Thursday, December 25, 2025
Home Blog Page 5795

औरंगाबादेत आज पुन्हा 74 नवे कोरोनाग्रस्त; एकूण रुग्णसंख्या 823 वर

औरंगाबाद | औरंगाबादमध्ये आज पुन्हा ७४ नवे करोनाबाधित सापडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या ८२३ झाली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत २१ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आज ७४ रुग्ण सापडल्याने आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहे. गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादमध्ये करोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही. औरंगाबादमध्ये काल दिवसभरात ६२ नवे रुग्ण सापडले होते आणि दोघांचा मृत्यू झाला होता. आज पुन्हा ७४ नवे रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे.

औरंगाबाद शहरातील आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. एन सहा,सिडको (2), बुढीलेन (1), रोशन गेट (1), संजय नगर (1), सादात नगर (1), भीमनगर, भावसिंगपुरा (2), वसुंधरा कॉलनी (1), वृंदावन कॉलनी (3), न्याय नगर (7), कैलास नगर (1), पुंडलिक नगर (8),सिल्क मील कॉलनी (6), हिमायत नगर (5), चाऊस कॉलनी (1), भवानी नगर (4), हुसेन कॉलनी (15), प्रकाश नगर (1), शिव कॉलनी गल्ली नं. 5, पुंडलिक नगर (1), हुसेन कॉलनी, गल्ली नं. 5 (2), रहेमानिया कॉलनी (2), बायजीपुरा (5), हनुमान नगर (1), हुसेन नगर (1), अमर सोसायटी (1), न्यू हनुमान नगर, गल्ली नं.1, दुर्गा माता मंदिर (1) या भागातील कोरोनाबाधित असल्याचेही त्यांनी कळविले आहे.

आज सापडलेल्या रुग्णांमध्ये पुरुषांप्रमाणेच महिलांचाही अधिक समावेश आहे. यातील बहुतेक रुग्ण झोपडपट्टी परिसरातील असून संपर्कातून त्यांना करोनाची बाधा झाल्याचं सांगण्यात येतं. या रुग्णांच्या संपर्कातील इतर रुग्णांचा शोध घेतला जात आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

देश तयार करणाऱ्या स्थलांतरित मजुरांवरील अन्याय जुनाच आहे..!!

थर्ड अँगल | राधिका झा

स्थलांतरितांची असुरक्षितता नव्याने दिसते आहे, पण ती नवी नाही. मागच्या आठवड्यात मध्यप्रदेश मधल्या आपल्या गावाकडे निघालेल्या २० पैकी १६ स्थलांतरित कामगारांच्या सोबत झालेल्या शोकांतिकेचा भारत साक्षीदार आहे. ते श्रमिक रेल्वेत चढण्याची आशा धरून होते. रुळावर विश्रांती घेत होते. ते महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात मालवाहू रेल्वेखाली गेले. २५ मार्च पासून जेव्हा संचारबंदी अंमलात आणली गेली होती, तेव्हापासून आपल्या उदरनिर्वाहासाठी रोजंदारीवर अवलंबून असणाऱ्या समाजातील असुरक्षित घटकांपैकी बऱ्याच जणांना जगण्यास आवश्यक मूलभूत गोष्टीही दिल्या नाहीत, अशांच्या  स्वास्थ्याविषयीची अनिश्चितता सातत्याने वाढते आहे. लोकसंख्येतील असा घटक जो पैसे कमावण्यासाठी देशाच्या गरीब भागातुन वेगवेगळ्या राज्यांमध्ये प्रवास करतो त्यांना स्थलांतरित कामगार म्हणतात. 

हा साथीचा आजार सुरु होण्यापूर्वी देशातील बेकायदेशीर परदेशी स्थलांतरित कामगारांच्या मुद्द्याभोवती राजकीय चर्चा सुरु होत्या. दिल्ली आणि इतर ठिकाणी अलीकडे पास करण्यात आलेल्या नागरिकत्व सुधारणा कायदा, २०१९ च्या विरोधात निषेध करण्यात आला होता. जे अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानमधून आलेले हिंदू, सिख, जैन, पारशी, बौद्ध आणि ख्रिश्चन आहेत आणि भारतात २०१४ च्या आधी आले आहेत अशा परदेशी स्थलांतरिताना जो कायदा नागरिकत्व देतो तो नागरिकत्व कायदा होय. आता या कडक संचारबंदीच्या अत्यंत वाईट काळात स्थलांतरितांच्या राहणीमानाच्या प्रश्नावर आजूबाजूला वादविवाद सुरु आहे. स्थलांतरित कामगारांचा विश्वासघात झाला आहे याकडे वृत्तपत्रातील लेख निर्देश देत आहेत. पण खरोखरच असे झाले का, खरेच? अलीकडे स्थलांतरितांसोबतच्या वागणुकीच्या पद्धतीची जी काही थोडीफार झलक दाखविली जात आहे, त्यांना नेहमी अशाच पद्धतीने वागविले जाते का? सध्याच्या केंद्र आणि राज्याच्या औदासिन्याचे कुणालाही आश्चर्य वाटता कामा नये. 

