Sunday, December 21, 2025
Home Blog Page 580

उमरगा विधानसभा मतदारसंघात ज्ञानराज चौगुले सलग चौथ्यांदा आमदार??

Umarga Assembly

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेनं साध्या सुध्या माणसांना राजकारणात आणलं…आमदार, खासदार, मंत्री केलं… धाराशिव जिल्ह्यातील उमरग्याबाबतही असंच काहीसं घडलं… पाहायला गेलं तर जिल्ह्यावर आधीपासूनच शिवसेनेचं वर्चस्व होतं… त्यात 2009 ला नव्यानं मतदारसंघ तयार झाल्यानंतर उमरगा विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला… तेव्हा प्रयोगशाळा सहाय्यक म्हणजेच लॅब असिस्टंट म्हणून नोकरी करणाऱ्या साध्या सुध्या, मध्यमवर्गीय ज्ञानराज चौगुले या माणसावर शिवसेनेने विश्वास टाकला… उमरग्याची उमेदवारी दिली… आणि आपल्या टाकलेल्या विश्वासावर अगदी सार्थ उतरत त्यांनी सलग तीन टर्म शिवसेनेचा भगवा मतदार संघावर फडकवत ठेवला… मात्र शिवसेनेच्या बंडात त्यांनी शिंदेंची वाट धरल्यानं प्रामाणिक शिवसैनिक त्यांच्यावर खवळलाय… पण यालाही पुरून उरत ज्ञानराज चौगुलेच सलग चौथ्यांदा उमरग्यातून आमदार होताना दिसतायत… फक्त ठाकरेंनी मनावर घेतलं तरच चौगुले यांचा करेक्ट कार्यक्रम होऊ शकतो… येणाऱ्या विधानसभेला उमरग्यात नेमकं काय घडेल? निकाल कोणाच्या बाजूने लागेल?

उमरगा विधानसभा मतदार संघ हा १९९५ नंतर शिवसेनेचा बालेकिल्ला बनला… माजी खासदार रवींद्र गायकवाड व त्यांचे शिष्य विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुले हे दोघेही इथून आमदार राहिले… रवींद्र गायकवाड खासदार झाल्यानंतर चौगुले आमदार बनले ते कायमचेच… 2014 आणि 2019 या दोन्ही टर्मला काँग्रेसच्या किसन कांबळेंचा पराभव करून चौघुलेंनी आपली आमदारकी कॉन्स्टंट ठेवली… गायकवाड बोले तैसे चौघुले चाले…. असं एकूणच चित्र असल्याने चौगुलेंच्या राजकारणाला मर्यादा होत्या… पण हळूहळू चौगुलेंनीही आपल्या कार्यकर्त्यांचा गट ॲक्टिव्ह करून स्वतःला राजकारणात खुल करून घेतलं…

पण ज्या एका सामान्य नोकरदार माणसावर ठाकरेंनी विश्वास ठेवला…आमदार केलं… त्याच चौगुलेंनी शिवसेनेच्या फुटीत शिंदेंच्या बंडाला साथ दिली… अर्थातच ज्या फुटीर नेत्यांना मतदारसंघातील शिवसैनिकांना तोंड द्यावं लागतय… अगदी तशीच परिस्थिती उमरग्यातही आहे… सामान्य शिवसैनिक, निष्ठावान कार्यकर्ते आजही चौगुलेंच्या या भूमिकेवर नाराज आहेत… त्याचा फटका त्यांना येणाऱ्या काळात विधानसभेला बसू शकतो… त्यात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराला मिळालेलं लीड पाहता ज्ञानराज चौगुले यांच्या आमदारकीचा चौकार हुकतोय की काय, अशी परिस्थिती सध्या निर्माण झालीये… त्यामुळे महायुतीतील भाजपसोबत काँग्रेसमध्येही अनेक इच्छुकांनी विद्यमान आमदारांसोबत दोन हात करण्याची तयारी दाखवलीय… त्यात शिवसेना ठाकरे गटाकडून डॉ. संजय कांबळे यांच्या नावाची जोरात चर्चा आहे…

रिपब्लिकन पार्टी, भारिप बहुजन महासंघ असा त्यांचा राजकीय प्रवास असल्यामुळे येणाऱ्या काळात मतदार संघातील दलित व्होटबँक आपल्या बाजूने वळती करून घेण्यात त्यांना यश येऊ शकतं… सोबतच मुस्लिम समाजही मोठ्या प्रमाणावर असल्याने चौगुले यांना याचा लॉस होऊ शकतो… तब्बल 15 वर्ष आमदार असूनही पायाभूत सुविधा, रोजगार, औद्योगिक प्रकल्प, शिक्षण संस्था, एमआयडीसी अशा सगळ्याच पातळ्यांवर विद्यमान आमदार साहेब सपशेल फेल ठरले आहेत… अगदी उमरगा शहरात आठवड्यातून एकदा पाणी येत असेल तर मतदारसंघातील गाव खेड्यांवरची परिस्थिती कशी असेल? याचा विचार केला तरी अंगावर काटा येतो…

