Thursday, December 25, 2025
Home Blog Page 5797

अखेर उद्धव ठाकरे आमदार झाले! विधान परिषदेवर बिनविरोध निवड

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह इतर आठही उमेदवार विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज अंतिम मुदत होती. त्यानंतर सर्व उमेदवारांच्या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आज दुपारी ३ वाजेपर्यंत होती. त्यानंतर अधिकृत निकालाची घोषणा करण्यात आली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे, भाजपचे रणजीतसिंह मोहिते-पाटील, गोपीचंद पडाळकर, प्रवीण दाटके आणि रमेश कराड, राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी, काँग्रेसचे राजेश राठोड यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे. या सर्वांची बिनविरोध निवड झाली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी १८ मे रोजी विधान परिषद सभापतींच्या उपस्थितीत विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेणार आहेत. विधान परिषद निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे सर्व ९ उमेदवारांचा शपथविधि सोमवारी विधान परिषदेत सभापतींच्या उपस्थित पार पडणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

मोठी घोषणा! मजुरांसाठी स्वस्त भाडं असलेली घरं आणि मुद्रा कर्जदारांना व्याजातून २% दिलासा- अर्थमंत्री

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना संकटादरम्यान जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली होती. ‘स्वावलंबी भारत’ पॅकेजविषयी आज दुसऱ्या टप्प्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रवासी मजुरांना दिलासा देणारी घोषणा केली आहे. प्रवासी मजूर आणि शहरी गरीब मजुरांसाठी कमीत कमी खर्चात राहता यावं यासाठी मोदी सरकार प्रयत्नशील असून कमी भाडं असेल अशी घरं प्रधानमंत्री आवास योजनेद्वारे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी उद्योगपती, राज्य सरकारने जागा उपलब्ध करून द्यावी अशा सूचना करण्यात आल्या आहेत. लघु कर्ज घेणाऱ्या आणि त्याची वेळेत परतफेड करणाऱ्या लोकांसाठी व्याजात २% सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुद्रा शिशु कर्ज घेणाऱ्या लोकांना १ लाख ६२ हजार कोटी रुपयांच्या थकीत कर्जाच्या व्याजात २% कपात करुन हे १५०० कोटी रूपये माफ करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे.

या व्यतिरिक्त, देशातील ८ कोटी मजुरांना, जे दुसऱ्या राज्यातून स्वतःच्या राज्यात परतले आहेत त्यांना पुढील २ महिन्यांसाठी ५ किलो गहू आणि तांदूळ मोफत देण्याचा महत्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारतर्फे देण्यात आला आहे. ही घोषणा प्रति व्यक्तीसाठी करण्यात आली असून याची अंमलबजावणी राज्य सरकारांनी करावी असं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे. या योजनेसाठी ३५०० करोड रुपयांची तरतूद केल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं आहे. यासोबतच केंद्रानं दैनंदिन कामगारांना देण्यात येणारं दिवसाचं मानधन १८२ रुपयांवरून २०२ रुपयांवर नेण्यात आल्याचं सीतारामन यांनी स्पष्ट केलं. १ लाख ८७ हजार ग्रामपंचायतीद्वारे २ कोटी ३३ लाख कामगारांना महात्मा गांधी रोजगार हमी योजनेद्वारे काम देण्याचं सीतारामन यांनी स्पष्ट केलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

८ कोटी प्रवासी मजुरांना २ महिने मिळणार मोफत धान्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना संकटादरम्यान जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली होती. ‘स्वावलंबी भारत’ पॅकेजविषयी आज दुसऱ्या टप्प्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रवासी मजुरांना दिलासा देणारी घोषणा केली आहे.

