Thursday, December 25, 2025
Home Blog Page 5793

अर्थमंत्री Live: निर्मला सीतारामन यांनी आज कोणत्या घोषणा केल्या? वाचा अडेट्स

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना संकटादरम्यान जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली होती. पॅकेजविषयी आज तिसऱ्या टप्प्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन घोषणा केल्या आहेत. कृषी क्षेत्राशी संबंधित ११ महत्वाच्या घोषणा आणि पायाभूत सुविधा मजबूत करण्यासंबंधी यातील ८ घोषणा आहेत. तर प्रशासकीय सुधारणांसंबंधी ३ घोषणा आहेत. अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली.

शेतकऱ्यांच्या खात्यात थेट १८७०० कोटी रुपये जमा केले
लॉकडाउनच्या काळात एमएसपी म्हणजे किमान आधारभूत किंमतीवर ७४,३०० कोटी रुपयांच्या शेती मालाची खरेदी केली. पीएम किसान फंडातंर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात थेट १८७०० कोटी रुपये जमा केले.

शेतीच्या पायाभूत सुविधांसाठी तातडीचे १ लाख कोटींचं पॅकेज
शेतीच्या पायाभूत सुविधांसाठी १ लाख कोटींचं पॅकेज देण्यात आल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी हे पॅकेज जाहीर करण्यात आली आहे. खाद्य पदार्शांशी संबंधित उद्योगांना १० हजार कोटींची मदतही जाहीर करण्यात आली आहे असंही निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलं.

वन औषधीच्या लागवडीसाठी ४ हजार कोटींची तरतूद
वन औषधीच्या लागवडीसाठी ४ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पुढच्या दोन वर्षात १० लाख हेक्टरवर वन औषधींचे उत्पादन घेतले जाईल. शेतकऱ्यांना यातून ५ हजार कोटीचे उत्पन्न मिळेल असा अंदाज आहे.

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेसाठी २० हजार कोटींची घोषणा
समुद्री आणि देशांतर्गत मासेमारीच्या विकासासाठी सरकारने प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना आणली आहे. यासाठी २० हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ५५ लाख लोकांना यातून रोजगार मिळण्याची शक्यता आहे.

 

इतर महत्त्वाच्या घोषणा

2 कोटी शेतकऱ्यांना व्याजावर सबसिडी देणार

समुद्री आणि आंतर्देशीय मत्स्य पालनासाठी ११००० कोटी , अंतगर्त सुविधेसाठी ९००० कोटी.

पुढील पाच वर्षात ७० लाख टन मत्स्य उत्पादनाचे लक्ष्य , ५५ लाख रोजगार , दुप्पट निर्यात होणार.

डेअरी इन्फ्रास्ट्रक्चरसाठी १५००० कोटी.  डेअरी कर्जाच्या व्याजावर 2 टक्के सूट

मधुमक्षिका पालनासाठी ५०० कोटींची योजना, शेतकऱ्यांना उत्पन्नाचे अतिरिक्त साधन.

शेतमालावरील वाहतुकीचे भाडे आणि शीतगृहातील खर्चावर ५० टक्के अनुदान.

अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी १० हजार कोटींची तरतूद

लॉकडाउनच्या काळात भाजीपाला पुरवठ्यासाठी ‘ऑपरेशन ग्रीन’

जीवनावश्यक वस्तू कायद्यात सुधारणा करणार

टॉप टू टोटल योजनेला ५०० कोटींची तरतूद

पाळीव प्राण्यांच्या लसीकरणासाठी 13 हजार 300 कोटीचं पॅकेज

नवीन अपडेट्ससाठी पेज रिफ्रेश करत राहा.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

विराट किंवा पृथ्वी नव्हे तर कैफ आहे सर्वोत्कृष्ट अंडर-१९ कर्णधार – प्रियम गर्ग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेट संघाने मोहम्मद कैफच्या नेतृत्वात २००० मध्ये प्रथमच अंडर -१९विश्वचषक जिंकला होता. युवराज सिंगही त्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा भाग होता. या अंडर -१९ वर्ल्ड कपनंतर वरिष्ठ भारतीय संघात युवराज आणि कैफला स्थान मिळवण्यात यश आले होते. अलीकडेच प्रियम गर्ग यांच्या नेतृत्वात टीम इंडियाने अंडर- १९ विश्वचषकाच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. प्रियामला जेव्हा विचारण्यात आले की आजवरचा अंडर १९ मधला तुझा आवडता कर्णधार कोण ? तर त्याने विराट किंवा पृथ्वी नाव न घेता मोहम्मद कैफ हा भारताचा आजवरचा सर्वोत्कृष्ट अंडर-१९ कर्णधार असल्याते सांगितले.

