Wednesday, December 24, 2025
Home Blog Page 5805

कोरोना संकटात शिक्षकांच्या अडचणी दूर करण्यासाठी शिक्षणमंत्र्यांना पत्र

कोल्हापूर प्रतिनिधी | कोरोना संकटाच्या काळात विविध समाजघटकांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. श्रमिक, कष्टकरी, शेतकरी वर्गाचा त्रास दिसून येतो आणि त्यावर बोललही जातं. मात्र अध्यापन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या लोकांना त्यांच्या संघटनेतर्फेच आपले प्रश्न मांडावे लागतात. राज्यातील शिक्षकांना कोरोना काळात कराव्या लागणाऱ्या ड्युटी संदर्भात आणि त्यांच्या सुरक्षेसंदर्भात एमफुक्टो या शिक्षक संघटनेत उपाध्यक्ष पदावर कार्यरत असणाऱ्या शिक्षकांनी पत्र लिहिलं आहे. आपल्या मागण्या त्यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यापुढे मांडल्या आहेत.

प्रति
मा. वर्षाताई गायकवाड,
शालेय शिक्षण मंत्री
महाराष्ट्र शासन,
मुंबई.

विषय: कोरोना ड्युटीवरील शिक्षकांच्या अडचणी दूर करणेबाबत…

महोदया,
कोरोना साथीत राज्यातील विविध जिल्ह्यांत शिक्षकांना ड्युटी देण्यात आली आहे. परंतु त्या ससंदर्भात अनेक गंभीर अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशा परिस्थितीत स्वतःचा जीव धोक्यात असूनही शिक्षक काम करीत आहेत. असे काम करताना शिक्षकाना कोरोनाची लागण होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामळे वरिष्ट प्रशासनाने शिक्षकांच्या अडचणीकडे तातडीने लक्ष देण्याची व त्या दूर करण्याची गरज आहे.

ला. ना. सार्वजनिक विद्यालय, जळगावचे शिक्षक एस.एच.कोळी यांना रेशनिंग दुकानावर ड्युटी करत असताना कोरोनाची लागण होऊन त्यांचे दु:खद निधन झाले आहे. कोरोनाच्या ड्युटीवर असलेल्या सांगलीचे प्राथमिक शिक्षक नानासो कोरे यांनाही आपले कर्तव्य बजावत असताना सिमेंटने भरलेल्या ट्रकने उडवले. अशा प्रकारच्या गंभीर घटना घडत आहे, तसेच शिक्षकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तरी या संदर्भात खालील मागण्याची पुर्तता करण्यासाठी तातडीने योग्य ती कार्यवाही करावी ही नम्र विनंती.

  1. ड्युटीवर असलेल्या शिक्षकांवर केली जाणारी मनमानी त्वरित थांबवा.
  2. शिक्षकांना सदर काम करण्यासंबंधी लेखी पत्र द्यावे. त्यांमध्ये कामाचे स्वरूप, सर्वांना कामाचे समान तास आणि कोणते अधिकार आहेत ते स्पष्ट केले पाहिजे.
  3. कोरोना ड्युटीवरील सर्व शिक्षकांना सुरक्षितता कीट देण्यात यावे.
  4. सदर शिक्षकांना आपले काम करण्यासाठी कामाच्या ठिकाणी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधांंची (बैठक व्ययवस्था, सावली, पाणी) पुर्तता करण्यात यावी.
  5. प्रत्येक चेक पोस्टवर शिक्षकांसोबत किमान एक पोलीस कर्मचारी असलाच पाहिजे.
  6. सदर शिक्षकांना विमा संरक्षण द्यावे.
  7. कोरोना साथीत ड्युटी बजावत असताना मृत्यू झालेल्या शिक्षकांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपये नुकसान भरपाई राज्य सरकारने द्यावी.
  8. शिक्षकांना केलेल्या कामाचे प्रमाणपत्र द्यावे.