पण म्हणून ज्ञानराज चौगुलेंनी शिंदेंना साथ दिली त्यामुळे भावनिकतेच्या जोरावर इथं ठाकरे गटाला मतदान होईल, असही म्हणता येऊ शकत नाही… कारण चौगुले बंडा आधी तेरा वर्ष शिवसेनेचाच भाग होते… त्यामुळे जनता महायुतीला तर कंटाळली आहेच… पण सोबतच ठाकरेंच्या शिवसेनेलाही कंटाळली आहे… त्यामुळे उमरग्याची जनताच मुळात राजकारणाच्या बाबतीत उदासीन झाली आहे…हा सगळा पैशांचा खेळ असून यातून आपल्याला काही एक मिळत नाही, अशा प्रतिक्रिया मतदारसंघातील अनेक नागरिकांनी बोलून दाखवल्या… त्यामुळे महाविकास आघाडी कडून उमेदवारी कोणाला द्यायची? हे मोठं कोड असणार आहे… त्यात भाजपकडूनही कैलास शिंदे यांच्या आमदारकीच्या महत्वकांक्षा लपून राहिलेल्या नाहीयेत… त्यामुळे उमरग्यात आमदारकीचा चेहरा बदलणार, हे तर फिक्स आहे… पण त्या जागी नेमक्या कोणत्या चेहऱ्याला उमरग्याची जनता आमदार म्हणून पाहतेय? याची देखील क्लॅरिटी सध्या आलेली नाहीये…

पण ही राजकीय उदासीनता अशीच राहिली तर ज्ञानराज चौगुलेंना आपल्या सत्तेच्या चाव्या वापरून पुन्हा एकदा आमदारकीवर ठाण मांडून बसायला, फारसा वेळ लागणार नाही… मुस्लिम आणि दलित मतं या निवडणुकीत काय भूमिका घेतील? हीच एक गोष्ट उमरग्याचा आमदार ठरवणार असल्याने सर्वच राजकीय पक्षांना याचा विचार करून उमेदवारी द्यावी लागणार आहे… बाकी तुम्हाला काय वाटतं? उमरग्यात ज्ञानराज चौगुले आमदारकीचा चौकार मारतील का? की महाविकास आघाडी त्यांना क्लीन बोल्ड करेल? तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा…

Pune News : पुणे रेल्वे स्थानकाचा होणार पुनर्विकास : केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव

Pune News : पुणेकरांसाठी आता एक खुशखबर आहे. पुण्यातील रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास केला जाणार आहे. याबाबतची माहिती खुद्द केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. मागील आठवड्याच्या शेवटी ते भाजपच्या एका मिटिंग साठी पुण्यातील बेलेवाडी येथे आले होते. शनिवारी (20) पुण्यातील रेल्वे स्थानकाला भेट देऊन पाहणी केली यावेळी त्यांनी पुणे रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास (Pune News) करण्याबद्दल भाष्य केले.

यावेळी बोलताना वैष्णव म्हणाले, पुणे स्टेशन हे एकूण पुणे शहराच्या विकासासाठी महत्वाचे आहे. आम्ही त्याच्या पुनर्विकासाची योजना आखात आहोत. हे काम टप्प्या टप्प्यामध्ये केले जाईल. असे त्यांनी स्पष्ट केले. पुणे विभागाचे अधिकारी पुणे यार्डचे नूतनीकरण करण्याचे नियोजन करत होते, ज्यामध्ये प्लॅटफॉर्मच्या विस्ताराचाही समावेश होता. स्थानकावरील फलाटांची संख्या वाढवण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी अलीकडेच (Pune News) सांगितले. मात्र, निधीचे वाटप होऊनही यार्ड रिमॉडेलिंगची योजना सुरू झाली नव्हती. असे त्यांनी स्पष्ट केले.

पुणे-लोणावळा घाट विकास (Pune News)

पुणे-लोणावळा घाट आणि कसारा-इगतपुरी विभागाचा विकासही महत्त्वाचा असल्याचे वैष्णव म्हणाले. ते म्हणाले, “या विभागांवरील गाड्या उतार, तीव्र वळण आणि उंचीच्या आव्हानांमध्ये धावतात. घाट विभागांचा ग्रेडियंट कसा कमी करता येईल यावर निर्णय घेण्यात आला आहे. हे दोन्ही विभाग विकसित करण्याची योजना आहे जेणेकरून गाड्या सुरळीत धावू शकतील. हालचाल सुरक्षित असावी आणि प्रवाशांना सुरक्षित वाटले पाहिजे.