यूएसए सारख्या देशात स्थलांतरित कामगारांच्या चांगल्या राहणीमानासाठी लोक जोर देत आहेत. ते परदेशी स्थलांतरित आणि असे लोक जे कमी विकसित देशातून यूएसमध्ये आले आहेत त्यांचा संदर्भ देतात. भारतात आपण अगदी आपल्या सहकारी भारतीयांना सुद्धा मूलभूत सुरक्षितता देण्यास सक्षम नाही आहोत. इथे तुम्हाला स्वतःचे मानण्यासाठी “भारतीय” ही एवढी पात्रता पुरेशी नाही आहे. १९६० च्या मुंबईतील “मराठी माणूस” चळवळीपासून ते २०१२ मधील बेंगलोर मधून ईशान्येकडील लोकांच्या लोंढ्याला बाहेर काढण्यापर्यंत, स्थानिकांकडून स्थलांतरितांना तिरस्कार आणि असहिष्णुतेची वागणूक दिल्याची अनेक उदाहरणे आहेत. जात, वर्ग, धर्म आणि प्रदेश अशा अनेक चौकटी आहेत ज्यांचा समावेश यात होणे गरजेचे आहे. पण दुर्दैवाने यापैकी काहीच तथाकथित स्थलांतरित कामगारांच्या बाजूने नाही. 

संपूर्ण दोष एकट्या सरकारला देणे अन्यायी आहे. जर सरकार त्याच्या समाजाचे प्रतिबिंब असेल तर सरकारचा सध्याचा प्रतिसाद हा समाजातील स्थलांतरित लोकांनी व्यापलेल्या स्थितीचा केवळ संकेत आहे. देशभरातील २२ राज्यातील भारतीयांसोबत, Common Cause, विकसनशील समाज अभ्यास केंद्र (Centre for Study of Developing Societies; CSDS) आणि Status of Policing in India report (SPIR) 2018 यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या सर्वेक्षणात १६% उत्तरदात्यांनी सांगितले की दुसऱ्या राज्यातील लोकांसोबत पोलीस भेदभाव करतात. शहरातील लोकांना पोलीस भेदभाव करतात हे अधिक वाटते. शहरातील २१% लोकांनी या विधानाला मान्यता दिली आहे. याउलट, एसपीआयआर, २०१९ च्या भारतातील २१ राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांसोबत करण्यात आलेल्या सर्वेक्षणातील २४% पोलिस कर्मचाऱ्यांचा असा ठाम विश्वास आहे की, गुन्हेगारी प्रवृत्ती ही स्थलांतरितांसाठी स्वाभाविकच आहे. तर ३६% पोलिसांना वाटते, स्थलांतरितांमध्ये थोड्या फार प्रमाणात गुन्हेगारी प्रवृत्ती असते. एकूण ६०% पोलीस कर्मचाऱ्यांनी स्थलांतरित हे नैसर्गिकरित्या गुन्हे करतात, असे मत व्यक्त केले. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर ते जन्मानेच गुन्हेगार असतात असे मत त्यांनी व्यक्त केले. जेव्हा पोलिसांना थेट हा प्रश्न विचारला गेला की काय त्यांनी खरोखरच स्थलांतरितांविरोधात भेदभाव केला होता का? या सगळ्यातून असे दिसून आले की, एकंदरीत, मोठ्या प्रमाणात लोकांना असे वाटते की पोलीस स्थलांतरितांसोबत भेदभाव करतात. 

