Thursday, December 25, 2025
Home Blog Page 5800

नक्षलवाद्यांनी ६ दिवसांपूर्वी अपहरण केलेल्या जवानाला पत्नीच्या एका विनंतीवरुन दिले सोडून !

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ४ मे रोजी छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी एका जवानला पळवून नेले. हा जवान ६ दिवस नक्षलवाद्यांच्या ताब्यात होता. नक्षलवाद्यांनी त्या युवकाचे डोळे बांधून त्याला जंगलात लपवून ठेवले आणि त्यानंतर त्या जवानाची बायको आपल्या नवऱ्याला सोडण्यासाठी दररोज भटकत राहिली. अखेरीस त्या जवानांची बायको काही पत्रकारांसह नक्षलवाद्यांच्या जनअदालत येथे पोहोचली आणि आपल्या नवऱ्याला सुखरुप परत आणले.

विजापूर जिल्ह्यातील भोपाळपट्टणम येथे पोलिस हवालदार पदावर तैनात असलेले संतोष कट्टम ४ मे रोजी गोरणा गावात जत्रेला गेले होते. तेथे नक्षलवाद्यांनी त्याचे अपहरण केले. नक्षलवाद्यांनी त्या युवकाचे डोळे बांधले आणि त्याला आपल्या गडावर नेले. जेथे एकीकडे संतोष कट्टम हा तरुण आपल्या मृत्यूची वाट पहात होता, तर दुसरीकडे आपल्या पतीचा जीव वाचवण्यासाठी त्याची पत्नी सावित्री दररोज जंगलातून त्याला शोधत फिरत होती.

2 Naxals arrested in Chhattisgarh's Bijapur - India News

यावेळी संतोषच्या सुटकेसाठी विजापूरचे काही पत्रकार पुढे आले. त्यांना बातमी मिळाली की सोमवारी नक्षलवादी संतोषला शिक्षा देण्यासाठी जन अदालत बोलावत आहेत. नक्षलवाद्यांच्या गढीतील या सामूहिक कोर्टात सावित्री पत्रकारांसह पोहोचली. त्यांना एक १० वर्षाची मुलगीही आहे. नक्षलवाद्यांसमोर सावित्रीने आपल्या पतीच्या जीवनदानासाठी विनवणी केली आणि शेवटी पोलिसांची नोकरी सोडण्याचे वचन घेऊन नक्षलवाद्यांनी त्यांना सोडून दिले.

नक्षलवाद्यांच्या या सामूहिक कोर्टात आजूबाजूच्या गावांमधून दीड हजाराहून अधिक गावकरी दाखल झाले होते. या अपहरणची संपूर्ण घटना नक्षलवाद्यांच्या गंगलूर एरिया कमिटीने घडवून आणली होती. नक्षलवादी नेते दिनेश मोदीयम यांनी म्हटले आहे की, हवालदार संतोष यांनी पोलिसांची नोकरी सोडून शेती करून आपला उदरनिर्वाह चालवावा.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

भाव नसल्यनाने तरुण शेतकऱ्याने शेतात साठवून ठेवला 25 टन कांदा..

सोलापूर प्रतिनिधी । सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील चिखलठाण येथिल शेतकऱ्याने आधुनिक पद्धतीने कांदा चाळ बनवली आहे. तसेच कांद्याला अपेक्षित भाव नसल्याने त्यात 25 टन कांदा साठवून ठेवला आहे. ज्ञानेश्वर पाटील अस या शेतकऱ्याचं नाव आहे. पाटील यांनी आपल्या शेतातील केळीच्या सव्वादोन एकर क्षेत्रामध्ये कांदा लागवड केली आहे. या शेतकऱ्याने कांद्याच्या आंतरपिकापासून ५६ टन कांद्याचे उत्पादन घेतले आहे.

