Thursday, December 25, 2025
Home Blog Page 5796

मामा सोबत संबंध बनवणार्‍या पत्नीला पतीने पाहिलं; नंतर शेतात नेऊन केली हत्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मध्य प्रदेशमधील विदिशा जिल्ह्यात असलेल्या बामौरिशला पोलिस स्टेशन परिसरातील रिनिया गावच्या राजू अहिरवार याच्या मृत्यूबाबत खळबळजनक खुलासा झाला आहे. हा खून उघडकीस आणत पोलिसांनी सांगितले की आरोपी पत्नी आणि मृताचा मामा यांना अटक करण्यात आली आहे. या दोघांमध्ये अनैतिक संबंध होते, ज्यामुळे ही हत्येची घटना घडली आहे.

पोलिसांनी दोघांनाही केली अटक
आरोपी मामाने प्रथम आपल्या भाच्याला खूप दारू पाजली आणि त्यानंतर दोघांच्यात झालेल्या भांडनामध्ये झाले आणि राजूची पत्नी यांनी राजूचा गळा आवळून खून केला. ग्रामस्थांच्या माध्यमातून या दोन्ही आरोपींमधील अवैध संबंध उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. यानंतर दोघांनाही न्यायालयात हजर केले असता तुरूंगात पाठविण्यात आले.

मृत व्यक्तीचा मामा आणि पत्नी यांच्यात होते अनैतिक संबंध
राजेश अहिरवार यांचा मृतदेह ९ मे रोजी रात्री शेतात सापडला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन या प्रकरणाचा तपास सुरू केला. यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांना ग्रामस्थांकडून समजले की प्रत्यक्षात मृत राजूची पत्नी सविता आणि त्याचा मामा श्रीकांत यांच्यात अनैतिक संबंध होते.

मामा आणि पत्नीचे शारीरिक संबंध असल्याचे पाहिले
त्या आधारे पोलिसांनी मृताची पत्नी सविता आणि मामा श्रीकांत यांना पकडले आणि त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी सांगितले की, या युवकाने पत्नीला त्याच्या मामाबरोबर आक्षेपार्ह स्थितीत पाहिले होते. या घटनेच्याच दिवशी त्याच्या मामाने त्याला शेतावर नेऊन दारू पाजली .

दोघांनीही मिळून मारले
यावेळी राजूची पत्नी तिथे पोहोचली तेव्हा राजूने तिला पाहताच तिला शिवीगाळ करण्यास सुरवात केली. श्रीकांतने राजूला रोखण्याचा प्रयत्न केला पण त्याने काहीच ऐकले नाही. यानंतर श्रीकांत आणि सविता यांनी मिळून राजूला शिवीगाळ केली आणि त्याचा गळा दाबून खून केला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

श्रमिकांच्या घरवापसीसाठी पुणे विभागातून उद्या एकाच दिवशी ७ ट्रेन रवाना होणार

पुणे । लॉकडाऊनमुळे विविध राज्यांमधून मजुरांनी आपापल्या गावची वाट धरली असून पुण्यातून उद्या एकाच दिवशी सात श्रमिक विशेष गाड्या रवाना होणार आहेत. जिल्हा प्रशासनाने या गाड्यांपर्यंत मजुरांना आणण्याची चोख व्यवस्था केली आहे. लॉकडाऊनमुळे पुणे विभागातील ५ जिल्ह्यांमध्ये अडकलेल्या ३५ हजार १६३ श्रमिकांना २८ रेल्वे गाड्यांतून आपापल्या मूळ गावी पाठविण्यात आले आहे. शुक्रवारी (दि. १५) आणखी ७ रेल्वे गाड्या सोडण्यात येणार असून, त्यामधून ९ हजार ३६८ श्रमिकांची पाठवणी केली जाणार असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज सांगितले. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतलेल्या पत्रकार परिषदेत डॉ.म्हैसेकर यांनी ही माहिती दिली.यावेळी बैठकीत महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, पोलिस आयुक्त के. व्यंकटेशन उपस्थित होते.