आपला नम्र,
प्रा. डाॅ सुभाष जाधव (कोल्हापूर)
राज्य उपाध्यक्ष, एमफुक्टो (महाराष्ट्र प्राध्यापक महासंघ)

LockDown 4 | 18 मे पासून पुढे सुरु – चौथ्या लॉकडाऊनसाठी नव्या सुधारणांची नरेंद्र मोदींची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना आत्मनिर्भर करण्यासाठी २० लाख कोटींच्या भव्यदिव्य पॅकेजची घोषणा केली. हे आर्थिक पॅकेज कुटिरोद्योग, ग्रामीण भारताची व्यवस्था सुधारण्यासाठी आणि भारताच्या विकासासाठी असणार असून हे पॅकेज कष्टकऱ्यांसाठी आहे, देशातील मध्यमवर्गीयांसाठी आहे आणि देशाची औद्योगिक धुरा सांभाळणाऱ्यांसाठी सुद्धा असल्याचं नरेंद्र मोदींनी आज स्पष्ट केलं.

देश पुढं जाण्यासाठी या पॅकेजची आवश्यकता असून संकटकाळात भारताची व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी मागील ६ वर्षांच्या एकूण अभ्यासातून हे निर्माण केल्याचं नरेंद्र मोदींनी यावेळी स्पष्ट केलं. जनधन, आधार आणि मोबाईल या त्रिसूत्रीचा अधिकाधिक वापर करुन आपण पुढे जाऊयात असा नारा नरेंद्र मोदींनी यावेळी दिला.

भारतीयांच्या सहनशीलतेचं नरेंद्र मोदींनी कौतुक केलं. त्यांना झालेल्या त्रासाची तीव्र वेदना मलाही आहे. आता मात्र इथून पुढचं प्रत्येक पाऊल हे त्यांना सक्षम करण्यासाठीच टाकायचं यावर नरेंद्र मोदींनी जोर दिला. स्थानिक सुविधांनीच आपल्याला कोरोना संकटाच्या काळात तारलं असून नागरिकांचा लोकल ते ग्लोबल प्रवास आपल्याला याच आत्मनिर्भरतेतून करायचा आहे असं मोदी यावेळी म्हणाले.

लॉकडाऊन ४.० १८ मे पासून
भारतात लॉकडाऊनचा चौथा टप्पा १८ मे पासून सुरु होणार असून यात नवीन सुधारणा केल्या जातील असं नरेंद्र मोदी भाषणाच्या शेवटी म्हणाले. नरेंद्र मोदींच्या आजच्या भाषणाचा पूर्ण रोख हा भारताच्या आत्मनिर्भरतेवर आणि स्वयंपूर्णतेवर असल्याचं पाहायला मिळालं.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

कोरोना संकटात आत्मनिर्भर भारताचा नरेंद्र मोदींकडून पुनरुच्चार

नवी दिल्ली । देशातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी केलेल्या चर्चेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्या लॉकडाऊनच्या मध्यात देशवासीयांशी पुन्हा एकदा संवाद साधला. कोरोना संक्रमणाशी लढताना जगभराने मागील ४ महिने लढा दिला असून जगभरात ४२ लाख लोकांना याचा संसर्ग झाला, ज्यामध्ये पावणेतीन लाख लोकांचा मृत्यू झाला. भारतातही यामुळे बऱ्याच लोकांचा मृत्यू झाला असून त्या सर्वांप्रति मी श्रद्धांजली व्यक्त करतो असं म्हणत मोदींनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी कोरोनाच्या संकटात आत्मनिर्भर भारताचा नरेंद्र मोदींकडून पुनरुच्चार केला गेला.

पंतप्रधान मोदी म्हणाले कि, ”२१ वं शतक भारताचं आहे असं आपण म्हणत होतो त्यावेळी येणाऱ्या प्रत्येक अडचणींचा सामना स्वतःच्या हिमतीने करण्याचा विचार आपण केला होता. त्यामुळे आज येणारी प्रत्येक समस्या ही संधी म्हणून पाहायला हवी असा विश्वास नरेंद्र मोदी यांनी जनतेला दिला. याबाबतचं उदाहरण देताना पीपीई किट आणि N95 मास्कसाठी संपूर्ण परावलंबी असणारा भारत, कोरोना संकटानंतर स्वयंपूर्ण झाल्याचं नरेंद्र मोदींनी सांगितलं. आज जगभरात आत्मनिर्भरतेचे संदर्भ बदलले असून अर्थकेंद्री जग विरुद्ध मानवतेचं जग हा प्रश्न प्रामुख्याने उभा राहिला आहे असं मोदी म्हणाले.

