Friday, December 26, 2025
Home Blog Page 5779

मुंबईहून बनपुरीत आलेल्या क्वारंटाईनमधील महिलेचा मृत्यू; ढेबेवाडी, तळमावळेत कोरोनाची धास्ती

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

बनपुरी ता पाटण येथे क्वारंटाईन शिक्का असलेल्या महिलेचा अचनानक मुत्यू झाला. दोन दिवसापुर्वी ती महिला मुंबई येथून आली होती. गावातील शाळेत तिला क्वांरटाईन करण्यात आले होते. काल तिला अचानक त्रास सुरू झाल्याने तिला कराडला हलवण्यात येत होते. वाटेतच तिचा मुत्यू झाला आहे. तिच्या मृत्यूचे नेमके कारण अजून समजले नसून ती व्यक्ती क्वारंटाईन असल्याने तिच्या घशातील स्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. दरम्यान कोरोनाने विभागात शिरकाव केला की काय या, भीतीने विभागास बनपुरी गांवात एकच खळबळ उडाली आहे. ढेबेवाडी, तळमावले बाजापेठ बंद ठेवण्यात आली आहे.

बनपुरी येथे शनिवारी १६ रोजी मुंबई येथून प्रवासी आलेल्या अंदाजे 43 वर्षीय महिलेला बनपुरी शाळेत क्वारंटाईन करण्यात आले होते. रविवारी दिनांक १७ रोजी रात्री तिला अचानक त्रास जाणवू लागल्याने कराडला हलवण्यात आले. दरम्यान तिचा वाटेतच मृत्यू झाला. यानंतर तिला गावात आणण्यात आले. मात्र कारण समजले नसल्याने उपसरपंच शिवाजी पवार , पोलीस पाटील दत्तात्रय कुंभार, ग्रामसेवक तानाजी जाधवर यांनी गटविकास अधिकाऱ्यांना मिना सांळुखे यांना संपर्क केला. पाटण चे प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, पाटण तालुक्यात वैद्यकीय अधिकारी पाटील साहेब,सळवे प्राथमिक आरोग्य केंद्र प्रमुख डाॅक्टर बनें, आरोग्य सेवक भांडे यांना सर्व हकीकत सांगितली. यानंतर तिला कराड उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले असून तिच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणी साठी पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती उपसरपंचांनी दिली. तिच्या मृत्यूचे खरे कारण समजले नसले तरी या घटनेमुळे बनपुरी परिसरास ढेबेवाडी विभागामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ढेबेवाडी तळमावले बाजारपेठ पुर्ण बंद ठेवण्यात आली आहे.

ढेबेवाडी विभागात मुंबईवरुन येणाऱ्या लोकांचे प्रमाण अतिशय वाढले आहे आता खरी कसोटी असून प्रत्येकाने खबरदारी घेऊन जबाबदारीने वागले पाहिजे. विभागात एकही संशयित सापडला नसल्याने प्रशासनाने बाजारपेठ काही नियम अटीवर सुरू केली होती. मात्र या घटनेमुळे व मुंबईवरून येणाऱ्या लोकांमुळे पुन्हा काही दिवस बाजारपेठ बंद करण्यात आली आहे. नगरपालिकेने तयार केलेल्या कोविड स्मशानभूमीत या महिलेवर सोमवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

