लोरोक्विनची गोळी घेत असल्याचे त्यांनी स्वतःच पत्रकारांना सांगितले. हायड्रॉक्सीक्लोरोक्विन हे मूळ मलेरियाचे औषध आहे. कोरोना व्हायरसविरोधात हे औषध गेमचेंजर आहे असा ट्रम्प यांचा दावा आहे. कमालीची बाब म्हणजे हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या COVID-19 च्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ही गोळी घ्यावी असे ट्रम्प यांच्या स्वत:च्या सरकारचे निर्देश आहेत. पण ट्रम्प कोणालाही न जुमानता हायड्रॉक्सीक्लोरोक्विनची गोळी घेत आहेत. याच औषधाच्या पुरवठयावरुन डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला इशारा दिला होता. भारताने या गोळयांची डिलिव्हरी केल्यानंतर त्यांनी आभारही मानले.

कोरोनावरील उपचारासाठी रुग्णालयाबाहेर हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचा उपयोग करु नका असा इशारा अमेरिकन एफडीएने दिला आहे. हायड्रॉक्सीक्लोरोक्विन या गोळीचे साईडइफेक्टही आहेत तसेच कोरोना व्हायरसविरुद्ध ही गोळी तितकी परिणामकारक नाही असेही काही तज्ज्ञांचे मत आहे. या औषधाचे साईड इफेक्टही असल्यामुळे त्यावर संशोधन सुरु आहे. हायड्रॉक्सीक्लोरोक्विन ही गोळी लुप्स, संधिवात या आजारांवरही वापरली जाते. या कारणांमुळे ट्रम्प यांना त्यांच्या डॉक्टरने हायड्रॉक्सीक्लोरोक्विन ही गोळी न घेण्याचा सल्ला दिला आहे. “ही गोळी चांगली आहे. या औषधाबद्दल मी अनेक चांगल्या गोष्टी ऐकल्या आहेत. त्यामुळे ही गोळी घ्यायला मी सुरुवात केली” असे ट्रम्प म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

सातारा जिल्ह्यात आज पुन्हा ८ जण नवे कोरोनाग्रस्त; कराड, खटावकरांची चिंता वाढली

सातारा प्रतिनिधी | सकलेनमुलाणी

जिल्ह्यात आज मंगळवारी सकाळी पुन्हा ८ नवीन कोरोनाग्रस्त सापडले आहेत. कराड, खटाव, लोणंद आदी भागात हे कोरोना बाधित सापडले असून यामुळे सातारकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. आज सकाळी जिल्ह्यातील ८ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले असून ते कोविड १९ बाधित असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक आमोद गडीकर यांनी सांगितले. तसेच १० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून एकूण ३२ जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलेले असल्याचे सांगण्यात आले आहे. नवीन सापडलेल्या रुग्णांमध्ये बहुतांश जण हे पुण्य मुंबईहून प्रवास करून आलेले किंवा त्यांचे निकटवर्तीय आहेत.

हाती आलेल्या माहितीनुसार, क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल असलेला लोणंद येथील मुंबई येथून प्रवास करुन आलेला एक 33 वर्षीय पुरुष व मायणी ता. खटाव येथील अकोला येथून प्रवास करुन ओलेले 55 वर्षीय पुरुष व 48 वर्षीय महिला तसेच कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे म्हासोली गावातील कोविड बाधित रुग्णाचे निकट सहवासित दोन पुरुष अनुक्रमे 45 व 62 वर्षे आणि तीन महिला अनुक्रमे 48, 35 व 60 वर्षे असे एकूण 8 जणांचा अहवाल कोरोनाबाधित आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

तसेच मुंबई येथील रुग्णालयात उपचार घेऊन आलेली 58 वर्षीय खंडाळा येथील एका महिलेचा अहवाल कोविड बाधित आल्याने या महिलेला क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल करण्यात आले आहे. या रुग्णावर मुंबई येथे उपचार झाल्याने तीची गणना मुंबई येथे केली असल्याने या जिल्ह्यात गणाना केली जाणार नाही.