देशातील ८ कोटी मजुरांना, जे दुसऱ्या राज्यातून स्वतःच्या राज्यात परतले आहेत त्यांना पुढील २ महिन्यांसाठी ५ किलो गहू आणि तांदूळ मोफत देण्याचा महत्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारतर्फे देण्यात आला आहे. ही घोषणा प्रति व्यक्तीसाठी करण्यात आली असून याची अंमलबजावणी राज्य सरकारांनी करावी असं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे. या योजनेसाठी ३५०० करोड रुपयांची तरतूद केल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं आहे. यासोबतच केंद्रानं दैनंदिन कामगारांना देण्यात येणारं दिवसाचं मानधन १८२ रुपयांवरून २०२ रुपयांवर नेण्यात आल्याचं सीतारामन यांनी स्पष्ट केलं. १ लाख ८७ हजार ग्रामपंचायतीद्वारे २ कोटी ३३ लाख कामगारांना महात्मा गांधी रोजगार हमी योजनेद्वारे काम देण्याचं सीतारामन यांनी स्पष्ट केलं.

रात्रीच्या वेळी काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन वेगळे नियम लागू करणार असल्याचं यावेळी अर्थमंत्र्यांनी सांगितलं. प्रवासी मजूर आणि शहरी गरीब मजुरांसाठी कमीत कमी खर्चात राहता यावं यासाठी मोदी सरकार प्रयत्नशील असून कमी भाडं असेल अशी घरं प्रधानमंत्री आवास योजनेद्वारे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी उद्योगपती, राज्य सरकारने जागा उपलब्ध करून द्यावी अशा सूचना करण्यात आल्या आहेत. लघु कर्ज घेणाऱ्या आणि त्याची वेळेत परतफेड करणाऱ्या लोकांसाठी व्याजात २% सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुद्रा शिशु कर्ज घेणाऱ्या लोकांना १ लाख ६२ हजार कोटी रुपयांच्या थकीत कर्जाच्या व्याजात २% कपात करुन हे १५०० कोटी रूपये माफ करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे.

राज्यांतर्गत मजुरांना हालचाल करता यावी, त्यांच्या आरोग्यासंदर्भातही काम करता यावं यासाठी प्रयत्नशील असल्याचं सीतारामन पुढे म्हणाल्या. जे कामगार घातक वातावरणाच्या ठिकाणी काम करतात त्या सर्वांना वाढीव ESI देण्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. मार्च आणि एप्रिल महिन्यात जवळपास ६३ लाख कर्जमंजुरी देण्यात आल्याचंही यावेळी सांगण्यात आलं. कामगार कायद्याचा वापर करुन कमीत कमी वेतनही सन्मानजनक असावं यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं अर्थमंत्र्यांकडून सांगण्यात आलं. कामगारांच्या आरोग्याविषयी सरकार सजग असून त्यांची वर्षातून एकदा आरोग्य तपासणी करण्यात येईल असंही आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं.

स्थलांतरित मजूर, गरीब, फेरीवाले, छोट्या प्रमाणात शेती करणारे शेतकरी यांच्यासाठी घोषणा होणार आहेत असं निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं. शेतकऱ्यांसाठी आजच दोनच घोषणा असल्या तरीही पुढेही त्यांच्यासाठी घोषणा असणार आहेत. कुणीही मोदी सरकार शेतकऱ्यांना विसरलं असं म्हणू नये असंही निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच स्पष्ट केलं. गरीबांच्या कल्याणासाठीच हे सरकार आहे. तसंच गरीब कल्याण योजनेतूनही स्थलांतरीत मजुरांना मदत देण्यात येईल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

लपूनछपून दिल्लीतून चीनला पाठवले जात होते ५ लाख मास्क अन् ५७ लिटर सॅनिटायझर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या संसर्गाचा वाढत धोका लक्षात घेता, देशात मास्क, सॅनिटायझर्स आणि पीपीईच्या किटची मागणी वाढत आहे. या दरम्यान, सध्या गरज असलेल्या या वस्तू बेकायदेशीरपणे चीन तसेच अन्य देशांत एक्सपोर्ट केल्याचा एक प्रकार नुकताच समोर आला आहे. गुप्तचरां कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे दिल्लीतील आयजीआय विमानतळावर एयर कार्गो वर कस्टम विभागाकडून छापे टाकण्यात आले. कस्टम विभागाने येथे ५.८ लाख मास्क ,९५० बाटल्यांमध्ये ५७ लिटर सॅनिटायझर्स आणि नवी दिल्ली कुरियर टर्मिनल येथे ९५२ पीपीई किटस यासह अनेक शिपमेंट अडवले. यांना देशातून बाहेर नेण्याचा किंवा निर्यात करण्याचा प्रयत्न केला गेला. त्याशिवाय २४८० किलो कच्चा मालही कस्टमने जप्त केला, जो चीनला पाठविला जात होता.