२०११ च्या जनगणनेच्या अंदाजानुसार भारतातील सुमारे ४१ दशलक्ष लोक दुसऱ्या राज्यात स्थलांतरित झाले आहेत. ही आकडेवाडी दहा वर्षांआधीची आहे. तरीही इतर देशांच्या तुलनेत भारतातील आंतर -राज्य स्थलांतरणाचे प्रमाण अधिक आहे. २००० ते २०१० च्या दरम्यान देशांतर्गत होणाऱ्या स्थलांतराच्या प्रमाणाची तुलना केली असता ८० देशांमध्ये भारताचा क्रमांक अगदी शेवटी येतो. बऱ्याच अभ्यासांमधून हे सिद्ध झाले आहे की, भारतात स्थलांतरितांनी संसाधने आणि गंतव्यस्थान या दोन्हीची सुधारणा करण्यात मदत केली आहे. मात्र आंतरराज्यीय स्थलांतर रोखणारी कडक धोरणे आहेत. आरोग्य, स्वच्छता, गृहनिर्माण, सामाजिक फायदे, सिद्धता आणि नोंदणी, राजकीय सहभाग, बालहक्क, शिक्षण आणि कामगार बाजारपेठा यामध्ये लोकप्रिय धोरणांचे निर्देशक असणाऱ्या आणि स्थलांतरणास अनुकूल धोरणे असणाऱ्या सात राज्यतील तुलनात्मक विश्लेषण करण्यात आले होते.  हे विश्लेषण आंतरराजीय स्थलांतर धोरण निर्देशक, २०१९ (Interstate Migration Policy Index ) (आयएमपीईएक्स) या सर्वेक्षणात करण्यात आले होते. या सात राज्यांच्या अभ्यासात केरळ सर्वोच्च तर दिल्ली सर्वात खालच्या क्रमांकावर असल्याचे दिसून आले. तथापि केरळमध्ये ही विशेषतः राजकीय समावेश, गृहनिर्माणामध्ये भेदभाव न करणे यासारख्या क्षेत्रात लक्षणीय सुधारणा होण्याची गरज आहे असे अभ्यास सांगतो. आंतरराज्यीय स्थलांतरितांच्या तुलनेत भेदभावाच्या धोरणांच्या पार्श्वभूमीवर स्थलांतरित कामगारांचे हित सुनिश्चित करणाऱ्या धोरणांचा अभाव दिसून येतो. (किंवा राज्यांमधील स्थलांतर) २०१८ च्या जागतिक बँकेच्या अभ्यासामध्ये असे आढळून आले की, काही ओळखीचे पुरावे असणारी घरे आणि त्यांच्या घरातील सदस्य यांनी राज्यभरात स्थलांतर करण्याची शक्यता कमी असते. अशाचप्रकारे सामाजिक कल्याणासाठीच्या अपुऱ्या ओळखपत्र कागदपत्रांची पोर्टेबिलिटी कुटुंबाना राज्यांमध्ये स्थलांतर करण्यास प्रतिबंध करते. 

असमानता आणि भेदभाव यांच्यासहित अनेक असमाधानकारक शहरी राज्ये आहेत. या कामगारांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असलो तरी पहिल्यांदा आपण त्यांना आपल्या गावात आणि शहरात येण्यापासून वंचित ठेवतो. आणि संकटकाळात त्यांना त्यांच्या गावी परत जाऊ देत नाही. केंद्र आणि राज्य जेव्हा या कामगारांच्या प्रवासासाठीचा रेल्वेसाठीचा खर्च कोण उचलणार यासाठी भांडत असताना हे कामगार पायी शेकडो किलोमीटर चालत आहेत आणि ते असेच मरत राहणार आहेत. आपण मात्र समाज म्हणून काळजी न करणे चालू ठेवणार आहोत. 

लेखिका Common Cause येथे संशोधन एक्सिक्युटीव्ह आहेत. ही मते त्यांची वैयक्तिक आहेत. या लेखाचा अनुवाद जयश्री देसाई यांनी केला आहे.

सोने जमा करण्याच्या योजना आत्तापर्यंत ‘या’ दोन पंतप्रधानांनी राबवल्या; दोघेही भाजपचेच – पृथ्वीराज चव्हाण’

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

कोरोना विषाणूमुळे सध्या संपूर्ण देश लॉकडाऊन मध्ये आहे. कोरोनाचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम पडलेला असून यातून देशाला बाहेर काढण्यासाठी नुकतेच पंतप्रधान मोदींनी २० लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. अशात सरकारने देशातील देवस्थानाकडील सोने जमा करावे अशी अपील राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्याच्या बातम्या प्रसारित झालेल्या होत्या. मात्र आता याबाबत चव्हाण यांनी स्वतःचे मत मांडले असून आपल्या विधानाची मोडतोड करून चुकीचा अर्थ पसरवला गेल्याचा आरोप केला आहे.

कोरोना महामारीमुळे देशावर जे आर्थिक संकट आले आहे त्यापार्श्वभूमीवर देशातील विविध व्यक्ती आणि धार्मिक संस्थांकडे जे सोने पडून आहे ते बॅंकाकडे व्याजावर जमा करण्याची अपील मी काल केली होती. मात्र काही समाजविरोधी व्यक्तींनी माझ्या सूचनेची तोडफोड करून त्याचा चुकीचा अर्थ पसरवण्याचा प्रयत्न केला आहे असं चव्हाण यांनी म्हटले आहे.