श्रमिकांना मूळ गावी पाठविण्यासाठी रेल्वे आणि बसेसची व्यवस्था करण्यात येत आहे. आतापर्यंत पाठविण्यात आलेल्या २८ रेल्वे गाड्यांमध्ये पुण्यातून १३, सातारा येथून ४, सांगलीतून ३, कोल्हापूरमधून ६ आणि सोलापूर येथून २ गाड्या गेल्या असल्याचे म्हैसेकर यांनी सांगितलं. तर येत्या शनिवारी सुद्धा ७ श्रमिक विशेष रेल्वे गाड्यांची व्यवस्था केली जाणार आहे. पुण्यातून ४ आणि कोल्हापूर येथून ३ रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्यामधून सुमारे ९ हजार ३६८ श्रमिक मूळ गावी जाणार आहेत अशी माहिती म्हैसेकर यांनी दिली.

श्रमिकांना रेल्वेशिवाय बसेसनेही गावी पाठविण्यात येत आहे. जवळच्या राज्यांतील श्रमिकांसाठी बसेसची व्यवस्था करण्यात येत आहे. आतापर्यंत १ हजार ४३ बसेसमार्फत १७ हजार २९० श्रमिकांना पाठविण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे राज्याबाहेर किंवा अन्य जिल्ह्यांमध्ये अडकलेले श्रमिक हे मूळ गावी येत आहेत. आजवर १७० बसेसमधून प्रामुख्याने पुणे, सातारा आणि सांगलीमध्ये तीन हजर ४३९ श्रमिक आले आहेत असंही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

अबब! जगभरात ४४ लाखांहून अधिक जण कोरोना बाधित; भारत १२ व्या क्रमांकावर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभर कोरोनाचा हाहाकार सुरूच आहे. आता जगभरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ४४ लाखांच्या पुढे गेली असून यामुळे सर्वच देशांची चिंता वाढली आहे. सद्यस्थितीत जगातील एकूण २१२ देशांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पसरला आहे. तसेच आत्तापर्यंत एकूण २ लाख ९७ हजार जणांचा कोरोनामुळे जगात मृत्यू झाला आहे.

मागील २४ तासात ८८ हजार २०२ नवीन कोरोना रुग्ण सापडले असून दिवसेंदिवस कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. आज दिवसभरात जगात एकूण ५३१४ लोकांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत मृत्यूंची संख्या जगभरात 2 लाख 97 हजार 765 वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात 16 लाख 57 हजार 716 रुग्ण बरे झाले आहेत. जगातील 72 टक्के कोरोनाबाधित हे केवळ दहा देशांमध्ये आहेत. या दहा देशांमध्येच 32 लाखांजवळ कोरोना रुग्ण आहेत.

वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात बाराव्या स्थानावर आहे. भारतात आत्ता कोविडचे 78,055 रुग्ण आहेत. तर भारतात कोरोनामुळं 2551 बळी गेले आहेत.

कोणत्या देशात किती रुग्ण आहेत याची सविस्तर यादी खाली दिलेली आहे

अमेरिका: कोरोनाबाधित – 1,430,348, मृत्यू- 85,197
स्पेन: कोरोनाबाधित – 271,095, मृत्यू- 27,104
रशिया: कोरोनाबाधित – 242,271, मृत्यू- 2,212
यूके: कोरोनाबाधित – 229,705, मृत्यू- 33,186
इटली: कोरोनाबाधित – 222,104, मृत्यू- 31,106
ब्राझिल: कोरोनाबाधित – 189,157, मृत्यू- 13,158
फ्रांस: कोरोनाबाधित – 178,060, मृत्यू- 27,074
जर्मनी: कोरोनाबाधित – 174,098, मृत्यू- 7,861
टर्की: कोरोनाबाधित – 143,114, मृत्यू- 3,952
इरान: कोरोनाबाधित – 112,725, मृत्यू- 6,783
चीन: कोरोनाबाधित – 82,926, मृत्यू- 4,633

