Thursday, December 25, 2025
Home Blog Page 5794

बडे दिलवाला अक्षयची मुंबई पोलिसांना पुन्हा एकदा मदत; पुरवले १ हजार हेल्थ बॅण्ड

मुंबई । कोरोनाच्या संकटात सामान्य नागरिकांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक जण शक्य होईल तशी प्रशासनाला आणि गरजूंना मदत करत आहे. यामध्ये खिलाडी अक्षय कुमार सातत्याने मदतीचा हात पुढे करत आहे. आतापर्यंत अक्षयने विविध मार्गांनी पोलिसांना, करोनाग्रस्तांना, महानगर पालिकेला, गरजुंना मदत केली आहे. त्यानंतर त्याने पुन्हा एकदा मदतीचा हात पुढे केला आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’नुसार, अक्षयने मुंबई पोलिसांना सेन्सॉर असलेले १ हजार मनगटावर बांधायचे हेल्थ बॅण्ड पुरवले आहेत. या बॅण्डच्या मदतीने पोलिसांच्या शरीराचं तापमान तपासता येणार आहे. मनगटावर बांधण्यात येणाऱ्या या बॅण्डमुळे पोलिसांच्या शरीराचं तापमान, हृदयाचे ठोके, रक्तदाब, कॅलरी या सगळ्या गोष्टी तपासता येणार आहेत. सध्याच्या काळात पोलीस अहोरात्र काम करत असून बऱ्याच वेळा ते त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोग्याच्या काळजीसाठी अक्षयने हे बॅण्ड पुरविल्याचं म्हटलं जात आहे.

दरम्यान, अक्षय सातत्याने त्याला शक्य होईल त्या पद्धतीने मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. यापूर्वी त्याने पंतप्रधान केअर फंडमध्ये २५ कोटी रुपयांची रक्कम केली आहे. तर मुंबई महानगरपालिकेला ३ कोटी रुपयांची रक्कम डॉक्टरांच्या पीपीई किट, मास्क आणि रॅपिड टेस्ट किट खरेदीसाठी दिले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

धक्कादायक! सांगलीत दहा वर्षीय मुलाला कोरोनाची लागण

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

साळसिंगे येथील कोरोना बाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या कडेगाव तालुक्यातील भिकवडी खुर्द येथील एका दहा वर्षाच्या मुलाचा कोरोना रिपोर्ट आज पहाटे पॉझिटिव्ह आला आहे. सांगली जिल्ह्याला साळसिंगे कनेक्शन पडले महागात पडले असून कडेगाव तालुक्यात कोरोनाची एंट्री झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. तर अन्य तिघांचे रिपोर्ट मात्र निगेटिव्ह आले आहेत. सद्यस्थितीत सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या १४ वर गेली आहे.

अहमदाबाद येथून खानापूर तालुक्यातील साळसिंगे येथे आलेल्या महिलेसोबत भिकवडी खुर्द येथील पती-पत्नी व त्यांची दोन मुले अशी चौघेजण सोमवारी भिकवडी खुर्द येथे आली होती. त्यामुळे त्यांना त्याचवेळी आरोग्य विभागाने तात्काळ होम क्वारंनटाईन केले होते. तर साळसिंगे येथील महिलेला कोरोना झाल्याचे रविवारी निष्पन्न झाले.

त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रांताधिकारी डॉ.गणेश मरकड, तहसीलदार डॉ.शैलजा पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक वायदंडे यांचेसह आरोग्य विभाग व तालुका प्रशासनाने भिकवडी खुर्द येथे धाव घेवून साळसिंगे येथील कोरोना बाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या भिकवडी खुर्द येथील पती पत्नी व त्यांची दोन मुले असे एकूण चौघांना सोमवारी होम क्वारेनटाईनमधून संस्थात्मक क्वारंनटाईन केले. त्यांना कडेगाव येथील शासकीय वसतिगृहातील अलगीकरण कक्षात ठेवले आहे. तर आरोग्य विभागाने त्यांच्या घशातील स्वाबचे नमुने बुधवारी सकाळी घेतले होते. तर या चौघांच्या संपर्कात आलेल्या गावांतील अन्य चौदा जणांना आरोग्य विभागाने होम क्वारंनटाईन केले होते.

