Thursday, December 25, 2025
Home Blog Page 5801

CAPF कॅन्टीनमध्ये आता फक्त मिळणार स्वदेशी वस्तू- गृहमंत्री अमित शहा

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे उद्भवलेल्या परिस्थितीकडे एक संधी म्हणून पाहण्याचं आवाहन केलं आहे. पंतप्रधान म्हणाले आहेत की, सध्याची जगाची परिस्थिती ही भारतासाठी एक संधी बनू शकते, अशा परिस्थितीत आपल्याला स्वावलंबी बनले पाहिजे. पीएम मोदींनी लोकलसाठी वोकल बनण्याची घोषणा दिली. पंतप्रधानांच्या या आवाहनानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने या दिशेने एक मोठा निर्णय घेतला आहे.

आता केंद्रीय सशस्त्र पोलीस दल अर्थात सीएपीएफच्या (CAPF) कॅन्टीनमध्ये केवळ स्वदेश वस्तूंचीच विक्री होणार आहे. नवा नियम 1 जूनपासून लागू होईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विटरवर याबाबत माहिती दिली. तसंच देशात बनवलेल्या वस्तूंचाच अधिकाधिक वापर करण्याचं आवाहन त्यांनी केलं. अमित शाह यांनी सांगितलं की, “सर्व सीएपीएफच्या कॅन्टीनमध्ये आता फक्त देशात बनलेल्या उत्पादनांचीच विक्री करण्याचा निर्णय गृह मंत्रालयाने आज घेतला आहे. 1 जून 2020 पासून देशभरातील सर्व सीएपीएफ कॅन्टीनमध्ये हा निर्णय लागू होईल. या निर्णयामुळे जवळपास 10 लाख सीएपीएफ कर्मचाऱ्यांचे 50 लाख नातेवाईक स्वदेशी उत्पादनांचा वापर करतील.”

याशिवाय अमित शहा यांनी देशातील लोकांना देशात बनवलेल्या जास्तीत जास्त उत्पादनांचा वापर करण्याचे आवाहनही केले. त्यांनी लिहिले, ‘मी देशातील लोकांना आवाहन करतो की तुम्ही देशात तयार केलेल्या उत्पादनांचा जास्तीत जास्त वापर करा आणि इतर लोकांनाही प्रोत्साहित करा. प्रत्येक भारतीयाने देशात (स्वदेशी) बनवलेल्या उत्पादनांचा वापर करण्याचे वचन दिले तर पाच वर्षांत देशातील लोकशाही स्वयंपूर्ण होऊ शकते अशी अशाही अमित शहा यांनी व्यक्त केली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

केंद्रानं देशातील सर्व देवस्थानांकडील सोनं ताब्यात घ्यावं- पृथ्वीराज चव्हाण

सातारा । केंद्र सरकारनं देशातील सर्व देवस्थान ट्रस्टकडे पडून असलेलं सोनं कर्जरूपानं ताब्यात घ्यावं, अशी मागणी माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशात पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळं देशातील अर्थकारण ठप्प पडलं असून त्याला चालना देण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांनी अत्यंत महत्त्वाचा उपाय केंद्र सरकारला सुचवला आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांनी याबाबत ट्विट करत म्हटलं कि,” केंद्र सरकारने ताबडतोब देशातील सर्व देवस्थान ट्रस्टमध्ये पडून असलेले सोने कर्जाने ताब्यात घ्यावे. जागतिक सुवर्ण परिषदेच्या (World Gold Concil) अंदाजानुसार देशात १ ट्रिलियन डॉलर (किंवा ७६ लाख कोटी रुपये) इतके सोने आहे. सरकारने हे सोने १ किंवा २ टक्के व्याजाने परतीच्या बोलीवर ताब्यात घ्यावे.” असं चव्हाण यांनी केंद्राला सुचवलं आहे.