Satara

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

परप्रांतीय कामगारांचा संयम सुटला; अहमदाबादमध्ये पोलिसांवर केली दगडफेक

अहमदाबाद । गेल्या काही महिन्यांपासून गुजरात सरकार व पोलिसांना परप्रांतीय कामगारांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. गुजरातमध्ये रोजगारासाठी आलेल्या परप्रांतीय मजुरांचा सातत्याने उद्रेक होताना पहायला मिळतो आहे. अहमदाबादमध्ये घरी जाण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या १०० परप्रांतीय कामगारांनी पोलिस आणि रस्त्यावरुन चालणाऱ्या नागरिकांवर दगडफेक केल्याची घटना घडली आहे. या घटनेत २ पोलीस कर्मचारी जमखी झाले असून जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या व लाठीचार्जचा वापर करावा लागला. तसेच पोलिसांनी याप्रकरणात काही कामगारांना ताब्यात घेतलं असून सर्वांची चौकशी सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या घटनेबाबत माध्यमांना अधिक माहिती देताना अहमदाबादचे पोलिस उप-आयुक्त प्रवीण मल म्हणाले, “रस्त्यावर आलेल्या मजुरांना ज्यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांवरच दगडफेक केली. वस्त्रापूर भागात दोन पोलिसांच्या गाड्या, एक खासगी कार्यालय, आणि कन्स्ट्रक्शन साईटची कामगारांनी नासधूस केली. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आम्ही योग्य ती पावलं उचलली आहेत.”

दरम्यान, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाउनचा चौथा टप्पा ३१ मे पर्यंत वाढवलेला आहे. गेल्या काही महिन्यांत दुसऱ्या राज्यांमध्ये अडकलेल्या मजूरांना घरी जाण्यासाठी केंद्राने रेल्वे विभागामार्फत श्रमिक एक्सप्रेस गाड्यांची सोय केली आहे. मात्र देशाच्या काही भागांत अजुनही मजूर व कामगार अडकून पडले आहेत. अशातच मजुरांचा संयम सुटून ते रस्त्यावर हिंसक प्रदर्शन करत आहेत. त्यातून गुजरात पोलीस आणि स्थलांतरित मजूर यांच्यात चकमकी घडत आहेत. याआधीही सूरत, वडोदरा शहरात कामगारांनी पोलिसांवर हल्ला व दगडफेक केल्याची घटना घडलेली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

घरी परतण्याच्या तिकीट नोंदणीसाठी गाझियाबादमध्ये लोकांची झुंबड, गर्दी नियंत्रणाबाहेर..!!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | तब्बल २ महिन्यानंतर आपल्या घरी परतण्यासाठी रेल्वे बुकिंगसाठी हजारो स्थलांतरित कामगारानी रामलीला मैदान, गाझियाबाद येथे गर्दी केली. यावेळी एकाच मैदानात काही हजार लोकांनी गर्दी केल्याने प्रशासनालाही बरीच धावपळ करायला लागली. एकमेकांच्या अंगावर जात, आरडाओरडा करत नाव नोंदणीचं काम याठिकाणी दिवसभर चालूच राहीलं.

गेल्या काही दिवसांपासून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूने अनेक देशांची स्थिती दयनीय करून टाकली आहे. भारतात २५ मार्च रोजी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी देशव्यापी संचारबंदी लागू करण्यात आली. जागोजागी पसरलेल्या आणि हातावर पोट असणाऱ्या स्थलांतरित कामगारांचे मात्र या संचारबंदीत हाल झाले. काम बंद झाले, शिल्लक असणाऱ्या धान्य आणि तुटपुंज्या पैशावर काही दिवस उदरनिर्वाह झाल्यानंतर पुढे काय हा प्रश्न प्रत्येकासमोर उभा राहिला. संचारबंदीमुळे गावीही परत जाता येत नव्हते. देशभरात विविध ठिकाणी उभ्या केलेल्या शिबिरांमधील अस्वस्थ कामगारांनी घरी परतायचे ठरवले आणि मिळेल त्या पर्यायाने घरी परतू लागले. अनेकांनी पायपीट केली. आणि आता सरकार या स्थलांतरित कामगारांना घरी परतण्यासाठी श्रमिक रेल्वेची सुविधा उपलब्ध करून देत आहे. एकीकडे कोरोनाचे संकट डोक्यावर असताना या कामगारांची सुविधाही महत्वाची आहे. 