तसेच अहमदाबाद येथून भिकवडी खुर्द येथे आलेल्या या चौघांचा कोरोनाचा रिपोर्ट आज पहाटे सहा वाजता आला. त्यामध्ये एका दहा वर्षाच्या मुलाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर अन्य तिघांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रांताधिकारी डॉ.गणेश मरकड, तहसीलदार डॉ. शैलजा पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक वायदंडे,निरीक्षक विपीन हसबनिस यांचेसह आरोग्य विभाग व तालुका प्रशासनाने भिकवडी खुर्द येथे धाव घेवून संबंधित वस्ती व भिकवडी खुर्द हे गाव सील केली असून गावांत पोलीस बंदोबस्त वाढवला.

आरोग्य विभागाने घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी मोहीम सुरु केली आहे. तर ग्रामपंचायतीच्यावतीने गावात निर्जंतुक औषध फवारणी सुरु केली आहे. गावात प्रचंड भीतीचे वातावरण आहे.14 जण होम क्वारंनटाईन मधून संस्थात्मक क्वारंनटाईन भिकवडी खुर्द येथील दहा वर्षाच्या कोरोना बाधित मुलाला पुढील उपचारासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात आज हलविण्यात आले. तर गावातील होम क्वारंनटाईन केलेल्या 14 जणांना आरोग्य विभागाने आज संस्थात्मक क्वारंनटाईन केले असून त्यांना कडेगाव येथील शासकीय वसतिगृहातील अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून आज त्यांच्या घशातील स्वाबचे नमुने घेतले जाणार आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

अजून संपलं नाही! निर्मला सीतारमन आज तिसऱ्या टप्प्यातही मोठ्या घोषणा करण्याची शक्यता

मुंबई । पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना संकटादरम्यान जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली होती. ‘स्वावलंबी भारत’ पॅकेजविषयी आज तिसऱ्या टप्प्यातही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मोठ्या घोषणा कार्याची शक्यता आहे. आज (१५ मे) अर्थमंत्र्यांची तिसरी पत्रकार षरिषद होणार आहे. चार वाजता होणाऱ्या बैठकीत आज काय घोषणा केल्या जातात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, काल आपल्या दुसर्‍या पत्रकार परिषदेत अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी स्थलांतरित कामगार, पथ विक्रेते, छोटे व्यापारी आणि छोटे शेतकरी याबद्दल घोषणा केली होती. 31 मे पर्यंत शेतकऱ्यांना व्याजातून सूट देण्यात येणार आहे. तसेच परप्रांतीय कामगारांना पुढील दोन महिने मोफत धान्य मिळणार असून. कार्ड नसलेल्यांना ५ किलो रेशन देण्यात येणार असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी दिली होती.

निर्मला सीतारमन म्हणाल्या होत्या की, कामगारांचे कल्याण हे आमच्या अजेंड्यात अव्वल आहे. किमान वेतन सध्या केवळ 30 टक्के कामगारांना लागू आहे. आम्हाला ते प्रत्येकासाठी बनवायचे आहे. तसेच 31 मे पर्यंत शेतकऱ्यांना व्याजातून सूट देण्यात आली आहे. 25 लाख नवीन शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड देण्यात आली आहे. शेतकऱ्यांसाठी आजच दोनच घोषणा असल्या तरीही पुढेही त्यांच्यासाठी घोषणा असणार आहेत. 12 हजार बचतगटांकडून 3 कोटी मास्क आणि दीड लाख लीटर पर्यंत सॅनिटायझरची निर्मिती केली आहे, असंही निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं होतं. गेल्या दोन महिन्यात 7 हजार 200 बचतगटांची स्थापना झाली आहे असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