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

स्वत: बनवलेल्या हातगाडीवर गर्भवती पत्नीला बसवून मजूराने पार केले ८०० कि.मी. अंतर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाऊनमध्ये सगळीकडेचे काम सध्या थांबले आहे, त्यामुळे इतर राज्यात अडकलेल्या मजुरांचे स्थलांतर सुरू झाले आहे. या दरम्यान, मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातून एक परप्रांतीय मजूराचा घरी परत येण्याचा एक हृदयद्रावक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओच या कामगारांच्या असहायतेची संम्पूर्ण गोष्ट सांगत आहे. वास्तविक, या व्हिडिओमध्ये एक वडील, एक गर्भवती महिला आणि एक दोन वर्षांची मुलगी हे दिसून येतात . हे सर्वजण हैदराबादमध्ये रोजंदारीवर काम करत होते. परंतु लॉकडाऊनमुळे ठेकेदाराची साईट बंद झाली आणि हे कामगार उघडे पडले.

१७ दिवसात ८०० किमी पायी चालत गावात पोहोचले
या कामगाराने सरकार आणि अनेक लोकांकडे मदतीसाठी विनवणी केली पण कोणीही त्याला मदत केली नाही. त्यानंतर त्याने हैदराबादहून आपला मूळ जिल्हा असलेल्या बालाघाटच्या कुंडे मोहगाव येथे परत जाण्याचा निर्णय घेतला आणि तो आपल्या गर्भवती पत्नीसह मुलगीसह पायीच जाऊ लागला. परंतु गर्भवती पत्नीला ८०० किमी पायी प्रवास करणे सोपे नव्हते. १०-१५ किलोमीटर अंतर चालल्यानंतर, त्याने बांबू आणि लाकडाचे तुकडे निवडून एक हातगाडी बनविली. त्या हातगाडीवर त्याने आपली पत्नी धनवंतबाई आणि २ वर्षाची मुलगी अनुरागिनी यांना बसवले आणि प्रवासासाठी पुढे निघाले. अशाप्रकारे, या मजूर कुटुंबाने बालाघाटकडचा सुमारे ८०० किमी हा प्रवास १७ दिवसात पूर्ण केला.

पोलिस कर्मचाऱ्याने त्यांना पाहिले तेव्हा त्यालाही दुःख झाले
रामू असे नाव असलेला हा मजूर आपल्या पत्नीसह जेव्हा राजेगाव हद्दीत पोहोचला तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्याला पाहिले आणि त्यांचा हा प्रवास पाहून तेही हादरून गेले. लांजीचे एसडीओपी नितेश भार्गव यांनी सांगितले की बालाघाटच्या सीमेवर आम्हाला एक मजूर आढळला जो आपली पत्नी धनवंतीसह हैदराबादहून पायी जात होता. त्यांच्याबरोबर त्यांची दोन वर्षाची मुलगीही होती जिला हातगाडीच्यासाहाय्याने ओढूत या ठिकाणी आणले होते. आम्ही आधी या मुलीला बिस्किटे दिली आणि नंतर तिला चप्पल आणली. त्यानंतर एका खासगी वाहनात बसवून त्यांना त्यांच्या गावी पाठविले.

एका दिवसात २०० हून अधिक मजूर लांजी येथून परत आले
मंगळवारी रात्री आंध्र प्रदेशातील करीमनगरहून लांजी परिसरातील राजेगाव सीमेवरुन दीडशेहून अधिक कामगार परत आले. दिवसभरात ४०० हून अधिक मजूर वेगवेगळ्या हद्दीतून घरी परतले. पोलिसांनी या मजुरांना पूर्वी सीमेवरील केंद्रात आरोग्य तपासणीसाठी पाठवले होते. नंतर लांजीच्या एसडीओपी भार्गव यांनी सीमा ओलांडून पहिल्या महामार्गावर पोहोचून कामगारांच्या भोजन आणि घरी पाठवण्याची व्यवस्था केली. त्यांच्या आरोग्य तपासणीनंतर त्या सर्वाना घरी पाठविण्यात आले.