तसेच मी केलेली अपील हि काही नवीन गोष्ट नाही. १९९८ साली पोखरण अनु चाचणीनंतर निर्माण झालेल्या आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयीनीं १४ सप्टेंबर १९९८ साली गोल्ड डिपॉझिट स्कीम आणली होती. ज्यातून सरकारकडे बरेच सोने जमा झाले होते. त्यानंतर २०१५ साली पंतप्रधान मोदी यांनी यात बदल करून गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम नोव्हेम्बर २०१५ मध्ये सुरु केली असे म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी आपण सांगितलेली कल्पना हि नवीन नसून आत्तापर्यंत दोन पंतप्रधानांनी सोने जमा करण्याच्या योजना राबवल्या असल्याचे सांगितले आहे. तसेच ते दोन्ही पंतप्रधान हे भाजपचेच असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.

पंतप्रधान मोदींनी सुरु केलेल्या गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम च्या पहिल्याच वर्षात देशातील मोठ्या आठ मंदिरांनी आपल्याकडीन सोने विविध बँकामध्ये ठेवले. याबाबत केंद्रीय अर्थमंत्र्यांनी लोकसभेत माहिती दिली आहे. यात शिर्डी देवस्थान आणि तिरुपती देवस्थानाचाही समावेश आहे. अर्थ मंत्रालयाच्या एका रिपोर्ट नुसार नोव्हेंबर २०१५ पासून ३१ जानेवारी २०२० पर्यंत या योजनेअंतर्गत जवळ जवळ ३००० जणांनी ११ बँकामध्ये साडे वीस टन सोने सरकारला दिले आहे. आपल्या देशात खूप सोने आहे. विश्व सुवर्ण परिषद (वर्ल्ड गोल्ड कौन्सिल) यांनी दिलेल्या माहितीनुसार देशात श्रीमंत वर्ग आणि काही देवस्थानाकडे प्रचंड प्रमाणात सोने आहे अशी माहिती चव्हाण यांनी दिली आहे.

दरम्यान, आपल्याकडे असणाऱ्या सोन्याचा या संकटाच्या वेळी योग्य उपयोग व्हावा या उद्देशाने मी व्याजावर सोने घेण्याची घोषणा केली होती. मात्र काही भक्त चॅनेलनी आणि राजकीय नेत्यांनी याला मी एखाद्या विशिष्ट धर्माला मध्ये देऊन अशी सूचना केल्याचा आरोप केला आहे. आत्तापर्यंत २ पंतप्रधानांनी सोने जमवण्यासाठी गोल्ड मोबिलायझेशन योजना बनवल्या आहेत. आणि दोघेही पंतप्रधान भाजप पक्षाशी निगडित आहेत असं चव्हाण यांनी सांगितले आहे.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/1711005865714588/

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांगलीत महापौर-आयुक्तांमधील संघर्ष वाढणार

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक कामे करता येतात, त्यामुळे नगरसेवकांची कामे आयुक्तांनी प्रलंबित ठेवली आहेत. मात्र आमराईत बेकायदेशीररित्या आयुक्तांनी काम सुरू केले आहे. कोरोना आपत्तीच्या काळात झालेल्या खर्चाचा हिशेेब जाहीर केला नाही. गेल्या ५० दिवसांपासून आयुक्तांचा हुकुमशाही कारभार सुरू असल्याचा आरोप महापौर गीता सुतार यांनी केला. या संदर्भात मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे तक्रार करणार असून जिल्हाधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या कारभाराची चौकशी करावी, अशी मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महापौर गीता सुतार यांनी आमराईत जावून सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. कोरोनाच्या काळात आमराईत तीन गेट बसविण्यात आले आहेत. शिवाय पेव्हिंग ब्लॉकची कामेदेखील सुरू आहेत. या कामांना वर्क ऑर्डर आहे का? कोणत्या फंडातून ही कामे सुरू आहेत. अशी माहिती शहर अभियंता, उद्यान अधीक्षक व शाखा अभियंता यांना विचारली होती. मात्र त्यांनी माहिती देण्यास नकार दिला. ठेकेदाराला देखील विचारले. त्यांनी पण माहिती दिली नाही. महापालिकेच्या एकाही पदाधिकारी व नगरसेवकाला या कामाची माहिती नाही. कोरोनाच्या काळात अत्यावश्यक कामे करता येतात. मात्र त्यांनी कोरोनाच्या परिस्थितीमध्ये केवळ अत्यावश्यक कामे करता येतात. असे सांगितले होते. मग आमराईतले असे काय अत्यावश्यक काम सुरू आहे? आयुक्तांकडून मनपा पदाधिकारी व नगरसेवकांची केवळ दिशाभूल सुरू असल्याचा आरोप महापौर सुतार यांनी केला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन होता. या काळात महापालिकेने केलेल्या खर्चाच्या हिशोबावरून आरोप होत होते. त्यामुळे महापालिकेची बदनामी होते. हा मुद्दा विशेष महासभेत उपस्थित झाला होता. आयुक्तांनी महापालिकेच्या वेबसाईडवर खर्च प्रसिध्द करण्याची ग्वाही दिली होती. मात्र त्यांनी खर्च सादर केला नाही. अधिकाऱ्यांना या संदर्भात प्रश्न विचारले तरी उत्तर देत नाहीत. कोरोनाच्या काळात त्यांचा हा हुकुमशाही कारभार सुरू आहे. त्यांच्या कारभाराची जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करावी, अशी मागणी करणार असल्याचे महापौर सुतार यांनी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