भारताने नेहमीच वसुधैव कुटुंब या भूमिकेला पूरक काम करत राहिला असून भारताच्या आत्मनिर्भरतेमध्ये सर्वांची काळजी, शांती आणि सामंजस्याची भूमिका जाणवते असं नरेंद्र मोदींनी यावेळी स्पष्ट केलं. सुखी, समृद्ध विश्वासाठी भारताची आत्मनिर्भरता दिशादायक ठरेल असंही मोदी पुढे बोलताना म्हणाले.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Big Breaking News | आत्मनिर्भर भारतासाठी PM मोदींची 20 लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा

नवी दिल्ली । कोरोना संकटाशी लढण्यासाठी केंद्र सरकारने १.७९ लाख कोटींची तरतूद केली होती. त्यामध्येच आज वाढ करत नरेंद्र मोदींनी एकूण २० लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा केली. हागणदारीमुक्त भारत, कुपोषणमुक्त भारत, स्वच्छ भारत, टीबीमुक्त भारत या गोष्टी जेव्हा भारत पुढे आणतो त्यावेळी जग भारताकडे अभिमानाने बघत असतो या जुन्याच पारंपरिक उदाहरणांचा दाखला मोदी यांनी यावेळी दिला.

गुलामगिरीतील भारत आता विकासाकडे निघाला असून या प्रवासातही भारताने विश्वकल्याणाचा मार्ग अवलंबला असल्याचं मोदी यावेळी म्हणाले. जगात ज्या गोष्टी सुधारण्यासाठी भारतीयांची गरज लागेल त्या गोष्टींसाठी भारत नेहमीच सज्ज राहील हे सांगत असताना नरेंद्र मोदींनी कच्छच्या भूकंपाची आठवण करुन दिली. संकटातून बाहेर पडायचा विचार केला तर आपण ते करुच शकतो याचा पुनरुच्चार नरेंद्र मोदींनी केला.

आत्मनिर्भर भारताची निर्मिती ५ मजबूत घटकांवर अवलंबून असून अर्थकारण, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, विविधता आणि मागणी हे ते घटक असल्याचं नरेंद्र मोदींनी स्पष्ट केलं.

-अर्थमंत्र्यांकडून या पॅकेजची सविस्तर माहिती दिली जाईल
– देशातील शेतकऱ्यांसाठी आणि उद्योगांसाठी हे आर्थिक पॅकेज आहे
-२० लाख कोटींचे हे पॅकेज आत्मनिर्भर भारतासाठी गती देईल
-२० लाख कोटी रुपयांचे हे पॅकेज आहे. भारताच्या जीडीपीच्या १० टक्के इतके आहे
-करोना संकटाचा सामना करण्यासाठी नवीन संकल्पानुसार विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

नरेंद्र मोदी Live | अब बचना भी हैं, और आगे भी बढना हैं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन संदर्भात देशवासीयांशी संवाद साधला. देशातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी केलेल्या चर्चेनंतर नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्या लॉकडाऊनच्या मध्यात देशवासीयांशी हा संवाद साधला. कोरोना संक्रमणाशी लढताना जगभराने मागील ४ महिने लढा दिला असून जगभरात ४२ लाख लोकांना याचा संसर्ग झाला, ज्यामध्ये पावणेतीन लाख लोकांचा मृत्यू झाला. भारतातही यामुळे बऱ्याच लोकांचा मृत्यू झाला असून त्या सर्वांप्रति मी श्रद्धांजली व्यक्त करतो असं मोदी म्हणाले.