आता या प्रकरणाचा तपास केला जात असून परदेशात हे सामान कोण पाठवत होते याचा हे शोधले जात आहे. डीजीएफटीच्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार हे सामान निर्यात केले जाऊ शकत नाहीत. परंतु हे लक्षात घेण्यासारखे आहे की सध्या देशात कोरोना विषाणूचा साथीचे संकट आहे, अशा परिस्थितीत भारत सरकारने बर्‍याच वैद्यकीय वस्तूंच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. १९ मार्च रोजीच केंद्र सरकारने या वस्तूंची निर्यात थांबविली होती. त्यामध्ये सॅनिटायझर्स, मास्क देखील सामील आहेत. त्याचवेळी या संकटामुळे भारतात एन-९५ मास्क आणि पीपीई किट बनवण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे.

कोरोना व्हायरसच्या या लढाईत या वैद्यकीय वस्तू महत्वाची भूमिका बजावतात. कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांबरोबरच या वैद्यकीय उपकरणांची मागणीही सतत वाढत आहे. अशा परिस्थितीत हा माल गुप्तपणे परदेशात पाठविणे हा गुन्हा मानला जातो आहे.

मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर जनतेने सूचना दिल्या
कोरोना संकटाच्या या काळात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील लोकांकडून सूचना मागितल्या. यानंतर जनतेने मुख्यमंत्री केजरीवाल यांना अनेक सूचना दिल्या आहेत. केजरीवाल यांनी दिल्लीकरांना विचारले होते की काय सुरु केले पाहिजे आणि काय सुरु करू नये ? त्याबद्दल लोकांनी सांगा.

लोकांनी बर्‍याच मुद्द्यांवर आपले मत व्यक्त केले. ज्यामध्ये बहुतेक लोकांनी वाहतूक, व्यवसाय, शाळा-महाविद्यालय आणि उद्योग परत रुळावर आणण्याविषयी सुचविले. तसेच काही लोकांनी मेट्रो, बस, टॅक्सी सुरु करण्याबाबत आपल्या सूचना दिल्या आहेत. तसेच, या बदललेल्या परिस्थितीत लोकांनी शाळा-महाविद्यालयीन कामकाजाविषयीही त्यांच्या महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. आता या सूचना अंमलात आणण्यासाठी दिल्ली सरकार पुढाकार घेईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

अर्थमंत्री LIVE: प्रवासी मजुरांसाठी सरकारने उघडले रोजगार हमी योजनेचे दरवाजे; अजून बरंच काही

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना संकटादरम्यान जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली होती. ‘स्वावलंबी भारत’ पॅकेजविषयी आज दुसऱ्या टप्प्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी महत्त्वाच्या घोषणांवर भर दिला. सेल्फ हेल्प ग्रुपच्या माध्यमातून लोकांनी कोरोनाकाळात चांगलं काम उभं केल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं.

ग्रामीण बँकांकडून २९ हजार ५०० कोटी रुपयांच्या कर्जाचं वाटप करण्यात येणार असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं. देशातील १२, ००० स्वयंसहायता गटांनी करोडो मास्क आणि लाखो लिटर सॅनिटायझर कोरोना कालावधीत तयार केलं असल्याने या ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणं गरजेचं असल्याचं सीतारामन पुढे म्हणाल्या. दैनंदिन कामगारांना देण्यात येणारं दिवसाचं मानधन १८२ रुपयांवरून २०२ रुपयांवर नेण्यात आल्याचं सीतारामन यांनी स्पष्ट केलं. १ लाख ८७ हजार ग्रामपंचायतीद्वारे २ कोटी ३३ लाख कामगारांना महात्मा गांधी रोजगार हमी योजनेद्वारे काम देण्याचं सीतारामन यांनी स्पष्ट केलं.