दरम्यान, मंगळवारी पंतप्रधान मोदी यांनी लॉकडाऊनमुळं ठप्प झालेल्या अर्थव्यवस्थेमध्ये प्राण फुंकण्यासाठी २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. पृथ्वीराज चव्हाण यांनी या घोषणेचं स्वागत केलं आहे. अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी सरकारनं जीडीपीच्या किमान १० टक्के प्रोत्साहन पॅकेज द्यावं, अशी मागणी मी सातत्यानं करत होतो. तसं पाऊल सरकारनं टाकल्याबद्दल मी समाधानी आहे. आता या पॅकेजचा योग्य विनियोग होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

क्रिकेटमध्ये अंपायर नियम बनवत नाहीत, आम्ही फक्त त्यांना अंमलात आणतोः सायमन टॉफेल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माजी आंतरराष्ट्रीय पंच सायमन टॉफेलचा असा विश्वास आहे की पंचांनी क्रिकेटच्या मैदानावर परत येण्यापूर्वी त्यांच्या निर्णय स्किल्सवर कामी करण्यासाठी ‘सराव सामना’ किंवा ‘ट्रायल मॅच’ मध्ये भाग घ्यावा. आयसीसीकडून पाच वेळा सर्वश्रेष्ठ पंच म्हणून निवडले गेलेले टॉफेल हे आयएएनएसला दिलेल्या खास मुलाखतीत म्हणाले की, “क्रिकेट खेळाविषयी ही एक गोष्ट अशी आहे की आपण ज्या पद्धतीने खेळतो त्याचा अभ्यास करत नाही. होय, आम्हाला नेट नेशन्सची गरज आहे. आणि इतरही अनेक गोष्टी सापडल्या आहेत. परंतु शेवटी ते खर्‍या अर्थाने प्रशिक्षण घेणे नसते. “

ते म्हणाले, “फिटनेस हा नेहमीच चांगला असतो. हा एक मूलभूत पाया आहे. पंचांसाठी, हे ज्ञानामधील मूलभूत गोष्टींपैकी एक आहे. परंतु ते बाहेर पडू शकत नसल्याने त्यांच्या निर्णयाच्या कौशल्यावर सराव आणि काम करण्यास सक्षम नाहीत. हे करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे प्रत्यक्षात सामने. ” ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार इयान चॅपेल यांनी अलीकडेच सांगितले की, गोलंदाजांना मदत करण्यासाठी बॉल टेम्परिंगला मान्यता देण्यात यावी.

England should've been given five runs, not six: Simon Taufel ...

या निर्णयाने पंचांची भूमिका कशी बदलेल असे विचारले असता टॉफेल म्हणाले की, “मी यावेळी खेळापासून दूर जाणार नाही. जेव्हा सरकारी यंत्रणा आणि नियम बनविणारे एखाद्या तज्ञांशी संवाद साधतील आणि त्याबाबत तज्ञांशी सल्ल्याचा विचार करून मग काय होईल ते पहा. “

ते म्हणाले, “या संदर्भात सुशिक्षित लोकांशी एक सकारात्मक चर्चा होईल. ते खेळाडू आणि पंचांच्या चांगल्या हितासाठी बद्ध आहेत. ते प्रत्यक्ष व्यवहार पाहतील तसेच फलंदाजी आणि बॉल यांच्यात संतुलन साधतील. क्रिकेटमधील पंच कायदा तयार करत नाही तर आम्ही फक्त त्यांची अंमलबजावणी करतो. “

रिकाम्या स्टेडियममध्ये प्रेक्षकविना क्रिकेट सुरू करण्याबाबत विचारले असता टॉफेल म्हणाले, “क्रिकेट पंच म्हणून, प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या स्टेडियमचे बरेच फायदे तसेच तोटेही आहेत. स्टेडियममध्ये आवाजाने आणि प्रेक्षकांनी भरलेल्या स्टेडियममध्ये काम करणे खूप अधिक आव्हानात्मक आहे. त्याचा फायदा असा आहे की आपण आपली कार्यक्षमता वाढवू शकता. “