पॅकेजच्या पहिल्या टप्प्यात अर्थमंत्र्यांनी कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली होती. ऑगस्ट महिन्यापर्यंत कंपनी आणि कर्मचार्‍यांचा 12 टक्के + 12 टक्के पीएफमध्ये केंद्र सरकार जमा करणार आहे. याचा 75 लाखाहून अधिक कर्मचारी व कंपन्यांना फायदा होणार आहे. सरकारने मार्च, एप्रिल आणि मे महिन्यातही यामध्ये हातभार लावला होता. हीच सुविधा आता तीन महिन्यांसाठी वाढवण्यात आली आहे, अशी माहिती अर्थमंत्र्यांनी दिली होती.
कोरोनाच्या संकटात कंपन्या आणि कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. पुढील तीन महिन्यांसाठी खासगी कंपन्याना 12 टक्क्यांएवजी 10 टक्के पीएळ भरावा लागणार आहे. ऑगस्टपर्यंत सरकार हे पीएफ भरणार आहे.

ज्या कंपन्यांकडे 100 पेक्षा कमी कर्मचारी आहेत, तसेच 90 टक्के कर्मचाऱ्यांचा पगार 15 हजार रुपयांपेक्षा कमी आहे, अशा कंपन्यांना सरकारच्या या योजनेचा फायदा होणार आहे. म्हणजेच 15 हजाराहून अधिक पगार असलेल्या कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही. यामध्ये जवळपास 3,67,000 कंपन्यांना आणि 72,22,000 कर्मचार्‍यांना याचा फायदा होईल. यावर सरकार 2500 कोटी खर्च करणार आहे. तसेच वीज वितरण कंपन्यांना मदत करण्यासाठी 90,000 कोटी रुपये दिले जाणार आहेत. नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी, मायक्रो फायनान्स कंपन्यांसाठी 30,000 कोटींची योजना आणली जात आहे. नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्यांसाठी 45,000 कोटी रुपयांच्या आधीच सुरू असलेल्या योजनांचा विस्तार होणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी जाहीर केलं होतं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

…म्हणून लॉकडाऊनमध्येही विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची तयारी सुरु

मुंबई । राज्यावर कोरोनाचे संकट असले तरी विधिमंडळाने आणि राज्य सरकारने विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची तयारी सुरू केली आहे. येत्या २२ जून रोजी राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु होणार आहे. या अधिवेशनातील कामकाज ठरवण्यासाठी येत्या सोमवारी १८ मे रोजी कामकाज सल्लागार समितीची बैठक होत आहे. या बैठकीत अधिवेशनाच्या कामकाजावर चर्चा होऊन ते निश्चित केले जाईल.

दरम्यान, राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता हे अधिवेशन पुढे जाण्याची दाट शक्यता आहे. तरीही नियमांनुसार व सर्व शक्यता गृहित धरून विधिमंडळाला आणि सरकारला अधिवेशनाची तयारी करावी लागणार आहे. त्यासाठीच सोमवारी विधानभवनात कामकाज सल्लागार समितीची बैठक होत आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह दोन्ही विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर तसंच सर्व पक्षाचे गटनेते उपस्थित असतील.

तर दुसरीकडे विधिमंडळानेही अधिवेशनाची तयारी म्हणून आमदारांकडून ऑनलाईन प्रश्न मागवण्यास सुरुवात केली आहे. पहिल्याच दिवशी विधानपरिषदेसाठी साडे सहाशे प्रश्न नोंदवण्यात आले आहेत. येत्या काही दिवसांत त्यात आणखी वाढ होईल. याशिवाय अर्धा तासाच्या चर्चा, लक्षवेधी सूचना विधीमंडळाकडे आमदारांकडून पाठवण्यात येतील. हे सर्व विधीमंडळाकडून मंत्रालयात संबंधित विभागात पाठवण्यात येते. मात्र सद्याची लॉकडाऊनची परिस्थिती पाहता आणि मंत्रालयातील कर्मचाऱ्यांची ५% उपस्थिती पाहता हे सगळं कामकाज वेळेत कसं होणार? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

शरद पवारांचे पंतप्रधान मोदींना पत्र; साखर उद्योगाला उभारणी देण्यासाठी केल्या ‘या’ मागण्या