रामलीला मैदानावर हजारोंच्या संख्येने रेल्वे बुकिंगसाठी जमलेला हा जमाव चिंतादायक चित्र निर्माण करतो आहे. कित्येक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर घरी परतल्यावर या लोकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आणखी वाढली आहे. देशभरातील रुग्णांची संख्या ९६ हजार पार करून गेली आहे. आता हे कामगार परतत असलेल्या बिहार, उत्तरप्रदेश सारख्या राज्यांनी मोठ्या प्रमाणात तपासणी करणे गरजेचे आहे. या परतलेल्या कामगारांसाठी अलगाव च्या सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. त्यांच्यासाठी तात्काळ वैद्यकीय सुविधांची सोय केली पाहिजे. मागच्या काही दिवसात रुग्णांची संख्या सातत्याने वाढते आहे ते पाहता आपली वैद्यकीय यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर आणि सर्वांसाठी अन्नधान्याची व्यवस्था करण्यावर सरकारने भर देणे गरजेचे असल्याचे दिसून येत आहे. देशभरातून असे कामगारांचे लोंढे आपापल्या गावी परतत आहेत त्यामुळे स्थानिक प्रशासनाने पुढे येऊन युद्धपातळीवर काम करण्याची गरज आहे. तरच येत्या काळात आपण ठामपणे उभे राहू शकू.

Corona Impact | काठमांडूतून पहिल्यांदाच दिसला २०० किमी दूर असणारा एव्हरेस्ट पर्वत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिमालयातील सुंदर शिखरे पाहणे हा एक अतिशय आनंददायक अनुभव आहे. जगभरातील अनेक लोकं हिमालयातील ही मनोहारी शिखरं पाहायला जात असतात. मात्र असंख्य असे लोक देखील आहेत ज्यांना त्यांच्या संपूर्ण आयुष्यात हिमालयातील ही शिखरे पाहता येत नाहीत. सध्या कोरोना विषाणूच्या संकटामुळे जगभरातील देशात लॉकडाऊन सुरु आहेत, ज्यामुळे वातावरणातील प्रदूषणाची पातळी खूपच कमी झाली आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे विजिबिलिटीमध्ये लक्षणीयरित्या वाढ झाली आहे आणि त्यामुळे शेकडो किलोमीटरपासून दूर असलेली हिमालयातील शिखरेही आता व्यवस्थित दिसू लागली आहे.

जालंधर, सहारनपूर येथूनही दिसली शिखरे
सध्या सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व उद्योगधंदे तसेच व्यवसायही बंद आहेत, ज्यामुळे वातावरर्णांतील प्रदूषणाची पातळी खूपच कमी झाली आहे. प्रदूषण कमी झाल्यामुळे विजिबिलिटी खूपच वाढली आहे. जालंधरमधूनही हिमालयातील शिखरे पाहता येतील याची कोणाला कल्पनाही नव्हती, मात्र एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच ही शिखरे दिसू लागली. अगदी घराच्या छतावरुन, हिमालयातील धौलाधर पर्वत लोकांनी पाहिले. इतकेच नव्हे तर काही काळानंतर उत्तर प्रदेशातील सहारनपुरातून ही शिखरे दिसू लागली.

लोकांनी फोटो केले शेअर
पण आता काठमांडूतील लोकही पहिल्यांदाच अगदी त्यांच्या घरातूनच माउंट एव्हरेस्ट पाहत आहेत. लोकांनी त्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. काठमांडूहून पाहिले गेलेलय एव्हरेस्ट पीकची छायाचित्रे लोकांनी शेअर केली आहेत, महत्त्वाची बाब म्हणजे काठमांडूपासून माउंट एव्हरेस्ट हे २०० किलोमीटर दूरवर आहे. आभूषण गौतम क्लिक केलेली छायाचित्रे नेपाळ टाईम्सच्या ट्विटर हँडलवर शेअर केली गेली आहेत.