32 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल तर १० जणांचे अहवाल निगेटिव्ह
दि.18 मे रोजी रात्री उशिरा क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील विलगीकरण कक्षात 32 जणांना दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस, पुणे यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली आहे. कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 10 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली आहे.

दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या- 146 झाली असून या पैकी उपचार घेत असलेले कोरोनाबाधित रुग्णसंख्या 71 इतकी असून कोरोना मुक्त होवून घरी गेलेले रुग्णसंख्या 73 आहे तर मृत्यु झालेले 2 रुग्ण आहेत.

Satara

येणाऱ्या काळात आॅनलाइन शिक्षण पद्धती स्विकारावी लागेल – पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कोरोना अजून किती दिवस असणार याबाबत निश्‍चित कोणालाच सांगता येत नाही. शाळा, कॉलेज बंद असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे याची जाणीव सरकारला आहे. यामुळे येणार्‍या काळात ऑनलाईन शिक्षण पध्दती स्विकारावी लागेल असे मत राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले आहे. डिस्टन्स लर्निंगच्या माध्यमातून मोबाईल, कॉम्पयुटरद्वारे शिक्षण घ्यावं लागेल याशिवाय आता तरी दुसरा काहीच पर्याय नाही असं चव्हाण यांनी यावेळी म्हटलं आहे.

याचबरोबर परदेशात अडकलेल्या विद्यार्थ्यांचा मोठा प्रश्‍न अजूनही शिल्लक आहे. सध्या रशियामध्ये असणार्‍या भारतातील सुमारे 120 विद्यार्थ्यांनी संपर्क साधला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील काही विद्यार्थी आहेत. त्यांना भारतात परत आणण्यासाठी भारतीय परराष्ट्रीय मंत्रालय तसेच महाराष्ट्र सरकारची काय उपाय योजना केली आहे याची माहिती घेतोय असे चव्हान यांनी सांगितले आहे.

तसेच कंटेनमेंट झोन वगळून राज्यातील एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात जाण्यासाठी कामगार, विद्यार्थ्यांची सोय जाईल पाहिजे. जर लोक आपापल्या घरी पोहोचले तर त्यांची राहण्याची, खाण्याची व्यवस्था होऊ शकते, तसेच त्यांना क्वॉरंटाईन करणेही सोयीस्कर होईल शकते. लॉकडाऊन 4 हा 31 मेपर्यंत असला तरी या कालावधीत जर रुग्ण संख्या वाढली नाही तर येणार्‍या काळात पूर्णपणे शिथीलता दिली जाऊ शकते. उदयोग धंदे सुरू होतील. मात्र सध्या मुंबईची परिस्थिती तशी चिंताजनकच आहे अशी माहिती चव्हाण यांनी दिली आहे.

भाज्यांपासून बनवलेली – “पौष्टिक lockdown करंजी”

सारं काही पोटासाठी | मेघना देशमुख

घरात शिल्लक असलेल्या भाज्या वापरून लॉकडाऊनच्या कालावधीत शिकलेली आणि केलेली ही नवीन रेसिपी. आता लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु झालाय, घरी बसणं अक्षरशः जीवावर आलंय. पण ही पदार्थ बनवण्याची आवड जिवंत आहे, म्हणूनच असं वेगळं काहीतरी करता येतंय. देशभरात लाखो लोकांची उपासमार होत असताना आपण असं चमचमीत खाणं योग्य आहे का? असा अपराधी भाव माझ्याही मनात येतो बरं का..!! पण आता हीच आवड रोजगाराच्या स्वरूपात बदलता येतेय का याचा प्रयत्न करुन बघायचाय. कसा? ते प्रत्येक नवीन रेसिपीसोबत सांगत राहीनच. तूर्तास पाहुयात करंजीचा हा एक भन्नाट प्रकार. घरी उपलब्ध असणाऱ्या भाज्यांचा वापर करुन हलक्या-फुलक्या नाष्ट्यासाठी बनवता येईल अशी ही करंजी तुम्हाला नक्कीच आवडेल.