सध्याच्या घडीला भारताचा अंडर १९ संघाचा कर्णधार प्रियम गर्गने HELO अ‍ॅपवर लाईव्ह येत अनेक गोष्टीचा उलगडा केला . या लाईव्हमध्ये प्रियमला एक प्रश्न विचारण्यात आला होता की, अंडर १९ संघाचा सर्वोत्तम कर्णधार कोण आहे तर त्यावर त्याने भारताच्या माजी खेळाडू मोहम्मद कैफचे नाव घेतले. कैफच्या नेतृत्वाखाली भारताने २००० साली पहिल्यांदा अंडर १९ विश्वचषक आपल्या नावावर केला होता. या संघात युवराज सिंगचा ही समावेश होता. भारताने आतापर्यंत ४ वेळा अंडर १९ विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

प्रत्येक पॅकेजसाठी ‘RBI’ची दारं ठोठावू नका! नाहीतर..; ‘या’ अर्थतज्ज्ञानं दिला मोदी सरकारला गंभीर इशारा

नवी दिल्ली । प्रत्येक आर्थिक संकटावेळी जर तुम्ही रिझर्व्ह बँकेच्या दाराशी गेलात तर तुम्ही बँकेला खिळखिळी कराल. यामुळे आधीच रडतखडत सुरु असलेली गुंतवणूक आणि विकासदराची गाडी आणखी खाली घसरेल, असा इशारा वर्ल्ड बँकेचे माजी अर्थतज्ज्ञ कौशिक बसू यांनी केंद्रातील मोदी सरकारला दिला आहे. आत्मनिर्भर भारत अंतर्गत जाहीर केलेल्या २० लाख कोटींच्या पॅकेजचा जास्तीत जास्त भार केवळ सरकारने स्वतःच्या खांद्यावर घेतला पाहिजे. त्याकरिता रिझर्व्ह बँकेच्या मदतीवर अवलंबून राहू नये, असा सल्ला वर्ल्ड बँकेचे माजी अर्थतज्ज्ञ कौशिक बसू यांनी केंद्राला दिला आहे. ते ‘बेनेट युनिव्हर्सिटी’ने आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये बोलत होते.

यावेळी बोलतांना ते म्हणाले, प्रत्यक्षात अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी आणखी आर्थिक पॅकेजची गरज आहे. बुधवारी सरकारने सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी आर्थिक मदत जाहीर केली आहे. मात्र ही केवळ निम्मी मदत आहे. जी घोषणा केली आहे ही गरजेपेक्षा निम्मी आहे. यातील मोठा हिस्सा रिझर्व्ह बँकेवर अवलंबून आहे. सरकारने आता पुढे यायला हवं असे बसू यांनी सांगितले. याचबरोबर आर्थिक पॅकेजमधील छोटा हिस्सा रिझर्व्ह बँकेकडून घेण्यास हरकत नाही. ‘आरबीआय’ला अतिरिक्त चलन छपाई करून ही मदत घेता येऊ शकते. मात्र यामुळे महागाईचा भडका उडू शकतो. रिझर्व्ह बँकेने चलन बाजारात रुपयाला स्थिर करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे त्यांनी सांगितले.

आर्थिक संकटात मदतीसाठी रिझर्व्ह बँकेकडे जाणे योग्य नाही. यामुळे बँकेचा ढाचा खिळखिळा होईल, असा गंभीर इशाराही बसू यांनी यावेळी केंद्राला दिला.अद्याप सरकारने वित्तीय तूट नियंत्रणाबाबत ठोस भूमिका स्पष्ट केलेली नाही. बाजारात रोकड तरलता उपलब्ध झाली असली तरी यामुळे महागाई वाढेल, असे बसू यांनी म्हटलं आहे. सध्याच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सरकारने आता विचारपूर्वक निर्णय घेतले पाहिजेत, असे बसू यांनी सांगितले.

कोण आहेत कौशिक बसू
वर्ल्ड बँकेचे माजी अर्थतज्ज्ञ असलेले कौशिक बसू २००९ ते २०१२ या काळात केंद्र सरकारने आर्थिक सल्लागार होते. सध्या ते कॉर्नेल युनिव्हर्सिटीत अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत.