हवा स्वच्छ झाल्यावर दिसले माउंट एव्हरेस्ट
नेपाळ टाईम्सने ट्वीट करून असे म्हटले आहे की,’ कोविड -१९ मुळे देशात सध्या लॉकडाऊन सुरु आहे, त्यामुळे नेपाळ आणि उत्तर भारताची हवा अगदी साफ झाली आहे. अनेक वर्षांत पहिल्यांदाच २०० किलोमीटर अंतरावर असलेल्या काठमांडूहून माउंट एव्हरेस्ट पाहिले जाऊ शकले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

१९९३ मुंबई बॉम्बस्फोटातील ‘या’ मोस्ट वॉन्टेड आरोपीला भारताकडे सोपवण्यास ब्रिटनचा नकार

नवी दिल्ली । १९९३ मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी आणि कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा साथीदार हनीफ टायगरला भारताकडे सोपवण्यास ब्रिटनने नकार दिला आहे. ब्रिटनच्या या निर्णयानंतर भारत पुन्हा एकदा प्रत्यार्पण अर्ज करू शकतो. मुंबईतील बॉम्बस्फोट, दहशतवादी कारवायांचा कट रचणे आदीसह इतर प्रकरणांमध्ये हनीफ टायगर आरोपी असून भारताला तो हवा आहे. हनीफ टायगरला हनीफ मोम्मद उमेरजी पटेल या नावाने ओळखले जाते.

भारतीय गुप्तचर संस्थांनी दिलेल्या माहितीच्या आधारे हनीफला २०१० मध्ये ब्रिटनमध्ये स्थानिक पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर भारतीय अधिकाऱ्यांनी प्रत्यार्पण वॉरंटही मिळवले. मात्र, हनीफने त्याविरोधात कोर्टात धाव घेतली. मात्र, हनीफची याचिका कोर्टाने २०१३ मध्ये फेटाळली. त्यानंतर हे प्रकरण ब्रिटनच्या गृहसचिवांकडे गेले. अनेक वर्ष सुनावणी झाल्यानंतर २०१९ मध्ये हनीफच्या प्रत्यापर्णला ब्रिटनने नकार दिला.

दरम्यान, भारत सरकार पुन्हा एकदा ब्रिटन सरकारकडे हनीफ टायगरच्या प्रत्यार्पणाची मागणी करू शकतो. मात्र, हनीफ पुन्हा स्थानिक कोर्टात जामीन अर्ज दाखल करू शकतो. हनीफला भारताला सोपवण्याच्या प्रस्तावाला ब्रिटनमधील पाकिस्तानी वंशाचे नेते साजिद जावेद यांनी आडकाठी केली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

UK: Pak-Origin Ex-Home Secretary Blocks Dawood Aide And Surat ...

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

आज औरंगाबादेत कोरोनाचा 32 वा बळी, रुग्णसंख्या 1021 वर

औरंगाबाद प्रतिनिधी l शहरात कोरोनाचा कहर सुरू आहे. कालरविवारी दिवसभरात तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता याला चोवीस तास उलटत नाहीत तोच सोमवारी मदनी चौक येथील 65 वर्षीय पुरुष रुग्णाचा घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. हा औरंगाबाद येथील 32 वा मृत्यू आहे, अशी माहिती घाटी रुग्णालयाच्या वतीने देण्यात आली.

मदनी चौक येथील 65 वर्षीय पुरुष रुग्णाला कोरडा खोकला व ताप ही लक्षणे असल्याने त्यांना 13 मे रोजी कटकट गेट नजीक खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णाला 16 मे रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास खाजगी रुग्णालयातुन घाटीमध्ये गंभीर अवस्थेत दाखल केले होते. त्यांच्यावर कोविड अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. त्यांना खाजगी रुग्णालयातही व्हेंटिलेटर लावण्यात आला होता.

घाटीतही व्हेंटिलेटरवरच होते तरीही त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात सर्वतोपरी उपचार सुरू होते मात्र, 17 मे रोजी रात्री 8 वाजता त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची माहिती घाटी रुग्णालयातील माध्यम समन्वयक डॉ. अरविंद गायकवाड यांनी दिली. चोवीस तासात हा चौथा तर आतापर्यंतचा औरंगाबादेत येथील 32 वा कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू आहे तर कोरोनाबाधित रुग्णसंख्या 1021 वर पोहोचली आहे.