राज्यात दिवसभरात १ हजार ६०२ नवीन कोरोनाग्रस्त; एकूण रुग्णसंख्या २७ हजार ५२४ वर

मुंबई । राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २७ हजार ५२४ झाली आहे. आज १६०२ नविन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ५१२ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ६०५९ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २० हजार ४४६ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख ४० हजार १४५ नमुन्यांपैकी २ लाख १२ हजार ६२१ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर २७ हजार ५२४ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३ लाख १५ हजार ६८६ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १५ हजार ४६५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात ४४ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या १०१९ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील २५, नवी मुंबईत १०, पुण्यात ५,औरंगाबाद शहरात २, पनवेलमध्ये १ तर कल्याण डोंबिवलीमध्ये १ मृत्यू झाला आहे. नवी मुंबईत आज नमूद करण्यात आलेले मृत्यू दि. १४ एप्रिल ते १४ मे या कालावधीतील आहेत. आज झालेल्या मृत्यूंपैकी ३१ पुरुष तर १३ महिला आहेत.

आज झालेल्या ४४ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २१ रुग्ण आहेत तर २० रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ३ जण ४० वर्षांखालील आहेत. या ४४ रुग्णांपैकी ३४ जणांमध्ये ( ७७ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका: १६,७३८ (६२१)
ठाणे: १६६ (३)
ठाणे मनपा: १२१५ (११)
नवी मुंबई मनपा: १११३ (१४)
कल्याण डोंबिवली मनपा: ४२४ (४)
उल्हासनगर मनपा: ८२
भिवंडी निजामपूर मनपा: ३९ (२)
मीरा भाईंदर मनपा: २४८ (२)
पालघर: ४२ (२)
वसई विरार मनपा: २९५ (११)
रायगड: १६६ (२)
पनवेल मनपा: १६१ (९)
ठाणे मंडळ एकूण: २०,६८९ (६८१)

नाशिक: ९८
नाशिक मनपा: ६०
मालेगाव मनपा: ६४९ (३४)
अहमदनगर: ५५ (३)
अहमदनगर मनपा: १५
धुळे: ९ (२)
धुळे मनपा: ६२ (४)
जळगाव: १७१ (२२)
जळगाव मनपा: ५२ (४)
नंदूरबार: २२ (२)
नाशिक मंडळ एकूण: ११९३ (७१)

पुणे: १८२ (५)
पुणे मनपा: २९७७ (१६६)
पिंपरी चिंचवड मनपा: १५५ (४)
सोलापूर: ९ (१)
सोलापूर मनपा: ३३५ (२०)
सातारा: १२५ (२)
पुणे मंडळ एकूण: ३७८३ (१९८)

कोल्हापूर: १९ (१)
कोल्हापूर मनपा: ६
सांगली: ३६
सांगली मिरज कुपवाड मनपा: ७ (१)
सिंधुदुर्ग: ७
रत्नागिरी: ८३ (३)
कोल्हापूर मंडळ एकूण: १५८ (५)

औरंगाबाद:९५
औरंगाबाद मनपा: ६२१ (१९)
जालना: २०
हिंगोली: ६१
परभणी: १ (१)
परभणी मनपा: १
औरंगाबाद मंडळ एकूण: ७९९ (२०)

लातूर: ३२ (१)
लातूर मनपा: ०
उस्मानाबाद: ४
बीड: १
नांदेड: ५
नांदेड मनपा: ५२ (४)
लातूर मंडळ एकूण: ९४ (५)

अकोला: १८ (१)
अकोला मनपा: १९० (११)
अमरावती: ५ (२)
अमरावती मनपा: ८७ (११)
यवतमाळ: ९९
बुलढाणा: २६ (१)
वाशिम: ३
अकोला मंडळ एकूण: ४२८ (२६)