सध्या लॉकडाऊनच्या काळात कांद्याला अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतातील उपलब्ध साहित्यापासून कांदाचाळीची उभारणी करून या कांद्याची साठवणूक करून ठेवली आहे. कृषी पदविकेचे शिक्षण झालेल्या ज्ञानेश्वरने शिक्षणानंतर नोकरी न करता शेती करण्याचा निर्णय घेतला. तसेच गावात कृषी सेवा केंद्र सुरू केले. २०१३ पासून शेतीमध्ये मिळालेल्या अनुभवातून वेगवेगळी पिके घेत त्यामधून विक्रमी उत्पादन मिळवले आहे. सध्या त्यांनी आपल्या सव्वादोन एकर क्षेत्रावर केळीचे पीक घेतले आहे. केळी लागवड करण्यापूर्वी पूर्व मशागतीनंतर पंचगंगा फुरसुंगी पुणे जातीच्या फेक पद्धतीने लागवड केली. ठिबक सिंचनच्यासाह्याने पाणी व्यवस्थापन केले. सध्या त्यांच्या या क्षेत्रांमध्ये अंदाजे छप्पन्न टन कांद्याचे उत्पादन मिळाले आहे.

दरम्यान, लॉकडाऊनमुळे कांद्याला अपेक्षित दर मिळत नसल्याने २५ टन कांदा चाळीत साठवण्याचा निर्णय घेतला. स्वतःच्या शेतात उपलब्ध असलेल्या साहित्याचा वापर करून शंभर फुटाची कांदाचाळीची उभारणी केली. त्यांना या कांद्यापासून २० रुपये किलो दर अपेक्षित असून असा दर मिळाल्यास या आंतर पिकातून त्यांना ११लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

यंदाच्या अर्जुन पुरस्कारासाठी बुमराहच्या नावाची BCCI करू शकते शिफारस

मुंबई । क्रीडा क्षेत्रात मानाचं स्थान असलेल्या अर्जुन पुरस्कारासाठी भारतीय संघाचा प्रमुख जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहचं नाव बीसीसीआय यंदा पाठवू शकते. दरवर्षी देशातील प्रत्येक क्रीडा संस्थेला दोन नावांची शिफारस करता येत. २०१९ साली बुमराहचं नाव चर्चेत होतं, मात्र रविंद्र जाडेजासोबतच्या शर्यतीत बुमरहाचं नाव मागे पडलं होतं. दरम्यान, आता पुन्हा यावर्षी बुमराहच नाव अर्जुन पुरस्काराच्या शर्यतीत आहे. गेल्या काही वर्षांमधली बुमराहची कामगिरीची दाखल घेत बीसीसीआयचे अधिकारी बुमराहच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याची शक्यता आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये बुमराहची कामगिरी अतिशय चांगली राहिलेली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये १४ कसोटीत ६८ बळी, ६४ वन-डे सामन्यांत १०४ बळी आणि ५० टी-२० सामन्यात ५९ बळी अशी बुमराहची आतापर्यंतची कामगिरी राहिलेली आहे. काही दिवसांपूर्वी बुमराह आयसीसीच्या वन-डे क्रमवारीत पहिल्या स्थानावर होता.

तर दुसरीकडे बीसीसीआयने यंदा अर्जुन पुरस्कारासाठी दोन खेळाडूंची नावं पाठवण्याचं ठरवल्यास सलामीवीर शिखर धवनचं नावही चर्चेत असल्याचं समजतंय. २०१८ सालच्या पुरस्कारासांठी धवनचं नाव बीसीसीआयने पाठवलं होतं, मात्र अंतिम यादीत त्याला स्थान मिळू शकलं नाही. २०१९ साली बीसीसीआयने बुमराह, रविंद्र जाडेजा आणि मोहम्मद शमी या ३ खेळाडूंच्या नावाची शिफारस केली होती, ज्यात अंतिम यादीत फक्त रविंद्र जाडेजाला स्थान मिळालं होतं.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

अफगाणिस्तानात मॅटरनिटी हॉस्पिटलवर दहशतवादी हल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अफगाणिस्तानात मॅटरनिटी हॉस्पिटलवर दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात १३ जण ठार झाल्याची माहिती मिळाली आहे. या हल्ल्यात महिला आणि मुलेही ठार झाली आहेत. हॉस्पिटलमध्ये प्रवेश करताच दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केल्याचे सांगण्यात येते आहे. रुग्णालयात दाखल केलेल्या महिला आणि लहान मुलांवरही यावेळी हल्ले झाले. मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात दोन नवजात मुलेही ठार झाली आहेत.