Untitled design - 2020-05-15T160959.811

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

चीन-पाकिस्तानच्या छातीत भरणार धडकी! जुलै अखेरीस ‘राफेल’ भारतात घेणार भरारी

नवी दिल्ली । भारताची सामरिक शक्ती वाढवणारं लढाऊ विमान राफेल चीन-पाकिस्तानच्या छातीत धडकी भरण्यासाठी आता भारतात दाखल होणार आहे. जुलै अखेरपासून भारतात राफेल फायटर विमाने दाखल होण्यास सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात फ्रान्सकडून ४ राफेल फायटर विमाने मिळणार आहेत. भारताने फ्रान्सबरोबर ३६ राफेल फायटर विमाने खरेदी करण्याचा करार केला आहे. राफेलच्या समावेशामुळे इंडियन एअर फोर्सची हवाई हल्ला करण्याची क्षमता कैकपटीने वाढणार आहे. तसेच भारतीय सीमेच्या हद्दीत राहून शत्रूला चोख उत्तर देण्याच्या या क्षमतेमुळे भारतासाठी राफेल हे ब्रम्हास्त्रापेक्षा कमी नसणार आहे.

दरम्यान, मे अखेरपर्यंत राफेल विमाने भारताला मिळणार होती. पण कोरोना व्हायरसच्या संकटामुळे दोन महिने उशिराने ही विमाने एअर फोर्सच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. पहिल्या चार विमानांपैकी तीन दोन आसनी ट्रेनर तर एक सिंगल सिटर फायटर विमान असेल. भारतीय हवाई दलाचे प्रमुख आर.के.एस भदौरिया यांच्या सन्मानार्थ ट्रेनर विमानांच्या शेपटीकडच्या भागावर आरबी सीरीजचा नंबर असेल. कारण भदौरिया यांनी या कराराला अंतिम स्वरुप देण्यात अत्यंत महत्वाची भूमिका बजावली आहे.

भारतात येण्यासाठी या विमानाने फ्रान्समधून उड्डाण केल्यानंतर सर्वप्रथम मिडल इस्टमध्ये हे विमान थांबेल. त्याआधी फ्रेंच एअर फोर्सकडून हवेमध्येच या विमानामध्ये इंधन भरण्यात येईल. मिडल इस्टमधून निघाल्यानंर इंडियन एअर फोर्सच्या IL-78 टँकर एअर क्राफ्टमधून हवेमध्ये इंधन भरण्यात येईल. राफेल फ्रान्सवरुन थेट भारतात येऊ शकते. पण १० तासांच्या या प्रवासात छोटया कॉकपीटमध्ये इतका वेळ बसणे वैमानिकाला त्रासदायक ठरु शकते. या विमानामुळे भारताला हवाई वर्चस्व मिळवता येणार आहे. सध्या तरी चीन आणि पाकिस्तानकडे राफेलच्या तोडीचे कुठलेही दुसरे विमान नाही आहे. म्हणूनच भारतीय आकाशात राफेल झेप घेताच येणाऱ्या काळात चीन आणि पाकिस्तानची झोप उडणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

TDS मध्ये २५ % कट; जाणुन घ्या कोणाला किती लागणार टॅक्स

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसच्या संकटामुळे सध्या संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरु आहे. यामधून लोकांना दिलासा मिळावा यासाठी केंद्र सरकारने डेव्हिडंड पेमेंट, विमा पॉलिसी, भाडे, प्रोफेशनल चार्ज तसेच स्थावर मालमत्ता खरेदीवर लावण्यात येणारा टीडीएस / टीसीएसवरील कर हा २५% ने कमी केला आहे. कमी केलेले हे दर ३१ मार्च २०२१ पर्यंत लागू राहतील. टीडीएस कमी करण्याची आणि टीसीएएस दरावर २५% कपात करण्याची घोषणा केल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी बुधवारी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) सुधारित दराला अधिसूचित केले. हे दर १४ मे २०२० ते ३१ मार्च २०२१ या कालावधीसाठी लागू होतील. सीतारामण यांनी कंपन्या आणि करदात्यांना या देशव्यापी लॉकडाऊनमुळे झालेल्या परिणामातून दिलासा देताना सांगितले की टीडीएस / टीसीएस कमी केल्यास लोकांची सुमारे ५०,००० कोटी रुपयांची बचत होईल.