Pakistan has been changed now, everything is fine here: Simon Taufel

ते म्हणाले, “मी जवळपास ३०० आंतरराष्ट्रीय सामन्यांत मैदानावर, थर्ड अंपायर किंवा चौथ्या अंपायर म्हणून काम पहिले आहे. यापैकी बहुतेक सामन्यांमध्ये बरे च प्रेक्षक होते. असे बरेच सामने असे आहेत जे प्रेक्षकांशिवाय राहिले आहेत. आम्ही प्रत्येक व्यावसायिक खेळामध्ये आणि जीवनाच्या प्रत्येक वळणावर त्याचे अनुसरण करतो. आपल्याला जे करायचं आहे त्याचे आम्ही अनुसरण करू. “

टॉफेल म्हणाले, “काही मूलभूत गोष्टी आहेत. आम्हाला टीव्हीवर सामने पाहायचे आहेत याचा अर्थ असा आहे की आपण समुदायिक पातळीवर देखील खेळ खेळू शकतो. आम्हाला सुरक्षिततेची आणि लोकांच्या हिताची मूलभूत तत्त्वे याची खात्री करुन घेण्याची देखील गरज आहे. “

Umpire Simon Taufel announces retirement | Stuff.co.nz

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

इन्कम टॅक्स रिटर्न्स ३० नोव्हेंबरपर्यंत भरता येणार; निर्मला सीतारामन यांची घोषणा

नवी दिल्ली । आयकरदात्यांना मोठा दिलासा देणारी एक घोषणा आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. इन्कम टॅक्स रिटर्न्स भरण्याची मुदत ३० नोव्हेंबर पर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजशी निगडीत अधिक माहिती देण्यासाठी आज सीतारामन यांनी एक पत्रकार परिषद घेतली. त्या दरम्यानच त्यांनी ही घोषणा केली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

‘आत्मनिर्भर भारत’ची बीजे ‘एनडीए-१’च्या कार्यकाळातच रोवली गेली- निर्मला सीतारामन

नवी दिल्ली । काल देशाला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘आत्मनिर्भर भारत’चा पुनरुच्चार केला होता. दरम्यान, केंद्रात २०१४ मध्ये सत्तेत आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए-१ (राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार) च्या कार्यकाळाच ‘आत्मनिर्भर भारत’ची बीजे रोवली गेली. समाजातील प्रत्येक घटकांसाठी केलेल्या सुधारणा आज चांगले परिणाम दाखवत आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. पंतप्रधान मोदींनी घोषणा केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची अधिक माहिती देताना सीतारामन यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्या बोलत होत्या. या पत्रकार परिषदेत अर्थराज्य मंत्री अनुराग ठाकूर सुद्धा उपस्थित होते.

विकासाला चालना देण्याबरोबरच स्वावलंबी भारतासाठी २० लाख कोटी रुपयांच ‘आत्मनिर्भर भारत अभियान’ हे पॅकेज तयार करण्यात आले आहे, असे सीतारामन यांनी सांगितले. सीतारामन यांनी दाक्षिणात्य भारतीयांना ‘आत्मनिर्भर भारत’ हे तामिळ, तेलगू आणि मल्याळम आणि कन्नड या चार भाषांमध्ये भाषांतरित करुन सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए-१च्या कार्यकाळात’आत्मनिर्भर भारत’ची बीजे रोवली गेली. २०१४ ते २०१९ या कालावधीत मोदी सरकारने सुधारणांचा धडाका लावला असं सीतारामन यांनी सांगितलं.

मोदी सरकारने जनतेच्या समस्या ऐकल्या आणि समस्यांचे निराकरण केले. स्थलांतरित आणि गरिबांचा विचार करता थेट बँक खात्यात अनुदान दिल्याने आजच्या टाळेबंदीमध्ये फायदेशीर ठरली. बँक प्रतिनिधींनी गरिबांच्या घरी जाऊन त्यांना पैसे दिले. डीबीटी, मायक्रो इन्शुरन्स, जनधन, स्वच्छ भारत योजना, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना तसेच कृषी क्षेत्रात पीएम किसान योजना , पीएम फसल योजना या निर्णयक ठरल्या. बँकिंग क्षेत्रात स्वच्छ ताळेबंद , इज ऑफ डुईंग बिझनेस, जीएसटी लागू कोळसा क्षेत्रात सुधारणा, मत्स्य व्यवसायात सुधारणा करण्यात आल्या. वीज निर्मितीत भारत स्वावलंबी बनला असल्याचे त्यांनी सांगितलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