मुंबई । कोरोना महामारीमुळे सुरु असलेल्या लॉकडाऊन मुले अनेक उद्योग धंद्यांची परिस्थिती बिकट बनली आहे. याला साखर उद्योगही अपवाद नसून कोरोनामुळे साखर उद्योगही आर्थिक संकटात सापडले आहेत. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पात्र लिहिले आहे. सदर पात्रातून पवार यांनी साखर कारखान्यांची सद्यस्थितीचे वर्णन केले असून साखर उद्योगाला उभारणी देण्यासाठी काही मागण्या केल्या आहेत. शरद पवार यांनी लिहिलेलं संपूर्ण पात्र खालीलप्रमाणे

माननीय महोदय,
प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदीजी

मी महाराष्ट्र राज्य सहकारी संस्थेच्या अध्यक्षांच्या १४ मे २०२० च्या पत्रातील तपशीलवार मुद्दे याठिकाणी मांडत आहे. या पत्रात साखर उद्योगाची सध्याची भीषण परिस्थिती विशद करण्यात आली आहे. कोरोनासारख्या महामारीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारतात जाहीर करण्यात आलेल्या अभूतपूर्व लॉकडाऊनमुळे राज्यातील अनेक उद्योगांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. साखर उद्योगाचाही यात समावेश आहे. साखर उद्योगाला यातून बाहेर काढण्यासाठी आपण त्वरित हस्तक्षेप करून विविध उपाययोजना जाहीर कराव्यात अशी विनंती साखर कारखाने महामंडळ लिमीटेडच्या वतीनं करण्यात आली आहे.

लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वीपासूनच साखर उद्योग संकटात होता. त्यावेळी आपण इथेनॉलच्या उत्पादनासाठी किमान हमीभाव, साखरेची निर्यात, राखीव साठा, भांडवली खर्चावरील व्याजापोटी दिले जाणारे अनुदान इत्यादी आर्थिक उपाययोजना करण्यावर भऱ दिला. आता कोविड-१९ चे संकट दिवेंदिवस गडद होत चालले असतानाही आपण काही धोरणात्मक निर्णय घ्याल अशी अपेक्षा आहे. यासंदर्भात साखर कारखाने महामंडळ लिमीटेडने काही उपाययोजना सुचवल्या आहेत.

-२०१८-१९ आणि २०१९-२० या वर्षांपासून प्रलंबित असलेल्या निर्यात प्रोत्साहन भत्त्यापोटी आणि राखीव साठ्याच्या खर्चापोटी निधीची तरतूद करावी.

-साखरेच्या हमीभावात रुपये ३४५० पासून ३७५० इतकी श्रेणीनिहाय वाढ करावी.

-गेल्या दोन वर्षात गाळप केलेल्या ऊसाला एका टनासाठी सरासरी ६५० रुपये इतक्या अनुदानाची तरतूद करावी.

-मित्रा समितीनं केलेल्या शिफारसीनुसार थकीत खेळत्या भांडवलाचे अल्प मुदतीच्या कर्जात रुपांतरण करावं आणि कर्जांच्या १० वर्षांच्या कालावधीचे अधिस्थगन करून कर्ज फेडण्याचा कालावधी आणखी २ वर्षे पुढे ढकलावा.

-साखर कारखानदारांच्या उस गाळप व्यवसायाकडे स्ट्रॅटेजिक बिझनेस युनिट म्हणून पहावं. साखर उद्योगाला पुन्हा उभं करण्यासाठी केंद्र सरकारनं २०१८ मध्ये जाहीर केलेल्या भांडवली खर्चावरील व्याजापोटी देण्यात येणाऱ्या अनुदान योजनेखाली सुरू करण्यात आलेल्या इथेनॉल प्रकल्पांना बँकांनी वित्तपुरवठा करण्याची तरतूद व्हावी.

साखर उद्योगाला नवी भरारी मिळण्यासाठी आपण साखर उद्योगात जातीनं लक्ष घालावे आणि कोरोनामुळे उभ्या राहीलेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर साखर उद्योगांसाठी आर्थिक उपाययोजना जाहीर करण्यात पुढाकार घ्यावा, अशी विनंती आपल्याला या पत्राद्वारे करत आहे.