एका व्हायरसने संपूर्ण जगाला वेठीस धरलं असून अशा प्रकारच्या आपत्तीतून आपण कधीच गेलो नसल्याचं मोदी म्हणाले. हा प्रसंग अवघड असला तरी त्यातून खचून न जाता आपल्याला लढावं लागेल आणि पुढंसुद्धा जावं लागेल असं नरेंद्र मोदी पुढं बोलताना म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

राज्य सरकारी कर्मचारी मुख्यमंत्री सहायता निधीला देणार एका दिवसाचं वेतन

मुंबई । करोना संकटामुळंं आर्थिक अडचणीत सापडलेल्या राज्य सरकारच्या मदतीसाठी सरकारी कर्मचारी धावून आले आहेत. मे महिन्यातील एका दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला देणार आहेत. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेनं हा महत्वाचा निर्णय घेतला आहे.

राज्यात कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता जवळजवळ सर्वच सेवा, उद्योग ठप्प आहेत. त्याचा थेट परिणाम राज्याच्या तिजोरीवर पडला आहे. राज्याला मिळणाऱ्या महसुलात मोठी घट झाली आहे. सरकारची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. या अडचणीच्या काळात राज्य सरकारी कर्मचारी सरकारच्या मदतीला धावून आले आहेत.

सरकारला आर्थिक मदत हवी म्हणून, राज्यातील सर्व कर्मचारी मे महिन्यातील एका दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीत देणार आहेत. संघटनेच्या वतीने राज्य सरकारला निवेदन देऊन कळवण्यात आले आहे. जवळपास साडेपाच लाख कर्मचाऱ्यांचे अंदाजे ३०० कोटी रुपये या निधीत जमा होणार आहेत.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

अभिनेत्री तापसीच्या आयुष्यात एका खास व्यक्तीची एन्ट्री; रिलेशनशीपबद्दल केला जाहीर खुलासा

मुंबई । बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू तिने सिनेमात साकारलेल्या उत्तम भूमिकांमुळे नेहमीच चर्चेत असते. काही महिन्यांपूर्वीच तिचा ‘थप्पड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील तिच्या भूमिकेसाठी तीच सर्वत्र कौतुक होत आहे. बॉलीवूडमध्ये तिनं आपलं स्थान सेलिब्रिटी स्टार पेक्षा एक उत्तम अभिनेत्री म्हणून मजबूत केलं आहे. अशा वेळी तापसी सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळं चर्चेत आली आहे. तापसीच्या आयुष्यात खास व्यक्तीची एन्ट्री झाली असून हा व्यक्ती एक प्रसिद्ध खेळाडू आहे. तापसीनं नुकताच तिच्या रिलेशनशीप विषयी खुलासा केला आहे.

प्रसिद्ध बॅडमिंटनपटू ‘मॅथियस बो’ याला डेट करत असल्याचा खुलासा खुद्द तापसीनं एका खासगी वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. ‘एक अभिनेत्री म्हणून केवळ चर्चेत राहण्यासाठी मी हे सांगत नाहीए. मला कोणापासूनही काहीच लपवायचं नाही आहे. माझ्या आयुष्यात मॅथियस खास व्यक्ती आहे याचा मला फार आनंद आहे’, अशी भावना तिनं व्यक्त केली आहे.

‘माझ्या घरच्यांना देखील आमच्या नात्याबद्दल कल्पना आहे. फक्त मला तो आवडला हे महत्त्वाचं नाहीए. माझ्या आई-वडिलांना आणि आवडायला हवा. त्यांनी आमचं नातं स्विकारलं आहे, याचा अर्थ त्यांनाही तो आवडतोय. आई-वडिलांनी नको म्हटलं असतं तर मला वाटत नाही की आमचं नातं इथपर्यंत पोहोचू शकलं असतं’, असंही तापसीनं म्हटलं आहे.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

कराड तालुक्यात ५२ वर्षीय पुरुष कोरोना बाधित; ८९ जण विलगीकरण कक्षात दाखल

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे बाधित रुग्णाचा निकट सहवासित 52 वर्षीय पुरुष कोरोना बाधित (कोविड-19 ) असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. तसेच एकुण ८९ जणांना आज विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असल्याचेही गडीकर यांनी सांगितले आहे.