औरंगाबादेत कोरोना रुग्णांची संख्या 677 वर ; नवीन 24 रुग्णांची भर

औरंगाबाद प्रतिनिधी l कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे. त्यात आज आलेल्या अहवालानुसार शहरातील कोरोनाबधितांची संख्या साडे सहाशेच्या पुढे गेली आहे. शहरात आज पुन्हा २४ जणांचा कोरोनाचा अहवाल पॉजिटिव्ह आल्याने शहरातील कोरोनाबधितांची संख्या ६७७ वर गेली असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी दिली.

शहराचा कोरोनाबधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे चिंता देखील वाढताना दिसत आहे. त्यात कालपर्यंतचा कोरोनाबधितांची संख्या पाहता ६५३ वर गेली होती. त्यात आज सकाळी आलेल्या अहवालानुसार २४ कोरोनाबधितांची भर पडली.

त्यात रामनगर-१, संजयनगर-२, भावसिंगपुरा-१, पदमपुरा-१, नंदवन कॉलनी-५, पुंडलीकनगर-२, हुसेन कॉलनी-३, गांधी नगर-१, जयभवानीनगर-१, गारखेडा विजयनगर-१, रहमीनिया कॉलनी-१, सातारा परिसर-१, घाटी परिसर-१, एन-८-१, भडकलगेट-१, अरुणोदय कॉलनी-१ असे एकूण २४ जणांचा यात समावेश आहे. यामुळे आज कोरोनाबधितांची संख्या ६७७ वर गेली. ६७७ पैकी १९९ कोरोनामुक्त झाले. तर १७ जणांचा मृत्यू झाला तर सध्या ४६१ रुग्णांवर उपचार सुरू आहे.

काँग्रेसची दारं नाथाभाऊंसाठी नेहमी खुली- बाळासाहेब थोरात

मुंबई । विधान परिषदेचं तिकीट नाकारल्यान पक्षावर नाराज असलेले भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आपल्याला इतर पक्षांकडून ऑफर असल्याचा गौप्यस्फोट केला होता. तसेच कोरोनाचं संकट संपल्यानंतर निर्णय घेऊ असं त्यांनी म्हटलं आहे. त्यावर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी स्पष्टीकरण देत आपण अशी कुठलीही ऑफर खडसे यांना दिली नसल्याचे म्हटलं आहे. मात्र, खडसेंसाठी आमची दारं कायम खुली असून आम्ही त्यांचं स्वागतच करु असं बाळसाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

”आम्ही कोणतीही ऑफर एकनाथ खडसेंना दिली नाही. भाऊ आम्ही सोबत आहोत असं बोलल्याचा अर्थ तुम्ही कसाही लावू शकता. भाजपा पक्षात होणारी एकनाथ खडसेंची अवहेलना पहावत नाही. काँग्रेसची दारं एकनाथ खडसेंसाठी नेहमी खुली आहेत,” असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. ”भाजपाला जनमानसाचा आधार असलेला, स्वावलंबी नेता नको असतो असं मला वाटतं. भाजपात बहुजन समाजाच्या नेत्याचा प्रभाव वाढू नये याची काळजी नेहमी घेतली जाते. भाजपाचा अभ्यास केला तर तसा तर्क काढला जाऊ शकतो. पक्षात राहूनही एकनाथ खडसेंना अंतरंग उशिरा कळले,” असंही यावेळी त्यांनी सांगितलं.