साहित्य :-
कणकेसाठी – 2 वाटी गव्हाचे पीठ / मैदा, तेल, मीठ, पाणी

सारणासाठी – 1 छोटा बटाटा बारीक चिरलेला, 1 वाटी फ्लॉवरचे बारीक काप, 1 छोटा बारीक चिरलेला कांदा, 3-4 हिरवी मिरची बारीक चिरलेली, 1/2 वाटी वाटाणा (तुम्हाला बाजारात जर ओले मूग मिळाले तर तेही चालतील), एक चिमूट हिंग, चवीसाठी मीठ, 1/2 चमचा धने पूड, 1/2 चमचा जिरेपूड
(तुमच्याकडे अजून वेगळ्या भाज्या असतील तर वापरू शकता. फक्त त्या वापरताना सारणाला जास्त पाणी सुटू नये याची काळजी घ्या.)

कृती :-
पीठामध्ये चवीपुरते मीठ घालुन घ्या. 4 चमचे कडक तेलाचे मोहन घालुन छान मिसळून घ्या. गरजेपुरते पाणी घालून कणिक घट्ट भिजवा. 20 मिनिटे झाकून ठेवा. आता कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करुन त्यात कांदा परतून घ्या. त्यानंतर चिरलेल्या सर्व भाज्या आणि मीठ, हिंग, धणेपूड व जिरेपूड घालून सारण व्यवस्थित परता.4-5 मिनिट परतल्यावर सारण थंड करण्यासाठी ठेवा.
सारण थंड होइपर्यंत कणकेचे छोटे-छोटे गोळे करून करंजीसाठी पोळ्या लाटून घ्या. त्यावर सारण घालून करंजी तयार करा. (करंजीचा साचा वापरला तरी चालेल) आता तेल गरम करून करंजी तळून घ्या. टोमॅटो सॉस किंवा पुदिना चटणी सोबत सर्व्ह करा.

मेघना देशमुख या जैवरसायनशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका असून त्यांना पाककलेची विशेष आवड आहे. प्रतिक्रियांसाठी संपर्क – 8698163195

आता बसा बोंबलत; गडचिरोलीत विलगीकरण कक्षातून पळून गेले ५० मजूर; जिल्ह्यात खळबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून १२ किलोमीटर असलेल्या यवली गावातून ५० मजूर विलगीकरण कक्षातून पळून गेले आहेत. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून घरची आतुरता असल्याने या मजुरांनी नियम धाब्यावर बसवत दवाखान्यातून पळ काढला आहे. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस सातत्याने वाढते आहे. मुंबई पुण्यासारखे जिल्हे रेड झोन मध्ये आहेतच पण महाराष्ट्रातील इतर भागातही दिवसेंदिवस नव्याने रुग्ण समोर नयेत आहेत. ऑरेंज झोनमधील जिल्हे रेड झोनमध्ये परावर्तित होताना दिसत आहेत. ग्रीन झोनमध्ये हळूहळू रुग्ण आढळू लागले आहेत.

महाराष्ट्रातील गडचिरोली हा जिल्हा सुरुवातीपासून ग्रीन झोन मध्ये होता. मात्र मागच्या आठवड्यात गडचिरोलीतील कुरघेडा तालुक्यात २ रुग्णांचे कोरोनाचे अहवाल सकारात्मक आल्याचे आढळून आले. जिल्हा प्रशासनाने याची दखल घेत तातडीने जिल्ह्यातील मजुरांना जिल्हा मुख्यालयापासून १२ किमी दूर असलेल्या यवली गावात विलगीकरण कक्षात ठेवले होते. एकूण १२० रुग्ण याठिकाणी अलगावमध्ये होते. १६ मे पासून विलगीकरणात असलेल्या या मजुरांपैकी ५० मजूर आज या केंद्रातून पळाले आहेत. 

राज्य सरकार कोरोनावर मात करण्यासाठी अनेक प्रयत्न करीत आहे. अशावेळी मजुरांनी पळून जाण्याने खळबळजनक स्थिती निर्माण झाली आहे. राज्याच्या विविध भागात आता हळूहळू रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन विलगीकरण केंद्रे तयार करत असून संसर्ग थांबविण्याचा प्रयत्न करते आहे. मजुरांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी सुसंवाद साधणे गरजेचे असल्याचे दिसून येते आहे. इतर कामगारांसारखे आपल्यालाही खूप सहन करावे लागेल ही भीती त्यांच्या मनातून काढणे आवश्यक आहे. असे केल्यास कदाचित अशा घटना पुन्हा घडणार नाहीत.