पुणे-नाशिक सेमी-हायस्पीड रेल्वे (Pune News)

पुणे रेल्वे स्थानकाच्या आजूबाजूला आणखी स्थानके विकसित करण्याची योजना सुरू असल्याचे मंत्री म्हणाले. वैष्णव म्हणाले की, पुणे-नाशिक सेमी-हायस्पीड रेल्वे प्रकल्पाशी संबंधित विविध विषयांवर राज्य सरकारशी चर्चा सुरू आहे. यासंबंधीच्या अडचणी लवकरच दूर केल्या जातील, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे लवकरच पुणे-नाशिक सेमी-हायस्पीड रेल्वे सुरु होण्याचा मार्ग मोकळा होण्याची (Pune News) शक्यता आहे.

160 वर्षानंतर पहिल्यांदाच मोठे घाट आणि 28 बोगदांना बायपास करण्यासाठी मुंबई आणि पुणे दरम्यान नवीन रेल्वे योजना गेल्या आठवड्याच्या शेवटी मंजूर झाली असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मध्य रेल्वे विभागाला त्यावर जलद गतीने काम करण्यास सांगितलं असल्याची माहिती दिली त्याचबरोबर लोणावळा इथं थांबलेल्या तीन डब्यांच्या विशेष ट्रेनमध्ये त्यांनी प्रवास केला आणि घाटांवर निगेटिव्ह (Pune News) करण्याच्या प्रक्रियेची आणि बँकर लोको मोटिव च्या ऑपरेशनची तपासणी देखील केली.

पृथ्वीवरुन चंद्रावर जाण्यासाठी बनला स्पेस सुपरहायवे; चीनने केला सर्वात मोठा प्रोजेक्ट पूर्ण

Space Superhighway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या अवकाशात अनेक गोष्टी आहेत. आजपर्यंत प्रत्येक व्यक्तीलाच आपल्या आकाशात नक्की काय असणार आहे? दुसरी मानव वस्ती तर नाही ना? अशा अनेक प्रकारचे प्रश्न पडलेले असतात. आणि आपले संशोधक देखील वेगवेगळ्या गोष्टींचा शोध लावण्याचा प्रयत्न करत असतात. अशातच आता चिनी संशोधकांनी पृथ्वी आणि चंद्र यांच्या दरम्यांचा नेटवर्क पायाभूत सुविधा करण्यासाठी एक रोड मॅप तयार केलेला आहे.

पृथ्वीपासून चंद्रापर्यंत जाणारा हा सुपर हायवे म्हणजे प्रत्यक्षात सॅटेलाईट असणार आहे. हा मार्ग सॅटॅलाइटच्या मार्गातून जाणार आहे. जपान आणि अमेरिकेच्या स्पेस एजन्सी देखील या प्रकारचा प्रोजेक्टवर काम करत आहे. परंतु त्यांच्या आधी चीनला या कामांमध्ये यश आलेले आहे. त्यांनी बाजी मारलेली आहे.

चीनच्या या मोहिमेचे मुख्य डिझायनर या मेंगफेई हे होते. त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या टीमने या प्रोजेक्टवर काम केलेले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार अंतराळवीर आहेt, त्यांच्यासाठी हा स्पेस हायवे बांधला जाणार आह
आता या स्पेस हायवेचा असा फायदा होणार आहे की, 20 किंवा त्याहून अधिक अंतराळवीरांना आता एकाच वेळी ऑडिओ आणि व्हिडिओद्वारे पृथ्वीशी सहजपणे संपर्क साधता येणार आहे.

सिस्लूनर स्पेस म्हणजे पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील प्रदेशात हा स्पेस सुपर हायवे तयार केला जाणार आहे. हा प्रोजेक्ट आता चंद्रावर तीन ग्राउंड स्टेशनवर 30 उपग्रहांचे संपूर्ण नेटवर्क उपलब्ध केले जाणार आहे. या सुपर हायवेवर आता नेव्हिगेशन आणि रियल टाईम देखील कम्युनिकेशन करता येणार आहे.

राजकारणातील सर्वात मोठा गौप्यस्फोट!! 100 कोटी वसुलीत ठाकरेंचं नाव घ्या, अनिल देशमुखांवर कोणी दबाव टाकला?

anil deshmukh uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक श्याम मानव (Shyam Manav) यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे महाविकास आघाडी सरकारमध्ये गृहमंत्री असताना तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे पिता- पुत्रांना अडकवण्यासाठी अनिल देशमुख यांच्यावर दबाव आणला होता. दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरेंना अडकवण्यासाठी प्रतिज्ञापत्रावर सही करा, तसेच १०० कोटी वसुली प्रकरणात उद्धव ठाकरेंचं (Uddhav Thackeray) नाव घ्या तरच तुम्ही इडी चौकशीतून सुटका करतो असं फडणवीस यांनी अनिल देशमुख याना सांगितलं होत मात्र अनिल देशमुखानी प्रतिज्ञा पत्रावर सही करण्यास नकार दिल्याने त्यांना जेलमध्ये टाकण्यात आले असा खुलासा श्याम मानव यांनी केला आहे.