एकनाथ खडसे माझे फार जुने मित्र आहेत. १९९० ला विधानसभेत आले तेव्हापासून आम्ही एकत्र काम करत आहोत. पक्ष वेगळे असले तरी आमच्यात मैत्री आहे. एक समर्थ विरोधी पक्षनेता आम्ही त्यांच्यात पाहिला. असा नेता जर काँग्रेसच्या विचारासोबत येत असेल तर आम्ही स्वागतच करु. ऑफर दिली की नाही हे महत्त्वाचं नसून आम्ही त्यांचे स्वागतच करु, असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे. दरम्यान, इतर नाराज नेत्यांना संपर्क करण्याचा काँग्रेसने कोणताही प्रयत्न केलेला नाही आणि करणार नाही. पण त्यांनी भाजपाची पुढील रणनीती देशाच्या आणि आपल्या हिताची आहे का ओळखणं गरजेचं आहे,” असा सल्ला बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

व्यथा मजुरांची|रस्त्यातून चालत जातानाच ‘तिने’ दिला बाळाला जन्म, त्यानंतर बाळासहित चालली तब्बल १६० किलोमीटर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन l सरकारने एवढे प्रयत्न केल्यानंतरही काही परप्रांतीय मजूर आपल्या घरी जाण्यासाठी अजूनही पायी प्रवास करताना दिसत आहेत. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र बॉर्डरवर बाळाला जन्म देऊन 1 तासानंतर पुन्हा 160 किलोमीटर पायी प्रवास करणाऱ्या महिलेची कहाणी ही अंगावर शहारे आणणारी आहे.

शकुंतला नावाची ही महिला आपल्या पतीसोबत नाशिकला राहत होती. ही महिला गरोदर असून ती नववा महिना संपत आल्यावर नाशिकमध्ये असणाऱ्या सटाणा या गावापासून मध्यप्रदेशमधील बीजसन या गावी पायी निघाली. हे अंतर जवळपास 1 हजार किलोमीटर आहे. तिने 5 मेला आपल्या घरापासून 160 किलोमीटर अलीकडे असतानाच रस्त्याच्या कडेलाच बाळाला जन्म दिला. एवढंच नाही तर बाळंतीण झाल्यावर या महिलेने आपलं बाळ घेऊन जवळपास 160 किलोमीटरचा प्रवास केला आहे.

ही महिला एवढा प्रवास करून शनिवारी आपल्या पतीसह मध्यप्रदेशमधील बीजसन येथे पोहचली. तेव्हा तेथील चेक-पोस्ट वर असलेल्या इंचार्जे महिलेने शकुंतलाची चौकशी केली. तेव्हा शकुंतलाने हा सर्व घडलेला प्रकार सांगितला. तेव्हा तेथील पोलीस कर्मचारी आणि इतरांकडे तर काही शब्दच नव्हते. शकुंतलाचे पती राकेश कौल यांनी माध्यमांशी संवाद साधला तेव्हा सांगितलं की प्रवास खूप कठीण होता. मात्र आम्हाला रस्त्यात खूप दयाळू लोक भेटले. एका शीख कुटुंबाने आमच्या नवजात बाळाला कपडे आणि आम्हला रस्त्यात लागणारे आवश्यक ते सामान दिल. नाशिकमध्ये उद्योगधंदे बंद आहेत. त्यामुळे माझी नोकरी गेली. आमच्यावर उपासमारीची वेळ आली. त्यामुळे आम्हाला हा खडतर प्रवास करावा लागला. अस शकुंतलच्या पतीने सांगितलं.

महाराष्ट्रातील ५ हजार एकर टोमॅटो पिकाचं नुकसान ; कोरोना काळातील नुकसानीचं नक्की कारण काय?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन l संपूर्ण जग कोरोनाव्हायरसच्या घातक विषाणूशी लढत असताना भारतातील शेतकऱ्यांना आता एका नवीन अडचणीला सामोरं जावं लागत आहे. विशेषतः महाराष्ट्रातील शेतकरी आपल्या शेतातील पिकांवर आलेल्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे हैराण झाले आहेत.

संचारबंदीची आणि लॉकडाऊनची अंमलबजावणी काटेकोर करुनसुद्धा त्याचा अपेक्षित परिणाम दिसून येत नाही. असं असतानाच महाराष्ट्रातील टोमॅटो पिकावर एका अनोळख्या विषाणूने मारा केल्याचं दिसून येत आहे. अहमदनगर, नाशिक आणि पुणे भागातील जवळपास ६०% पिकांचं मागील १० दिवसांत नुकसान झालं असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.