कोरोना संकटाच्या काळात सर्व गरजूंना शासनातर्फे ३ वेळ जेवण द्यायचा प्रयत्न झाल्याचं सीतारामन यांनी भाषणाच्या सुरुवातीला सांगितलं. राज्यांतर्गत मजुरांना हालचाल करता यावी, त्यांच्या आरोग्यासंदर्भातही काम करता यावं यासाठी प्रयत्नशील असल्याचं सीतारामन पुढे म्हणाल्या. जे कामगार घातक वातावरणाच्या ठिकाणी काम करतात त्या सर्वांना वाढीव ESI देण्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. मार्च आणि एप्रिल महिन्यात जवळपास ६३ लाख कर्जमंजुरी देण्यात आल्याचंही यावेळी सांगण्यात आलं. कामगार कायद्याचा वापर करुन कमीत कमी वेतनही सन्मानजनक असावं यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं अर्थमंत्र्यांकडून सांगण्यात आलं. कामगारांच्या आरोग्याविषयी सरकार सजग असून त्यांची वर्षातून एकदा आरोग्य तपासणी करण्यात येईल असंही आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

सुटकेसवर झोपलेला चिमुकला; आई दोरीने ओढल कापत होती गावचा रस्ता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसच्या संकटामुळे सध्या देशभरात सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये दुसऱ्या राज्यांमध्ये अडकलेले अनेक कामगार आपल्या घरी परतत आहेत. हे कामगार आणि त्यांच्या कुटुंबांची अनेक मार्मिक छायाचित्रे आता सोशल मीडियातून समोर येत आहेत. कधी कुठेतरी ते बैलांसह बैलगाडीमध्ये आपल्या कुटुंबाला खेचत आहे, तर कुठे ते पेंढींसारखे सिमेंट मिक्सिंग ट्रकमध्ये बसून त्यांच्या गावाकडे निघालेले दिसून येतात. ज्यांना परत जाण्याचे साधन मिळाले ते भाग्यवान आहेत, मात्र ज्यांना काहीच मिळाले नाही असे लाखो लोक रस्त्यांवरून चालतच आपापल्या गावी जात आहेत. बुधवारीही अशाच एका कामगारांची एक तुकडी ताजनागिरी आग्रा येथे पंजाबहून परतून महोबाकडे निघाली होती. यामध्ये बऱ्याच महिला आणि मुलेही होती. या तुकडीमध्येच सामील असलेली एक आई आपल्या निरागस मुलाला सूटकेसवरच झोपवून चालत जात होती. याचा एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर बराच व्हायरल होतो आहे.

मूल सूटकेसवर झोपले आहे आणि आई ते दोरीने खेचत आहे
या व्हिडिओमध्ये,हे पाहता येते कि चाकं असलेल्या एका सुटकेसवर एक मूल झोपलेले आहे आणि ती सूटकेस त्याची आई दोरीने खेचत आहे. ती बाई सांगत आहे की आम्हांला महोबा (झांशी) येथे जायचे आहे. मजुरांची ही टीम पंजाबहूनच महोबाकडे रवाना झाली आहे. या टीममध्ये महिला आणि मुलांचा देखील समावेश आहे. या तुकडीत सामील असलेल्या धीरज नावाच्या एका व्यक्तीने ते पंजाबहून परत येत असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे चालत चालतच आपण आतापर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे असे तो म्हणाला.आम्ही जिथे रात्र होते तिथेच थांबतो. निघताना वाटेत काही लोकांनी रेशन दिले आहे, ते बनवून खातो असेही त्याने सांगितले.