याबाबत श्याम मानव यांनी नुकतंच एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हंटल कि, अनिल देशमुख यांना ईडीच्या चौकशीपासून वाचवण्यासाठी काही प्रतिज्ञापत्र पाठवण्यात आली होती. त्यावर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब आणि अजित पवार या चार नेत्यांवर खोटे आरोप करण्यात आले होते. एकवेळ अजितदादांच्या आरोपावर सही नाही केली तरी चालेल पण बाकीच्या ३ प्रतिज्ञापत्रावर सही करा असं अनिल देशमुख याना सांगण्यात आलं होते. मात्र अनिल देशमुख यांनी सही करण्यास नकार दिल्याने त्यांना जेलमध्ये जावं लागलं, असा दावा श्याम मानव यांनी केला आहे.

अनिल देशमुख यांच्याकडे पाठवण्यात आलेले प्रतिज्ञापत्र

1) उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बोलवलं आणि दर महिन्याला १०० कोटी गोळा करण्याचा मला आदेश दिला.
2) उद्धव ठाकरेंचा मुलगा आदित्य ठाकरे यांनी दिशा सालियन या मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर तिचा खून केला.
3) अनिल परब यांचे गैरव्यवहार
4) अजित पवारांनी मला गुटका व्यवसायिकांकडून कोट्यवधी रुपयांची वसुली करून द्यावी, असं सांगितलं होतं.

या चार प्रतिज्ञापत्रकावर सही करुन दिलात तर तुम्हाला ईडी लागू होणार नाही असं फडणवीस यांनी अनिल देशमुख याना सांगितलं. मात्र अनिल देशमुख यांनी खूप विचार केला. त्यांनी म्हंटल, मी जर सही केली तर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अनिल परब हे तिघेही जेलमध्ये जातील. त्यामुळे अनिल देशमुखांनी सही केली नाही आणि स्वत: १३ महिने जेलमध्ये राहिले. त्यामुळेच मी अनिल देशमुखांचे कौतुक करतो. कारण याला खरा मर्दपणा म्हणतात असं श्याम मानव यांनी म्हंटले.

समरजीतसिंह घाटगे यंदाही फेल ठरणार, कागलच्या जनतेचा कौल हसन मुश्रीफ यांनाच

hasan mushriff

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती शाहू महाराजांचा पुरोगामी वारसा ज्या मतदारसंघाच्या कणाकणात रुजला… तो मतदारसंघ म्हणजे कागल विधानसभा… कागलचा इतिहास, ऐतिहासिक परंपरा जितकी समृद्ध आहे… तितकच टोकदार इथलं राजकारण देखील…. हसन मुश्रीफ तब्बल २५ वर्षांपासून कागलच्या राजकारणावर आपला दबदबा राखून आहेत… पण समरजीत सिंग घाटगे यांच्या राजकारणातील एंट्रीने कागलची समीकरण बदलली… काहीही झालं तरी कागल मध्ये राजेच! असा एक गट तयार झाला… मुश्रीफांच्या विरोधात घाटगेंनी मागच्या विधानसभेला दोन हात केलीही… पण त्यात मुश्रीफांचं लीड त्यांना काही तोडता आलं नाही… यंदा परिस्थिती वेगळीय… मुश्रीफ आणि घाटगे हे दोन कट्टर विरोधक महायुतीच्या एकाच छताखाली आहेत… काहीही झालं तरी आता आमदारकीचा गुलाल कपाळा लावल्याशिवाय शांत बसणार नाही, असा जणू निश्चय घाटगेंनी केला असला तरी कागलमध्ये यंदाही मुश्रीफ पॅटर्नच चालणार, असं सध्या तरी चित्र दिसतंय…सगळ्या शक्यतांचा विचार केला तरी कागलमध्ये आमदारकीला मुश्रीफच निवडून येतील, असं आम्ही का म्हणतोय? घाटगेंनी संपूर्ण राजकीय ताकद पणाला लावून देखील मुश्रीफांचा अनुभव त्यांना कसा प्लस मध्ये ठेवतोय? कागलमध्ये येणाऱ्या विधानसभेला नेमकं काय घडतय? त्याचंच हे साधं सोपं आणि सविस्तर विश्लेषण…

कार्यकर्ता ते पंचायत समिती सभापती, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष ते कॅबिनेट मंत्री असा 70 वर्षीय मुश्रीफ यांच्या राजकीय प्रवासाची मूळ घट्ट रोवली गेली ती कागल विधानसभेतूनच… 1999 पासून सलग पाच वेळा निवडून येणारे हसन मुश्रीफ हे पश्चिम महाराष्ट्रातले एकमेव अल्पसंख्याक नेते… संजय घाटगे, संजय मंडलिक आणि समरजितसिंह घाटगे या राजकारणाचे बाळकडू घरातच घेतलेल्या मातब्बरांना धूळ चारत 1999 पासून सलग पाच टर्म एकाच पक्षाकडून निवडून जाण्याचा रेकॉर्डही मुश्रीफांच्याच नावावर आहे… मुश्रीफ मोठं लीड घेऊन आमदारकी खेचून आणत असले तरी यंदा आमदारकीचा गुलाल कपाळाला लावल्याशिवाय मागे हटणार नाही, असा जणू प्रणच केलेल्या समरजित सिंह घाटगेंनी प्रचाराला देखील सुरुवात केलीय… पण भाजपमध्ये असणाऱ्या घाटगेंनी कागलच्या उमेदवारीसाठी हिंदुत्वापासून अनेक मुद्द्यांच्या आधारावर मुश्रीफांची कोंडी केली… तेच मुश्रीफ अजित दादांसोबत महायुतीत आल्यामुळे घाटगे यांची अस्वस्थता वाढली…