वित्त मंत्री अजय भूषण पांडे यांनी पगारदार लोकांना टीडीएसच्या दरातील कपातीचा लाभ न देण्याविषयी कारण विचारले असता ते म्हणाले की ‘पगारदार व्यक्तीसाठी ८० C सारख्या विविध कपातीचा विचार करूनच पगारातून टीडीएस वजा केला जातो. ते म्हणाले की हे असे केले गेले कारण हे नसते केले तर पगारदार व्यक्तीला वर्षाच्या अखेरीस अधिक दराने कर भरावा लागला असता. म्हणूनच पगारदार लोकांसाठी टीडीएसचे दर कमी केलेले नाहीत.

२३ प्रकरणांसाठी टीडीएस दर कमी केले
ते पुढे म्हणाले की बँकांकडून एक कोटी रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम काढण्यासाठी १% टीडीएस वजा केला जाईल आणि टीडीएस दरात कपात करण्याचा फायदा अशा व्यवहारांवर उपलब्ध होणार नाही. त्याचप्रमाणे परकीय पतपुरवठ्यासाठीही टीडीएसच्या दरात कपात केली गेली नाही. पत्रकारांशी बोलताना पांडे पुढे म्हणाले की, सरकारकडून २३ प्रकरणांसाठी टीडीएस तसेच इतर ७ प्रकरणांमध्ये टीसीएसचे दर कमी करण्यात आले आहेत. ते म्हणाले की सिक्युरिटीजवरील व्याज, बँक खात्यावर व्याज, डेव्हिडंड पेमेंट यांमध्ये १०% टीडीएस वजा केली जात असे. आता हा दर ७.५% करण्यात आला आहे.

टीडीएस किती वजा केला जाईल
ते म्हणाले, कंपन्यांकडे रोख रक्कमेची उपलब्धता सुनिश्चित करण्याकरिता हे केले गेले आहे. सीबीडीटीने दिलेल्या एका अधिसूचनेत असे म्हटले आहे की दहा लाखाहून अधिक वाहनांच्या विक्रीवर असलेला टीसीएस हा एक टक्क्याने घटून ०.७५% करण्यात आला आहे. सीबीडीटीच्या म्हणण्यानुसार जीवन विमा पॉलिसीच्या देयकावरील टीडीएस हा ५ टक्क्यांऐवजी ३.७५% इतका असेल, तर डिव्हिडंड तसेच व्याजासह रिअल इस्टेटच्या भाड्यावर जे आधी १०% होते, ते आता ७.५% असतील. पूर्वीच्या एका टक्क्याच्या तुलनेत स्थावर मालमत्तेच्या खरेदीवर टीडीएस आता ०.७५ असेल. त्याचप्रमाणे वैयक्तिक किंवा हिंदू अविभाजित कुटुंबाकडून भाडे देय टीडीएस ५ टक्क्यांऐवजी ३.७५% एवढे असेल.

ई-कॉमर्स सहभागींच्या बाबतीत टीडीएस हा एका टक्क्यावरून ०.७५% करण्यात आला आहे आणि प्रोफेशनल चार्ज म्हणून टीडीएस २ टक्क्यांवरून १.५ % करण्यात आला आहे. राष्ट्रीय बचत योजनेंतर्गत देय रकमेवर टीडीएस आता ७.५ % असेल, जो आतापर्यंत १० टक्के होता. तेथेच म्युच्युअल फंडाद्वारे युनिट्सच्या पुनर्खरेदीवर आता टीडीएसला १५% रक्कम द्यावी लागेल, जी आधी २०% होती. त्याचप्रमाणे विमा आयोग आणि ब्रोकरेजवरील टीसीएस हा ५ टक्क्यांवरून ३.७५ टक्के करण्यात आला आहे.

त्याशिवाय तेंदूची पाने, भंगार, इमारतीचे लाकूड आणि कोळसा, लिग्नाइट किंवा लोह खनिजांच्या विक्रीवरही टीसीएस कपात केली गेली आहे, सीबीडीटीने असे स्पष्टीकरण दिले की, ज्यामध्ये पॅन / आधार दिले जात नाही अशा प्रकरणांमध्ये टीसीएस किंवा टीसीएसमध्ये कोणतीही कपात केली जाणार नाही तसेच जास्त दराने कर वजा केला किंवा गोळा केला जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

ट्रम्प यांच्या ‘त्या’ आरोपामुळे भर बैठकीतच दिला जागतिक व्यापार संघटनेच्या प्रमुखांनी राजीनामा

वृत्तसंस्था । जगभर पसरलेल्या कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सातत्यानं चीन, जागतिक आरोग्य संघटना यांच्यावर आरोप करत आहे. ट्रम्प यांनी जागतिक व्यापार संघटनेलाही या वादात ओढलं असून, संघटनेचे महासंचालक रॉबर्टो अझेवेडो यांनी व्हिडीओ कान्फरसिंगद्वारे सुरू असलेल्या बैठकीत अचानक आपला राजीनामा दिला.

वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, जागतिक व्यापार संघटेनेच्या विभागाप्रमुखांच्या शिष्टमंडळाची गुरूवारी दुपारी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत प्रशासकीय मुद्यांवर जोर देण्यात आला. या बैठकीत चर्चा सुरू असताना अचानक महासंचालक रॉबर्टो अझेवेडो यांनी आपला राजीनामा सादर केला. डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक व्यापार संघटना कोरोना काळात चीनला व्यापारासाठी जाणीवपूर्वक मदत करत असल्याचा आरोप करत लक्ष्य केलं आहे. “चीनला अप्रामाणिकपणे व्यापार करण्यास परवानगी दिली जात आहे,” असा आरोप ट्रम्प यांनी संघटनेवर केला. ट्रम्प यांनी केला होता. ट्रम्प यांनी केलेल्या शाब्दिक हल्ल्यामुळेच अझेवेडो यांनी राजीनामा दिला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दरम्यानं, अझेवेडो हे संघटनेच्या जिनिव्हा येथील मंडळाचे महासंचालक आहेत. ते २०१३ पासून या पदावर कार्यरत होते. ते दुसऱ्यांदा पदावर काम करत होते. त्यांचा कार्यकाळ सप्टेंबर महिन्यात पूर्ण होणार होता. अझेवेडो यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या जागी नव्या नावाची कोणतीही चर्चा सुरू झालेली नाही. संघटनेनं या विषयावर कोणतीही वाच्यता केलेली नाही. अमेरिकेत करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला चीन जबाबदार असल्याचा आरोप डोनाल्ड ट्रम्प सातत्यानं करत आहे. यावरून त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेवरही गंभीर आरोप केले होते. त्याचबरोबर आरोग्य संघटनेचा निधी रोखण्याचा निर्णयही त्यांनी घेतला होता. काही दिवसांपूर्वीच झालेल्या एका पत्रकार परिषदेत ट्रम्प पत्रकारावर संतापले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

पंतप्रधान मोदी आणि बिल गेट्स यांच्यात ‘कोरोना पे चर्चा’

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी जगप्रसिद्ध मायक्रोसॉफ्ट कंपनीचे मालक आणि सह-संस्थापक बिल गेट्स यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. या दरम्यान पंतप्रधान मोदींनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. पंतप्रधान मोदी आणि बिल गेट्स यांनी कोरोना साथीच्या जागतिक परिणाम या विषयावर पंतप्रधान मोदी आणि बिल गेट्स या दोघांमध्ये सुमारे अर्धा तास देवाणघेवाण केली. वैज्ञानिक इनोव्हेशन आणि संशोधन याचा कोरोना या साथीच्या आजाराशी लढा देण्याच्या दृष्टीने कसा उपयोग करता येईल याबाबतही उभयतांमध्ये चर्चा झाली. तसेच कोरोनाच्या संकटामुळे उत्पन्न झालेले सामाजिक आणि आर्थिक परिणाम कमी करण्यात आणि सर्वांसाठी लसी, चाचणी आणि उपचार उपलब्ध करण्यात भारताची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचं बिल गेट्स यांनी यावेळी म्हटलं.

पंतप्रधान मोदी यांनी चर्चेदरम्यान बिल अण्ड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनच्या केवळ भारतातीलच नव्हे, तर जगभरातील आरोग्यविषयक कामांची प्रशंसा केली. स्वच्छ भारत अभियानाद्वारे स्वच्छतेबाबत पहिल्यापासूनच जागरूक केलं जात होतं. करोना व्हायरसच्या लढाईत ते महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. करोनाविरोधातील लढाईत गेट्स फाऊंडेशन भारतासोबतच जगभरातील निरनिराळ्या भागांमध्ये मदत पोहोचवत आहे, हे खऱ्या अर्थानं उल्लेखनीय आहे, असंही मोदी म्हणाले. जगाच्या हितासाठी भारताच्या क्षमतांचा अधिकाधिक उपयोग कसा करता येईल या संदर्भात त्यांनी बिल गेट्सकडे सूचना मागविल्या.