पायातील फोड बरे होण्यासाठी पोलिस मलम तसेच पेन किलर्सचे वाटपही केले जात आहे
सामान्यपणे कठोर वागणारे पोलिस या प्रवासी मजुरांसाठी चप्पल, मलम आणि पेन किलर जेल यांचे वाटप करतानाही दिसून येत आहेत. लांजीचे एसडीओपी राजेगाव चेकपोस्टमध्ये मुलांसाठी बिस्किटे आणि मजुरांसाठी मलमचे वाटप करताना दिसले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

UGC NET 2020 परीक्षेच्या तारखांबाबत केंद्रीय मंत्री म्हणाले..

नवी दिल्ली । कोरोनाचा प्रादुर्भाव तसेच लॉकडाऊनमुळे स्थगित करण्यात आलेली UGC NET 2020 परीक्षा कधी होणार हा प्रश्न अनेकांना सतावत आहे. या परीक्षेला लाखो उमेदवारांनी अर्ज केला आहे. मात्र, सध्या केंद्र सरकार या परीक्षेबाबत नेमका निर्णय काय घेते याकडे सर्व परीक्षार्थी डोळे लावून बसले आहेत. दरम्यान, केंद्रीय मनुष्यबळ मंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनी याबाबत आज एक महत्वाची माहिती दिली आहे.

डॉ. पोखरियाल यांनी आज गुरुवारी १४ मे रोजी देशभरातील शिक्षकांशी एका वेबिनारद्वारे संवाद साधला. त्यात त्यांनी यूजीसी नेट परीक्षेसंदर्भात चर्चा केली. या वेबिनारमध्ये देशातील विविध भागातून शाळा-महाविद्यालयांच्या शिक्षकांनी मंत्रीमहोदयांना अनेक प्रश्न विचारले. त्यापैकी काही जणांनी यूजीसी नेट परीक्षेची तारीख कधी जाहीर होणार याबाबत त्यांना प्रश्न केला.

यावर केंद्रीय मंत्र्यांनी उत्तरादाखल सांगितले की, ‘पुढील काही दिवसांतच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अधिकाऱ्यांची मी बैठक घेणार आहे. या बैठकीत यूजीसी नेट परीक्षेच्या तारखेबाबत निर्णय घेण्यात येईल.’ लवकरच या परीक्षेच्या तारखेचीही घोषणा केली जाईल असं त्यांनी सांगितलं. यूजीसी नेट २०२० साठी अर्ज करण्याची प्रक्रिया अजूनही सुरू आहे. अर्ज करण्याची अखेरची तारीख १६ मे २०२० आहे. ही परीक्षा नॅशनल टेस्ट एजन्सीद्वारे आयोजित केली जाते. विद्यापीठ तसेच महाविद्यालयांमधील असिस्टंट प्रोफेसर किंवा रिसर्च फेलोशीपसाठी या परीक्षेतील यशामुळे संधी मिळते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

दुर्दैवी! मुंबईत आणखी एका पोलिसाचा कोरोनाने घेतला बळी

मुंबई । मुंबईत दिवसागणिक कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच मुंबई पोलीस दलातील आणखी एका कर्मचाऱ्याचा करोनाच्या संसर्गामुळं मृत्यू झाला आहे. मुंबईतील शिवाजी नगर पोलीस ठाण्यातील ४५ वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याचा करोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आतापर्यंत मुंबई पोलीस दलातील ६ पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. तर राज्यातील मृत्यू झालेल्या पोलिसांची संख्या एकूण ९ झाली आहे.

दोनच दिवसांपूर्वी मुंबईतील शिवडी पोलीस ठाण्यातील एका पोलीस अधिकाऱ्याचा कोरोनाने मृत्यू झाला होता. त्यांनतर आता पुन्हा एका पोलिसाचा मृत्यू आहे. लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई पोलीस दल आणि राज्यातील पोलीस अहोरात्र मेहनत घेत आहेत. अशा वेळी कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळं पोलिसांच्या जीवाला दिवसेंदिवस धोका वाढत आहे.