राज्यात दिवसभरात २ हजार ३३ नवीन कोरोनाग्रस्त; एकूण रुग्णसंख्या ३५ हजार ५८ वर

मुंबई | राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३५ हजार ५८ झाली आहे. आज २०३३ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ७४९ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ८ हजार ४३७ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २५ हजार ३९२ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख ८२ हजार १९४ नमुन्यांपैकी २ लाख ४७ हजार १०३ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ३५ हजार ५८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ३ लाख ६६ हजार २४२ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १८ हजार ६७८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात ५१ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली असून एकूण संख्या १२४९ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मध्ये २३, नवी मुंबईमध्ये ८, पुण्यात ८, जळगावमध्ये ३, औरंगाबाद शहरात २, अहमदनगर जिल्ह्यात २,नागपूर शहरात २, भिवंडी १ तर पालघरमध्ये १ मृत्यू झाला आहे. या शिवाय बिहार राज्यातील १ मृत्यू मुंबईत झाला आहे.

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ३५ पुरुष तर १६ महिला आहेत.आज झालेल्या ५१ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २१ रुग्ण आहेत तर १९ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ११ जण ४० वर्षांखालील आहे. या ५१ रुग्णांपैकी ३५ जणांमध्ये (६८ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका: २१,३३५ (७५७)
ठाणे: २३० (४)
ठाणे मनपा: १८०४ (१८)
नवी मुंबई मनपा: १३८२ (२२)
कल्याण डोंबिवली मनपा: ५३३ (६)
उल्हासनगर मनपा: १०१
भिवंडी निजामपूर मनपा: ४८ (३)
मीरा भाईंदर मनपा: ३०४ (४)
पालघर: ६५(३)
वसई विरार मनपा: ३७२ (११)
रायगड: २५६ (५)
पनवेल मनपा: २१६ (११)
ठाणे मंडळ एकूण: २६,६४६ (८४४)

नाशिक: १०६
नाशिक मनपा: ७४ (१)
मालेगाव मनपा: ६७७ (३४)
अहमदनगर: ६५ (५)
अहमदनगर मनपा: १९
धुळे: १२ (३)
धुळे मनपा: ७१ (५)
जळगाव: २३० (२९)
जळगाव मनपा: ६२ (४)
नंदूरबार: २५ (२)
नाशिक मंडळ एकूण: १३४१ (८३)

पुणे: २०४ (५)
पुणे मनपा: ३७०७ (१९६)
पिंपरी चिंचवड मनपा: १६० (४)
सोलापूर: ९ (१)
सोलापूर मनपा: ४२० (२४)
सातारा: १४० (२)
पुणे मंडळ एकूण: ४६४० (२३२)

कोल्हापूर: ४४ (१)
कोल्हापूर मनपा: ८
सांगली: ४५
सांगली मिरज कुपवाड मनपा: ८ (१)
सिंधुदुर्ग: १०
रत्नागिरी: १०१ (३)
कोल्हापूर मंडळ एकूण: २१६ (५)

औरंगाबाद:१६
औरंगाबाद मनपा: ९५८ (३३)
जालना: ३६
हिंगोली: १०४
परभणी: ५ (१)
परभणी मनपा: २
औरंगाबाद मंडळ एकूण: ११२१ (३४)

लातूर: ४७ (२)
लातूर मनपा: ३
उस्मानाबाद: ११
बीड: ३
नांदेड: ९
नांदेड मनपा: ६९ (४)
लातूर मंडळ एकूण: १४२ (६)

अकोला: २८ (१)
अकोला मनपा: २४६ (१३)
अमरावती: ७ (२)
अमरावती मनपा: १०८ (१२)
यवतमाळ: १००
बुलढाणा: ३० (१)
वाशिम: ३
अकोला मंडळ एकूण: ५२२ (२९)