त्यानंतर त्यांचं नॉट रीचेबल असणं… फडणवीसांकडून काढण्यात आलेली समजूत आणि लोकसभेच्या प्रचारात मुश्रीफांसोबत खांद्याला खांद्या लावून काम करण्याची आलेली वेळ यामुळे घाटगे विधानसभेच्या आधीच चांगलेच राजकीय कचाट्यात सापडलेत… मेरिट, सिनिऑरिटी आणि करंट स्टेटस या सगळ्याच पातळ्यांवर महायुतीचा चेहरा म्हणून हसन मुश्रीफ यांनाच तिकीट मिळणार असल्यामुळे घाटगे यांना पक्षविरोधी भूमिका घेणं, अपक्ष लढणं किंवा विरोधी पक्षात प्रवेश करणं एवढेच पर्याय उपलब्ध आहेत… थोडक्यात निवडणूक जिंकण्याची इच्छाशक्ती असली तरी नाईलाजाने भूमिका बदलायला लागत असल्यानं याचा फटका समरजीत सिंग घाटगेंना बसणार, हे कन्फर्म आहे…. तिसऱ्या बाजूला संजय घाटगे हे पारंपारिक विरोधक महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवतील, अशी शक्यता आहे… पण मुश्रीफ – संजय घाटगे यांच्यातला स्नेह आणि बदलत्या राजकारणामुळे वाढलेली जवळीकता पाहता ते स्वतः मुश्रीफांना निवडणूक अवघड जाईल, इतपत ताकद लावतील, असं सध्या तरी दिसत नाही…

मुश्रीफ यांनी आघाडी सरकारच्या काळात जलसंपदा, विधी व न्याय, पशु संवर्धन आणि दुग्ध विकास, शिक्षण, कामगार, ग्रामविकास अशा महत्वाच्या खात्यामध्ये उल्लेखनीय काम केलं. त्याचा फायदा त्यांना निवडणुकीत नेहमीच होत असतो…उदाहरणादाखल मुश्रीफ विधी व न्याय खात्याचे मंत्री असताना त्यांनी सरकारी दवाखान्यात गरजू आणि गरीब रुग्णांना 10 टक्के जागा राखीव ठेवण्याचा कायदा केला.. .तसंच हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक गरrब रुग्णांवर मोफत उपचार आणि शस्त्रक्रिया करण्यात येतात….जिल्हा बँक, जिल्हा परिषद, गोकुळ दूध संस्था ही सत्ता केंद्र आणि घरोघरी निष्ठावान कार्यकर्त्यांची फळी असल्याने मुश्रीफ कागलमध्ये विरोधकांपेक्षा प्लस मध्ये राहतात… त्यात मुश्रीफ यांनी अजितदादा गटासोबत जाणं पसंद केल्यानं मतदारसंघात थोडीफार नाराजी असली तरी त्याचा इम्पॅक्ट विधानसभा निकालात पाहायला मिळेल, असं सध्या तरी म्हणणं थोडं धाडसाचं ठरेल…

बाकी मुश्रीफांनाही समरजीतसिंग घाटगेंना हलक्यात घेणं परवडणार नाहीये… फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांसोबत असणार त्यांचं ट्युनिंग… मतदारसंघात केलेली अनेक आंदोलन, घेतलेल्या सभा… भाजप पक्षाची मतदारसंघात ठामपणाने मांडलेली बाजू या सगळ्याचा विचार करता भाजपही घाटगेंवर अन्याय होऊ देणार नाही असं दिसतंय… घाटगेही अगदी कॉन्फिडंटली राजकारण कुठेही फिरलं तरी मीच आमदार होईल असं सांगतायत…. यावरून येणाऱ्या काळात कागल विधानसभेत अनेक टर्न अँड ट्विस्ट पाहायला मिळू शकतात… पण अद्याप तरी त्याला सुरुवात झालेली नाहीये….बाकी आमदारकीचं घोडे मैदान लांब असलं तरी दोन्ही बाजूंनी आत्तापासूनच प्रचाराला सुरुवात झालीय… महायुतीत नसताना भाजपविरुद्ध रोखठोक भूमिका मांडणारा नेता म्हणूनही मुश्रीफ यांची ओळख होती… फडणवीस, चंद्रकांत पाटील किंवा मोदींच्या विरोधातही मुश्रीफ यांनी कायम आक्रमक भूमिका घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळालं… पण आता मुश्रीफच महायुतीत आल्यानं घाटगेंना भाजप त्यांच्याविरोधात कशी ताकद देणार हाही मोठा प्रश्न आहे…