दरम्यान, खबरदारी म्हणून गेल्या महिन्यापासून मुंबई पोलीस दलातील ५५ वर्षांवरील पोलिसांना रजेवर पाठवण्यात आले आहे. शिवाय ज्या पोलिसांना आजार आहेत, त्यांनाही रजा घेण्यास सांगितले आहे .राज्यातील कोरोनाबाधितांमध्ये १००हून अधिक पोलीस अधिकारी आणि ९०० हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर राज्यातील मृत्यू झालेल्या पोलिसांची संख्या एकूण ९ झाली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

‘वन नेशन वन रेशन कार्ड’ नेमकी काय आहे ‘ही’ मोदी सरकारची योजना

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना संकटादरम्यान जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली होती. ‘स्वावलंबी भारत’ पॅकेजविषयी आज दुसऱ्या टप्प्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ योजनेची घोषणा केली. यानुसार देशभरात कुठल्याही मान्यताप्राप्त शिधावाटप दुकानातून वन नेशन वन रेशनकार्ड योजनेमुळे रेशन मिळणे शक्य होणार आहे. याचा लाभ विशेषतः आपल्या मूळ गावापासून इतर ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना याचा लाभ होणार आहे.

‘वन नेशन वन रेशन कार्ड’ योजनेअंतर्गत प्रत्येक रेशन कार्ड धारकाला कुठल्याही राज्यातील सरकारमान्य रेशन दुकानावरून आपल्या रेशन कार्डवर रेशन घेता येईल. यासाठी आधार कार्डवर गरजेचं आहे. विशेष करून रोजगारासाठी इतर राज्यांमध्ये जणाऱ्या मजुरांना या योजनेचा अधिक फायदा होईल. ही योजना मार्च २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचा सरकारचा संकल्प आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली.

यापूर्वी रेशनकार्ड असूनदेखील अनेकांना रेशन मिळत नव्हते. त्याबाबत राष्ट्रीय स्तरावर एकच रेशनकार्ड असावं अशी योजना केंद्र सरकारने तयार केली होती. त्याला आज सरकारने चालना दिली आहे. यानुसार आपल्या रेशन कार्डवरून सरकारने निश्चित केलेल्या दरानुसार रेशन घेता येईल. मार्च २०२१ पर्यंत आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ही योजना पूर्ण केली जाणार आहे. (इंट्रा-स्टेट पोर्टेबिलिटी ) ही यंत्रणा २० राज्यांमध्ये लागू केली जाईल. या यंत्रणेनुसार इतर राज्यांतील दुकानांवर कामगारांना रेशन घेता येईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

बच्चू कडूंचे स्टिंग ऑपरेशन; वेषांतर करून कंटेनमेंट झोनमध्ये शिरण्याचा केला प्रयत्न मात्र…

अकोला । राज्यात कोरोना विषाणूने चांगलेच थैमान घातले आहे. पंतप्रधान मोदी यांनीही १७ मे नंतर लॉकडाऊन वाढवण्यात येणार असल्याचे सूचित केले आहे. राज्य सरकार देखील लॉकडाऊन १७ मे नंतर वाढवण्याच्या विचारात आहे. पोलीस प्रशासन कोरोनाच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहे. यापार्श्वभूमीवर राज्यमंत्री आणि अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी पोलिसांचेच स्टिंग ऑपरेशन केले आहे.

बच्चू कडू यांनी बैदपुरा भागातील कंटेनमेंट झोनमध्ये वेषांतर करून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. फाटे चौक येथे बच्चू कडू यांनी आपला चेहरा पोलिसांना दिसू नये यासाठी कापड गुंडाळलं होतं. दुचाकीवर मागच्या सीटवर ते बसले होते. पोलिसांनी ओळखू नये यासाठी त्यांनी स्वत:देखील पोलिसांशी बोलणं टाळलं. त्यांच्यासोबत असणारी व्यक्ती आपल्याला आत सोडा म्हणून पोलिसांकडे विनंती करत होती. आतमध्ये आमचे पाहुणे राहतात..लगेच जाऊन येतो असे सांगितले तरी सदर पोलीस अधिकाऱ्याने कडू यांना आतमध्ये जाऊ दिले नाही. याउलट कंटेनमेंट झोनमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असल्याने सुनावलं. यामुळे राज्यमंत्री कडू यांनी घेतलेल्या परीक्षेमध्ये पोलीस पास झाले आहेत. यावेळी बच्चू कडू यांनी पोलिसांना कंटेनमेंट झोनमध्ये अतिशय कठोरपणे नियमांची अमजबजावणी केली जावी अशा सूचना दिल्या आहेत.