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 3, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील एक, कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 22 व उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 21 असे एकूण 47 जणांचा अहवाल निगेटिव्ह आले असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.

89 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 43, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे 22, ग्रामीण रुग्णालय वाई येथे 7, व कोरेगांव येथे 17 असे एकूण 89 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली.

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या- 122 झाली असून या पैकी उपचार घेत असलेले बाधीत रुग्ण (कोविड-19)- 84, कोरोना मुक्त होवून घरी गेले रुग्ण- 35, कोरोना बाधित मृत्यु झालेले 2 रुग्ण आहेत.

सलमान-जॅकलीनचं नवं रोमॅन्टिक गाणं रिलीज; लॉकडाऊनमध्ये सलमाननं फार्म हाऊसवर केलं शूट

मुंबई । कोरोना व्हायरसमुळे देशात लागू केलेल्या लॉकडाऊमुळे लोक आपापल्या घरांमध्ये बंद आहेत. बॉलिवूडचा दबंग सलमान खान सुद्धा लॉकडाऊनमुळे जवळपास आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत पनवेल येथील त्याच्या फार्महाउसमध्ये अडकला आहे. यावेळी त्याच्यासोबत जॅकलीन, वलूशा डीसूजा आणि आयुष शर्मा हे सुद्धा आहेत. याकाळात सलमान खानने ‘प्यार कोरोना’ हे आपलं गाणं रिलीज केलं होतं. त्याच्या चाहत्यांनी हे गाण डोक्यावर घेतलं होतं. अशातच आता सलमान खानने त्याचं नवं कोरं गाणं ‘तेरे बिना’ लॉन्च केलं आहे. या म्युझिक व्हिडीओमध्ये सलमानसोबत अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस आहे.

या म्युझिक व्हिडीओबाबत खास गोष्ट म्हणजे, हे संपूर्ण गाणं सलमान खानने आपल्या पनवेलमधील फार्म हाऊसवर शूट केलं आहे. व्हिडीओ पाहताना हा व्हिडीओ फक्त एकाच ठिकाणी शूट केला आहे, यावर विश्वासच बसत नाही. डोंगर, रस्ते आणि तलाव यांमुळे या गाण्यातील लोकेशन्स तुम्हाला आपल्या प्रेमात पाडतात. गाण्यामध्ये सलमान खान आणि जॅकलीन फर्नांडिस या दोघांमधील रोमॅन्टिक केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.
चला तर पाहुयात हे गाणं..

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

एअर इंडियाचा कर्मचारी निघाला कोरोना पॉझिटिव्ह; मुख्यालय सील

नवी दिल्ली । संपूर्ण देशात कोरोनानं थैमान घातलं आहे. दिवसागणिक कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. अशातच दिल्लीतील एअर इंडियाच्या मुख्यालयात कार्यरत असलेल्या एका ५४ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

यानंतर एअर इंडिया कंपनीचं लुटियन्स झोनमधील मुख्यालय दोन दिवसांसाठी सील करण्यात आलं आहे यासोबतच मुख्यालयाचा परिसरही सॅनिटाईझ करण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. टाईम्स ऑफ इंडियानं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

काही दिवसांपासून मुख्यालयात कार्यरत असलेल्या एका ५४ वर्षीय कर्मचाऱ्याची प्रकृती ठीक नव्हती. त्यामुळे ते होम क्वारंटाइन होते. याचदरम्यान त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. “एअरलाइन्स हाऊसमध्ये काम करणाऱ्या आमच्या एका कर्मचाऱ्याचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आपल्या कर्मचाऱ्यांचं संरक्षण आणि कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी कंपनी कटिबद्ध आहे. संबंधित कर्मचाऱ्याला सर्वतोपरी मदत केली जाईल,” असं एअर इंडियाकडून सांगण्यात आलं.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”