अफगाणिस्तानचे माजी अध्यक्ष हमीद करझाई यांनी काबूलमधील प्रसूती रुग्णालयावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची तीव्र शब्दांत टीका केली आहे. हमीद करझाई यांनी ट्विटद्वारे आपला संदेश दिला आहे. त्यांनी लिहिले आहे – काबूलमधील प्रसूती रुग्णालयावर झालेल्या बॉम्बस्फोटाची मी जोरदार टीका करतो, ज्यामध्ये नवजात, इतर मुले आणि महिलाही ठार झाल्या आहेत. हा हिंसाचार हे आपल्या देशाबद्दल आणि आपल्या लोकांविरूद्ध केलेल्या परदेशी कट रचण्याचा भाग असल्याचे स्पष्टपणे दिसून येते.

 

काबूलमधील प्रसूती रुग्णालयावर आज दहशतवादी हल्ला झाला आहे. हल्ल्यादरम्यान दहशतवाद्यांनी जोरदार गोळीबार केला तसेच हॅन्ड ग्रेनेडही फेकले. या हल्ल्यात १३ जणांचा मृत्यू झाला आहे तसेच या हल्ल्यात बरेच लोक जखमीही झाले आहेत.

माध्यमांच्या वृत्तानुसार, ठार झालेल्यांमध्ये सुरक्षा कर्मचारीही आहेत. या दहशतवादी हल्ल्यात अनेक डॉक्टर अडकल्याची माहितीही मिळाली आहे. रुग्णालयाच्या आतून अजूनही गोळीबाराचे आवाज ऐकू येत आहेत.

काबूलच्या दष्ट परिसरातील रुग्णालयावर हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सुमारे १४० लोक अजूनही आतमध्ये अडकले आहेत. अफगाणिस्तानच्या अंतर्गत मंत्रालयाने माहिती दिली आहे की सुमारे ३ हल्लेखोरांनी हा हल्ला केला आहे. एक हल्लेखोर ठार झाल्याची माहिती मिळाली आहे, तर उर्वरित दोघं बरोबर चकमकी चालू आहे.

या रुग्णालयात मोठ्या संख्येने परदेशी लोकही काम करतात. असे म्हटले जात आहे की हल्लेखोरांचे लक्ष्य हे परदेशी नागरिकच आहेत. अफगाणिस्तानच्या सुरक्षा दलाने हे रुग्णालय जवळपास रिकामे केले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

मध्य प्रदेशात जैन साधूंच्या स्वागतासाठी लॉकडाऊनचे नियम धाब्यावर; रस्त्यावर लोकांची तुडुंब गर्दी

सागर, मध्यप्रदेश । देशभरात कोरोनाचा संसर्गावर नियंत्रण मिळवता आलं आहे. त्यामुळं गेले दीड महिन्यापेक्षा संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये आहे. याकाळात कुठल्याही सार्वजनिक किंवा धार्मिक उत्सवानिमित्त एकत्र येण्याला पूर्णपणे बंदी आहे. मात्र, तरीही अनेक ठिकाणी लॉकडाउनच्या काळात घातलेले निर्बंध धाब्यावर बसवून धार्मिक कारणांवरून लोक एकत्र येत असल्याचे दिसत आहे. मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात लॉकडाउनच्या नियमांचं उल्लंघन करून कोरोना संसर्गाला हातभार लावणारा प्रकार घडला आहे. या ठिकाणी जैन साधू प्रमाणसागर यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर गर्दी जमा होऊन सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं उल्लंघन करण्यात आल्याचं समोर आलं आहे.