2009 साली मिरज इथं जातीय दंगल झाली होती. त्यावेळी पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात त्याचे पडसाद उमटले होते. त्यावेळी मुस्लीम असतानाही मुश्रीफ मोठ्या लिडनं विजयी झाले होते… यावरून कागलकर त्यांच्यावर किती विश्वास ठेवतात, हे आपल्याला दिसून येतं… बाकी सत्ताधारी म्हणजेच भाजपसोबत असल्याने मुश्रीफांना येणाऱ्या निवडणुकीत कितपत लॉस होईल? हे सांगता येत नाही… पण विकासाच्या मेरिटच्या बेसिसवर सध्या तरी मुश्रीफच कागलच्या राजकारणात उजवे ठरतात, एवढं मात्र नक्की…बाकी तुम्हाला काय वाटतं? कागल मध्ये येणाऱ्या विधानसभेला मुश्रीफच आपल्या या विजयाचा सिलसिला असाच कायम ठेवतील? की शब्द दिल्याप्रमाणे समरजीत सिंह घाटगे आमदारकीचा गुलाल आपल्या कपाळाला लावतील? तुम्हाला काय वाटतं

रोहित- सूर्यकुमार मुंबईची साथ सोडणार?? पलटणला डबल धक्का बसणार?

Rohit and Suryakumar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयपीएल २०२५ पूर्वीच मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. मुंबईच इंडियन्सच्या संघाचा कणा असलेले रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) हे दोघेही मुंबई इंडियन्सची साथ सोडण्याची शक्यता आहे. दैनिक जागरणच्या एका रिपोर्टनुसार, हे दोन्ही खेळाडू मेगा लिलावात सहभागी होऊ शकतात. असं झालयास आयपीएल इतिहासातील सर्वत यशस्वी संघ मानला जाणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी मोठा धक्का असेल. कारण नुकतंच रोहित शर्माने त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला T20 विश्वचषक जिंकवून दिला आहे, तर सूर्यकुमार यादव भारतीय संघाचा कर्णधार बनला आहे.

दैनिक जागरणच्या वृत्तानुसार, रोहित आणि सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्समधून बाहेर पडू शकतात. अशावेळी कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही खेळाडूंना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करेल. याशिवाय दिल्ली कॅपिटल्सचा संघ सुद्धा रोहित शर्माला घेण्यात रस दाखवू शकेल. रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्या रूपाने फक्त एक फलंदाजच नव्हे तर कर्णधार सुद्धा संघाला मिळेल. त्यामुळे जर रोहित आणि सूर्या मेगा लिलावात उतरले तर त्यांच्यासाठी सर्वात मोठी बोली लागेल हे नक्की.

मुंबईची बिकट परिस्थिती –

दुसरीकडे सूर्यकुमार आणि रोहितने जर मुंबई इंडियन्सची साथ सोडली तर फ्रेंचाइजीला हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा धक्का असेल. कारण मुंबई इंडियन्सने आत्तापर्यन्त ज्या ५ आयपीएल ट्रॉफी जिंकल्या त्या सर्व फक्त रोहित शर्माच्याच नेतृत्वाखाली जिंकल्या आहेत. तरीही मागच्या आयपीएलमध्ये रोहितला हटवून मुंबईने हार्दिक पांड्याला संघाचा नवा कर्णधार केलं. मात्र हार्दिक नेतृत्व करण्यात सपशेल अपयशी ठरला आणि मुंबई इंडियन्स संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर होता. रोहितच्या समर्थकांनी हार्दिकला अनेकदा चिडवलं होते, तसेच मुंबईच्या संघ मॅनेजमेंट सुद्धा नाराजी व्यक्त केली होती. त्यातच आयात जर रोहित स्वतःच संघाबाहेर पडला तर मुंबईच्या फॅन बेसवर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो.

Maharashtra Rain : मुंबई, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा

Maharashtra Rain 24 july

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सध्या अनेक ठिकाणी चांगलीच मुसळधार पावसाला (Maharashtra Rain) सुरुवात झालेली आहे. अनेक ग्रामीण भागातील जनजीवन देखील विस्कळीत झालेले आहे. नदी, नाल्या, धरणे सगळे वाहून जात आहे. अशातच हवामान विभागाने आज राज्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता दिलेली आहे. तसेच अनेक ठिकाणी सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे.

हवामान दिलेल्या माहितीनुसार आज म्हणजे 24 जुलै 2024 रोजी मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस (Maharashtra Rain) सांगितलेला आहे. त्याचप्रमाणे रायगड आणि सातारा या दोन जिल्ह्यांना देखील आज पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे. त्याचप्रमाणे पालघर, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि पुणे या जिल्ह्यांना देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. तसेच विदर्भातील चंद्रपूर, नागपूर, वाशिम आणि अमरावती या भागात देखील आज जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पाऊस चालू आहे. त्यामुळे वारणा, नदी तसेच कृष्णा नदीच्या पाणी पातळी देखील मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. कृष्णा नदीची पाणीपातळी ही 30 ft पर्यंत पोहोचलेली आहे. त्याचप्रमाणे कोणतीही दुर्घटना होऊ नये, म्हणून कृष्णा नदीकाठच्या नागरिकांना स्थलांतर करण्यासाठी सांगली महापालिकेकडून सुरुवात देखील करण्यात आलेली आहे.