नागपूर: २
नागपूर मनपा: ३२९ (२)
वर्धा: १ (१)
भंडारा: १
गोंदिया: १
चंद्रपूर: १
चंद्रपूर मनपा: ४
गडचिरोली: ०
नागपूर मंडळ एकूण: ३३९ (३)

इतर राज्ये: ४१ (१०)
एकूण: २७ हजार ५२४ (१०१९)

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

जळगाव जिल्ह्यात आज 22 कोरोनाग्रस्तांची भर,  बाधितांची एकूण संख्या 232

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात जळगाव, भुसावळ, रावेर, फैजपूर, चोपडा, अमळनेर, भडगाव, यावल येथील स्वॅब घेतलेल्या 78 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल प्राप्त झालेत. त्यापैकी 56 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह तर बावीस व्यक्तींचे तपासणी अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत.

पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये भुसावळ येथील एक, जळगाव शहरातील दर्शन कॉलनी दोन, गेंदालाल मील एक, पवननगर भागातील एक, चोपडा येथील सात, अडावद येथील एक, भडगाव शहर चार व निंभोरा येथील एक, फैजपूर एक, यावल एक आणि अमळनेर येथील दोन अशा एकूण बावीस रुग्णांचा समावेश आहे.

जळगाव जिह्यात आजपर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 232 इतकी झाली असून त्यापैकी पस्तीस व्यक्ती कोरोनामुक्त होऊन घरी गेल्या तर अठ्ठावीस कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

जळगाव जिल्ह्यात कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नागरीकांनी घाबरुन न जाता जागरुक रहावे लॉकडाउनचे पालन करावे , शक्यतो घराबाहेर पडू नये. अत्यंत आवश्यकता असेल तर बाहेर पडताना मास्कचा वापर करावा. जीवनावश्यक वस्तुंची खरेदी करतांना सोशल डिस्टनिंगचे पालन करावे.

– अविनाश ढाकणे, जिल्ह्याधिकारी


प्रेयसीच्या लग्नाच्या अगोदर रात्री घरात घुसला प्रियकर; दुसर्‍या दिवशी एकाच बेडवर दोघांचे मृतदेह

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेशच्या झांसी जिल्ह्यातील नवाबाद पोलिस स्टेशन भागात एका युवकाने घरात घुसून आपल्या मैत्रिणीला गोळी घातली. यानंतर त्याने स्वत: लाही गोळी घातली. यात त्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे मुलीच्या घरात एकच गोंधळ उडाला. त्याचवेळी परिसरात ही बातमी पसरताच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस लगेचच घटनास्थळी पोहोचले आणि दरवाजा तोडून त्यांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले. या दोघांचे मृतदेह एकत्रच पडले होते. पोलिसांनी घटनास्थळावरून एक पिस्तूलही ताब्यात घेतली आहे. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन त्यांना पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत.

प्रेयसीच्या डोक्यात गोळी झाडली
अशोक प्रजापती हा नवाबाद पोलिस स्टेशन परिसरातील एक शेतकरी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी ते लग्नासाठी मुलीची पाठवणी करण्यासाठी मध्य प्रदेशातील शिवपुरी येथील कारैराला गेले होते. त्यांची १९ वर्षीय मुलगी रात्री बाहेरील खोलीत झोपली होती. त्याच दरम्यान, त्याच परिसरात राहणारा एक तरुण रात्री त्यांच्या घरी पोहोचला. इथे झालेल्या संभाषणादरम्यान त्याने पिस्तूलाच्या साह्याने एका युवतीच्या डोक्यात गोळी झाडून तिची हत्या केली, आणि त्यानंतर त्याने स्वत: वर गोळी झाडून आत्महत्या केली.

एकाच बेडवर रक्ताने माखलेले मृत शरीर
गुरुवारी सकाळी नातेवाईकांनी मुलीला जागे करण्यासाठी दरवाजा ठोठावला, पण त्यांना आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. यावर बाजूच्याच एका मुलाला खिडकीवर चढवले आणि त्याने आत डोकावताच रक्ताने भिजलेल्या अवस्थेत पडलेले त्यांचे मृतदेह त्याने पाहिले. घरातील सदस्यांकडून या घटनेविषयी माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि दरवाजा तोडून दोघांचेही मृतदेह ताब्यात घेतले. पलंगावर एक पिस्तूलही होती. पोलिसांनी हे पिस्तूल तसेच मृतदेहही ताब्यात घेतले.