या विषाणूमुळे टोमॅटोचा लाल रंग पिवळा-काळा होतोय. त्याशिवाय तयार टोमॅटोमध्ये काळ्या रंगाचा डाग तयार होत आहे. गंभीर बाब म्हणजे किटकनाशकं मारुनही हा रोग आटोक्यात येत नाही. टोमॅटोचा रंग बदलला असल्याने ग्राहक, व्यापारी माल घेत नसल्याचं, मोठं नुकसान होत असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं आहे. टोमॅटोच्या बियाणांमध्ये दोष होता का, याबाबत कृषी विभागाने शोध घेण्याची मागणी किसान सभेने केली आहे. महात्मा फुले कृषी विद्यापिठाने टोमॅटोचे सॅम्पल गोळा केले असून ते बंगळुरुला पाठवण्यात येणार आहेत. सॅम्पल तपासून जो अहवाल येईल त्यानंतर योग्य ती कारवाई करण्याचे सांगण्यात आले आहे.

निर्मला सीतारामन यांनी उद्योगांसाठी सांगितलेल्या सहा महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या??

टीम हॅलो महाराष्ट्र | निर्मला सीतारामन यांनी आत्मनिर्भर भारतासाठीच्या उद्योगविषयक धोरणांकडे लक्ष देत सहा महत्वाच्या गोष्टींविषयी आज भाष्य केलं.

१) मध्यम-सूक्ष्म आणि लघु, कुटीर आणि गृहउद्योगांना सध्या पैशांची कमतरता जाणवत असून या उद्योगाद्वारे देशातील १२ करोड लोकांना रोजगार मिळतो. या सर्व उद्योगांना ३ लाख कोटींचं विनातारणी कर्ज देण्याचं अर्थमंत्र्यांतर्फे सांगण्यात आलं.

२) सरकारतर्फे २० हजार करोड रुपयांची तरतूद आर्थिक तुटीत असलेल्या संस्थांना देण्यात येणार असून त्यांना चालना देण्यासाठी हे आवश्यक असल्याचं सांगण्यात आलं. देशातील ४५ लाख सूक्ष्म उद्योजकांना फायदा होण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी जाहीर केलेल्या पॅकेजची मदत होईल असंही यावेळी सांगण्यात आलं.

३) सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांना वाढीसाठी आवश्यक पैसे उपलब्ध होण्यासाठी ५० हजार कोटींची तरतूद करण्यात आली असून यासाठी ‘फंडांचा फंड’ काढण्यात येईल असंही सीतारामन यांनी यावेळी सांगितलं.

४) MSME (सूक्ष्म-मध्यम-मोठे उद्योगांची) व्याख्या बदलण्यात आली असून यातील गुंतवणुकीची मर्यादा वाढवण्यात आली आहे. लघुउद्योजकांसाठी १ करोड रुपयांची गुंतवणूक आणि ५ करोड रुपयांची उलाढाल आतापासून ग्राह्य धरण्यात येणार आहे. उत्पादन आणि सेवा पुरवठा करणाऱ्यांसाठी ही मर्यादा सारखीच राहील असं सांगण्यात आलं आहे. मध्यम उद्योगांसाठी १० करोड रुपयांची गुंतवणूक आणि ५० करोड रुपयांची उलाढाल तर मोठ्या उद्योगांसाठी २० करोड रुपयांची गुंतवणूक आणि १०० करोड रुपयांची उलाढाल ही सुधारणा करण्यात आली आहे.

५) ३ लाख करोड रुपयांची मदत जाहीर केल्यानंतर यांच्या कामात आणि स्पर्धेत वाढ होईल हे लक्षात घेऊन २०० कोटींपेक्षा मोठी असलेली जागतिक कंत्राटे घेतली जातील आणि ती या उद्योगांना जोडली जातील असं यावेळी सांगण्यात आलं.

६) ४५ दिवसांच्या मुदतीमध्येच या कर्जाचं वाटप करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”