कोल्हापूरमध्येही मुसळधार पाऊस- Maharashtra Rain

कोल्हापूरमध्ये देखील मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे येथील लोकांना देखील सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. या ठिकाणी कळंबा तलाव हा आता 100% भरलेला आहे. आणि तलावाच्या आजूबाजूला देखील पाणी बाहेर पडत आहे. त्यामुळे आता अनेक नागरिक हे कळंबा तलाव पाहण्यासाठी गर्दी करत आहे. परंतु या नागरिकांना देखील सावधानतेच इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे.

Budget 2024 : महाराष्ट्राला या अर्थसंकल्पातून छदामही मिळाला नाही, सरकारच्या मनात द्वेष आणि आकस

sanjay raut narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पहिल्यांदाच देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात सरकार कडून अनेक मोठमोठ्या घोषणा कऱण्यात आल्या आणि सर्वसामान्य जनतेला खुश करण्याचा प्रयत्न झाला. यावेळी निर्मला सीतारामन यांनी बिहार आणि आंध्रप्रदेश या २ राज्यांसाठी विशेष निधींची घोषणा केली, मात्र दुसरीकडे महाराष्ट्राचा साधं नावही घेतलं नाही. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे सामना अग्रलेखातून मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. सरकारच्या मनात महाराष्ट्राविषयी किती आकस व द्वेष भरला आहे, हेच यातून दिसून येत असं म्हणत ठाकरे गटाचे जोरदार टीका केली आहे.

सामना अग्रलेखात नेमकं काय म्हंटल?

दीड महिन्यापूर्वी आलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांत ‘मोदी सरकार’ हा गुर्मी दाखवणारा किताब जनतेने हिसकावून घेतला आणि चंद्राबाबू नायडू व नितीशकुमार यांच्या कुबड्यांवर दिल्लीत एनडीएचे सरकार आले. नरेंद्र मोदी कसेबसे तिसऱ्यांदा सत्तेवर विराजमान झाले असले तरी त्यांची खुर्ची तकलादू पायांवर उभी आहे. त्यामुळेच खुर्चीचे दोन पाय असलेल्या बिहार व आंध्र प्रदेश या दोन राज्यांवर अर्थसंकल्पातून निधीची प्रचंड खैरात वाटण्यात आली. हा संपूर्ण देशाचा अर्थसंकल्प आहे की सरकारला पाठिंबा देणाऱ्या दोन पक्षांना खूश करण्याचा संकल्प आहे, असा प्रश्न देशाच्या उर्वरित राज्यांतील जनतेला पडला आहे. वास्तविक केंद्रीय अर्थसंकल्प हा देशातील जनतेच्या आशा- आकांक्षांची पूर्तता करणारा व देशाला विकासाच्या वाटेवर घेऊन जाताना प्रत्येक राज्याला समन्यायी पद्धतीने निधीवाटप करणारा दस्तावेज असायला हवा. मात्र निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या ताज्या अर्थसंकल्पात सर्व राज्यांना समान न्याय हे तत्त्व कुठेच दिसत नाही. जदयुच्या एका कुबडीला सांभाळण्यासाठी बिहारला तब्बल 41 हजार कोटी रुपयांची मदत या अर्थसंकल्पातून करण्यात आली आहे, तर तेलगू देसमची दुसरी कुबडी सांभाळण्यासाठी आंध्र प्रदेशवरही हजारो कोटींची उधळण करण्यात आली आहे. आंध्रची नवी राजधानी अमरावतीच्या उभारणीसाठी तब्बल 15 हजार कोटी रुपये या एकाच आर्थिक वर्षात देऊ करण्यात आले आहेत आणि भविष्यात याच धर्तीवर दरवर्षी याच पद्धतीने अतिरिक्त निधी आंध्र प्रदेशला देण्यात येईल, अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली.