https://twitter.com/bachhukadu0796/status/1260831646007332864

दरम्यान बच्चू कडू यांनी आज अकोला जिल्ह्यातील कोरोना बाधित भागांना भेटी दिल्या. तसेच त्यांनी यावेळी कोरोना रुग्णांवर उपचार सुरु असलेल्या अनेक रुग्णालयांना भेट देऊन पाहणी केली. अकोला येथून सकाळी तेलंगणाची सुटलेल्या एसटी बस ला कडू यांनी हिरवा झेंडा दाखवून अडकलेल्या कामगारांना निरोप दिला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या कराडकरांना दिलासा! परिचारिकांसह ६ कोरोनाग्रस्तांना मिळाला डिस्चार्ज

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या कराडकरांना दिलासादायक बातमी असुन कराडच्या सह्याद्री हॉस्पीटल मधून कोरोना बाधित 6 रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.

हॉस्पीटल स्टाफ व प्रशासनाकडून टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देणेत आला. यामध्ये कराड उपजिल्हा रुग्णालयातील 5 परिचारिकांचाही समावेश असून उपचार घेत असणार्‍या 6 कोरोनाबाधितांचे 14 दिवसानंतरचे दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आज त्यांना डिस्चार्ज देणेत आला.

आत्तापर्यंत कराड तालुक्यात कोरोनावर उपचार घेऊन बरे झालेल्या 37 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच तालुक्यार आजपर्यंत फक्त एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

मोदींच्या मेगा आर्थिक पॅकजमध्ये शेतकऱ्यांसाठी आहेत ‘या’८ तरतुदी

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना संकटादरम्यान जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली होती. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी आज आत्मनिर्भर भारत अभियानाच्या आर्थिक पॅकेजचा दुसरा टप्पा जाहीर केला. या पॅकजमध्ये शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी सरकारने काय आर्थिक उपायोजना केल्यात त्याची माहिती सीतारमन यांनी दिली.

१)शेतीकरिता शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध झाले पाहिजे, यासाठी नाबार्ड ग्रामीण बँकांना अतिरिक्त ३० हजार कोटी रुपये उपलब्ध करुन देणार असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आहे.

२)मच्छीमार आणि पशुसंवर्धन करणाऱ्या शेतकऱ्यांचा सुद्धा किसान क्रेडिट कार्ड योजनेत समावेश करण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात कर्ज मिळणार आहे.

३)१ मार्च ते ३० एप्रिल या काळात कृषी क्षेत्रासाठी ८६,६०० कोटी रुपयांची ६३ लाख कर्जे मंजूर करण्यात आली.

४)मार्च २०२० मध्ये नाबार्डने कोऑपरेटीव्ह आणि ग्रामीण बँकांना २९,५०० कोटी रुपये उपलब्ध करुन दिले.

५)ग्रामीण भागात पायाभूत सोयी-सुविधांसाठी ग्रामीण पायाभूत विकास फंडातंर्गत राज्यांना ४,२०० कोटी रुपये देण्यात आले.

६) ३ कोटी छोटया शेतकऱ्यांना ४ लाख कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले. त्यांना व्याजामध्ये सवलत देण्यात आली. ही सवलत आता ३१ मे २०२० पर्यंत वाढवण्यात आली आहे.

७) २५ लाख किसान क्रेडिट कार्डमधून २५००० कोटी मंजूर करण्यात आले आहेत.

८) कृषी मालाची खरेदी करण्यासाठी केंद्र सरकारने ६७०० कोटी राज्य सरकारना उपलब्ध केले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”