तसंच यावेळी मोदी यांनी कोरोनाविरोधात भारतानं केलेल्या उपाययोजनांचीही त्यांना माहिती दिली. “भारत आपल्या सर्व नागरिकांच्या मदतीनं कोरोनाविरोधातील ही लढाई कठोरपणे लढत आहे. कोरोनाशी निगडित सर्व माहिती आम्ही सर्वांपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी झालो आहोत. याचा लाभ जगभरातील अन्य देशही घेऊ शकतात. अशा कठीण परिस्थितीत कोणतेही पूर्वग्रह न ठेवता सर्वांनी एकत्र आलं पाहिजे,” असं मोदी म्हणाले. या साथीच्या काळात भारतातील आरोग्य सेवा कशा मजबूत केल्या जात आहेत हे मोदींनी स्पष्ट केले.

याशिवाय लोकांची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेद औषधे देखील वापरली जात असल्याची माहिती त्यांनी दिली. भारतात स्वच्छतेवर जोर देण्यात येत आहे. या सर्व गोष्टींमुळे भारताला कोरोना साथीविरोधात लढा देण्यास बळ मिळाल्याचे त्यांनी सांगितले. भारतातील लोक सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत आहेत. यासह, लोकांना लॉकडाउन नियमांसह लोक चेहऱ्यावर मास्क घालत असल्याचे मोदी यांनी चर्चेत सांगितले. यामुळे कोरोना संसर्ग रोखण्यात थोडेसे यश मिळाले आहे, असे मोदी म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

धक्कादायक! पित्यासह सावत्र आईच्या मारहाणीत मुलीचा मृत्यू

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

बापानेच स्वतःच्या पोटच्या मुलीचा छळ करून, दुसऱ्या पत्नीच्या साथीने अमानुष मारहाण केल्याने मुलीचा मृत्यु झाल्याची दुःखद घटना वाळवा येथे घडली. सुहाना ख्वाजासाहेब मोमीन असे त्या अभागी मुलीचे नाव असुन, सावत्र आई आसमा ख्वाजासाहेब मोमीन हिच्या साथीने ख्वाजासाहेब इस्माईल मोमीन याने त्या मुलीला क्रूर निर्दयीपणे मारहाण केल्यानेच त्या मुलीचा मृत्यु झाल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. सावत्र आई व बापाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आरोपी ख्वाजासाहेब इस्माईल मोमीन याच्या पहील्या पत्नीची सुहाना ही मुलगी आहे. दोन वर्षापुर्वी सुहानाच्या आईचा मृत्यु झाला, त्यानंतर ख्वाजासाहेब याने आसमाशी विवाह केला व तेव्हापासुन सावत्रपणाची वागणुक देत सुहानाचा छळ पती पत्नींनी सुरू केला होता, घरातील सर्व घरकामे सुहानाकडुन करून घेतली जायची, सुहाना निमुटपणे कामे करीत असे पण तरीही तिला शिवीगाळ करीत अमानुष मारहाण केली जायची, तिची शाळा सुद्धा बापाने बंद केली. लग्नानंतर काही दिवसातच पलुस येथे मदरशामध्ये बापाने तिला पाठवले, दुसरी पत्नी आसमा हिला सात – आठ महीन्यापुर्वी मुलगा झाला, त्यामुळे सुहानाला घरकामसाठी परत वाळवा येथे आणले, सुहाना गावात भंगार गोळा करून बापाला चार पैसे मिळवुन देत असे, घरात धुणी भांडी, पाणी भरणे अशी सर्वच कामे ती करायची.

काल बुधवारच्या रात्री पती पत्नी यांनी लाथाबुक्कयांनी तिला बेदम मारहाण केली, शेजारच्या लोकांनी हस्तक्षेप केला असता माझी मुलगी आहे. मी काहीपण करीन, तुम्हाला काय करायचे ? असा दम त्याने भरला. गुरुवारी सकाळी तो द्राक्षबागेत मजुरीच्या कामावर निघुन गेला, आसमाने अजुन सुहाना का उठली नाही व प्रतिसाद देत नाही म्हटल्यावर पतीला फोन केला, तो आल्यानंतर सुहाना मृत झाल्याचे स्पष्ट झाले, परिसरातील लोक गोळा झाले, स्थानिक नागरीक व शेजारच्या लोकांनी ख्वाजासाबला चांगलाच चोप दिला व पोलीसांना कळवण्यात आले.