इंदूर मधील बैलगाडीचा व्हिडिओ समोर आला
यापूर्वीही मध्य प्रदेशच्या इंदूरमधला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये एका माणसाला बैलासह बैलगाडी ओढताना दाखवले गेले. या व्हिडिओमध्ये दिसणारा राहुल नावाचा मजूर म्हणतो आहे की महूमध्ये त्याचे रोजंदारीचे काम गेले त्यामुळे तो आपल्या कुटुंबासह इंदूर गावी जात आहे. खाण्यासाठी त्याला तिथे एक बैल विकाव लागला होता. बैलगाडीतील दुसऱ्या बैलाऐवजी कधीकधी तो स्वतः तर कधी त्याची बायको त्यामधून कुटुंबाला ओढतात.

मुख्यमंत्री योगी यांनी धीर धरण्याचे आवाहन केले आहे
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वेगवेगळ्या राज्यातून परत आलेल्या कामगारांना संयम राखण्याचे आवाहन केले होते. मुख्यमंत्री म्हणाले की, जे काही आहेत त्यांनी आहे तेथेच थांबवावे. या कामगारांना बसेसद्वारे त्यांच्या गावी पाठविण्याच्या सूचनाही त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या परंतु दररोज शेकडो कामगार पायी, सायकली किंवा ट्रकमधून परत येत असल्याचे चित्र समोर येते आहेत. एसपी सिटी बोत्रे रोहन प्रमोद यांनी फोनवर सांगितले की, कामगार कोठे आहे याची माहिती दिली तर प्रशासन तातडीने त्यांच्या राहण्याची तसेच खाण्याची व्यवस्था करते. बसची व्यवस्था करुन त्यांना त्यांच्या गावीही नेले जात आहे. ठिकठिकाणी त्यांच्यासाठी शेल्टर होमचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

राज्यात ३१ मेपर्यंत लॉकडाऊन वाढणार? ठाकरे सरकारचं एकमत

मुंबई । कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता राज्यात लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याचे समजत आहे. आता राज्यात लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवण्याबाबत महाविकासआघाडीच्या बैठकीत चर्चा झाली आहे. या बैठकीत सर्वांचं लॉकडाउन वाढवण्यावर ठाकरे सरकारचे एकमत झालं असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच १७ मे नंतर लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यावर या बैठकीत सहमती झाली आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या महत्त्वाच्या मंत्र्यांच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली. मुंबईतील शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या जागेत महाविकास आघाडीची बैठक पार पडली. बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते. यावेळी वरिष्ठ प्रशासकीय आणि पोलीस अधिकारीदेखील बैठकीला उपस्थित होते.

https://hellomaharashtra.in/breaking-news-marathi/fm-nirmala-sitharaman-press-conference-live-updates-on-economic-package/

केंद्र सरकारकडून जोपर्यंत लॉकडाउन ४ च्या नव्या अटी-शर्थींची सविस्तर माहिती दिली जात नाही तोपर्यंत राज्य सरकारकडून लॉकडाऊन वाढवण्याची अधिकृत घोषणा केली जाणार नाही अशी सुत्रांची माहिती आहे. मात्र, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत सर्वांचं लॉकडाउन वाढवण्यात एकमत झालं असून राज्यात १७ मे नंतर लॉकडाऊन वाढणार आहे. राज्यातील कोराना रुग्णांचा वाढणारा आकडा लक्षात घेता महाराष्ट्रातील लॉकडाऊन राज्य सरकार ३१ मे पर्यंत वाढवणार आहे अशी चर्चा आहे.

लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यासोबतच राज्यातील उद्योग टप्प्याटप्प्याने सुरु करण्याचाही निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याचं कळत आहे. पण कोरोनाचे रुग्ण वाढू नयेत यासाठी कंटेनमेंट झोनमध्ये कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याचंही समजत आहे. मात्र अद्याप यासंबंधी कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. केंद्र सरकारने सविस्तर माहिती दिल्यानंतरच राज्य सरकारडून घोषणा केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, केंद्र सरकारने आधीच लॉकडाउन वाढवला जाणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना १७ मे नंतरही लॉकडाउन कायम असेल अशी घोषणा केली होती. मात्र तो कधीपर्यंत कायम असेल तसंच कोणते निर्बंध शिथील असतील याची माहिती दिली नाही आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

https://hellomaharashtra.in/bollywood-news/sunny-leon-unseen-photos/

https://hellomaharashtra.in/other/26-year-old-teacher-absconding-with-8th-standard-student-has-been-in-a-relationship-for-1-year/

https://hellomaharashtra.in/political-news/devendra-fadnavis-is-good-human-being-chandrakant-patil-on-eknath-khadse-criticise-him/

 

 

इयत्ता ८ वी मधील विद्यार्थ्यासोबत २६ वर्षांची शिक्षिका फरार; १ वर्षापासून होते रिलेशनशिपमध्ये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरातमधील गांधीनगर येथील कलोल शहर पोलिस स्टेशन परिसरातील एका प्रेमप्रकरणात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. इथे एक २६ वर्षीय शिक्षिका एका अल्पवयीन विद्यार्थ्यासह बेपत्ता झाली. हा विद्यार्थी आठवीत शिकत आहे. या दोघांमध्ये गेल्या १ वर्षापासून जवळीक झाली होती. हा विद्यार्थी जेव्हा शाळेतून घरी परत आला नाही तेव्हा त्याचे कुटुंबीय काळजीत पडले. आपला मुलगा बेपत्ता झाल्याबद्दल वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी अनेकांशी विचारपूस केल्यानंतर ही गोष्ट समोर आली की त्या शिक्षिकेचे या विद्यार्थ्यांशी प्रेमसंबंध असून ते दोघेही कुठेतरी निघून गेले आहेत.

या विद्यार्थ्याच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, मी संध्याकाळी ७ वाजता घरी पोहोचलो तेव्हा मला आढळले की माझा मुलगा हरवलेला आहे. बायकोने सांगितले की मुलगा ४ वाजल्यापासूनच घरात नव्हता. मग त्यांनी शेजाऱ्यांना विचारले, त्याचा इकडेतिकडे बर्‍यापैकी शोध घेतला, मात्र तो कोठेही सापडला नाही. त्यानंतर आम्ही आमच्या मुलाला शिकवत असलेल्या त्याच्या एका वर्गशिक्षिकेच्या घरी गेलो तर त्याही त्यांच्या घरातून बेपत्ता असल्याचे आम्हांला समजले. बरेच प्रयत्न करूनही जेव्हा आमचा मुलगा सापडला नाही तेव्हा आम्ही पोलिसांशी संपर्क साधला.

या प्रकरणात पोलिसांनी सांगितले की, ती शिक्षिका कलोल शहरातील दरबारी चौल भागातील आहे. गेल्या एक वर्षापासून तिचे या बेपत्ता झालेल्या विद्यार्थ्यांशी बेकायदेशीर संबंध होते. शाळा प्रशासनानेही यासंदर्भात या दोघांनाही इशारा दिलेला होता. त्यामुळे अशी भीती व्यक्त केली जात आहे की, त्यांचे संबंध कोणाकडूनही न स्वीकारल्यामुळे त्यांनी घर सोडून इतरत्र जाण्याचा निर्णय घेतला असेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

पक्षाच्या ‘त्या’ नियमाला पडळकर अपवाद का? खडसेंनाचा चंद्रकांतदादांना परखड सवाल

जळगाव । विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपनं तिकीट नाकारल्यानंतर भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांची नाराजी उफाळून आली आहे. आपल्याला तिकीट नाकारण्यामागे राज्यातील भाजप नैतृत्वाचा हात असल्याचा थेट आरोप खडसे यांनी करत राज्यातील नेत्यांना धारेवर धरले होते. त्याला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उत्तर देत “विधानसभेचं तिकीट दिल्यानंतर विधान परिषदेचं देत नाहीत, हा पक्षाचा नियम आहे. पंकजा मुंडेंना विधानसभेचं तिकीट दिलं होतं. रोहिणी खडसे यांना तिकीट दिलं होतं,” अशी भूमिका चंद्रकांत पाटील यांनी मांडली होती. चंद्रकांत पाटील यांच्या भूमिकेवर आता एकनाथ खडसे यांनी तिखट प्रतिक्रिया देत त्यांच्यावर प्रश्नांच्या फैरी झाडल्या आहेत.