मैत्रिणीच्या लग्नामुळे नाराज होता
हा तरुण हा झाशी महानगरपालिकेत कंत्राटी कामगार म्हणून काम करत होता, अशी माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. तो कुंभाराच्या कुवा येथे एका नातेवाईकाकडे राहत होता. या युवकाचे या मुलीशी दीर्घ काळ प्रेमसंबंध होते. या मैत्रिणीचे लग्न ठरले असल्याने तो खूपच अस्वस्थ होता. त्यामुळे मैत्रिणीला स्वतःपासून दूर जाताना पाहून त्याने असे भयावह पाऊल उचलले. त्याने झाडलेल्या गोळीच्या दुखापतीमुळे या दोघांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

 mure

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

सोलापूरात एकाच दिवशी सापडले 22 पॉझिटिव्ह, एकूण संख्या 330 वर

सोलापूर प्रतिनिधी । सोलापूर शहरात आज नव्याने 22 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून त्यामध्ये 8 पुरुष आणि 14 महिलांचा समावेश आहे. आज सापडलेल्या 22 रुग्णामुळे सोलापुरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 330 झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

आज एक महिला मयत झाली असून ही महिला 65 वर्षांची आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील सुलतानपूर येथील महिला नइ जिंदगी येथील नातेवाईकांकडे 18 मार्च रोजी आली होती. लॉक डाऊनमुळे ती महिला याच ठिकाणी नातेवाईकांकडे राहत होती. 12 मे रोजी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात या महिलेला गंभीर स्थिती दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान 12 मे रोजी सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास या महिलेचे निधन झाले असून या महिलेचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

आज नव्याने सापडलेल्या 22 रुग्णांमध्ये नीलम नगर येथील दोन महिला, रेल्वे लाईन येथील कोनापुरे चाळ मधील एक महिला, कुमठा नाका येथील एक पुरुष, नइ जिंदगी (मुळगाव सुलतानपूर जिल्हा उस्मानाबाद) येथील एक महिला, एमआयडीसी नवनाथ नगर येथील दोन पुरुष एक महिला, अशोक चौकातील तीन पुरुष व चार महिला, न्यु पाछा पेठेतील दोन पुरुष व चार महिला, लष्कर येथील एक महिला असे 22 जण आज कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

अद्यापही 232 जणांचे कोरोना चाचणी अहवाल प्रलंबित असल्याची माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली. कोरोना मुक्त झालेल्या 22 जणांना (चौदा पुरुष व आठ महिला) आज घरी सोडण्यात आले आहे. केगाव येथील क्वारंटाइन कॅम्पमधून चौदा दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यामुळे 88 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

कोरोनामुळे ही सुंदर अभिनेत्री आर्थिक संकटात; बायको प्रेग्नंट असणारा मेकअपमॅन म्हणाला..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे प्रत्येकाला अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशातच हे लॉकडाऊन आणखी वाढविण्यात येईल, अशी घोषणाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतीच केली आहे. अशा परिस्थितीत असे बरेच टीव्ही स्टार्स आहेत जे आजकाल आर्थिक संकटातून जात आहेत. शूटिंगही बंद आहेत आणि त्यामुळे कमाईही. अलीकडेच सयंतनी घोष आणि विनीत रैना या कलाकारांनी त्यांना येणाऱ्या आर्थिक अडचणींबद्दल सांगितले होते. आता छोट्या पडद्यावरील अभिनेत्री सोनल वेंगुर्लेकर हिनेही सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले की ती सध्या आर्थिक संकटात सापडली आहे.

मेकमॅनने अभिनेत्री सोनलला केली मदत
आर्थिक संकटात सापडलेल्या या अभिनेत्रीला अखेर तिच्या मेकअप मॅनने मदत केली, सोनल वेंगुर्लेकरनेही तिच्या मेकअपमॅनचे सोशल मीडियावर आभार मानले आहेत. तिच्या मेकअप मॅनचे आभार मानताना सोनलने लिहिले की, “आज मी हे माझ्या मेकअप मॅनबरोबर शेअर करत आहे की, पुढील महिन्यातल्या खर्चासाठीही माझ्याकडे जास्त पैसे नव्हते, कारण बऱ्याच निर्मात्यांनी माझे पैसे अजूनही दिलेले नाहीत. आणि ते बराच काळ रखडले आहेत.

मेकमॅनची पत्नी आहे गरोदर
सोनलने लिहिले की, मला माझ्या मेकमॅनची चिंता होती, तो या परिस्थितीला कसा समोर जाईल, त्याची पत्नी गरोदर आहे आणि त्यासाथीचा खर्चही बराच आहे. परंतु त्याच्याकडून मला आलेल्या मेसेजची मी अपेक्षा केली नव्हती. त्याचा मेसेज वाचताच माझ्या डोळ्यांत पाणी आले. मेकअपमॅन मला म्हणाला, “मॅम, माझ्याकडे आत्ता १५ हजार रुपये आहेत, तुम्हाला हवे असल्यास तुम्ही घ्या, आणि माझ्या बायकोच्या डिलिव्हरीवेळी परत द्या.”