कोरोना संकटात जागतिक बँकेकडून भारताला मोठी मदत; दिले ‘इतके’ कोटी

वृत्तसंस्था । कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अनेक जागतिक संघटना आता मदतीसाठी पुढे आल्या आहेत. जागतिक बँकेने भारताला मोठी आर्थिक मदत केली आहे. जागतिक बँकेने भारताला तब्बल एक बिलियन डॉलरचं पॅकेज जाहीर केले आहे. हे सामाजिक संरक्षण पॅकेज आहे. यापूर्वी कोरोनाशी युद्धासाठी ब्रिक्स देशांच्या न्यू डेव्हलपमेंट बँकेने आपत्कालीन मदत म्हणून एक अरब डॉलरची मदत जाहीर केली होती.

जागतिक बँकेचे एक अब्ज डॉलरचे (सुमारे ७६०० कोटी) पॅकेज देशातील कोरोना रुग्णांच्या चांगल्या तपासणीसाठी, कोविड रुग्णालयांचा दर्जा वाढवण्यासाठी तसेच प्रयोगशाळेसाठी इमारत बांधण्यासाठी वापरले जाऊ शकते. जागतिक बँकेने यापूर्वी २५ विकसनशील देशांना पॅकेज देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. याआधी न्यू डेव्हलपमेंट बँकेने भारताला एक अब्ज डॉलर्सची आपत्कालीन मदत जाहीर केली. कोविड -१९ चा प्रसार रोखण्यासाठी आणि कोरोना विषाणूच्या साथीमुळे होणारे मानवी, सामाजिक व आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी हे कर्ज देण्यात आलं होतं.

याव्यतिरिक्त, एशियन डेव्हलपमेंट बँकने (एडीबी) कोरोनाच्या संकटात भारताला १.५ अब्ज डॉलर्सचे पॅकेज जाहीर केले होते. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आणि कोरोनो विषाणूमुळे होणारे मानवी, सामाजिक व आर्थिक नुकसान कमी करण्याच्या लढाईत भारत सरकारला सामील करणे हे त्याचे उद्दीष्ट आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

सातारा जिल्हा कारागृहातील आणखी एका कैद्याला कोरोनाची लागण

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

सातारा जिल्हा कारागृहातील निकट सहवासित 26 वर्षीय रुग्णाचा अहवाल कोरोना (कोविड-19) बाधित आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. तसेच ११५ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले असून ८ जणांना विलगीकरण कक्षात दाखल केले आहे.

वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 99, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 2 व ग्रामीण रुग्णालय कोरेगांव येथील 14 असे एकूण 115 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. तर काल दि. 14 मे रोजी रात्री उशिरा क्रातीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 8 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपाणीसाठी पाठविण्यात आल्याची माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली.

दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या- 125 झाली असून या पैकी उपचार घेत असलेले बाधीत रुग्ण (कोविड-19)- 78, कोरोना मुक्त होवून घरी गेले रुग्ण- 45, कोरोना बाधित मृत्यु झालेले 2 रुग्ण आहेत.

सातारा जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

… म्हणून राज्य सरकार आता स्थापणार ‘कामगार ब्युरो’

मुंबई । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक कारखान्यातील परप्रांतीय श्रमिक त्यांच्या घरी निघून गेले आहेत. यामुळे स्थानिक भूमिपुत्रांना त्यांच्या जागी रोजगाराची संधी निर्माण झाली आहे. यासाठी कामगार ब्युरोची स्थापना केली जाणार असून, यात कामगारांच्या त्यांच्या कौशल्याप्रमाणे विभागणी केली जाईल. त्यानंतर, अवघ्या ७ दिवसांत कामगारांना प्रशिक्षण देऊन उद्योगांची गरज पुरविली जाणार आहे. महाराष्ट्रातील उद्योगांमध्ये कामगारांची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून उद्योग, कामगार व कौशल्य विकास विभागाच्या वतीने या कामगार ब्युरोची स्थापना केली जाणार असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी गुरुवारी दिली.