काल तीनजणांचा घाटीत उपचारादरम्यान मृत्यू घाटी रुग्णालयात आज मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये रोशन गेट येथील गल्ली नं. पाच येथील 42 वर्षीय पुरूष रुग्णाचा आज मध्यरात्री 1.15 वाजता. तर शंभू नगर, गल्ली नं. 29 येथील 35 वर्षीय महिलेचा सकाळी सहा वा आणि बुड्डी लेन, रौफ कॉलनीतील 74 वर्षीय पुरूष रुग्णाचा उपचारास प्रतिसाद न मिळाल्याने सकाळी 9.15 वा. मृत्यू झाल्याचेही कळवले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

राज्यात केंद्रीय पोलीस दलाच्या १० तुकड्या दाखल; केंद्रानं केली राज्य सरकारची मागणी पूर्ण

मुंबई । राज्यातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव, लॉकडाऊनचा काळ आणि पोलीस यंत्रणेवर वाढता ताण या सर्व परिस्थितीमुळे राज्य सरकारने केंद्र सरकारला राज्यात केंद्रीय पोलीस दलाच्या तुकड्या पाठवण्याची मागणी केली होती. केंद्रानं राज्य सरकारची मागणी मान्य केली असून केंद्रीय पोलीस दलाच्या १० तुकड्या महाराष्ट्रात दाखल झाल्या आहेत. या सर्व तुकड्या सोमवारीच राज्यातील विविध ठिकाणी सेवेत रुजू होणार आहेत.

राज्यात दाखल होत असणाऱ्या या तुकड्यांमध्ये रॅपिड अक्शन फोर्सच्या ५, CISFच्या ३ आणि CRPFच्या २ तुकड्या दाखल झाल्या आहेत. दाखल करण्यात आलेल्या प्रत्येक तुकडीत १०० जवान आहेत. राज्यातील एकंदर परिस्थिती पाहता राज्य शासनाने एकूण २० तुकड्या मागवल्या होत्या, त्यातील १० तुकड्या सद्यस्थितीला केंद्राने पाठवल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यातील कोरोना प्रभावित मुंबई, पुणे, औरंगाबाद, मालेगाव, अमरावती इथे या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. रमजान ईद, आषाढी पालखी सोहळा, गणेशोत्सव या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि महाराष्ट्र पोलिसांना विश्रांती देण्यासाठी या तुकड्यांना राज्यात पाचरण करण्यात आल्या आहेत. राज्यात आलेल्या केंद्रीय पोलीस दलाच्या या तुकड्या कुठे तैनात करायच्या याचा अधिकार त्या-त्या जिल्ह्यांच्या पोलीस आयुक्तांना दिले असल्याची माहिती समोर येत आहे.

औरंगाबादेत शीघ्र कृती दलाची तुकडी दाखल ; गर्दीचे नियमन करण्यास होणार मदत

औरंगाबाद प्रतिनिधी l लॉकडाऊनच्या काळात पोलिसांच्या मदतीला आता शीघ्र कृती दलाला पाचारण करण्यात आले आहे. त्यामुळे 120 जणांची एक तुकडी शहरात दाखल झाली आहे. त्यामुळे आता विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांना चांगलीच चपराक बसणार आहे.

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतच चालला आहे. जिल्हा प्रशासन वारंवार नागरिकांना घरात राहण्याच्या सूचना करीत आहेत. मात्र तरी देखील नागरिक ठीक-ठिकाणी गर्दी करीत आहेत. ही गर्दी रोखण्यासाठी पोलिसांच्या मदतीला आता शीघ्र कृती दलाची एक तुकडी औरंगाबाद शहरात दाखल झाली आहे. या तुकडी मध्ये 120 कर्मचारी आहेत. शहर पोलीस दलातील 3500 पोलिसांच्या मदतीला आली आहे. यामुळे गर्दीचे नियमन करण्यास मदत होणार आहे.