जैन साधू प्रमाणसागर आपल्या २० अनुयायांसोबत सागर जिल्ह्यातील बांदा येथे पोहोचले होते. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. एएनआयने गर्दीचा व्हिडीओ ट्विट केला असून यावेळी लोकांकडून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं उल्लंघन करण्यात आल्याचं स्पष्ट दिसत आहे.मध्य प्रदेश पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असून चौकशीचा आदेश दिला आहे. सहाय्यक उपनिरीक्षक प्रवीण भुरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, “घटनेचा तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जर सोशल डिस्टन्सिंग आणि जमावबंदीच्या नियमांचं उल्लंघन करण्यात आलं असेल तर कारवाई योग्य करण्यात येईल अशी माहिती भुरिया यांनी दिली आहे. तर दुसरीकडे कोरोनाचा फटका बसलेल्या राज्यांमध्ये मध्य प्रदेशचाही समावेश आहे. मध्य प्रदेशात कोरोनाचे ३९८६ रुग्ण असून २२५ जणांचा मृत्यू झाला आहे. इंदूर, भोपाळ, उज्जैन आणि खांडवा ही राज्यातील प्रमुख शहर कोरोनाचे हॉटस्पॉट आहेत. अशात सागर जिल्ह्यात एका जैन साधूसाठी जमलेली गर्दी राज्यातील कोरोनाचे संकट आणखी वाढवणारी ठरू शकते.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

मोदींचं भाषण ऐकून नेहमीच प्रेरणा मिळते; ‘या’ बॉलिवूड अभिनेत्याने मानले पंतप्रधानांचे आभार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशवासीयांशी संवाद साधत २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. यावेळी नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण ऐकून बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांना करोनाशी लढण्याची प्रेरणा मिळाली. या प्रेरणादायी भाषणासाठी अनुपम खेर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत.

 

“नरेंद्र मोदी जेव्हा बोलतात तेव्हा देशच नाही तर संपूर्ण जगही त्यांचे भाषण ऐकण्यासाठी सज्ज होतं. त्यांच्या भाषणातून आम्हांला नेहमीच प्रेरणा मिळते. जेव्हा १३० कोटी भारतीय आत्मनिर्भरतेचं भांडवल घेऊन एकत्र येतील तेव्हा सम्पूर्ण जगात आपल्या कोणीही थांबवू शकणार नाही. आपल्याला निश्चितच यश मिळेल. २०,००,००० कोटी असे दिसतात. २०००००००००००००! गणित तर ठिक आहे ना?” अशा आशयाचं ट्विट अनुपम खेर यांनी केलं आहे. त्यांचं हे ट्विटही सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोनाशी लढण्यासाठी २० लाख कोटीं रुपयांचं पॅकेज जाहीर केलं आहे. यावेळी देशातील सर्व प्रकारच्या उद्योगांना चालना देण्यासाठी हे पॅकेज त्यांनी दिले आहे. देशासाठी रात्रंदिवस झटणाऱ्या शेतकरी, मजुर तसेच प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या मध्यमवर्गीयांसाठी हे पॅकेज आहे असंही नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

पोलिसांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदिक काढ्याचा उतारा

सोलापूर प्रतिनिधी । कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखताना पोलिसांची दमछाक होत आहे. अशातच  आता पोलिसांनाही कोरोनाचा विळखा पडू लागला आहे. राज्यात आज पर्यंत आठ पोलिस अधिकारी आणि कर्मचार्यांना मृत्युने गाठले आहे. सोलापूर जिल्ह्यातही जवळपास 15 हून अधिक  पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यापूर्श्वभूमीवर पोलिसांची रोग प्रतिकारक शक्ती वाढवून त्यांना कोरोनापासून वाचवण्यासाठी  पंढरपुरातील पोलिसांना औषधी वनस्पतींची  विविध फुले आणि पानांपासून तयार केलेल्या आयुर्वेदिक काढा दिला जात आहे.