आष्टा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक भानुदास निंभोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर ढोरे सहकाऱ्यांसह घटनास्थळी तातडीने दाखल झाले, पोलीस पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह आष्टा उपजिल्हारुग्णालय येथे नेला. आरोपी पती, पत्नीलाही पोलीसांनी अटक केली आहे. अधिक तपास सपोनि विरूपाक्ष कुंभार करीत आहेत. शवविच्छेदनानंतर मृतदेह गावकरी व नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. शोकाकुल वातावरणात वाळवा माळ भाग येथे तिच्यावर अंत्यसंस्कार करणेत आले, सदर घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असुन, परिसरातील लोक संताप व्यक्त करीत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

पावसाची प्रतीक्षा लांबू शकते; केरळात मान्सून उशिराने दाखल होणार

नवी दिल्ली । यंदा मान्सूनचं आगमन लांबणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. पावसाच्या आगमनाच्या आणि परतीच्या सुधारित तारखांचा अहवाल आज प्रसिध्द करण्यात आला आहे. त्यात केरळात पाऊस ४-५ दिवस उशिराने दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. केरळवर यावर्षी नैऋत्य मॉन्सूनची सुरुवात ४ दिवस उशिरा होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) शुक्रवारी व्यक्त केली. मान्सूनच्या सुरुवातीच्या तारखेनंतर ४ दिवसांनी जूनपर्यंत दक्षिणेकडील राज्यात प्रवेश करण्याची जास्त शक्यता आहे.

यावर्षी केरळवर नैऋत्य मॉन्सूनची सुरुवात सुरू होण्याच्या सामान्य तारखेच्या तुलनेत थोडा उशीर होण्याची शक्यता आहे. केरळमध्ये यावर्षी मान्सूनची सुरुवात जून रोजी सर्वसाधारण होण्याची शक्यता असते, असे आयएमडीकडून सांगण्यात आले. दरम्यान, केरळात मान्सून ४ दिवसांनी उशिराने दाखल होईल, असा अंदाज आहे. केरळमध्ये मान्सून सुरु झाल्याने देशात ४ महिन्यांच्या पावसाळ्याची अधिकृत सुरुवात होते. बंगालच्या उपसागरात वादळाच्या चक्रीय स्थितीवर मॉन्सून स्थिती असते. साधारण १६ मेपर्यंत आधी मान्सून अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहात पोहोचण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने (आयएमडी) बुधवारी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

सांगलीत बाहेरहून आलेल्यांची संख्या पोहोचली १३ हजारांवर

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून देशभर लॉकडाऊन जारी आहे. लॉकडाऊनमुळे सांगली जिल्ह्यातील अनेक व्यक्ती राज्याबाहेर व राज्यातील अन्य जिल्ह्यात अडकून पडल्या आहेत. तसेच सांगली जिल्ह्यातही अन्य जिल्ह्यातील व राज्याबाहेरील व्यक्ती अडकून पडल्या आहेत. या व्यक्तींना त्यांच्या स्वगृही जाता यावे यासाठी शासनाच्यावतीने अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत.

त्यानूसार दिनांक १३ मे पर्यंत सांगली जिल्ह्यातून राज्याबाहेर व अन्य जिल्ह्यात ३९ हजार ३४३ व्यक्ती जिल्ह्याबाहेर गेले असून सांगली जिल्ह्यात राज्याबाहेरून व राज्यातील अन्य जिल्ह्यातून १२ हजार ७९६ व्यक्ती जिल्ह्यात आले आहेत. अशा येणाऱ्या व जाणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या ५२ हजार १३९ इतकी आहे. अशी माहिती अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांनी दिली आहे.

यामध्ये सांगली जिल्ह्यातून राज्याबाहेर जाणाऱ्या १७ हजार ९६८ व्यक्ती आहेत तर राज्यातील अन्य जिल्ह्यात जाणाऱ्या २१ हजार ३७५ व्यक्तींचा आहेत. सांगली जिल्ह्यात राज्याबाहेरून आलेल्या ४ हजार ४५९ तर राज्यातील अन्य जिल्ह्यातून आलेल्या ८ हजार ३३७ व्यक्तींचा समावेश आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”