नागपूर: २
नागपूर मनपा: ३७३ (४)
वर्धा: ३ (१)
भंडारा: ३
गोंदिया: १
चंद्रपूर: १
चंद्रपूर मनपा: ४
गडचिरोली: ०
नागपूर मंडळ एकूण: ३८७ (५)

इतर राज्ये: ४३ (११)
एकूण: ३५ हजार ५८ (१२४९)

सोलापुरात एकाच दिवशी सापडले 50 कोरोना बाधित, तिघांचा मृत्यू, बाधितांची संख्या 435

सोलापूर प्रतिनिधी । शहर आणि जिल्ह्यात एकाच दिवशी सर्वाधिक 50 कोरोना बाधित रुग्ण सापडण्याची घटना आज पहिल्यांदाच घडली. आज एकाच दिवशी 34 पुरुष आणि 16 महिला कोरोनाबाधित आढळले आहेत. आज एकाच दिवशी तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून मृत पावलेल्या व्यक्तींची संख्या 29 तर कोरोना बाधित झालेल्या व्यक्तींची संख्या 435 झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

आज मयत झालेली पहिली व्यक्ती शुक्रवार पेठ परिसरातील 54 वर्षांचे पुरुष असून 16 मे रोजी त्यांना छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान 17 मे रोजी दुपारी बारा वाजता त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मयत झालेली दुसरी व्यक्ती हत्तुरे वस्ती परिसरातील असून साठ वर्षाचे पुरुष आहेत 15 मे रोजी त्यांना छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान 16 मे रोजी दुपारी दोन वाजता त्यांचे निधन झाले आहे. त्यांचाही कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मयत झालेली तिसरी व्यक्ती शुक्रवार पेठ परिसरातील असून पंचावन्न वर्षांच्या पुरुष आहेत. 14 मे रोजी त्यांना छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान 15 मे रोजी सकाळी साडेनऊ वाजता त्यांचे निधन झाले. त्यांचाही कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

आज नव्याने आढळलेल्या 50 कोरोनाबाधित रुग्णांमध्ये नीलम नगर परिसरातील चार पुरुष, किसन संकुल अक्कलकोट रोड येथील एक महिला, हत्तुरे वस्ती येथील एक पुरुष, इरण्णा वस्ती येथील एक पुरुष, जोशी गल्ली येथील एक पुरुष व एक महिला, कुमठा नाका येथील तीन पुरुष व दोन महिला, बुधवार पेठेतील एक पुरुष व एक महिला, जुना कुंभारी नाका येथील एक महिला, अशोक चौकातील दोन महिला, नइ जिंदगी येथील एक पुरुष, दत्त चौकातील एक पुरुष, न्यू पाछा पेठेतील एक महिला, इंदिरानगर येथील एक पुरुष, लोकमान्य नगर येथील एक पुरुष, मिलिंद नगर न्यू बुधवार पेठ येथील सात पुरुष व पाच महिला, मोदी येथील एक पुरुष, मुरारजी पेठ येथील एक पुरुष, पाछा पेठेतील दोन पुरुष, रेल्वे लाईन येथील दोन पुरुष, रविवार पेठेतील दोन पुरुष व एक महिला, साईबाबा चौकातील एक पुरुष व एक महिला, साठे पाटील वस्ती येथील एक पुरुष, शिवशरण नगर एमआयडीसी येथील एक पुरुष, सिद्धेश्वर पेठ येथील एक पुरुष अशा 50 जणांचा समावेश आहे.

कोरोना मुक्त झालेल्या सात जणांना आज घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली. सोलापूर शहर व जिल्ह्यातील 245 व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल अद्यापही प्रलंबित असल्याची माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली.

सांगलीतील आटपाडी, कुंडलवाडीत दोघे कोरोना पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या २० वर

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात कोरोनाने प्रवेश केला असून दिल्लीहून आलेल्या 29 वर्षीय तरुणाचा कोरोनाचा अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आला. तसेच आज कुंडलवाडी येथील आणखी एक जणाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून दिवसभरात २ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाल्याचे जिल्हा प्रशासनांकडून सांगण्यात आले आहे.