येथील आयुर्वेदिक  आबासाहेब रणदिवे यांनी तुळशी,जेष्ठ मध,सुंठ,हळद, कु़डूची  आदी औषधी वनस्पतीपासून तयार केलेल्या औषधी काढा दररोज एक महिनाभर सर्व पोलिसांना दिला जाणार आहे. औषधी वनस्पतीपासून तयार केलेला हा काढा दिल्यास पोलिसांची रोगप्रतिकारक शक्ती वाढून ते कोरोनाशी मुकाबला करती अशी या मागची भूमिका आहे. अशा प्रकारचा औषधी वनस्पतींपासून तयार केलेला  आय़ुर्वेदिक काढा प्रथमच पंढरपुरातील पोलिसांना दिला जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

ऑस्ट्रेलियामध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी भारत देणार सात विशेष विमान उड्डाणांना परवानगी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रवासांवर निर्बंध घातल्यामुळे ऑस्ट्रेलियामध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी २१ मेपासून भारतातून सात खास उड्डाणे आयोजित केली जाणार आहे. कॅनबेरा येथील भारतीय उच्चायुक्तांनी बुधवारी यासंदर्भात अधिकृत घोषणा केली. सरकारच्या ‘वंदे भारत मिशन’अंतर्गत एअर इंडियाची काही विशेष उड्डाणे भारतीयांना परत आणण्यासाठी घेण्यात येतील, अशी माहिती या अधिकृत अधिसूचनेत उच्चायोगाने दिली.

या अधिसूचनेत म्हटले आहे की, “या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात एअर इंडिया २१ मे ते २८ मे २०२० या कालावधीत ऑस्ट्रेलिया ते भारतातील विविध शहरांत विशेष उड्डाणे घेणार आहेत.” असे म्हटले आहे की जागा मर्यादित असल्याने बहुतेक अत्यावश्यक बाबी असलेल्या प्रवाशांनाच पहिले प्राधान्य दिले जाईल. जर शॉर्टलिस्ट केलेले प्रवासी २४ तासात तिकिट खरेदी करण्यात अपयशी ठरला तर त्याची जागा प्रतीक्षा यादीतील पुढील प्रवाशाला दिली जाईल.

यासाठीच खर्च प्रवासी स्वत: च करणार आहेत आणि शॉर्टलिस्टिस्ट केलेल्या प्रवाशांना हाय-कमिशन ईमेलद्वारे उड्डाणांविषयी सूचित करेल. ऑस्ट्रेलियामधील भारतीय समुदायाची लोकसंख्या सुमारे सात दशलक्ष आहे. भारतातील सुमारे ९०,००० विद्यार्थी ऑस्ट्रेलियन विद्यापीठांत शिक्षण घेतात. ऑस्ट्रेलियामध्ये कोरोना विषाणूची ६९७२ प्रकरणे आहेत आणि ९८ मृत्यू झाले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

सोलापूरात एका दिवशी वाढले 31 रुग्ण, एकूण संख्या 308, दोघांचा मृत्यू

सोलापूर प्रतिनिधी । सोलापूर शहरात आज एकूण 31 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले असून एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३०८ झाली आहे. आज नव्याने आढळलेल्या ३१ जणामध्ये पंधरा पुरुष आणि 16 महिलांचा समावेश आहे. आज दोन व्यक्तींचा मृत्यू झाला असून सोलापुरातील एकूण मृत व्यक्तींची संख्याही 21 झाली आहे.