“विधानसभेचं तिकीट दिल्यानंतर विधान परिषदेचं देत नाहीत, हा पक्षाचा नियम आहे तर मग गोपीचंद पडळकरांना का तिकीट दिलं? ते का अपवाद ठरले? चांगल्या कार्यकर्त्यांना डावलण्यासाठी सांगायला ते कारण आहे. पंकजा मुंडे यांच्याशी माझं बोलणं झालं, पण त्याबद्दल मी बोलणार नाही. हे म्हणतात सुनेला तिकीटं दिलं, मुलीला तिकीटं दिलं. आम्ही कुठे मागितलं होतं मुलीसाठी तिकीट? माझ्यासाठी तिकीट मागितलं होतं. माझी मुलगी ढसाढसा रडत होती, मला तिकीट नको म्हणून तरी तिला जबरदस्ती तिकीटं दिलं. का दिलं? मला जाणूनबुजून तिकीट नाकारलं. नाथाभाऊंसारखा स्पर्धक परत तयार व्हायला नको होता. मी सांगितलं होत, इथे मला व्यक्तिगत मानणारा वर्ग आहे, माझी मुलगी निवडून येणार नाही. तरी जबरदस्ती तिकीट दिलं,” असं सांगत एकनाथ खडसे यांनी चंद्रकांत पाटील यांना धारेवर धरलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

बायकोला सोडून तुझ्याशीच लग्न करणार; ४१ वर्षाच्या व्यक्तीकडून १८ वर्षांच्या तरुणीचे अपहरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एका ४१ वर्षीय व्यक्ती आपल्या पत्नीला सोडून एका १८ वर्षाच्या मुलीच्या मागे लागला. त्याने या मुलीला सहा दिवस एका खोलीत बंद ठेवून बलात्कार केला. त्यानंतर या पीडित मुलगी या माणसाच्या घराशेजारी असलेल्या गॅरेजमध्ये बेशुद्ध अवस्थेत सापडली. या पीडित मुलीच्या आईने याबाबत डूमस पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तक्रार दाखल केल्याच्या थोड्याच वेळातच आरोपीला पकडले गेले. पोलिसांनी आयपीसीच्या अनेक कलमांसह पॉक्सो कायद्या अंतर्गत त्याच्यावर कारवाई सुरू केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,हा ४१ वर्षीय आरोपी मेहुल रमेश पटेल डूमसच्या अभावा गावात राहणारा आहे. तो विवाहित आहे. त्याला एक मुलगा देखील आहे. मेहुलने एका १८ वर्षाच्या मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले तिला सांगितले की त्याची पत्नी नोकरी करते ज्यामुळे त्या दोघांचे बिलकुल पटत नाही. आपल्या पत्नीपासून घटस्फोट घेतल्यानंतर तो तिच्याशी लग्न करेल. असे सांगून मेहुलने २० एप्रिल रोजी या १८ वर्षीय मुलीला आपल्या सोबत नेले.

लग्न करण्यासाठी ती मुलगी आपल्यासोबत लिविंग सर्टिफिकेट आणि जन्म प्रमाणपत्र घेऊन आली, पण मेहुलने हे पाहिले असता त्याने तिला लग्नाला नकार देत मारहाण केली. मुलीच्या म्हणण्यानुसार, मेहुलने तिचे डोळे, कान आणि पायावर मारले. त्यानंतर तिला एका खोलीत बंदिस्त ठेवून अनेक दिवस तिच्यावर बलात्कार केला. सहा दिवसानंतर ती मेहुलच्या घराजवळच्या गॅरेजमध्ये बेशुद्ध अवस्थेत सापडली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.