कुंडलवाडी (ता. वाळवा) येथील कोरोनाबाधित रुग्णाचा मामाला इस्लामपूर येथे संस्था क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. त्याला त्रास होऊ लागल्याने त्याची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. त्या व्यक्तीच्या मामाचा अहवालही पॉझिटिव्ह आला. लॉक डाऊनचा चौथा टप्पा सुरू झाला असून लोक मोठ्या प्रमाणात बाहेर येत आहेत. त्यामुुळे जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली असून जिल्ह्यात सद्यस्थितीत 20 रुग्ण झाले आहेत.

Sangli

श्रमिक रेल्वेतील प्रवाशांचा ८५% प्रवासखर्च केंद्र सरकार उचलत असल्याचा दावा खोटा 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | स्थलांतरित कामगारांना घरी पोहोचविण्यासाठी सरकारने श्रमिक रेल्वे सुरु केल्या आहेत. या रेल्वेच्या माध्यमातून आपल्या घरी परतण्याची एक आशा मजुरांमध्ये निर्माण झाली आहे. मजुरांच्या प्रवासाचा ८५% खर्च केंद्र सरकार उचलत असल्याचे सांगण्यात आले होते. केंद्र सरकारचा हा दावा खोटा असल्याचे विधान नुकतेच राज्याचे गृहमंत्री आणि काँग्रेस नेते यांनी केले आहे. राज्यभरातून इतर राज्यातील मजुरांसाठीचा प्रवासखर्च कोण करणार यासाठी गेले अनेक दिवस केंद्र आणि राज्य सरकार यांच्यामध्ये वाद सुरु आहेत. बऱ्याच मजुरांनी कोणतीच आशा दिसत नसल्याने पायी प्रवास सुरूही केला होता मात्र श्रमिक रेल्वेच्या घोषणेने पुन्हा या कामगारांमध्ये घरी सुखरूप पोहोचता येण्याची किंचित आशा निर्माण झाली होती. अशावेळी जे मजूर यापूर्वी श्रमिक रेल्वेने परतले त्यांच्याकडून तिकीट आकारण्यात आले. 

आपल्याकडे असणारे पैसे आपल्या आतापर्यंतच्या उदरनिर्वाहासाठी खर्च केलेले असे अनेक मजूर आहेत. ज्यांच्याकडे तिकिटासाठी पैसे नाहीत आणि त्यांच्याकडे संचारबंदीमुळे कोणतेच कामही नाही. अशावेळी त्यांच्याकडून तिकीट दर आकारणे योग्य नसल्याचे राज्यसरकारकडून सांगण्यात आले होते. मात्र तरीही केंद्र सरकारने तिकीट दरावर ५० रुपयांचा अधिभार लावला होता. हे भाजपच्या भाडे कसे आकारावे यासंदर्भातील पत्रावरून स्पष्ट होत असल्याचे काँग्रेस नेते नितीन सावंत यांनी म्हंटले होते. केंद्र सरकारकडे मजुरांना मोफत प्रवास उपलब्ध करून द्यावा अशी विनंती करूनही केंद्राने दुर्लक्ष केल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मजुरांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतील ५४.७० कोटी रुपये दिले असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

जळगाव जिल्ह्यात आज 18 कोरोनाग्रस्तांची भर, बाधितांची संख्या 297

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज अठरा कोरोना बाधित रूग्ण आढळले. जिल्ह्यातील विविध ठिकाणी स्वॅब घेतलेल्या 94 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल आज प्राप्त झालेे. त्यापैकी 76 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून अठरा व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील दक्षतानगर, शाहूनगर, आर. आर. हायस्कुल परिसर याठिकाणचे अकरा बाधित, साईनगर, भुसावळ येथील तीन, भडगाव येथील एक, पाचोरा येथील एक व कोरपावली ता. यावल येथील दोन रुग्णाचा समावेश आहे

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 297 झाली असून त्यापैकी 77 व्यक्ती कोरोनामुक्त होऊन घरी गेल्या आहेत. आतापर्यंत 33 कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्ण असलेल्या अमळनेर तालुक्यातील 65 रुग्णांची आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. त्यांना अाज कोविड केअर सेंटर मधून दिला डिस्चार्ज देण्यात आला आहे.