केंद्रीय अर्थसंकल्पाचा राजकारणासाठी व सत्ता टिकवण्यासाठी असा गैरवापर करणे हे कुठल्या आर्थिक शिस्तीत बसते? मग इतर राज्यांनी केंद्र सरकारचे काय घोडे मारले? उत्तर प्रदेशने तर देशाला पंतप्रधान दिला. त्या उत्तर प्रदेशसाठी अर्थसंकल्पात काहीच नाही. केंद्रीय सरकारच्या तिजोरीत कराच्या रूपाने सर्वाधिक भर घालणाऱ्या महाराष्ट्राला या अर्थसंकल्पातून छदामही मिळाला नाही. निधी तर सोडाच; पण अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्र व मुंबईचा साधा उल्लेखही केला नाही. ‘खोकेशाहीच्या माध्यमातून महाराष्ट्रात घटनाबाहय़ सरकार सत्तेवर आणूनही केंद्रीय सरकारच्या मनात महाराष्ट्राविषयी किती आकस व द्वेष भरला आहे, हेच केंद्रीय अर्थसंकल्पातून स्पष्ट झाले. सरकारची कुबडी बनलेल्या आंध्र व बिहार या दोन राज्यांवर सरकारी तिजोरीतून दौलतजादा करणाऱ्या या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासह अनेक राज्यांवर घोर अन्याय झाला आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत सर्वाधिक योगदान देणारे सर्वात मोठे करदाते राज्य असणे हा महाराष्ट्राचा दोष आहे काय? केवळ राजकारण व सरकारची खुर्ची टिकवण्यासाठी देशाची तिजोरी दोन राज्यांत रिकामी करणे, यालाच ‘सब का साथ, सब का विकास’ असे म्हणतात काय? असा सवाल करत सामना अग्रलेखातून केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आलाय.

चांदोली धरण परिसरात भूकंपाचे धक्के!! नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Earthquake in Sangli

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चांदोली धारण परिसरात आज पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. पहाटे 4 वाजून 47 मिनिटांनी भूकंपाने संपूर्ण परिसर हादरला. या भूकंपाची तीव्रता 3 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु असतानाच हा भूकंप घडला. जवळपास काही सेकंद जमिन हादरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे. प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी कि, मागील काही दिवसांपासून सातारा, सांगली जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे चांदोली धरण जवळपास 82 टक्के भरले असून खबरदारीचा उपाय म्हणून सध्या धरणातून पाणी सोडले जात आहे. आज पहाटे ४ वाजून ४७ मिनिटांनी पाण्याचा विसर्ग सुर असतांना अचानक धरण परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. अनेक नागरिक हे झोपेत असतानाच अचानक भूकंपामुळे जमीन हादरली आणि नागरिकांना जाग आली. भूकंपाचे धक्के जाणवताच नागरिकांनी घराबाहेर पळ काढला.

दरम्यान, मागील काही दिवसापासून सांगली जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. पावसाचा जोर दिवसेंदिवस वाढतच चालला असून नदी, नाले तुडुंब भरले आहेत. अनेक नद्यांची पाणीपातळीवाढली आहे. असून पुरस्थिती निर्माण झाली आहे. सध्या चांदोली धरणातून पाणी सोडले जात असून नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आज झालेला भूकंप हा सौम्य असल्यामुळे चांदोली धरणाला धोका नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले.

BSNL VS Jio Plan | BSNL ला टक्कर देण्यासाठी Jio ने आणला स्वस्त रिचार्ज प्लॅन; मिळणार हायसीड डेटा

BSNL VS Jio Plan

BSNL VS Jio Plan | जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच अनेक टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज दरामध्ये वाढ केलेली आहे. एअरटेल, जिओ आणि व्हीआयने देखील त्यांच्या रिचार्ज दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केलेली आहे. अशातच आता सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलला मात्र याचा खूप जास्त फायदा झालेला आहे. बीएसएनएल हे त्यांच्या ग्राहकांसाठी नेहमीच नवनवीन आणि स्वस्त दरात असतात. यावेळी बीएसएनएलने त्यांच्या ग्राहकांना टिकवून ठेवण्यासाठी आणि इतर ग्राहकांना स्वतःकडे आकर्षित करण्यासाठी अनेक नवीन स्वस्त असे प्लॅन लॉन्च केलेले आहेत. परंतु आता bsnl ला टक्कर देण्यासाठी जिओने देखील त्यांचा एक नवीन रिचार्ज प्लॅन मार्केटमध्ये आणलेला आहे.

बीएसएनएल 399 रुपयांचा ब्रॉडबॅंड प्लॅन | BSNL VS Jio Plan

बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला 100 GB डेटा मिळतो. हा प्लॅन आपल्याला सर्वत्र उपलब्ध नाही. बहुतांश ग्रामीण भागामध्ये हा प्लॅन मोठ्या प्रमाणात वापरला जातो. व्यवसायिक इमारती आणि व्यवसायिक ग्राहकांसाठी हा प्लॅन उपलब्ध नाही. परंतु यामध्ये तुम्हाला हाय स्पीड इंटरनेट मिळते.

जिओचा 399 रुपयांचा ब्रॉडबॅंड प्लॅन | BSNL VS Jio Plan

जिओच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला 300 एमबीबीएस स्पीडने 3.3 T.B डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये तुम्हाला बीएसएनएलच्या प्लॅनपेक्षा तीन पटीने जास्त डाटा मिळत आहे. या दोन्ही प्लॅन ची किंमत जरी सारखी असली तरी जीओचा प्लॅन हा तुमच्यासाठी अत्यंत फायद्याचा प्लॅन ठरणार आहे