सो कॉल्ड श्रीमंत लोकं मनानेही श्रीमंत होऊ देत
सोनलने आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिले, “मला आश्चर्य वाटले की ज्यांच्याकडे माझे लाखो रुपये अडकले आहेत ते माझा फोनही उचलण्यास तयार नाहीत, त्यांनी मला ब्लॉक केले आहे आणि माझे कष्टाने कमावलेले पैसेही ते परत करण्यास तयार नाहीत. माझा एक मेकअप मॅन पंकज गुप्ता जो नेहमी मला माझ्या कुटूंबासारखा आहे तो मला पैसे देत आहे. सर्वात मोठी गोष्ट ही नाही कि त्याने मला पैसे दिले, मोठी गोष्ट ही आहे की अजूनही त्याच्याकडे पैसे नाही आहेत, परंतु यानंतरही, त्याने माझ्याबद्दल विचार केला. हे सो कॉल्ड श्रीमंत लोकं मनानेही श्रीमंत होऊ देत. मला यासारख्या लोकांसाठी वाईट वाटते. ” सोनलने ‘शास्त्री सिस्टर्स’, ‘ये वादा रहा’ आणि ‘साथ दौंड भिडे’ अशा बर्‍याच शोमध्ये काम केले आहे.


View this post on Instagram

 

@pankajgupt09 ♥️

A post shared by Sonal Vengurlekar (@sonal_1206) on May 13, 2020 at 1:10am PDT

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

जपानमधील आणीबाणी मागे; आज पासून नवीन आयुष्याला सुरवात – पंतप्रधान शिंजो अ‍ॅबे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जपानचे पंतप्रधान शिंजो अ‍ॅबे यांनी गुरुवारी सांगितले की कोरोना विषाणूबाबत त्यांच्या देशातील बहुतांश भागात लागू करण्यात आलेली आणीबाणी मागे घेण्यात आली आहे. मात्र, राजधानी टोकियो आणि ओसाकामध्ये ही आणीबाणी कायम राहील. पंतप्रधान अ‍ॅबे यांनी म्हटले आहे की आजपासून नवीन जीवनाची सुरुवात होते आहे आणि पुढील काही दिवसात सर्वकाही सुरळीत होईल अशी अपेक्षा आहे.

आशा आहे की आता सर्व काही ठीक आहे
जपानचे पंतप्रधान अ‍ॅबे यांनी टीव्हीवरून देशाला संबोधित केले आणि या आणीबाणी बाबत घोषणा केली. ते म्हणाले, “आज आम्ही निर्णय घेतला आहे की ४७ पैकी ३९ प्रांतात लागू असलेली आणीबाणी मागे घेत आहोत.” टोकियो व्यतिरिक्त ओसाका, क्योतो आणि होक्काइडो यासह इतर सात प्रांतांमध्ये मात्र ही आणीबाणीची परिस्थिती कायम राहील. हे प्रांत सध्या जास्त जोखमीच्या ठिकाणी आहेत. ७ एप्रिल मध्ये जपानने एका महिन्यासाठी टोकियो आणि इतर सहा शहरी प्रांतांमध्ये आणीबाणी जाहीर केली. यानंतर, संपूर्ण देशभरात याचा कालावधी हा ३१ मे पर्यंत वाढविण्यात आला.

आता देशात संसर्ग होण्याचे प्रमाण कमी होऊ लागले आहे, तर देशाच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा चालना देण्यासाठी हे निर्बंध कमी करणे आवश्यक आहे असे पंतप्रधान अ‍ॅबे यांनी ठरवले आहे. त्यांना देशाची अर्थव्यवस्था आणि रोग प्रतिबंध यांच्यात संतुलन राखण्याची इच्छा आहे. मात्र, त्यांनी लोकांना असा इशाराही दिलेला आहे की संक्रमणाची प्रकरणे पुन्हा समोर येऊ शकतील, म्हणून स्वत: ला सुरक्षित ठेवा. ते येत्या आठवड्यात आरोग्य तज्ज्ञांची बैठक घेणार असून उर्वरित भागातील निर्बंध हटवायचे की त्यांना तसेच राहू द्यायचे याचा निर्णय ते घेतील असे अ‍ॅबे यांनी सांगितले. त्यांनी मे महिन्याच्या अखेरपर्यंत कोरोनाच्या साथीवर नियंत्रण मिळवण्याचे आश्वासन दिले आहे. जपानमध्ये १६००० पेक्षा जास्त संसर्गाची प्रकरणे आहेत, तर साथीच्या आजारामुळे ६८० लोकांचा मृत्यू झाला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.