Rapid Action Force | UPSC - IAS Exams

जिल्ह्यात कोरोनाचे 1021 रुग्ण झाले आहे. प्रशासन अतिशय सतर्कतेने काम करत आहे. मात्र नागरिक याच गांभीर्य काही लक्षात घेताना दिसत नाहीत. त्यामुळं पोलीस ही या नागरिकांसमोर हतबल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शीघ्र कृती दलाची एक तुकडी औरंगाबाद शहरात दाखल झाली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

दिलासादायक ! सोलापूरात अवघ्या 22 दिवसाच्या बाळाने केली कोरोनावर मात

सोलापूर प्रतिनिधी l कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या सोलापुरातुन एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील अवघ्या 22 दिवसाच्या एका चिमुकलीने कोरोनवर मात केली आहे. 26 एप्रिल रोजी या मुलीचा सोलापुरातील शासकीय रुग्णालयात जन्म झाला होता. घरी गेल्यानंतर बाधितांच्या संपर्कात आल्याने या चिमुकलीची आई आणि चिमकुलीस कोरोनाची लागण झाली. अवघ्या 11 दिवसाची असताना या मुलीस शासकीय रुग्णालयात कोरोनाच्या उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र योग्य उपचार मिळाल्याने 11 व्या दिवशी चिमुकली कोरोनामुक्त झाली.

22 दिवसाची ही चिमकुली आणि तिची आई या दोघींचेही अहवाल निगेटिव्ह आल्याने रविवारी त्यांना रुग्णालयातुन सोडण्यात आले आहे. ही चिमुकली कोरोनामुक्त झाल्याने जिल्ह्यात दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे.

जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आज पर्यंत जिल्ह्यातील कोरोनाबधित रुग्णांची संख्या 390 वर जावून पोहचली आहे. त्यामुळे जिल्ह्यात अजून भीतीच वातावरण निर्माण झालं आहे. संचारबंदीमुळे जिल्ह्यात सर्वत्र शांतता आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

अर्थमंत्री सीतारामन यांचा ‘निर्मला अक्का’ असा उल्लेख करत आव्हाडांनी हाणला टोला, म्हणाले..

नवी दिल्ली । काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधींनी मजुरांची भेट घेऊन विचारपूस केल्यावर त्यांना  ड्रामेबाज म्हणणाऱ्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवरून टोला हाणला आहे. एखाद्याविषयी माणुसकी आणि संवेदना व्यक्त करणं ही ड्रामेबाजी असेल तर मग हा देश ड्रामा करणाऱ्यांचा आहे’ असा टोला आव्हाड यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना हाणला आहे.

विशेष म्हणजे आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये अर्थमंत्र्यांचा उल्लेख ‘निर्मलाअक्का’ असा केला आहे. ‘स्थलांतरित मजुरांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या बाजूला बसणे, गप्पा मारणे, त्यांच्याबरोबर चालणे ही राहुल गांधींची ड्रामाबाजी आहे, असं निर्मलाअक्कांचं म्हणणं आहे. ‘जर माणुसकी आणि संवेदना व्यक्त करणे ड्रामाबाजी आहे तर मग हा देश ड्रामा करणाऱ्यांचा आहे. माणुसकी इथे व्यक्त होतेच,’ असं आव्हाडांनी ट्विटमध्ये म्हटलं.

राहुल गांधी मजुरांना भेटल्याचा प्रश्नावर अर्थमंत्र्यांनी दिलं उपहास करणार उत्तर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेलं २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजवर काँग्रेसनं जोरदार टीका केली आहे. आम्हाला पैसे दाखवा, ड्रामा नको, असं काँग्रेसनं सरकारला सुनावलं होतं. पॅकेज वाटपाची माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सीतारामन यांना याबद्दल प्रश्न विचारला असता त्यांनी काँग्रेसलाच ड्रामेबाज ठरवून टाकलं. ‘खरे ड्रामेबाज काँग्रेसवाले आहेत. राहुल गांधी रस्त्यावर बसून मजुरांशी चर्चा करतात आणि त्यांचा वेळ उगाचच वाया घालवतात. यापेक्षा त्यांनी मजुरांच्या मुलांना घेऊन आणि त्यांचं सामान घेऊन त्यांना मदत करायला हवी होती,’ असं सीतारामन म्हणाल्या होत्या.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”