आज मयत पावलेली पहिली व्यक्ती गुरूनानक परिसरातील 60 वर्षाची साठ वर्षांचे पुरुष आहेत. 11 मे रोजी दुपारी सव्वा बाराच्या दरम्यान त्यांना सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात गंभीर स्थितीमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याच दिवशी सायंकाळी सहा वाजता त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाला असून तो पॉझिटिव्ह आला आहे. मयत झालेली दुसरी व्यक्ती भवानी पेठ मोदी परिसरातील इंदिरा वसाहत मधील 72 वर्षांचे पुरुष आहेत. 12 मे रोजी सकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय त्यांना गंभीर स्थितीत दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याच दिवशी सकाळी साडेनऊ वाजता त्यांचे निधन झाले. त्यांचा कोरोना अहवाल प्राप्त झाला असून तो अहवाल पॉझिटिव्ह असल्याची माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली.

आज नव्याने आढळलेल्या 31 रुग्णांमध्ये सोलापुरातील साईबाबा चौकातील दोन पुरुष चार महिला, लष्कर सदर बाझार येथील एक पुरुष एक महिला, शास्त्री नगर येथील दोन पुरुष दोन महिला, नवनाथ नगर येथील एक महिला, भारतरत्न इंदिरा नगर येथिल तीन पुरुष व चार महिला, रामलिंग नगर येथील एक पुरुष, कुमार स्वामी नगर येथील एक महिला, बेगम पेठ येथील एक पुरुष, केशव नगर येथील एक पुरुष, गवळी वस्ती जुना कुंभारी रोड येथील एक पुरुष, जुळे सोलापुरातील एक पुरुष, एकता नगर येथील एक पुरुष, इंदिरा वसाहत भवानी पेठ येथील एक पुरुष, पोलीस मुख्यालय येथील एक महिला, रंगभवन येथील एक महिला, रविवार पेठेतील एक महिला अशा 31 जणांचा समावेश आहे.

दरम्यान, अद्यापही 142 जणांचे रिपोर्ट प्रलंबित आहेत. आज दिवसभरात 129 अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 98 अहवाल निगेटिव्ह असून ३१ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोनामुक्त झालेल्या बारा जणांना आज घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

PF संबंधी केंद्रानं केली ‘ही’ मोठी घोषणा; ७२ लाख कर्मचाऱ्यांना मिळणार फायदा

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजचा कोणकोणत्या क्षेत्राला फायदा होईल त्याची विस्तृत माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज दिली. उद्योग आणि कर्मचारी दोघांना भविष्य निर्वाह निधीसंबंधी दिलासा देणारी एक मोठी घोषणा त्यांनी केली आहे.

सरकारने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या तब्बल ७२.२२ लाख कर्मचाऱ्यांच्या ईपीएफसाठी विशेष आर्थिक पॅकेजमधून २५०० कोटींची मदत जाहीर केली आहे. त्यानुसार पुढील तीन महिने कर्मचाऱ्याच्या वेतनातून कापण्यात येणारे १२ टक्क्याचा भार सरकार भरणार आहे. पुढचे तीन महिने म्हणजे जून, जुलै आणि ऑगस्टमध्येही सरकारच पीएफचा पैसे भरणार आहे.

उद्योग आणि सर्वसामान्यांवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी सरकार भविष्य निर्वाह निधीचा भार उचलणार आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेजतंर्गत पीएफ फंडात कंपनीकडून देण्यात येणारे १२ टक्के आणि कर्मचाऱ्याच्या वेतनातून कापण्यात येणारे १२ टक्क्याचा भार सरकार भरणार आहे.कंपन्यांना कर्माचाऱ्यांच्या पीएफमधील योगदान आधी १२ टक्के इतके बंधनकारक होते. आता त्यात सरकारने कपात केली. खासगी कंपन्यांना आता १० टक्के इतके कर्मचाऱ्यांच्या पीएफमध्ये योगदान द्यावे लागेल. १०० पर्यंत कर्मचारी असणाऱ्या कंपन्यांमधील १५००० पर्यंत पगार असणाऱ्या कामगारांच्या पीएफचे योगदान हे सरकार भरणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”