कामगार ब्युरोच्या माध्यमातून उद्योगांना कुशल, अकुशल मजूर, कामगार मोठ्या संख्येने उपलब्ध होतील. मराठी मुलांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले आहे. कोरोनामुळे एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. आम्ही गेले महिनाभर परप्रांतीय श्रमिकांना सतत सांगत होतो जाऊ नका. तरीही ते गेले. मात्र, त्यांच्या जाण्याने राज्यात आता रोजगाराची संधी निर्माण झाली आहे. ती स्थानिक भूमिपुत्रांनी सोडू नये. कारण, त्यासाठी आम्ही अनेकदा आंदोलने केली. महाराष्ट्राला ही एक संधी मिळाली आहे. त्यामुळे आता उद्योजकांनी स्थानिक भूमिपुत्रांना प्रथम संधी द्यावी. यामुळे मराठी माणसांची महाराष्ट्रातील बेकारी कमी होईल, असा विश्वास सुभाष देसाई यांनी व्यक्त केला आहे.

परभणी पुन्हा ग्रीन झोनमधून ऑरेंज झोनमध्ये; सापडले ३ नवीन कोरोनाग्रस्त

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे

परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यामध्ये, तीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने, जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. ग्रीन झोन मध्ये असलेला परभणी जिल्हा आता, ऑरेंज झोनमध्ये गेला आहे.

मुंबई येथील पोलिस दलात कार्यरत असलेल्या, एका जवानांच्या कुटुंबीय, जिंतूर तालुक्यातील आपल्या (शिवडी या गावात ) गावी दोन दिवसापूर्वी आले होते. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांची चाचणी घेऊन रिपोर्ट पुणे येथे तपासणीसाठी पाठवला होता. त्याचा काल रात्री उशिरा अहवाल आल्यानंतर कुटुंबातील चाळीस वर्षीय महिला आणि दहा वर्षे वयोगटातील दोन बालकांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं आहे.

दरम्यान, आता सदर रुग्णांना परभणीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले असून, त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. तर त्यांच्या संपर्कात आल्याने कोणाला याची लागण झाली आहे का याचाही तपास सुरू करण्यात आलाय…

परभणी जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

खडसे-भाजपा वादावर नितीन गडकरी, म्हणाले..

नागपूर । विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपानं उमेदवारी न दिल्यानं भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ यांनी राज्यातील पक्ष नैतृत्वावर जाहीर टीका आहे. राज्यातील नेत्यांमुळे तिकीट मिळालं नसल्याचा आरोपही त्यांनी केला होता. निष्ठावंतांना डावलून भाजपानं उपऱ्यांना संधी दिल्याचा आरोप पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यावर भूमिका स्पष्ट केली. यावरून बराच कलगीतुरा एकनाथ खडसे आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकातं पाटील यांच्यात रंगला होता. या सगळ्या वादावर भाजपाचे नेते आणि केंद्रीय नितीन गडकरी यांनी मौन सोडलं आहे. गडकरी यांनी खडसे यांच्याविषयी सहानुभूती व्यक्त केली.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना नितीन गडकरी म्हणाले,”गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली मी आणि एकनाथ खडसे यांनी एकत्र काम केलं आहे. पक्षाचा विस्तार करण्यात खडसे यांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. अतिशय प्रतिकूल काळात विशेषतः उत्तर महाराष्ट्रात त्यांनी मोठं काम केलं. पक्षाला यश मिळवून दिलं. मात्र आज त्यांना दिली जाणारी वागणूक दुःखद आहे. पक्षाशी निष्ठा ठेवून इतकी वर्षे काम करणाऱ्या कार्यकर्त्यावर वा नेत्यावर ही वेळ येणं पक्षासाठी चांगलं नाही. त्याबद्दल मी फक्त दुःख व्यक्त करू शकतो, त्यापेक्षा जास्त मला काही बोलता येणार नाही,” अशा शब्दात गडकरी यांनी आपली खंत व्यक्त केली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”